कम्युनिझम आणि भारत : स्वातंत्र्योत्तर काळ
१९४५ -१९५० : पहिल्याच लोकशाही सरकारला विरोध, सश्स्त्र उठाव.
१९४५ च्या निवडणुका कम्युनिस्ट पक्षाने लढवल्या होत्या, पण त्यात कॉंग्रेसला यश मिळाले होते. स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारस कम्युनिस्टांत दोन तट पडले. कॉम्रेड बी. टी. रणदिवेंच्या गटाचे म्हणणे होते की संप, उठाव, हिंदू मुस्लिम दंगे याचा फायदा घेऊन आता क्रांतीचे रणशिंग फुंकले पाहिजे आणि कम्युनिस्टांनी सत्ता ताब्यात घेतली पाहिजे, कॉंग्रेसची सत्ता म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. पश्चिम बंगाल शाखेने त्यांना पाठिंबा दिला. १९४७ मध्ये प्रसिद्ध केलेया पत्रकात ते म्हणतात ' कॉंग्रेस फॅसिस्टांवर तुम्ही बंदुका रोखा. सर्व कलकत्त्याला किंवा सर्व बंगालला आग लावा.' वाद विकोपाला गेले आणि लोकशाही सरकारच्या विरोधात क्रांतीला विरोध केल्याबद्दल पी. सी. जोशींची उचलबांगडी करून बी. टी. रणदिवे सरचिटणीस झाले. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताबद्दल कम्युनिस्टांचे दोन कलमी धोरण ठरले.
(१)शहरी भागात सर्वत्र संप घडवून आणणे.
(२) (आंध्र प्रदेश) तेलंगण भागात सशस्त्र उठाव करून तो ताब्यात घेणे. ( तेंव्हा तेलंगण निजामाकडे होता)
पण सरदार पटेलांनी सप्टेंबर १९४९ मध्येच निजामाला शरण आणून तेलंगण भारतात समाविष्ट करून घेतले. त्यानंतर पुढे तीन वर्षे कम्युनिस्टांचा भारत सरकारशी सशस्त्र संघर्ष चालू राहिला.
१९५१ - १९५९ : भांडणे आणि रशियाच्या आदेशांचे पालन.
मे १९५० मध्ये राजेश्वर राव सरचिटणीस झाले. ते चीनसमर्थक असल्याने अंतर्गत संघर्ष सुरू झाला. इकडे नेहरू रशिया संबंध जुळू लागले होते. त्यातच रशियाने ब्रिटिश कम्युनिस्ट पक्षाद्वारे असा आदेश दिला की भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सांसदीय पद्धतिशी जुळवून घ्यावे. याला अर्थातच चीनवादी राव यांचा विरोध होता. यावरचे मतभेद एवढे टोकाला गेले की ते आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट नेत्यांनी सोडवावे असे ठरले. त्याप्रमाणे १९५१ मध्ये डांगे, राव, अजय घोष वगैरे रशियाला गेले. आणि अखेर स्टॅलिनच्या आदेशाप्रमाणे राव यांच्या ऐवजी अजय घोष सरचिटणीस झाले. भारताविरुद्धचा सश्स्त्र लढा मागे घेण्यात आला. निवडणुका लढवण्याचे धोरण ठरले.
अशा रीतीने ४ वर्षे चाललेली भारताविरुद्धची क्रांती स्टॅलिनच्या आदेशाने संपुष्टात आली. या सर्व निर्णयप्रक्रियेत भारताला काय हवे ? काय चांगले ? याचा विचार सुद्धा झालेला दिसत नाही.
भारत रशिया मैत्री १९५५ मध्ये वाढत गेली आणि त्याचा परिणाम म्हणून रशियाने भारत सरकारशी जुळवून घेण्याचा स्पष्ट आदेश अजय घोषना त्यांच्या १९५६ रशिया भेटीत दिला. त्याप्रमाणे पक्षाने निवडणुका लढवल्या व १९५७ मध्ये केरळमध्ये नंबुद्रिपादाम्च्या तेतरुत्वाखाली कम्युनिस्टांना सत्ता मिळाली.
१९५९ - १९६४ : पावलापावलाला देशद्रोह.
१९५९ ला पहिली भारत चीन चकमक झाली त्यात १० भारतीय जवान ठार झाले. कम्युनिस्ट पक्ष चीनच्या मागे उभा राहिला, प्रत्यक्ष नंबुद्रिपादनेच 'हे भारतीय आक्रमण सहन केले जाणार नाही' असे जाहीर केले. कॉम्रेड डांगेंना याबद्दल संसदेत फैलावर घेताच त्यांनी 'चीनला समर्थन ही पक्षाची चूक आहे. मी या बाबतीत माझ्या पक्षाशी सहमत नाही' असे संसदेत २४ ऑक्तोबर १९५९ ला नमूद केले.
पण रशियाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला जाहीर पाठींबा देताच कम्युनिस्टांना त्यांची भूमिका काही काळ बदलावी लागली. प्रश्न चिघळत गेला, चीनचे आक्रमण झाले, दबाव वाढत गेला आणि अखेर १ नोव्हेंबर १९६२ रोजी कम्युनिस्ट पक्षाने चीनचा निषेध करणारा ठराव मंजूर केला. हा ठराव मात्र सुखासुखी होउ शकला नाही, प्रचंड विरोध, गोंधळ झाला आणि चीनच्या समर्थनार्थ आणि ठरावाच्या विरोधात ज्योती बसू, हरकिशन्सिंग सुरजीत, नंबुद्रिपाद इत्यादींनी राजीनामे दिले. (कॉंग्रेसमध्ये पेरलेलेया कम्युनिस्टांपैकी एक मणीशंकर आय्यर हा त्या वेळेला युरोपात चीनवाद्यांसाठी धनसंकलन करत होता.)
नंबुद्रिपाद आणि इअतर ९५७ कॉम्रेड्ससह ही सर्व मंडळी जानेवारी १९६३ पर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरूंगाची हवा खात होती. आज हीच मंडळी समाजात उजळ माथ्याने वावरत तर आहेतच. पण सरकारमध्ये सहभागी आहेत, निर्णयासाठी दबाव आणत आहेत, अनेक गोपनीय कागदपत्रे बघू शकत आहेत ही खरी भयावह परिस्थिती आहे.
एक लक्षात आले असेलच की या सगळ्यात पुन्हा भारताच्या बाजूचे की चीनच्या असा प्रश्नच नव्हता. रशियाच्या ऐकायचे की चीनच्या बाजूने उभे रहायचे असा प्रश्न होता. यावरुन ही सगळि साठमारी चालू होती.
ते युद्ध तर आपण हरलो. पण चीननेही शस्त्रसंधी जाहीर केली आणि आपल्याला मुक्त करायला लाल सेना आली या स्वप्नात वावरणार्यांचा भ्रमनिरास झाला.
१९६४ - १९६७ : फूट, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना, पुन्हा दहशतवादाकडे.
कम्युनिस्ट पक्षातील ही सर्व भांडणे विकोपाला गेली. त्यातच चीनवादी कॉम्रेड्सनी कॉ. डांगे यांनी १९२५ मध्ये तुरुंगातून मुक्ततेच्या बदल्यात ब्रिटिशांशी एकनिष्ठ रहाण्याची शपथ घेतल्याचे प्रकरण उकरून काढले आणि अखेर भारतीय कम्युनिस्ट पक्षापासून फुटुन वेगळे होत आपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष स्थापन केला.
चीनने पेकिंग रिव्ह्यूद्वारे या नव्या पक्षाचे स्वागत करताम्ना मूल सीपीआयवर त्यांच्या मवाळ सुधारणावादी धोरणांबाबत जोरदार टीका केली. या नव्या नव्या सीपीएमचे चारू मुजुमदार, कानू सन्याल वगैरे नेते 'कायद्याने वा सरकारच्या माध्यमातुन आपले ध्येय साध्य होणार नाहीत. आता सशस्त्र क्रांतीद्वारे सत्ता काबीज केली पाहिजे. चीनचे नेते माओ हेच जागतिक क्रांतीचे अग्रदूत आहेत. संसदीय मार्ग हा सुधारणावाद आहे, तो स्वीकारणार्यांबरोबर सहकार्य नाही' अशा गर्जना करू लागले. ( सुधारणावादी ही कम्युनिस्टांमधली मोठी शिवी आहे.)
पण तरीही १९६७च्या निवडणुका सीपीएम ने लढवल्या आणि अनपेक्षितपणे सत्ता मिळाल्यावर बसू आणि कंपनी एकदम घुमजाव करून सध्या क्रांती नको, पुढे निवडणुकातूनच देशभर सत्ता मिळवू असे म्हणू लागली.
असे करणे हा माओशी द्रोह आहे असे चारू मुजुमदार, सन्याल या जहालांचे मत होते आणि त्यातूनच पुन्हा एकदा मतभेदांची ठिणगी पडली. १९६७ मध्ये नक्षलबाडीला पहिला कम्युनिस्ट उठाव झाला आणि बुरागंज हा भाग स्वतंत्र म्हणून घोषित करण्यात आला. समांतर सरकार स्थापन करण्यात आले. हे सर्व चिघळत जाऊन १९६९ मध्ये लेनिनच्या जन्मशताब्दीच्या दिवशी मुजुमदार सन्याल यांची कम्युनिस्ट पार्टी ऑफ ईंडिया(मार्क्सिस्ट - लेनिनिस्ट) सिपीएम पासून फुटुन वेगळी झाली.
या नव्या क्रांतीचे चीनतर्फे स्वागत करण्यात आले, आणि या वेळेला सीपीएम वर टीका करण्यात आली की त्यांनी तेलंगणाची क्रांती अर्धवट सोडुन दिली व विश्वासघात केला. नक्षलबाडीचा दहशतवाद ही १९५१ म्ध्ये रशियाच्या दबावाने थांबलेल्या कम्युनिस्टांच्या भारताविरुद्धच्या सशस्त्र क्रांतीचेच १६ वर्षाच्या खंडानंतर पडलेले पुढचे पाउल होते.
१९६७ साली सुरू झालेला हा हिंसाचार आता अनेक राज्यातल्या मिळून शेकडो जिल्ह्यात पसरला आहे. किती ठिकाणी भारताचे राज्यशासन उलथुन यांचे शासन सुरू झाले आहे. आतापर्यंतच्या मुद्यांवरून
(१)कम्युनिस्टांचा देशद्रोह.
(२)भारताविरुद्धची कटकारस्थाने.
(३)परकीयांशी हातमिळवणी.
(४)दहशतवाद.
(५) भारताचे विभाजन करू पहाणारी भूमिका.
हे स्पष्ट झाले असावे, आणि त्यांना सर्व शक्तीनिशी विरोध करण्याची आवश्यकताही जाणवली असावी.
कम्युनिस्ट दहशतवादाची पुढची एका बाजूला सम्सदीय राजकारण तर दुसर्या बाजूला सशस्त्र लढा ही दुहेरी वाटचाल, उल्फा, जिहादी, LTTE , नेपाळचे माओवादी अशा सर्वांशी हातमिळवणी आणि सद्यस्थितीबद्दलची झोप उडवेल अशी काही महत्वाची आकडेवारी हे आपण नंतर थोड्या काळाने पाहू.