|
Upas
| |
| Monday, December 31, 2007 - 3:46 pm: |
| 
|
>>हिंदूंवर अत्याचार करणार्या मुसलमानांचे राज्य इथे त्याने कसे चालू दिले? >>मग त्याच पेशव्यांचे राज्य इंग्रज बुडवत असताना कुठे गेले होते देव? अहो झक्की अंतु बर्वा नाही ऐकलेंत वाटतं.. हे सगळं त्या राजीवड्यावरच्या काशीविश्वेवराच्या चक्रनिमिक्रमेण चालू, ब्रम्हदेवाच्या एका सेकंदातले खेळ हो हे.. आहात कुठे? ~D
|
Mansmi18
| |
| Monday, December 31, 2007 - 11:54 pm: |
| 
|
झक्की, तुमची new year party सकाळीच सुरु झालेली का हो? . त्याशिवाय तुम्ही जसे लिहिले ते लिहिले जाणार नाही. तुमच्या उथळ लिखाणाला टाळ्या वाजविणार्यांच्या मतानी हुरळुन जाण्यात अर्थ नाही. तुम्हाला लहानपणा पासुन पडलेले प्रश्न सुटले नाहीत यात तुम्हाला थोडे आत्मपरीक्षण करावे लागेल असे वाटत नाही का? हिंदुंचा देव, मुसलमानांचा देव, ख्रिस्ती लोकांचा देव असे काही असते का? क्षणभर मानले की असे वेगवेगळ्या धर्माचे देव आहेत तर तुम्हाला असे का वाटत नाही कि इन्ग्रजांच्या देवाने किंवा मुघलांच्या देवानी त्याना मदत केली आहे आणि आपल्या लोकांची भक्ती कुठेतरी कमी पडली.. थोरले माधवराव पेशवे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवाय परकीय शक्तींचा धोका ओळखण्याचा द्रष्टेपणा इतर महाराष्ट्रीय किंवा इतर प्रांतातल्या फ़ार कमी राज्यकर्त्यामधे होता आणि हेच परकीय शक्ती प्रबळ होण्याचे कारण ठरले हे कोणी शाळकरी पोरही सांगेल. यात देवाने काय आणखी करायला हवे होते? देव म्हणजे तुम्हाला काय तुमचा नोकर वाटला का? तुम्हाला हवे तसे वागायला? देवाने विचार करायला तारतम्य, बुद्धी दिलेली आहे त्याचा वापर केला नाही आणि स्वत: स्वत:च्या पायावर धोन्डा घालुन घेतला तर त्याचे खापर देवावर फोडणे कितपत योग्य आहे? दुसरी गोष्ट..तुम्ही संत एकनाथ महाराजांबद्दल इतक्या हेटाळणीने का लिहिले आहे ते कळले नाही. तुम्ही संत एकनाथ महाराजानी केलेल्या तपश्चर्येबद्दल नीट वाचले नाही वाटते. ते म्हणजे काही congress चे पुढारी नव्हते कि त्यानी अस्पृश्याना vote bank म्हणुन जवळ केले. नुसते असे करुन ते संत झाले असे तुम्हाला वाटले की काय? राहिली गोष्ट काळी जादु वगैरे..ते एक थोतांड आहे..काळ्या जादु करणी वगैरे भाकड्कथा आहेत यावर दुमत नसावे पण त्याचा देवाशी तुम्ही संबंध का जोडता ते कळत नाही. असो. नववर्षाच्या शुभेच्छा. ||एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा|| ||हरीकृपे त्याचा नाश आहे||
|
Radha_t
| |
| Tuesday, January 01, 2008 - 4:01 am: |
| 
|
इन्ग्रजांच्या देवाने किंवा मुघलांच्या देवानी त्याना मदत केली आहे आणि आपल्या लोकांची भक्ती कुठेतरी कमी पडली देव म्हणजे तुम्हाला काय तुमचा नोकर वाटला का? तुम्हाला हवे तसे वागायला? कित्ती contradictory कित्ती contradictory तुमची new year party सकाळीच सुरु झालेली का हो? मोठ्यांबद्दल काही आदर नावची गोष्ट असते का हो? मोठे जाऊ द्या पण दुसर्याबद्दल काही? आणि एकनाथ महाराजांबद्दल एक सत्य बाब समोर आणली आहे. यात हेटाळणी कुठे झाली हो? आणि मुद्दा योग्यच आहे, ज्ञानेश्वरांच्या कुटुंबियांना वाळित टाकलेले विसरलात काय? सरळ आहे ते काही सावकार नव्हते. ते सावकार असते तर कदाचीत त्यांनाही वाळीत टाकायची कुणाची हिम्मत झाली नसती. आता पुन्हा यात मी ज्ञानेश्वरांची हेटाळणी केली असे म्हणु नका.
