|
अजून एक वाचनीय लेख http://www.rediff.com/news/2008/apr/14guest.htm
|
सुन्दर लेख अहे. लिन्क बद्दल धन्यवाद जय श्रिराम
|
देव म्हणजे रमेश देव, सीमा देव, अजिंक्य देव 
|
आणि देव,देव आनन्द!गाइड सारख्य चित्रपटतुन आनन्द देणारा,आणि मि.प्राइमिनिस्टर सारखे चित्रपट बनवून लोकान्चा आनन्द हिरावुन घेणारा वन आणि ओन्ली देव देव आनन्द!
|
Hi_psp
| |
| Friday, April 18, 2008 - 5:41 am: |
| 
|
एक देव आहे, त्याला पन सिमा आहे म्हनुन तो अजिन्क्य आहे.
|
Chyayla
| |
| Sunday, April 27, 2008 - 10:37 pm: |
| 
|
देव, ईश्वर म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी स्वता: प्रयत्न केला तेव्हा कित्येक विचार, कल्पना व तर्क वाचण्यात व अनुभुतीत आले तरी देव काय हे खात्रीपुर्वक कळाले हे म्हणण्याचे धाडस होइना. माझ्या स्वता:च्या अनुभवानुसार माझ्या मुख्य प्रश्नाचे निराकरण झाले व जीथे खात्रीपुर्वक उत्तर मिळाले ते केवळ वेदांतदर्शनामधे. मागे आश्चिग यान्नी वेदांतदर्शन व विविध दर्शने, मते यांचा तपशील दिला होता तो माहितीपुर्ण होता पण तरी तो गोंधळच निर्माण करणारा होता त्यामुळे असे वाटावे की वेदांतदर्शन देव, ईश्वर हे जाणण्यास असमर्थ आहेत की काय. पण जेव्हा स्वामी विवेकानंदांचे वेदांताबाबत फ़ारच सोप्या शब्दात समजावुन सांगितले विचार वाचले तेव्हा एक लक्षात आले की वेदांतांतीना देव काय हे निसंदिघओअणे कळाले पण त्याच्या स्वरुपाबाबत व तपशिलाबाबत मात्र वाद आहेत. व आश्चिगने मुळ विषयापेक्षा, या वादावरच जास्त भर दिला. असो तर मी जे वाचले तेच केवळ ईथे लिहित आहे, यात माझे स्वता:चे काहीही नाही. पण देव काय हे समजायला याचा उपयोग होइल हा विश्वास. ही त्या मालिकेतील पहिली पोस्ट पण यातुन लगेच निश्कर्ष काढण्याची घाई करु नये ही विनंती कारण हे केवळ टप्प्या टप्प्यानेच समजता येइल. वेदांतदर्शनाचा एकमेव विषय, एकमेव उद्देश आहे एकत्वाचे अन्वेषण (यात देव कुठे आला हा प्रश्न तुम्हाला पडेल, पण धीर धरावा). हिंदु मन तपशिलात रमत नाही, ते विशेषांकडे लक्ष देत नाही; त्याला नेहमी त्यामागील सामान्य तत्वाचीच ओढ वाटत असते. "जे जाणल्याने बाकी सारे जाणले जाते असे काय आहे?" हाच त्याच्या चिंतनाचा एकमेव विषय आहे, त्याच सत्याचे त्यांनी अन्वेषण केले आहे. "मातीच्या एका ढेकळाचे ज्ञान झाल्याने ज्याप्रमाणे मातीच्या सर्व वस्तुंचे ज्ञान होउ शकते, त्याप्रमाणे, असे काय आहे की जे जाणल्याने हे अवघे विश्वचे विश्वच जाणले जाईल?" हीच त्याची एकमेव पृछा, एकमेव जिज्ञासा. मला वाटत हा उद्देश किती सरळ व सुस्पष्ट आहे तथाकथित आदिमकाळापासुन ज्या जिज्ञासेतुन मनुष्य बौद्धिक, भौतिक, सांस्कृतीक प्रगती करत आहे ती ह्या मुळ जिज्ञासेतुनच असावी. व तेच सार्या तत्वज्ञानाचे,शास्त्रांचे, मानसशास्त्राचे, आधुनिक विज्ञानाचे आदर्श असु शकते. यात कुठेही धर्म, सामाजिक रुढी, कर्मकांड, मरीआई, सटवाई तसेच पिंडाला कावळा शिवणे, नामस्मरण यांचाही सध्या सम्बंध नाही, वेळोवेळी हे विषय बाजुला सारुन केवळ शुद्ध चर्चेवर भर देण्याचे विनंती करत होतो व आहे.
