|
Slarti
| |
| Saturday, January 26, 2008 - 5:16 pm: |
| 
|
गोंधळ दूर केल्याबद्दल धन्यवाद.
|
मी व्हिकी ऐवजी चुकुन व्हिस्की वाचले. असो. वीकेंडचा परीणाम. (परीणाम मधला री र्हस्व की दीर्घ? )
|
झक्की अहं ब्रह्मास्मी कैच्या कैच.. बेरंगी वाटतय त्ये पोस्ट... एक्दम सेक्युलर वाटतय. मी बी खुष तु बी खुष. द्येव हाय पण आनि नाय पण. वांधाच नाय.. काय? आपल्याकड नाय का समदेच देशभक्त... काय बी करा.. तुच त्ये हाईस.
|
Zakki
| |
| Monday, January 28, 2008 - 11:19 am: |
| 
|
खरेच माझ्या मनात फार गोंधळ आहे, नि जे काही समजले असे वाटते तेहि धड लिहीता येत नाही. पण एकदा ते उघड्यावर आणले की त्यातले दोष इतरांना तरी दिसतील, नि मग काही नवीन वाचायला, विचार करायला मिळेल, नि कदाचित् एक तरी गोष्ट समजेल, या भावनेतून लिहीले आहे. तुमच्या लिखाणाबद्दल धन्यवाद. आता तुम्ही काही लिहा, समजले तर बघतो.
|
जिज्ञासूंसाठी एक जबरदस्त लेख . . . http://www.loksatta.com/lokprabha/20080208/bhumika.htm
|
हा लेख "विचित्र विश्व" सारख्या मासिकात शोभेल
|
तुम्ही "विचित्र विश्व"चे तहतयात वाचक असल्यामुळे तुमचा असा गैरसमज होणे साहजिकच आहे. परंतु हा लेख जिज्ञासूंसाठी आहे. "विचित्र विश्व" आवडीने वाचणार्यांसाठी नाही.
|
Chyayla
| |
| Sunday, March 02, 2008 - 12:48 am: |
| 
|
सतिश, चांगला व माहितीपुर्ण लेख आहे. मला संपादकाची या विषयाकडे सरसकट फ़ुली मारण्यापेक्षा डोळस पणे बघण्यची दृष्टी पटली. विज्ञान, आधुनिकतेच्या नावाखाली आपण अधिक उथळ व अंधश्रद्ध होत चाललो आहोत की, अधिक खुले होत चाललो हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे.
|
जिज्ञासूंनी श्री श्री परमहंस योगानंद यांचे आत्मचरित्र "Autobiography of a Yogi" जरूर वाचावे. याचे मराठी भाषांतर "योगीकथामृत" या नावाने उपलब्ध आहे. श्री श्री परमहंस योगानंदांचा San Diego जवळ Encinitas मध्ये समुद्रकिनार्यावर अतिशय सुन्दर आश्रम आहे. जिज्ञासूंच्या बर्याचश्या शंका हे आत्मचरित्र वाचल्यावर दूर होतील.
|
Radha_t
| |
| Monday, March 10, 2008 - 8:25 am: |
| 
|
मस्त मसालेदार चटपटीत खुसखुशीत आणि रंजक लेख आहे, आपल्याला तर एकदम आवडला बुवा
|
हा लेख जिज्ञासू, अज्ञानी, "विचित्र विश्व"प्रेमी अशा सर्वांनाच आवडलेला दिसतो आहे.
|
Radha_t
| |
| Tuesday, March 11, 2008 - 10:52 am: |
| 
|
BTW या लेखात देवाचा कुठेच उल्लेख नाही, ना चित्रगुप्ताचा, त्याबद्दल कुणाला काही म्हणायच आहे का?
|
या लेखात देवाचा किंवा चित्रगुप्ताचा का उल्लेख नाही ते देवालाच ठाऊक.
|
Prr
| |
| Tuesday, March 11, 2008 - 4:26 pm: |
| 
|
Satishmadhekar ...thanks for sharing such a nice article. संपुर्ण लेख वाचुन होईस्तोवर थोडी भितीच वाटायला लागली. मिती वाचुन तर थोडी जास्तच चांगले आणी वाईट कर्म याची सविस्तर माहिती कुठे वाचली असल्यास सांगा.(भगवद् गीता वाचत आहे) "Autobiography of a Yogi" वाचायला सुरवात केली होती (The Law of Miracles chapter ..very interesting)
|
भगवद् गीतेत कर्माचे खूपच सविस्तर विवेचन केलेले आहे. "Autobiography of a Yogi" (किंवा मराठीत "योगीकथामृत"), श्री सदगुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र व त्यांची प्रवचने या पुस्तकांत चांगले व वाईट कर्म कोणते हे सोदाहरण आणि सोप्या भाषेत स्पष्ट केलेले आहे.
|
Radha_t
| |
| Wednesday, March 12, 2008 - 5:24 am: |
| 
|
अब्जावधी मनुष्य प्राणी, किती कुणास ठाऊक अन्य प्राणी, वनस्पती, ही पृथ्वी, सुर्यमाला, आकाशगंगा आणि ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा फापट पसारा बघून आपण यात किती नगण्य आहोत अस वाटत. हे सगळ काही तरी, कस तरी चालतय.सगळच गूढ आहे. बर हे सगळ आहे तर आहे पण हे सगळ चालवणारी कुठली अचाट शक्ती आहे अस म्हणतात. बर असली तर असली. पण तिला देव म्हणतात आणि ती मला भेटली म्हणतात. काय great लोक आहेत. देव हा concept आजीबात वाईट नाही, खूप चांगला आहे. अगदी वरच्या लेखात दिलेल्या मित्यांचा concept सुद्धा खूप चांगला आहे. तो जर मानला आणि त्याप्रमाणे वागल तर आयुष्य चांगल्या प्रकारे जगता येईल. पण शेवटी ती एक संकल्पना आहे. संकल्पना समजली उमगली म्हणण ठीक आहे पण भेटली म्हणायला कस वाटत?
|
Amruta
| |
| Wednesday, March 12, 2008 - 2:07 pm: |
| 
|
लेख छान आहे. योगीकथामृतहि वाचलय. ही जी काहि शक्ती आहे ती सहजासहजी प्रत्येकाला कळण केवळ अशक्य वाटत. ती भेटली म्हणण्यापेक्षा काही व्यक्तींना ती थोडी कळली हे म्हणण जास्त योग्य ठरेल. राधा, छान नाव आहे. सहजच सांगत्ये. मी सध्या शिवाजी सावंत ह्याच युगंधर वाचत्ये. अतिशय सुंदर पुस्तक आहे. त्यात राधा ह्या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. रा म्हणजे मिळो,लाभो आणि धा म्हणजे मोक्ष. राधा म्हणजे मोक्षा साठी तळमळणारा जीव.
|
सहज आठवले, परमहन्स योगानन्दान्च्या निधनानन्तर त्यान्चे दोन शिष्य दया माता आणी क्रियानन्द यान्च्यात "परमहन्द योगानन्द" या शब्दाच्या कॉपिराइट्वरून बरेच खटले झाले आणे लाखो डॉलर्स गेले.
|
Zakki
| |
| Thursday, March 13, 2008 - 9:04 pm: |
| 
|
या सगळ्या धर्मग्रंथाचा एक 'विकिपेडिया' झाला आहे. खरे काय नि खोटे काय? त्यापेक्षा खालील गाणे म्हणा: 'जिंदगी ख्वाब है, ख्वाबमे झूठ क्या, और भला सचहि क्या?' किंवा 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या'. आता जर झोपेतच जर काही देव म्हणून असले तरी ते झोपेतच रहाते. जागेपणी मात्र 'यावज्जीवेत् सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत् भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:!' अगदी निष्काम कर्म म्हणजे तरी काय,तर आपण आपल्याला योग्य वाटेल ते करावे, परिणाम आपल्या हाती नसतो! सोप्पे! अश्या विचारांमुळे मानसिक व शारीरिक सौख्य लाभते! म्हंटलेच आहे: 'रडतच आलो येताना पण, हासत जावे जाताना'
|
पुणे महापालिका देणार निर्मला देवीना मानपत्र http://esakal.com/esakal/04062008/PuneBB38E7E861.htm
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|