Shravan
| |
| Wednesday, February 27, 2008 - 10:29 am: |
|
|
गजानन, अगदी बरोबर! तो धडा 'हृदयाची श्रीमंती'च होता आअणी तू तो संदर्भ बरोबर दिला आहेस. मला फक्त तो राजाभिकारीदान असे काहिसे आठवत होते. (मी केवढा चुकीचा संदर्भ दिला होता ) नाताळचे दिवस पु.लं. चा होता का? नववीला मराठीमध्ये बखरीतला काही भाग होता पहिल्याच धड्यात. 'ऐसे मारा जाहला कि जैसे भडभुंजे लाह्या भाजतात' अशी काही वाक्ये आठवतात. आणी हिंदीमध्ये तो एक थरारक वर्णन असलेला धडा होता. लेखक आणी त्याचा धाकटा भाऊ वडिलांची पत्रे घेऊन टाकायला जातात. रस्त्यात विहीर असते कि ज्यात नाग पडलेला असतो व त्या मुलांचा त्याला वरुन डिवचणे हा दररोजचा खेळ असायचा. पत्रे नेमकी विहिरीत पडतात. लेखक मग दोराने खाली उतरून नागाच्या समोरुन पत्रे ऊचलतो. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार एकच छोटा भाऊ. थरारक वर्णन होते. पाचवीला गुंड्याभाऊ, चिमणरावांचा धडा होता. चिमण जुनी गाडी विकत घेतो आणि मग त्याच्यातून घडलेल्या गमतीजमती. हिंदितली एक कविता पण आठवते. (इ.६वी बहुतेक). सकाळचे वर्णन असलेली. 'चिडियाने भी चहक सुनायी, मुर्गे ने कुकडू का डेरा(?)' छ्या, बरेच विसरायला झाले आहे. माझी दहावी ९४ ची. माझ्या एक वर्ष नंतर अभ्यासक्रम बदलत होता बहुतेक.
|
Zakasrao
| |
| Wednesday, February 27, 2008 - 12:37 pm: |
|
|
श्रावण अभ्यासक्रम १९९६ साली बदलला. आमची पहिलीच बॅच त्या अभ्यासक्रमाची. आम्हाला नववी आणि दहावीला तुझ्या अभ्यासक्रमापेक्षा वेगळा होता. त्याच्या आधीचा सारखाच होता. मग माझ्यानंतर दोन की तीन वर्षानी मागचे अभ्यासक्रम बदलत येत होते. जसे की मी आठवीत असताना ५ वीचा बदलला अस. मी तरि देखिल जुन्या अभ्यासक्रमातले काही धडे वाचले आहेत माझ्या आवडीमुळे. सुट्टीत मावसभावांची पुस्तक घेवुन वाचायचो. तुमच्या वेळी इंग्रजीमध्ये कथा असायच्या. आम्हाला नववीपासुन ती पद्धत बदलली आणि कम्युनिकेशन स्कील वर जास्त भर होता. पत्रे विहिरित पडलेला धडा आठवला रे. खरच थरारक होता. मराठीत असे होते बहुतेक त्यात "अखेर सायकलने जिंकल" असा एक होता. त्यात स्वातंत्र्य चळवळीत असलेल्या एका स्त्रीला तुरुंगातुन सोडवण्यासाठी तिच्या सहकार्यानी केलेली धडपड आणि शेवटच्या सायकलच्या प्रयत्नात आलेले यश असा गाभा होता त्याचा.
|
Sonalisl
| |
| Wednesday, February 27, 2008 - 6:43 pm: |
|
|
हो ९६साली बदलला. माझ्या नंतरच्या बॅचला नवीन अभ्यासक्रम होता. त्यातले धडे पण छान होते. मी माझ्या बहीणीची पुस्तके वाचली होती. नवीन वर्ष सुरु झाले कि सर्वात आधी भाषा पुस्तके वाचून कढायचे ते मशानातलं सोनं, तो टोमटो चा धडा वाचून फ़ार वाईट वाटले होते मला.
|
Sayuri
| |
| Wednesday, February 27, 2008 - 9:48 pm: |
|
|
श्रावण, कुमारभारतीतला तो बखरीचा धडा मला पण आठवतोय...ते भडभुंज्यांचं वाक्य संदर्भासहित स्पष्टिकरणासाठी असायचं बहुतेक...शाळेचे दिवस आठवले.....मराठीची सर्व पुस्तकं ठेवायला हवी होती.. दहावीसाठी स्पेशल 'दहावी दिवाळी' किंवा दोन्ही मुले दहावी-बारावी या दोन्ही बोर्ड परीक्षांमध्ये प्रथम आलेल्या डॉ. अरुण हतवळण्यांचं 'यशवंत व्हा' पुस्तकही आणल्याचं आठवतय..
|
आप मेला, जग बुडाले, आबरु जाते वाचतो कोण. आपेश मरणाहुन वोखटे----करा बर संदर्भासहीत स्पष्टीकरण * या धड्याच नावही आपेश मराहुन वोखटे असच होत--भाऊसाहेबांची बखर मधील उतारा आहे तो
|
Shravan
| |
| Thursday, February 28, 2008 - 8:02 am: |
|
|
मनिषा, क्या बात है! तोच धडा.. 'आपेश मरणाहून वोखटे'. नववीला गांधीजींचा पण धडा होता. त्यात अहिंसा कशी योग्य याबद्दल सांगीतले होते. 'साळंत जायचं ' आठवतो का? झोंबी मधून घेतला होता बहुतेक. की लक्ष्मण मानेंचा होता? झकास, सायकलने जिंकले आठवते आहे रे. बहुतेक शिरुभाऊ लिमये आणी कंपू बद्दल असावा. 'लाल चिखल' वाचायला वाईट वाटायचे खरोखर! सातवीला इंदिरा गांधींचा परदेशी बाहुली जाळल्याचा धडा होता. परदेशी मालाची होळी केल्यावर, इंदिराला एक पाहुणे विचारतात कि तिची बाहुली पण परदेशी आहे तिचे काय? तेव्हा नंतर इंदिराजी जड अंतकरणाने पण खंबीरपणे ती लाडकी बाहुली पण जाळतात.
|
Meggi
| |
| Thursday, February 28, 2008 - 9:17 am: |
|
|
बी, रझिया पटेल यांचा धडा होता. हुंड्याच्या प्रश्नावर आणि स्त्रीयांच्या बाकी प्रश्नावर लिहिलं होतं त्यांनी.
|
Bee
| |
| Thursday, February 28, 2008 - 3:02 pm: |
|
|
yes yes Meggi, u r right!!!!
|
Chandya
| |
| Thursday, February 28, 2008 - 3:10 pm: |
|
|
मनिषा, दत्ताजी शिंदे, पानिपतची लढाई. बरोबर का?
|
हो हो अगदी बरोब्बर चंद्या
|
meggi रजिया पटेल यांच्या धड्याचे नाव ' जोखड ' . श्रावण, झोंबी मधून घेतलेल्या धड्याचे नाव ' पाटी आणि पोळी ' आणि त्या धड्याचे लेखक आनंद यादव आहेत.
|
हो हो जोखड. आणि विद्या बाळ यांचाही त्याच पुस्तकात[म्हणजे ९ वी की १० वी]साधारण अशाच विषयावर होता. आणखी एक धडा होता "साळंत जायचं" दादा धर्माधिकारी यांचा एक धडा होता, त्यात एका माणसाकडे इतकी अंथरुणे असतत की तो रात्रभर गाद्याच घालत रहातो आणि मग सकाळ होते त्याचे झोपायचे राहुनच जाते--इथे असतो तांत्रिक प्रश्न. आणि काहींकडे अंथरुणच नसत.समानता-मानवता अशा काहीह्सा नावाचा तो धडा होता.
|
Kiran
| |
| Saturday, March 01, 2008 - 3:36 am: |
|
|
कोणाला इन्ग्लिशचे धडे आठवतायत का? म्हणजे मराठी मिडियमवाल्यांचे इन्ग्लिश हो! मला खालचे २ धडे स्पष्ट आठवतायत दहावीला होते. १९८८ १. Magic of 99 २. Orpheus & Eurydice ह्यातली पहिली savings बद्दल होती आणि दुसरी अधुरी प्रेमकहाणी. म्हणजे आत्ताच्या झी मराठीतली नव्हे तीपण सन्पली म्हणा. हुश्श! हा तर ही गोष्ट आपल्या सत्यवान सावित्रीसारखी पण बहुतेक उलटी (आठवत नाही) त्यात यम का कोण तो त्या Orpheous ची बायको परत करतो पण एका अटीवर की त्याने पृथ्विवर जाईपर्यन्त मागे वळून पहायचे नाही अशी आणि हा येडपट शेवटी मागे वळून बघतो अशी काहीतरी चू.भु.द्या.घ्या.
