|
Mansmi18
| |
| Saturday, December 08, 2007 - 1:41 pm: |
| 
|
मी लिहिलेले कुठेतरी "लागलेले" दिसते. असो. हा thread आपण hijack करण्यापेक्षा हा विषय इथेच थाम्बवुया का? धन्यवाद.
|
Sunilt
| |
| Saturday, December 08, 2007 - 1:48 pm: |
| 
|
कोणाला कही "लागलेले" वगैरे नाही mansmi18 . तसे vijaykulkarni नी उत्तर दिलेलेच आहे.
|
Zakki
| |
| Saturday, December 08, 2007 - 5:10 pm: |
| 
|
इथे कुणालाहि काहीहि 'लागत' नाही. सगळ्यांच्या कातडी गेंड्याची असून वर चिलखत घातलेले आहे. शिवाय डोक्यातल्या मेंदूला कायमचे कुलुपात अडकवून ठेवले आहे, त्यामुळे कितीहि वेळा तेच तेच सांगितले तरी डोक्यात शिरत नाही. त्यामुळे कुठल्याहि प्रश्नाला उत्तर देण्याचे बंधन नाही, फक्त आपली एकच एक पुंगी वाजवत बसायचे. असे एकंदरीत या हितगूजचे स्वरूप असल्याने हितगूज अनंत काळपर्यंत टिकून राहील. नंतर देवनागरी लिपी मोडी लिपीप्रमाणे व मराठी भाषा, संस्कृत, प्राकृत या भाषांप्रमाणे नाहीशा होऊन सर्व भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकच भाषा येईल - हिंग्लिश. तसेच पूर्वी भारतात जसे नव्वद टक्के शेतकरी होते तसे सर्व भारतात आता नव्वद टक्के लोक परदेशी कं साठी कस्टमर सपोर्ट चे कर्मचारी बनतील, नि उरलेले राजकारणी बनून त्या लोकांचे पैसे लुटतील. आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे!
|
Sunilt
| |
| Sunday, December 09, 2007 - 3:40 am: |
| 
|
सगळ्यांच्या कातडी गेंड्याची असून वर चिलखत घातलेले आहे. शिरस्त्राण विसरलात?
|
अरेच्चा! कुटे गेले सगळे? सगळ्या नास्तिकांचा देवावर विश्वास बसला कि काय? बारा दिवस या बिबि वर एकहि पोस्ट नाहि म्हणजे काय? आज सकाळ मधे आलेली एक बातमी. किती अस्तिकांचा या गोष्टीला पाटींबा आहे? शिर्डीत साईमूर्तीला दहा कोटींचे सुवर्णसिंहासन आज अर्पण होणार शिर्डी, ता. २९ - साईबाबांचे समाधिमंदिर पुन्हा एकदा सुवर्णतेजाने झळाळणार आहे. मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीसाठी सुमारे ९२ किलो वजनाच्या सुमारे दहा कोटी रुपये किमतीच्या सोन्याचे सिंहासन अर्पण करण्यासाठी बंगळूर येथील एक दानशूर साईभक्त हे सिंहासन घेऊन उद्या येथे येत आहेत. यापूर्वी एका साईभक्ताच्या देणगीतून साडेपाच किलो वजनाच्या सोन्याचा मुलामा वापरून साईमंदिराचा कळस सोन्याचा करण्यात आला आणि साडेतीन किलो वजनाच्या सोन्याच्या साईपादुका करण्यात आल्या. एक किलोचे सोन्याचे पात्र साईमंदिराला भेट मिळाले. आता साईबाबांच्या मूर्तीसाठी तब्बल ९२ किलो सोन्याचे सिंहासन भेट मिळत आहे. सव्वावर्षापूर्वी साईमूर्तीसाठी सोन्याचे सिंहासन तयार करण्याचा निर्णय साईसंस्थानचे अध्यक्ष आमदार जयंत ससाणे यांनी घेतला होता. हा निर्णय जाहीर झाल्यापासून संस्थानच्या दानपेटीत सोन्याच्या देणगीत मोठी वाढ झाली होती. दानपेटीत सुमारे पंधरा किलो सोने व सुमारे एक कोटी रुपये जमा झाले होते. मात्र, प्रसारमाध्यमातून या निर्णयावर उलटसुलट चर्चा झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही या निर्णयास विरोध केल्याने शेवटी संस्थानने हा निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर काही दिवसांतच ऊर्जा प्रकल्प उभारणी करणाऱ्या एका उद्योजकाने बाबांना सोन्याचे सिंहासन अर्पण करण्याची लेखी विनंती संस्थानला केली होती. संस्थानने त्यास मान्यता दिल्यानंतर सहा महिन्यांपासून बंगळूर येथे हे सिंहासन तयार करण्याचे काम सुरू होते.