|
Tonaga
| |
| Wednesday, April 09, 2008 - 5:22 pm: |
| 
|
लालू, लोकाना तिबेट माहीत होता? अमेरिकेतल्या? त्याना तर अमेरिका सोडून इतर देश आहेत हेच मुळी माहीत आहे का? त्यांचे प्रॉब्लेम तर दूरच. अगदी भारतातल्या लोकानाही तिबेटचे राजकीय स्टेटस काय आहे हे या आन्दोलनामुळेच माहीत झाले.खुद्द हा बी बीच त्याचे निदर्शक आहे. सचिनची आणि किरण बेदी यांची राजकीय समज एक असणे कसे शक्य आहे?. भुतीयाची गोष्ट वेगळी आहे त्याचे तिबेटींशी नाते मानववंश शास्त्रीय आहे.सचिन एक खेलाडू म्हणून आणि तुम्ही शुद्ध क्रीडाप्रेमी म्हणून त्याकडे पाहात आहात. पण जीवनाची सगळी अंगे अशी एअर टाईट असतात का? त्यामुळेच तर ठाकर्यांची पाकशी न खेळण्याची भूमिका जन्म घेते. शुद्ध क्रीडाप्रेमीना ते तथ्यहीन वाटते तर समर्थकाना वाटते पाकीस्तान विरुद्ध प्रोटेस्ट करण्याचा हा एक मार्ग आहे.गम्मत म्हणजे सचिनचे फॅन असलेले ठाकरे अन सचिन मात्र पकिस्तानशी खेळायला विरोध करत नाही. अशी ही गुंतागुंत! ठाकरे ही गुंतागुंत त्यांच्या नेहमीच्या धरसोडीप्रमाणे वाढवतात ती अशी की बाहेर खेळलेले त्याना चालते,. क्रिकेट सोडून इतर खेळात म्हणजे हॉकी वगैरे त्यांचा विरोध नसतो!अन जावेद मियान्दाद मातोश्रीवर जाऊन त्याना भेटतो अन ते त्याच्या 'त्या' षटकाराचे कौतुकही करतात! तात्पर्य, तिबेटीना लढू द्या. नाहीतरी नेहरूनी तिबेट चीनला एखादी जमीन विकावी तसा विकलाय त्याची भरपाई या पिढीत तरी होऊ द्या
|
Lalu
| |
| Wednesday, April 09, 2008 - 6:51 pm: |
| 
|
>>तिबेटीना लढू द्या टोणगा, याबद्दल दुमत नाहीच आहे. त्यांनी जी वेळ निवडली आहे आणि ज्या कारणासाठी निवडली आहे यी योग्य आहे का आणि त्याचा काही उपयोग आहे का असा प्रश्न आहे. आता ऑलिंपिकची वेळ निवडणे यात तुम्हाला काही वावगे वाटत नसेलही पण त्याचा उपयोग होणार नसेल आणि तोटाच होणार असेल तर ते चुकीचेच आहे. सध्या या आंदोलनाला जे पाठिंबा देत आहेत त्यांचा agenda वेगळा आहे. यावेळच्या आंदोलनामुळे अमेरिकेत किंवा इतर देशांतल्या सर्वसामान्य जनतेत त्याबद्दल जागरुकता वाढली असे म्हणायचे असेल तर हा भ्रम आहे. जे लोक जागरुक असतात ते असतात, नसतात ते नसतात. त्यांच्या संख्येत फार मोठा फरक पडत नाही. (जेव्हा प्रॉब्लेम तुमचा स्वतःचा नसतो तेव्हा.) प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल जास्त बघायला, वाचायला मिळाले म्हणजे जागरुकता आली असा अर्थ होत नाही. (तसे दलाई लामा खूप वर्षांपासून इथे बरेच पॉप्युलर आहेत. नेहमीच दिसायचे TV, मासिकांमध्ये. )
|
ऑलिंपिक ज्योत वेगवेगळ्या देशात फिरवून चीनला न्यायची चीनला इतकी खाज का आहे? ही काही जुनी परंपरा वगैरे नाही. साधारणपणे ही ज्योत यजमान देशात फिरवली जाते. मानवाधिकाराचे रेकॉर्ड इतके वाईट असताना चीनने असे करायला नको होते. चीन आपल्या देशात उत्तम दडपशाही करू शकतो तर तिथेच ही ज्योत फिरवायची होती. म्हणजे खेळात राजकारण नको वगैरे टेंभा ह्या ऑलिंपिक टेंभ्याच्या जोडीला मिरवता आला असता. परदेशात चीनच्या दडपशाहीबद्दल असंतोष आहे. तिथे असली लफडी, राडे होणारच.
|
अरे टोणग्या,तु एकाच पानावर सारखी सारखी भुमिका बदलतोय असे वाटत नाहीये का???आधी म्हणतोस की तिबेटनी ऑलिंपिक्सचा फ़ायदा घ्यायला पाहिजे आणि आंदोलन करुन जगाला चीनचे अत्याचार दाखवायला पाहिजे. मग ठाकर्यांच्या भुमिकेला विरोध करतोस. अरे पण ठाकरेंनी खेळाला राजकिय रंग दिल्याने पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाची चर्चा झालेली तुला का चालत नाही???हॉकिची परिस्थिती तशीच वाईट आहे मग अजुन जेव्हढ्या होतात तेव्हढ्या स्पर्धाही बंद करुन काय उपयोग???आता मियादाद भेटायला आल्यावर त्याला काय 'चालता हो,नाही भेटत जा' म्हणायला हव का??? एका षटकाराचे कौतुक केल्याने काय होते???पण त्याचवेळी त्याच्यासमोर ठाकरे मिडियाला म्हणाले होते की 'पाकिस्तानातुनच दहशतवादी येतात,तिकडूनच हल्ले होतात'. तुमच्या प्रिय कॉंग्रेसवाल्यांनी असा स्पष्टवक्तेपणा दाखवला असता का??तु लिहितोस **नाहीतरी नेहरूनी तिबेट चीनला एखादी जमीन विकावी तसा विकलाय त्याची भरपाई या पिढीत तरी होऊ द्या** आणि वरच लिहिलय की तु नेहरुभक्त आहेस म्हणुन. आता याला काय म्हणायचे?? माझ्यामते तिबेटनी पुर्ण सामर्थ्यानिशी आता लढा द्यावा. अशी संधी पुन्हा येणार नाही त्यांच्यासाठी.
