|
Bee
| |
| Wednesday, January 31, 2007 - 11:16 am: |
| 
|
नेमस्तकांनी हा बीबी सुरु करुन दिल्याबद्दल त्यांचे मनःपुर्वक आभार. तणावाखाली येऊन दारू, सिगारेट, विडी, पान - तंबाखू ह्या सवयींची सोबत धरुन आयुष्य कंठणार्या व्यक्ती तुम्ही आम्ही सर्वांनीच बघितल्या असतील. एक वेळ अशी येऊन ठेपते की फ़क्त ती सवय आणि ती व्यक्ती हे दोघेच उरतात. आपण कितिही मार्गदर्शन केले तरी ते त्यांना लागू पडत नाही इतकी ती व्यक्ती व्यसनाच्या अधीन झालेली असते. म्हणतात ना 'मनुष्य सवयीचा गुलाम' आहे हे अगदी सत्य आहे. व्यसनी व्यक्तीला हे उमगत असते की आपले ह्यात काहीच भले पण ती मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. शेवटी ती व्यक्ती तर जीवनातून उठतेच पण तिच्यासोबत तिच्या कुटुंबियांचे देखील हाल होतात. हा प्रश्न जरी तुमच्या आमच्या घरचा नसेल तरी तो आपल्याच समाजातील आहे आणि त्याला आपणच सामोरे जाऊन त्या व्यक्तीला वाचवायला पाहिजे असा दृष्टीकोन जर ठेवला तर अनवधनाने समाजासाठी आपण खूप काही चांगले कृत्य करु शकू. व्यसन न आवडणार्या व्यक्ती व्यसनी व्यक्तीचा राग करतात आणि त्यांच्यापासून दूर राहतात पण असे जर आपण दूर राहिलो तर त्या व्यक्तीला समजवून कोण सांगेल. त्यापेक्षा दादापुता करुन त्या व्यक्तीला थोडे डोस दिलेत, वारंवार त्याला समजवून सांगितले तर ती व्यक्ती कदाचित व्यसनातून बाहेर पडू शकेल असे मला वाटते. निदान १० पैकी एक व्यक्ती तरी त्या व्यसनातून मुक्त होईल. हल्लीच आपण युवराज शेखर ह्या व्यक्तीला खूप छान समजवून सांगितले. तो बीबी अगदी आदर्शवादी झाल्यासारखा वाटतो मला. ह्या बीबीचे प्रयोजन अगदी सिमित आहे की अशा लोकांकरिता आपण काय करू शकतो. आपल्याच आजूबाजूला असणार्या व्यसनी लोकांवर आपण कशारितिने प्रभाव पाडू शकू? ती व्यक्ती जर आपला मित्र असेल तर त्याला उपदेश करणे मदत करणे अगदी सहजशक्य आहे पण जी व्यक्ती आपण ओळखत नाही पण ती आपल्याच अवतीभोवती असते अशा व्यक्तीसाठी आपण काहीतरी करायला हवे असे मला वाटते. कदाचित माझे पोष्ट खूप विस्कळीत झाले असेल पण माझे म्हणने तुम्हाला कळले असेल अशी अपेक्षा.
|
Shonoo
| |
| Wednesday, January 31, 2007 - 1:26 pm: |
| 
|
नुकतेच कोणाच्या तरी घरी 'ग़ौरी आठवणीतली' हे पुस्तक चाळले. गौरी देशपांडे यांच्या बद्दल, त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या चाहत्यांनी, परिचितांनी लिहिलेले लेख आहेत. मी आता पर्यंत फक्त आहे हे असं आहे आणि तेरुओ ही दोन पुस्तकं वाचली होती आणि इथली त्यांच्याबद्दलची चर्चा. त्या पुस्तकात त्या Cirrhosis of liver ह्या अति मद्यपानाने होणार्या रोगाने वारल्याचा उल्लेख वाचला. नक्की काय वाटलं ते नेमकं शब्दात नाही सांगता यायचं पण राग आला, थोडी कीवही वाटली, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांबद्दल आनी इतर गोतावळ्याबद्दल 'असे कसे हे लोक' असं ही वाटलं. इतक्या accomplished, talented व्यक्तीने अशा रितीने स्वत:चा अंत ओढवून घ्यावा याबद्दल कमी पणाही वाटला. या सर्व वाटण्यामधे त्यांच्या लेखनाचे, कर्तृत्वाचे इतर पैलू त्या पुस्तकात पहिल्यांदा वाचले ते सर्व झाकोळून गेले. गौरी सारख्या सुशिक्षित, सुस्थितीत असलेल्या, चिकार मित्र-मैत्रिणी आप्तेष्टांचा गोतावळा असलेल्या व्यक्तीने अशी अखेर ओढवून घ्यावी आणि त्याबाबत इतरांनी काही केलं असेल तरी त्याला यश येऊ नये असं का व्हावं?
