|
तिबेटींचा प्रतिकात्मक विजय होताना दिसत आहे. http://www.expressindia.com/latest-news/IOC-may-scrap-overseas-Olympic-torch-relay/294081/
|
भान्डारकर सन्स्थेवर हल्ला करून चार कपाटे इकडे तिकडे केली म्हनून काही लोकाना फारच राग आलेला दिसतोय.
|
Zakki
| |
| Tuesday, April 08, 2008 - 11:35 pm: |
| 
|
अहो आपण पुण्यातल्या संस्थेबद्दल बोलतो आहोत. पुण्यात तत्वाचा प्रश्न फार महत्वाचा असतो. त्यामुळे प्रश्न पडतो की एखाद्या संस्थेवर मुळात असा हल्ला करणे हेच न्यायविरोधी कृत्य. त्याचे समर्थन काय तर कुणा ब्रिटिश माणसाने श्री छत्रपति शिवाजी महाराजंबद्दल गैर लिहीले. मग तार्किक दृष्ट्या त्या ब्रिटिश गृहस्थाला धरून दोन लाफा मारायच्या, की आपल्याच देशातील संस्थेवर हल्ला करायचा. नि असे काय या लोकांचे संशोधन आहे की त्या संस्थेतल्या ग्रंथात लिहीलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत असे म्हणायला! कुठे कुणी तरी मान्य केलय् ते? निव्वळ दंगेखोर लोक ते! त्यांनाच धरून तुरुंगात डांबून ठेवले पाहिजे. तर तुम्ही त्यांचीच बाजू घेताहात! उद्या तुमच्या घरात येऊन कुणि उगाच उलथापालथ केली नि थोडी पुस्तके जाळली, टेबल मोडले तरी तुम्ही असेच म्हणणार का की जरा थोडी नासधूस झाली, मला काही त्याचा राग येत नाही? उगीचच काहीतरी लोकांच्या विरुद्ध लिहून स्वत: किती वेगळ्या विचाराचे, कुणितरी (अति) शहाणे आहोत असे दाखवायचे?
|
Uday123
| |
| Wednesday, April 09, 2008 - 3:21 am: |
| 
|
उद्या तुमच्या घरात येऊन कुणि उगाच उलथापालथ केली नि थोडी पुस्तके जाळली, टेबल मोडले तरी तुम्ही असेच म्हणणार का की जरा थोडी नासधूस झाली, मला काही त्याचा राग येत नाही? --- असे अजिबात नाही म्हणणार कारण मी कमालीचा ढोंगी आहे, माझे दुसरे नावच ढोंगी आहे... मागे bbc ची एक लिंक टाकुन स्वत:ला हवा होता तसा निष्कर्ष काढला होता ह्या साहेबांनी, त्या लिंकचा आणि निष्कर्ष यांचा कुठेही संबंध नव्हता. माढेकरांनी यांना खोटारडेपणा केल्या बद्दल चांगलेच कात्रीत पकडले होते. (त्यांनी) खुप पिच्छा पुरवुनही माफ़ी नाही, की खोटेपणा उघडा पडला म्हणुन लाजही नाही (वेड पांघरून पेडगावला जरुर जाऊन आलेत). ही विचारवंतांची लक्षणे? लोकांना राग आला आहे (आणि मला झळही लागली नाही), म्हणुन मला आनंद होत असेल तर या प्रकाराला विकृती म्हणतात. ही "विकृती" ग्रंथांची नासाडी करणार्या प्रवृत्तीपेक्षाही भयंकर आहे- एक ग्रंथ प्रेमी.
|
>>> भान्डारकर सन्स्थेवर हल्ला करून चार कपाटे इकडे तिकडे केली म्हनून काही लोकाना फारच राग आलेला दिसतोय. अयोध्येत श्रीरामजन्मस्थानावर बळजबरीने बांधलेल्या बांधकामाचे दोनचार दगड इकडेतिकडे केले म्हणून काही निधर्मान्ध मंडळी अजूनही सुतक पाळतात.
|
वा!.......!!!!!!!!!!!!!!!!सतिशजी! याला म्हणतात शुद्ध मराठीत शालजोडितले हाणणे!