|
Mansmi18
| |
| Tuesday, January 01, 2008 - 4:22 am: |
| 
|
राधा, १. out of context संदर्भ देउन दीडशहाणे comments करणे यात तुमचा हात कोणी धरणार नाही. तुम्हाला वितंडवाद घालण्यात जास्त रस आहे हे तुम्ही आधीहि सिद्ध केले आहे. २. तुम्ही दुसर्याला नम्रता शिकवण्याआधी स्वत: कसे लिहिता ते पहा. ३. संत एकनाथ महाराजांबद्दल त्यानी काय सत्य बाब समोर आणली आहे ही वकिली करणार्या तुम्ही कोण?? मला जे काय सांगायचे असेल ते त्याना मी direct लिहिले आहे. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
|
Zakki
| |
| Tuesday, January 01, 2008 - 2:19 pm: |
| 
|
अरे अरे. राधा, मनस्मि, भांडू नका हो. आपापसात भांडून काय उपयोग? मी जे लिहीले त्यावर वर उपास यांनी अत्यंत मुद्देसूद उत्तर दिलेले आहे. एकदा देव म्हणजे काहीतरी उच्च कोटीची कल्पना असे म्हंटल्यावर फुटकळ गोष्टींवरून देवाची गंमत केली तरी देवाला काऽही होत नाही. तर आपण कशाला भांडा? प्रत्येकाने आत्मपरिक्षण केल्यावर त्याला देवाचे तेच स्वरूप दिसेल, अनुभवाला येईल, असे नाही. तेंव्हा मला आत्मपरिक्षण करून पहा म्हणून सांगण्याचा तुम्हाला काही उपयोग नाही. केवळ दुसर्याचे भले व्हावे या उद्देशाने तुम्ही सल्ला देत असाल तर धन्यवाद. उगीच कुठेतरी ज्यांना तुम्ही पाहिलेहि नसेल, ते लोक, देव म्हणून जे काही आहे, कल्पना, सत्य (जे नक्की सगळ्यांना पटले नाही) त्याबद्दल काय लिहीतात, यावरून भांडणे करायची गरज काय?
|
Hkumar
| |
| Wednesday, January 02, 2008 - 5:55 am: |
| 
|
देवा ( जर असलास तर! ), या भांडणार्यांना क्षमा कर!
|
Zakki
| |
| Thursday, January 03, 2008 - 12:31 am: |
| 
|
अनुमोदन! अहो भांडून काही होत नाही. मला देवाबद्दल काय वाटते ते देवाला पक्के ठाऊक असणार याबद्दल मला खात्री आहे. निदान माझ्या मते, देवाला कळते, मी केंव्हा गंमत करतो आहे, नि केंव्हा (जेंव्हा केंव्हा) त्याची मनोमन प्रार्थना करतो! आता माझ्या सौ. ने मला म्हंटले मागल्या वर्षी एक जानेवारीला आपण देवळात गेलो नि मग तुम्हाला छान नोकरी मिळाली. ती आता गेली. तर यावर्षीहि एक ता. ला आपण नक्की जाउ, म्हणजे या वर्षीहि तशीच नोकरी मिळेल! आता हे कुणाला पटेल? मला तर नाहीच. पण मी गेलो. कारण त्या देवळात उत्तम पैकी इडल्या डोसे पण मिळतात! आता मी जर नोकरी मिळवण्याचे प्रयत्न करण्या ऐवजी दिवसभर झोपा काढल्या नि नुसता इथे येऊन दिसेल त्याची नि त्या विषयाची टिंगल टवाळी करत बसलो, तर मला नोकरी मिळेल का? मग मी नुसता रोज देवळात जाऊन देवाला नमस्कार करून आलो तरी नाही मिळणार! कारण माझ्या देवाचा माझ्या नोकरीशी काऽही संबंध नाही. त्याला फक्त मनोभावे प्रार्थना केली तरच पोचते, नाहीतर त्याला काही interest नाही मी काय करतो, बोलतो, लिहीतो.