|
Pooh
| |
| Wednesday, January 31, 2007 - 3:03 pm: |
| 
|
shonoo गौरी देशपांडे अतिरिक्त मद्यपान करत होत्या की नाही हे मला माहित नाही. पण सिर्होसिस फक्त अल्कोहोल प्यायल्यामुळेच होतो असे नाही. त्याची इतरही कारणे असू शकतात. check this out. http://digestive.niddk.nih.gov/ddiseases/pubs/cirrhosis/ माझा एक ex-boss teetotaler असूनही sirhosis मुळे गेला.
|
Laalbhai
| |
| Wednesday, January 31, 2007 - 3:13 pm: |
| 
|
ह्या बीबीचे प्रयोजन अगदी सिमित आहे की अशा लोकांकरिता आपण काय करू शकतो. >>> कोणतीही व्यसनाधीनता हे गमावलेल्या आत्मविश्वासाचे लक्षणही असू शकते. तणाव नसतानाही व्यसनाच्या आहारी जाणारी उदाहरणे आहेत. एकंदरितच मानसिक अवस्थेचा व्यसनाशी जवळचा संबंध आहे, असे माझे निरिक्षणातून आलेले मत आहे. त्यासाठी मनसोपचारांची नितांत आवश्यकता आहे. तो माझ्यामते एक फार उपयुक्त मार्ग आहे. एक जुने गाणे आहे. आमच्या काळातले. "इस शहर मे हर शक्स परेशानसा क्यों है". ही अवस्था दूर करण्यासाठी मानसोपचारांची गरज आहे. बाकी योगासनांनीही आत्मविश्वास येतो, असे म्हणतात. त्याविषयी मला कल्पना नाही. मुक्तांगण ही संस्था चांगले काम करत आहे. तसेच alchoholic anonymous (?)अशीही एक संस्था आहे पुण्यात. तेही चांगले करतात. त्यांच्यापैकी कुणी असेल तर त्यांचे उपाय इथे लिहिल्यास फायदा होईल.
|
Zakki
| |
| Wednesday, January 31, 2007 - 4:45 pm: |
| 
|
कोणतीही व्यसनाधीनता हे गमावलेल्या आत्मविश्वासाचे लक्षणही असू शकते. तणाव नसतानाही व्यसनाच्या आहारी जाणारी उदाहरणे आहेत. एकंदरितच मानसिक अवस्थेचा व्यसनाशी जवळचा संबंध आहे, असे माझे निरिक्षणातून आलेले मत आहे. त्यासाठी मनसोपचारांची नितांत आवश्यकता आहे. तो माझ्यामते एक फार उपयुक्त मार्ग आहे. १०० टक्के अनुमोदन!
|
Shonoo
| |
| Wednesday, January 31, 2007 - 6:34 pm: |
| 
|
त्या पुस्तकात एखाद्-दोन लोकांनी ओझरता, संदिग्ध उल्लेख केलाय की त्यांनी स्वत:ची अखेर स्वत:च ओढवून घेतली. आणि कुणीतरी त्यांच्या मद्य पानाचाही उल्लेख केला आहे. ते पुस्तक मी शोधलं पण मला ( विकत घ्यायला ) मिळालं नाही.
|
Bee
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:25 am: |
| 
|
मला मुक्तांगण संस्थेबद्दल खूप काही माहिती नाही. मला वाटतं अनिल अवचटांनी चालवलेली आहे ही संस्था. वर्ध्यात मी खूप दारुडे बघितलेत. अभय बंग ह्यांनी गढचिरोलीला SEARCH मधे व्यसनमुक्तीचे पण कार्य हाती घेतलेले आहे. सोबत राणी बंग आहेतच. हे दांपत्य खरच simply GREAT आहे. शोनू, ह्या लेखिका गौरीबाई वयाच्या ६०व्या वर्षी गेल्यात. इरावती बाई म्हणजे त्यांच्या आई ६७व्या वर्षी गेल्यात. मला वाटतं दोघींच वय इतकही काही कमी नव्हतं. गौरींची एक विचारसरणी होती की, जे पुर्वी स्त्रियांनी केले नाही किंवा पुरुषांनी तिला करु दिले नाही ते स्त्रिपुरुषांच्या नाक्कावर टिच्चून करायचे. पण एखाद्या लेखकाचे व्यक्तिगत जीवन आणि त्याची पुस्तके, एकत्र करु नये.
|
Yogy
| |
| Thursday, February 01, 2007 - 5:27 am: |
| 
|
गौरीबाईंनी आपले पिणे कधीही जगापासून लपवले नाही. त्या दुकानात दारूची बाटली घ्यायला जात तेव्हा दुकानदार बाई आहेत म्हणून बाटली कागदात वगैरे गुंडाळून देत असे. तर गौरीबाई, "अहो मला प्यायला लाज वाटत नाही, तुम्हाला विकायला कसली लाज वाटते?" असे म्हणत असो... मुक्तांगण संस्थेची माहिती www.muktanga.org वर सापडेल.
|
Yogy
| |
| Thursday, February 01, 2007 - 5:34 am: |
| 
|
श्री.दा.पानवलकर हे मद्यपानामुळे अकाली गेलेले अजून एक लेखक. त्यांच्या कथेवर आधारित अर्धसत्य हा चित्रपट छान होता
|
Ajjuka
| |
| Thursday, February 01, 2007 - 5:43 am: |
| 
|
यशवंत दत्त, प्रशांत सुभेदार आणि लक्ष्मीकांत बेर्डे.. अतिमद्यपानामुळे अकाली गेलेली गुणी माणसे
|
Ajjuka
| |
| Thursday, February 01, 2007 - 6:00 am: |
| 
|
एक जुने गाणे आहे. आमच्या काळातले. "इस शहर मे हर शक्स परेशानसा क्यों है". ही अवस्था दूर करण्यासाठी मानसोपचारांची गरज आहे. दुर्दैवाने ही नुसती मानसिक अवस्था नाहीये. Urban reality आहे. सलमान रश्दीच्या 'हरून ऍन्ड सी ऑफ स्टोरीज' या कादंबरीची सुरूवात 'There was a sad city. A city so invariably sad that it leaked sadness through taps...' असे काही वाक्य आहे. माझ्यामते प्रत्येक मेट्रोसिटीला ते लागू पडते. गेल्या पिढीपेक्षा stress levels आणि प्रकार दोन्ही वाढलेय असे विधान केले तर चुकीचे ठरू नये. आणि आमची पिढी मानसिकरित्या गेल्या पिढीपेक्षा किंवा निदान आमच्या आजीआजोबांच्या पिढीपेक्षा तरी कैक पटीने कमकुवत आहे हेही विधान चुकीचे ठरू नये. म्हणून प्रत्येक जण कसला ना कसला तरी आधार शोधतो. व्यसन शोधतो. दारू, फुंकणे हे काही जण जवळ करतात. तर काहीजण बुवाबापू. कुठलं व्यसन जास्त घातक माहीत नाही. असो... मानसोपचारांची गरज तर खरेच पण घोळ असा होतो की generally व्यसनाधीन असणारी सुशिक्षित, मुख्यतः कलाकार मंडळी.. इतकी sensitive आणि इन्तेल्लिगेन्त असतात (त्यामुळेच तर व्यसनाच्या अधीन होतात) आणि मग त्यांच्या बुद्धिपुढे counselors कमी पडतात कारण हे लोक आपलीच एक unbeatable and logical philosophy मांडतात.. जी चुकीची आहे कळत असूनही युक्तिवाद शक्य होत नाही. Rehab मधे तिसर्यांदा गेलेल्या आणि सध्या तिथेच असलेल्या अत्यंत जवळच्या मित्राचा हा किस्सा कालच ऐकलाय. खुप त्रास झाला.. असो..
|
इथे काहीतरी चान्गल लिहिलच पाहिजे.....! पण त्या आधी मला एक सान्गा कुणीतरी, की "अती मद्यपान" यातिल "अतीची" व्याख्या काय करावी? अतीचे प्रमाण कशा सापेक्ष किती असावे? माझ्या माहितीप्रमाणे कुन्डली मधे "व्यसनाधीनतेचे" योग व कसले व्यसन केव्हा हे पट्टीचे ज्योतिषी खात्रीपुर्वक सान्गु शकतात! मूडीऽऽऽ तुम कहां होऽऽऽ?????
