|
Upas
| |
| Saturday, August 18, 2007 - 4:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हं सशल असं nostalgic वाटणं साहाजिक आहे विशेशतः जर तू महाराष्ट्रात फीरली असशील अशी मन्मुराद तर.. आपलं राज्य हे गड कील्ल्यांचं राज्य असे घाट, गड किल्ले, डोंगर दर्या तुला कुठेही मिळणार नाहीत भारतात.. पण खरं सांगू इथे VA मधे असताना खूप जवळीक वाटली तिथल्या terrain शी.. असेच चढ उतार, नागमोडी रस्ते.. आणि blue ridge parkway चा मस्त पट्टा अगदी Shenadoh Valley पर्यंत वर.. इथे driving ची जी मजा आहे ती दुसरी कुठे नाही.. आणि गाडीत पाणी, चटणि संॅडवीज वगैरे करून ठेवायचं.. अगदीच हौस असेल तर वडापाव.. NJ मधे पण लहान लहान खूप beaches दिसले.. trainling ची पण इथे खूप मजा येते.. बरंच safe देखील आहे.. सांगायचं मुद्दा असा की जर मनात आलय एवढं तर बाहेर पड.. just do it .. मला माहीतेय सांसारीक जबाबदर्या असतात पण काही छोटे क्षण आपण नक्कीच जगू शकतो.. जर अशी जगण्याची ओढ असेल तर.. best of luck! ![:-)](/hitguj/clipart/happy.gif)
|
Upas
| |
| Tuesday, September 11, 2007 - 9:55 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सशल, You said it in the end! तेच बर्याच अंशी खरं आहे असं मला तरी वाटतय.. NJ मधे मला असा अनुभव यायचा त्याचं महत्वाच कारण असं की इतक्या गिर्हाईकांच्या प्रचंड गर्दीत काही ऐकून घ्यायला कींवा हसायला दुकानदाराला वेळच नसायचा! पदार्थांचे वास घेऊन पाहू नका, चाखून पाहू नका असे बर्याच देसी दुकानात लिहीले आहे.. ते केवळ गिर्हाईके तसं करतात त्यातून आलेल्या अनुभवामुळेच.. भेंडीची, गवारीची टोके तोडून बघू नयेत, टोमेटोला टोचे मारू नयेत अशा प्रकारचे बोर्ड दिसल्यास नवल नाही..
|
Deepanjali
| |
| Tuesday, September 11, 2007 - 10:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
hmm फ़्रीमोंट मधे उघडलेलं नवीन कॅश ऍंड कॅरी मात्र अजुन तरी फ़ारच चांगलं आणि स्वच्छ आहे इथल्या इतर Indian stores पेक्षा , मोठही आहे . शास्ता ची ती चटणी मी पण आवर्जून आणते , मस्त असते भारत बाजार - कुमुद मात्र तू लिहिलयस त्या प्रकारातलेच ! Anywas, कढी पत्ता , कोथिंबीर सोडून देशी stores मधून भाज्या , फ़ळे आणणे पाहिल्याच वर्षी सोडून दिलय आणि Indian restaurents चं तर नावही नको वाटतं !
|
Kedarjoshi
| |
| Tuesday, September 11, 2007 - 10:17 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुझा मुद्दा एकदम रास्त आहे. ईकडे ही नेहमी आम्ही सेल बाय डेट पाहुन्च (भारतीय मध्ये) घेतो. बर्याचदा तर त्या डेटस अल्टर केलेल्या असतात. म्हणजे एक्सपायर झाल्यावर बदललेल्या. बर्याच प्रयत्नांनंतर आम्हाला एक चांगले दुकान सापडले त्यात सर्व चांगल्या वस्तु असन्याची खात्री झाली आहे. डिव्हीडी च अगदी बरोबर. त्या दुकानात पायरेटेड डिव्हीडी मिळत नाहीत. एकुनच मानसिकता तशीच असते, उपकार केल्याची, काही दुकाने अपवाद.
|
Farend
| |
| Tuesday, September 11, 2007 - 10:42 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सशल तू दिलेली कारणंच आहेत असेच मलाही वाटते. सनीवेल च्या IC&C मधून आम्ही मधे ब्रेड आणला त्याला उदबत्तीचा वास येत होता खाताना. मी जाऊन दाखवले तर साधारण असाच अनुभव, फक्त पैसे परत दिले त्यांनी. पण दिलगिरी वगैरे ची भानगड नाही. एकूणच हसून बोलणारे वगैरे भारतीय दुकानदार मला सनीवेल मधे दिसलेले नाहीत. एवढ्या सर्व दुकानांत फक्त भारतीय दुकान वाल्यांचेच चेहरे एवढे कडवट का असतात कळत नाही. पण तुला एक करता येईल, त्या दुकानाच्या मालकाला बाजूला घेऊन (म्हणजे इतर ग्राहकांसमोर न करता) समजावलेस तर कदाचित रिलेशन न बिघडता हे काम होईल.
|
Ksha
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:24 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
San Jose च्या कुमुदमध्ये तर raid टाकायला हवी इतका माल expiry date उलटून गेलेला असतो. यांना इथल्या health ministry चे काहीच नियम लागू नाहीत का असा प्रश्न पडतो कधी कधी. तरी बरं इथलं एक गुजराथ्याचं दुकान सापडलंय सुगंध म्हणून. चांगला माल असतो. आणि भाजी वगैरे पण अगदी निवडलेली, तोडलेली मिळते ( आमच्या सारख्या ब्रम्हचार्यांची सुटका! )
|
Deepanjali
| |
| Tuesday, September 11, 2007 - 11:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि भाजी वगैरे पण अगदी निवडलेली, तोडलेली मिळते ( आमच्या सारख्या ब्रम्हचार्यांची सुटका! ) <<<<< ha ha ha... तुला कापलेली किंवा निवडलेली म्हणायचय का रे क्ष ? कारण तोडलेली भाजी सगळ्याच दुकानात मिळते रे इतर दुकानां मधे काही भाजीची शेती नसते कि आपली आपल्याला भाजी तोडून घ्यावी लागेल . ![](/hitguj/clipart/crazy.gif)
|
Marhatmoli
| |
| Wednesday, September 12, 2007 - 12:12 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मलाहि असाच अनुभव आला या weekend ला. बरेच लोक जेवायला येणार म्हणुन पोळ्यांचि ३ पाकिटे ( grab & go ) आणलि Bombay spice नावाच्या indian store मधुन त्यापैकि दोन पाकिटांमधिल पोळ्यांवर बुरशि आलेलि. पैसे तर वाया गेलेच शिवाय ऐनवेळि पाहुण्यांसमोर फ़जिति झालि त्याचा मनस्ताप वेगळाच.
|
Dineshvs
| |
| Wednesday, September 12, 2007 - 1:37 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सशल, तेल असणारे कुठलेही पदार्थ म्हणजे चटण्या तर आहेतच शिवाय तेलबियाही म्हणजे तीळ, शेंगदाणे वैगरे खवट होत जातात. त्यामुळे एक्स्पायरी डेट महत्वाची असते. दुसरे म्हणजे फ़्रोझन पदार्थांच्या बाबतीत कोल्ड चेन महत्वाची, ती म्हणजे पदार्थ तयार केल्यापासुन तुमच्या घरी येईपर्यंत, सर्व वाहतुकीमधे तपमान राखले पाहिजे. ते भारतात होत नाही. म्हणुन माल खराब होतो.
|
Tulip
| |
| Wednesday, September 12, 2007 - 2:18 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
त्या दुकानाच्या मालकाला बाजूला घेऊन (म्हणजे इतर ग्राहकांसमोर न करता) समजावलेस तर >> चांगलच खोपच्यात घेऊन समजाव त्याला सशल भारतीय दुकानदार म्हणजे केदार म्हणतोय तसे सेल बाय डेट आल्टर केलेलेही असू शकतात.
|
Bee
| |
| Wednesday, September 12, 2007 - 3:41 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
म्हराटमोळी, तुझा अनुभव खरच खेदजनक आहे. मागे इथे एकाकडे सहास्त्रवर्तन होते म्हणून मी माव्याचे पेढे आणले पण घरी आणून उघडून पाहिले तर बुरशीचा एक करडा हिरवा थर चढला होता आत. खूप बरे झाले मी घरीच उघडून पाहिला डबा.
|
Apurv
| |
| Wednesday, September 12, 2007 - 1:56 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सशल.... relationship तर आता बिघडले आहेच, जरी वर वर भांडण नाही झाले तरी मनात त्याची खंत आहेच... अश्या relation ला काय अर्थ... मन मोकळे पणाने सांगून टाक... थोडा राग येइल त्यांना... वाइट वाटेल... तरीही तु तिकडे परत जात राहीलीस तर जुन्या गोष्टींचा विसर पडेल.
|
Chandya
| |
| Wednesday, September 12, 2007 - 2:35 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
डागळलेल्या भाज्या, फळे, sell by date च्या आधीच नासलेले दुध, फुटलेली अंडी, जवळपास खराब झालेले fish fillet , expiry date उलटुन गेलेले पदार्थ (chips, cookies etc) इथल्या अमेरिकन grocery store मध्ये सुद्धा पाहिलेत आणि (चुकून) विकत आणलेत. it is okay to expect courtesy and hospitality in Indian shops that we usually get at many of their american couterparts but we should also keep in mind the price difference . Just be extra cautious when purchasing any food or hygiene items. Although it is for their own profit, life would have been much tougher (and bland) for immigrant like us in these foreign countries if these fellow Indian shop owners would not have ventured into this business. Long live gujju bhais
|
Ksha
| |
| Wednesday, September 12, 2007 - 5:44 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुला कापलेली किंवा निवडलेली म्हणायचय का रे क्ष ? >>>> तुमच्याकडे गवार कापतात का? आमच्याकडे तर तोडतात बुवा!
|
Upashiboka
| |
| Wednesday, September 12, 2007 - 6:50 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
You get what you pay for. Whole foods/Wild Oats chi quality havi pan paise matra Indian store chya bhavat, he kase shakya hoNaar?
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, September 12, 2007 - 8:50 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
उपाशीबोका काही कळल नाही तुम्हाला असे म्हणायचे आहे का की भारतीय दुकानदार स्वस्त विकतात म्हणुन खराब माल विकला तरी चालेल. ( अन ते स्वस्त असत?) होल फुड मध्ये तुरीची दाळ, वाघ बकरी चहा व खोबर्याची चटनी मिळेल का?
|
Farend
| |
| Wednesday, September 12, 2007 - 9:22 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Upashiboka तुमचा अनुभव काय आहे माहीत नाही, पण माझ्या माहितीतील भारतीय तरी आपल्या दुकानात गोष्टी स्वस्त मिळतात म्हणून जात नाहीत (आणि मुळात फार थोडे पदार्थ इतर दुकानांपेक्षा स्वस्त मिळतात. Whole Foods ची तुलना करण्यात अर्थ नाही, कारण त्यांच्या त्या organic वगैरे भानगडीमुळे जास्त रेट ते लावू शकतात, ते ही organic म्हणजे चांगले हा समज लोकांचा आहे तोपर्यंत चालेल), ते जातात कारण बरेचसे भारतीय पदार्थ फक्त तेथेच मिळतात म्हणून. उद्या अमेरिकन दुकानांनी ते ठेवायला सुरुवात केली तर ते ही होणार नाही, थोड्या प्रमाणात आत्ताच तसे होऊ लागले आहे. आपण जे काय विकतोय ते पदार्थ खाण्याच्या लायकीचे आहेत का नाही याची खात्री अशा दुकान दारांनी सतत करावी हीच अपेक्षा आहे. Chandya हो येथील अमेरिकन दुकानातून सुद्धा कधी कधी असे पदार्थ मिळतात पण जेव्हा आपण ते परत घेऊन जातो तेव्हाचा अनुभव खूप वेगळा असतो. Safeway वगैरे chains असल्याने तेथील कामगारांना वैयक्तिक फरक पडत नाहे वगैरे ठीक आहे, पण असे पदार्थ परत तर सगळ्यांनाच परत घ्यावे लागतात, मग थोडी customer service दाखवली तर काय बिघडले आणि इतर काही नाही तरी गिर्हाइकांशी नीट बोलायला तर पैसे पडत नाहीत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|