|
ईथे काही लोकांच मत अथवा अनुभुती अथवा दावा म्हणा... असा आहे की देव नाही..! जी गोष्ट नाही असे तुम्हाला वाटते त्यासाठी एव्हढा आटापिटा कशाला?... मी तुम्हाला असे सांगितले की तुम्ही नाही आहात. तर तुम्ही काय म्हाणाल?... काय तुम्ही माझ्याशी वाद तरी घालाल का की हे सिद्ध करा म्हणुन... तुम्ही क्वचितच लक्ष द्याल आणि ह्या वेडगळपणाकडे लक्षच देणार नाही... कारण तुम्हाला पक्के माहीती आहे की तुम्ही आहात आणि माझे म्हणणे हे खोटे आहे. तुम्ही हे तरी मान्य करता की तुम्हाला अस्तित्व आहे... देवाचे अस्तित्व तुम्ही मान्य करा न करा.. तुमचे अस्तित्व तरी आहे की नाही?... देव नाही असे म्हणणारी radha_t तरी आहेच आहे. आपल्याला चव लागते जिभेला... ती कशी लागते?... आपण जे पाहतो ते कसे पाहतो?... आपल्या शरीरात जर 108 मुलद्रव्यापलीकडे काहीच नसेल तर मग आपल्याला मी अशी जी भावना येते ती कुठुन येते?... मग नाहीतर आपण म्हणजे काय निव्वळ chemicals आहोत?... देवाला विसरुन जा पण आपल्याला " स्व " चे अस्तित्व आहे हे मान्य करावेच लागते... ईंद्रीयांच्या पलिकडे कोण आहे?... एक साधी गोष्ट पहा... आपल्याला साधा चहा करायचा झाला की काय काय करावे लागते? ... दुध असावे लागते.. ते आदले दीवशी दुकानातुन आणावे लागते. .... साखर असावी लागते, .... पाणी.. प्यायचे भरुन ठेवावे लागते. .... ईंधन ग्यास लागतो. त्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि तो घेवुन येणार्याला पाच रुपये द्यावे लागतात... वर. आणि मग त्यावर चहा करण्यासाठी चे ज्ञान ही लागते.. तेव्हा कुठे चहा बनतो.... मोठ मोठी projects जेव्हा देशापरदेशात होतात तेव्हा कीतीतरी गोष्टींचे planning करावे लागते... आपण जन्मतो, आपण खाल्लेले पचते... आपण विचार करतो.. आपल्याला आठ मिनिटे प्रकाषवर्श दुर असलेल्या सुर्याकडुन प्रकाष मिळतो मग आपले अन्न होते... आपल्याला दुसयांचे आकर्शण वाटते.. प्रेम वाटते.. मग प्रजनन होते... ............आणि हे सर्व योगायोगाने होते?........ म्हणजे तुमचे चहा करण्याला पण planning आनि managemant लागते आणि बाकी सर्व मात्र योगायोगाने होते?....... वा!! धन्य धन्य आहे मग तुमची..! आणि जी गोश्ट नाही हे माहीती आहे त्यावर ईथे पोस्ट काय लिहीता?.. जे नाही आहे ते नाहीच आहे.. जी मुळातच नाही ती नाहीच ना?... ... देव नाही म्हणणार्यांनी चहा करावा आणि तो देव आहे म्हणणार्यांना द्यावा....
|
Zakki
| |
| Monday, January 07, 2008 - 1:30 pm: |
| 
|
देव आहे, देव आहे!! कुठाय् चहा? चांगला आले घालून करा. थंडीच्या दिवसात बरा असतो.