|
Bee
| |
| Thursday, February 01, 2007 - 6:43 am: |
| 
|
मानसोपचारांची गरज तर खरेच पण घोळ असा होतो की generally व्यसनाधीन असणारी सुशिक्षित, मुख्यतः कलाकार मंडळी.. इतकी sensitive आणि इन्तेल्लिगेन्त असतात (त्यामुळेच तर व्यसनाच्या अधीन होतात) आणि मग त्यांच्या बुद्धिपुढे counselors कमी पडतात कारण हे लोक आपलीच एक unbeatable and logical philosophy मांडतात.. जी चुकीची आहे कळत असूनही युक्तिवाद शक्य होत नाही.>> EXACTLY!!!! LT- व्यसन हे अति तेंव्हाच होते जेंव्हा तुम्हाला त्याची सारखी सारखी गरज भासायला लागते. शौकपाणी म्हणून तुम्ही दारू चाखली विडी ओढली ह्यात काही गैर नाही. पण दारुपाण्याची गरज भासणे विडी शिवाय काहीही न सुचने म्हणजेच तुम्ही 'अति' ह्या स्तराला पोचलात. व्यसनाला आणखी एक कारण म्हणजे अयोग्य संगतगुण, अयोग्य मित्रमंडळी. कारणे कैक असतील. पण आपण काय करू शकतो? काही करु शकतो का इथून मला विचार करावासा वाटतो. खूप दुरचे नाही माझ्या सुसंस्कृत आत्याचा मुलानी लग्न केले, त्याला लेक झाली. सध्या बायको माहेरी राबते आहे, शेतात कापूस वेचायला जाते म्हणे. ह्या मुलाचा कुठेच ठावठिकाणा नाही. कुठल्याही नातलगाकडे हा जातो, पैसे उकळतो आणि पितो. परत नवे नातलग, नवे मित्रदोस्त आणि गावाचे बदलने. आज इथे उद्या तिथे. घरात चांगली प्रेमळ माणसे असताना मुलगा असा हातचा गेला ह्याचे आत्याला मला सर्वांनाच वाईट वाटते आहे. सर्वात मोठी काळजी म्हणजे त्याच्या बायकोचे आणि मुलीचे पुढे काय होईल ह्याची. त्याचे वय फ़क्त २९ आहे. म्हणूनच मागे मी इथे एकदा लिहिले होते भारतीय माणसाने दारुपासून दूरच रहावे. फ़्रेंच लोक दारू पितात पण त्यांचे पिणे मर्यादीत असते. ही Fashion झाली. आपल्याकडे दारू पिणे ही विकृती झाली. कारण पिणार्याला किती प्यावी ह्याचे भान रहात नाही.
|
Bee
| |
| Thursday, February 01, 2007 - 6:48 am: |
| 
|
मीना कुमारी, गुरुदत्त सारखे जन्मजात कलाकार देखील दारूमुळेच गेलेले आहेत. गुरुदत्तने म्हणे दारुचा डोस जास्त घेतला होता व त्या नशेतच त्यानी झोपेच्या गोळ्या अधिक घेतल्या.
|
बी, तू दिलेली "अतीची" व्याख्या बरोबर वाटती हे! पण काय हे ना? मी अनुभव आणि अनुभुती शिवाय काहीच भाष्य करीत नाही.....(त्यासाठी बुधवारला जावे काय त्यान्च्या वन्शात???) DDD एनिवे, माझे सर्व अनुभव आणि अनुभुत्या आता एकत्रित पणे आठवुन मग इथे लिहितो! 
|
Yogy
| |
| Thursday, February 01, 2007 - 9:31 am: |
| 
|
मद्यपान करणारी व्यक्ती काही दिवसांनी अशा परिस्थितीला पोचते की मद्यसेवन केल्याशिवाय ती सामान्य-अवस्थेत राहू शकत नाही. हा एक प्रकारचा विकार आहे ज्याला अल्कोहोलिझम (मराठी प्रतिशब्द माहिती नाही) म्हणतात. http://www.counseling.caltech.edu/drug/selftest/test1.html ही चाचणी देऊन तुम्ही "बेवडे" आहात का याची खात्री करून घेऊ शकता. भोली सुरत दिल के खोटे वाले भगवानदादा हे अल्कोहोलिझमचे शिकारी होते. ते दारू न प्यायल्यावर नशेत असल्यासारखे व दारू प्यायल्यावर नॉर्मल असत.
