Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 27, 2008

Hitguj » Views and Comments » General » आयटी आणि कॉल सेंटर कल्चर » Archive through January 27, 2008 « Previous Next »

Sharmilaphadke
Saturday, January 26, 2008 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आयटी आणि कॉल सेन्टर कल्चर मुंबई आणि पुण्या सारख्या शहरांत आणि लहान गावांतही आता चांगलेच स्थिरावले आहे. तरुण वयात नोकरीच्या अगदी सुरुवातीपासूनच भला मोठा पगार, त्यामुळे अकस्मात बदललेला कुटुंबाचा आर्थिक स्तर, कामाच्या अनिर्बंधीत वेळा, ताण-तणाव हे सारेच आयटी आणि कॉल सेन्टर कल्चरचे पार्ट आणि पार्सल म्हणून आपण समाजात सामावून घेतलेले आहेच. पण ह्यात कित्येक घराची संस्कृतीच फक्त बदलत नाही तर समाजाची किंवा एका शहराचीच संस्कृती पूर्णपणे बदलते.
अपेक्षा अशी आहे की कॉल सेन्टर आणि आयटी कल्चरचा सामाजिक आणि कौटुंबिक ह्या दोन्ही स्तरांवर होणारा परिणाम स्वानुभवातून किंवा ऐकलेल्या घटना, अनुभवातून चर्चिला जावा. ह्यात स्त्रियांचे प्रश्न जसे महत्वाचे म्हणजे कौटुंबिक जबाबदार्‍या निभावणे, नोकरीच्या वेळांमुळे निर्माण होणारे सुरक्षिततेसारखेही प्रश्न तसेच इतरांचीही म्हणजे त्यांच्या कुटुंबियांची, समाजाचीही काही वेगळी भुमिका, बघण्याचा दृष्टीकोन असू शकतो.


Sharmilaphadke
Saturday, January 26, 2008 - 10:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्याही प्रश्नाचे गांभीर्य स्वत्:च्या घरापर्यंत तो येऊन पोचल्याशिवाय कळत नाही. माझ्या भाचीने एकोणीसाव्या वर्षी ती कॉलेजात शिकत असतानाच आणि पुढे परदेशात उच्चशिक्षण घ्यायची तयारी करत असतानाच कॉलसेन्टरमधे जॉब सहज मिळतोय, केवळ छान इंग्लिश बोलता येण्याच्या आणि स्मार्ट ऍपियरन्सच्या जोरावर तर करुन बघावा ह्या सहज हेतूने पवईच्या एका नामवंत कॉलसेंटरमधे दोन वर्षांपूर्वी जॉब घेतला. सहा महीन्यांतच तिचा पगार अठरा हजार आणि कामाच्या वेळा दिवस-रात्रीचे कोणतेही प्रहर मिळून दहा ते चौदा तास अशा झाल्या. अत्यंत ब्राईट बुद्धीच्या ह्या मुलीने मग कॉलेजचे शेवटचे वर्ष जेमतेम पासक्लास इतके मार्क मिळवून पुरे केले. परदेशात शिकायला जावे किंवा एमबिए करावे असा तिचा विचार कधीच मागे पडला. सुरुवातीला खुष असणारी माझी बहीण आणि तिचा नवरा हळूहळू चिंताग्रस्त झाले कारण भाचीचा सोशलच काय पण कौटुंबिक संवादही पूर्णपणे तुटला. तिची बदललेली लाईफ़स्टाईल, काहीसा ऍडव्हेन्चरस झालेला फ़ॅशन सेन्स, पार्टीजचे वाढलेले प्रमाण आणि मुख्य म्हणजे बेफ़ीकीर वृत्ती ह्यांनी इतक्या झपाट्याने तिच्यात बदल घडवून आणला की आम्हीही सारेच अगदी चकीत झालो. तिच्या लग्नाच्या विचाराला अजून वेळ आहे पण सतत त्याच कल्चरमधल्या तरुणांशी संबंध आल्यावर ( शिक्षण जेमतेम पूर्ण करुन भरपूर पगार मिळवणार्‍या) जर त्यांच्यापैकीच कुणाशी लग्न जमवले तर च्या धास्तीत बहीण आणि घरकाम शिकणे, स्वयंपाक ह्या कोणत्याच प्रकाराकडे जराही लक्ष देत नाही म्हणून आजीला चिंता आणि बहीणीच्या मिस्टरांना तिच्या शैक्षणिक करिअरचा खेळखंडोबा झाला म्हणून राग अशा परिस्थितीत घराचे वातावरण पूर्ण बिघडलेले आहे हे मला जाणवलेच पण त्याबरोबर ह्या प्रश्नामागची सामाजिक बाजूही जाणवायला लागली. लग्नानंतर जेव्हा तिचे स्वत्:चे कुटुंब (?) बनेल आणि अशी अनेक आत्तापर्यन्त बनलेली असतील तेव्हा नक्की कसे असणार त्यांचे स्वरुप? आणि मग ह्या कुटुंबांना सामावून घेताना समाजाला कशाप्रकारे मोल्ड व्हावे लागणार? हे आणि असेच प्रश्न मनात डोकावले ज्यांची उत्तरे अजून मिळत नाहीयेत.
भाचीच्या नव्या मैत्रीणी कॉस्मो कल्चरच्या आहेत तशाच तिच्यासारख्याच ब्राम्हणी घरांतून आलेल्या सुद्धा आहेत. त्यांचे आत्तापासूनच सहज पैसे उडवणे, भरमसाठ शॉपिन्ग, काहींच स्मोकींग, ड्रिंकींग आणि इतरही अशाच सवयींबद्दलची सहजता पाहून मन दचकते.