|
मझ्या एका चिनि सहकार्याशी या विषयावर गप्पा मारताना लक्षात आलेली मजेदार गोष्ट म्हणजे एकाच प्रश्नाकडे पहण्याचा आपला द्रुष्टीकोण कसा वेगळा असतो. शाळेत आम्हाला एक धडा होता "आतले आणी बाहेरचे" तिबेट हा चीनचा अविभाज्य भाग आहे आणी दलाई लामा तेथे अस्थिरता माजवू पहात आहेत असे त्याचे ( आणी त्याच्या मते सर्व चिन्यान्चे ) मत आहे. तिबेटी लोकाना स्वातन्त्र्य द्यायला काय हरकत आहे असे त्याला विचारले तर तो सन्तापतो ( काश्मिर पाक ला द्यायला काय हरकत आहे? असे आपल्याला कोणी विचारले तर जसे आपण सन्तापू )
|
Uday123
| |
| Thursday, April 10, 2008 - 3:05 am: |
| 
|
माझ्यामते तिबेटनी पुर्ण सामर्थ्यानिशी आता लढा द्यावा. --- हत्ती आणि मुंगी असा लढा आहे, ०.२६ कोटी तिबेटी आणि १३२.१८ कोटी चिनी, बाहेरच्या पाठिंब्याशिवाय काहीही होणे शक्य नाही. किरण बेदी यांची प्रतिक्रिया खुपच मार्मीक आहे. http://www.expressindia.com/latest-news/Ill-not-participate-in-Oly-torch-run-Kiran-Bedi/294668/
|
Zakki
| |
| Thursday, April 10, 2008 - 11:18 pm: |
| 
|
एकाच प्रश्नाकडे पहण्याचा आपला द्रुष्टीकोण कसा वेगळा असतो. चीनचे म्हणणे आहे की आम्ही तिबेटला जुन्या काळातून एकविसाव्या शतकाकडे नेत आहोत. इकडे पूर्वी इंग्रजांनी पण म्हंटले होते की 'आम्ही भारताला सुसंस्कृत करतो, शिक्षण देतो' (म्हणजे काट्या चमच्याने खायला शिकवतो, नि 'फाड फाड' इंग्रजी बोलायला)! अमेरिकेत प्रथम गेलेल्या गोर्या लोकांचे म्हणणेहि हेच की आम्ही इथल्या "इंडियन" लोकांना सुसंस्कृत व प्रगत केले, शिक्षण दिले, धर्म दिला!! इंग्रज व अमेरिकेतल्या गोर्या लोकांनी भारतीयांचा व अमेरिकेतल्या "इंडियन" लोकांवर अनवित अत्याचार केले. तर इथल्या काही लोकांना प्रश्न पडला आहे की इंग्रज नि इथे आलेले गोरे लोक यांना चीनचा निषेध करण्याचा हक्कच कसा पोचतो? आता भारतीय. बिचारे. लढून घेता येत नाही म्हणून निषेध करतात! भारताच्या निषेधाला महत्व द्यायची चीनला काय गरज? नसेल यायचे ऑलिंपिकला तर नका येऊ. भारतीयांखेरीज इतर कोणी म्हणणार आहेत का, की 'अरेरे, भारतीय क्रीडापटू असते तर बरे झाले असते!' हे काही क्रिकेट नव्हे की पैशाच्या जोरावर काय वाट्टेल ते करावे!
|
Slarti
| |
| Friday, April 11, 2008 - 5:50 am: |
| 
|
हा एक सणसणीत तीरकस लेख बघा लेख IOC वरची निरीक्षणे विचार करायला लावणारी आहेत.
|
Mukund
| |
| Friday, April 18, 2008 - 7:34 am: |
| 
|
स्लार्टी... LOL... मस्त लेख आहे... आवडला.. यावेळच्या आंदोलनामुळे अमेरिकेत किंवा इतर देशांतल्या सर्वसामान्य जनतेत त्याबद्दल जागरुकता वाढली असे म्हणायचे असेल तर हा भ्रम आहे. जे लोक जागरुक असतात ते असतात, नसतात ते नसतात. त्यांच्या संख्येत फार मोठा फरक पडत नाही. (जेव्हा प्रॉब्लेम तुमचा स्वतःचा नसतो तेव्हा.) प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल जास्त बघायला, वाचायला मिळाले म्हणजे जागरुकता आली असा अर्थ होत नाही. (तसे दलाई लामा खूप वर्षांपासून इथे बरेच पॉप्युलर आहेत. नेहमीच दिसायचे TV, मासिकांमध्ये. ) लालु.. परत एकदा १००% अनुमोदन! टोणगा... मी क्रिडाप्रेमी आहे म्हणुन लालुच्या पोस्टींग्सना मुळीच दुजोरा देत नाही... ती म्हणते ते १००% सत्य आहे!आता मराठमोळीची मी आधीच माफ़ी मागतो... कारण तिचा या बीबीचा उद्देश तिबेटबद्दल माहीती व्हावी हा होता पण आज मी इथे यंदाच्या चायनामधल्या ऑलिंपिक्सवर बहिष्कार का होणार नाही याचा उहापोह करणार आहे. बहिष्कार करावा किंवा करु नये हा इथे माझ्या पोस्टातला मुद्दा नसुन... तो का होणार नाही याची कारणे मी इथे सांगु इच्छीतो हे वाचकांनी कृपया ध्यान्यात घ्यावे... बहिष्कार न होण्याची कारणे पडताळुन पाहताना त्याकडे आपल्याला राजकिय,ऐतिहासीक व खेळ खेळाडु या तीन्ही द्रुष्टीकोनातुन पाहणे आवश्यक आहे. खर म्हणजे चायनाच्या ह्युमन राइट्सबाबतचा विचार हा लालु म्हणाली त्याप्रमाणे चायनाला ऑलिंपिक्स बहाल करायच्या आधीच करायला हवा होता. पण आज आपल्याला सगळ्यांना ठाउक आहे की ऑलिंपिक्स सारख्या स्पर्धा या त्या खेळांच्या