|
Moodi
| |
| Friday, August 04, 2006 - 8:14 am: |
|
|
दिनेश सही!!! जी एस अहो ह्या नॉस्ट्रॅडॅमसची काही भविष्ये( भारताबाबत) खोटी ठरलीत( मला लै आनंद झाला कारण मुंबईविषयी काहीतरी वाईट लिहीले होते अन ते न घडल्याने माझा जीव समुद्रात पडला)
|
Cool
| |
| Saturday, January 27, 2007 - 5:03 pm: |
|
|
Gs1 पुढे लिहा कि जरा..
|
Mandard
| |
| Monday, January 29, 2007 - 10:30 am: |
|
|
लालभाई हिकडे फ़िरकत नाहीत वाटते
|
Laalbhai
| |
| Monday, January 29, 2007 - 12:15 pm: |
|
|
नाही.. मी फिरकतो. सगळीकडे लक्ष असते माझे. पण ही "पैसे भरून" घेतलेली खाजगी जागा आहे. आपल्या स्वतःच्या मालकीच्या जागेत वाट्टेल तो धिंगाणा घालण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य असते. माझ्या घरात मी जगातल्या यच्चयावत लोकांना शिव्या देण्याचे स्वातंत्र्य अबाधित ठेवतो. तसेच दुसर्यालाही ते स्वातंत्र्य आहे, हे मला समजते. इतरांच्या स्वातंत्र्यावर माझ्याकडून घाला येणार नाही, इतकेच मी बघत असतो.
|
Zakki
| |
| Monday, January 29, 2007 - 12:40 pm: |
|
|
मग तुम्ही घ्या की 'खाजगी जागा' इथे, मी देणगी देऊ का? मला आवडेल तुम्ही काय लिहाल ते वाचायला. म्हणजे दोन्ही बाजूचे ऐकल्यावर खरे काय, खोटे काय ते कळेल. सारखी क्रांतीच करत रहायचे की काय? समजा सगळे कम्युनिस्ट झाले नि सगळी संपत्ति राज्यकर्त्यांनी घेतली तर ते आपो आप सज्जन, प्रामाणिक नि नि:स्वार्थी असतील याची खात्री देता येईल का? ते जर नीट वागत नसतील, तर त्यांना सत्तेवरून दूर कसे करायचे? सशस्त्र क्रांति करून? स्टालिनला लाखो लोक मारायची नि माओ ला पण तसे करण्याची गरज का पडली? त्या मागे काय कायदा होता की केवळ मते पटली नाहीत म्हणून मारून टाकायचे? हे तरी कळेल. तिकडे तो मुस्लिम दहशतवाद तर अजून कळला नाहीच. निदान कम्युनिस्ट कसे तरी कळू द्या! धन्यवाद.
|
Laalbhai
| |
| Monday, January 29, 2007 - 1:11 pm: |
|
|
मी देणगी देऊ का? >>> असलियत पे उतर आये ना (फिर एक बार!)! GS1, sorry.. it is your personal space. (Atleast)I do not mean to spoil it. I am off of this conversation. बाकी कुरापती काढणार्यांचे काय करायचे ते तुमचे तुम्ही बघा. हे जे चालू होतेय तेच तुम्हाला अपेक्षित आहे, असे मला तरी वाटत नाही. moderators/Admins ची अभिव्यक्तीस्वातंत्र्याची व्याख्या तर काही कळतच नाही!
|
Safaai
| |
| Monday, January 29, 2007 - 1:28 pm: |
|
|
झक्की, तुम्ही कशाला हो आता वाटे जाताय? तुमचा वेळ जात नसेल तर तुम्ही त्या हूडाला पकडा बघू
|
Yog
| |
| Monday, January 29, 2007 - 7:35 pm: |
|
|
gs1, उत्तम चालू आहे. अजून येवू देत. लगे रहो..
