Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 01, 2006

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » sashal » Feedback » Archive through December 01, 2006 « Previous Next »

Upashiboka
Thursday, November 09, 2006 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंगीबेरंगी चे पान मिळाल्याबद्दल अभिनंदन. आता पटकन काही तरी खरड बरं तुझ्या पानावर :-)

Sayonara
Thursday, November 09, 2006 - 7:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा सशल, अभिनंदन. चल लिही बरं तुझे सगळे मेन्यू इथे.

Seema_
Monday, November 13, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा!नविन पान . अभिनंदन. आता गोष्ट लिही लवकर मस्तपैकी .

Milindaa
Tuesday, November 14, 2006 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला असं वाटतंय की नाहि, तुमचं काय मत?<<<

v&C मध्ये BB उघड, मग सांगतो :-)

Bee
Tuesday, November 14, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sashal, hach prashna purnapane Marathit lihi karaN foolproof'che don arth aahet. 1) jyapasun dhoka nahi ase te 2) je kadhihi bighadat nahi ase te. nakki kuthalya arthi tu wicharate aahes kalale nahi.

Sashal
Tuesday, November 14, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे मिलिंदा, V&C सारखं वळण लागू नये म्हणून तर मुद्दाम इकडे लिहीलं .. सांग बघू इकडेच ..

Bee , तूला जो अर्थ योग्य वाटतो तसं समजून लिही बघू ..


Swaatee_ambole
Tuesday, November 14, 2006 - 6:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निसर्गाचं माहीत नाही, पण रंगीबेरंगी fool - proof नाही हे दिसलं आता.

Avv
Tuesday, November 14, 2006 - 6:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

it should not be taken personally, mhanaje mi nisargacha apamaan nahi kela mag maze natural calamities madhye nuksaan hou naye. aani khare mhanaje koni apamaan kela aani koni nahi yacha nyaynivada karnare aapan kon? we just have a few parameters to judge this. infact i think we human species have become very arrogant. we presume that we understand nature, but probably we dont. we have not yet understood ourownselves completely and are claiming to know the world order.

(ps.u r free to ignore this.)

Milindaa
Friday, December 01, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महापूर, अतिवृष्टी, भूकंप, tornados, typhoons, tsunamis etc., का घडतात? मी बर्‍याच वेळा ऐकलं आहे की ही निसर्गाची स्वतःचा balance राखण्याची तर्‍हा आहे .. माणसाने ज्या प्रकारे निसर्ग exploit केलाय आणि ह्यामुळे जो imbalance निर्माण झालाय तो control करण्यासाठी ह्या calamities घडतात .. पण मग ह्यात प्राण मात्र किती निष्पाप लोकांचेही जातात ना? त्यात बळी जाणार्‍या सर्वांनीच निसर्गाचा अवमान केलेला नसतो .. ओल्याबरोबर सुकंही जळतं, असंच काहितरी होतं .. पण जर निस

<<<

सशल, हे बघ मी तुझ्याच बीबी वरचं टेक्स्ट कॉपी केलं.. अगदी नेहमीसारखं.. काहीही बदल नाही.

Sashal
Friday, December 01, 2006 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिलिंदा इकडे ठिक आहे कारण इकडे पोस्ट करणं हे हितगुज वर इतर कुठेही पोस्ट करण्यासारखं आहे आणि म्हणूनच ते होतंय .. (मला त्यामागच्या code बद्दल हे म्हणायचं आहे .. पण मी जेव्हा माझ्या पेज वर पोस्ट करते, म्हणजे ज्याला दाद इकडे दिली जाते त्या पोस्ट मध्ये तसं करता येत नाहिये .. मला असं वाटलं की तिकडे देवनागरी वेगळंच दिसतं तर काहितरी वेगळा code असेल आपण type केल्यानंतर ते रोमन लिपीतलं देवनागरी दिसण्यामागे, तर इकडे जो code वापरला आहे त्यात ती copy-paste ची सुविधा नाहिये बहुतेक ..

I hope I am able to state my problem clearly now ..

Milindaa
Friday, December 01, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Copy - Paste होतं आहे, फक्त ते Readable नाही.. म्हणजे junk characters दिसताहेत :-)

Sashal
Friday, December 01, 2006 - 6:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय रे ..

