|
Zakki
| |
| Wednesday, March 26, 2008 - 4:26 pm: |
| 
|
अरुणाचल साठी युनो मध्ये तक्रार आत्तच नोंदविने आवश्यक आहे ते कसे शक्य आहे? आता सार्वत्रिक निवडणूका आहेत. त्याची तयारी करायला पाहिजे ना? निवडणूका संपल्यावर सरकार स्थापन झाले, सेलेब्रेशन संपले की वळू हळू हळू असल्या छोट्या प्रश्नांकडे.
|
Uday123
| |
| Wednesday, March 26, 2008 - 4:34 pm: |
| 
|
आपल्या पंतप्रधानांना अरुणाचलला भेट द्यावी वाटली तर चिन ने खळ्-खळ का करावी? आणि आपण काहीच आदळ्-आपट न करता मुकाट्याने फ़क्त निषेधाच्या पलीकडे काही करत नसु तर आपण तो 'विवादास्पद भाग' आहे हे अप्रत्यक्षरित्या मान्यच करतो आहे. ही घटना २००८ मधील आणि ताजी आहे. या भेटीचा चिन ने सरकारी पातळीवर निषेध नोंदवला आहे. तिबेट विसरा, जे आपले आहे ते जरी सांभाळता आले तरी खुप आहे, नव्हे तेच अपेक्षित आहे. केदार यांनी योग्य (युनो) उपाय सुचवला आहे, पण मला नाही वाटत आपण असा धाडसी निर्णय घेऊ...
|
Alpana
| |
| Thursday, March 27, 2008 - 8:39 am: |
| 
|
ह्या सगळ्या चांगल्या चाललेल्या चर्चेमध्ये त्या कार्ला चा फोटो काय करतोय? कुणालाच कसे खटकत नाहीये?
|
Santu
| |
| Thursday, March 27, 2008 - 1:30 pm: |
| 
|
अल्पना अग कार्ला च फोटो असु दे ते एक पोस्ट ला उत्तर म्हणुनच टाकलाय. तुला आवडला नाहि का? केदार अरे नेहरुना १९५८ च्या आधिच तिबेट चिन गिळंक्रुत करणार आहे हे मान्य केल होत मान्य केल नव्हत ते सरदार पटेलानी. नेहरुंचा कल हा आधि पासुन डाव्या चिन कडे होता. म्हणुन तर पंचशिल ची वकिली त्यांनी केलि. शेवटि (भांडवल्शाही)अमेरिकेनीच दबाव टाकुन १९६१ च्या युध्दात नेहरुंची अंडरप्यांट तरि शाबुत ठेवली. नाहितर चिन्यानी ति पन काढुन ठेवली असती. तशी तिबेट बरोबर आपन १९५० च्या आधी स्वतंत्र राष्ट्र म्हनुन संबन्ध ठेवले होते. पण नंतर सगलेच फ़िसकटले. मला वाटते क्रुश्ण मेनन ने नेहरुंना या बाबतित बरेच बहकवले होते.
|
Tonaga
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:55 pm: |
| 
|
तिबेट पेक्षा हा विषय वेगळा आहे.पण तिबेटशी संबंधीत आहे.खरा फान्दा मारला ब्रिटीशानी.प्रत्येक ठिकाणी त्यानी फाळणी आणि border dispute निर्माण केले. इस्त्राएल प्रश्नात मूळ काडी टाकली त्यानीच अन इस्राएल अन पॅलेस्टाईन दोन भाग करून आग लावून दिली ती अजून धुमसतेच आहे्या बाबतीत ब्रिटीशांचा हात कोणी धरणार नाही... ब्रिटीश ईन्डीया म्हणजे पाकिस्तान, भारत, भूतान ब्रम्हदेश,तिबेट इत्यादी. सोडून जाताना त्यानी नुसत्या कागदावर सीमा आखून दिल्या.व सर्वत्र लूज सीमा ठेवल्या. प्रॉपर सीमा नसल्याने कधी गैरसमजातून तर कधी मतलबी प्रमाणे प्रदेशाचे क्लेम केले जातात.