|
वा! सोनाली, किती वर्षांनी बहिर्वक्र त्रिकोणातले हे चित्र बघतोय! मी मागे या पोस्टमध्ये या चित्राबद्दल लिहिले होते. सगळे वाचताना मस्तच मजा येतेय..! पाचवीला एक कविता होती बहुतेक 'वासरू' नावाची. सुरुवात अशी होती, ओढाळ वासरु रानी आलं फिरू कळपाचा घेरू सोडुनिया मोकाट मोकाट पिसाट पिसाट दिसेल ती वाट धावू पाहे पाचवी की सहावीच्या इंग्रजीच्या पुस्तकात एक धडा होता. त्यातली सगळी 'ष्टोरी' आठवत नाही. पण त्यात एक कोंबडीचे छोटे पण बुद्धिमान पिल्लू असते. ते एका पायाने लंगडे असते. संकटाच्या वेळी डोके लढवून सगळ्यांना वाचवते असे काहीसे होते. सुटीच्या दिवशी आम्हाला काय उद्योग? आम्ही आपले एका एका 'लय भारी' धड्याचे नाटक बसवीत बसायचो. तथाकथीत रंगमंचावर ज्यांचे 'प्रवेश' चालू असतील, ते सोडून इतरांनी प्रेक्षक व्हायचं. या धड्यावर आम्ही नाटक बसवले होते. त्यातले पिल्लू मी झालो होतो. एके ठिकाणी ' I must go! I must go! ' असे संवाद म्हणत लंगडत लंगडत धावायचे होते. ते धावताना माझा खरेचच पायात पाय अडकला आणि जिन्यावर आदळून हात फ्रॅक्चर झाला होता.
|
आई घर बघ. जगन घर बघ. ब घ र आ ई. हा पहीलीतला पहीला धडा कदाचित. ती घरे चित्रात ईतकी सुबक आणि त्यावरचे छ्प्पर लाल रंगाचे असायचे...
|
Shravan
| |
| Saturday, February 23, 2008 - 12:04 pm: |
|
|
धोंडोपंत, बालभारतीची चित्रे भारीच असायची. त्या चित्रांसाठीच पुस्तके मिळावित असे वाटते.शाळा सुरु झाली की नवी पुस्तके सगळ्यांकडेच असायची. प्रिटींग मध्ये थोडाफार फरक असतोच. मग आम्ही कुणाच्या पुस्तकातले चित्र ठळक असा खेळ खेळायचो. त्या खेळामुळे तर ती चित्रे अधिक ठसलीत मनात. सोनाली ते घाम हवा घाम आठवतेय. त्या राज्यात कुणीच कष्ट करायला तयार नसते. त्यामुळे राजा दवंडी देतो घाम हवा म्हणून. पण त्याला तो कुणाकडून मिळत नाही असा काहिसा. मला ते नाटक नेहमी कंटाळवाणे वाटायचे. गणीताच्या पुस्तकातील चित्रे शि.द.फडणीसांची असायाची. त्यांचे कार्टून्स अजुनही त्याच ढब मध्ये असते. बालगंधर्व कलादालनात प्रदर्शन असते कधी कधी. अगदी गणीताचे पुस्तक उघडल्यासारखेच वाटते ती चित्रे बघताना. नेट वर पण होते त्यांचे कार्टून्स. सापडले तर लींक टाकतो.
|
Shravan
| |
| Saturday, February 23, 2008 - 12:07 pm: |
|
|
चंद्या, भारीच, लई भारी... झाले चार शब्द
|
गीडी तो इंग्रजीच्या पुस्तकात होता धडा दोन भागात अ लिटिल हाफ चिक" आम्हाला ४थीत सुकेशीनी धडा होता. आथवीत बाजार आणि एक खुप छान काश्मिर चं वर्णन असलेला धडा होता ८ वीत नाव आठवतय का कोणाला??? सातवीच्या पुस्तकात भाऊबंदकी नाटकातला काही भाग होता.आणि नववीत रायगडाला जेवा जाग येते मधल काही भाग होता. तसच एका अत्यंत कंजुस माणसाची गोष्ठी होती कितवेत होती बर???बहुदा कवडीचुंबक " की कायसं नाव होत. हा अभ्यासक्रम असलेल अहे का कोणी?? आमच्या नंतर बहुदा मराठीची पुस्तक बालायची दरवर्षी पिवळे पिवळे उन कोवळे पसरे चौफेर रे हिंद बांधवा थांब या स्थळी अशृ दोन ढाळी अनाम विरा जिथे आहला या कविताही आठवतात बहुदा पहिलीतच केळीच्या बागा मामाच्या आणि फुलपखरु छान किती दिसते या कविता होत्या
|
Shravan
| |
| Tuesday, February 26, 2008 - 11:20 am: |
|
|
मनिषा, आठवीतले बाजार आणी तो काश्मीरचे वर्णन असलेला धडा आठवतो आहे. काश्मीरची केशरची शेती वगैरे वर्णन होते. बाजार मध्ये लेखकाला कसे नुसते काही खरेदी न करता बाजारातून फिरायला आवडते याचे वर्णन होते. पुन्हा दुकानातून काही खरेदी न करता बाहेर कसे पडावे याच्या काही टिप्स पण! सातवीची 'बोलावणे आल्याशियाय नाही' ही दिवाकरांची नाट्यछटा आठवते का? आणी तो एक धडा होता, लेखक लहान असताना वाचनाच्या वेडापायी वाचनालयात पहिल्या मजल्यावर अडकून पडला मग त्याने सुटकेसाठी खालच्या रस्त्यावरून जाणार्या लोकांकडे केलेली याचना आणी त्याला भेटलेले नमुनेदार लोक असे वर्णन असलेला धडा होता. तसेच एक 'दान' म्हणून धडा होता. राजाcज्या दरबारात एक भिकारी काही मिळण्याच्या अशेने येतो मात्र उलट राजाच त्याच्याकडे दान मागतो. भिकारी त्याला निराशेने झोळीतून एक धान्याचा दाना काढुन देतो. नंतर बाहेर आल्यावर भिकार्याला त्याच्य झोळीत एकच सोन्याचा दाना सापडतो असा काहिसा.
|
ते बाजाराचं वर्णन 'लंडनचा नाताळ' ह्या धड्यात होतं का? की तो दुसरा होता? आणि आठवीत अजून एक होता धडा 'आणि बुद्ध हसला'. कवितांमध्ये 'गे मायभू तुझे मी', 'हे राष्ट्र देवतांचे', 'माझी मुक्ताई मुक्ताई' या कविता आठवतायत. मनिषा, ते होतं का त्या इंग्रजी धड्याचं नाव, मला आठवतच नाही. सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात शेकोटीगीत असतं तशी एक कविता होती. म्हणजे असं - [स्काऊटचा म्हातारा शेकोटीला आला. स्काऊटचा म्हातारा, म्हातार्याची बायको शेकोटीला आली स्काऊटचा म्हातारा, म्हातार्याची बायको, बायकोचा कुत्रा शेकोटीला आला स्काऊटचा म्हातारा, म्हातार्याची बायको, बायकोचा कुत्रा, कुत्र्याचं शेपूट शेकोटीला आलं स्काऊटचा म्हातारा, म्हातार्याची बायको, बायकोचा कुत्रा, कुत्र्याचं शेपूट, शेपटावरची माशी शेकोटीला आली...] सातवीतल्याच अजून 'मेरीज् लॅम्ब' आणि 'क्रॅडल', 'ग्रासहॉप्पर' या कविता पण आठवताहेत. श्रावण, तो लेखक अडकून बसतो तो गंगाधर गाडगीळांचा 'बालपणीचा काळ सुखाचा' असावा असे मला वाटतेय. आणि त्या राजा आणि भिकार्याच्या धड्याचं नाव 'दान' नव्हतं, हृदयाची श्रीमंती असं होतं. (सातवीला होता तो धडा.) यात मला आठवतंय ते असं, राजाचा जन्मदिन असतो. म्हणून आपल्याला काहीतरी घसघशीत भेट मिळेल या आशेनं भिकारी तिथं येतो. पण अनपेक्षीतपणे राजा त्याला विचारतो की "तू माझ्या जन्मदिनानिमित्त माझ्यासाठी काय भेट आणली आहेस?" तेव्हा तो भिकारी क्षणभर गडबडतो पण लगेचच पुढे येऊन राजाला ओंजळ पुढे करायला सांगतो. आणि आपली झोळी त्याच्या ओंजळीत रिती करायला लागतो. राजाची ओंजळ भरते आणि दाणे खाली सांडू लागतात. पण भिकारी ओततच राहतो. राजाला लाज वाटते. असला भिकारी असून हातचं काही न राखता देण्याचं दातृत्व त्याच्यात आहे आणि आपण राजा असून इतकुशा मनानं त्यानं काय आणलंय असं विचारत बसतो.
