नमस्कार,
आज प्रत्येक तरुण अमेरीका व युरोपात नौकरीचे स्वप्न बघतोय. त्या प्रमाणे शिक्षण पुर्ण झाल्यावर प्रयत्नही केले जातात. आजची पिढी मात्र संगणकाच्या मदतीने परदेशातील नौक-या शोधताना दिसतात, तरी सुद्धा "घी वाला" किंवा इतर मोठी नावं आजही विदेशी नौक-या देण्याचे काम करताहेत.
बरेच वेळा परदेशाची नौकरी शोधणा-यां सुशिक्षीत लोकांची सुद्धा फसवणुक होते. एजंट पैसे खाऊन बसतो, ठरल्यावेळेपेक्षा जास्त वेळ घेतो, काहिवेळा तर चक्क एजंटच पळुन जातो. अशा वेगवेगळ्या प्रकारे विदेशातिल नौक-या शोधणा-यांची फसवणुक होत असते. काल टिविवर बातमी होती, चार मराठी मुलांना एका एजंटने मलेशियात नौकरिसाठी पाठवलं, मोबदल्यात भरपुर पैसे उकळले. तिथे गेल्यावर मात्र त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. आता महाराष्ट्र सरकार त्याना परत आणण्यासाठी प्रयत्न करतेय. हे सगळं एखाद्या शिकलेल्या माणसा सोबत घडण्याचं कारण आहे या तरुणांकडे परदेशाची नौकरी शोधण्याच्या मार्गदर्शनाचा अभाव, विदेशी नौकरी शोधण्याचं अज्ञान. या अज्ञानामुळे कित्येकांना मोठया आर्थिक व मानसिक प्रश्नाना सामोर जावं लागतं. याच अज्ञानाचा फायदा घेऊन हि मधली माणसं एखाद्या चांगल्या सुशिक्षिताचीही फसवणुक करतात.
आज माबोवर मात्र वेगवेगळ्या देशात राहणारी मराठी माणसं मोठ्या प्रमाणात आहेत. त्यानी संबंधीत देशात नौकरीसाठी येऊ पाहणा-या विद्यार्थ्याना मार्गदर्शनात्मक माहिती दयावी.


आत्ता दोन दिवसा आधी महाराष्ट्र सरकारनी मलेशीयात अडकलेल्या (फसवणूक होऊन) सांगलितील तिन मराठी तरुणांची सुटका करुन सरकारी खर्चाने भारतात परत आणलेय.
विदेशी नौकरीच्या निमित्ताने फसवणुक होऊ नये म्हणुन काय काळजी घेता येईल.
याच्यावर काही ठोस उपाय होऊ शकतो का ?
१. वेबसाईटवर डायरेक्ट कंपनीलाच संपर्क करुन त्यांच्याच मार्फत परदेशी जाणे.
२. विश्वासार्ह एजंट मार्फत जाणे.