|
|
Thread |
Posts |
Last Post |
  | Archive through December 28, 2004 | 35 | 12-29-04 2:46 am |
  | Archive through May 04, 2006 | 20 | 05-05-06 3:09 am |
  | Archive through May 09, 2006 | 20 | 05-09-06 8:24 pm |
  | Archive through July 04, 2007 | 20 | 07-04-07 10:56 pm |
  | Archive through July 06, 2007 | 20 | 07-06-07 4:36 am |
  | Archive through July 06, 2007 | 20 | 07-06-07 7:04 pm |
  | Archive through July 07, 2007 | 20 | 07-07-07 11:49 am |
  | Archive through July 08, 2007 | 20 | 07-08-07 9:42 pm |
  | Archive through July 09, 2007 | 20 | 07-09-07 4:00 pm |
  | Archive through July 10, 2007 | 20 | 07-10-07 3:41 pm |
  | Archive through July 11, 2007 | 20 | 07-11-07 7:22 pm |
  | Archive through July 13, 2007 | 20 | 07-13-07 1:38 pm |
  | Archive through July 16, 2007 | 20 | 07-16-07 4:19 pm |
  | Archive through July 22, 2007 | 20 | 07-22-07 7:55 pm |
  | Archive through July 24, 2007 | 20 | 07-24-07 8:16 am |
  | Archive through July 26, 2007 | 20 | 07-27-07 12:23 am |
  | Archive through July 31, 2007 | 20 | 07-31-07 12:44 pm |
  | Archive through August 01, 2007 | 20 | 08-01-07 7:06 pm |
  | Archive through August 02, 2007 | 20 | 08-03-07 1:57 am |
  | Archive through August 03, 2007 | 20 | 08-03-07 5:22 pm |
  | Archive through August 07, 2007 | 20 | 08-07-07 9:42 am |
  | Archive through August 08, 2007 | 20 | 08-08-07 9:11 am |
  | Archive through August 09, 2007 | 20 | 08-09-07 4:48 am |
  | Archive through August 10, 2007 | 20 | 08-10-07 6:34 am |
  | Archive through August 10, 2007 | 20 | 08-10-07 11:26 pm |
  | Archive through August 13, 2007 | 20 | 08-13-07 11:30 am |
  | Archive through August 14, 2007 | 20 | 08-14-07 7:58 pm |
  | Archive through August 15, 2007 | 20 | 08-16-07 1:32 am |
  | Archive through August 17, 2007 | 20 | 08-17-07 6:27 am |
  | Archive through August 17, 2007 | 20 | 08-17-07 10:34 pm |
  | Archive through August 19, 2007 | 20 | 08-19-07 2:10 pm |
  | Archive through August 21, 2007 | 20 | 08-21-07 6:41 pm |
  | Archive through August 22, 2007 | 20 | 08-22-07 9:01 pm |
  | Archive through August 23, 2007 | 20 | 08-23-07 6:18 pm |
  | Archive through August 24, 2007 | 20 | 08-24-07 4:37 pm |
  | Archive through August 27, 2007 | 20 | 08-27-07 6:22 am |
  | Archive through August 28, 2007 | 20 | 08-29-07 12:22 am |
  | Archive through August 29, 2007 | 20 | 08-29-07 8:42 pm |
  | Archive through August 31, 2007 | 20 | 08-31-07 7:01 pm |
  | Archive through September 04, 2007 | 20 | 09-04-07 2:15 pm |
  | Archive through September 06, 2007 | 20 | 09-06-07 6:22 pm |
  | Archive through September 12, 2007 | 20 | 09-12-07 8:29 pm |
  | Archive through September 14, 2007 | 20 | 09-14-07 10:56 am |
  | Archive through November 21, 2007 | 20 | 11-22-07 4:16 am |
  | Archive through November 29, 2007 | 20 | 11-29-07 4:05 pm |
  | Archive through December 07, 2007 | 20 | 12-08-07 2:29 am |
  | Archive through December 31, 2007 | 20 | 12-31-07 3:05 pm |
  | Archive through January 10, 2008 | 20 | 01-10-08 7:53 am |
  | Archive through January 14, 2008 | 20 | 01-14-08 5:04 pm |
  | Archive through January 26, 2008 | 20 | 01-26-08 1:31 pm |
  | Archive through April 06, 2008 | 20 | 04-06-08 10:47 pm |
  | Archive through May 20, 2008 | 20 | 05-20-08 9:10 pm |
Chyayla
| |
| Friday, May 30, 2008 - 9:46 am: |
| 
|
मागे आपण पाहिले की आजचे विज्ञान व वेदांत हे कसे जवळपास पोचतात. जस जसे विज्ञान प्रगत होत आहे त्यात नव्या ज्ञानाची भर पडतेय ते वेदांतदर्शनाला अधिकच प्रमाणित करीत आहे. हा खरे तर समस्त भारतियान्ना अत्यंत अभिमानाचा विषय जरी वेदांत हे केवळ एका संप्रदाय, देशापुरता मर्यादित नाही तरी. त्याचे अन्वेषण हे समस्त मानवजातीसाठी आहे. एक गोष्ट मी आवर्जून नमूद करेल की भारतिय अध्यात्म शास्त्र ईश्वर, देव, धर्म हे शुद्ध वैज्ञानिक व अध्यात्मिक अन्वेषणावर आधारित आहे. त्यात उगाच कोणीही येउन काहीही सांगितले, अमुक धर्मग्रंथात असे लिहिले म्हणुन आपण आंधळेपणे विश्वास ठेवावा असे काही नाही. आणी मला वाटत हिंदु (वेदांतदर्शन) व ईतर धर्मांमधे हाच एक अत्यंत विषिष्ट असा मुलभूत फरक आहे. ईतर धर्म केवळ एका मर्यादेपर्यंत मानसिक आधार देउ शकतात पण वैज्ञानिक व अध्यात्मिक जिज्ञासा शमवु शकत नाहीत व मानवी बुद्धीला स्वाभाविकपणे पडणार्या प्रश्नांचे कोणतेच उत्तर वा तसला प्रयत्नही अढळत नाही. त्यामुळे आधुनिक पिढीचा भ्रमनिरास होणे यात काही नवल नाही. आमची श्रद्धा आहे पण ती आंधळी नाही तर तुमच्या बुद्धीला पटेल अशीच आहे. म्हणुन तर आदी शंकराचार्य ठामपणे म्हणतात की जर वेद म्हणतात की अग्नी हा थंड आहे व माझा अनुभव मात्र जर त्याविरुद्ध असेल तर मी ते वेद फेकुन देइल. आधुनिक विज्ञानाच्या प्रवासात ज्या काही महान वैज्ञानिकान्नी योगदान दिले ते आणी आपले प्राचिन ऋशी मुनी ज्यांनी हेच विज्ञान व अध्यात्म निव्वळ संशोधनाच्या व मेहनतीने निर्माण करुन जगत्कल्याणासाठी सामान्य मानवासमोर प्रस्तुत केले ते सारखेच ना. जसे आधुनिक काळातील सर आईनस्टाईन सारख्यांचे उदाहरण घ्यायचे तर काय फ़रक आहे ह्यांच्यात? सत्याचा प्रामाणिक शोध, जिज्ञासा, जाणुन घ्यायची धडपड त्याचाच सतत ध्यास आणी अध्ययन हाच तर समान दुवा आहे दोघांमधे. असो वर जे आतापर्यंत वेदांचा अन्वेषणाचा प्रवास आपण पाहिला त्याजवळपास आजचे आधुनिक भौतिक विज्ञानही कसे पोहोचले ते पाहु या. थोर अमेरिकन अवकाश शास्त्रज्ञ एडवीन हबल यान्नी केलेले काही महत्वाचे संशोधन हे आजच्या प्रचलित बीग बॅंग थेयरी साठी फार उपयोगाचे ठरले. अवकाशाचा वेध घेताना सखोल निरिक्षणाअंती सर्वप्रथम त्याच्या हे लक्षात आले की आपली सुर्यमाला व आपण ज्या आकाशगंगेत रहातो याव्यतिरीक्त कित्येक आकाशगंगा अस्तित्वात आहेत त्यात आपल्याच सारखे अगणीत तारे, ग्रह अणुंचे ढग आहेत. आकार, प्रकाशाची तीव्रता यात ते भीन्न आहेत काही सर्पील, गोल, चक्राकार, शंकु तर काही स्पायरल अश्या आकारत अस्तित्वात आहेत. साधारणता १९२७ च्या दर्म्यान अजुन एक महत्वाचा शोध लागला ज्याने त्याचा आधीचे प्रचलीत विश्वनिर्मितीचे सगळे अंदाज व आराखडेच बदलवुन टाकले. ऍडवीनच्या असे लक्षात आले की ह्या सगळ्या आकाशगंगा एकामेकांपासुन सतत दूर जात आहेत.( Expansion Theory ) त्यावरुन असा तर्क काढण्यात आला की जर विश्व असे प्रसरण पावत आहे या अर्थी एकेकाळी ते नक्कीच जवळ होते, नव्हे त्याची सुरुवातच मुळी एका बिंदुपासुन झाली. सध्या सर्वत्र मान्यता पावलेली थेयरी म्हणजे बीग बॅंग थेयरी. त्यानुसारही एका विशिष्ट, अद्भूत व अत्यंत सुक्ष्म अश्या अणु मधे महाविस्फ़ोट झाला व तीथुनच सारे भौतिक पदार्थ, शक्ति ( Energy, Matter ) तयार झाले व तीथुनच आकाश ( Space ) व काळ (Time ) यांची सुरुवात झाली. अजुनही यापुढे संशोधन सुरुच आहे. यात आईनस्टाईनच्या महत्वाच्या संशोधनाचा उल्लेख नाही केला तर ही पोस्ट अपुर्ण राहील. आईनस्टाईनने एक महत्वाचे प्रमेय मांडले व ते अणुस्फ़ोटाद्वारे प्रत्यक्ष सिद्धही झाले ते म्हणजे E = mc 2 याचा अर्थ एकदम थक्क करणारा आहे. यानुसार एका पदार्थापासुन म्हणजे त्याच्या Mass ( m ) च्या गुणीला प्रकाषवर्षाच्या वर्ग म्हणजे( c 2 ) ईतकी प्रचंड शक्ती ( Energy ) निर्मित होउ शकतो, खरे तर निर्मिती हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, कारण ईथे पदार्थ व शक्ति यांच्यात अदलाबदल होते ( Exchange ). एका सुक्ष्म अणूमधेही किती प्रचंड शक्ति आहे हे लक्षात येइल. ( Matter can be turned into Energy and Energy can be turned into Matter. Matter and Energy are really different forms of same thing ) आणी ईथे वेद व आधुनिक इज्ञान हे एकाच निष्कर्शाप्रत पोहोचलेले दिसतात. आपण मागच्या पोस्ट मधे बघितलेच की वेदानी प्रतिपादन केले आहे की प्राण व आकाश हे एकाच मुलकारणामधे विलीन होतात व त्याला नाव दिले गेले आहे 'महत'. आता आपण पुढच्या पोस्टपासुन हे महत म्हणजे काय व त्या अनुशंगाने पुढचा प्रवास बघणार आहोत तो ही तितकाच रोमांचक, अद्भुत व उत्कंठावर्धक आहे.
|
Slarti
| |
| Friday, May 30, 2008 - 2:13 pm: |
| 
|
ह्म्म्म... रोचक आहे. त्यातली विज्ञानावर केलेली टिप्पणी तुझी स्वतःची की विवेकानंदांची ? म्हणजे निळ्या रंगातलं ते विवेकानंदांचं भाष्य आणि काळ्या रंगातलं ते तुझं असं आहे का ?
|
Chyayla
| |
| Friday, May 30, 2008 - 3:33 pm: |
| 
|
अगदी बरोब्बर.. हुश्शार आहे हो आमचा स्लार्तीबार्डफास्ट.
|
Chyayla
| |
| Friday, June 06, 2008 - 12:07 am: |
| 
|
स्लार्ती तुम्हाला ही माहिती रोचक वाटतेय हे पाहुन आनंद झाला. तुमची आणी ईतरांचीही टीप्पणी मी महत्वाची मानतो. प्राचिन ऋशी मुनींना ईश्वराचा शोध घेताना सगळ्या भौतिक जगाचे विश्लेषण करुन पाहिले, त्यातही त्यांना बरीच महत्वाची वैज्ञानिक माहिती मिळाली पण तरी समाधान होईना, शेवटी हे लक्षात आले की ह्या भौतिक जगताचे कितीही विश्लेषण केले कितीही तपशील मीळवला तरी एकत्वाचा शोध लागणार नाही. सखोल चिंतनानंतर त्यांच्या लक्षात आले की अरे आपण ज्याचा सहाय्याने हे जाणतो आहे त्याकडे तर लक्षच नाही, जे काही जाणायचे ते तर आपल्यातच आहे आतापर्यंत आपण जे काही जाणले ते मनाच्या सहाय्यानेच ना, जर कधी आपण ह्या मनाचाच शोध घेतला तर? हा विचार त्यांच्या मनात आला, पण मनाला जाणायचे कशाने तर त्यावरही तोडगा हाच की मनाला हे मनानेच जाणायचे. कस्तुरीमृगाप्रमाणे बाह्यजगतात शोध घेण्यापेक्षा अंतर्जगताचा शोध घेतला तर सारे काही तिथेच आहे. यापुढे मात्र शुद्ध भौतिक विज्ञानाएवजी मानसशास्त्राचा आधार घेतला गेला आहे. यात एक गोष्ट अजुन लक्षात घ्या प्राचिन भारतात मानसशास्त्र हे शास्त्र म्हणुन मान्यता पावलेले होते ते कुठे आज आपण आधुनिक जगतात पुन्हा एकदा नुकतेच मान्य झालेले बघतोय व गंभीरपणे त्यावर संशोधन करतोय. आता यानंतर आपण मानसशास्त्राकडे वळु. मी तुमच्याकडे बघत आहे, डोळे माझ्याकडे बाह्य संवेदना आणीत आहेत्; संवेदनावाहक ज्ञानतंतू त्या संवेदना मेंदूकडे घेउन जात आहेत. आपले हे बाहेरुन दिसणारे डोळे काही पाहण्याचे 'ईंद्रिय' नव्हत, ते केवळ बाह्य 'साधन' वा 'करण' वा 'यंत्र' होत. कारण मेंदूकडे संवेदना घेउन जाणारे, ह्या आपल्या डोळ्यांमागील खरे दर्शनेंद्रिय जर नष्ट झाले तर मला दोन सोडुन वीस डोळे जरी असले तरी मी तुम्हास शकणार नाही. डोळ्यांअधील पडद्यावर बाह्य विषयाचे अगदीस हक्य तितके पूर्ण चित्र पडलेले असेल, आणि तरीही मी तुम्हाला पाहु शकणार नाही. सबब. द्रूष्टीचे 'ईंद्रिय' हे त्याच्या 'साधना' हुन वेगळे आहे; ते खरे दर्शनेईंद्रिय ह्या आपल्या डोळ्यांच्या मागे अवस्थित असते. सर्वच प्रकारच्या विषयानुभूतीसंबंधी हे खरे आहे, खरे घ्राणेंद्रिय त्याच्या मागे बसविलेले असते. आपल्या प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या बाबतित ही अशीच रचना आहे ह्या स्थूल शरीरात त्यांची बाह्य साधने वा यंत्रे असतात. परंतु आपल्याला