५-६ चिवनी
फोडणी - १ गड्डा लसूण पाकळ्या ठेचुन, हिंग, हळद, मसाला २ चमचे.
लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
चवीपुरते मिठ
१ हिरवी मिरची
थोडी चिरलेली कोथिंबीर.
भांड्यात तेलावर वरील फोडणी टाकुन चिवनी व चिंचेचा कोळ टाकावा. थोडे पाणी घालावे. मिठ घालावे व चिरलेली कोथिंबीर घालुन मिरची मोडून घालावी. उकळी आली की ३-४ मिनीटे शिजवुन गॅस बंद करावा.
चिवनी ही मच्छी सुरवातीचा जोरदार पाउस पडून जेंव्हा पाणी वाहू लागत तेंव्हा येतात. ही चिवनी ह्या दिवसात गबोळीने भरलेली असतात. उधाण आल्यावर अंडी घालण्यासाठि ही वर आलेली असतात. म्हणुन ह्यांना उधवणीची चिवनी म्हणतात. ही समुद्रातुन वाहत खाडीत, विर्यात शेतात जातात. ह्या दिवसात हे चिवने पकडण्यासाठी सगळे मच्छीप्रेमी आसु घेऊन जागोजागी दिसतात.
चिवनी साफ करण्यासाठी राखाडी घ्यावी लागते. ती नसेल तर तांदळाचे पीठ थोडे थोडे बोटांना लावुन साफ करावी लागतात. कारण ती बुळबूळीत असतात. हातात घेतल्यावर हातातुन सटकतात. ह्यांच्या पाठीवर एक टणक काटा आसतो तो राखाडी हातात घेउन मोडतात.
मला हा काटा वगैरे काढता येत नाही म्हणून मी त्या काट्याच्या जवळून डोकच काढुन टाकते. डोक्याच्या जवळच हा काटा असतो. मच्याकडे कोणी जास्त डोकी खात नाहीत मच्छीची. त्यामुळे साफ करायलाही सोप पडतात.
ह्यातील गाबोळी खाण्यासाठी ही मच्छी लोकप्रिय आहे.
जागु तुस्सी ग्रेट
जागु तुस्सी ग्रेट हो...
माझ्या मावशीला राखाडीने मासे साफ करताना गावी पाहिले होते त्याची आठवण झाली.
माझ्या गावी पहिला पाऊस पडुन सगळीकडे पाणीच पाणी झाले की मासे चढतात.. नदीच्या आजुबाजुला भातशेती आहे ती पुर्ण पाण्याखाली जाते आणि सगळीकडे मासेच मासे होऊन जातात. धरणातले मासे चढत असल्यामुळे खुप मोठेमोठे मासे असतात ते. लोक रात्रीबेरात्री हातात एक बादली, मासे मारायला एक कोयता आणि बॅटरी घेऊन शेतात हिंडतात. गावात मिळणारे हेच मासे, नाहीतर मग एरवी नदितले बोटाएवढे लहान मासे, किंवा वाडीतुन येतात ते.
मुंबैला राहणारे आंबोलकर चाकरमनी ह्या दिवसात मुद्दाम गावाला भेट देतात, आणि गावाला मे महिन्यात गेलेले लोक हे मासे खाल्ल्याशिवाय मुंबैचा रस्ता धरत नाहीत....
ही आहेत चिवनी ही आहेत साफ
ही आहेत चिवनी

ही आहेत साफ केलेली चिवनी


हे काहे चिवनीचे कालवण (रस्सा)
प्रकाटाआ
प्रकाटाआ
प्रेग्नंट डेड फिश? प्लीज
प्रेग्नंट डेड फिश? प्लीज
जागु धन्स हि क्रुती इथे
जागु धन्स हि क्रुती इथे टाकल्याबद्दल . आमच्याइथे मिळते हि मच्छी पावसामधे , आज संध्याकाळी सासरे आणणार आहेत चिवनी ,तुझ्या पध्दतीने करून बघेन . पण मला साफ करता येत नाही यावरून सासर्याचा खुप ओरडा खाते (मस्करीत) , मी माझ्या कामवालीकडून साफ करून घेते
असेच दिसणारे पण रंगाने जरा
असेच दिसणारे पण रंगाने जरा काळे असणारे मासे मी धरलेत गावी नदीत..
त्यांच्या डोक्यावर तिन दगड असतात असे मावशी म्हणायची.
उद्या सकाळी मासळी बाजारात जाते आणि शोधते. बेलापुरच्या दिवाळेगावातल्या मार्केटात मिळायला पाहिजेत..
अश्विनी, वरील चित्र वाईट आहे हे नक्कीच.. खरेतर आपण आषाढ ते श्रावण संपेपर्यंत मासे खात नाही कारण हा काळ त्यांच्या प्रजननाचा असतो. आता माश्यांची संख्या इतकी खालावतेय की आपण मुद्दामहुन खाणे बंद केले पाहिजे. पण बाहेर चित्र उलटे आहे. पहिल्यासारखे आता पाऊस सुरू झाला की मासळीबाजार बंद पडत नाहीत.
मग मिळताहेत म्हणुन आपणही खातो.
आणि दुसरे असे की हे काही खास मासे फक्त आताच मिळतात. छोट्या गावांमध्ये ते खाल्ले तरी एकुण प्रजननावर फारसा परिणाम होत नसावा.
जागु, फोटो अगदी ताजेताज
जागु, फोटो अगदी ताजेताज दिसताहेत.. लक्की गं तु...
आताच गावी फोन करुन काकाशी
आताच गावी फोन करुन काकाशी बोलले.. तो गेले दोन दिवस मासेच खातोय शेतातुन मारुन आणलेले
पुर्वी मळे नावाचे मासे
पुर्वी मळे नावाचे मासे दिसायचे, ते पण असेच चिकट असायचे. अजूनही मिळत असतील. जागू, तूमच्याकडे जिताडे, मिळतात कि नाही ?
पुर्वी मळे नावाचे मासे
पुर्वी मळे नावाचे मासे दिसायचे,
दिनेश मला वाटते मी वर जे मासे लिहिलेत ना आंबोलीतल्या नदीतले, त्यानचे हेच नाव आहे. उद्या गावी फोन करुन विचारते.
अश्विनी, काव्हीयार म्हणजे
अश्विनी, काव्हीयार म्हणजे दुसरं काय? - माशाची अंडीच. ती अशीच येतात.
साधना कधी वाशीला येण झाल तर
साधना कधी वाशीला येण झाल तर तुला आणतेच मासे.
दिनेशदा जिताडे मिळतात आमच्याकडे. मिळाले की टाकतेच इथे.
नुतन केले का काल चिवने ?
जॅग्स, धन्स गं... ये लवकर...
जॅग्स, धन्स गं... ये लवकर...
प्रकाटाआ म्हणजे ?????
प्रकाटाआ म्हणजे ?????
मेघना मलाही नाही कळला
मेघना मलाही नाही कळला अर्थ.
प्रत्यक्ष ____ टाक आता असा आहे का ?
प्रतिसाद काढुन टाकला आहे. -
प्रतिसाद काढुन टाकला आहे. - प्रकाटाआ
हो जागु केले होते शुक्रवारी ,
हो जागु केले होते शुक्रवारी , मस्त झाले होते असे सासरे म्हणाले , कारण मी खात नाही ना चिवने
तु का खात नाहीस ? खाउन घे.
तु का खात नाहीस ? खाउन घे. ह्याच महिन्यात चांगले मिळतील.
साधना, थँक्स . मी इतकी
साधना, थँक्स . मी इतकी वेगवेगळी काँबिनेशअन करुन बघितलि आहेत ह्याची. मलाहि प्रकाश चित्र टाकण्यासंबंधी वाटत होतं.
जागु , तुझ्या रेसिपी बद्दल आधी मी कहिच म्हंटलं नाही , सॉरी गं. आमच्या घरी ( सासरी) अंड्याचं नावही काढुन चालत नाही. पण मला आवड्तं , मी बाहेर खाते. पण माझी धाव फक्त पॉपलेट, सुरमई, कोलंबी इतपतच आहे, बाकीचे मासे कधी खाल्ले नाहीत,. नाही म्हणायला लग्नाआधी एकदाच खेकडा खाल्लाय.
मला नुसत्या रेसीपीज वाचायला सुध्दा आवड्तात. ( दुधाची तहान ताकावर !!).
तुझी रेसिपी एकदम झकास दिसतेय.
अग मला नाही आवडत हि मच्छी ,
अग मला नाही आवडत हि मच्छी , मला फक्त काळे मासेच आवड्तात . पण माझ्या सासरी सगळ्यांनाच आवडते हि पावसाळ्यातली मच्छी .
धनुडी धन्स. नुतन तु नुसती
धनुडी धन्स.
नुतन तु नुसती गाबोळी खाउन बघ मासा नको खाउ.
बा बीबी नाही आवडला.. फोटो
बा बीबी नाही आवडला..
फोटो मला बरोबर वाटले नाहीत 
जागु ह्या रविवारीच केलेली हि
जागु ह्या रविवारीच केलेली हि चिवनी , माझी मुलगी तर फक्त गाबोळीच खात होती
नुतन अजुन आमच्याकडे यायची
नुतन अजुन आमच्याकडे यायची आहेत. आता पावसाला सुरुवात झालेय. उद्या परवा पर्यंत येतीलच.
आमच्या कडे यायला सुरूवात
आमच्या कडे यायला सुरूवात झालेय , माझ्या सासरे आणी नवर्या बरोबर माझी लेकही आवडीने खाते.
जागू वर्णन आवडलं.. पण
जागू
वर्णन आवडलं..
पण चित्रं थोडी अंगावर आली.
दक्षे खायला सुरुवात केलीस की
दक्षे खायला सुरुवात केलीस की काहीच नाही वाटणार.
नुतन
या चिवनी माश्याबद्दल आईला
या चिवनी माश्याबद्दल आईला सांगितल्या वर ती म्हणाली कि गावी यालाच मळे मासे म्हणतात. पण ती हे ही म्हणाली कि मुंबईत हे मासे न खाल्लेले चांगले कारण कोणत्या पाण्यातील असतील सांगता येत नाही. गावी हे मासे शेतात पकडतात त्यामुळे खायला हरकत नाही.
जागू हे मासे वाशीला मिळतात का?
sahi..
sahi..
सामी तिथल्या करावे-दारावे
सामी तिथल्या करावे-दारावे गावातील खाडीत कदाचीत मिळत असावेत.
अमि धन्स.
Pages