Submitted by suryakiran on 28 April, 2010 - 02:33
आमचा खंड्या.. पावसानी गारठलेला..
वर्षभर राबून अखेर पिक घेवून घरलां निघालेली गाडी - अखेरची खेप !
मावळतीचे रंग.. माझ्या शेतातून.
चारही बाजूस डोंगरांच्या कुशीतली माझी शेती..
पुन्हा मावळतीचे रंग...
क्षितीजावर अलगद निजताना ...
नभ उतरू आले...
शेताला वेढलेल्या ढोंगरात जूनी एक दगडाची खाण...
सरोवर रिसॉर्टजवळचा हा फोटो.. १५ मि. अंतरावर असलेलं हे ठिकाण..
पिरंगुट घाटातून घेतलेलं हे चित्र, घाटाच्या उजव्या बाजूला आमचं शेत, अन डाव्या बाजूचा हा फोटो.माझ्या शेतात उभा राहून घेतलेले लेटेस्ट फोटो... आभाळ भरून येताना.. अन दिलखुलास मोकळं होताना..
पॅनोरमा view...
आखाड नैवेद्य... नॉनव्हेज पार्टी भर पावसात...
आमच्या गाईला वासरू झालं तेव्हा... ( आजोबांनी एकच आरोळी टाकली... गाईला "घोरा" झाला )
काही म्हशी वळताना मी ....
काही भातलावणी झालेली खाचरे..

गुलमोहर:
शेअर करा
सुंदर आहेत फोटो तुमच्या गावचे
सुंदर आहेत फोटो तुमच्या गावचे
कुनचं गांव रे हे ? छान आहे.
कुनचं गांव रे हे ? छान आहे.
मस्त
मस्त
छान आहे कुठंल गाव म्हणायचं
छान आहे
कुठंल गाव म्हणायचं हे.
मस्त फोटो ! सुर्यकिरण
मस्त फोटो !
सुर्यकिरण ...नुसते फोटो काढले का ?
मळणीला हातभार लावला ?
धन्यवाद , प्रकाश , वर्षा,
धन्यवाद , प्रकाश , वर्षा, योगेश , आय पियेल , हसरी.
हे गावं आहे पिरंगूट (ता. मुळशी , जि. पुणे ) येथील, या गावाजवळच , ऑक्स्फोर्ड मॅनेजमेंट कंपनीचा गोल्फ क्लब झाला आहे. सुंदर आहे पावसाळयात पाहण्यासाठी. ह्या फोटोतल्या बैलगाडी मधे भाताचे साळ म्हणजे भरडायच्या आधी जे घेवून जातात ना ते आहे. हो , मी भाताचे रोप म्हणजे ( दाढ ) नंतर चिखल करणे, दाढ दोरीच्या आधाराने ओळीत लावणे, अन त्या नंतर त्यात भाताची गोळी ( वाढीसाठी वापरले जाणारे औषधी खाद्य) अन शेवटी भात काढणी , पेंढ्या रचणी , भात झोडपणी, अन शेवट ३ ते ४ महिन्यांनि राईस मिल मधून तांदूळ भरडणी या सगळ्या प्रोसेस केल्या आहेत.
अन विशेष म्हणजे इथे कोकणासारखचं भात काढताना सुद्धा खासरात गुडघ्या एवढं पाणी असतं , लवकरचं पावसाळ्यातलां माझा गावं असे फोटो इथे प्रदर्शीत करेल.
छानैत तुझ्या गावाचे फोटो.. पण
छानैत तुझ्या गावाचे फोटो.. पण मी आजवर एक ही गाव पाहिलं नाहीये.. म्हणून तू जे फोटो टाकशील तेच पाहीन आता
वर्षभर कष्ट करुन फक्त इतकचं
वर्षभर कष्ट करुन फक्त इतकचं धान्यं
छान आलेत फोटो. मस्तय गाव तुझ.
छान आलेत फोटो. मस्तय गाव तुझ.
श्री, ती एकचं खेप होती रे
श्री, ती एकचं खेप होती रे
खूप छान!!
खूप छान!!
छान आलेत रे फोटो !
छान आलेत रे फोटो !
मस्त... शेवटचा फोटो एकदम
मस्त... शेवटचा फोटो एकदम झक्कास...
विशाल , गणेश धन्यवाद रे.
विशाल , गणेश धन्यवाद रे. चिमूरी फोटो पेक्षा ती जागाच खूप सही आहे. दिवसा ढवळ्या घुबड बघायला अन बरेच पक्षी बघायला मिळतात तिथे. खूप सही प्लेस आहे.
किरणा, सहीच की रे
किरणा, सहीच की रे
खूप सुंदर आहे , मी पाहिलं आहे
खूप सुंदर आहे , मी पाहिलं आहे हे सगळं , पिरंगूट मधे रहायला होतो तेव्हा.
अरे वा!! एव्हढे छान शेत ! लकी
अरे वा!! एव्हढे छान शेत ! लकी आहेस सुर्यकिरण तु .
मस्त रे किरण्या
मस्त रे किरण्या
मृदूला , हो खरचं लकी आहे
मृदूला , हो खरचं लकी आहे पुण्यासारख्या झपाट्याने विकास होणार्या शहराजवळच म्हणजे कोथरूड पासून अवघ्या १० किमी वरच आहे हे शेत.
किरण, छान आलेत रे फोटो !
किरण,
छान आलेत रे फोटो !
अरे वा मस्त आहे की शेत ! पण
अरे वा मस्त आहे की शेत ! पण हे काय शेत बघायला येतो म्हटलं की हे फोटो दाखवायचे
म्हणजे वाटाण्याचं पीक घेता जणू 
केव्हाही या बघायला, पण जुन
केव्हाही या बघायला, पण जुन end किंवा संबंध जुलै महीन्यात आलात तर खूपचं सही वाटेल.
छान आहे तुमच गाव...........
छान आहे तुमच गाव........... आम्हा शहरी लोकांना गाव म्हणजे असा हे माहित नहीं... कारन आमची गाव सुद्धा शहरच.... एकदा येला पाहिजे तुमच्या गावाला....अत पावसात खुप छान ग्रीनरी असेल ना.... तर मग ते फोटो पण लवकर टका
भारी रे
भारी रे
भरून आलेल आभाळ मस्तच रे अजुन
भरून आलेल आभाळ मस्तच रे
अजुन येऊ देत.
वॉव! सूर्यकिरण मस्तच आहे रे
वॉव! सूर्यकिरण मस्तच आहे रे तुझं शेत! आणि तू स्वता: सगळं करतोस! छानच!
आणि खंड्या कित्ती गोड आहे.
आणि खंड्या कित्ती गोड आहे. पाळलेला आहे की असाच फोटो टाकलायस?
२२ आणि २३ फोटो मस्त आहेत.
२२ आणि २३ फोटो मस्त आहेत. पावसाळ्यात नक्की भेट देणार तुमच्या शेताला
आणि पक्षी पण असतात म्हणजे फोटोग्राफीला फिस्टच मस्त !
पुढच्या वेळेस जास्ती फोटो टाकताना त्याला नंबर घालणार? म्हणजे प्रतिक्रिया देणं सोपं जाईल
खुप मस्त ......गावची आठवण आली
खुप मस्त ......गावची आठवण आली रे...............
बाकी तुझ्या गावात यावं लागेल बाबा....खुप छान.....
वा!! छानच आहे शेत तुझं आणि
वा!! छानच आहे शेत तुझं आणि फोटु पण लईच भारी! बैलगाडीत बसायला मिळालेच नाही कधी
Pages