|
Slarti
| |
| Tuesday, January 08, 2008 - 6:33 am: |
| 
|
'मी अस्तित्वात आहे' हे अतिशय खोल, बहुपदरी विधान आहे. यातील अक्षरशः एकेका शब्दावर चर्चा घडते.... हो, अगदी 'आहे' या शब्दावरसुद्धा. थोडा विचार केला तर या विधानामागील गृहीतके व तदनुशंगिक प्रश्न यांची जंत्री तयार होण्यास सुरुवात होते. उदा. अस्तित्व म्हणजे काय आणि असणे म्हणजे काय ? आहे या क्रियापदातून जो 'काल' अपेक्षित आहे तो नक्की कोणता ? आणि तो तसाच का अपेक्षित आहे ? इ. इ. असो. तरी इथे काही विषयोचित प्रश्न उपस्थित करावेसे वाटतात. सर्व सजीवांमध्ये 'स्व'ची जाणीव आहे का ? असल्यास तिचे स्वरूप काय आहे ? अमीबा, जेलीफिश, कुत्रा, वडाचे झाड व मानव यांच्यात जी 'स्व'ची जाणीव असेल ती सारखी आहे हे आपण आता ठामपणे म्हणू शकत नाही. दोन विभिन्न सजीवजाती जाऊ दे, माझ्या अस्तित्वाची मला असलेली जाणीव व माझ्या अस्तित्वाची दुसर्यास असलेली जाणीव हीच सारखी नाही. (किंवा, माझ्या अस्तित्वाची मला असलेली जाणीव व दुसर्याच्या अस्तित्वाची मला असलेली जाणीव हे सारखे नाही). दोन मानवी मेंदू अगदी तंतोतंत सारखे नसतात. तर त्या दोघांच्या जाणीवेमध्ये जे फरक आहेत त्यात या शारीरीक फरकांचा हात किती हे आधी जाणून घ्यायला पाहिजे. थोडक्यात, माझी 'स्व'ची जाणीव व तिचा कार्यकारणभाव समजून घेण्यासाठी मला माझ्या व इतर सजीवांच्या जाणिवेतील फरक समजून घेणे आवश्यक आहे. मेंदूची रचना (मेंदू असला तर) व 'स्व'ची जाणीव यांचे नाते समजले पाहिजे. Complexity आणि consciousness यांचा संबंध विचारात घ्यायला हवा. जाणीवांमधील फरक इतर काही भौतिक फरकांचा परिणाम आहे की नाही हे तपासून बघितले पाहिजे. हे सर्व तपासून न बघताच '१०८ मूलद्रव्यांच्या बाहेरचे' असा अधिभौतिक कार्यकारणभाव स्विकारणे घाईचे व चुकीचे ठरेल. दुसरे म्हणजे जिथे ही १०८ मूलद्रव्ये नाहीत तिथेसुद्धा ही 'स्व'ची जाणीव आहे का ? मग तिचे स्वरूप काय ? थोडक्यात, ही जाणीव या मूलद्रव्यांच्याशिवाय अस्तित्वात येऊ / असू शकते का ? या प्रश्नांची उत्तरे आवश्यक आहेत. त्यासाठी अधिभौतिकीकडे वळण्याआधी भौतिकीकडे याची उत्तरे नाहीत / नसतील याची खात्री करून घेणे आवश्यक वाटत नाही काय ? शेवटी एकच... देव आहे असे म्हणणार्यांना चहा मिळत असेल तर मीही म्हणतो देव आहे कारण माझ्या (?) अस्तित्वाच्या (?) मला (?) असलेल्या (?) जाणीवेला (?) चहाचे अस्तित्व (?) देवापेक्षा (???) जास्त जाणवते...