|
Shonoo
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:46 pm: |
| 
|
काशीनाथ घाणेकर व बबन प्रभू यांच्याबद्दलही असेच ऐकले होते. माझ्या ओळखीत ऐकण्यात अलीकडे VRS घेऊन आराम करण्याची, नवा बिझनेस सुरू करून भरपूर पैसे कमावण्याची अशी वेगवेगळी स्वप्ने पाहणारी एक्-दोन मंडळी दुर्दैवाने याच वाटेने चालली होती/ आहेत. घरच्यांचे attitude चुकते, का प्रयत्न कमी पडतात काही कळत नाही :-( कोणी अनुभवाचे चार शब्द सांगतील तर निदान तसा प्रयत्न करून बघता येईल.
|
Rmjadhav75
| |
| Thursday, February 01, 2007 - 12:49 pm: |
| 
|
मद्यपान करणारी व्यक्ती काही दिवसांनी अशा परिस्थितीला पोचते की मद्यसेवन केल्याशिवाय ती सामान्य-अवस्थेत राहू शकत नाही योगी, मी तुमच्याशी एकदम सहमत नाही!!! कारण, मी असे बरेच दारुडे पाहीलेत जे एके काळी भरपुर दारु पित होते (आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त) आणि आज गेली १०-१५ वर्षं ते लोक पुर्ण निर्व्यसनी आहेत. योगी, माफ करा पण आपले हे विधान दारु सोडणर्यांना निराश करणारे आहे.
|
Zakki
| |
| Thursday, February 01, 2007 - 2:37 pm: |
| 
|
१२ fl oz. बीअर, ५ fl oz. वाईन, आणि 1.5fl oz. ८० टक्के अल्कोहोल (व्हिस्की इ.), म्हणजे एक 'Drink' . अशी दोन Drinks पुरुष, नि एक Drink स्त्रिया दररोज safely घेऊ शकतात असे माझ्याजवळच्या पुस्तकात म्हंटले आहे. (१ fl. oz. म्हणजे २९.५ मिलि लिटर.) याचा अर्थ पुरुषांनी दररोज २४ फ्ल. औ. बीअर, किंवा १० फ्ल. औ. वाईन किंवा ३ फ्ल. औ. ८० प्रूफ़ मद्य घेतले तरी ते सेफ असते. असे या डॉक्टरचे म्हणणे आहे. यावर वाद घालण्याइतकी अक्कल मला नाही, तेंव्हा मानायचे तर माना. सेफ म्हणजे प्रकृतिवर वाईट परिणाम होत नाही नि जे काय दारू प्यायचे फायदे होतात म्हणतात ते होतात. दारू पिऊन फायदा होत असला तरी तोटा इतका मोठा भयंकर आहे की त्याचा पण विचार करावा. तो तोटा असा की व्यसन लागणे. फार कमी लोक व्यसन लागू देत नाहीत. त्यांची तब्येत कदाचित् एरवीच चांगली असेल, तर त्यांना दारू पिण्याची गरजच नाही, तब्येतिसाठी. एक आणखी वाईट प्रकार म्हणजे दररोज जरी नाही प्यायले दोन चार आठवड्यानि एकदा एकदम चार ड्रिंक्स घेणे हे सुद्धा चांगले नाही. त्याला बिंज ड्रिंकिंग म्हणतात, नि तेहि alcoholism समजले जाते. इथे एक चांगला नट विल्यिअम होल्डन हा असाच घरात एकटा असताना दारू खूप प्यायला, नि दुर्दैवाने खाली पडताना टेबलाच्या कडेवर त्याचे डोके आपटले. जखम मोठी नव्हती, पण वेळीच उपचार करायला कुणि नसल्याने रक्तस्रावाने तो मेला! हा भयंकर प्रकार ऐकल्यावर माझे तर पिणे एकदम आटोक्यात आले.
|
Yogy
| |
| Thursday, February 01, 2007 - 5:28 pm: |
| 
|
योगी, माफ करा पण आपले हे विधान दारु सोडणर्यांना निराश करणारे आहे. क्षमा करा पण माझा तो हेतू नव्हता... दारू पिण्यामुळे ती व्यक्ती दारूच्या इतकी आहारी जाते की ती सामान्य जीवन जगू शकत नाही असं माझं म्हणणं होतं... त्यामुळे दारू पिणं हे वाईट आहे. संसारा उद्ध्वस्त करी दारू... बाटलीस स्पर्श नका करू
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|