विशेष म्हणजे सोन्याचे कलाकुसरीचे काम करताना एकूण किमतीच्या तीस टक्के मजुरी द्यावी लागते. मात्र, हे सिंहासन तयार करणाऱ्या कारागिरांनी मजुरी घेतली नाही. अप्रतिम कलाकुसरीचा उत्तम नमुना असलेल्या या सिंहासनासाठी ९२ किलो सोने व सुमारे ५० किलो चांदी वापरली आहे. आणि सर्व नस्तिक लोकांना माझा प्रश्न आहे. प्रत्येक गोष्ट विज्ञाने सिद्ध करता येते का? मी स्वताहाला नास्तिक समजायचो पण प्रत्येक ठिकानी विज्ञान नाहि मदत करु शकत. जरा मला सांगू शकाल का, पिंडाला कावळा का शिवतो ते? त्याच्या मागचे सगळे तर्क खोटे आहेत का? कि या गोष्टिवर पण तुम्हा सगळ्यांचा विश्वास नाहि? आणि हो, भात खानारे किती तरि प्राणी या जगात आहेत फक्त कावळेच का येतात तिथे??????????? आणि हो मला माहित आहे कि पिंडाला कावळाका शिवतो याचा या बिबिशी काहि संबंध नाहि. पण जर विज्ञान देव आहे हे सिद्ध करु शकत नाहि म्हनुन देव नाहि असे जर तुम्हि म्हनत असाल तर मग विज्ञान बर्याच गोष्टी सिध्ध करु शकत नाहि त्या सगळ्या खोट्या मानायच्या का? मला या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर नाही मिळाले.
|
Yuga
| |
| Friday, December 21, 2007 - 11:16 am: |
| 
|
पिन्डाला कावळा शिवला तर ते अन्न पितराना पोहोचते असे मानले जाते.. पण फ़क्त कावळाच शिवतो असे काही नाही आहे अभीजीत!
|
युगा, मी एका पिंडाला कोकीळ शिवल्याचे एकले आहे, पण फक्त एकदाच.
|
जरा मला सांगू शकाल का, पिंडाला कावळा का शिवतो ते? त्याच्या मागचे सगळे तर्क खोटे आहेत का? होय, ते खोटे आहेत. घाटावर विशिष्ट वेळी भात ठेवला जातो हे कावळ्याना कळते आणी म्हणून ते येतात. न्यूयॉर्क मध्ये ठरावीक ठिकाणी रोज दुपारी कबूतरे येतात. आमच्या घरी रोज सकाळे एक मान्जर यायचे कारण माझी आई त्याला थोडेसे दूध देणारे हे त्याला कळत होते. म्हणून त्याना दिव्य द्रुष्टी आहे असे मानत नाहीत. प्रत्येक ठिकानी विज्ञान नाहि मदत करु शकत. एखादे उदाहरण द्याल
|
Dineshvs
| |
| Saturday, December 22, 2007 - 3:05 am: |
| 
|
विजय आभार. इथे एकदम मत मांडणे जीवावर आले होते, कारण एकटा पडलो असतो. शिवाय बाकि सगळे विरोधात उभे राहिले असते. पिंडाला कावळा शिवणे, वगैरे प्रकार अगदीच खुळचट आहेत. कावळा कायम अन्नाच्या शोधात असतो, त्याला अन्न ठेवलेले सवयीने कळते. पण पोट भरले असेल किंवा त्याला धोका वाटला, तर तो खाली येणार नाही. मग दर्भाचा कावळा करण्याची सोय आहेच की. म्हणजे भुकेल्या माणसांची आबाळ नको ना व्हायला. पण तरिही एक प्रथा म्हणुन पाळत असलो, तर त्यात मला एक चांगला हेतु दिसतो, कि या निमित्ताने सगळे नातेवाईक एकत्र येतात. मृत व्यक्तीच्या राहुन गेलेल्या इच्छांचा विचार करतात. त्या पुर्या व्हाव्यात म्हणुन काहि संकल्प करतात. जुने वैर विसरले जाते. कावळा शिवण्याचे दडपण न देता, हे झाले असते तर चांगले, पण या दडपणाखाली का होईना, हे होते. विज्ञानावर निष्ठा ठेवणे महत्वाचे. जिथे स्पष्टिकरण मिळत नाही, तिथे तुमचे ज्ञान तोकडे पडते, विज्ञान नाही. त्यामुळे अज्ञानाचीच भक्ती करायची का, हा मूळ सवाल आहे ? आणि समजा विज्ञानाने कार्यकारणभाव समजाऊन सांगितला, आणि होणारा परिणाम दुष्परिणाम असेल तर तो कार्यकारणभाव नष्ट करण्यासाठी तुम्ही काय करता, हे महत्वाचे. उदाहरण द्यायचेच झाले तर ध्रुवीय प्रदेशातला बर्फ़ का वितळतोय, याचे कारण माहित आहे, काय करणार आहात ? तंबाखुमूळे कॅन्सर होतो, हे माहित आहे, प्रत्येक सिगारेटच्या पाकिटावर ते छापलेले असते, मग कुठला धर्म वा देव धुम्रपान करु नका, तंबाखु खाऊ नका, म्हणुन सांगतो का ? ( पारसी लोक सहसा सिगरेट ओढत नाहीत, कारण ते अग्निपूजक असतात, पण तो अपवाद, कारण धर्मानेच नकार दिलाय म्हणुन दारु वा सिगरेट टाळणारे, मुसलमान फ़ारच थोडे. ? विज्ञानाने दिलेल्या एका सुंदर तंत्राचे फ़लित म्हणजे मायबोली. या ठिकाणी पण आपण पिंड आणि कावळा, असल्या गोष्टींची चर्चा करणार आहोत का ? शिक्षणाची एक किमान पातळी, असणारा हा एक समाजघटक आहे, असा माझा समज होता. आता यावरुन इथे वाद पेटेलच. म्हणुन मी बाजुला होतोय.
|
Hkumar
| |
| Saturday, December 22, 2007 - 7:10 am: |
| 
|
दिनेश, अगदी पटले. असल्या विषयांची चर्चा येथे अजिबात होउ नये असे मलाही वाटते.
|
अरे बाप रे, चर्चा बंदच करण्यावर निर्णय कसा काय आल बुवा. आणि अगदि अपेक्शितच उत्तरे मिळाली. असो, तर मी आधि सांगितल्या प्रमाने. मी सुद्धा एक नास्तिक आहे, म्हणजे मुद्दाम झालो असे म्हणाले तरि चालेल. मी या गोष्टीवर विश्वास ठेवायचे कारण म्हणजे, मी हि पिंडाला कावळा शिवण्यचि प्रथा किती खरी आहे ते स्वत अनुभवले. मी सुध्धा आधि या सगळ्या गोष्टिंना अशीच कारणे द्यायचो. पण मी जे पाहिले ते मी नाकारु शकत नाहि. विनायक दादा/ काका आणि हो, तुम्हा सर्वांचा देवावर नाहि म्हणजेच काळ्या जादु वर सुध्धा विश्वास नसेल ना. ज्यांना शंका आहे त्यांना त्याची खात्रि पटवून द्यायचि माझी तयारि आहे. तिथे खुप विचार करुन पण मला उत्तर नाहि मिळाले. म्हणुन मी विज्ञान प्रत्येक ठिकाणी मदत करु शकत नाहि असे लिहिले. कोणाच्या भावना दुखवित असतिल किंवा विषय भरकटत असेल तर नेमस्तक माझे पोस्ट उडवतिलच.
|
मी या गोष्टीवर विश्वास ठेवायचे कारण म्हणजे, मी हि पिंडाला कावळा शिवण्यचि प्रथा किती खरी आहे ते स्वत अनुभवले. म्हणजे नक्की कसे? आणी केवळ एका व्यक्तीच्या अनुभवावरून एखादी गोष्ट खरी असे विज्ञान मानीत नाही. परिक्षेला जाताना तोन्डात लवन्ग टाकल्यावर चान्गले गुण मिळतात हे मी अनुभवले आहे. पण केवळ माझ्या अनुभवावरून विज्ञान हे मान्य करणार नाही. त्यासाठी शेकडो किन्वा हजारो विद्यार्थ्यान्चा डाटा घ्यावा लागेल. काळ्या जादू ने दावूद इब्राहिम ला मारून टाकायला किती खर्च येइल?
|
अरे बाप रे, घाबरलो ना मी. एवढा अचानक हल्ला.!!!!!!!!!!!!! तोडांमधे लवंग ठेवुन गेल्यावर पेपर सोप्पा जातो. हे उदाहरण आहे कि स्वानुभव? मला पण प्रयत्न करायला हरकत नाहि. पण पिडांला कावळा शिवण्यामागे काहितरि लॉजिक आहे. पितर वगेरे. जे लवंगा मागे नहि. असले तर सांगा. बुद्धिप्रामान्य वाद देव हे सगळे खोटेच आहे असं मानून प्रत्येक गोष्ट बघा असे ना सांगता जे घडतय त्या मागच्या सर्व कारणांचा विचार करुन मग निर्णय घ्या असेच सांगतो ना.? दाउद ला मारण्यासाठि तसेच सीमे वर लढण्यासाठी मी पण काळी जादु वापरायचा विचार करत आहे. सध्यातरि ते कशाप्रकारे ते करतात ते जाणुन घ्यायच्या प्रयत्नात आहे. थोडे विषयांतर पण इथे कोणाला माहित आहे का? विनय दादा मग मी असे समजु का कि तुम्हाला काळी जादु असते हे मान्य आहे. नाहि, खर्च विचारलात म्हणून म्हणतो. दिनेश दादा मी इथे मायबोलि वर सगळ्यांना प्रवेश असेल म्हणुन आलो. मला माहित नव्हते कि इथे शिक्षणाचि अट आहे. नेमस्तक प्रवेश परिक्षा पण घेणार का? शुद्धलेखन हा विषय ठेउ नका, घेणार असाल तर. मी खरेच एक अशिक्षित मुलगा आहे ज्याला वाटले कि मायबोलि सारख्या ठिकाणी मत प्रदर्शन करायला आणि शंका उपस्थित करणर्या जिज्ञासु बालकांना लोक न रागावता उत्तरे देतात.
