- स्वगृह
- या गृपमधे भाग घेण्यासाठी मायबोलीत प्रवेश करा/मायबोलीकर व्हा !
व्हर्जिनिया / वॉशिंग्टन डी.सी.
सदस्य प्रवेश |
व्हर्जिनिया / वॉशिंग्टन डी.सी.व्हर्जिनिया / वॉशिंग्टन डी.सी. मधले मायबोलीकर |
|
माझा नंबर पहिला!
(कोणते नाव घ्यावे कळले नाही!)
-लालू
अगं व्हर्जिनिया/वॉशिंग्टन बीबीचंच नाव घे की ..
कुणी म्हणा पंगत, कुणी म्हणा ठेला
हा मात्र माझा मुहल्ला
व्हर्जिनीया/वॉशिंग्टन बीबी वर पोस्ट टाकायला
माझा नंबर पहिला
कोणतंही घे अगं!
'नावात काय आहे' असं तो कुणीसा म्हणाला नव्हता का?
काय बरं नाव होतं... श वरून होतं काहीतरी...
लालु तु पण कोपर्यात हिंदमाता उभी केलीस की, पहिला नंबर घेवुन.
तिसरं राज्य ..
चला, चला, चला
अजून एक बा.फ. आला
चकाट्या पिटायला
माझा नंबर पहिला
'श' वरून म्हणजे? शेरलॉक होम्स कधी म्हणाला असे? की शर्मिला स्वत:च म्हणाली? (आता ती कोण ते विचारू नका...)
राम राम पावनं
टायडल बेसीनची चक्कर झाली काय?
आम्ही फेरफटका मारून आलो. यंदा बहर ठीक वाटला पण रंग जरा मीळ्मीळीत वाटले.
त्यात पुनः गाडी लांब लावावी लागतिये.
वसंत सरत आला तरी थंडी हटेना की वो. जरा डेक वर गेल की भणाणा वारा लागतोय.
गरम कच्च ऊन्हाची आस लागून राहीलीये जीवाला.
-झक्कास
रंग मिळमिळीत? ढगाळ ब्यागराउंड वर तसे वाटले असतील ते!
ऊन नको इतक्यात, पाऊस पडू दे जरा. नाहीतर मागल्या वर्षागत दुष्काळ..
-लालू
अय्या!! उसगावात पण दुष्काळ पडतो??/
अमृता, अगं मागच्या वर्षी आमच्या काउंटीत आत्तापर्यतची सगळ्यात वाईट परिस्थिती होती. मग काउंटी पाणी वापरण्यावर बंधने घालते. लॉन ला काही ठरावीक वेळी ठरावीक काळापुरतेच पाणी घालायचे, झाडांना hose ने पाणी घालायचे नाही gallon च्या कंटेनर ने घालायचे, गाड्या धुवायच्या नाहीत. एकाच्या पाण्याच्या पाईप मधे चीर पडून लीक होत होतं ते त्याला बिल पाहिल्यावर लक्षात आलं, भरपूर बिलाबरोबर त्याला दंडही बसला, वेळेवर फिक्स केले नाही म्हणून.
तुम्ही राहता तिथे असे काही कधी होते का माहित नाही. पण मागच्या वर्षी अशी परिस्थिती इकडे बर्याच ठिकाणी होती. NC, GA मध्येही.
आमच्या इथे २००८ साली तरी जोरदार पाउस पडलाय. पण २००२, २००५ अन २००७ साली ऐन उन्हाळ्यात पाण्याची फार emergency होती. आम्हाला पण असलेच सगळे नियम होते. कार वॉश वगैरे पण बंद करायला लावले होते. २००२ सालच्या उन्हाळ्यात आमच्या अंगणातली दोन मोठी जुनी झाडं सुकायला लागली अन २००३ सालच्या सप्टेम्बर मधे पूर्ण सुकल्याने तोडून टाकावी लागली
तसं दुर्भिक्ष नको. पण निळंभोर निरभ्र आभाळ असणारं उन पाहिजे लवकर!
अमृता, लालु - शोनु म्हणतायत तसा दुष्काळ मागच्या वर्षी NC मधे होता. माझी मैत्रिण राहते तिकडे.. ती सांगत होती.
साऊथला हे प्रॉब्लेम्स जास्त असतात का?
बापरे.. कायच्या काय. इथे CT मधे नसाव अस काहि.
आज काय सुंदर उन पडलय आणि तपमान पण चक्क ७० फ.
हो अमृता आज आमच्याकडे सुद्धा असेच आहे तापमान त्यामुळे खुप मस्त वाटतय.
१० जुलै ते १३ जुलै डी सी ला येतेय सहकुटुंब. कुणाकुणाची भेट होऊ शकतेय?
व्हर्जिनिया मधील मायबोलीकरांनो तुम्ही सर्व सुखरूप आहात अशी आशा करते.
तीन ट्विस्टर्स म्हणजे अगदीच भयानक.काळजी घ्या.
जोर्ज बुश, थोमस जेफरसन, अब्राहम लिन्कन वगैरे वगैरे..
- अनिलभाई
नमस्कार मंडळी,
स्थानिक कार्यक्रम
शनिवारी मराठी कला मंडळाचा मे दिनानिमीत्य कार्यक्रम 'गजरा'.
यावा.
-झक्कास
झककास,
अरे, तू आता म्.क.मं चा प्रेसिडेंट नाहीस. विसरलास का? ईतर लोक आहेत आमंत्रण करायला.....
--------------------
-- कार्टा.
--------------------
अरे कारट्या,
मंड्ळाच्या आमंत्रणला काय प्रेसीडेंट्च पहिजे असं नाही. मंडळावर प्रेम असणारं कोणीही चालत.
- झक्कास.
मंडळी,
मायबोलीच्या टी-शर्ट तसेच टोपीची विक्री चालू झाली आहे.
अधिक माहितीसाठी इथे पहा व लवकर आपापली ऑर्डर बुक करा...
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
त्वरा करा ! त्वरा करा !! त्वरा करा !!!
टी-शर्ट नोंदविण्याची शेवटची तारीख उद्या आहे. आत्तापर्यंत ९० पेक्षा जास्त टी-शर्टस ची नोंदणी झाली आहे. त्यात तुमची नोंदणी आहे का? नसल्यास त्वरीत आपली नोंदणी नोंदवा.
धन्यवाद,
टी-शर्ट समिती
नमस्कार मन्डळी !!
White House ला जायचा असेल तर जवळ्पास कोणते Train Station आहे?
DC ची Duck tour चान्गली आहे का??
'मेट्रो सेंटर' आणि 'मॅकफर्सन स्केअर' हे सर्वात जवळचे आहेत. कूठून येणार आहात तूम्ही ?
डक टुर्स पे़क्षा 'ओपन बस' घे.. आम्हाला तरी ती चांगली वाटली.
Thanks Amit !
आम्ही NY वरुन येऊ.
ओपन बस म्हणजे tourmobile का?
हो tourmobile च. वेळ असेल आणि खूप चालायची तयारी असेल तर चालतही बरेच काही पहाता येते.
Thanks Lalu !