|
Zakki
| |
| Monday, April 28, 2008 - 1:18 pm: |
| 
|
च्यायला, तुम्ही चांगले लिहीले आहे. विशेषत: शेवटचा परिच्छेद. खरे तर त्यात धर्म इ. बरोबर देव हेहि लिहायला पाहिजे होते. कारण तुम्हीच लिहील्याप्रमाणे, वेदांतांतीना देव काय हे निसंदिघओअणे कळाले . मग जर इच्छा असेल नि जमत असेल तर आधी ते ज्ञान प्राप्त करावे नि मग देवाबद्दल बोलावे. तोपर्यंत जे माहितच नाही त्यावर चर्चा कसली करणार?
|
Chyayla
| |
| Monday, April 28, 2008 - 9:06 pm: |
| 
|
धन्यवाद झक्की, तुमच्या म्हणण्याला दुजोरा देइल की सध्या "देव", देवपुजा हे शब्दप्रयोग बाजुला ठेवु यात कारण देवाच्या बाबतित बर्याच लोकान्नी चुकीची कल्पना करुन ठेवली आहे व त्यामुळे अजुनच गोंधळ होउ शकतो, तेव्हा आधी वेदांत या बाबतित काय म्हणतय ते समजुन घ्यायचा प्रयत्न करु या. असो मागील पोस्ट मधे वेदांताचा उद्देश आपण बघितला हा उद्देश वैज्ञानिक तर आहेच पण सध्या आधुनिक विज्ञान मात्र एका मर्यादेतच घुटमळतय त्याचा मुख्य उद्देश विश्वोत्पती जाणुन घ्यायचा आहे जो की वेदांतच्या उद्देशापेक्षा एक पायरी खाली आहे पण पुढच्या पायरीसाठी तितकाच पुरक आहे. विज्ञानाच्याही पुढे जी पायरी आहे ती म्हणजे अध्यात्मिक. वेदांतदर्शनाचा उद्देश, अन्वेषण व त्यासाठीचा वैज्ञानिक अभ्यास ह्यातुन जे शास्त्र निर्माण झाले त्याला "अध्यात्म" हा शब्दप्रयोग वापरतोय हे लक्षात आलेच असेल. म्हणुनच तुम्हाला अध्यात्मात पुरक असे शुद्ध विज्ञान सोबत तत्वज्ञान, मानसशास्त्र व ईतर शास्त्रेही दिसतीलच. असो तर स्वामी विवेकानंद पुढे म्हणतात्- हिंदु तत्वज्ञांच्या मतानुसार हे अवघे विश्व 'आकाश' नामक एका जडद्रव्यात रुपांतरीत होउ शकते. आपण आपल्या सभोवार जे काही पहातो, ज्या कशाचा अनुभव घेतो, ज्या कशाला स्पर्श करतो, ज्या कशाची चव घेतो ते सारे ह्या 'आकाशा' चाच केवळ विभिन्न आविष्कार होय. हे आकाश सुक्ष्म व सर्वव्यापक आहे. आपण ज्यान्ना घन, द्रव किंवा वायुरुप म्हणतो ते सर्व पदार्थ, सर्वप्रकारचे आकार, रुपे नि