|
मी आयटी मधली नाही कॉल सेंटरमधली पण नाही. पण या क्षेत्रातल्या बर्याच लोकाना ओळखते अगदी कॉल घेणार्यापासून ते कंपनीचा व्ही पी पर्यंत. माझा स्वत्:चा पगार माझ्या वयाच्या आणि अनुभवाच्या मानाने जरा जास्तच आहे!!!! कारण पी आर हे तसं specialised skill आहे. technical skill पेक्षा soft skill इथे वाप्रलं जात असलं तरीही.... दुर्दैवाने शर्मिलाताईनी सांगितलेल्या कॅटेगरीमधे मी बसते. भरमसाठ शॉपिंग आणि क्लबिंग हे माझे आवडते उद्योग आहेत. मुंबईमधे एक असा पब नाही जिथे मी गेलेली नाही. पण मी माझ्या मर्यादा आखलेल्या आहेत. नो स्मोकिंग नो ड्रिकिंग.. नो वन नाईट स्टॅंड्स... आणि या माझ्या मी आखलेल्या आहेत. यामधे घरचे संस्कार वगैरे गोष्टीचा काहीही संबंध नाही हे मुद्दाम सांगतेय.. एहकुमार याच्या काॅल सेंटर संस्कृतीमुळे आता सर्व कमावती मंडळी 'पुरूष' च झाली आहेत. 'स्त्रीपण' असलेली स्त्री आता शोधावी लागेल! या वाक्याची मात्र मजा वाटली... स्त्रीपण म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे हे मला जाणून घ्यायला आवडेल. मी लग्नासाठी मुलं बघताना असे बरेच नमुने सध्या बघतेय.. म्हणए स्वयंपाक करता येतो का? हा प्रश्न उपस्थित होतोच.. आणि हो घर सांभाळता येत का? मुलं सांभाळू शकत येतील का? हेही!!!!! अडीच वर्षं हॉस्टेलवर राहून, दोन वर्षं एकटीने फ़्लॅट घऊन राहिल्यावर. जर माझ्याकडून कुणी अशा प्रश्नाची उत्तरं मागत असेल तर कठीण आहे. (हे सो कॉल्ड मॉडर्न विचाराची मुलं.. ) तरीही कमावणारा तो पुरुष आणि घर सांभाळणारी ती स्त्री या मताचं अजून कोणीतरी एक बघून आश्चर्य बिल्कुल वाटले नाही.
|
जरा कॉल सेंटरबद्दल.. इथे भविष्य नाही हे सर्वानाच माहीत आहे. तिथे काम करणार्या मुलाना सुद्धा. पण तरीही मी जर टीम लीडर ट्रेनर झालो तर हे गाजर असतेच ना.. कारण या पोस्टला सुद्धा भरपूर पगार आणि पर्क्स असतातच. इथल्या मुलामधे व्यसनाचं प्रमाण जस्त आहे, कामाच्या अनिश्चित वेळा. शारिरिक आणि मानसिक ताण आणि महत्वाचं म्हणजे हातात खेळणारा पैसा. हा पैसा कुठेतरी गुंतवावा असं वाटणारे फ़ार कमीजण असतात. कल की कल सोचेंगे.. हा इथला फ़ंडा आहे. अर्थात हळू हळू इथल्या मुलाना पण या सर्वाची जाणीव व्हायला लागली आहे. कॉल सेंटर्स नवीन असताना त्यामधे ग्लॅमर होतं. आता त्याकडे एक फ़ालतू जॉब म्हणून पाहिलं जातय. पालक पण मुलाना हे करू नका असं सांगत आहेत. (कधीकाळी हेच पालक स्वत्:च्या पायावर उभे राहिलेल्या मुलाचं कौतुक करत होते. आज त्यामधे आकर्षण कमी होत चाललय. वर म्हटल्यापरमाणे जर चायनीज लोक हे काम अजून कमी पैशामधे करून द्यायला लागले तर भारतीय कॉल सेंटरचं भवितव्य कठीण आहे. त्यामुळे वेळीच पावलं ओळखून हे तरूण तरूणी देशाने इतर कामात गुंतवावेत (सरकारने नव्हे!!!!) आयटी आणी कॉल सेंटर या पूर्ण वेगळ्या बाबी आहेत. जरी कामाचे तास वगैरे सारखे असले तरीही... ( मग PR, advertising मधे वेगळं काय असतं??) उलट इथल्यासारखे wild लोक इतर कुठे सापडणं कठीण आहे..
