कृष्णा , थांबव तुझा पावा

Submitted by अवल on 3 July, 2010 - 09:53


( हे चित्र नव्याने काढले आहे. खालची कवितामात्र आधीचीच !)

घरचे सारे काम, अन सासूचा पहारा
संध्याकाळची वेळ, अन सा-यांच्याच नजरा
कृष्णा , थांबव ना पावा ! कृष्णा , थांबव तुझा पावा
कालिंदीचा तट, तिथे गोपांचा मेळावा
कदंबाची सावली, जिथे सगळ्यांना विसावा
कृष्णा , थांबव ना पावा ! कृष्णा , थांबव तुझा पावा
मनीची मझ्या घालमेल, त्यात तुझा पुकारा
होते कालवाकालव, मन पिसाटवारा
कृष्णा , थांबव ना पावा ! कृष्णा , थांबव तुझा पावा
गोळा झाले सारे, गोकुळ भोवती तुझ्या
राहिले नाही भान, जनाजनास सा-या
आता हरकत नाही, सख्या वाजव तुझा पावा कृष्णा , वाजव ना पावा !

गुलमोहर: 

कृष्णाचा चेहरा फार सुरेख अवतरलाय! Happy कविता आणि चित्र दोन्ही माझ्या आवडत्या कृष्णाचे आणि छानच!

धन्यवाद !
कविता, माझं फॉर्मल शिक्षण M.A., M. Phil. ( History). आता अ‍ॅनिमेशन शिकतेय, त्यात पहिल्या १५ दिवसात बेसिक चित्रकला शिकवली त्यांनी अन मग फोटोशॉपमध्ये प्रयोग करत गेले माझी मीच Happy पण या वयात हे सगळे शिकणे जरा जडच जातं गं.
तशी अगदी लहानपणा पासून चित्र काढते, पण त्याचे शिक्षण नाही घेता आलं Sad

आरती, छान चित्र. या वयात का होइना तुला चित्र काढता येतय हे नशीब.

आम्ही माणूस काढला तरी लोकाना तो बेडूक वाटेल.. कुठल्याही वयात Proud

Pages