शरीरे, ही पृथ्वी, चंद्र, सुर्य, तारे हे सगळेचकाही ह्या 'आकाशा' चे बनलेले आहे. ईथे आकाश या शब्दावरुन व्यव्हारातील प्रचलित शब्दप्रयोगामुळे गोंधळ होउ शकतो म्हणुन त्याबाबत थोडेसे स्पष्टीकरण. वर दिसणारे निळे निळे आकाश म्हणजेच आकाश हे या ठीकाणी अपेक्षीत नाही. आकाश म्हणजे पंचतत्वातील एक तत्व पृथ्वी (घन), जल (द्रव),अग्नी, वायु व आकाश. यातली पहिली चार तत्वे आपणा सगळ्याना माहित आहे शेवटचे तत्व आकाश म्हणजे आधीच्या ४ तत्वाव्यतिरिक्त जे काही आहे ते म्हणजे आकाश. हे आकाश अगदी तुमच्या शरीरात, खडकातील पोकळीत तसेच, समस्त ब्रह्मांडात सर्वत्र व्याप्त आहे हे सगळ्यात मोठे तत्व आहे व यातच ईतर तत्वे अंतर्भुत आहेत ही तत्वे सतत रुपांतरीत होत असतात आकाश तत्वातुनच पृथ्वी, जल, वायु, अग्नी निर्माण होतात व शेवटी त्यातच विलीन होतात. साधे उदाहरण द्यायचे तर जलाचे घनरुप म्हणजे बर्फ याला अग्नीने तापवले तर द्रव पदार्थात रुपांतर होते, अजुन तापवले तर वायुरुप व पुढे हा वायु आकाशात विलिन होतो परत पर्जन्यचक्रानुसार जलरुपाने अवतीर्ण होतो. या छोट्या उदाहरणावरुन वेदांतीना नेमके काय म्हणायचे आहे ते लक्षात येइल. पर्जन्यचक्राप्रमाणेच वेगवेगळ्या स्वरुपाच्या प्रक्रियेत या जगातील सगळ्या जडवस्तु जसे सुर्य, चंद्र, तारे सुद्धा ह्या रुपांतरीत होत असतात अगदी तुमची आमची सजीव शरीरेही, तुम्हाला ठाउक असेल शरीरातही रोज हजारो पेशी तयार होतात मरतात व निघुन जातात पुढे त्या कुठे विलिन होतात? तर परत आकाशात. म्हणजे आपणही अगदी रोज नित्यनुतन आहोत बरे का. आता या आकाशाव्यतिरिक्त या ब्रह्मांडात सर्वव्यापक असे अजुन एक तत्व आहे आहे ते काय आहे ते आपण पुढच्या टप्प्यात पाहु या.
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 29, 2008 - 3:22 am: |
| 
|
समीर, मी अश्याच विचाराना मानतो. नाम, रुप, मुर्ती, पूजा या सगळ्याच्या पलिकडची हि संकल्पना, मला खुप आवडते. या विषयावर सर्वाना समजेल असे लिहिणे, कठिण आहे. या लेखनाबद्दल शुभेच्छा.