मुळ उद्देशापासुन खुप दुर होत चालल्या आहेत. आता फक्त या स्पर्धांपासुन फायदा किती होइल याचा विचार प्रामुख्याने केला जातो. आजच्या ग्लोबल इकॉनॉमीमधे.. ज्यात सगळ्यांचे हात पाय एकमेकात गुंतलेले आहेत.... असे चायनासारख्या देशातल्या ऑलिंपिक्सवर बहिष्कार घालणे जगातल्या कोणत्याच देशाला फायद्याचे नाही. जागतीक राजकारण जर मॉरल प्रिन्सिपल्सनी खेळले जात असले असते तर गोष्ट वेगळी होती... पण तसे होत नाही हे सुज्ञांना सांगणे नलगे! नाहीतर अमेरिकेने इराकवर धादांत खोटी कारणे देउन केलेला ब्लेटंट हल्ला व गेली ५ वर्षे चाललेले तिथले ब्लडी सिव्हील वॉर झालेच नसते... अमेरिकेचे आपलेच हात या इराक युद्धामुळे.. ह्युमन राइट्सच्या दृष्टीने... बरबटलेले असल्यामुळे त्यांना फ़ोर्सफ़ुली चायनाला त्यांच्या तिबेटच्या अंतर्गत मामल्याबाबत बोलायला मुळीच वाव नाही... आणी त्यात भर म्हणजे सगळ्या जगाला माहीत आहे की चायना व्यापारामधे अमेरिकेचा मोस्ट फ़ेव्हर्ड देश आहे.. अमेरिकेत मिळत असलेल्या वस्तुंपैकी ७५ टक्के वस्तु या मेड इन चायना असतात. तसेच अमेरिकन मालाला चायनाची १.३ बिलिअन लोकांची बाजारपेठ उपलब्ध आहे.. अश्या या अमेरिका-चायना नात्यामुळे अमेरिका तरी या ऑलिंपिक्सवर बहिष्कार घालणार नाही..(किंबहुना बहिष्कार घालु शकणार नाही असे म्हणणे उचीत ठरेल!) आणी इराक युद्धात इंग्लंडचेही हात गुंतले असल्यामुळे तेही बहीष्कार टाकणार नाहीत हे उघड आहे.जी गोष्ट इंग्लंड अमेरिकेची तीच गोष्ट रशिया व इस्टर्न ब्लॉक देशांची. ते सगळे कम्युनीस्ट देश असल्यामुळे ते बहिष्कार घालतील याची संभावना फारच कमी आहे.आता उरले बाकीचे देश... त्या देशांनी जर या ऑलिंपिक्सवर बहिष्कार टाकला तर तिबेटचा प्रश्न सुटु शकेल हा दावा जर कोणी करत असेल तर त्यांच्या निरागसतेची कमाल आहे! आता ऐतिहासीक दृष्ट्या जर बहिष्काराकडे बघीतले तर बहिष्कार हा कधीच प्रभावी उपाय ठरला नाही. १९७६ मधे मॉंट्रियाल ऑलिंपिक्सवर आफ़्रिकन देशांनी साउथ आफ़्रिकेच्या वर्णभेदी राजवटीविरुद्ध आवाज उठावा म्हणुन बहिष्कार घातला होता... त्यानंतर साउथ आफ़्रिकेमधे राजकिय परिवर्तन त्या बहिष्कारामुळे घडले असे म्हणणे धारीष्ट्याचे ठरेल... साउथ आफ़्रिकेमधे बदल घडला तो जगातल्या सगळ्या देशांनी त्यांच्याविरुद्ध इकोनॉमिक एंबार्गो केल्यामुळे... आणी तसे केल्यामुळे जगाचे काही फारसे नुकसान झाले नाही... कारण साउथ आफ़्रिकेची इकॉनॉमी ही आजच्या चायनाच्या बलाढ्य इकॉनॉमीसारखी जगव्याप्त नव्हती... या उलट चायनाविरुद्ध इकॉनॉमिक एंबार्गो हा विचारही जगातले प्रगत देश आज करु शकत नाहीत इतकी चायनाच्या इकॉनॉमीने इतर सर्व जगात आपली पाळेमुळे रुजवली आहेत... त्यानंतर घ्या १९८० च्या मॉस्को ऑलिंपिक्सचे उदाहरण!... त्या ऑलिंपिक्सवर अमेरिकेने बहिष्कार घातला होता.. कारण? रशियाने अफ़गाणीस्तानावर १९७९ मधे केलेले अतिक्रमण.... पण झाला का त्याचा काही उपयोग? रशियाने अफ़गाणीस्तानातुन माघार घेतली १९८९ मधे! तेही अहमदशहा मसुद व ओसामा बिन लादेनच्या गनीमी युद्धाला कंटाळुन!(अर्थात त्यावेळेला ओसामाला अमेरिकेनेच पैशाची व मिलीटरी मदत केली होती हेही खरच होते!) पण अमेरिकेने १९८० मधे मॉस्को ऑलिंपिक्सवर टाकलेल्या बहिष्काराचा फायदा काहीच झाला नाही... ते ऑलिंपिक्स व त्या ऑलिंपिक्समधे भाग घेउ इच्छिणारे खेळाडु मात्र उगाच वेठीस धरले गेले... आणी मग १९८४ च्या लॉस ऍंजेलीस ऑलिंपिक्सवर रशियाने बहिष्कार घातला... कारण काय? तर अमेरिकेने १९८० च्या मॉस्को ऑलिंपिक्सवर घातलेल्या बहिष्काराचा बदला म्हणुन रशियाला अमेरिकेला ऑलिंपिक्समधे आर्थीक झळ पोहोचवयाची होती.... पण तुम्ही जर ते ऑलिंपिक्स टिव्हीवर बघणार्या दर्शकांची संख्या बघीतलीत व त्या वर्षी अमेरिकन ऑलिंपिक्स समीतीला झालेला फायदा पाहीलात तर रशियाचा बहिष्कार अगदीच निष्फळ ठरला होता!..... म्हणजे बहीष्कारातुन काही साध्य होइल याचा काहीच ऐतहासीक पुरावा नाही..