भारत पाकीस्तान मधली रडक्लिफ लाईन निश्चित कुठे आहे. सियाचीनचा प्रश्न असा आहे की तिथे सगळ्या टेकड्या टेकड्या आहेत आखलेली बॉर्डर नसल्याने दोन्ही सैन्याला नेमकी टेकडी आपली कोणती हे माहीत नाही. त्यांच्या समजुतीप्रमाणे एखाद्या टेकडीवर स्वताची समजून गस्त घालायला गेला तरी दुसरा त्याच्यावर अतिक्रमण केले म्हणून फायरिंग सुरू करतो. ब्रिटीश इन्डिया आणि अफगाणिस्तान मधल्या ड्युरान्ड लाइणचा ही असाच घोळ घातला. त्यावर अजूनही पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांची झोम्बी चालूच आहे. तात्पर्य कोणाला सुखाने जगू द्यायचे नाही ही ब्रिटीश पॉलिसी यशस्वी आहे. तिबेट आणि भारताची सीमा ठरविणारी मॅकमहोन लाईन हा असलाच प्रकार.तिबेट चा कबजा सोडताना म्याकमहोन सायबानं मारलेली पाचर... तर अरुणाचालाला लागून तिबेटची बॉर्डर येते (तिबेत.... चुकलो चीनचा झिझॅंग प्रान्त)अरुणाचलातील तवांग जिल्ह्यात तवांग धर्मपीठ पाचव्या दलाइ लामाने स्थापले होते व सहाव्या दलाइ लामाचा जन्म तवांगमध्ये झाला होता.(सतरावे शतक)त्यामुळे तवान्ग हातिबेटचा भाग होता अन आता तिबेट म्हणजेच चीन असल्याने तवांग आणि अरुनाचल चीनचेच पूर्वीपासून आहे असे चीनचे या क्लेममागचे लॉजिक आहे.... यात लामाबुवा धरसोडीची भूमिका घेत असतात. तवांगला बुद्धपीठ नव्हतेच असे एकदा म्हणायचे एकदा दुसरेच... बघू या काय होतेय ते...
|
Zakki
| |
| Thursday, March 27, 2008 - 4:28 pm: |
| 
|
बघू या काय होतेय ते... भारतीय राजकारणी असेच म्हणताहेत!! नि काहीहि झाले तरी निवडून येण्यासाठी त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा याचा विचार करताहेत. जगातल्या सगळ्या राजकारण्यांचा एव्हढाच उद्योग.
|
Santu
| |
| Friday, March 28, 2008 - 11:36 am: |
| 
|
अहो टोणगा ब्रिटिशानी यात काय केले तिबेट हा स्वतंत्र भाग होता. भारत स्वतंत्र झाल्यावर तिबेट मधे भारताची वकिलात होती. चिन ने तिबेट गिळंक्रुन्त केल्यावरच हि परिस्थिति पालटलि. पुर्वि आपला राज्दूत तिबेट मधे होता. त्यामुळे तिबेट हा चिन चा भाग नव्हताच. चान्ग कै शेक हा राज्यावर असताना फ़क्त त्याने तिबेट वर आक्रमण केले नव्हते. त्याची राजवट गेल्यावर माओ ने तिबेट वर हल्ला केला हे तुम्च्या गावी हि नाहि वाटते नाहि तर तुम्हि असे म्हटलाच नसता. यात ब्रिटिश कुठुन आले उगिच ढगात गोळ्या मारु नका. आता लामा बुवा काय धर सोड करतील उलट आपले घर काबिज केलेल्या अडेल्तट्टु चिन बरोबर त्याने आत्ता पर्यंत शांततेनिच आंदोलन केले होते. हे आता जे दिसते आहे त्या चिन च्या स्वातंत्र्य पुर्व प्रसव वेदना आहेत. उघिर प्रांतातत्ले मुसल्मानाना सुध्दा स्वतंत्र व्ह्यायचे आहे. चिन च्या हुकुम शाहि ने आज पर्यांत याना बाधुन ठेवले होते पण असे कुठ पर्यांत चालनार. आज ना उद्या हे लोक फ़ुटणार हे निशित्च जसे रुशियाचे झाले तसेच चिन चे होनार.