|
Tonaga
| |
| Wednesday, April 09, 2008 - 8:21 am: |
| 
|
भांडारकर इन्स्टिट्यूटबाबत अजून लोकाना बरीच खुमखुमी दिसते. अन्यथा तिबेट चा विषय चाललेला असताना पुन्हा पुन्हा हा विषय का काढला जातोय? हा विषय एकाने काढायचा मग च्यायला, जयमहाराष्ट्र, केदार जोशी,सन्तु,सतीश माढेकर,झक्की,उदय १२३,सव्यसाची इत्यादी नेहमीच्या यशस्वी कलाकारानी येऊन त्याना हवे ते इथे प्रपोगेट करायचे ही चाल आता सर्वांच्या लक्षात आलेली आहे. मग मूळ विषय स्विट्झर्लन्डची अर्थव्यवस्था असो अथवा जपानी आदिवासींच्या लंगोट्यांचे डिझाईन असा असो.कुठून तरी हिन्दुत्व, नेहरू, गान्धी,दलीत, बौद्ध, मुसलमान या हातखंड्या विषयावर गाडी आली म्हणजे बस्स. कोणी तरी भांडारकर संस्थेच्या प्रकरनाबाबत स्वतन्त्र फळा उघडण्याची घोषणाही केली होती ना? (बाय द वे भांडारकर इन्स्टीट्यूटच्या व्यवस्थापन मंडळात जी सध्या आपसात लठ्ठालठ्ठी सुरू आहे ती वाचली की नाही? इथल्या बोरूबहाद्दरानी संस्थेच्या हिताची कळकळ असेल तर ती पहिल्यान्दा मिटवून यायला हरकत नाही. अगदी झक्कीनी अमेरिकेतून योगदान द्यायला हरकत नाही. नाही तरी अमेरिकनाना जगाच्या भानगडीत नाक खुपसायची सवयच आहे...)
|
टोणगा, मी तिबेट व ऑलिंपिकशी संबंधितच संकेतस्थळ दिले होते. परंतु माझ्या पोस्टनंतर एका नेहमीच्याच (अ)यशस्वी कलाकाराने मूळ विषयाशी काहिही संबंध नसलेल्या भांडारकर संस्थेवर झालेल्या हल्ल्याबद्दल आपले मत प्रदर्शित केले. त्यामुळे त्यांना मला योग्य ते प्रत्युत्तर द्यावे लागले.
|
Tonaga
| |
| Wednesday, April 09, 2008 - 10:15 am: |
| 
|
त्या विजय कुलकर्णीना औचित्य नाही. (कुणीतरी मीच तो आहे असेही म्हटले.धन्य.)म्हनून का त्याखालच्या ज्ञानवन्त, वैचारीक क्रांतीकारकानी शेण खाऊन त्यांच्यावर थुंकलेच पाहिजे का? झक्कीसाहेबांसारख्या ज्येष्ठालाही हा मोह आवरू नये? त्यांचा मुळात भारताशी काय संबंध? ते गेलेत ना इथल्या मूर्ख अज्ञानी लोकाना, मूर्ख राजकारण्याना, भ्रष्टाचार, धूळ, अव्यवस्थेला कंटाळून तिकडे. बरे चाललेय ना त्यांचे त्यांच्या श्रीमन्त, भ्रष्टाचारमुक्त,स्वच्छ देशात.? माझ्या गरीब, मागासलेल्या देशाची त्यानी का सुरक्षीत गुहेत राहून हेटाळणी करावी?. बी बी सी आणि इतर पाश्चिमात्य माध्यमे भारताकडे ज्या कुचेष्टेने पाहतात, अन लिहितात त्यांच्यात अन झक्कींत काय फरक आहे? किती उत्साहाने लगेच सगळ्यानी तिबेट सोडून खरडायला सुरुवात केली. अन तिबेट मध्ये तरी काय नेहरू नेहरू अन नेहरू. जणू काही नेहरूंशिवाय तिबेट प्रश्नाला काही बाजूच नाही. मी नेहरू भक्त आहे हे मी स्पष्ट सांगतो. नेहरू काही देशद्रोही नव्हते. राज्यकर्त्यांच्या चुका होतच असतात.त्याबद्दल इतिहासही त्याना क्षमा करीत नाही. मोठ्या माणसांच्या चुकांचे परिणाम ही मोठे असतात हे ही मान्य. मग नेहरूनी काहीच केले नाही काय.? ज्या अमेरिकेचे बूट चाटायला लोक जातात त्या अमेरिकेच्या पुढार्यानी चुकीची धोरणे राबविल्याने अमेरिकेचे नुकसान झालेलेच नाही काय?(बूट चाटणे ही इथलीच भाषा आहे त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नये.)गांधी हे माझे दैवत आहे. (तुम्हालाही ते एके काळी प्रात्: स्मरणीय वाटलेले आहेत )त्यांच्या चुकांसह आम्हाला ते आवडतात. कारण त्यानी या देशाला अन जगालाही बरेच काही दिले आहे.त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. त्यांची नालस्ती करणारांचा समाचार निश्चितच इथे घेतला जाईल हे पक्के समजून असा. तिबेट मोड ऑन...
|
Lalu
| |
| Wednesday, April 09, 2008 - 2:14 pm: |
| 
|
मोड पुन्हा ऑफ झाला का? तिबेट मोड ऑन. Let the games go on.. हा एका चिनी व्यक्तीनेच लिहीलेला लेख आहे. ऑलिंपिक सारख्या कार्यक्रमाला असे वेठीला धरणे बरोबर नाही. ज्या कारणांवरुन चीनविरुद्ध गदारोळ चाललय ती आधीही होतीच. त्यांना कमी लेखण्याचा उद्देश नाही. पण सध्या ऑलिंपिकमुळे जगाचे चीनकडे लक्ष वेधले आहे त्याचा फायदा घेऊन ते प्रश्न जोरात प्रसारमाध्यमात आणणे चालू आहे. एखाद्या देशाने बहिष्कार घालणे म्हणजे तर गुन्हा वाटतो. खेळाडूंनी कित्येक वर्षे केलेली तयारी पाण्यात जाते! तेव्हा हे ऑलिंपिक व्यवस्थित पार पडूदे. लोकांना त्याचा आनंद घेऊदे. ते संपले की आपण तिबेट प्रश्नाकडे वळू(तोवर कोणाला स्वारस्य उरले असेल तर. ~D )
|
>>याला म्हणतात शुद्ध मराठीत शालजोडितले हाणणे! agadi agadi 
|
Uday123
| |
| Wednesday, April 09, 2008 - 2:44 pm: |
| 
|
या लेखात म्हटले आहे की तिबेटमधे चालवलेला हिंसाचार, दंगा बघुन सामान्य चिनी ला सरकार जे करत आहे ते बरोबर आहे असे वाटते. पण हा हिंसाचार, दंगा खरोखरच तिबेटी लोकं करत आहेत कां? की त्यांच्या वेषात अजुन कुणी (?) त्यांची बदनामी करण्यासाठी हा प्रकार केला आहे? खेळाडुंनी बरीच वर्ष मेहेनत केलेली असते, आणि ती मेहेनत पाण्यात नको जायला असे प्रत्येक क्रिडाप्रेमीला वाटणे सहाजीक आहे, पण म्हणुन गेली पाच दशके, हजारो लाखो तिबेटींची चाललेली स्वातंत्राची गळचेपी मुकाटपणे पहा आणि थोडा काळ हे सर्व विसरा असे सुचवायचे आहे कां?
|
Lalu
| |
| Wednesday, April 09, 2008 - 3:02 pm: |
| 
|
उदय, तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर माहित नाही. >>पण म्हणुन गेली पाच दशके, हजारो लाखो तिबेटींची चाललेली स्वातंत्राची गळचेपी मुकाटपणे पहा आणि थोडा काळ हे सर्व विसरा असे सुचवायचे आहे कां? मला उलट म्हणायचे आहे. गेली लाखो वर्षे हे चालू आहे ना? मग आत्ताच का सगळ्यांना एकदम जाग आली? या इव्हेंटचा (गैर)फायदा घेतला जातो आहे. काहींना चीनमध्ये ऑलिंपिक होते आहे ही गोष्ट खुपते ही वस्तुस्थिती आहे. ते प्रश्न आत्तपुरतं विसरा असं मुळीच म्हणायचं नाही आहे. एकदा ऑलिंपिक पार पडले की यातल्या किती लोकांना या प्रश्नांबद्दल स्वारस्य राहील याबद्दलच शंका आहे. सामान्य चिनी जनतेला काही झालं तरी ऑलिंपिकचा अभिमानच वाटत असणार आणि राज्यकर्त्यांविरुद्ध त्यांच्या मनात कितीही राग असला तरी एक नागरीक म्हणून हे यशस्वी व्हावे असंच त्यांना वाटणार. त्यामुळे तिबेटमध्ये सरकार जे करत आहे ते योग्य आहे असं त्यांच मत बनत असेल.
|
Mukund
| |
| Wednesday, April 09, 2008 - 3:17 pm: |
| 
|
लालु.... तुझ्या दोन्ही पोस्टींग्सना १००% अनुमोदन! लाख मोलाचे बोललीस!
|
Uday123
| |
| Wednesday, April 09, 2008 - 3:21 pm: |
| 
|
मी परवाच वर्तमान पत्रात टांग डक्सिअन (ल्हासा मधील घटना मार्च २- १०, १९८९) यांचा लेख वाचला. त्यात बरोबर अशाच प्रकारचा घटनाक्रम होता असे म्हटले आहे आणि ते पुर्ण सरकारने पुरस्कृत केलेले नाटक होते. खास विशेष दलातील ३००+ सुरक्षा कर्मी (गणवेषात नाही बर कां) सामील होते दंगा करण्यात... आणि मग ते कारण पुढे करुन तिबेटींना झोडपले.
|
Farend
| |
| Wednesday, April 09, 2008 - 3:33 pm: |
| 
|
आज बे एरियात मशाल येणार आहे, निदर्शनाची तयारी जोरात दिसते. सॅन फ्रॅन्सिस्को मधे.
|
Asami
| |
| Wednesday, April 09, 2008 - 3:41 pm: |
| 
|
तिबेटमधील घडामोडिंमधे दिसते त्यापेक्षा जास्त आहे असे सुचवणारा एक चांगला लेख
|
Tonaga
| |
| Wednesday, April 09, 2008 - 3:47 pm: |
| 
|
लालूताई, तुमच्या मुद्द्याशी सहमत होणे कठीण आहे.मुकुन्द आंच्या क्रीडाप्रेमाचा आदर करूनही तुम्हा दोघांशी सहमत होणे कठीण आहे.कारण शेवटी मनोरंजनापेक्षा मानवी मूल्ये श्रेष्ठ आहेत.ऑलिम्पिक्स होत राहतील पण तिबेटीना त्यांच्यावरचा अत्याचार जगाच्या वेशीवर टांगण्याची ही मला वाटते शेवटची संधी आहे. now or never अशी तिबेटची स्थिती आहे. अन्यथा चीन सारखा बदमाष देश तिबेटींवरील अत्त्याचारच काय पण तिबेटींचे नखही बाहेर दिसू देणार नाही. स्वत्:ची पोटची १०००० हून अधिक मुले ज्यानी ध्यान एन मेन चौकात मारली ते तिबेटीना सोडतील का? ऑलिम्पिक हे चीनची स्वत्:ची प्रतिमा सुधारण्याचे साधन आहे. त्याचा पर्दाफाश कारण्याची संधी तिबेटीनी घेतली तर त्यात गैर नही. आपनही आपल्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वच प्रकारचे उपाय वापरले होते. भुतिया पाठोपाठ आजच किरण बेदीनीही ऑलिम्पिक ज्योत रीलेत भाग घ्यायला नकार दिला आहे... (तिबेटच्या प्रश्नात भारताची भूमिका हा अगदी वेगळा वेगळा प्रश्न आहे...)
|
Lalu
| |
| Wednesday, April 09, 2008 - 4:01 pm: |
| 
|
>>पण तिबेटीना त्यांच्यावरचा अत्याचार जगाच्या वेशीवर टांगण्याची ही मला वाटते शेवटची संधी आहे. का? असं म्हणून तुम्ही 'ऑलिंपिक संपल्यावर लोकांचे त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होईल' या म्हणण्याला दुजोराच देत आहात. तिबेटींना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी अश्या एखाद्या इवेंटचा आधार घ्यावा लागतो हे त्यांचे दुर्दैव आहे. आणि जग इतर कारणांसाठी त्याचा फायदा घेत आहे. हेच लोक करुदेत ना पाठपुरावा ऑलिंपिक संपल्यावर. याची सुरवात चीनला ऑलिंपिक बहाल केले तेव्हापासूनच व्हायला हवी होती. ते कशाला केले मग?
|
Uday123
| |
| Wednesday, April 09, 2008 - 4:23 pm: |
| 
|
भुतिया पाठोपाठ आजच किरण बेदीनीही ऑलिम्पिक ज्योत रीलेत भाग घ्यायला नकार दिला आहे... --- सचिन धावणार आहे म्हणे, स्वत:हुन तशी ईच्छा प्रकट केली त्याने. टोणगाच्या या पोस्ट मधील मताशी पुर्ण सहमत, स्वातंत्राची स्वप्ने पहाणारे (ज्यांच्या साठी या आयुष्यात स्वातंत्र हेच "एकमेव उद्दिष्ठ" आहे), यावेळेला सुवर्ण संधी समजतील तर त्यात वावगे असे काहीच नाही. दुर्देवाने ऑलिम्पिक नंतर जगाचे लक्ष (आज जेव्हढे आहे त्यापेक्षा) कमी होईल.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|