(आता इतिहासात फायदा झाला नाही म्हणुन आता बहिष्कार करु नये असे थोडीच आहे? असे म्हणु नका... मी इथे बहीष्कार का होणार नाही हे सांगत आहे... करावा की नाही हे सांगत नाही हे लक्षात घ्या!) आणी शेवटचे म्हणजे... खेळ व खेळाडु यांच्या दृष्टीने..... या मुद्द्याबाबत मात्र मी एक क्रिडाप्रेमी असल्यामुळे बायस आहे हे आधीच सांगु इच्छितो... ऑलिंपिक्स कमीटीच्या नालायकीची फळे या ऍथलिट्सनी का म्हणुन भोगायची? ऑलिंपिक्स कमीटीने चायनामधे व तिबेटमधे होत असलेल्या ह्युमन राइट्सच्या पायमल्लीचा विचार न करता ऑलिंपिक्स चायनाला बहाल करायचा बोनहेड डिसीजन घेतला.... तर त्याची शिक्षा खेळाडुंना का? या एका स्पर्धेसाठी उभे आयुष्य मेहनत केलेले १०,००० खेळाडु असतात हे लोकांनी विसरु नये हे या बहिष्कार न घालण्यासाठी असलेले तिसरे कारण! खर म्हणजे ऑलिंपिक्सच्या खर्या स्पिरीटला जागुन जगभरच्या सगळ्या खेळाडुंनी एकत्र येउन या स्पर्धांमधे भाग घेण्यासारखे उदात्त,शांतीचे,मैत्रीचे सदभावनेचे दृष्य आजच्या जगात दुसरीकडे कुठेतरी पाहायला मिळेल काय? म्हणुन या वरील तिन्ही गोष्टींचा सारासार विचार केला तर या ऑलिंपिक्सवर बहिष्कार येणे कठीण दिसते!
|
Farend
| |
| Friday, April 18, 2008 - 1:20 pm: |
| 
|
जबरी लेख आहे तो स्लर्ती! मुकुंद तुझाही लेख वाचून असे वाटते की चीन वर अवलंबून असणार्या अर्थव्यवस्थांमुळे अरब देशांसारखाच एक नवीन भस्मासूर उभा राहात आहे. मग त्याने काहीही केले तरी प्रत्येक देश आपले आर्थिक हितसंबंध जपत त्याविरुद्ध जाहीर पणे कठोर भुमिका घेऊ शकणार नाहीत.
|
Slarti , तुम्हि दिलेला लेख आवडला. मुकुंद, माझि माफ़ि मागण्याचि काहिच गरज नाहि. 2008 olympic च्या निमित्तानेच सध्या तिबेटचा प्रश्न ऐरणिवर आला आहे त्यामुळे olympic वर बहिष्कार हा प्रश्न ओघानेच आला. मला तुमचि post आवडलि. तुम्हि खुपच वस्तुनिष्ठ दृष्टिकोणातुन बहिष्कार प्रत्यक्षात का येवु शकत नाहि याच विवेचन केलय. पण मला तुमच शेवटच वाक्य ("खर म्हणजे ऑलिंपिक्सच्या खर्या स्पिरीटला जागुन जगभरच्या सगळ्या खेळाडुंनी एकत्र येउन या स्पर्धांमधे भाग घेण्यासारखे उदात्त,शांतीचे,मैत्रीचे सदभावनेचे दृष्य आजच्या जगात दुसरीकडे कुठेतरी पाहायला मिळेल काय?") काहि पटल नाहि. मी काहि तुमच्या इतकि जाणकार नाहि पण मला अस वाटत कि सध्याच्या काळात एकुणच खेळ हे फ़क्त पैशांसाठि खेळले जातात खेळाडुंकडुनहि. मेरिट मध्ये येण्याचा ध्यास घेतलेल्या विद्यार्थ्याला अभ्यास्क्रमातिल एखाद्या कवितेच रसग्रहण करण्याचि जेव्हढि इछ्छा असेल तेव्हडिच इछ्छा या खेळाडुंना शांतता, बंधुता इत्यादि मानवि मुल्यांमध्ये आहे. पराकोटिचि महत्वाकांक्षा आणि बक्षिसानंतर मिळणारे प्रचंड आर्थिक लाभ यापायि जिथे स्वत:च्या आरोग्याचि पर्वा न करता उत्तेजक सेवनाचा मार्ग पत्कारला जातो तिथे कसलि आलिये उदात्तता. खेळाडुंचा विचार करता बहिष्कार घालु नये या मुद्द्याशिहि मी सहमत नाहि. हे खेळाडु म्हणजे समता बंधुता, 'हे विश्वचि माझे घर' या तत्वांसाठि केळणारे आधुनिक संत महात्मे नाहित तर मिळणारे मेडल्स, काहि काळासाठि प्रस्थापित होणारे विक्रम त्या अनुषंगाने मिळणारा प्रचंड पैसा आणि (काहिंच्या बाबतित) मिळणार अमेरिकन नागरिकत्व यासाठि स्पर्धेत उतरणारि सर्वसामान्य माणसे आहेत. हे अस असु नये किंवा ह्यात खेळाडुंचा काहि दोष आहे अस मला म्हणायच नाहिये. पण मग ह्या खेळाडुंच्या नुकसानाच्या मोबदल्यात जर अनेक लोकांच्या आयुष्यात काहि सकारात्मक बदल होवु शकत असेल तर अस व्हाव म्हणुन जरूर प्रयत्न झाले पाहिजेत. प्रसार माध्यमांचि ताकत प्रचंड असते (कारगिल युध्धात जिचा भारत सरकार ने योग्य वापर करुन घेतला). मग तिबेटच्या बाबतित जनमत तयार करण्यासाठि असा उपयोग नाहि का करता येणार? कुठल्याहि देशाच सरकार तिबेटसाठि आपणहुन काहि करणार नाहि हे मान्य, आर्थिक हितसंबंधांना प्राधान्य दिले जाइल हेहि बरोबर. पण जनमत जर तयार झाल तर त्याच्या रेट्यापुढे सरकारला झुकाव लागेल ना? अखेर निवडुन येण्याचि चिंता त्यांनाहि आहेच. सध्या olympic च्या निमित्ताने जगातिल प्रसारमाध्यमे चिनवर दृष्टि रोखुन आहेत भविष्यात अशि संधि मिळेल का? बहिष्कार प्रत्यक्षात येणार नाहि हे मान्य पण त्यासाठि प्रयत्न करण्याच कारण मात्र योग्य आहे. मानवि जीवन हे बहुमुल्य आहेच पण सर्वसामान्य तिबेटि नागरिकांपेक्षाहि एक मोठि गोष्ट इथे पणाला लागलि आहे ति म्हणजे त्यांचि संस्कृति. पोटाला राजवाड्यापासुन चार पावलांच्या अंतरावर भव्य कसिनो बांधुन देउन चिनि सरकार तिबेट्चि प्रगति साधु पहात आहे. जशि रासवट युरोपिअन लोकांनि दक्षिण अमेरिका आणि अफ़्रिकेतलि संस्कृति नष्ट केलि तशिच गत चिनि सरकारच्या हातुन तिबेटि संस्कृतिचि होणार. एका मागुन एक अश्या संस्कृतिंचा र्हास मानवि प्रजातिच्या ( Homo sapiens ह्या अर्थाने) आत्मिक उन्नतिच्या दृष्टिने घातक नाहि का? कल्पना करा ह्या न्यायाने एक दिवस सबंध जग हे अमेरिकेसारख होउन जाइल जिथे इतिहास नसेल, संस्कृति नसेल, परंपरा नसतिल. धर्म अनेक असतिल पण प्रत्येकाचा खरा धर्म एकच असेल चंगळवाद!
|
मुकुंद तुम्ही बहिष्काराचे बरोबर मांडले आहे. बहिष्कार करुन काय फायदा? काहीही नाही. पण खेळाडुंबद्दलचे रश्मीचे मत पटते. विश्वबंधुत्व वैगरे काही नसत, फक्त पैसे असतात ( यात फार तर १ टक्का खेळाडु येत नसतील पण बाकी फक्त पैसे). तिबेटच्या जनतेने त्यांचाकडे लक्ष न वेघले तरच नवल. त्यांना मिळालेली हे एक सुवर्ण संधी आहे.
|
Mukund
| |
| Saturday, April 19, 2008 - 5:18 am: |
| 
|
मराठमोळी... तुझ्या वरील पोस्टमधे तु एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहेस.. तो म्हणजे सोशल ऍन्थ्रोपोलॉजीचा... त्याला उत्तर देण्याचा या बीबीचा स्कोप आहे की नाही हे माहीत नाही.. त्याविषयावर एक उत्तम चर्चा होउ शकेल... संस्कृतीचा र्हास कसा होतो? त्या विषयावर प्रसिद्ध सोशल ऍन्थ्रोपोलॉजीस्ट मॅक्स ग्लकमन ने कार्ल मार्क्स ची कॉन्फ़्लिक्ट थिअरी कशी विस्तृत केली आहे ती जरुर वाच. हा खरच खुप विचार करण्यासारखा विषय तु काढला आहेस. सध्या सर्व जगात अमेरिकन चंगळवादाचे जे अंधपणे अनुकरण केले जात आहे त्या पार्श्वभुमीवर सगळ्यांनी या विषयाचा अभ्यास करायला हवा. गंमत म्हणजे अमेरिकेची भांडवलशाही अश्या गोष्टींना तितकीच जबाबदार जितकी चायनाचा समाजवाद तिबेटिअन संस्कृती र्हासाला... त्यामुळे जगात सत्य एकच आहे असे मला वाटते... जगाच्या इतिहासात काही काही देश आपला ठसा जगातल्या बाकीच्या संस्कृतीवर काही काळासाठी उमटवतात.. मग त्या देशांचे प्रभुत्व कालांतराने नष्ट होते... मग दुसरे काही देश त्यांची जागा घेतात व असे हे चक्र चालुच राहते... त्या चक्रातुन तावुन सुलाखुन ज्या संस्कृती वाचतात... त्यांचेही मुळ स्वरुप थोडेफार तरी बदलते. सध्याच्या जेट व कंप्युटर-इंटरनेट युगात सर्व जग इतके एकमेकांच्या जवळ आले आहे की आता अशी ही संस्कृतींची मिसळ वेगात होउ लागली आहे. पुर्वी देशादेशातील लोकांचे स्थलांतर आजच्याइतके नव्हते त्यामुळे असे प्रश्न सहसा लोकांना भेडसावत नसत. पण हे असे संस्कृतीतले बदल होणे सोशल ऍन्थ्रोपोलॉजीच्या दृष्टीने अटळ आहे... त्यात नुसत्या चायना किंवा अमेरिकेला दोष देणे कितपत योग्य आहे हा वादाचा विषय होउ शकतो. मी इथे अमेरिकेचा चंगळवाद बरोबर की चायनाचा समाजवाद बरोबर याची तुलना करत नसुन या प्रश्नाकडे एका ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह ने बघण्याचा प्रयत्न करत आहे... आता मुद्दा आहे खेळाडुंचा... मान्य आहे की सध्या टॉप ऍथलिट्सना मिळत असलेल्या पैशाच्या लोभामुळे काही ऍथलिट्स परफ़ॉर्मन्स एनहांसींग ड्रग्स घेतात... पण जगातले सगळेच ऍथलिट असे ड्रग्स घेतात असे म्हणणे म्हणजे जगातल्या ९५ टक्के ऍथलिट्सवर अन्याय केल्यासारखे होइल. आणी सगळेच ऍथलिट अमेरिकन सिटीझनशीपच्या मागे असतात हे विधानही मला पटत नाही. मला खेळांची अत्यंत आवड असल्यामुळे या विषयावर मी बायस असण्याची शक्यता आहे. पण माझ्या प्रोफ़ेशनच्या संदर्भात मला १९८८ मधे कालोराडो स्प्रिंग्स मधल्या अमेरिकन ऑलिंपिक्स प्रशिक्षण केंद्रात अमेरिकेचा प्रख्यात जलतरणपटु मॅट बिऑंडी चे प्रशिक्षण जवळुन अभ्यासायचा योग आला होता. त्या वेळेला तो आणी इतर जलतरणपटु व अजुन बरेच ऍथलिट दिवसातुन १२- १२ तास कसुन मेहनत व प्रशिक्षण घेताना मी स्वत्: डोळ्याने पाहीले आहेत. कटिंग एज प्रशिक्षण कसे वापरले जाते.. एक्झरसाइज फिजीऑलॉजीमधले कटींग एज रिसर्च वापरुन ऍथलिट्सना मिलिसेकंद बाय मिलिसेकंद फ़ास्टर कसे बनवले जाते हे मी स्वत्: पाहीले आहे. त्यामागची ऍथलिट्सची मेहनत व परिश्रम वाखाणण्यासारखी असते... हे खेळाडु चार वर्षे असे अविरत मेहनत घेउन प्रयत्न करत असतात... मग अश्या खेळाडुंच्या मेहनतीला काही ऍथलिट्स ड्रग्स घेउन जेव्हा काळीमा फासतात तेव्हा माझे मन खुप चरफडते... असो.. परत एकदा... तुम्ही माझ्या बायस मताशी सहमत व्हा असे मी मुळीच म्हणणार नाही... पण मी अजुनही म्हणेन की ऑलिंपिक्स स्पर्धांचा मुळ उद्देश खरच उदात्त आहे. त्यांच्या प्रिंसीपल्सपैकी काही मी इथे खाली कॉपी पेस्ट करत आहे. ऑलिंपिकमधे भाग घेतलेल्या(ड्रग्स न घेतलेल्या) कुठल्याही ऍथलिटला किंवा ते प्रत्यक्ष पाहीलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यांचे ऑलिंपिक अनुभव विचारा व त्यांच्या मनातल्या भावना त्या १५ दिवसात काय होत्या हे विचारा... ते सगळे मान्य करतील की एकोपा व बंधुभाव हे नुसते शब्द न राहता त्याची अनुभुती प्रत्येकाला या ऑलिंपिक्स स्पर्धांच्या वेळी होते. असो. Fundamental Principles of Olympism 1. Olympism is a philosophy of life, exalting and combining in a balanced whole the qualities of body, will and mind. Blending sport with culture and education, Olympism seeks to create a way of life based on the joy of effort, the educational value of good example and respect for universal fundamental ethical principles. 2. The goal of Olympism is to place sport at the service of the harmonious development of man,with a view to promoting a peaceful society concerned with the preservation of human dignity. 4. The practice of sport is a human right. Every individual must have the possibility of practising sport, without discrimination of any kind and in the Olympic spirit, which requires mutual understanding with a spirit of friendship, solidarity and fair play. 6.The goal of the Olympic Movement is to contribute to building a peaceful and better world by educating youth through sport practised in accordance with Olympism and its values.
|
Slarti
| |
| Saturday, April 19, 2008 - 5:43 am: |
| 
|
मुकुंद, सुंदर विश्लेषण. प्रत्येक खेळाडूने थोर उदात्त भावना मनात घेऊन मैदानात उतरण्याची गरज आहे का ? शेवटी हा उत्सव नक्की कशाचा आहे ? त्याचे खूप खोलवरचे पापुद्रे काढून बघण्याऐवजी वरचा एकच पापुद्रा काढून बघितला तर... हा उत्सव आहे माणसातील सर्वोत्कृष्ट शोधण्याचा, एक माणूस म्हणून असलेल्या आपल्या सीमारेषा कुठे आहेत हे बघण्याचा आणि त्यांना ओलांडून जाण्याच्या प्रयत्नांचा... कुठल्या सीमा ? राजकीय, वैचारीक सीमा तर दूर राहिल्या... निसर्गदत्त आकृतीबंधाच्या. आपल्याला निसर्गाने दिलेला आकृतीबंध (केवळ शारिरीकच नव्हे, तर मानसिकसुद्धा) पुन्हा पुन्हा कसाला लावणे हे कमी उदात्त ध्येय नाही असे मला वाटते. पैसे, कीर्ती या 'प्रलोभनांमुळे' हे बहुतांशी होत असले तरी त्याद्वारे जे (वर उल्लेख केलेले) साध्य होत आहे ते 'बंधुता, शांतता' इ. इतकेच महान आहे असं माझं मत. (हे मी उत्तेजके वगैरे सेवन न करणार्यांबद्दल बोलतोय.) आता ही स्पर्धा विश्वबंधुता, शांतता वगैरेंसाठी वापरता येईलसुद्धा. पण ऑलिम्पिक समिती ढोंगी आहे... ते जर खरेच त्यांचे ध्येय असते तर मुळात चीनला यजमानपदच दिले नसते, अन् इतरही देशांना जर या गोष्टींची चाड असती तर त्याच वेळी या निर्णयाबद्दल काही करायचे होते. या स्पर्धेमधून थेट, प्रत्यक्षदर्शी असे जे मिळतय त्याच्याही 'पलिकडे' (गरज काय ??!! ) जाऊन आणखी ( !! ) काहीतरी खोल, उदात्त शोधण्याचा प्रयत्न केवळ ढोंगीपणाचाच नव्हे, तर सध्याच्या परिस्थितीकडे व त्यातून येणार्या अपरिहार्यतेकडे (अमोलने मांडलेला मुद्दा) दुर्लक्ष करणारा आहे. तिबेटी लोकांनी ही संधी घेणे यात मलातरी काहीच गैर वाटत नाही, पण मलाही त्यांना होणार्या फायद्याबद्दल शंका आहे.