बाह्य वस्तुंचे ज्ञान होण्यासाठी ही एवढीच पुरेशी नाहीत. समजा की मी तुमच्याशी बोलत आहे, आणि तुम्ही अगदी लक्षपूर्वक माझे म्हणणे ऐकत आहात. अशा वेळी काही तरी घडते समजा एखादी घंटा वाजते; परंतु तिचा आवाज तुम्हाल ऐकू येणार नाही. असे का बरे व्हावे? ध्वनितरंग तुमच्या कानापर्यंत आले, ते तुमच्या कांनात शिरुन आतील पडद्यावर आदळले, तेथुन ज्ञानतंतूंनी तो संदेश मेंदूपर्यंत नेउन पोहोचविला; याप्रमाणे सर्व प्रक्रिया पूर्ण होउनही तुम्ही तो ध्वनी ऐकु शकला नाही, असे का जर मेंदूप्रयंत संदेश पोहोचविला जाण्यानेच समस्त श्रवणप्रक्रिया पूर्ण होत असेल तर मग, तसे घडुनही, तुम्ही तो ध्वनी का बरे ऐकू शकला नाही यावरुन हेच दिसुन येते की, श्रवणप्रक्रियेसाठी आवश्यक असलेले आणखी काहीतरी तेथे हजर नव्हते तुमचे मन त्या ईंद्रियाशी जोडलेले नव्हते आणि म्हणुनच, बाकी समस्त प्रक्रिया होउनही तुम्ही ऐकू शकला नाही. ज्या वेळी मन हे ईंद्रियापासून अलग असते, त्याच्याशी संयुक्त नसते, त्यावेळी ईंद्रियाने त्याला वाटेल तो संदेश आणुन दिला तरी मन ते ग्रहण करणार नाही. मन जेव्हा ईंद्रियाशी जोडले जाते, त्याच्याशी संयुक्त होते, केवळ तेव्हाच कोणतीही वार्ता ग्रहण करणे मनाला शक्य होते, परंतू एवढ्यानेही ही प्रक्रिया खरोखर पूर्ण होत नाही, एवढ्यानेच खरोखर आपल्याला विषयज्ञान वा विषयानुभव होत नाही. नाक, कान आदी बाह्य साधनांनी वा यंत्रांनी बाहेरील वस्तूच्या संवेदना आत घेतल्या, ईंद्रियांनी त्या आत मेंदूपर्यंत नेउन पोहोचविल्या, मन त्या मेंदूतील केंद्राशी संयुक्त झाले, आणि तरीही विषयज्ञानाची क्रिया पूर्ण व्हावयाची नाही. आणखी एक गोष्ट आवश्यक आहे आतून एक प्रतिक्रिया व्हावयाला हवी. ही प्रतिक्रिया घडताच ज्ञान उत्पन्न होते. बाहेर असलेल्या वस्तूने जणू माझ्या मेंदूकदे एक संदेशप्रवाह प्रेरीत केला. तेथून माझ्या मनाने तो ग्रहण करुन बुद्धीला सादर केला. बुद्धीने चित्तात पूर्वीपासुन अवस्थित असलेल्या संस्काराच्या अनुरोधाने त्याचे वर्गीकरण केले आणि एक प्रतिक्रियाप्रवाह प्रेरीत केला; ही प्रतिक्रिया होताच मला त्या वस्तूचे ज्ञान झाले. येथे ईछाशक्तिचे कार्य घडते. मनाची जी शक्ती ही प्रतिक्रिया प्रेरीत करते तिला बुद्धी म्हणतात. तथापि अजुनही ही वस्तुज्ञानाची प्रक्रिया संपूर्ण झालेली नाही. ती पुरी होण्यास आणखी एक टप्पा आवश्यक आहे. क्रमशा:
|
Chyayla
| |
| Wednesday, June 11, 2008 - 2:44 am: |
| 
|
मागच्या पोस्टमधे आपण मानसशास्त्राच्या आधारे मन व बुद्धी हे काय आहे व त्यांचे कार्य कसे होते ते बघितले. तुम्ही म्हणाल ठीक आहे वेदांना हे कळाले व आधुनिक विज्ञानालाही हे कळाले. तरी ईश्वराचे अस्तित्व कसे सिद्ध होते? आता जर ईथपर्यंत नीट लक्षात आले असेल तरच तुम्हाला पुढच्या तर्क कळेल. ज्यात आधी 'आत्मा' म्हणजे काय ते तर्काने सिद्ध केले गेले आहे. १) पहिल्या टप्प्यातुन 'भौतिक शास्त्राद्वारे' हे विश्व व विश्वोत्पत्ती समजुन घेतली आहे. २)दुसर्या टप्प्यात 'मानसशास्त्राच्या' आधारे मानवी मन, बुद्धी त्याचे कार्य म्हणजे विचार, मनन, संकल्प ईत्यादी व प्रतिक्रियेद्वारे निर्णयशक्ती कशी कार्य करते ते बघितले. ३)तिसर्या टप्प्यात आपण 'तर्कशास्त्राच्या' आधारे आत्मा व ईश्वर काय आहे ते समजुन घेणार आहोत. मागे कुणीतरी, कदाचित स्लार्तीनी विचारले होते की देव तर्कातीत आहे की नाही? याचे उत्तर हेच देता येइल तो आहेही आणि नाहीही. ते कसे? शिवाय आता तर्काद्वारे ईश्वर समजुन घेणे म्हणजे आम्हाला 'ईश्वर' कळला असे होइल का? परत ईथे ईश्वराची अनुभूती घ्यायची तर त्यासाठी वेगळेच प्रयत्न करावे लागतात व ती स्वता:ची स्वता:च घ्यावी लागते. तरी वेदांचे व त्यांच्या तर्कांचे महत्व तसुभरही कमी होत नाही आता असे बघा आपल्याला अमुक शहरी जायचे, समजा मला मुंबईला जायचे पण मी जन्मात कधीही गावाच्या बाहेर पडलो नाही, मग मी कसा जाउ? ते तर जाउ द्या मुम्बई अस्तित्वात आहे हेच कशावरुन? अशावेळेस तुम्हाला ईतरांचा अनुभव कामात येइल ते म्हणतील "अरे मी जाउन आलो की मुंबईला" आणि तिथे कसे जायचे तेही मार्गदर्शन करेल. आता या ठीकाणी नाही म्हटले तरी तुम्हाला त्या व्यक्तिवर विश्वास ठेवावाच लागेल शिवाय मुंबई अस्तित्वात आहे ह्यावरही विश्वास ठेवावा लागेल. तरच मला प्रवासाला निघता येइल व मुंबई गाठु शकेल व जेव्हा मी स्वता: मुंबई बघेल तेव्हा मला मुंबई काय आहे ते प्रत्यक्ष कळेल. तोपर्यंत सांगणार्यालाच मुर्खात काढणे ही स्वता:ची फसवणुक ठरेल. अश्याच प्रकारे ज्यांना ईश्वराकडे जायचे आहे, समजावुन घ्यायचे त्यांनाही हाच व्याव्हारीक दृष्टीकोन अध्यात्माच्या मार्गावरही सुरुवातीला ठेवावा लागणार नाही का? चला तर आता पर्यंत आपण विश्व, मानव आणि ईश्वर या त्रिकोणातील दोन कोन बघितले आता तिसरा कोन पाहु या. स्वामी विवेकानंद वेदांचा तर्क सिद्ध करण्यासाठी एक आधुनिक उदाहरण देतात तेव्हा आपण मागच्या पोस्टच्या धागा पकडुन पुढे पाहु या- मन व बुद्धीचे कार्य पूर्ण झाले तरी वस्तूज्ञानाची प्रक्रिया संपुर्ण झाली नाही. ती पुरी होण्यास आणखी एक टप्पा आवश्यक आहे. समजा की येथे एक चित्रक्षेपक यंत्र आणि एक पडदा आहे, आणि मी त्या यंत्राने त्या पडद्यावर चित्र पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. मी काय करायचे असते? मी त्या यंत्रामधुन नानाप्रकारचे प्रकाशकिरण त्या पडद्यावर सोडुन ते सगळे तिथे नीट एकत्रित करावयाचे असतात. या ठीकाणी अशी एक न हालणारी, अचल वस्तू आवश्यक असते की जिच्यावर चित्र पाडता येउ शकेल. जी वस्तू स्वता:च हालत आहे, चल आहे तिच्यावर चित्र पाडता येणे शक्य नाही, त्यासाठी एखादी न हालती, स्थिर, अचल वस्तूच आवश्यक आहे. कारण, त्या यंत्रामधून मी जे प्रकाशकिरण फ़ेकीत आहे ते हालते आहेत, चल आहेत्; म्हणुन त्याचे चित्र उमटण्यासाठी त्या हालत्या, चल प्रकाशकिरणांना एखाद्या न हालत्या, स्थिर, अचल वस्तूवर एकत्रित, एकिभूत, मीलित करुन पुर्णस्वरुपात प्रक्षेपित करावे लागेल. आपली ही ईंद्रिये ज्या सार्या संवेदना आत घेउन मनाला सादर करीत आहेत आणि मन व बुद्धीला सुपूर्द करीत आहे, त्या संवेदनासंबधीही अगदी असेच आहे. जिच्यावर हे सगळे वेगवेगळे ठसे एकत्रित नि एकिभूत करता येतील असे स्थायी, स्थिर, अचल काहीतरी पाठीमागे असल्याखेरीज वस्तूच्या ज्ञानाची वा विषयानुभूतीची ही प्रक्रिया पूर्ण व्हायची नाही. आपल्या अस्तित्वातील सार्या बदलत्या घटकांमधे एक एकत्वाचा भाव निर्माण करणारी ती वस्तू काय आहे? बाह्य विषयांचे आपण ग्रहण करीत असलेले सर्व ठसे, - बाह्य विषयांच्या आपल्या सर्व संवेदना जिच्यात एकत्र ओवल्या जातात, जिच्यामुळे आपले सगळे विषयानुभव जणु संमीलित होतात, एकत्र वास करतात नि त्यांना एक अखंडभाव प्राप्त होतो ती वस्तू काय आहे? आपण बघितलेच आहे की असे काही तरी असणे आवश्यक आहे. आणि आपण हेही पाहिले की शरीराच्या मनाच्या तुलनेने अचल, स्थिर असे असावयास हवे. आपल्यामधील 'ते' स्थिर व अचल असे 'काहीतरी' , तो 'पडदा' म्हणजेच 'द्रष्टा' हा एक अविभाज्य, अखंड, कूटस्थ, अचल अशी साक्षीस्वरुप व्यक्ती असावयास हवी. ज्याच्यावर मन ही सारी चित्रे चितारीत आहे, आमच्या मनाने व बुद्धीने वाहुन आणलेल्या संवेदना ज्यांच्यावर स्थापित, श्रेणीबद्ध नि एकीभूत केल्या जातात त्यालाच म्हणतात मानवाचा 'आत्मा'. आपण बघितले की, विराट समष्टी-मन वा 'महत' हे आकाश व प्राण ह्या दोहोत विभक्त झाले असून, मनाच्या मागे आपल्यामधे आत्मा विद्यमान असल्याचेही आपल्याला दिसुन आले आहे. जसा आपल्यात, तसाच ह्या विश्वात, या समष्टी-मनाच्या मागे एक आत्मा विद्यमान आहे (पिंडी ते ब्रह्मांडी), आणि त्यालाच म्हणतात 'ईश्वर'.
|
हे वाचा आणि विचार करा. http://www.rediff.com/news/2008/jun/12god.htm
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|