Hkumar
Saturday, January 26, 2008 - 10:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काॅल सेंटर संस्कृतीमुळे आता सर्व कमावती मंडळी 'पुरूष' च झाली आहेत. 'स्त्रीपण' असलेली स्त्री आता शोधावी लागेल!

Vijaykulkarni
Saturday, January 26, 2008 - 3:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काॅल सेंटर संस्कृतीमुळे आता सर्व कमावती मंडळी 'पुरूष' च झाली आहेत. 'स्त्रीपण' असलेली स्त्री आता शोधावी लागेल!

'स्त्रीपण' म्हणजे काय
दिवसभर नवर्‍याची वाट पहत घरी बसणे आणी
तो आल्या आल्या त्याची सेवा करणे?

काहींच स्मोकींग, ड्रिंकींग आणि इतरही अशाच सवयींबद्दलची सहजता पाहून मन दचकते.

या बाबातीत स्त्री आणी पुरुष असा भेदभाव का?

शिवाय या सार्‍या गोष्टी रिलेटिव्ह आहेत.
सत्तर वर्षान्पुर्वी महाराष्ट्रात 'चहा पिवू नये'
आणी 'स्त्रियानी नऊवारीच नेसावे, गोल साडी नव्हे'
असे वाद झाले होते.
कालाय तस्मी नमह.


Zakki
Saturday, January 26, 2008 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दारू, सिगरेट पिणे मुलांनाहि वाईटच. तसे केल्याने 'आपण थोर्‍यामोठ्यांच्या सांगण्याविरुद्ध काहीतरी करतो, आपण केव्हढे मोठे आता' असे त्या वयात स्वाभाविकपणे वाटत असतेच. फक्त आमचे मोठे लाच खाणे, कामे न करणे, सार्वजनिक जागी अस्वच्छता असे करत, तसे आम्ही करणार नाही असे तेंव्हा सुचत नाही. कुणि सांगितले तरी न ऐकण्यातच शहाणपण आहे असे वाटते!

त्यात स्त्री पुरुष असा भेदभाव नाही. गोल साडी नेसणे हे स्त्रियांना नि सिगारेट पिणे पुरुषांना असे 'मोठे' झाल्याचे प्रदर्शन करता येत असे. आता जरा पुढची पायरी म्हणजे दारू पिणे!

बहुधा आजकाल तरुण स्त्री पुरुष जातपात मानत नाहीत हे चांगलेच नाही का? तसे चांगले काम करणारे अनेक तरुण, तरुणी आहेतच की. त्यांच्याकडे बघा ना. बाकीच्यांच्याकडे दुर्लक्ष करा. खुद्द आपल्या घरच्यांनी सिगारेट, दारू असले धंदे केले तर त्यांना सभ्यपणे सांगावे, तू मोठा झालास (झालीस), पण अक्कल काही नाही हो आली तुला!

नाहीतरी मी म्हणतोच की वयाची चाळीस वर्षे होइस्तवर कुणाला एक पैशाइतकी सुद्धा अक्कल येत नाही. मग पन्नाशीपर्यंत जरा जरा कळू लागते!


Sharmilaphadke
Saturday, January 26, 2008 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विजय कुलकर्णी आणि झक्की ह्या दोघांची पोस्ट्स बीबीच्या विषयाशी काहीच संबंध नसलेली कां आहेत?

