|
Bee
| |
| Wednesday, February 20, 2008 - 10:50 am: |
|
|
अखि त्या कथेचे नाव कलिंगड असेच आहे. ती कथा आहे हे असे आहे मधे आहे. माझ्या पुतणीला १२ मधे आता गौरीचीच सोन्याचा तुकडा ही एक कथा आहे.
|
Akhi
| |
| Wednesday, February 20, 2008 - 12:10 pm: |
|
|
हो मला ती कलिंगडा मधे बसण्याची कल्पना आणी, त्या दोघिंच जवळ येणे तेव्हा खुप भावल होते.
|
Kshitij_s
| |
| Wednesday, February 20, 2008 - 12:15 pm: |
|
|
झकास, अरे तो धडा नाहि पण सुरुवात चान्गलीच लक्शात आहे रे! सुट्टी सम्पली शाळा सुरु झाली. आज शाळेचा पहिला दिवस. आज अभय भेटेल, X भेटेल, Y भेटेल
|
Shravan
| |
| Thursday, February 21, 2008 - 11:15 am: |
|
|
झकोबा क्षितीज, झकास एकदम.. मग तुम्हाला चौथीच्या बालभारतीतील त्या कविता आठवत असतील ना? पहिलीच कविता होती 'पालखी'. म्हणजे झाडाच्या रोपाची पालखीतून मिरवणूक असे वर्णन. धिवर पक्षाची कविता. तसेच ती 'घाटातली वाट' कविता.. घाटातली वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ. वर उंच कडा, खाली खोल दरी.. पुढे आठवेना बाबा.. आणी ती तिसरीची ती 'आमची मुले' कविता? सरसर झाडावर चढतात चढतात, झाडाच्या पारंब्या लोंबतात लोंबतात, पहा आमची मुले, रानची फुले, ईट बाई इटुकली इटुकली, भित नाही पिटुकली पिटुकली. ते धडे आठवत असतीलच ना? आमचा खंड्या, धाडसी फेलिसिटा, पांडूतात्यांची झोप, आईची सुट्टी अहाहा.. पुन्हा त्या दिवसात फिरुन आल्यसारखे वाटते आहे. मी ती पुस्तके मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे रे. बालभारतीने नाही म्हणून सांगीतले आहे. दुसरे कुठे शोधावे हाप्रश्न आहे.
|
Farend
| |
| Thursday, February 21, 2008 - 5:13 pm: |
|
|
मस्त! फक्त हे धडे आणि त्या कविता त्या त्या वेळच्या परिक्षेत आठवल्या असत्या तर किती मजा आली असती ना?
|
Zakasrao
| |
| Friday, February 22, 2008 - 4:22 am: |
|
|
श्रावण अहाहा काय आठवण काढलीस रे. मला कविता आठवत नाहीत. एक खंड्याची (किंगफ़िशर) ची कविता की धडा होता त्यात त्याच एक सुंदर चित्र होत. पांडु तात्या म्हणजे जे चालता चालता झोपायचे तेच ना?? मी लहान होतो तेव्हा आम्ही कोंबड्या पाळल्या होत्या. मग नवीन पिल्ले आली की त्यांच नामकरण होत असे मी आणि माझा भाउ प्रत्येक पिल्ल्याच वैशिष्ट्य बघुन नाव ठेवत असे. एका अशाच पेंगणार्या कोंबड्याच नाव आम्ही पांडुतात्या ठेवल होत. त्याला संदर्भ तो धडा हो ना अमोल अगदि अगदि हिंदि च्या तोंडी परिक्षेला मी "कोशिश करनोवालों की हार नहि होती" ही कविता घाब्रत घाबरत म्हणालो होतो हे अस आठवतय. त्यावेळी कुठे त्याचा नीट अर्थ समजावुन घेतलेला असायचा. आता खरच वाटत की पहिलीपासुनची आपल्यावेळची सगळी पुस्तके हवीत. खरच कुठे मिळतील बर??? }
|
Arun
| |
| Friday, February 22, 2008 - 5:01 am: |
|
|
बालभारती मध्ये मी पण पुस्तकांची विचारणा केली होती, पण त्यांच्याकडून काहीच मिळालं नाही ............