|
Chyayla
| |
| Wednesday, April 30, 2008 - 9:38 pm: |
| 
|
दिनेशदा धन्यवाद, हा विषय तसा गहन आहेच तरी रामकृष्ण मठाने स्वामी विवेकानंदांचे वेदांवरील भाष्य संकलीत करुन ठेवले आहे तेच ईथे सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे तुमच्या शुभेछांची गरज आहेच. दिनेशदा, मला वाटत हा शुद्ध ज्ञानमार्ग आहे जर कोणाला हा मार्ग पेलवला तर पुढे जाण्यास काहीच हरकत नाही. ईतर पुजा पाठ, नाम वैगेरे हे मला भक्ति मार्गाचे प्रकार वाटतात. रोजच्या जीवनातुन, अनेक सुख दुखाच्या फ़ेर्यातुन मानवी मन भटकत असत ते प्रथम ताळ्यावर येणे जरुरी आहे जेणेकरुन त्याची बुद्धी स्थिर होउन हेच ज्ञान प्राप्त होण्यास मदत व्हावी हा त्याचा मुख्य उद्देश. भक्ति मधे सोबत विश्वास असो एक आधार असतो नाहीतर ह्या मार्गावर पुढे जाउन अधोगती किंवा भरकटण्याची जास्त शक्यता असल्यामुळे तिथे या उपायांचा सुरुवातीला व प्रगतीच्या नंतरच्या येणार्या टप्प्यावरही याचा चांगला उपयोग होतो. म्हणुन मला हे सगळेच मार्ग परस्पर पुरक वाटतात व व्यक्तिसापेक्ष योग्य वाटतात. तरी तुमच्या मताशीही सहमत आहे कारण काळानुसार त्यातही भेसळ आली व मुळ उद्देशाशी कुठे कुठे फारकत होत गेली असे जाणवते असो म्हणुनच स्वामी विवेकानंद, दयानंद सरस्वती व ईतर महात्मे याना हे जाणवले तेंव्हा त्यान्नीही परत वेदांकडे चला हा महत्वपुर्ण संदेश दिला आहे. मागे आपण बघितले की हे सारे विश्व आकाशाचे बनले आहे व त्यात प्रत्येक जडवस्तु सुक्ष्मात व सुक्ष्मातुन जडात सतत रुपांतरीत होत असते. मग हे जे रुपांतरण होत आहे ते होण्यासाठी कोणती तरी शक्ति कार्य करीत असावी नाही का? आज त्याबद्दल. ह्या 'आकाशा' वर कोणती शक्ती कार्य करुन त्यापासुन या विश्वब्रह्मांडाचे सृजन करीत असते: ह्या आकाशासमवेतच एक विश्वव्यापी शक्तीही अस्तित्वात आहे; ह्या विश्वात जी म्हणुन काही शक्ती आहे मग ती आकर्षणशक्तीच्या रुपाने प्रकट होत असो की अपसारणच्या रुपाने प्रकट होत असो, नव्हे विचारशक्तीच्या देखील रुपाने प्रकट होत असो- ती सारी त्या एकाच महाशक्तीची केवळ विभिन्न अभिव्यक्ती होय्; आणि त्या एका मूळ शक्तीलाच हिंदु लोक 'प्राण' म्हणत असतात. हाच 'प्राण' 'आकाशा' वर कार्य करुन हे अवघे विश्व निर्माण करीत असतो. कल्पाच्या प्रारंभी हा प्राण जणुन 'आकाश्; रुपी अनंत समुद्रात प्रसुप्त असतो, आदीकाली हे आकाश गतिहीन स्वरुपात असते. नंतर ह्या प्राणाच्या प्रभावाने ह्या आकाश्-समुद्रात गती उत्पन्न होते, आणि हा प्राण जसजशी हालचाल करु लागतो, जसजसा स्पंदन पावु लागतो तसतशी ह्या आकाश्-समुद्रातुन नाना ब्रह्मांडे, किती सुर्य, किती चंद्र, किती तारे, ही वसुंधरा, माणसे, पशु, वन्स्पती, निरनिराळ्या शक्ती नि अद्भुत पदार्थ निर्माण होउ लागतात. म्हणुन हिंदुंच्या मते, शक्तीचे प्रत्येक रुप हा या प्राणाचाच एकेक आविष्कार असुन, प्रत्येक भौतिक रुप हे आकाशाचिच अभिव्यक्ती होय. वरच्या पोस्ट मधे विचारशक्तीलाही एक शक्ती म्हटले आहे हे लक्षात घ्यावे तसेच अजुन 'कल्प' हा शब्दप्रयोगही आला आहे पुढच्या पोस्ट मधे ह्याबद्दलच थोडे विवेचन करु या व हे काय आहे, ते समजुन घेउ या.