Savyasachi
Saturday, January 26, 2008 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो विकेंड आहे, त्यांच त्यांनाच माहीत नसेल कोणता बाफ आहे, आपण काय बोलतोय वगैरे वगैरे :-)

Sunilt
Saturday, January 26, 2008 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शर्मिला, इथे विषयाशी संबंधीतच पोस्ट लिहायचा नियम अजिबातच नाही. आणि त्यातून त्यांच्या पोस्ट काही अगदीच अवांतर नव्ह्त्या. संबंधीतच होत्या.





Slarti
Saturday, January 26, 2008 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hkumar, पार्ट्या करणे, सिगरेट ओढणे, दारू पिणे, बेफिकीर जगणे इ. गोष्टींनी स्त्रीचे 'स्त्री'पण कसे जाते ? किंवा ते करणारे 'पुरुष' कसे होतात ? जीवनपद्धतीवरून पुरुषपण अथवा स्त्रीपण ठरते असे वाटत नाही आणि कुठलीही जीवनपद्धती एका लिंगाची मक्तेदारी वा व्यवच्छेदक लक्षण असू शकत नाही. असो.
कॉलसेंटरमध्ये 'सहजगत्या' मिळणार्‍या पैशांमुळे short term विचार केला जातोय. स्वतःच्या गुणांचा पूर्ण विकास न करणे, long term career कडे दुर्लक्ष करणे हे मला जास्त धोकादायक वाटते. वर सांगितलेल्या जीवनपद्धतीत अजून एक धोका आहे तो ताबा सुटण्याचा कारण पुरेशी जाण नसलेल्या वयात या गोष्टी मिळत आहेत. तेव्हा खालिल गोष्टी करता येतील -
१. पालकांनी मुलांना लहानपणापासूनच त्यांच्यातील potential ची नीट जाणीव करून देणे. ते वापरणं आणि वाढवणं दोन्ही अत्यावश्यक आहे हे त्यांना कळले पाहिजे.
२. कॉलसेंटरच्या नोकरीच्या मर्यादांची स्पष्ट करणे, पैसा हाच प्रगतीचा निदर्शक मानला तरी तोसुद्धा दीर्घ कालाचा विचार करता इतरत्र जास्त मिळतो हे सहज दाखवता येईल. तिथे केवळ दहावी पास होण्याची क्षमता असणारासुद्धा तुझ्याइतकाच कमावतो / दहावी पास आणि पदवीधारक तिथे एकाच लायकीचे आहेत इ. उदाहरणे देऊन त्या नोकरीच्या मर्यादा अधोरेखित करणे आवश्यक आहे.
३. मित्रमंडळीचा दबाव जबरदस्त असतो. तेव्हा त्या दबावाला बळी पडण्यामागचा फोलपणा मुलांना पटवून देता येतो. शिवाय त्या दबावाला बळी न पडण्यासाठी घरच्यांनी proactive मदत करणे आवश्यक आहे. उदा. तुला ही नोकरी नक्की कशासाठी करायची आहे, त्यासाठी दुसरे काही पर्याय उपलब्ध आहेत का जे long term मध्ये जास्त फायदेशीर ठरू शकतील आणि अनुभव / पैसा कमावण्याची इच्छाही पूर्ण होईल इ. प्रश्नांवर चर्चा करणे. यामुळे मुलांना या बाबीचे वेगवेगळे पैलू समजण्यास मदत होईल. शिवाय मोठ्यांना मुलांची बाजू समजायला मदत होईल ते वेगळेच. संवादाला पोषक वातावरण असणे सर्वात महत्वाचे.
४. येवढे पगार मिळतात याची कल्पना असता 'त्या पैशांचे काय करण्याचा विचार आहे' हा प्रश्न उपस्थित करणे अवश्यक आहे. त्यामुळे त्या पैशांचे नक्की काय करायचे याबद्दल मुलांच्या विचारास निश्चित दिशा मिळेल.
५. चैन करणे व ताबा सुटणे यातला फरक समजावणे उदा. सिगरेट, दारू इ. गोष्टी मजेसाठीच्या catalyst आहेत, आवश्यक नव्हेत हे मुलांना कळणे महत्वाचे आहे. त्या गोष्टी करणे वाइट नसून त्यांच्या कह्यात जाणे चूक आहे हे समजले पाहिजे.
६. खुद्द पालकांनी जीवनपद्धतीतील या काही बदलांकडे नकारात्मक बघणे थांबवले पाहिजे. हे बदल अनिवार्य आहेत, ते थोपवायचे नसून पचवायचे आहेत. तेव्हा प्रत्येक बदलाकडे चांगल्या-वाईटाच्या चष्म्यातून बघण्याची घाई करू नये. या बदलांकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले तर त्या बदलांचे माध्यम असलेली मुलेसुद्धा आपल्या सूचनांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतील.