|
Shraddhak
| |
| Tuesday, February 26, 2008 - 12:16 pm: |
|
|
राजाचा जन्मदिन असतो.<<<< जीडी, जन्मदिन?????? मराठीच्या धड्यांच्या बीबीवर तूही? :-P ~D तो बाजाराचं वर्णन असलेला धडा वेगळा. लंडनचा नाताळ पुलंच्या अपूर्वाई मधून घेतला होता. BTW नंतर मूळ पुस्तक वाचले तेव्हा, त्यात असलेला बीयरचा उल्लेख शालेय पुस्तकातून काढला होता, हे कळलं. :-P बालमनावर विपरीत परिणाम नकोत. :-P तो बालपणीचा काळ सुखाचा हा धडा मला वाटतं, द मा मिरासदारांचा होता. कवितांमध्ये ' माणूस माझे नाव ' अशी कविता होती, इंदिरा संतांची ' झुबे ' होती. एक भंगलेल्या समाधीवरची कविता होती.
|
श्रद्धा LOL महाराष्ट्र दिनासारखं गं! :D अच्छा बालपणीचा काळ सुखाचा द. मा. मिरासदारांचा होता का?
|
Zelam
| |
| Tuesday, February 26, 2008 - 1:00 pm: |
|
|
तो काश्मीरचे वर्णन असलेला धडा बहुतेक आचार्य अत्र्यांचा होता. अजून एक म्हणजे ते ज्या गावाला जातात त्या गावाचं नाव असतं मटन.
|
हा बाजार धडा बहुदा ना. सि. फडक्यांचा असावा असं वाटतय[चु. भु. द्या. घ्या.] त्यात विविध तर्हेच्या अत्तरांची वर्णनं आहेत. दुकानदार त्यांना हे जास्मिन घ्या वगैरे आग्रह करतो. आणि काश्मिर चा तोच धडा बरोब्बर. केशराच्या शेतांची वर्णने होती त्यात. आणि आमच्या बाई काश्मिरला जाउन आलेल्या असल्याने त्या खुप खुप वर्णन करुन शिकवायच्या.तेव्हा अस वाटायच की आपण कधी जाणार तिथे. आणखी एक काहीतरी "दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम" इतकच आठवतय. हिंदीत खुब लढी मर्दानी वो तो झांसीवाली रानी थी. ५ वीत की ६ वीत" जुगनु" तिच कोणीतरी वर उल्लेखलेली मुंगीची कविता होती. आणि "शेखचिल्ली", "नानाकी\मामाकी ऐनक" धडा होता मराठीत [कितवीत ते नाही आठवत बहुदा ९वीत] सुनील गावस्करच्या "सनी डेज" मधला काही भाग होता. दाढ दुखत असतानाही कसं द्विशतक केल.. [मला परत शाळेत जावस वाटतय.धन्यवाद हा बा. फ. सुरु करणर्याला]
|
Zakasrao
| |
| Tuesday, February 26, 2008 - 3:16 pm: |
|
|
मला परत शाळेत जावस वाटतय.धन्यवाद हा बा. फ. सुरु अरणर्याला] >>>>. मनिषा जाच तु शाळेत. तुझ्या ह्या दोन पोस्ट पाहुन तरी असच वाटतय की लवकरच जा आणि मराठी टायपिंग ची प्रॅक्टिस जोरात कर. श्र तुझ्या मेंदुची कपॅसिटी मजबुत दिसतेय. अजुन आठवतय म्हणजे काय यार. मस्त आहे हा बीबी. मला ह्या बीबी मुळे जुने धडे आठवु लागले. विसरभोळा गोकुळ एक होता धडा. एका नाटकाचा काही भाग होता तो. आणि एकेकाचे वेड हा कितवीत होता हे आठवत नाहिये पण बहुतेक आचार्य अत्रे यानी लिहिलेल्या नाटकातील काही भाग होता. त्यात रावसाहेब याना सुर्य नमस्काराची आवड ही वेड म्हणावी इतपत असते. ते सगळ्या समस्येंवर सुर्य नमस्कार हाच तोडगा सांगत असतात. एकाला भविष्य, ज्योतिष याची आवड असते असाच काहिसा होता तो.
|
Bee
| |
| Tuesday, February 26, 2008 - 3:26 pm: |
|
|
हिन्दीचा विषय नाही ह्या बीबीचा. पण मोह आवरत नाही. हिन्दीमधे तो बाबूजीची ऐनक धडा होता ना. तो मला आठवतो आहे. मराठीमधे एक सुकेशिनी नावाचा धडा होता. त्यात सुकेशिनी, तिचे केस विकते की दान करते, आठवत नाही आता. पाचवीला, 'आणि पाडवा गोड झाला' हा एक खूपच गोड भावूक धडा होता. कुणाला आठवतो का इथे? की मी खूप आजी माजी गटात आहे इथे :-)
|
अरे झ कस रे कळत नाही तुला की मला अगदी काय लिहु आणि काय नको असं झाल्यामुळे अशा चुका होतायत आणि मग चुका लक्षात आल्या पण त्या सुधारत बसण्याचा कंटाळा आला. बी सुकेशीनीचा उल्लेख मी माझ्या आधीच्या पोस्टमधे केलाय की. १९८९ ला १० वी झालेले कोण कोण आहेत बरं इथे??????
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 26, 2008 - 5:23 pm: |
|
|
मी त्यामानाने बराच ज्येष्ठ नागरिक आहे, पण मला वाटते हा सुकेशिनी धडा आम्हालाही होता. कदाचित तो वेगळ्या भाषेत असावा. यात ती मुलगी गौतम बुद्धासाठी, केस विकते आणि बुद्धाचा आशिर्वाद मिळाल्यावर तिचे केस परत येतात.
|
Suyog
| |
| Tuesday, February 26, 2008 - 5:53 pm: |
|
|
हो मी ८६ ला १० वी ज़ाले मनिशाने सान्गितलेले सर्व धडे आठवले
|
Farend
| |
| Tuesday, February 26, 2008 - 6:45 pm: |
|
|
हो बी पाडवा गोड झाला आठवतो. ती 'ताई' लाडू लपवते तोच ना? छान आहे तो. मनिषा, मामा की च होती ऐनक बहुधा सनी डेज मला ही वाचल्याचे आठवते, पण आमच्या नंतर च्या वर्षी सगळी पुस्तके बदलली होती, मग हे कदाचित नुसते वाचले असेल. हिंदीत तो एक कोणीतरी लुकडा मुलगा बेशुद्ध पडल्याचे सोंग घेऊन त्याला त्रास देणार्या इतर मुलांनाच त्याला उचलून न्यायला लावतो, तो 'एक लुहार की' सुद्धा मस्त होता.
|
Kiran
| |
| Tuesday, February 26, 2008 - 8:29 pm: |
|
|
मनिषा, दाने दाने पर म्हणणारा चंपूशेट नावाचा ईसम असतो ईतकेच आठवतेय. आणि तेव्हा तरी माझ त्या व्यक्तिरेखेविषयीच मत वाईट झालेल होते. म्हणजे तो कुणाकडेतरी जातो आणि कोणासाठीतरी केलेले जेवण स्वतःच खातो आणि हे वाक्य म्हणतो असकाहीतरी आठवतय. पण तो मराठी धडा होता की हिंदी ते आठवत नाहिये. तुला हिंदी होते का?
|
हो मला हिंदी होतं. पण तो धडा मराठी की हिंदी होता आठवत नाहीये. मात्र त्यावर आम्ही नाटक बसवलं होत हे नक्की आठवतंय
|
Bee
| |
| Wednesday, February 27, 2008 - 7:20 am: |
|
|
तो धडा मराठीच होता. आम्ही पण त्यावर नाटक बसविले होते. विद्या बाळ ह्यांचा जाचक कथा असा एक धडा होता ना. आणि रजिया सुलतान ह्यांचा दहाविला एक धडा होता. तो स्त्रियांवर होता. नाव नाही आठवत.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|