ते नीट दिसायला हवं म्हणूनच तर मी हेल्प मागितली ना .. पण मला जे पोस्ट कॉपी करायचं होतं, चाफ़ाचं, पार्ले बीबी वरचं ते वाहून गेलं आता ..


Lalu
Friday, December 01, 2006 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरेरेरे काय ही दुरावस्था! पार्ले बीबीच्या थोर, उज्ज्वल व दैदिप्यमान अशा परंपरेचा हा होत चाललेला र्‍हास! मन ढवळून निघाले ही विन्मुख विनामेन्यू भुकेली पोस्टस पाहून. च् च् च्.

कार्याध्यक्षा श्रीमती सशल, खाद्यमंडळाच्या एक आद्य संस्थापिका म्हणून तुम्हाला वाटत असलेला विषाद तुम्ही न सांगताच तुमच्या अल्पाक्षरी पोस्टमधून भरभरुन व्यक्त होतो आहे. मोठ्या धडाडीचे नवीन सदस्य श्रीयुत अमेय यांनीही काहीच खाऊ नये? दोनच दिवसांपूर्वी दुसर्‍या आद्य संस्थापिका समि यांनी सेक्रेटरी नसल्याची सबब सांगून इथे मेन्यू लिहिण्याचा कंटाळा येतो हे सांगितले. ते ऐकून झालेल्या यातना वर्णनातीत अशाच आहेत. तत्पूर्वी काही आठवडे श्रीमती लालू यांनी इथे काय खाणार आहे ते न लिहिता काय खाल्ले तेच लिहावे असा उपप्रस्ताव मांडल्याने इथे येणार्‍या नवीन उत्सुक मेन्यूकरांच्या उत्साहावर थोडे विरजण पडले असण्याची कुणकुण मंडळाला होतीच. त्यात सन्माननीय सदस्या ट्युलिप यांनी काय खाल्ले किंवा काय खाणार आहे हे न लिहिता तिसरेच (तिसरे हा प्राणी नव्हे, संख्या या अर्थाने) म्हणजे काय खावेसे वाटत आहे हे लिहायची नवी कल्पना सुरु केली. पार्ल्याच्या खाद्यसंस्कृतीला या सर्व खाण्याच्या 'पोट'शाखांचा आनंदच आहे. पण मेन्यू न सांगताच इथे पोस्ट टाकणे म्हणजे अगदीच शो. ना. हो.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या निमित्ताने या विषयावर त्रिस्तरीय खाद्य कार्यकारी मंडळ नेमून परिसंवादात्मक चर्चासत्र आयोजित केले जावे ही आमची मागणी अनाठायी वाटू नये. मी कार्याध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी 'जातीने' पुढाकार घेऊन 'भरपूर' खाण्यापिण्यावरच्या चर्चेसाठी हा परिसंवाद आयोजित करुन सर्व सभासदांना कळवावे. आणि त्या चर्चासत्रात मिळणार्‍या जेवणाचा मेन्यू निमंत्रणपत्रिकेत जरुर कळवावा.

-chafa

|| श्री अन्नपूर्णा देवी प्रसन्न ||

स. न. वि. वि.

बृहन् पार्ले खाद्यमंडाळाच्या माननीय खाद्यजनहो आनि इतर खद्येच्छूक जनहो, आपणांस कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की लवकरच एक अखिल हितगुज खाद्य सम्मेलन आयोजित करण्याचे योजिले आहे.

आपल्या मंडळाचे शुध्दखाद्यपान प्रमुख चाफ़ा ह्यांनी 'जातीने' केलेल्या परिसंवादात्मक चर्चासत्राच्या मागणीतूनच आम्हाला या अखिल हितगुज खाद्य सम्मेलनाची कल्पना सुचली. या संम्मेलनाअसाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगीबेअर ह्यांनी हे आमंत्रण स्वीकारावे अशी मी त्यांना विनंतीवजा धमकी देते.