|
Zakki
| |
| Friday, March 28, 2008 - 3:04 pm: |
| 
|
शिवाय ब्रिटिशांनी काही केले असो. एकदा स्वतंत्र झाल्यावर आपल्या राज्याच्या सीमा आखून घेणे हे आपलेच काम असते. त्यात ब्रिटिशांनी काहि का केले असेना. ते नेहेरू नि त्यांचे चमचे, सगळे लोक म्हणजे राज्य करायला नालायक लोक, त्यात ते गांधी मधे मधे! ब्रिटिश धार्जिणे लोक म्हणत होते ते खरे. स्वतंत्र देश म्हणजे काय नि तो कसा चालवायचा याची अजिबात अक्कल तेंव्हा कुणाला नव्हती! आता जरा तरी फरक पडला असेल अशी आशा आहे. खरे तर भारताने केंव्हाहि उठून आपल्या सीमा पुन: एकदा ठरवल्या पाहिजेत नि बाकीच्या राज्यांची त्याला संमति मिळवली पाहिजे. पण हे करण्यात कुणाच राजकारण्याला पैसे मिळत नाहीत ना? उद्या सगळा भारत चीनच्या ताब्यात गेला तरी मला आश्चर्य वाटणार नाही. थोडे वाईट वाटेल, पण हजारो वर्षे तसेच चालू आहे, मालक वेगळे, गुलाम आपणच!
|
Tonaga
| |
| Friday, March 28, 2008 - 5:20 pm: |
| 
|
झक्कीजी तुमचे प्रतिपादन फारच अतिरेकी स्वरूपाचे असते.सगळ्या स्वतंत्र देशात पहिल्या पिढीत अनुनभवी लोकच असतात. त्यांच्या चुका होणे अपेक्षितच आहे. तुम्ही ज्यांची चमचेगिरी करत असतात ना ते कुठे होते त्या वेळी? त्यानी का नाही त्यांची अक्कल पाजळली? ते तर स्वातंत्र्य युद्धातही नव्हते! त्याना धर्मरक्षणच महत्वाचे वाटत आले. तुम्ही एखादी ग्रामपंचायत चालवून दाखवता का? मग तुम्हाला राजकीय व्यवस्था का असते ते कळेल.तुम्ही तर तिकडे जाऊन बसलेले आहात ना इथल्या नालायक लोकापासून दूर सुरक्षीत? मग इथे काहीही चालो तुम्हाला काय करायचे आहे?. विधवेने कशाला कुंकवाची उठाठेव करावी.? उद्या सगळा भारत चीनच्या ताब्यात गेला तर आम्हीही जाउ चीनमध्ये. तुम्ही तर रहाल ना तिथे सुरक्षीत कुचाळक्या करायला.?तुम्हाला मुळीच वाईट वाटणार नाही उलट तुमची बत्तीशी खरी ठरल्याबद्दल आसुरी आनन्दच होईल तुम्हाला... राज्य करायला नालायक लोक होते तर का नाही भारतात यादवी झाली? का नाही लष्करशाही आली? त्याचा पाकीस्तान का नाही झाला? उगीच उचलली जीभ अन लावली टाळ्याला!!! अन गांधींना शिव्या देण्यासाठीही त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही तुमची. नेहरूंचे जोडे उचलण्याची तरी पात्रता आहे का तुमची?
|
Uday123
| |
| Friday, March 28, 2008 - 6:26 pm: |
| 
|
टोणगे महाषयांचा पारा खुपच चढलेला दिसतो आहे, शांत व्हा पाहु. चिन काही आपल्याला संपुर्ण गिळंकृत करत नाहे, फ़ार-फ़ार तर काठा-काठावर कुर्तडेल पण खिळ-खिळा करायचे प्रयत्न जरुर सोडणार नाही. काही वर्षांपुर्वी जॉर्ज़ म्हणालेच होते की आपला नं.१ चा वैरी कोण आहे ते, काय गहजब माजला होता त्यांच्या वक्तव्यावर. स्वतंत्र झाल्यावर नेते परिपक्व नव्हते, पण आज तरी ६० वर्षानंतर कुठे येते (कुठलाही पक्ष, नेता घ्या)परिपक्वता?
|
परिपक्वता कशाची तेही पहायला पाहीजे. पैसे खाणे याबाबत ते पूर्णपणे परिपक्व झाले आहेत
|
थोडक्यात काय १९४७ साली स्वतंत्र व्हायला व राज्यकारभाराचे शकट हाकायला भारतीय जनता व त्यांचे तथाकथित थोर नेते अपरिपक्व होतो हेच खरे!
|
Santu
| |
| Saturday, March 29, 2008 - 8:29 am: |
| 
|
नेहरुंचि जोडे उचलण्याची पात्रता आहे का))))) असे काय दिवे लावले नेहरुने. सगळि वाट लावुन ठेवलि आहे. चिन बरोबर हरला. कश्मिर घालवला. असे काय दिवे लावले नेहरुने
|
Chyayla
| |
| Saturday, March 29, 2008 - 9:52 am: |
| 
|
ते तर स्वातंत्र्य युद्धातही नव्हते! त्याना धर्मरक्षणच महत्वाचे वाटत आले हा जावईशोध आपल्या सगळ्यांच्या महान त्यागमुर्ती ली(री)डर सोनियानी भाषण वाचताना लावलेला आहे हे तर सगळ्याना माहित आहे त्याला साथ देणारी पिल्लावळही.. कोण ते सांगायची गरज नाही, गोर्या कातडीच्या रीडरनी सांगायचे आणी आम्ही निर्बुद्धपणे कोणताही विचार, वाचन न करता गुलामासारख्या माना हलवायच्या. अहो पण जनता काय ईतकी मुर्ख आहे की असल्या प्रचाराला बळी पडेल? कैच्या कैच. आज मी विविध क्षेत्रातुन, प्रांतातुन आलेल्या ज्याही तरुणाना भेटतो त्यान्ना कोणालाच नेहरु, गांधी पटलेले दिसत नाहीत. हो पण अपवाद माझा एक केरळी ख्रिश्चन मित्र आहे तो म्हणतो भारताला स्वातंत्र्य नेहरुंमुळेच मिळाले.. कारण नेहरु त्या लेडी माउंटबॅटनशी लफ़ड करत होता आणी माउंटबॅटनला यापासुन पिछा सोडवायचा होता, म्हणुन त्याने एकदाचे देउन टाकले स्वातंत्र्य बरे यांचा कांगावा काय असतो तर जे काही स्वातंत्र्य मिळाले ते फ़क्त गांधी, नेहरुमुळे (नेहरु ब्राह्मण होते म्हणुन कुणी सांगितले नाही वाटत याना ) बाकी स्वा. सावरकर, थोर क्रांतिकारक जसे मदनलाल,भगतसिंग,राजगुरु, अशफ़ाक उल्ला खान, चाफ़ेकर बंधु, टीळक, नेताजी, हेडगेवार (जे कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते व जंगल सत्याग्रहात भाग घेतलेले) याशिवाय कित्येक हुतात्मे झालेले जे हसत हसत वंदे मातरम म्हणत फ़ासावर चढले ह्यानी काहीच केले नाही उलट ते वाट चुकलेले देशभक्त म्हणुन त्यांचा बलिदानाचा अपमान करण्यात या नतद्रष्ट, क्रुतघ्न मंडळीना कोण आनंद. याना कोण सांगणार की या वेड्या हुतात्म्यांचा, देशभक्तांचा देव, धर्म केवळ भारतमाता होती, म्हणुन धर्मरक्षण महत्वाचे होते असो हे सोनिया तर सांगणार नाहीच कारण तिला या देशाच्या ईतिहास, संस्कृतीशी काय देणे घेणे लागते. मतलबापुरता भारतिय बहु म्हणुन त्याच भांडवल केले की झाले, आजकाल तर तेही नाटक चालेनासे झाले. तरी काही म्हणा देश स्वतंत्र झाला तो नेहरु, गांधींमुळेच त्यामुळे हा देश म्हणजे त्यांची खाजगी मालमत्ता आहे. बाकी सब झुट त्याना काही बोलायचा अधिकार नाही. असो टोणग्याचे पहिले काही मुद्देसुद पोस्ट वाचुन जरा वाटले होते की हे तरी अभ्यासपुर्ण, जातियतेच्या, संकुचित विचारसरणीच्या थोडे बाहेर असतील, आता का तोल सुटला कोण जाणे, पण मायबोलीवर कोणाला ठोकायचे हे ते ठरवुनच आलेले दिसताहेत. वरुन दुसर्यांच्या नावाने फ़ुकाची बोंब मारायची की मायबोलीवर कोणाला ठोकायचे ते ठरले असते. असो तुम्ही हे असले धाडस केले याच तुम्हाला स्वता:ला फ़ार कौतुक वाटत असेलच. आता भोगा आपल्या कर्माची फ़ळ (तुमच्याच ओकार्या) असो विषयांतराची प्रत्येक बाफ़ला सवयच झाली असते. तिबेट व चिन याच्या संघर्शावर हा एक विवेक मधे प्रसिद्ध झालेला माहितिपुर्ण लेख.
|
Zakki
| |
| Saturday, March 29, 2008 - 5:48 pm: |
| 
|
तुम्हाला मुळीच वाईट वाटणार नाही उलट तुमची बत्तीशी खरी ठरल्याबद्दल आसुरी आनन्दच होईल तुम्हाला... अहो, असे काही होणार नाही! माझा भारत महान, तो परकीयांच्या ताब्यात गेला तर वाईटच वाटेल. गांधींना शिव्या देण्यासाठीही त्यांचे नाव घेण्याची लायकी नाही तुमची. नेहरूंचे जोडे उचलण्याची तरी पात्रता आहे का तुमची? नेहेरूंचे जोडे उचलायला मी कशाला जाऊ? त्यांचे अनेऽक नोकर असतील की! नि गांधींचे नाव घेतो कारण त्यांचा स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळात बराच (बहुतेक सर्व प्रतिकूल) परिणाम झाला होता!! जे पैसे कुठल्याहि कायद्यान्वये पाकीस्तानला द्यायला नको होते, ते द्यावे म्हणून उपोषण काय? 'मुसलमानांनी हत्या केली तरी ती मुकाट सहन करावी', 'देशाची फाळणी माझ्या मृत देहावरच होईल!' 'स्वातंत्र्य मिळाल्यावर मी राजकारणातून निवृत्त होईन' असे म्हणून, नंतर पुन: उपोषणे नि भाषणे करून नेत्यांवर दबाव असली आचरट विधाने नि कृति करणार्या माणसाचा आदर फक्त त्यांच्या वैयक्तिक विचारांबद्दल असू शकतो, नि आहेहि. पण राजकारणात लुडबूड का?
|
Chyayla
| |
| Saturday, April 05, 2008 - 5:30 am: |
| 
|
तिबेटभोवती आज चिनचा पोलादी पडदा मजबुत होताना दिसतोय, तिथले निदर्शने व बळी गेलेली संख्या कशाची व्यवस्थित माहिती बाहेर येउ शकत नाही व जगाला कळतही नाही... बरे कळले तरी त्याचा काय उपयोग होणार? तिबेटच्या आजच्या अनावस्थेचे, अराजकाचे व गुलामगिरीचे मुळ कशात असेल याचा अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे बौद्ध धर्मातील अतिरेकी स्वरुपातील अहिंसा तत्व. कारण तिबेट हा बौद्ध धर्मिय आहे हे सर्वषृत आहे. चिन सारखा राक्षस बाजुला असुनही नेहरु गांधींसारखा अहिंसेची जपमाळ तोही ओढत बसला. त्यामुळे सरंक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष, परीणाम चिनचे आक्रमण खरे तर याचा सारा दोष तिबेटलाच जातो. जणु लांडग्यासाठी आयती कोकरुची शिकार. "देवो दुर्बलस्य घातका:" दुर्बळाना देवही मदत करत नाही. अतिरेकी अहिंसेमुळे क्षात्र तेज असे लयाला गेले की स्वता:चे सरंक्षणही करु शकत नाही. अश्या दुर्बलांचा कोणी वाली नसतो. तुम्हीच बघा दलाई लामांसारख्या व्यक्तिला लांडगा म्हटल्या जातय त्यानी जगाला तिबेट प्रकरणाकडे लक्ष देण्याचे अपीलही केले पण ऐकतोय कोण? चिनच्या भीतीमुळे कोणी त्याविरुद्ध जाण्यास धजत नाही. युनो तर आता हा प्रश्न सुरक्षा समितीतही चर्चेला घेणार नाही म्हणते. जर युनोच अशी वागायला लागली तर दुर्बळ देशानी तक्रार मांडायचे कुठे त्याना न्याय मिळायचा कसा? शेवटी हेच खर ठरत की असल्या दुर्बळाना न्याय मिळत नसतो. केदार, माझ्या ह्या मुद्याचा विचार करुन बघा, तुम्ही म्हणालात भारत त्यावेळी युद्धाच्या तयारीत नव्हता किंवा परवडणारे नव्हते, खरे तर ईथे युद्धाच्या तयारीत नव्हता यापेक्षा सरंक्षणाच्या तयारीत नव्हता आणी याला कारण सरंक्षणासारख्या महत्वाच्या बाबतित दाखवलेली बिनडोक उदासिनता यात दोश कोणाचा? शिवाय १९४८ चे युद्ध हे लादलेले होते व १९५९ ला युद्ध ओढवुन घ्यायचे नव्हते असे तुम्ही म्हणालात. पण त्याचा उपयोग काय? उलट तुमचा दुबळेपणा चिनच्या लक्षात आला व त्याची हिम्मत अजुन वाढली व शेवटी तुम्ही युद्ध ओढवुन घ्या किंवा नका पण साम्राज्यवादी चिनच्या महत्वाकांक्षेला एकप्रकारे खतपाणी द्यायला असला भेकडपणा निश्चितच कारणीभुत ठरला. शेवटी नाही म्हटले तरी युद्ध झालेच व त्यात प्रचंड प्राणहानी व मानहानी जी व्हायची ती झालीच. तुम्ही नेहरुन्ना डोक्यापेक्षा हृदयाने राजकारण करणारे म्हणालात. मला हे विधान अतिशय मिळमिळीत व त्यांचा मुर्खपणा झाकण्याची केविलवाणी धडपड वाटते. (कृपया वैयक्तिक घेउ नका, कारण हे विधान नक्कीच कुण्या नेहरु गांधींचे व त्यांच्या घराण्यांचे पाय चाटण्यात धन्यता मानणार्यान्नी, जोडे उचलणार्याने लिहुन ठेवलेले आहे.) देश चालवायचा म्हणजे डोक्याचेच काम जास्त असते. चाणक्य नितीप्रमाणे वागुन अखंड सावधान राहुनच राज्यशकट हाकणे हे महत्वाचे. आधी स्वता:चे डोके सांभाळा मग हृदयाच्या गोष्टी कराव्या, (सर सलामत तो पगडी हजार..) असे मला वाटते. तुम्ही विचार करुन बघा मी हे हवेतले मनोरे, किंवा भावनेच्या भरात लिहित नाही तर शक्य अशी वस्तुस्थितीच लिहितोय. असो या बौद्ध धर्मातील अतिरेकी अहिंसेमुळे भारताचेही प्रचंड नुकसान झाले व अनेक आक्रमणे व गुलामगिरी ओढवुन घेतलेली होती, पण ह्या मातीच्या संस्कृतीतुन, राखेतुनही नवा जन्म घेउन फिनिक्स पक्षाने उड्डाण करावे त्याप्रमाणे कुठेतरी क्षात्रतेज जागृत झाले त्यातुनच पुढे वीर राजपुत, मराठे, शिख व ईतर अनेक लढवय्या जमाती निर्माण झाल्या व भारताचा ईतिहास केवळ पराभवाचा न होता गौरवशाली संघर्शाचा झाला, असो अश्या गौरवात्मक पराक्रमाला आवश्यक असते ती विजिगिषू वृत्ती, ज्याचा तिबेटच्या व चिनच्या बाबतित भारतिय नेत्यांमधे मात्र पुर्ण अभाव होता.
|
Santu
| |
| Saturday, April 05, 2008 - 2:22 pm: |
| 
|
च्यायला तुझ शंभर टक्के खरे आहे दुर्बळांचे रक्षण परमेश्वर सुध्दा करत नाहि. बुध्दा च्या अतिरेकि अहिंसे मुळे आर्यावर्त कायमचा गमावला.(आत्ताच पाकिस्तान व अफ़्गनिस्तान) तसेच तिबेट चे झाले.
|
Uday123
| |
| Saturday, April 05, 2008 - 2:34 pm: |
| 
|
स्वता:चे डोके सांभाळा मग हृदयाच्या गोष्टी कराव्या, (सर सलामत तो पगडी हजार..) --- सर सलामत तो हृदय हजार... छान विचार मांडलेत, आपण ४७ मधे तर लष्कराला सुट्टी द्यायला निघालो होतो. आपले आजचे धोरण हेही बोटचेपेच आहे, आपल्या राजदुताला (निरुपमा राव) भर मध्य रात्री "समन्स" (या शब्दावर पण वाद आहे) देऊन बोलावुन घेतले जाते, काय तर म्हणे दिल्ली मधे तिबेट समर्थकांनी केलेल्या हंगाम्याबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी. मध्यरात्री बोलावण्याएव्हढी तातडीची अवशक्ता होती? मग आपणही मध्यरात्रीच त्यांच्या दुताला का नाही बोलावले आपण काय्-काय उपाय्-योजना करत आहोत याची माहिती देण्यासाठी? घटना खुप क्षुल्लक आहे पण जश्यास्-तसे हे तत्व पाळले तरच तुमची निगा रखली जाईल. इकडे मुखर्जी साहेब लामांना कडक समज देत आहेत, पण चिन मधे होत आसलेल्या अत्याचारांबद्दल अवाक्षरही नाही. उलट 'अविभाज्य भाग' आहे ही 'जपमाळ'. भुटियाने बाणेदारपणे ज्योती सोबत धावायला नकार दिला आहे.