|
Kiran
| |
| Saturday, March 01, 2008 - 3:42 am: |
|
|
आणि हो एक हिन्दी धडा. त्यातले एक वाक्य खुप touching होते ते अजुनही आठवतेय. कोणा गरीब बाइची गोष्ट असते. एका चान्गल्या घरातली मुलगी एकदा एकादशीच्या दिवशी तिला विचारते की तुझा उपवास नाही का? तेव्हा ती म्हणते "आज क्या है? जिस दिन खानेको नही मिला उस दिन उपास ही तो है|"
|
किरण, तो चोरघड्यांचा (अद्याक्षर आठवत नाहित) धडा होता 'अम्मा' कि असच काहितरि चरित्रनायिकेच नाव होत. इंग्रजितिल ५-७ (मराठि माध्यम) characters छान होते सीता, गोपाळ, लीला, अहमद, यास्मिन, गणपत आणि त्यांचा मुम्बईला रहाणारा मित्र कृष्णा. Orpheus & Eurydice चि गोष्ट पुढे जी एंच्या 'पिंगळावेळ' मध्ये वाचलि होति. मराठित सहावित लक्ष्मिबाइ रानड्यांच्या आत्मचरित्रातला भाग होता त्या बंगालि भाषा शिकल्या त्याबद्दल. तसच ६७ 'समाधि' नावाचि सुंदर कविता होति.
|
किरण, तो चोरघड्यांचा (अद्याक्षर आठवत नाहित) धडा होता 'अम्मा' कि असच काहितरि चरित्रनायिकेच नाव होत. इंग्रजितिल ५-७ (मराठि माध्यम) characters छान होते सीता, गोपाळ, लीला, अहमद, यास्मिन, गणपत आणि त्यांचा मुम्बईला रहाणारा मित्र कृष्णा. Orpheus & Eurydice चि गोष्ट पुढे जी एंच्या 'पिंगळावेळ' मध्ये वाचलि होति. मराठित सहावित लक्ष्मिबाइ रानड्यांच्या आत्मचरित्रातला भाग होता त्या बंगालि भाषा शिकल्या त्याबद्दल. तसच ६७ 'समाधि' नावाचि सुंदर कविता होति.
|
इंग्रजीत एक धडा होता "मंथरक" नावाचा. तो विणकर असतो आणि देवाकडे तो वर मागतो कि त्याला अजुन दोन हात हवेत वगैरे आणि देव त्याची इCचा पुरी करतो. एक होता "ब्युटी अन्ण्ड द बिस्ट" हा दोन भागात होता. हिंदीतला एक आठवतोय " चुडीवाले बाबा. ते तोंडातुन कधीही अपशब्द काढायचे नाहीत.
|
Zakasrao
| |
| Saturday, March 01, 2008 - 1:41 pm: |
|
|
मंथरकाचा धडा वाचुन वाइट वाटले होते. मनिषाने उल्लेख केलेले सगळे धडे आठाव्ले. मराठेमोळी यानी उल्लेख केलेले धडे यास्मीन सीता गोपाल हे आअम्च्या नंतर जो अभ्यासक्रम बदलत आला होता त्याना होते किरन यानी उल्लेख केलेले धडे माझ्या अभ्यासक्रमात नव्हते पण मी त्याची मराठीत भाषांतरे वाचली आहेत गाइड मच्ये मॅजिक ऑफ़ ९९ हा बचती बद्दल होता. त्या खाली उल्लेख केलेल्या धड्यात तो काहितरी वाद्य वाजवत असे असा उल्लेख होता. अजुन त्याच अभ्यासक्रमात होता तो म्हणजे अलिबाबा चाळीस चोर.
|
Bee
| |
| Saturday, March 01, 2008 - 2:41 pm: |
|
|
Magic of 99 was the first lesson in english textbook and who was shakar? was the first question in that lesson :-)
|
Zakasrao
| |
| Saturday, March 01, 2008 - 3:37 pm: |
|
|
he first question in that lesson>>>>>>> बी तुला प्रश्न आठवत आहे ह्यात नवल ते काय???
|