|
भक्ति मधे ह्या मार्गावर पुढे जाउन अधोगती किंवा भरकटण्याची जास्त शक्यता असल्यामुळे... हे विधान बेसलेस आहे. भक्तीतुन माणुस भरकटू शकतो या विधानाला काहीच अर्थ नाही. वेदांतदर्शनाचा एकमेव विषय, एकमेव उद्देश आहे एकत्वाचे अन्वेषण एकत्व म्हणजे अद्वैत का???जर तसे असेल तर तेही विधान चुकिचे आहे.मुळात बरेच योगी ज्याला वेदांत म्हणतात ते खरे वेदांत नसुन वेदांतावर शंकराचार्यांनी लिहिलेली टिका आहे. वेदांतावर इतरही टिका आहेत. श्रीमद भागवतम ही वेदांतावरची भक्ती टिका आहे. मध्वाचार्यांनीही वेदांतावर टिका लिहीली आहे.त्यामुळे जेंव्हा वेदांताबद्दल बोलले जाते तेंव्हा भागवताचाही विचार व्हावा.
|
Chyayla
| |
| Friday, May 02, 2008 - 6:04 am: |
| 
|
भक्ति मधे सोबत विश्वास असो एक आधार असतो नाहीतर ह्या मार्गावर पुढे जाउन अधोगती किंवा भरकटण्याची जास्त शक्यता असल्यामुळे चिन्या, अरे बाबा नीट वाच की, मी भक्तिचे महत्वच सांगतोय.. ह्या मार्गावर म्हणजे अध्यात्माच्या मार्गावर, हे लक्षात आले का? वेदांतचा उद्देश व 'अद्वैत' एक नाही हे मी स्पष्ट करु ईछितो. द्वैत, अद्वैत, द्वैताद्वैद हा यानंतरचा उहापोह आहे. केवळ याचसाठी मी लिहिले होते की सध्या कोणत्याही निष्कर्शावर जाउ नकोस
|
खूप छान शब्दांत अतिशय गहन विषय मांड्लाय समीर, अजून येऊ द्या.
|
Dineshvs
| |
| Saturday, May 03, 2008 - 2:54 am: |
| 
|
समीर, सुरवातीला ज्यावेळी इतर रुढ मार्ग वापरले जातात त्यावर भयंकर स्पर्धा आहे. हा शब्द जरा खटकेल, पण असे असते ना कि आम्ही सांगतो तोच देव खरा, आम्ही सांगतो तेच स्तोत्र म्हणा, ( का तर त्याचा हमखास फायदा होतो ) बाकि सगळे कनिष्ठ. अगदी कुठल्याहि कथेत, हेच असते. या कंपुबाजीमूळे प्रचंड वाद झाले, गट पडले. या सगळ्याची मला कीव येते. यालाच भरकटणे म्हणत असावेत.
|
Chyayla
| |
| Sunday, May 04, 2008 - 3:13 pm: |
| 
|
असे असते ना कि आम्ही सांगतो तोच देव खरा, आम्ही सांगतो तेच स्तोत्र म्हणा, ( का तर त्याचा हमखास फायदा होतो ) बाकि सगळे कनिष्ठ. दिनेशदा, अगदी मान्य हा प्रकार खुप झाला. कंपुबाजीही निर्माण झाली त्यामुळे केवळ गोंधळच झालेला. जर असे कंपुबाज हिंदुंमधेही असतील त्तर चर्च (ख्रिशचन धर्मसंस्था) जे म्हणत की केवळ चर्चमधुनच मुक्तिचा मार्ग आहे व मुस्लिम जे म्हणतात आमचाच अल्ला बाकी सगळे झुट यांच्यात व त्यांच्यात काय फरक राहीला? दुसरीकडे देवाच्या नावावर बरेच हिडिस प्रकार आलेत आणी गेलेत जसे बोकडाचा बळी काही ठीकाणी अजुनही आहेच, बुवाबाजी, चमत्कार व त्याद्वारे फसवणुकीचे प्रकार, तसेच तीर्थक्षेत्रांमधील पंडे लोकांचा धुमाकुळ त्यातुन पैसे मागुन देवदर्शन करवणे वैगेरे या सगळ्या प्रकारांमुळे 'देव' म्हणजे काही तरी भयंकर प्रकार आहे अशी समजुत होते व उबग येतो अर्थातच यामुळे मुळापासुन दूर गेल्याने संभ्रम होउन समाजमन भरकटल्या जाते. दिनेशदा तुमच्या मुद्याला व त्यावर माझ्या उत्तराला अनुसरुन एक उदाहरण देइल. जसे पुर्वी शैव व वैष्णव यांच्यामधे प्रचंद वाद होता, वादच तो त्यामुळे फार तर सामाजिक दूरी निर्माण झाली होती. पण त्यामुळे अगदी समाजात लढाया, रक्तपात झालेला नाही यासाठी खरे श्रेय ज्या मुशीतुन हिंदु भारतिय समाजमन(धर्म नव्हे) निर्माण झाले त्याच कौतुक करेल. नाहीतर आपण ईतर ठीकाणी असल्या वादातुन जो भयंकर रक्तपात होताना आजही पहात आहोत (शिया-सुन्नी) असे कित्येक प्रकारचे रक्तपात भारतातही झाले असते. शेवटी तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे कंपुबाजी होउन भरकटले होते हे मात्र नक्की. तरी दुसरीकडे समाधानाची गोष्ट अशी की हा प्रकार आला पण भारतिय समाजाला कधीच मानवला नाही. व रुजलाही नाही उदा: जर कुणी म्हणत असेल की कृष्ण हाच खरा देव पण त्यासोबत तो असे म्हणणार नाही की राम हा खोटा देव. साधारणता एका देवाला महत्व देताना ईतर देवांचा अपमान केल्या जात नाही. म्हणुन तर हिंदु मन हिंदु देवदेवताना मानेल पण सोबत अल्ला (मुस्लिम नव्हे), ख्राईस्ट (चर्च नव्हे) यान्ना कनिष्ठही मानणार नाही. कारण त्याना हे पुरत ठाउक आहे की एकाच शक्तिला, एकाच परम्यात्माला केवळ वेगवेगळ्या नावाने पुकारल्या जाते. स्तोत्राच्या बाबतितही म्हणाल तर त्यातही शेवटी फ़लषृती असते जसे हे केल्याने अमुक मिळेल आणी तमुक मिळेल, मला सुद्धा खरे तर स्त्रोत्राच्या मर्माव्यतिरिक्त हे असल काही पटतच नाही. गीतेच्या (वेदांताचे सार) तत्वज्ञानाप्रमाणे निष्काम उपासना, निष्काम कर्मयोग या तत्वाना फाटा जातो व परत मुळापासुन मात्र भरकटल्या जाते असे वाटते. दुसरीकडे असे जाणवते जसे की लहान मुलाना आपण चांगल काम करण्यासाठी उद्युक्त करायला जसे आमिश देतो तसे हे काही सामान्य समाजमनाला व अध्यात्म्याच्या मार्गावर आणण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणुन स्तोत्र वाचण्यासाठी उद्युक्त केले असावे. संदीप, तुमच्या प्रोत्साहनाबद्दल आभार. आता लिहितोच पुढचे पोस्ट. मुळ विषयातुनही कधी कधी ईतर विषयांचा उहापोह होतोच, पण अशीही चर्चा होणे आवश्यक आहे.
|
Radha_t
| |
| Wednesday, May 07, 2008 - 11:03 am: |
| 
|
च्यायला पहिल्यांदाच तुमच लिखाण आवडल आणि पटल. वेदांतावरून गाडी लवकरच देव म्हणजे काय आणि त्याची गरज काय यावर येईल ही अपेक्षा
|
Chyayla
| |
| Saturday, May 10, 2008 - 12:20 pm: |
| 
|
राधा, तुम्हालाही धन्यवाद प्रथम पासुन माझा देवाच्या बाबतित द्रुष्टीकोन हा शुद्ध वेदांतिक होता तर तुमचा काही प्रचलित कारणांमुळे देवाबाबत झालेल्या समजुतीच्या आधारे वेगळाच द्रुष्टीकोन होता व त्यातुन वाद होत होते. माझा आग्रह हाच राहिल की वरवरचे उथळ समजुतीवरुन निष्कर्ष काढण्या आधी हा विषय मूळापासुन समजुन घेतल्यास गैरसमज दूर व्हायला मदत होईल. असो तर मूळ विषय पुढे चालु ठेवु या.. ज्या वेळी हा कल्प संपेल त्या वेळी, आपण ज्याना घन पदार्थ म्हणतो ते सगळेच्या सगळे त्यानंतरच्या सूक्ष्म रूपात म्हणजे द्रव रुपात परिणत होतील; तो द्रव पदार्थ मग बाष्परुपात परिणत होईल; तो बाष्पीय पदार्थ मग आणखीच सूक्ष्म आणि एकजिनसी तेजाचे रुप धारण करील; आणि अखेर सारेकाही, ज्यापासुन ते सारे उत्पन्न झाले होते त्या मूल आकाशात लय पावेल, आणि ह्याचप्रमाणे, आपण आता ज्यान्ना आकर्षणशक्ती, अपसारणशक्ती वा गतिशक्ती इत्यादी म्हणत असतो त्या सर्व शक्ती हळुहळु, क्रमाक्रमाने त्या मूल प्राणात विलीन होउन जातील. त्यानंतर पुढील कल्पाचा आरंभ होईपर्यंत काही काळ हा प्राण जणु निद्रिस्त अवस्थेत राहील, नि कल्पारंभी मग फ़िरुन जागृत होउन फ़िरुन ही नाना रुपे प्रकट करील; आणि मग तो कल्प संपलयानंतर हे सारे लय पावेल. हे सारे याप्रमाणे येत आहे नि जात आहे एकदा वर तर एकदा खाली, एकवार पुढे तर एकवार मागे याप्रमाणे जणु हिंदकळत आहे, हिंदोळत आहे. आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे ते एकवार स्थितिशील, तर परत गतिशील होत आहे; एकवार प्रसुप्त तर एकवार क्रियाशील होत आहे. आलटुनपालटुन हे असेच अनाद्यंत चालले आहे. तथापी हेही विश्लेषण आंशिक वा अपुर्णच आहे. हे एवढे आधुनिक भौतिक विज्ञानालाही अवगत आहे. भौतिक विज्ञानाचे संशोधन ह्यापलिकडे पोहोचु शकत नाही. परंतु या अन्वेषणाचा अंत इथेच होत नाही. भौतिक विज्ञानाद्वारे बुद्धीगम्य असे सांगता येते पटवता येते पण जे बुद्धीच्याही पलिकडे आहे त्याच काय? एक गोष्ट नक्की की बुद्धीलाही हे जाणवत की याच्यापलिकडे काही तरी आहे पण ईथे परत आड येते एक अभेद्य भींत ते म्हणजे मानवी मनाच्या सीमा, ते देश, काल आणि कार्यकारणभाव यांच्या पलिकडे जाउच शकत नाही. ज्याप्रमाणे माणुस स्वता:च्या खांद्यावर बसु शकत नाही त्याचप्रमाणे दिक्कालांनी रेखाटलेली लक्ष्मणरेखाही कुणीसुद्धा उल्लंघुन जाउ शकणार नाही. ह्या देश-काल-निमित्याचे कोडे सोडविण्याचा प्रत्येक प्रयत्न विफ़लच ठरणार, कारण त्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न त्या त्रिकुटाचे अस्तित्व गृहीत धरुनच केलेला असणार म्हणुन मानवी बुद्धी, मन व विज्ञान ईथेच थांबतय. यापलिकडचे जाणुन घ्यायचे तर पुढे सुरु होतो अध्यात्माचा प्रांत. आधुनिक विज्ञान आता कुठे जगाची निर्मिती कशी झाली असावी ईथपर्यंय पोहोचण्याच्या बेतात आहे व त्याचा तपशील गोळा करण्यात गर्क आहे. खाली एक व्हिडियो क्लिप देत आहे ती जवळपास वर जे काही विष्लेषण केले त्याला पुरक आहे पण पुर्ण नाही. तरी वेदांताला काय म्हणायचे आहे याचा अंदाज यायला मदत होउ शकते. http://www.youtube.com/watch?v=mpsD68sRrvA&eurl
|
Chyayla
| |
| Saturday, May 17, 2008 - 3:17 am: |
| 
|
वरील विश्लेषणातुन आपल्याला अजून ते 'एक' काही गवसले नाही की जे जाणल्याने बाकी सारेकाही जाणले जाते. आपण अवघे विश्व हे भूतद्रव्य ( Matter ) आणि शक्ति ( Energy )या नावांनी प्रसिद्ध असलेल्या, किंवा भारतातील प्राचिन तत्वज्ञ ज्यांन आकाश आणि प्राण म्हणत असत अशा त्या दोन घटकांमधे विलीन केले. यानंतरची पायरी म्हणजे ह्या आकाश व प्राण यांना त्यांच्या मूलकारणात विलीन करणे. त्या उभयंताना, त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ अशा मन नामक पदार्थात विलीन करणे शक्य आहे. मन वा महत नामक समष्टीभूत मानसशक्तीतुन वा विचारशक्तीतुन आकाश व प्राण ही दोन्ही उत्पन्न झाली आहेत. विचार वा चिंतन हा आत्म्याचा, आकाश वा प्राण या दोहोंपेक्षाही अधिक सूक्ष्म असा आविष्कार आहे. ही विचारशक्ती, ही चिंतनशक्ती, ही समष्टीभूत मानसशक्ती वा हे 'महत' च आकाश व प्राण या दोन रुपांत विभक्त होउन जाते. प्रारंभी हे सर्वव्यापी मन वा 'महत'च अस्तित्वात होते, त्यानेच व्यक्त होउन, परीणत होउन, विकसित होउन आकाश व प्राण ही दोन रुपे धारण केली; आणि त्या दोहोंच्या संयोगाने, दोहोंच्या समन्वायानेच हे समस्त विश्व निर्मित झाले.
|
हा पहा कलकी भगवान http://pudhari.com/KolhapurStanikDetailNews.aspx?news_id=50537
|
Zakki
| |
| Tuesday, May 20, 2008 - 9:10 pm: |
| 
|
अहो याचा देव असण्या नसण्याशी काही संबंध नाही हो. आपल्यात, अगदी तुमच्या नावासकट, सर्वांची नावे देवाच्याच कुठल्यातरी नावावरून ठेवली असतात. त्यातल्याच एकाने काही बेकायदेशीर कृत्य केले, फसवाफसवी केली तर त्यावरून देव आहे का, देव म्हणजे काय या प्रश्नांवर काऽहीहि उजेड पडत नाही. केवळ एक बातमी. नि असे तर जगात प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू असते. तुम्हाला वाटत असेल की फक्त हिंदूंमधेच असे होते, तर आमच्या देशात चर्च मधे काय काय धंदे चालतात देवाच्या नावाखाली, ते ऐकून थक्क व्हाल!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|