|
Shravan
| |
| Friday, February 22, 2008 - 10:02 am: |
|
|
फारेंड.. झकास, तू लहानपणापासूनच असा आहेस म्हणजे.. कोंबड्याला पांडूतात्या.. भारीच. त्या धिवर पक्षाच्या कवितेचा मी पण वर उल्लेख केला आहे झकास.. कविता होती. एक दरोडेखोराचा धडा पण होता. जंगलातील वाटसरूंना तो मारयचा. मग त्याला एक साधू भेटतो (कि बुद्ध भिक्खू की गौतम बुद्ध स्वत: ते आठवत नाही) आणी ते त्याला झाडाची पाने तोडून जोडायला सांगतात व त्याचे मतपरिवर्तन होते.. बरोबर.. 'तोडणे सोपे जोडणे अवघड' असे नाव त्या धड्याचे. 'एकमेका सहाय्य करू' आठवतो का? एका रात्री धर्मशाळेतील एकाच लहान खोलीत एक वाटसरु उतरतो. मात्र नंतर दुसरा तिसरा आणी चौथा असे ३ जण येतात. खोली अतिशय लहान असते मग ते फक्त उभे राहू शकतात. मात्र एकमेकांच्या जवळ उभे राहण्याने त्या कडाक्याच्या थंडीत त्यांच्यात ऊब निर्माण होते. किचक वधाचे एक नाटक पण होते. त्यात किचकाने द्रौपदीला हात लावल्यावर एक प्रेक्षक सरळ रंगमंचावर जाऊन त्याला जाम बदडतो असा काहिसा. 'केळीच्या बागा मामाच्या' कविता आठवते का? आणी दुसरीच्या पुस्तकातली ती शेवटच्या पानावरची कविता.. 'वारा सुटला सो सो सुम्म, विज चमकली चकचक, जिकडे तिकडे लखलख. पाऊस आला धो धो धो, पाणी वाहिले धो धो धो, पाण्यावर बोट सोडली सोडली... आणी ती पुढे जाऊन बुडाली बुडाली असे काहिसे. आजून आठवतील तसे धडे टाकतो.
|
Shraddhak
| |
| Friday, February 22, 2008 - 10:53 am: |
|
|
तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये उभे झाड. झाडावर धीवराची, हाले चोच लाल जाड. शुभ्र छाती, पिंगे पोट, जसा चाफ़ा यावा फ़ुली. पंख जणू थंडीमध्ये, बंडी घाली आमसुली. गड्या पाखरा, तू असा. सारा देखणा रे कसा? पाण्यावर उडताना, नको मारू मात्र मासा. हीच ती खंड्याची कविता. चौथी बालभारती. पण बिचार्या खंड्याचं जेवण का तोडायचं म्हणते मी... :-P आभाळ वाजलं धडामधूम वारा सुटला सूं सूं सूं वीज चमकली चक चक चक जिकडे तिकडे लख लख लख पाऊस आला धो धो धो पाणी वाहिले .. .. .. पाण्यात बोट सोडली सोडली. हातभर जाऊन बुडली, बुडली. बोटीवर बसले बेडूकराव. बेडूक म्हणाला डरांव डरांव. एवढीच आहे ना? की अजून आहे? चौथीच्याच पुस्तकात चंद्रावर जाण्याचा एक धडा होता.
|
Zakasrao
| |
| Friday, February 22, 2008 - 11:24 am: |
|
|
श्र तुझ्याकडे अजुन ते पुस्तक आहे का?? कस काय आठवत अजुन?? श्रावण हो तो गौतम बुद्धांचा धडा, वाटसरुंचा धडा आठवतोय किचक वधाचा नाही आठवत. एकीचे बळ नावचा एक धडा होता. त्यात एका दांडगट मुलाने काढुन घेतलेला बॉल साग्ळी मुल एकत्र जावुन त्याच्याकडुन परत घेतात असा काहिसा होता. तो कितवीत असताना होता ते माहित नाही. हुसेनी माश्याचा एक धडा होता. आटह्वतोय का?? कोणाकडे जर अशी जुनी पुस्तके असतील तर मला ती ज़ेरॉक्स करुन घयची आहेत. इथे सांगा जर असतील तर. बालभारतीत देखिल नाहित म्हणजे सापडण कठिणच आहे.
|
Manya2804
| |
| Friday, February 22, 2008 - 11:39 am: |
|
|
लहरोसे डरकर नौका पार नही होती कोशीश करने वालोंकी हार नही होती नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है चढती दिवारोंपर, सौ बार फिसलती है मनका विश्वास रगोंमे साहस भरता है चढकर गिरना, गिरकर चढना न अखरता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती कोशीश करने वालोंकी हार नही होती .....1 डुबकीयाॅं सिंधूमे गोताखोर लगाता है जा जा कर खाली हाथ लौटकर आता है मिलते न सहजही मोती गहरे पानी मै बढता दूना विश्वासभी ईसी हैराने मै मुठ्ठी उसकी खाली हरबार नही होती कोशीश करने वालोंकी हार नही होती .....2 असफलता एक चुनौती है, स्विकार करो क्या कमी रह गयी है देखो और सुधार करो जबतक न हो सफल, नींद चैन की त्यागो तुम संघर्षोंका मैदान छोड मत भागो तुम कुछ किये बीना ही जयजयकार नही होती कोशीश करने वालोंकी हार नही होती .....3 CBDG
|
Shraddhak
| |
| Friday, February 22, 2008 - 12:03 pm: |
|
|
झकास, ती कविता पाठ आहे रे मला अजून. पुस्तक नाहीये माझ्याकडे. मी तोंडी परिक्षेसाठी कुठल्याही तीन कविता पाठ करा असं सांगितलं की सगळ्या कविता पाठ करून ठेवायचे. :-P बाकीच्या कविता काहीतरी क्लू दिला तर आठवतील.
|
Shravan
| |
| Friday, February 22, 2008 - 2:22 pm: |
|
|
श्रध्दा, सहिच एकदम. सगळी कविता भेटली. अहाहा... मला धिवरची फक्त पिंगट पोट एवढाच रेफरंन्स आठवत होता. तुला अजूनही कविता पाठ आहे म्हणजे कमाल आहे. धन्यवाद पण पुर्ण कवितेसाठी. अजून काही आठवत असेल तर टाकत जा ना..
|
Shravan
| |
| Friday, February 22, 2008 - 2:23 pm: |
|
|
झकोबा, एकीचे बळ.. इयत्ता तिसरी.
|
Zakki
| |
| Friday, February 22, 2008 - 2:58 pm: |
|
|
मला वाटले आजकाल शाळांमधून मराठी काढून टाकले आहे. फक्त हिंदी किंवा इंग्रजी! निदान जिथे कुठे मराठी शिकवतात तिथे फक्त अत्यंत गरीऽब लोक जातात!
|
Bee
| |
| Friday, February 22, 2008 - 3:24 pm: |
|
|
मराठीमधे शिकलेत तरी त्याचा उपयोग नोकरी पाण्यात होत नाही असे कारण मिळते ऐकायला. जिथे तिथे हल्ली ईंग्रजीवाचून निभत नाही असे उत्तर मिळते.
|
Chandya
| |
| Friday, February 22, 2008 - 4:00 pm: |
|
|
श्रावण, ती 'आमची मुले' कविता बहुदा अशी आहे वडाच्या पारंब्या लोंबतात, लोंबतात त्यांचे झोपाळे झुलतात, झुलतात झुलत्या झोपाळ्यावर बसतात, बसतात अशी आमची मुले रानची फुले धिट बाई धिटुकली भीत नाही पिटुकली
|
Sonalisl
| |
| Friday, February 22, 2008 - 7:08 pm: |
|
|
श्रध्दा, छानच. मला तर पहील्या ४ ओळीच आठवत होत्या. आता संपुर्ण कविता मिळाली. धन्यवाद. चंद्या, 'आमची मुले' ही कविता पण मला खुप आवडते. वडाच्या झाडावर पकडा-पकडी--सुरपारंब्या, खेळताना आम्ही ही कविता बोलायचो. ते चित्रपण छान होतं. एक नाटक होतं, घाम हवा घाम. आठवतं का कोणाला? आणि एक कविता होती, शेवटच्या पानावर. एक चिमणी तिच्या घराच्या शोधात सगळीकडे फ़िरते, सगळे तिला आप-आपल्या घरात रहायला सांगतात पण ती नाही रहात. आत तर फ़क्त एकच ओळ आठवते त्यातली..... जळो तुझा पिंजरा मेला, माझे घरटे हवे मला.. असं कहीतरी. गणिताच्या पुस्तकामध्ये पण छान चित्रे होती.
|
Sonalisl
| |
| Friday, February 22, 2008 - 7:15 pm: |
|
|
|
Manjud
| |
| Saturday, February 23, 2008 - 6:20 am: |
|
|
झक्की तुमची माहिती चुकीची आहे. इंग्रजी माध्यम असलं तरी हल्ली अभ्यासक्रमात दुसरीपासून मराठी आहे. आणि अगदी उच्चभ्रू शाळांमधेही मराठी भाषा व्यवस्थित शिकवतात.
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|