|
धोंडोपंत, स्लार्टीच्या पोस्टच्या अनुषंगाने पुढे: देव नाही असे आम्हाला वाटत नाही. असेलही. शक्यता कुणी नाकारली नाही. इथे चर्चा चालु आहे ती त्या संकल्पनेला सिद्ध करण्यासाठी वापरल्या जाणार्या थेअरीज, पुरावे, मार्ग, पध्धती इ.इ. ची. जसे स्लार्टीने लिहीले तसे एकदम अधिभौतिकात शिरुन देव आहे'च' असे देव मानणारे म्हणतात. विरोध त्याला आहे. तुम्ही ह्या बीबीच्या सुरुवाती पासुनच्या पोस्ट्स जर वाचल्यात (विशेषत स्लार्टी व आश्चिग ह्यांच्या) तर तुम्हाला हा युक्तिवाद अधिक ठळक व सुस्पष्टपणे लक्षात येइल. बाकी झक्कींच्या 'देव ही एक संकल्पना' ह्यावरील एक-दोन ओळींच्या पोस्ट ह्या बीबीचे सार आहे. त्या तुम्हाला ऑगस्ट महिन्यातल्या पोस्ट्स मध्ये सापडतील.
|
Maanus
| |
| Wednesday, January 09, 2008 - 5:28 am: |
| 
|
What is wrong with Christians?
click here if you want to see the complete book This is one insane book another page from book The last point from Fill in the Blanks section, makes it all clear. तुम्हाला संध्यानंद सारखा TP करायचा असेल तर ही news वाचा Indians-seek-help-from-Visa-God
|
Slarti
| |
| Wednesday, January 09, 2008 - 12:57 pm: |
| 
|
सागर, तू हे कुठून कुठून शोधून काढतोस रे ? १९५४ सालचं ख्रिश्चनांचं 'activity book' ( = 'विकासमाला' !! )... बाकी अमेरिकन व्हिसालाच साक्षात देव मानणारे कैक लोक माझ्या प्रत्यक्ष परिचयाचे आहेत.
|
Divya
| |
| Wednesday, January 09, 2008 - 2:30 pm: |
| 
|
सर्व सजीवांमध्ये 'स्व'ची जाणीव आहे का ? असल्यास तिचे स्वरूप काय आहे ? अमीबा, जेलीफिश, कुत्रा, वडाचे झाड व मानव यांच्यात जी 'स्व'ची जाणीव असेल ती सारखी आहे हे आपण आता ठामपणे म्हणू शकत नाही. दोन विभिन्न सजीवजाती जाऊ दे, माझ्या अस्तित्वाची मला असलेली जाणीव व माझ्या अस्तित्वाची दुसर्यास असलेली जाणीव हीच सारखी नाही. slarti तुम्ही जे म्हणताय ती जाणीव ही बाह्य जाणीव आहे. जे चैतन्य आत्मस्वरुप जिवंतपण देत ते सगळीकडे सारखच आहे. जस electricity जर आत्मस्वरुपाचे उदाहरण म्हणुन घेतले तर, it dosent matter कि ते computer चालवते कि tv चालवते कि छोटासा nightlamp. electricity शिवाय काहीही चालु शकत नाही हे सत्य आहे. अमिबा काय, झाड काय आणि इतर प्राणीमात्र काय सगळ्यांमधे आत्मस्वरुपच वास करुन आहे. बाह्य जाणीवा वा कार्य या प्रत्येक electricity वर चालणार्या वस्तु सारखे वेगवेगळे असले तरी.
|
Maanus
| |
| Wednesday, January 09, 2008 - 9:06 pm: |
| 
|
http://reddit.com .. .. .. Reddit is social news website, people like you and me post the news and then again people like you and me vote those news. as the particular news starts getting more and more votes it comes to front page. new submissions can be found on new tab. These days you'll mostly see politics news over there, but there are many subsection where you can find news to particular topic, like programming, science, politics and stuff like that. Another popular news site is digg.com, but mostly new news comes to reddit first then it goes to digg.com and later to slashdot.org follow it, its fun, you'll be amazed how many new things you can discover everyday 
|
Slarti
| |
| Thursday, January 10, 2008 - 3:52 am: |
| 
|
मुद्दा हा की जिवंतपणा हा भौतिक संकल्पनांद्वारे समजून घेता येईल का ? चैतन्य आत्मस्वरूप वगैरे इमारती मजबूत तार्किक असतीलही, पण मुद्दा हा की त्या इमारतीत कधी जावे, किंबहुना, मुळात तिथे जाण्याची आवश्यकता आहे का ? एक निरीक्षण : चैतन्य आत्मस्वरूप इत्यादी संकल्पना याबद्दल विविध अध्यात्मिक विचारधारांमध्ये एकवाक्यता आढळत नाही.
|
Yog
| |
| Thursday, January 10, 2008 - 4:33 am: |
| 
|
>>एक निरीक्षण : चैतन्य आत्मस्वरूप इत्यादी संकल्पना याबद्दल विविध अध्यात्मिक विचारधारांमध्ये एकवाक्यता आढळत नाही. पण या सर्वाचा देव असणे वा नसणे शी सम्बन्ध काय...? आणि समजा असलाच तरी अध्यात्मीक दृष्ट्याही तुम्हाला भेटलेला देव अन मला भेटलेला देव सारखाच असेल कशावरून..? नसला तर अनेक देव आहेत असा अर्थ होतो का...? या चर्चेचा आदी अन्तही मला आता देवासारखाच भासू लागला आहे "अगम्य"! गोरा कुम्भार, सन्त तुकोबा याना मातीत दगडात देव दिसला, त्यान्नी अनुभवला अस म्हणूया, आणिक कुणाला हजार वर्षे तप करूनही नाही भेटला.. अनुभूती इतकीच काय ती खरी बाब बाकी सर्व subjective आहे. आन्धळा अन डोळस यात फ़क्त एका प्रकाशकिरणाचा फ़रक आहे, मग आन्धळा आयुष्यभर असे म्हणू शकतो की प्रकाश अस्तित्वातच नाही.. किव्वा एखाद्या आन्धळ्यालाही मनःचक्शून्समोर एखादा वेगळाच प्रकाश भासतो असे तो म्हणू शकतो... तात्पर्य, अनुभूती, आणि ती घेण्याची इन्द्रीयशक्ती ही ज्याची जशी तसे त्याचे मत... यातून जे "आहे" त्यात बदल कुठे होणार आहे? तेव्हा देव म्हणजे काय या अतीरन्जक चर्चेला आता पूर्णविराम द्यावा. या thesis मधून कितीही रन्गिबेरन्गी models बनवली वा इतर सयुक्तिक निष्कर्श काढले तरी शेवटी जिथे अनूभूतीच नाही तिथे सर्व फ़क्त कही सुनी आहे. आमच्या एका अतीविद्वान मित्राने इथे फ़ुलपाखराच्या उडण्याच्या trajectory/path चे गणीतीक समिकरण मान्डून दाखवले and this was only one part of his PhD in Mathematics तेव्हा ते मोठे समिकरण आणि त्यामगचे सर्व स्पष्टीकरण वाचून झाल्यावर म्या पामराने म्हटले," वाह! महान आहेस लेका, अगदी व्य्वस्थित मान्डल आहेस तुझ समिकरण, पण गड्या तेव्हड फ़ुलपाखरू त्याच मार्गाने उडताना दिसल तर किती बर होईल.. यावर त्याच उत्तर अस होत: that is not the goal of my thesis.. असो. या निमित्ताने आम्चे इथले जुने जाणकार मित्र धोन्डोपंत यानी चहा मागितल्यावर देव म्हणजे काय ही कहाणी साठा उत्तरी सुफ़ळ सम्पूर्ण झाली.
