Santu
| |
| Friday, October 12, 2007 - 1:18 pm: |
|
|
मला वाटते औदुंबर सुध्दा होति कितविला बर? तसेच झाशी राणी लक्ष्मी बाई वर सुध्दा होती. भा. रा. तांब्याची.
|
Hkumar
| |
| Friday, October 12, 2007 - 1:59 pm: |
|
|
.....पाय टाकूनी जळात बसला असला औदुंबर बरोबर ना santu ?
|
Tiu
| |
| Friday, October 12, 2007 - 3:51 pm: |
|
|
Hkumar ...ती 'अनामवीरा' कवीता इथे पोस्ट कराल का please ?
|
Hkumar
| |
| Saturday, October 13, 2007 - 2:36 am: |
|
|
हो, Tiu आधी इंटरनेट वरील साइट शोधण्याचा प्रयत्न करतो आणि कळवितो. माझी पाठ असली तरी टाईप करायला मोठी आहे.
|
Dineshvs
| |
| Saturday, October 13, 2007 - 4:44 am: |
|
|
मला वाटते, अनामवीरा, सुमन कल्याणपुरने गायली आहे. अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात, अश्या ओळी आहेत ना ?
|
इथे कुसुमाग्रजांच्या बीबीवर आहे ती कविता. अनामवीरा
|
Itgirl
| |
| Saturday, October 13, 2007 - 5:00 am: |
|
|
अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा
|
Farend
| |
| Saturday, October 13, 2007 - 6:45 am: |
|
|
दिनेश लताने गायले आहे बहुतेक. शोधतो लिंक
|
Farend
| |
| Saturday, October 13, 2007 - 6:50 am: |
|
|
येथे अनाम वीरा ऐकायला मिळेल. त्या लिस्ट मधे आहे.
|
Hkumar
| |
| Saturday, October 13, 2007 - 1:35 pm: |
|
|
शालेय जीवनातील अजून एक चांगली लक्षात राहीलेली कविता म्हणजे मर्ढेकरांची ''गणपत वाणी बिडी पिताना..'' ekkavita.com वर ती वाचायला मिळाल्यावर काय आनंद झाला! वाण्याचे किती चपखल वर्णन.
|
Hkumar
| |
| Sunday, October 21, 2007 - 11:18 am: |
|
|
नुकतीच माझ्या माहितीतील ६० वर्षीय गृहस्थांनी आत्महत्त्या केली. तेंव्हा शालेय जीवनातील मराठीच्या पुस्तकातील शंतनुराव किर्लोस्करांचा या विषयावरील धडा आठवला. त्यात त्यांनी ही कृती म्हणजे निव्वळ भ्याड्पणा व पळपुटेपणा आहे असे म्हटले होते. तो धडा वाचलेला माणूस तरी अशी कृती करणार नाही एवढी ताकद त्या धड्यात होती! dhaDyaache naawa aaNi iyatta maatra aaThawata naahee.
|
एक कविता आम्हाला आठवते... म्हण्जे आम्हाला न्हवती ही कविता पण सातवीला जुण्या पुस्तकात ही कवीता होती. गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या... असे ते कवितेचे शब्द होते. त्यात एका गरीब बापाचे आणि त्याच्या मुलीचे वर्णन होते. अकरा बारा वर्षाच्या मुलाना आपण उगाचच म्हातारे करुन टाकतो असे नाही वाटत तुम्हाला? कदाचित करुणरसप्रधान म्हणुनही असेल कदाचित. कुणी सांगावे? आमच्या लहानपणी निबंधाच्या स्पर्धा असायच्या... आणि त्यात आम्हाला भाग घ्यायलाच लागायचा... अहो काय सांगावे?... ते निबंध हे जे प्रकरण होते ते म्हणजे अजब होते. आधि कुणीतरी ते लिहुन द्यायचे.. मग आपण ते पाठ करायचे... मग लिहुन पहायचे.. मग तपासायचे... पण त्यातुनही काही चांगल्या सवयी लागल्या.. पण .... पण एकंदर स्पर्धा ही विनाकारण सिरीयस असायची असे आत्ता वाटते... असो. श्या...!! शिंच्या नो आत्ता तुम्ही पाहाणार काय तर तो टी व्ही.. आणि त्यावरचा " तो " " तसला " नाच..! मग तें पाहील्यावर हें सिरीयस वाटणारच... शिंचे आम्ही तर अजुन म्हणतो... नोकरीहुन आल्यावर कोपर्यात बसकर पसरा आणि अभ्यास करा... काय?....... लवकर वरती जाल नोकरीत. शिंचे शिकलात म्हणुनच ना आता गोष्टी सांगताय?... पण आजकालची पोरे नाचतात गातात छान.. शिंचे आमच्या वेळेला बर का हे काय नव्हतेच..
|
Amithk
| |
| Saturday, February 02, 2008 - 12:18 am: |
|
|
Can you please post complete kavita pitat sare god hivala......... kavi madhekar...... mi kuthekar posts madhe link phili... ti link kaam kart nahiye..... so please konitari post kara........kinva mala mail kara .......... amithkamithk@gmail.com
|
Hkumar
| |
| Tuesday, February 19, 2008 - 7:07 am: |
|
|
धड्याचे नाव आता आठवत नाही पण तो ज्ञानेश्वरांचा लेख होता. लेखाच्या शेवटी त्यांनी लिहीले होते 'ही लेखनसीमा शोभते'. अत्यंत मार्मिक वाक्य आहे! लांबलचक रटाळ लिहीणार्या मंडळींसाठी अगदी मार्गदर्शक.
|
Akhi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 9:06 am: |
|
|
लाल चीखल हा धडा होता ना? त्याचे लेखक कोण ते आठवत नाही. पण शेती वरचा होता तो
|
Akhi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 9:14 am: |
|
|
arc मधे सापडल... लाल चिखल बद्दल अजुन १ आठवतो मला धडा, दत्तक मुलगी आणी आई ह्याच्या नात्य वरती होता. कलिंगडा मधे बसण्याची कल्पना आहे अस काही तरी होत त्यात.
|
Monakshi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 10:58 am: |
|
|
गौरी देशपांड्यांची कथा होती ती. नाव बहुतेक 'दोघी' किंवा 'त्या दोघी' असं काहीसं असावं. नक्की आठवत नाही. त्या कथेवर टि.व्ही.वर एक एपिसोड ही झालेला होता. विक्रम गोखले आणि बायको माहित नाही कोण होती ती आणि दत्तक मुलीचे काम मीरा वेलणकरने केले होते.
|
Shmt
| |
| Wednesday, February 20, 2008 - 1:20 am: |
|
|
हो मलाही तो धडा खूप आवडायचा. कलिंगडातील कल्पना खूपच छान आहे त्यातिल.
|
Zakasrao
| |
| Wednesday, February 20, 2008 - 4:35 am: |
|
|
लाल चिखलचे लेखक गंगाधर पानतावणे होते का?? के ते मी साळत जातो चे लेखक होते. काही नक्की आठवत नाही. मोना मी ती कथा वाचली आहे. आता नवीन अभ्यासक्रम आहे दहावीसाठी बहुतेक. १९९६ नंतर मागच्याच वर्षी बदल झाला असेल त्यात. मी दुसरीत असताना आम्हाला एक मराठीत धडा होता "सुगीचे दिवस" त्यात छान वर्णन होते सुगीच्या दिवसाचे. चित्रे देखिल छान होते मळणी करणार्या शेतकर्यांची. अजुन एक होता तो म्हणजे शाळेचा पहिला दिवस. कोणाला आठवतय का??
|
Akhi
| |
| Wednesday, February 20, 2008 - 6:37 am: |
|
|
'कातरवेळ' नावाचा धडा होता आठवतो का कुणाला?
|