|
नन्दिनी,आपले विचार वाचून छान वाटले.विशेषताहा स्त्री पुरुषांच्या स्थानाबद्दल व भूमिके बद्दल एवढी जाग्रुती करण्याचे प्रयत्न होवून ही कुमारांची वक्तव्ये वाचून वैषम्य वाटते. समाजाच्या बद्ला मध्ये सायन्स व टेक्नोलाजी चा भाग असतो. नोकर्या नवीन व्यवसायांवर व skillset आणि manpower च्या उपलब्धते वर अवलम्बून असतात.त्यात लिन्ग भेद कुठून आला? विशेष्ताहा common skill sets irrespective of gender असताना. आणि फक्त आय टी किंवा साफ़्टवेर या क्षेत्रांशी सम्बन्धीत ही प्रश्न नाही-हे म्हणून मी व्यसनासक्ततेचे समर्थन करीत नाही-माझ्या manufaturin सेक्टर मध्ये ही ही तेवढीच ज्वलन्त समस्या आहे. नवा माणूस २ वर्षां नन्तर organizedmanufacturing sector मध्ये वीस हज़ाराच्या आस पास कमावतो. या वर उपाय आहे.प्रत्येकाच्या work place मध्ये सुजाण व दोन्ही बाजू अनुभवलेल्या लोकानी एक अभियान वजा प्रयत्न केले तर हळू हळू ही गाठ सुटू शकेल. west मधील anti smoking campaign हे ताजे उदाहरण आहे
|
स्वयंपाक करता येतो का? हा प्रश्न उपस्थित होतोच.. आणि हो घर सांभाळता येत का? मुलं सांभाळू शकत येतील का? हेही!!!!! ????????????????????? मुलगा किती शिकला आहे? नोकरी कुठे करतो सरकारि कि खासगी? पगार किती आहे? खासगी नोकरी आहे तर परदेशी जाण्याचा विचार आहे का? कुठल्या हुद्द्यावर काम करतो? मुलाचे स्वता:चे घर जमीन आहे का? मोठ्या भावाचे लग्न झाले तर हे दोघे लग्न झाल्यवर वेगळे राहणार कि एकत्र कुटुंबात? असे कित्ती प्रश्न मुलांना पण विचारले जातात. मी पण अजुनही या प्रश्नांची उत्तरे देतो आहे. जेंव्हा हे प्रश्न थांबतील तेंव्हा ते प्रश्नसुध्धा थांबतील हो:-) जर हे प्रश्न कोणाला स्वाभाविक वाटत असतील तर तुम्ही लिहिलेले प्रश्न सुध्धा स्वभाविकच आहेत. हा या बिबि चा विषय नाहि तरि रहाविले नाहि म्हणुन लिहिले.
|
Bee
| |
| Monday, January 28, 2008 - 7:29 am: |
| 
|
पण जर एखाद्याकडे soft skills चांगल्या असतील तर त्यानी जर त्याचा उपयोग केला तर call centre ही चांगलीच field म्हणायला हवी. तसेही इतर कुठल्याही क्षेत्रातील लोक आपले क्षेत्र कुठे बदलतात. भारतात अशी मुले मुली खूप आहेत ज्यांचे soft skills चांगले असते आणि बाकी academic talent कमी असते. आता स्त्री आणि पुरुष ह्यांच्या 'पणा'बद्दल बोलायचे तर हो निदान मला तरी दोघात भेद वाटतो आणि असायलाच हवा. काही गोष्टी जी एक स्त्रीच करू शकते ते पुरुष करू शकत नाही. निदान नेहमीसाठी तरी पुरुष स्त्रीयांच्या आणि स्त्री पुरुषांच्या गोष्टी करू शकत नाही. तुम्ही म्हणाला आपले संस्कार आड येतात वगैरे पण नैसर्गिक जडनघडण अशी केली आहे इश्वराने की काही गोष्टी स्त्रीच करू शकते तर काही गोष्टी फ़क्त पुरुष. इथे मी हे म्हणत नाही की पुरुष का गरोदर राहू शकत नाही.. जीवशात्रीय फ़रक बद्दल मी बोलत नाही आहे. स्लार्टी, मुद्दे नीट मांडलेत. पण हल्लीची कोवळी मुले ऐकत नाहीत हो पालकांचे त्याचीच काळजी वाटते.
|
Bee
| |
| Monday, January 28, 2008 - 7:50 am: |
| 
|
शर्मिला, तुझा लोकसत्तामधील एक लेख वाचला. अभिनंदन! ज्यांना वाचायचा आहे त्यांच्याकरिता लिंक देतो आहे. http://www.loksatta.com/daily/20080119/ch10.htm
|
Slarti
| |
| Monday, January 28, 2008 - 9:41 am: |
| 
|
अभिजीत, मुलामुलीने एकमेकांस करिअरबद्दल प्रश्न विचारणे फक्त स्वाभाविकच नव्हे, तर आवश्यक आहे. परंतु, मुलीला घराबाहेरचे करिअर आहे हे माहिती आहे तरी तिला स्वयंपाक, मुलांसंबंधीचे प्रश्न का ? हे 'म्हणजे केवळ जाणून घ्यायचे आहे' या कुतूहलातून येत नाही, तर मुलीने ते करायचे आहे या अपेक्षा असतात. हे प्रश्न तिला विचारणे 'स्वाभाविक' वाटणे यामागे 'ते तिचेच काम आहे' हे मग्रूर गृहीत आहे. ते समर्थनीय मुळीच नाही. घराबाहेरचे करिअर असलेल्या एखाद्या मुलीने स्वतःहूनच तुला 'स्वयंपाक येतो का ? घर, मुले सांभाळता येतील का ? ' असे प्रश्न विचारले तर तुझे तिच्याबद्दलचे होणारे मत आणि तुझे या प्रश्नांना उत्तर काय असेल याची स्वतःशीच चाचपणी करून बघावी. (तू मॉर्कूटवर नसतोस असे दिसल्यामुळे इथे लिहीत आहे.)
|
अभिजीत.. सॉरी, तुम्ही लिहिलेल्या एकाही प्रश्नामधला प्रश्न मी विचारत नाही.. "सरकारी नोकरी" माझ्या गेल्या तीन पिढ्यामधे कुणाची नव्हती.. आता तर ती मिळायची शक्यताच नाही. पगार किती घरात कोण कोण आहे. शिक्षण किती हे बेसिक प्रश्न झाले.. आपली मुलगी एखाद्या घरात देण्या आधी कुठलेही आईवडील हे विचारणारच ना.. मला विचारण्यात आलेले प्रश्न कदाचित तुम्हाला सम्जले नसतील... एका मुलाcया वडीलानी माझ्या आईला विचारलं "एका मुलीनंतर सात वर्षानी तुम्हाला मुलगा आहे. यामागे काही खास कारण आहे का?" जाऊ दे हा पूर्ण वेगळा विषय झाला... बी, तू काय लिहिले आहेस हे तुला तरी समजतय का? कॉल सेंटर हे वाईट फ़िल्ड कुणीही म्हटलेलं नाही. तिथे काम करताना soft skills हवीतच ही गरज नाही.. soft skills माझ्या क्षेत्रात लागतात. आणि हे तुझे काही गोष्टी स्त्री करू शकते आणि पुरुष काही गोष्टी करू शकतो, हे विधान मला पटत नाही. निसर्गाने दोघामधे केलेला फ़रक हा इथला विषय नाहिये. आणि हल्लेच्या मुलाना कोवळं वगैरे म्हणू नकोस. सर्व समजतं त्याना.. चांगलं वाईट दोन्हीही. कॉल सेंटरचे भवितव्य अंधारात आहे त्यामुळे आपण देशातले किती टॅलंट तिथे अडकवून ठेवणार आहोत हा मुद्दा फ़ार महत्वचा आहे.उद्या दहा वर्षानी हे तरूण काय करतील? कारण जास्त पैसा कमवायची त्याना चटक आहे. लाईफ़स्टाईल त्याची प्रीमीयम रेंजमधे आहे. खुर्चीवर बसून त्याना काम हवय.. दहा वर्षानी जेव्हा हे लोक घर कुटुंबवाले असतील तेव्हा काय करतील? श्रमाचे काम त्याना नको हवं असेल. त्याचा अनुभव त्याना फ़ार फ़ार तर telephone operator चा जॉब देईल. किंवा DEO चा. तेव्हा त्याची व्यसनाधीनता त्यानाच नव्हे तर त्याच्या पुढच्या पिढीला बरबाद करेल.. तेव्हा देशाची हालत काय होईल??? हा मुद्दा महत्वाचा आहे. बाकीचे मुद्दे, उदा. कामाचे तास अथवा भरमसाठ उधळपट्टी हे "जनरल" मुद्दे बनत चालले आहेत. सर्वच क्षेत्राना त्याचा फ़टका जाणवतोय.
|
Bee
| |
| Monday, January 28, 2008 - 10:43 am: |
| 
|
जर त्या मुलांना चांगल वाईट ह्याची जर समज असेल तर ती मुल नक्कीच ह्याचाही विचार करतील की १० वर्षा नंतर त्यांचे भवितव्य काय असेल. म्हणून मी त्यांना कोवळी मुल म्हंटले आहे कारण एकतर ती शिक्षण पुर्ण करत नाहीत आणि कमी वयात नोकरीला लागतात. भारतात रोजगाराचा किती मोठा प्रश्न आहे. एक विचार असाही येतो की जर असे क्षेत्र हा बेरोजगार कमी करू शकत असतील किंवा ज्यांना तातडीने पैशाची.. नोकरीची गरज आहे त्यांच्या गरजा भागवू शकत असतील तर भारताचे अनेक मेंदू ह्या कामात अडकून पडले आहेत असा विचार का करावा. अनुभव कुठलाही असो तो वाया जात नाही असे माझे मत आहे. १८ हजार हा काही फ़ार मोठा पगार झाला नाही. काटछाट करून हाती किती येतो? हल्ली सरकारी नोकरी करणार्यांचेही पगार वाढलेत.. वाढताहेत. दुसर्या विषयाबद्दल.. जर नोकरी करणार्या मुलींना मुलांनी असे प्रश्न विचारलेले आवडत नाही तर त्या मुली स्पष्ट पण नम्रपणे ती गोष्ट तिथेच मुलांसोबत आणि आईवडीलांसोबत चर्चा करताना का बोलून दाखवित नाहीत. माघारी मुली खूप चुका काढतात. हे चित्र बदलायला हवे. नंदीनी, मी लिहिलेल नक्कीच मला कळत. इतरांनाही कळतं असे वाटते. आता तुझ्यासारख नाही जमत लिहायला.. soft skill चा problem
|
मागील दोन चार दिवसातील लोकसत्तात याच विषयावर एक लेख आलेला हे! अन मला तो शोध शोधुन सापडत नाही, कुणाला मिळाल्यास लिन्क द्या! शर्मिला, गुड टोपिक! मी येतोच नन्तर!
|
Prasadp77
| |
| Monday, January 28, 2008 - 11:13 am: |
| 
|
@Nandini, You have a raised a decent question about blocking talent in call centers but I wonder if you are offering any other chance/job (in terms of idea) to these guys who can at least start their life in our Indian job culture of cut-throat life? For this point, I second Bee. The other questions that you have raised in the last paragraph (their position/career/life in next 10 years) have to be deliberated by the individuals working in this industry. If they don't realise them, I feel and will feel sorry for them. Since early childhood I have always been bombarded with a statement, its my life and its in my hands if I should make it or mess it. These are supposedly mature individuals and they should engrave it on their brain. Family and friends can only show them a path and it will be solely their decision what they should do. One request, please tone down in your comments. Few comments I read up above felt a bit arrogant.
|
हे सगळे discussion काल सेन्टेर वर केन्द्रित होत आहे-आय टी क्षेत्रावर नाही
|
नन्दिनी, स्लार्टि. मी ते सहज गंमत म्हणुन लिहिले होते.स्मायली टाकता येत नाहित अजुन म्हणुन तुमचा गैरसमज झाल कि काय? आणि नंदिनी मी फक्त तुला जे काहि मजेशीर प्रश्न वाटले तसेच मला मजेशीर वाटलेले प्रश्न टाकले. मला त्यातले प्रश्न क्र ४ आणि ७ जरा खटकलेच. बाकि ठिक आहेत नेहमीचेच आहेत. असो तर स्लार्टि तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाहि असेच आहे. सगळ्या साधारण भारतीय पुरुषांप्रमाणे माझीहि अपेक्षा हिच आहे कि मी नोकरी करावी आणि बायकोने घर संभाळावे. जसे नंदिनी नमुने बघते आहे मी सुध्धा त्यातलाच एक नमुना आहे. मुलगी बघायला गेलो होतो तेंव्हा सरळ सांगीतले कि मी घरात काहि काम करत नाहि घराची पुर्ण जबाबदारी तुझ्यावर असेल. तु घरात पैसे कमविण्यासाठि नोकरी करायची गरज नाहि. तुला हवे असेल तर नोकरी कर तुझ्या साठि पण जे काहि करशील ते घर संभाळुन करावे लागेल. पत्रिका न जुळल्या मुळे तिच्या बिचारीच्या नशीबी अस संकुचित विचाराचा जोडिदार नाहि आला!!!!!!!!!!!!! छे फारच विषयाला सोडुन लिखाण झाले राव. नेमस्तक पोस्ट विषयाला सोडुन असली तरि नंदिनी आणि स्लार्टि ने वाचु पर्यंत राहु द्या. विनंती.
|
प्रसाद, मराठीतून लिहावे ही नम्र सूचना... बघा लगेच टोन डाऊन झालेय... बी, या मुलाना चांगले वाईट समजतं पण बेफ़िकीरीची वृत्ती वाढतेय.. मेरा कुछ बुरा नही हो सकता हे मानणारी ही मुलं आहेत. कॉल सेंटरच्या अनुभवाचा इतरत्र उपयोग नाही. कॉल सेंटर्स आज आहेत, उद्या असतील किंवा त्यात इतका पैसा असेल हे नक्की नाही.. तेव्हा ही मुलं आणि आपण (शेवटी कुठेना कुठेतरी या सर्वाचा भारतात राहणार्या प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होईलच ना?) काय करणार आहोत? प्रसाद, तुम्ही मला मी काय सोल्युशन ऑफ़र करू शकेल हे विचारलेलेल आहे. माझ्याकडे या समस्येला उत्तर नाही.. मात्र जी मुलं आज कॉल सेंटरमधे जाऊ इच्छितात किंवा जात आहेत त्याना यातले धोके आणी खाच खळगे (त्याच्या पालकाना पण..) मी नक्कीच समजावून सांगते. हा माझ्या परीने मी केलेला प्रयत्न आहे. कॉल सेंटरची आलेली नोकरी न घेण्याचा अजून एक मूर्ख निर्णय.. बी तुला १८ हजार हा पगार FY, SY ला असताना कमी वाटतो?? आणि हा पगार अख्खा हातात पडतो PF वगैरे भानगडी अर्थातच नसतात. वर एखाद्या रीजॉर्टमधे पिकनिक, पिक्चरची तिकीटे, असले बरेच पर्क्स पण असतात. आणि दुसर्या विषयाबद्दल, मी माघारून चुका काढलेल्या नाहीत. तिथल्या तिथे स्पष्टपणे मी त्या बाबी मांडलेल्या आहेत. कित्येक मुलाना तर ठोकलय असं म्हणायला हरकत नाही. ते नमुने पण तसलेच होते. त्याबद्दल इथे चर्चा नको. नेमस्तक वेगळा बीबी आहे का हो या विषयावर?? अभिजीत, तुम्ही ते गंमत म्हणून लिहिलेत असे वाटले नाही. त्यामुळे घोळ झाला असावा.
|
Dineshvs
| |
| Monday, January 28, 2008 - 12:19 pm: |
| 
|
झालं नेहमीप्रमाणे विषय भरकटला, मायबोलीच्या रितीला साजतेच म्हणा ते. शर्मिला, हि चर्चा योग्य त्या मार्गाने आणि विषयाला धरुन व्हावी, याची जबाबदारी कुणीतरी घ्यायला हवी.
|
नंदिनी, कांदा पोहे चा बिबि आहे ना याच साठी. तु मागे त्या बिबि वर एक पोस्ट टाकली सुध्धा होतीस त्यावर. घोळ झाला असता. पण तुझ्या स्मायली ने तो निस्तरला असे वाटतं. काॅल सेंटर ची तरुण वर्गात वाढती लोकप्रियता बघुन भिती वाटते हे खरे. पण मुलांना कितीही समजावुन सांगितले तरी पटत नाही. माझे दोन मित्र डिप्लोमाला माझ्या सोबत होते, फायनल ईयर ला दोन विषय राहिले. ती परिक्षा द्यायला सहा महिने आहेत म्हणुन त्यांनी काॅल सेंटर चा जोब स्वीकारला. आता तीन वर्षे झाली तरी अजुन डिप्लोमा पुर्ण झाला नाहिच. मी त्यांना काहि सांगायला गेलो तर ते माझ्यापेक्षा किती सुखी आहेत हे मलाच सांगत बसतात. पैसे, यायला जायला गाडी, ओव्हर टाईम, चिकण्या चिकण्या चांगल्या चांगल्या घरातल्या गर्लफ़्रेंड, वगैरे वगैरे. मुली त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावुन काम करीत असल्या तरी यांचे विचर आणि त्यांच्याकडे बघायचा द्रुष्टिकोण काही बदलत नाही लोकांचा. यांचे भवीतव्य काय आहे यांनाच ठावुक. सध्यातरि ऐश करायला मिळतेय ना मग बघु पुढचे पुढे असाच द्रुष्टिकोण आहे सगळ्यांचा
|
बरोब्बर.. अभिजीत, माझे बरेच मित्र आणि मैत्रीण मला हेच सांगतात. सुरुवातीला तू पण इकडे ये सांगणारे लोक चार वर्षानी तुझ्या कंपनीमधे आम्हाला जॉब मिळेल का हे विचारत आहेत.. कामाच्या वेळा, उलट सुलट दिनचर्या हे नंतर त्रास देऊ लागतं हे पटतय आता त्याना. ही अक्कल लवकर सर्वाना येऊ देत म्हणजे मिळवली.
|
जर एखादा टिन एज मधे अशी चूक करीत असेल त त्याला समजवावे लागणे ठिक आहे. ते वयच असतं अल्लड. खुप काही चूकिच्या गोष्टींचे आकर्षण तेव्हा वाटते. पण जेंव्हा २५-२६ वर्षाची लोकं मला असे स्पष्टिकरण देतात तेंव्हा मात्र मला प्रश्न पडतो कि खरंच यांना यांच्या भविष्याची चिंता कशी वाटत नाहि? कसं कळत नाही कि ही नोकरी मला कायम स्वरुपी आधार देउ शकत नाही.
|
Nandini, Pub madhye janyat kay motha modern pana ahe? Jila don payavar chalata yete ti pub madhye jau shakel. Overdose of Shopping and eating out ... hya vait savai ahet. Tyala mothya tondani ka .. mi kahi tari great karate" ase dakhavates. Ani mulani vicharale ... cooking yete ka .. yat chuk kay ahe ... jyala je have te tyane vicharave. Tu adhich ka sangun takat nahis ... ki mla bar madhye jane avadate, bharamsat shopping avadate, baherach khate, cooking yet nahi ... ratri pub madhyech basate ... mhanje kase ... mulana tuzyavar time waste karayachi jaruri nahi. Ani rahila vishay paishacha ... tar tu tuzya ayushat jitake kamavnar nahis titake mi ek mahinyat kamavato ... tyamule paishachi badabad band kar. Lihi ata yala uttar.
|
Call center madhye kam karanaryana je karayache te karu dya ki. Apan kon sanganar kay barobar kay chuk. Kay karun karun karanar? ... daru, drugs, ..ajun kay? Karu det ... hi lokashahi ahe. Te mhananat na ... paisa alyavar manus kay karato ? ... tar apala khara swabhav dakhavato ... Kahi jani bar madhye jatat, shopping madhye paise udavatat ... tya kahi kuthe samaj seva karat nahi ... Ek vaya geleli dusari la mhanate ki tu vaya geli. Kara ata mala ban ya chat varun ... spashta bolalo mhanun ... konitar spashata bolanare asalech pahije
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|