मी त्या नोकरीला विरोध मुळीच करत नाही. जुजबी पात्रतेच्या आधारे थोड्या काळात बर्‍यापैकी पैसे कमावण्याचा उत्तम मार्ग आहे.
सहज मिळतेय म्हणून नोकरी घेतली, ठिक. पण तिथेच अडकून राहिलात तर तुमच्या आयुष्यात value addition काय होणार आहे ? पैसेसुद्धा जे मिळतात ते घसघशीत नाहीत.... निदान क्षमतेला साजेसे तर नक्कीच नाहीत. हे सर्व कळण्याएवढी प्रगल्भता त्या वयाच्या मुलांमध्ये असते का ? म्हणून मी पालकांना जास्त (पूर्ण नाही) जबाबदार धरतो.


Vijaykulkarni
Saturday, January 26, 2008 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

1 Call center jobs do not add to our experience at all.
There is no personal growth or enrichment. A person with 5 year experience in a real job is very valuable for the company. The company will think twice before firing him. A person with 5 years experience in call center is worth the same as a fresher. Call center job can not be a career.
People in Banglore are realizing it now.

2 If a company is paying 18 thousand for a job which needs no skills above speaking phaad phaad english, what will the company do if someone
else is ready to do it for 10 thousand only? What if chinese are ready to do it for 5 thousand only?

3 In early twenties it is easy to sustain irregular working hours, night shifts etc etc. What happens when the person becomes 30+, The company will replace him with a young ( and cheap) person in no time.

In short , call center may be a good option to make some quick money during college days, It should NEVER be viewed as a career. In fact in America call center jobs are considered to be the worst of the worst dead end jobs.


Sunilt
Saturday, January 26, 2008 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ती आणि विजय कुलकर्णी तुम्ही कॉल सेन्टर जॉबबाबत अतिशय योग्य असे मुद्दे मांडले आहेत.

शर्मिला, आयटी आणि कॉल सेन्टरला एका तागडीत तोलण्याची गरज नाही. आयटीसाठी एक किमान शैक्षणिक अर्हता लागते जी कॉल सेन्टरला नाही. दुसरे म्हणजे आयटीत पुढे जाण्याच्या अनेक संधी असतात जसे की, प्रोजेक्ट लीडर, प्रोजेक्ट मॅनेजर, डीबेई इ. जे कॉल सेन्टरमध्ये अजिबातच शक्य नसते.

दुसरे एक क्षेत्र आहे ते म्हणजे non voice based BPO , यात back office ची सगळी कामे जसे की accounting इ. केली जातात. इथे अगदी आयटीसारखे करियर करता जरी नाही आले तरी कॉल सेन्टरसारखेसुद्धा नाही.


Jadoo
Saturday, January 26, 2008 - 11:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>तशाच तिच्यासारख्याच ब्राम्हणी घरांतून आलेल्या सुद्धा आहेत

याचा अर्थ काय होतो???? कोणी सांगेल का?


Malavika
Sunday, January 27, 2008 - 2:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

slarti यांना अनुमोदन. तुम्ही अगदी बरोबर मुद्दे मांडले अहेत. विजय कुलकर्णी यांची पोस्ट इंग्रजीत असल्यामुळे वाचल्या गेली नाही. विषयांतर होतेय पण कृपया मराठीत लिहा.

Sharmilaphadke
Sunday, January 27, 2008 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्टी, विजय तुमचे सगळेच मुद्दे पटले. पालकांनी नकारात्मकता सोडून मुलांना अशा शॉर्टटर्म करियरच्या धोक्यांना समजावून सांगण्याचा मार्ग अवघड खराच पण करायला हवाय. अवघड अशा साठी की विशीच्या आतच वीसहजार सहजपणे (खरंतर सहज असं नाही. तिथे ज्याप्रकारच्या स्ट्रेस मधून ही मुले जातात त्या कडे पहाता हे खरंच सहज नसतं) मिळाल्यावर आणि ते खर्च करुन टाकण्याचे हजारो मार्ग समोर सहज दिसत असताना त्या पैशांचा नाद सोडून परत एमबिए करायला घे असं काही सांगीतलेलं ही मुलं ऐकून सुद्धा घेत नाहीत सुरुवातीला. नंतर दोनेक वर्षांनी अशा जॉबचे तोटे दिसायला लागतात पण तोपर्यंत करियर अभ्यास करुन पुढे नेण्यातला उत्साह टिकत नाही. काही उदाहरणं अशीही आहेत की मुलांनी कॉलसेन्टर मधून पैसे साठवून आपली मेडीकल, इंजिनियरिंगची शिक्षणं पूर्ण केली. पण ती खूपच दुर्मिळ.
लहान गावांमधून जी मुलं मुंबईमधे शिकायला येतात त्यांना कॉलेजच्या नोटिसबोर्डवर अशा नोकर्‍यांची जाहीरात दिसते आणि पैशांची खरंच गरज असल्याने ते जॉब घेतात. इंजिनियरिंग आणि मेडीकल कडे वळू पहाणारी कित्येक मुलं कॉल सेन्टर कडे वळलेली आहेत. आता खरंपहाता मेडीकल, इन्जिनियरिन्गला जाऊन अजून एक डॉक्टर आणि अजून एक इन्जिनियर बनून तसेही काही फार वेगळं कोणीच करत नसतं आजकाल कारण फार कमी संशोधनात्मक काम ह्यातले कोणी करतात. पण तरीही कॉल सेन्टर करियर हा यावर उपाय नाहीच.

सुनिल मला आयटी आणि कॉलसेन्टर एका तागडीत अजिबातच तोलायचं नाही. फक्त कामाच्या भरमसाठ वेळा, भरपूर पगार ह्यामुळे कुटुंबांची बदलती संस्कृती, स्त्रियांवर लग्नानंतर ह्या करियरचा पडणारा ताण ह्यात साम्य असल्याने, त्यावरही चर्चा करणं सोयीच जावं म्हणून खरंतर ते मी एकत्र शब्द घातलेत.

जादू, ब्राह्मणी घरांतून आलेल्या ह्या शब्दांना काही विशिष्ट अर्थ नाही. फक्त एक समान पार्श्वभूमी दाखवायला मी ते लिहिले. उपनगरातले मराठी मध्यमवर्गीय असं तिथे घातलं तरी चालेलं.



Sharmilaphadke
Sunday, January 27, 2008 - 6:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नैतिकता आणि अनैकतिकता हे कितीही रेलेटीव्ह शब्द आहेत असे मानले तरी कॉलसेन्टर्स मधल्या पैशांमुळेच पब्-रेव्ह कल्चर मुंबई ( इथे परत मुंबई मधे ते आधीपासूनच होतं वगैरे कोणी म्हणायच्या आधीच सांगते की मी मुंबईच्या मध्यमवर्गीय उपनगरांबाबत बोलतेय) पुण्यात अफ़ाट बोकाळलय आणि ह्यातून खरंच वाईट प्रकार चालतात. जे मुलं-मुली दोघांसाठीही वाईटच.
समाजाची ही घसरण म्हणायची की कल्चरल अपग्रेडेशन? म्हणजे मध्यमवर्गीय संस्कारांतून हायब्रो संस्कृतीत जातेय नवी पिढी तर जाऊदेत इतकंच म्हणायच आणि आपल्याला त्याची सवय करुन घ्यायची?


Hkumar
Sunday, January 27, 2008 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अशा ठिकाणी काम करणार्‍यांना कित्येक शारिरीक व मानसीक व्याधी ऐन पंचविशीत जडल्या आहेत हा या विषयाचा अजून एक पैलू.

Raviupadhye
Sunday, January 27, 2008 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Please pardon me for writing me in English.
I have been closely associated with IT friends who are working on SAP implementation in large multinationals(working in those companies on deputation as implementation partners through large companies like TCS,IBM etc).I have also worked in manufacturing sector.To metypical differences are
-No or little social networking at workplace,its always-me and my computer or client across globe-a faceless entity
-Tremendous work pressure due to nature of deadlines
-Very unresonable demands from clients compounded by non clarity of scope and cusomer's lack of knowledge of software's capabilities
-Extremely poor living conditions offered to people on deputation (even to very highly qualified people in even companies like TCS-6 people to a room,no transport provided,unhyienic food at place of living)
-Frequent change in location due to short tenure nature of project
-Continuously chnaging companions/clients at workplace
-Technlogical absoloscence
-Unearthly working hours,no exercise,late sleeping
-Away from family for months together
Compared to this ,I found all other sectors of employment had some method in "madness"-be it working hours,time spent with families,and time available for oneself,to develop teamwok with colleagues,developing lifetime partnership.
I have no solution to offer -but I heard that implementation partners and functional experts of SAP working abroad are not stretched like this-at least they have semblance of regulated working hours-is tha true?

Vijaykulkarni
Sunday, January 27, 2008 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणजे मध्यमवर्गीय संस्कारांतून हायब्रो संस्कृतीत जातेय नवी पिढी तर जाऊदेत इतकंच म्हणायच आणि आपल्याला त्याची सवय करुन घ्यायची?

दुर्दैवाने याचे उत्तर हो असे आहे.
फार तर आपल्या मुलाना यातले खाच खळगे सान्गून ठेवणे इतकेच आपल्या हातात आहे. बाटली बाहेर आलेला हा राक्शस पुन्हा बाटलीत जाणे नाही.
शर्मिलाजी, तुमची प्रामाणीक कळकळ मला समजते. पण एखाद्या हाय ब्रो मुलीने तुम्हाला "कोल्ह्याला द्राक्षे आम्बट" असे म्हणले तर काय उत्तर आहे?
आपणे तरी साने गुरुजी सन्स्क्रुती कितिवेळ कवटाळून बसणार? मुलाना नाही पटत ते. तुका म्हणे उगी रहावे जे जे होयील ते ते पहावे.



Zakki
Monday, January 28, 2008 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I have no solution to offer -but I heard that implementation partners and functional experts of SAP working abroad are not stretched like this-at least they have semblance of regulated working hours-is tha true?

तीस वर्षे या क्षेत्रात काम केल्यावर या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे आहे असे मला वाटते. इथली कामाची पद्धत जरा वेगळीच आहे. उगीचच हे काम इतक्याच वेळात झाले पाहिजे, असे नुसते म्हंटले की लोक गुलामासारखे खाली मुंडी घालून कामाला लागत नाहीत, दहा प्रश्न विचारतात. नि सरळ सांगतात, हे एव्हढे जमायचे असेल तर अमुक अमुक लोकांनी अमुक अमुक करायला पाहिजे नि त्यांनी ते नाही केले, तर तुमची जबाबदारी!

मी कन्सल्टिंग कं त होतो, पण गिर्‍हाईकाला खूष करण्यासाठी आपल्याच लोकांना असे गुलामासारखे वागवायचे अशी इथे पद्धत नाही. मॅनेजर म्हणून माझी जबाबदारी की मी काहीहि करून गिर्‍हाइकाला पटवून द्यायचे की हे एव्हढे काम करायला एव्हढा वेळ लागेल. ते मला जमले नाही तर माझी नोकरी जाईल, काम करणार्‍यांची नाही.

विशेषत: तुम्ही म्हणता तशी कामे करणारे लोक मिळणे कठिण, त्यांना पैसेहि जास्त द्यावे लागतात. उगाच त्यातला एक जण सोडून गेला तर ... हि टांगती तरवार सगळ्याच मॅनेजरांच्या डोक्यावर असते. भारतात असे का नाही? उगीच 'फाड फाड' इंग्रजी बोलता आले की बास, अश्या प्रकारची कामे नव्हेत ही. त्याला बरीच अक्कल नि शिक्षण लागते.


Dineshvs
Monday, January 28, 2008 - 3:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉल सेंटर्स नसलेल्या कंपन्या, या क्षेत्रातील तरुणांकडे, उमेदवार म्हणुन बघत नाहीत. या क्षेत्रातला अनुभव, बाकि कुठल्याच क्षेत्रात विचारात घेतला जात नाही, त्यामुळे या तरुणाना, मनात आणले तरी ते क्षेत्र सोडणे शक्य होत नाही.

त्यामुळे या क्षेत्रात काम करताना, ते काहि मर्यादित काळासाठीच करता येईल. जर क्षेत्र बदलायचे असेल तर परत पहिल्यापासून सुरवात करावी लागेल, त्या काळाची तरतूद म्हणुन हा पैसा राखावा, असा सल्ला, मी तरी देईन.
एकाच व्यक्तिवर इतका ताण येऊ देण्यापेक्षा, एक काम दोन जणात वाटून दिले आणि कामाचे तास मर्यादित केले, तरी बरेच प्रश्न सुटतील.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators