Submitted by जागू-प्राजक्ता-... on 12 May, 2010 - 03:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
तांब माशाच्या तुकड्या साधारण ४-५
आल लसुण पेस्ट १ चमचा
चवी पुरते मिठ
मसाला १ ते २ चमचे
हिंग, हळद पाव चमचा
लिंबु रस १ चमचा
तळण्यासाठी तेल
क्रमवार पाककृती:
तांब च्या तुकड्या स्वच्छ धुवुन त्याला आल लसुण पेस्ट, हिंग, हळद, मसाला, मिठ, लिंबु रस चोळून घ्यावा. वेळ असेल तर थोडा वेळ मुरवत ठेवावेत. नंतर तवा गरम करुन तेल टाकुन त्यावर तुकड्या टाकाव्यात. खालुन ४-५ मिनिटांत शिजतात मग पलटी करुन ५ मिनीटे शिजवाव्यात.
वाढणी/प्रमाण:
४-५ जणांसाठी
अधिक टिपा:
आले लसुण पेस्ट न लावता ठेचलेल्या लसणाची फोडणी देउन तुकड्या तळल्या तरी चालतात.
आले लसुण लावलेल्या तुकड्यांना शक्यतो नॉन स्टीक तवा वापरावा म्हणजे तुकड्या चिकटत नाहीत.
नॉन स्टीक तवा नसल्यास तुकड्यांना रवा लावावा म्हणजे त्या चिकटत नाहीत.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तांब.... मी हे नाव
तांब.... मी हे नाव पहिल्यांदाच ऐकलेय..
जागु, फोटोही टाक ना आधीचा आणि नंतरचा म्हणजे मासाही ओळखता येईल..
साधना हा घे फोटो. ह्या
साधना हा घे फोटो.

ह्या तळलेल्या तुकड्या.

बराच मोठा दिसतोय.. चवीला कसा
बराच मोठा दिसतोय.. चवीला कसा लागतो हा मासा??
मी गेल्या दिवाळीच्या वेळी मासळीबाजारात दिसणारे पण मी कधी न खाल्लेले मासे आणुन खायचा प्रयत्न केला होता. काही काही मासे चवीला चांगले वाटले तर काही फार आवडले नाही..
अग साधारण घोळीच्या
अग साधारण घोळीच्या माश्यासारखी चव असते. चांगली असते. हा छोटाच आहे ह्याच्यापेक्शा मोठा असतो.
वॉव!!! काय मस्त तळला
वॉव!!! काय मस्त तळला गेलाय!!
उद्या पुन्हा पाहीन फोटो.... आज गुरुवार आहे
उसगावात याला रेड स्नॅपर
उसगावात याला रेड स्नॅपर म्हणतात का?
जागु तु वडा च्या लिंकवर या
जागु तु वडा च्या लिंकवर या बीबीची लिंक दिलीस म्हणून इथे ही हजेरी लावली..
पण ही पाकृ इंटरेस्टींग नाही वाटली...
फोटोमुळे असेल. कच्चा आणि मग थेट तळलेले तुकडे.. मधली रेसिपी फार सॉलिड लिहितेस... अर्थात हा बीबी ऑलमोस्ट एक वर्षापुर्वीचा आहे... 
मस्त , आजचा दिवस कारणी लागला.
मस्त , आजचा दिवस कारणी लागला.
जागू असला कुठला मासा तू खात
जागू असला कुठला मासा तू खात नाहीस ग. आजून एक तू तो मासा खातेस आम्ही त्याला बंगाली मासे म्हणतो मी त्यांना आमच्या इकडे वजनावर भेटतात मोठे मोठे जाडे जाडे असतात कसे लागतात ते ग........................
तांब माशाचे आग्री पद्धतीने
तांब माशाचे आग्री पद्धतीने कालवण/रस्सा व तळलेल्या तुकड्या खालील लिंक उघडून पहा.
https://youtu.be/OfsMqUiTH6Q