|
तुम्ही नेहरुन्ना डोक्यापेक्षा हृदयाने राजकारण करणारे म्हणालात. मला हे विधान अतिशय मिळमिळीत व त्यांचा मुर्खपणा झाकण्याची केविलवाणी धडपड वाटते>>>>>> तुला असे का बर वाटते की मी नेहरुंच्या नितीला पांठिंबा देत आहे? मला वाटते मी नेहरुंबद्दल मागे बरेच काही लिहीले होते ते तुझ्या वाचनात आलेले दिसत नाही. असो. त्या वाक्याचा अर्थ आता संदर्भासहित स्पष्ट करुन सांगतो. नेहरु हे ऋद्ययाने विचार करतात याचा अर्थच असा होतो की ते डोक्याने करत न्हवते म्हणजे सारासारविचार बुध्दीला जे पटते त्याचा विरोधात जाउन ते जे त्यांचा ऋद्ययाला वाटते जसे चिन बरोबर युध्द होनार नाही हे त्यांना वाटले व त्यांनी सिमारेषेवरुन जवान काढुन घेतले. आता हे त्यांचे वाटने आहे तु किंवा मी ते ठरवु शकत नाहीत. तेच वल्लभ्भाई पटेल जर पंतप्रधान असते तर त्यांनी ते सैन्य काढले नसते कारण ते डोक्याने विचार करत असत. दुसरे उदा द्यायचे झाले तर ते आपण युध्द जिंकत असताना उगीच तक्रार नोंदवायला युनोत गेले तेच जर युनोत युध्द जिंकल्यावर गेले असते तर पाक व्याप्त काश्मीर हा प्रकारच राहीला नसता. पण त्यांचा ऋद्याला वाटले की युनोत तक्रार केली की सर्व संपले, ते लोक लगेच मदत करुन आपल्याला काश्मीर वापस देतील, ही विचारसरनी डोक्याची असु शकत नाही कारण परिस्तिथीचा विचारच केला गेला नाही. आता तुला कळला का अर्थ त्या वाक्याच्या? आणि हो युध्द टाळने ह्याला जर तु पळपुटा किंवा दुबळा म्हणत असशिल तर तुला शिवाजी राजांनाही पळपुटा म्हणावे लागेल. राजकारणात त्याला रणनिती म्हणतात पण त्या नितीत नेहरुंना यश आले नाही ही गोष्ट निराळी.
|
Chyayla
| |
| Saturday, April 05, 2008 - 11:43 pm: |
| 
|
धन्यवाद संतु, उदय तु जी माहिती दिलीस ते तर होणारच, यात तिबेटवर अन्याय करुन चिनची खुशामदी करणारच, केदार म्हणतात त्याप्रमाणे आपण आज मात्र युद्ध ओढवुन घेउ शकत नाही केवळ बोटचेपेपणाच करु शकतो. तिबेट झाले आता चिनचा डोळा, अरुणाचल, सिक्किम या भारतातल्या राज्यांवर आहेच. ईकडे लालभाई कम्युनिस्ट कारथ मंडळी म्हणतात भारताने तिबेटच्या बाबतित ढवळाढवळ करु नये तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, चिनने काश्मिर बाबतित ढवळाढवळ केलेली चालेल काय? असो ह्यावर नंतर मत मांडेल पण यावर ईतर मायबोलिकरान्ना काय वाटते ते प्रथम जाणुन घ्यायला आवडेल. केदार, मला माहित आहे तुमचा नेहरुंच्या नितीला पाठिंबा नाही, माझ्या लिहिण्याचा काही गैरसमज झाला असल्यास माफी मागतो. तसेच मी तुम्हाला म्हटले होते काही वैयक्तिक घेउ नका ते या सगळ्या कारणांसाठी. दुसरी गोष्ट मी शिवाजी महाराजाना पळपुटा अजिबात म्हणणार नाही कारण त्यान्नी भवानी मातेच्या साक्षिने हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली होती, त्यांचा उद्देश व कृती दोन्ही त्याला पुर्णपणे अनुसरुन होती व त्यापासुन मात्र त्यान्नी कधीच माघार घेतली नाही. पण नेहरुंजवळ वैयक्तितिक स्वार्थापलिकडे, स्वता:चा मोठेपणा दाखवण्यापलिकडे कोणता उद्देश होता? कोणती रणनिती होती? वास्तविक 'रणनिती' हा शब्दही नेहरुंसाठी वापरणे फारच जड जातय व हास्यास्पद वाटतय, कारण त्यांच्यात देशाला आवश्यक अशी नितीच नव्हती, होते ते केवळ ईतरांचे अनुकरण कारण मुळ भारतिय आत्माच नव्हता असल्या व्यक्तिकडुन काय अपेक्षा करणार? दुसरी गोष्ट स्पष्ट करतोय ईतरांचे अनुकरण म्हणजे त्यांच्यातल्या चांगल्या व देशाला आवश्यक गोष्टींचे अनुकरण करण्याचे नक्कीच समर्थन करेल पण तिथेही आवश्यक होता तो म्हणजे मुळ भारतिय आत्मा. शिवाजी महाराज प्रसंग पाहुन माघार घ्यायचे, असली माघार विजयासाठी घेणे कधी कधी आवश्यक असते (यालाच विजिगिषु व्रुत्ती म्हणतात) पण माघार घेतल्यावरही संधी मिळताच त्यान्नी आपले उद्दीष्ट साध्य केले. ईकडे नेहरु मात्र प्रसंग नसताना काही कारण नसताना उगीच भेकडपणे दिवास्वप्न बघत माघार घेत होते भले चिन प्रश्न वा काश्मिर प्रश्न. तुम्ही जे नेहरुंचे उदाहरण दिले त्यातले पहिले काश्मिर, १ / ३ काश्मिर पाकने बळकावल्यावर लोकसभेत शपथ घेतली होती की तो काश्मिर परत मिळवणार.. काय झाले त्या शपथेचे उलट काश्मिर प्रश्न ३७० कलम, लांगुलचालन यामुळे अजुनच स्वता:हुन चिघळवुन घेतला ईतका की अजुनही ३७० कलमविरुद्ध बोलणे पाप आहे. मग आता वाजपेयी सरकार येवो की कुणी येवो त्याला पुर्ण बहुमत मिळवल्याशिवाय काही करणे शक्य नाही. दुसरे उदाहरण तिबेटचे, यात तर त्याना वाटले की तिबेट गिळंक्रुत करण्याच्या (चिनच्या साम्राजवादाला) पाठींबा दिला तर चिन खुष होइल व मित्र बनुन आपल्यालाच फायदा होइल. ह्या मागे केवळ होते दिवास्वप्न व त्यांची वैयक्तिक हेकेखोरी. स्वामी विवेकानंदांचे भाकित तसेच स्वा. सावरकर व गोळवलकर गुरुजी यान्नी नेहरुन्ना पुर्वसुचना देवुनही नेहरुन्नी स्वता:चाच हेका चालवला. परीणाम चिनसारख्या शत्तुला सिमेवर आणुन ठेवले. मला एक सांगा या दोन्ही प्रकरणात कोणती मुत्सद्देगिरी दिसुन येते? तात्पर्य नेहरु व शिवाजी महाराज यांची कोणत्याच दृष्टीनी तुलना शक्य नाही. हेच नेहरु मात्र शिवाजी महाराजाना वाट चुकलेले म्हणत होते, व त्यांची पिल्लावळ तर चक्क लुटारु म्हणत होती, भांडारकर संस्थेवर मोठी मर्दुमकी दाखवत हल्ला करणारे मात्र यांचे पाय चाटताना दिसताहेत याला मात्र शिवभक्ती म्हणायची बरे का खरे शतृ कोण हे अजुन संभाजी ब्रिगेडने ओळखले नाही किंवा ओळखले तरी त्यांच्याशी लढा द्यायची हिम्मत नाही त्यापेक्षा आपल्याच लोकाना विनाकरण काल्पनिक शतृ ठरवुन स्वता: जास्त शिवभक्त दाखवणे यात त्याना मर्दुमकी वाटते अश्या संस्थेच देव भल करो. असो याबाबतित वेगळा फलक काढण्याची सुचना आली होती ती खरच चांगली आहे, तरी ईथे मुद्यामुळे याचा उल्लेख झाला परत त्यावर ईथे वाद नको व मुळ विषय चालु द्यावा ही ईच्छा.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|