|
Slarti
| |
| Saturday, April 19, 2008 - 6:00 am: |
| 
|
मुकुंद आताच तुमचे नंतर आलेले पोस्त वाचले. खेळाडूंमध्ये निर्माण होणारी एकोप्याची भावना म्हणजे जबरदस्त सहपरिणाम आहे (माझ्या दृष्टीने)
|
Tonaga
| |
| Saturday, April 19, 2008 - 4:00 pm: |
| 
|
मर्हाटमोळी यांच्या लिखाणात त्यानी ऑलिम्पिक खेलाडूना मिळणार्या अमाप पैशाबद्दल उल्लेख केलाय. मला वाटते पैसा देणारे बहुसंख्य व्यावसायिक खेळ ऑलिम्पिक मध्ये नसतात.उदा. क्रिकेट, टेनीस इ. एथलेट, शूटर्स,जिमनॅस्ट्स वगैरे मेडलसाठी, मानासाठीच लढतात. ऑलिम्पिक मधल्या खेळात फार पैसा आहे असे मला वाटत नाही. राजवर्धन राठोडला आर्मीने मदत केली अन जाहीरातीत भाग घ्यायला अपवाद म्हणून परवानगी दिली म्हणून तो ट्रेनिंगचा खर्च तरी करू शकतोय. अन्यथा सगळी तोट्यातच गम्मत आहे...
|
टोणगा तुम्ही फक्त भारतातल्या खेळाडु ला उदा म्हणुन धरताय. अमेरिका, जपान, चिन आणि रशिया या देशांमध्ये ऐक ऐक सेंकद कमी करन्यासाठी मिलीयन्स टाकून रिसर्च केला जातो. आणि म्हणुनच त्या चार देशांकडेच सर्वात जास्त मेडल्स जातात. भारतात खेळांकडे दुर्लक्ष केले जाते. वा हेच आपण जगातल्या बहुतांश गरिब देशांबद्दल म्हणू शकतो कारण तिथे खेळांपेक्षा मुलभुत सोयींकडे पैसे वळविले जातात. रिसर्च, खेळांविषयी घोर अज्ञान व लागनारी सामुग्री वैगरे भारतीय खेळाडुंना मिळत नाही म्हणुन त्यांना सहाय्याची गरज लागते व त्यामुळेच ते मेडल मिळविन्यात अयशस्वी ठरतात. खेळा साठी मेहनत घेने हे आलेच. मेडल उगीच कोणालाही मिळत नाही, पण ती मदत करायला वर उल्लेखलिल्या देशात अनेक संघटना आहेत. त्या व सरकार हवी ती मदत खेळाडुंना करते कारण उपलब्ध असलेला पैसा व ईतर सहाय्य. केनीया चा धावपटु भले महान असेल पण त्याला फक्त रेस च्या दिवशीच घालायला बुट दिले तर तो पहिला यील का? नाहीच. शुटर्स, जिमनस्ट वैगरे हे वर उल्लेखलेल्या देशात स्वतंत्र करिअर आहेत त्यासाठी लहानपणा पासुन मेहनत घेतली जाते. भारतासाअरख्या देशात अजुन तसे नाही म्हणुन भारतात अशा खेळात पैसे मिळत नाहीत. खेळ खेळनार्यांना व आयोजन करनार्यांना मला कमी लेखायचे नाहीये. तिथे जाने नक्कीच फार मोठी (प्रचंड मोठी) गोष्ट आहे व त्यासाठी त्या लोकांना माझा सलाम पण स्लार्टी नी म्हणल्याप्रमाने प्रत्येक वेळी उद्दात भावना घेउन उतरायची गरज नाही. हा खेळ आहे व खेळाकडे खेळ म्हणुनच पाहीले जावे. पण नेमके ईथेच घोळ आहे. ऑल्मपिक कमीटी फक्त पैशांकडे बघुन ईतर गोष्टींकडे दुर्लक्ष करते नाहीतेर केनीया, भारत झालच तर सोमालिया ईथेही आतापर्यंत ऑलंमिक विश्वबधुंत्वामुळे आयोजीत केले असते पण तसे झालेले नाही. आता यावर उत्तर म्हणुन तुम्ही लगेच म्हणनार की या देशात हे सर्व खेळ आयोजीत करायला लाग्नार्या गोष्टी व पैसा नाही. म्हणजे परत पैसा याच गोष्टीवर आपण येतो विश्वबंधुत्व वैगरे वर नाही. भलेही त्यांचे फंडामेटंल्स तसे सांगत असतील (वर उल्लेखित) पण ऑल्मपिक व खेळांमुळे विश्वबंधुत्व वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी त्यांची घ्टना आता बदलायला हरकत नसावी कारण गेल्या ५० वर्षात अनेक युध्द झाली आहेत व खेळांना रशिया व अमेरिकेने युध्दभुमी म्हणुन पाहीले आहे हे सर्वज्ञात आहे मग यात बंधुत्व कुठे येते? जे लोक जागरुक असतात ते असतात, नसतात ते नसतात. त्यांच्या संख्येत फार मोठा फरक पडत नाही. (जेव्हा प्रॉब्लेम तुमचा स्वतःचा नसतो तेव्हा.) प्रसारमाध्यमांमध्ये याबद्दल जास्त बघायला, वाचायला मिळाले म्हणजे जागरुकता आली असा अर्थ होत नाही. (तसे दलाई लामा खूप वर्षांपासून इथे बरेच पॉप्युलर आहेत. नेहमीच दिसायचे TV, मासिकांमध्ये. )>>>>>> लालु तुझा मुद्दा अर्धा मान्य का ते सांगतो. जागरुक असने हा झाला स्थायीभाव पण मिळालेल्या माहीतीमुळे जागरुक होणे की झाली प्रक्रिया. ह्या प्रक्रीये मुळे अनेक लोक जागरुक होतात. प्रत्यके जागरुक नागरिकाला