|
२१ डिसेंबर ला रजिस्ट्रेशन आणि एव्हडे शुद्ध मराठी टंकलेखन??? भरीत भर म्हणजे नेमस्तक वगैरे शेलक्या मायबोली टर्म्सचा वापर?? भारीये राव तुम्ही... आणि सगळ्या पोस्ट ह्याच बीबी वर..
|
तुम्हाला मी बेडेकर काका म्हणलं तर चालेल ना, असो, तर या बिबि वर तुम्ही मांडलेले सर्वच विचार मला पटले. माझ्या विचारांशी जुळले. माझ्या पहिल्या पोस्ट मधे नास्तिक लोकांप्रमाने अस्तिक लोकांना पण एक प्रश्न होता. कोणालाहि त्याचे उत्तर द्यावेसे वाटले नाहि का?
|
बेडेकर काकांच्या पोस्ट वरुन एक कल्पना सुचली. आपन एक शब्दकोश तयार करुयात का जिथे आंग्ल शब्दांचे मराठी प्रतिशब्द पटकन सापडू शकतील. आणि त्याचप्रमाने माझ्यासारख्या लोकांना शुद्धलेखन पण पडताळुन बघता येइल. आता उदाहरनार्थ लिन्क ला मराठी प्रतिशब्द मला आठवत नाहि आहे. अशी लिन्क कुठे असेल तर ती द्या.
|
Sunilt
| |
| Monday, December 24, 2007 - 3:39 pm: |
| 
|
अभिजीत, link ला "दुवा" हा मराठी शब्द वापरता येईल.
|
Zakki
| |
| Monday, December 24, 2007 - 5:24 pm: |
| 
|
काळ्या जादू ने दावूद इब्राहिम ला मारून टाकायला किती खर्च येइल? दावूदची 'काळी जादू' जास्त पावरबाज आहे. एकंदरीतच हिंदूंचे देव इतरांना जरा झुकते माप देतात. मला लहानपणापासून पडलेले प्रश्न: हिंदूंवर अत्याचार करणार्या मुसलमानांचे राज्य इथे त्याने कसे चालू दिले? आणि त्या गाण्यात तर 'खळखळा ओतिल्या मोहोरा', पण तशीच जादू करून मुळात त्या जुलुमी शहालाच का नाही हकलून दिले? पेशवे एव्हढे सनातनी. त्यांनी खुद्द शूरवीर पेशवे बाजीरावांना सुद्धा मस्तानि प्रकरणावरून छळले! मग त्याच पेशव्यांचे राज्य इंग्रज बुडवत असताना कुठे गेले होते देव? तर शेवटी, आपले मन, शरीर तंदुरुस्त राखील, अभ्यास करेल त्याचे पेपर्स लवंग खाल्ली नाही तरी चांगले जातात. स्वानुभव.
|
Radha_t
| |
| Monday, December 31, 2007 - 9:38 am: |
| 
|
झक्की द ग्रेट, आजसे आप हमारे गुरु
|
Zakki
| |
| Monday, December 31, 2007 - 3:05 pm: |
| 
|
ह्या: ह्या:, कसचे कसचे. मी म्हणजे, मला काय, खरे तर मला काही एव्हढे कळत नाही हो त्यातले. म्हणून तर सोप्पे मार्ग शोधून काढायचे. आपल्यामुळे दुसर्याला मदत नाही तरी निदान त्रास होऊ नये. बक्कळ पैसा मिळवून तो जतन करून ठेवावा. मग अगदी कुणावर अवलंबून नको. एकनाथांनी अस्पृश्य लोकांना जवळ केले. काही दिवस गावातले ब्राम्हण बोलले. पण एकनाथ म्हणजे सावकार. त्यांच्याशिवाय गावाचे चाललेच नसते. मग काय बिशाद होती त्यांना वाळीत टाकायची? शेवटी संतपद पावले.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|