|
Bhagya
| |
| Monday, January 29, 2007 - 9:42 pm: |
|
|
गोविंद, चांगलं लिहिलं आहेस. मी गोदावरी परुळेकर (यांचे नावही मला आधी माहिति नव्हते) यांचे वारल्यांच्या लढ्यावर लिहिलेले पुस्तक वाचले. त्यात तपशीलवार दिले आहे की कसे कम्युनिस्टांनी वारल्यांना सावकारांच्या तावडीतून सोडवले. उद्देश काही का असो या कम्युनिस्टांच्या हातून ही एक चांगली गोष्ट घडली. तुला या बाबतीत काही माहिती आहे का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 30, 2007 - 3:44 am: |
|
|
GS1 उगाच आपली पुरक माहिती. एकेकाळी सिनेमातील लोकांवर या विचारसरणीचा खुपच प्रभाव होता. पैगाम ( दिलिपकुमार, राजकुमार, वैजयंतीमाला ) , नया दौर ( दिलिपकुमार, वैजयंतीमाला ) ईन्सान जाग उठा ( सुनील दत्त, मधुबाला ) दो बिघा जमीन ( बलराज सहानी, निरुपा रॉय, मीनाकुमारी ) या सिनेमाची कथानके याच विचारसरणीने भारलेली होती. मग मात्र तिचा प्रभाव ओसरला. अगदी अलिकडे गुरु मधे, परत मिथुन आणि माधवन यांच्या पात्रात, हि विचारसरणी दिसली.
|
communism म्हणजे नक्की काय हा किडा बरेच दिवस होत डोक्यात. पण केवळ वाचायचा आळस आणि अर्थातच योग्य मर्गदर्शनाचा अभाव यामुळे तो किडा राहिला होता तसाच. ही माहिती मस्तच वाटली एकदम! precise and detailed! येउ द्या अजुन!
|
अस म्हणतात की वयाचा विसी पंचविशी मध्ये एखादा युवक साम्यवादी नसेल तर तो युवक नाही व तिशी नंतर ही तो साम्यवादीच असेल तर तो माणूस नाही. चायना हा एकच देश अजुनही साम्यवादी आहे असे म्हनने म्हणजे ५ वर्षापुर्वीचे वाक्य आहे. गेल्या ५ - १० वर्षात चायना ने देखील भांडवली देशा कडे वाटचाल केली आहे. (कदाचीत याला आपण चायनाचा ग्लासनोस्त म्हणू शकतो). गेल्या आठवड्यातच USA Today, Money मध्ये US मधील काही कंपन्या चायनात प्लांटस उघडनार अशी बातमी आली आहे. विप्रो व टिसीएस या भारतीय कंपन्यानी आधीच दुकान उघडली आहेत. रशीया चे उदाहरण आज साम्यवादी म्हणून देने चुकीचे ठरेल. भारत व ब्राझील प्रमाने त्यांचा शेअर बाजार हा परकीय संस्था चालवतात.
|
अगदी अलिकडे गुरु मधे, परत मिथुन आणि माधवन यांच्या पात्रात, हि विचारसरणी दिसली. >>>>>दिनेश गुरु मधील मिथुन आणि माधवनने रंगविलेल्या भूमिका डाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात असे वाटत नाही. केवळ गुरुभाईच्या भांडवलशाहीला विरोध नसतो त्यांचा. डाव्या विचारसरणीत कामगारांचे शोषण हा मुख्य मुद्दा असतो. तसे शोषण गुरूत नाही आणि तो मुद्दाही त्यांचा नसतो. त्यांचा विरोध आहे भ्रष्टाचाराला, मूल्यांच्या मोडतोडीला आणि विधिनिषेधशून्यतेला. त्यांचा गुरुभाईच्या धंद्याला विरोध नसतोच मुळी. त्यामुळे मला वाटते गुरुचे उदाहरण येथे गैरलागू आहे कम्युनिझम पुरते तरी. प्रत्यक्षात धिरूभाई आणि रामनाथ गोएंकाशेठच्या वादाचा संदर्भ त्याला आहे. गोएन्काज कधीच communist नव्हते... असो. जी एसच्या म्हणण्यावर मलाही react होणे आवडेल पण हल्ली इथे विरोधी मते बजरंग दलीय पद्धतीने ऐकून घेतली जातात आणि त्याला'उत्तरे'ही तशीच देण्याची पद्धत आहे नाही का?
|
झक्की, तुम्ही कशाला हो आता वाटे जाताय? तुमचा वेळ जात नसेल तर तुम्ही त्या हूडाला पकडा बघू >>>म्हणजे? मी काय झक्कींचे timepass चे साधन आहे की काय? छे छे! मी त्यांचा कट्टर विरोधक आहे. झक्की हे एक आंतरराष्ट्रीय ढोंग(किंवा सोंग)आहे अन त्यांचा पर्दाफाश करीत राहणे हे माझ्या आयुष्याचे मिशन आहे... हर हर महादेव!! हटकेश्वर हटकेश्वर!!