तो कितीही जागरुक राहीला तरी जगातल्या सर्व घटना कळने केवळ अशक्य आहे. अग घरी जर एक टिनैजर असेल तर त्याचा सर्व गोष्टी पण आपल्याला माहीत नसतात मग जगाचा गोष्टी कळने व त्यावर उहापोह करने हे होत नाही. आणि इथेच मिडीया ते काम करतो. नव्हे ते करायला पाहीजे. जागरुक माणसाला ती गोष्ट कळली तर तो त्या भाग घेउ शकतो पण माहीती नसलीच तर काय? मग तो जागरुक म्हणायचे नाही काय? जागरुकतेचे एक उदा म्हणजे भारताचे स्वातंत्र्य. सामान्य लोक कधीही जागरुक न्हवते पण त्यांचात जागरुकता आणली ती गांधी, लोकामान्यांनी. ती सर्व लोक जागरुक झाली. स्वातंत्र्य पुर्व काळात बहुतांश क्रांतीकारक बंगाल, पंजाब व महाराष्ट्रातच का होती? कारण वर्तमान पत्रांनी ती जागरुकतेची प्रक्रिया घडविली म्हणुन ह्या तिन राज्यात लोक जास्त जागरुक होती. दलाई लामांना प्रसिध्दी मिळने वेगळे व तिबेट मधल्या अत्याचारांना प्रसिध्दी मिळने वेगळे. अत्याचारांना प्रसिध्दी गेल्या ऐक वर्षात (ऑलंम्पीक मुळे) मिळतीये. ह्या वारंवार मिळनार्या प्रसिध्दीतुन काही लोक जागरुक होतील ती होईल प्रक्रीया मग त्यांना पण तु ते आधीच जागरुक होते असे म्हणशील काय?
|
Mrinmayee
| |
| Saturday, April 19, 2008 - 9:39 pm: |
| 
|
धरून चालुयात की लोक आधी जागरुक नव्हते, ते आता झाले. पण जागरुक झाले म्हणून नेमकं काय झालं? काय बदललं? इथे जागरुकतेचा अर्थ 'जनसामान्यांना परिस्थीती माहिती झाली' इतपतच घेता येऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणून जगभरातून काय प्रतिसाद मिळाला? फारसा काही नाही. आपल्या रोजीरोटीच्या चिंतेतून काही वेळ काढून कुणी उठाव केले? कुठले दरवाजे ठोठावले? (ह्या निष्क्रीयतेत मी पण आले.) सध्यातरी खेळांवर बहिष्कार घालून तिबेटी लोकांना "आमची सहानुभुती आहे" येव्हडंच दाखवता येईल. ह्याउप्पर काही नाही. आणि त्यामुळे नेमकं काय साध्य होईल हे कळलं नाही.
|
Uday123
| |
| Sunday, April 20, 2008 - 1:20 am: |
| 
|
ऑलिंम्पिक खेळांवर बहिष्कार टाकावा असे तर खुद्द दलाई लामा देखील म्हणत नाही आहे, त्यांचा बहिष्कारास विरोधच आहे. हो पण तिबेटींना शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवण्याचे स्वातंत्र असायला हवे यासाठी ते पाठपुरावा करतात. आता जगभरातील राजकीय नेते फ़क्त उद्घाटन समारंभावर बहिष्कार (ते आधीच व्यस्त आहेत, बहिष्कार हा शब्द खुबीने टाळतात) टाकणार असतील, तर त्याने खेळावर खुप काही परिणाम होईल असे वाटत नाही. युनो सरचिटणिस, ब्रिटन, जर्मनी राष्ट्रप्रमुख यांनी अगोदरच असमर्थता दर्शवली आहे, बहुधा फ़्रान्स आणि अमेरिकन प्रमुख देखील उपस्थीती टाळतील. काय फ़रक पडतो बुश आले काय आणि नाही आले काय उद्घाटन समारंभाला तर?
|
सध्यातरी खेळांवर बहिष्कार घालून तिबेटी लोकांना "आमची सहानुभुती आहे" येव्हडंच दाखवता येईल. ह्याउप्पर काही नाही. आणि त्यामुळे नेमकं काय साध्य होईल हे कळलं नाही>>>>>>> मृण्मयी, खेळावर बहिष्कार टाकु नयेच. खेळ व्हायला पाहीजेत. प्रश्न बहिष्काराचा नाही तर जागरुक होन्याचा आहे. प्रश्न खेळांचा नाही तर तिबेट त्या खेळांचा स्वतला फायदा कसा करुन घेईल त्याचा आहे. प्रश्न जागतीक मिडीयाचे लक्ष तिबेटी कसे ओढवुन घेतील याचा आहे. १९०० नंतर भारतीय लोक जागृत व्हायला सुरु झाले त्यामुळे १९४७ मध्ये स्वातंत्र्य भेटले. त्याल कालवधी द्यावा लागतो. आज जागरुक झाले की उद्या बदलले असे नसते. तिबेटी लोकांनीच तो लढा लढायचा आहे. तु, मी किंवा आपण नाही. आपण सर्व बाहेरचे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर तिबेटी लोक आत्तापर्यंत त्यांचे लक्ष वेधु शकले नाही. ती संधी त्यांना ऑल्मपिक मुळे आली. फक्त तिबेटी जरी एकत्र यामुळे येत असतील तरी पण मोठी गोष्ट होईल. त्यांचा लढ्याल्या जगभरातुन पैसे मिळतील हा दुसरा फायदा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|