|
Slarti
| |
| Thursday, January 10, 2008 - 5:12 am: |
| 
|
>>> अनुभूती इतकीच काय ती खरी बाब बाकी सर्व subjective आहे. नाही, अनुभूती हीच मुळात subjective आहे हे लक्षात येणे महत्वाचे. (हाच मुद्दा मी असंख्य वेळा असंख्य प्रकारे मांडला आहे.) अध्यात्मिकदृष्ट्या मला भेटलेला देव व तुम्हाला भेटलेला देव यात फरक असेल, असू शकतो हे मान्य करणे (>>> तात्पर्य, अनुभूती, आणि ती घेण्याची इन्द्रीयशक्ती ही ज्याची जशी तसे त्याचे मत... ) म्हणजेच 'अनुभूती' ही subjective आहे हे मान्य करणे होय. त्यामुळे 'जिथे अनुभूतीच नाही...' वगैरे निष्कर्ष थोटे ठरतात. 'या सर्वाचा' व देवाच्या अस्तित्वाचा संबंध 'अनुभूतीकडे objective दृष्टीने कसे बघता येईल ? ' या प्रश्नात दडलेला आहे. अनुभूती व देव यांचा अन्योन्य संबंध मान्य केल्यावर अनुभूतीचा प्रश्न ऐरणीवर येणे साहजिकच आहे. निरीक्षण नोंदवण्यामागचे कारणही तेच. अनुभूती ही subjective नाही म्हणून ती 'खरी' असे सुचवण्याआधी "आपण यात जे गृहीतक धरले आहे त्याची सिद्धता काय ?" हा प्रश्न विचारला तर नंतरची सर्व पुनरुक्ती टाळता येते. जाता जाता... गणिती समीकरण मांडण्यामागे 'निसर्गाने गणित पाळावे' असा हट्ट नसून 'निसर्गाचे गणित समजून घ्यावे' अशी आस असते हे कळाले तर दुर्दैवी गैरसमज होत नाहीत.
|
Yog
| |
| Thursday, January 10, 2008 - 7:05 am: |
| 
|
i think u just iterated my point... गणितात गैरसमज असूच शकत नाहीत, esp. when everything is defined either as real or non real in maths.. निसर्गाचे गणित समजावता येत नसेल किव्वा समजून दाखवण्याइतपत गणिताची व्याप्ती नसेल तर निसर्गा च्या नियमाना छेद देवू नये इतकेच अपेक्षित आहे. अनुभूतीबदल्: साखर गोड लागली ही अनुभूती आहे (चव घेतल्यावर), किती गोड लागली ही subjective अनुभूती आहे.. based on one's taste buds.. खरी अनुभूती ही मूलतत्वाशी जोडून असते, जी सत्त्य का असत्त्य true/not true या मूळ प्रश्णाची उकल करते.. गणीतात ती उकल मान्डून दाखविता येईल पण अनुभविता येणार नाही.. असो, या शाब्दिक उहापोहाचा तथ्यांश वर पंतान्नी उचित मान्डला आहे, तेव्हा अधिक बोलणे न लगे..
|
Slarti
| |
| Thursday, January 10, 2008 - 7:53 am: |
| 
|
साखरेचा गोडपणा हा साखरेतील 'मूलद्रव्यांशी' निगडीत आहे, त्यामुळे साखरेसारखे इतर गोड पदार्थही तयार करता येतात. असो. मुळात 'खरी अनुभूती' हेच सापेक्ष नाही का ? तुमच्या दृष्टीने खरेपणाची व्याख्या 'मूलतत्वाशी' निगडीत आहे, ती व्याख्याच सापेक्ष आहे हे ध्यानात घ्या. शिवाय त्यात मूलतत्व ही सापेक्ष संकल्पना आहे ते वेगळेच. हे सर्व दृष्टीआड केले तरी शेवटी, अनुभूती ही 'खरी' आहे की 'खोटी' हे फक्त अनुभूती घेणारच जर ठरवू शकत असेल, ते फक्त त्यालाच कळत असेल तर objectvity कशी येईल ? गणितात ही सापेक्षता नाही, त्यामुळे गणिताला 'ती' उकल करता आली तर ती उकल सत्य म्हणून स्विकारावीच लागेल, तुमचे अध्यात्मिक विचार काहीही असले तरी. गणित विनाअनुभूती उकल करते हे त्याचे सामर्थ्य आहे, मर्यादा नव्हे... आणि गणिताची व्याप्ती कुठपर्यंत आहे हे गणिताद्वारे मांडले तरच ते गणिताला स्विकारार्ह होईल. हे महत्वाचे आहे. पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो, गणिताच्या मर्यादांबद्दल गणित स्वभाषेत बोलू शकते, बोलते. तेव्हाच त्याची खरी व्याप्ती कळेल. गैरसमज गणितात असूच शकत नाहीत हे खरे, ते गणिताकडे बघण्याच्या दृष्टीकोनातून होतात.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|