|
Gs1
| |
| Wednesday, January 31, 2007 - 10:10 am: |
|
|
रॉबिनहूड, पुढच्या शनिवारी रात्री १० तारखेला तुमच्याकडेच मुक्कामाला यायचा बेत आहे आमचा... तेंव्हाच होउन जाऊ दे... >>>>असो. जी एसच्या म्हणण्यावर मलाही react होणे आवडेल पण हल्ली इथे विरोधी मते बजरंग दलीय पद्धतीने ऐकून घेतली जातात आणि त्याला'उत्तरे'ही तशीच देण्याची पद्धत आहे नाही का? तुम्हाला अथवा इतर कोणालाही माझ्याकडुन असा अनुभव आल्याचे एखादे उदाहरण दाखवू शकाल का ? बाकी विरोधकांची हिंसेने मुस्कटदाबी याब्द्दल जगभर तरी कम्युनिस्टच कुप्रसिद्ध आहेत. असो, तुमचे काही मुद्दे असतील तर जरूर मांडा. तुम्हाला तर फार जवळून अनुभव असेल बर्याच गोष्टींचा.
|
हो हो लग्नाला येणार आहात ना? कोण कोण येतंय? मी नाशिकलाच थाम्बतोय... काय प्रोग्रॅम आहे कळवा मी व्यवस्था करतो.... तुझ्याबाबत नाही म्हणत मी.. एकूण हितगुजवरच राजकीय मते मांडायची काही सोयच राहिली नाही.
|
Saee
| |
| Wednesday, February 07, 2007 - 7:46 am: |
|
|
GS , अत्यंत माहितीपुर्ण लिहीतो आहेस. आणि सोपे करुनही. त्यामुळे विषयाची चांगली उकल होत आहे.
|
Zakki
| |
| Wednesday, February 07, 2007 - 8:04 pm: |
|
|
मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला देता येतील का GS1 ? मला वाटले लालभाई देतील, पण त्यांना काहि माझे प्रश्न दिसले नसावेत, फक्त माझे नाव पाहिले की त्यांचे टाळकच फिरते मला वाटते. आता तुम्ही चांगले लिहीले आहे, त्याला 'धिंगाणा' म्हणयची गरज आहे का? मी जे प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल लिहीण्या ऐवजी उगीचच काहीतरी. तसाच तो रॉबीन हूड. आंतराष्ट्रीय ढोंग, सोंग, पर्दाफार्श काय? दारू प्यायलेली माणसे या दोघांपेक्षा व्यवस्थित उत्तरे देऊ शकतील. हे दोघे आपले उगीचच जिथे जातील तिथे पाय वरून घाण करणार!! सगळा त्या मनेका गांधींचा उपद्व्याप की असल्या प्राण्यांना प्रेमाने वागवा म्हणे!
|
Gs1
| |
| Thursday, February 08, 2007 - 11:49 am: |
|
|
झक्की, तुमचे प्रश्न मला उद्देशून होते असे मला वाटले नव्हते, म्हणून मी काही लिहिले नव्हते. आणि आताही असेच वाटते की तुमच्या प्रश्नातच उत्तरे दडलेली आहेत. कम्युनिस्टांना निरूत्तर करणारे प्रश्न आहेत. भाग्यश्री, तुझा प्रश्नाबद्दल आपण सविस्तर बोलूच. पण कुठलाही शोषणाचा प्रश्न हा असंतोष निर्माण करण्याचे एक साधन म्हणून वापरायची कम्युनिस्टांची पद्धत आहे. प्रश्न सोडवणे हे साध्य नसते, तर प्रश्न हे साधन असते, असंतोष, दहशतवाद आणि फुटिरता निर्माण करण्याचे. वारली, तेंदूपत्ता, नर्मदा, नक्षलबारी सगळीकडे तेच..
|
>>>>> पण कुठलाही शोषणाचा प्रश्न हा असंतोष निर्माण करण्याचे एक साधन म्हणून वापरायची तर्रीच, काही वर्षान्पुर्वी तान्ह्या बाळान्ना अन्गावर "पाजू" नये अशी टूम वैद्यकीय क्षेत्रात निघाली होती..... कुणी सान्गाव, ती अजाण बालके देखिल "शोषक" वर्गाची प्रतिनिधी वाटली असणार या कम्युनिस्टान्ना! DDD
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|