तर अशा या खाद्यपरंपेच्या समृध्द भरभराटीस खाद्य ठरू शकेल अशा या संम्मेलनाची रुपरेषा खाली देत आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून योगीबेअर उद्घाटना च्या हेतूपुर्तीसाठी breakfast चा मेनू जाहिर करतील. त्यानंतर सशल " खाणे हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच " हा चमचमीत एकपात्री प्रयोग सादर करतील. ह्या कार्यक्रमामुळे आलेला थकवा दूर करण्यासाठी एक छोटा snack break ठेवून मग त्यानंतर हितगुज वरच्या आद्य खाद्यपरंपरेचा इतिहास आणि आजच्या हितगुज मध्ये करायचे खाद्यबदल ह्याबद्दल चाफ़ा एक खमंग व्याख्यान देतील. हे व्याख्यान आणि त्यानंअतर होणारा प्रश्नोत्तरांचा V&C ह्यांनी वातावरण बरेच तप्त होण्याची शक्यता लक्षात घेऊन अधून मधून थंड किंवा शीत आणि अगदीच कुणाचा आग्रह असल्यास रंगीत पेये पुरवली जातील. त्यानंतर अर्थातच जेवणाचा चविष्ट आणि खुमासदार कार्यक्रम होईल. जेवणानंतरचा थोडा वेळ शक्तीवर्धक डुलकी साठी राखून ठेवण्यात आला आहे. पुढच्या कार्यक्रमांचा अस्वाद घेण्याची शक्ती आमंत्रितांना मिळाली की लगेच समि ह्यांचा " खाऊन आणि टाईपून मीही दमले, सेक्रेटरी कधी रे येशील तू " ह्या मधूर आणि रसाळ आळवणीचा कार्यक्रम होईल. त्यानंतर वेळ असेल चहापानाची. पुढचा कार्यक्रमाचा भार सांभाळतील ट्युलिप आणि अमेय, अनुक्रमे " रूचिरा नंतर काय? " आणि " सख्खे खाद्यशेजारी " सादर करून. सगळ्यांत शेवटी लालु ह्यांचे झणझणीत भाषण आणि स्वाती ह्यांचे चटपटीत काव्यवाचन होऊन सम्मेलनाचा समारोप होईल.

तर अशा या समाधानाचा / ची तृप्त ढेकर द्यायला लावणार्या बहारदार संम्मेलनाला आपण सर्वांनी 'जातीने' अगत्य खाण्याचे नव्हे येण्याचे करावे ही विनंती.

आपलेच,
पार्ले खाद्यमंडळ.

वि. सू. : प्रत्येकाला इच्छाभोजन करता यावे यासाठी मुद्दामच कसलाही मेनू ठरवलेला नाहि. प्रत्येकाने स्वतःला हवे ते, खाल्ले असेल ते, खावेसे वाटणारे ते सर्व खावे.

ता. क. वरील रुपरेषेत एका महत्वाच्या कार्यक्रमाची नोंद राहून गेली त्याबद्दल मंडळ आपली सखेद माफ़ी मागत आहे. वर नमूद केलेल्या पूर्वनियोजीत कार्यक्रमांच्या अधून मधून उपास ह्यांचे " करंजी असो वा सूतरफ़ेणी, तूच माझी राणी " हा सुमधूर गीतगायनाचा कार्यक्रम होईल.
-sashal

हे वर पोस्ट केले आहे. दिसते आहे का? :-)


Anilbhai
Friday, December 01, 2006 - 7:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ये लालु, ती तिच्या रंगिबेरंगीच्या पाना बद्दल बोलते अहे. Feed back च्या पानाबद्दल नाही.

Lalu
Friday, December 01, 2006 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माहित आहे हो भाई. पण तिला हे पोस्ट पाहिजे होते, ते दिले.

Sayonara
Friday, December 01, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालू      

Lalu
Friday, December 01, 2006 - 8:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सायो, ते अनुक्रमे चाफा आणि साशल यांनी लिहिले आहे. नावे आहेत बघ खाली.

Sayonara
Friday, December 01, 2006 - 9:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो ते नंतर वाचलं मी. :-)

Asami
Friday, December 01, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाइ तीचा password द्या लालूला म्हणजे तिथे पण post करेल ती हवे तर

Sashal
Friday, December 01, 2006 - 11:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, नीट वाच पाहू सगळं .. कोणीही पोस्ट केलं तरी ते नीट दिसत नाहिये हाच तर प्रॉब्लेम आहे ..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators