|
Peshawa
| |
| Thursday, November 29, 2007 - 4:55 pm: |
| 
|
या उदाहरणावरुन प्राचिन काळापासुन भारतात अध्यात्माच्या मार्गावर अग्रेसर होताना किती सखोल विचार केला याचे महत्व पटतय. देव जाणण्यासाठी त्यान्नी अशी विषिष्ट चौकट बांधुन ठेवली नाही. तर सगळ्याना सर्व प्रकारचे मार्ग जोखण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.>> I beg to differ with Chinya. They did build frameworks and the people who proposed particular framework indeed believed that the framework worked. What happened was that physical force was seldom used in order to gain the followers. Persuasion\debate was the preferred means to spread the ideas. The point of understanding was reached that the frameworks somehow are complementary although on the face of it they might appear otherwise. No body "granted" freedom to choose but freedom of choice was assumed by those who professed their ideas or frameworks. देव या कल्पनेचा तत्कालिन उच्चवर्णीय ( यात फक्त ब्राम्हण नाहीत) गैर फायदा घेतला >> could you elaborate this? because the people who were priests took their job seriously before science/scientific concepts were introduced. They equally believed that if they don't obey their duties then they will suffer retribution from the all mighty! For most of the middle ages there were no BIG improvements in religious systems. Further, I feel "undue advantage" of belief was not at the core of the problem but the belief that the system works was. नास्तिकांनी ती वाचली तर देवाकडे ( वा त्या शक्तीकडे) वेगळ्या दृष्टीने पाहाता येईल. >>> The means that believers use to engage the non-believers are the problem and not the GOD herself. In western countries the Believers have (thumb rule) curtailed freedom of others who differed with them. In India, as I have suggested, curtailing freedom was not part of believing and therefore the debate about God has different contours.
|
Peshwa, not much needed to elaborate that. You see all that karmakadnd, You do this for god, god will do that to you was the mantra earlier. My point was that. नवस बोलने, सत्यनारायनाच्या पुजा घालने, बोकड कापने अनेक व्रत सांगने व करवुन घेने हे सर्व प्रकार म्हणजे गैर फायदा घेने होय. येस but diff is पण नॉन बिलीव्हर युज टु एन्गेज. देव स्वत प्रॉब्लेम कधीच न्हवता. अन नाही. देव मानन्यार्यात पण देव एक की अनेक याच्यात युध्द आहेत. विवेकानंद देव बाबतीत म्हणतात तुम्ही पुजा कराय्ची गरज नाही वा नामस्मरन करायची गरज नाही तर अवती भवती जे पिडीत लोक आहेत त्यांची सेवा करा म्हण्जे त्यातच देव दिसेल. एवढे असुनही ते देवाला मानतात व त्यांचा स्वतच्या म्हणन्या प्रमाने त्यांनी त्या शक्तीला बघीतले, जानले आहे. त्यांचा देवा बद्दल चा दृष्टीकोन वेगळा आहे म्हणुन त्यांचे साहीत्य वाचायला सांगीतले.
|
Radha_t
| |
| Monday, December 03, 2007 - 8:06 am: |
| 
|
जर देव कुणाला कशात दिसतो कुणाल कशात, कुणाला गोर गरिबांची सेवा करण्यात तर कुणाला दगडाच्या मूर्तीत, तर तो खरा कसा असेल. तो तर काल्पनीक झाला. आता तुम्ही म्हणाल हवा तरी तुम्हाला कुठे दिसते ती फक्त जाणवते, वास तरी कुठे दिसतो फक्त जाणवतो. याचा अर्थ तो काल्पनीक आहे असा नाही. पण त्याची जाणीव सगळ्यांना सारखीच होते. गुलाबाचा वास जसा मला येतो तसाच तुम्हालाही येतो. पण देव जर कुणी जाणला असेल तर तो सगळ्यांनी सारखाच जाणलेला नाही. कुणाला कितपत त्याची खरी जाणीव झाली हे कसे समजावे? कदाचीत त्याची जाणीव झाली ही सुद्धा एक कल्पनाच असावी. सहान्च्या पाशातुन सुटल्याशिवाय देव दिसणार नाही सहांच्या पाशातून सुटल्यावर देवाला भेटायची इच्छा तरी रहाते का? का षड्रिपूंच्या पाशातून सुटला म्हणाजे देव भेटला अस तर नाही? किंवा या सहाच्या पाषातून सुटूनही देवाला भेटायची इच्छाच नसेल तर? निश्कर्ष पुन्हा तोच देव काप्लनीक आहे.
|
माझ्यामते ही चर्चा आता बंद व्हायला हवी कारण इथे स्टोरी पुढे सरकतच नाही आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, December 03, 2007 - 5:23 pm: |
| 
|
हे पोस्ट निव्वळ, माहितीसाठी. म्हणजे एखाद्या गंभीर लेखात, चौकट असते तसेच. तेहतीस कोटी देव, असे आपण लहानपणापासून ऐकत आलोय. मला खुप उत्सुकता होती कि नेमकी हि संख्या कुठुन आली. देवळातल्या सगळ्या देवांची गणना केलीय का गावोगावच्या ग्रामदेवतांच्या नावाची यादी केलीय, असे वाटायचे. शेवटी त्याचे उत्तर मिळाले ते असे. कोटि हा शब्द संख्यावाचक नाही, तो आहे गुण किंवा प्रतवाचक. विश्वातील गुणातीत पुरुष म्हणजे त्रिगुणात्मक सूर्य. त्यालाच त्रयी विद्या असे म्हणायचे. या त्रयी विद्या म्हणजे ॠक, यजुः आणि साम हे वेद. या तीन वेदांची प्रतिके म्हणजे भूह, भुVअः आणि स्वः, म्हणजे अनुक्रमे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग. ( हो गायत्रीमंत्रात येतात तेच. ) या तीनही स्थानाचा एक प्रमुख देव आणि त्या प्रत्येक गटात इतर दहा देवता, असे मिळुन तेहतीस देव. त्याची यादी पण देतो. ( यातली बरिच नावे अनोळखी वाटतील ) पृथ्वीस्थानाची प्रमुख देवता, अग्नी, व या गटात, द्रविणोद, तनूनपाद, नराशंस, इडा, नक्तः, उषा, त्वष्ट्र, वनस्पति, स्वाहाकृति, पृथिवी. अंतरिक्षस्थानाची प्रमुख देवता इंद्र. व या गटात पर्जन्य, रूद्र, वायू, मित्र, वरूण, यम, आदिती, सवितृ,धातृ, इन्दु. स्वर्गस्थानाची प्रमुख देवता सूर्य व या गटात, अश्विन, भग, पूषन, वृषाकपि, विष्णु, अजैकपाद, समुद्र, केशिन, वसु, संवत्सर. आता माझ्याप्रमाणे अनेकांची उत्सुकता शमली असेलच.
|
Mansmi18
| |
| Tuesday, December 04, 2007 - 6:56 pm: |
| 
|
राधा, तुमचे प्रश्न अतिशय चांगले आहेत पण मला वाटते त्याची तुम्हाला समाधान होइल अशी उत्तरे या forum वरुन मिळणे मला कठीण वाटतेय. एकतर या forum वर जे तुम्हाला उत्तरे देतात त्यातील कोणीही आत्मज्ञानी नाही(कोणी असले तर मला क्षमा करा). ऐकलेल्या किंवा वाचलेल्या माहिती वरुन (उदा. मी लिहिलेली कविता) ते (माझ्याप्रमाणे) तुम्हाला उत्तरे देत आहेत. उदा:षड्रीपुपासुन मुक्ती मिळाल्यावर कशी अवस्था असते त्याचे उत्तर षड्रीपुमधे लोळणार्या आमच्यापैकी कोणाला माहीत असणे कसे शक्य आहे? त्यासाठी ज्यानी षड्रीपुवर विजय मिळवला आहे त्यानाच विचारले पाहिजे. आणि ही उत्तरे तुम्हाला सद्गुरुकडुनच मिळतील.(इथे सद्गुरु याचा अर्थ भोन्दुबाबा असा क्रुपया घेउ नये!) आमच्या गुरु म्हणतात ज्याला व्याधी झाली आहे तोच जसा डॉक्टर कडे जाउन औषध घेतो त्याप्रमाणे तुम्हाला देवाबद्दल खर्याच शंका असतील तर तुम्हाला सद्गुरुकडुन त्याची नक्की उत्तरे मिळतील आणि तुमचे समाधान होइल. पण तुम्हाला नुसताच वाद घालायचा असेल तर मात्र हा forum अतिशय उत्तम आहे कारण या वादाला काही अंतच नाही. शुभं भवतु||
|
सद्गुरु कसा ओळखावा? माझ्या मते सत्य साईबाबा भोन्दू आहेत. काही लोकान्च्या मते ते सद्गुरु आहेत. खरे काय?
|
कुलकर्नी त्याच उत्तर सोपे आहे कोणी म्हणतात अल्लाच देव आहे, कोणी म्हणतात रामच देव आहे तर कोणी येशु. अन ते सर्वच दुसर्या देवाला देव नाही अस म्हणतात नाही का? तसाच काही आपला प्रश्न आहे.
|
Sunilt
| |
| Wednesday, December 05, 2007 - 6:29 pm: |
| 
|
सत्य साईबाबा म्हणजे ते हवेतून अंगठ्या वगैरे काढणारेच का? त्यांना सरकारने दुष्काळी परिस्थितीत हवेतून गहू - तांदूळ वगैरे काढायला लावले पाहिजे. (असो, माझा शेजारी असलेल्या गुलट्याच्या मॉनीटरवरील फोटोतून माझ्याकडे ते गुरकावून पाहताहेत असा भास होतोय!!)
|
Tiu
| |
| Wednesday, December 05, 2007 - 6:38 pm: |
| 
|
Rather... , सत्यसाईबाबा म्हणजे ते श्रीमंतासाठी हवेतुन सोन्याच्या अंगठ्या, घड्याळं आणि गरिबांसाठी हवेतुन अंगारा काढणारेच ना?
|
Uday123
| |
| Wednesday, December 05, 2007 - 7:17 pm: |
| 
|
बरोबर आहे Tiu सत्यसाई हे हुशार आहेत, गरिबाला सोन्याचे महत्व काय कळणार म्हणुन अंगारा; आणी ( AC गाडीतुन येणार्या) श्रीमंतांना अंगार्याचे महत्व नाही म्हणुन मग सोने.
|
दिनेशभाऊ, गुड पोस्ट! पण फक्त आता, या देवान्ची याच नावाने बारशी कुणी घातली, हे सन्ख्येने येवढेच का तेवढे का नाहीत अशासारख्या प्रश्णान्ची उत्तरे देखिल तयार ठेवा, कस???? D मनस्मी, ऍग्री
|
Zakasrao
| |
| Thursday, December 06, 2007 - 12:06 pm: |
| 
|
मी लिहितोय त्याला काय फ़ार महत्व नाहिये. पण लिहितोच. सत्यसाइ बाबाच्या चमत्कारावर मी पण विश्वास ठेवत नाही. पण त्यान्च्या चॅरिटेबल त्रस्टच काम खुप मोठे आहे. खुप गरिब लिकांची हृदयाची ऑपरेशन तिथे मोफ़त होतात. पेशन्ट आणि त्यासोबत काळजी घेणरा एक माणुस ह्यान्ची ते सोय करतात अगदी महिना महिना राहणे खाणे आणे त्यासाठी अत्यल्प मोबदला घेतला जातो. असे लोक त्याना महान माणनारच ना??? माझ्या मित्राच्या घरी त्यान्चा एक फ़ोटो आहे आणि ते त्यान्ची पुजा करतात रोज. कारन चमत्कार नाही पण त्या मित्राच्या बाबांच ऑपरएशन तिथे झालय. ज्यासाठी दुसर्या हॉस्पिटलमध्ये लाखावर खरच गेला असता त्याऐअव्जी साधारन १०००० मध्ये काम भागल होत.
|
Sunilt
| |
| Thursday, December 06, 2007 - 1:12 pm: |
| 
|
दिनेशभाव, थोडी गडबड वाटतेय तुम्ही दिलेल्या नामावलीत. अंतरिक्षस्थानाची प्रमुख देवता इंद्र. व या गटात पर्जन्य, रूद्र, वायू, मित्र, वरूण, यम, आदिती, सवितृ,धातृ, इन्दु. स्वर्गस्थानाची प्रमुख देवता सूर्य व या गटात, अश्विन, भग, पूषन, वृषाकपि, विष्णु, अजैकपाद, समुद्र, केशिन, वसु, संवत्सर. मित्र आणि सवितृ ही सूर्याची नावे नव्हेत का? (आठवा बारा सूर्यनमस्कार). मग ती इंद्राच्या category त कशी काय गेली बुवा? देवांचेही पक्षांतर??????
|
I beg to differ with Chinya. पेशवा,तुम्ही पोस्टलेलं वाक्य मी लिहिलेल नाहि आहे. मी तर म्हणतो देवाने सरळ सरळ मार्ग दाखवला आहे त्याच्याकडे जायचा. माझ्यामते देवाकडे जायच्या वेगवेगळ्या मार्गांबद्दल,द्वैत,अद्वैताबद्दल चर्चा चांगली होईल पण ती या BB वर नको.
|
Maanus
| |
| Thursday, December 06, 2007 - 3:32 pm: |
| 
|
Morpheus: But then you have to ask yourself, What is reality. then it all gets very complicated.
|
Dineshvs
| |
| Thursday, December 06, 2007 - 4:31 pm: |
| 
|
Sunlit देवांच्या नावात, स्वरुपात प्रचंड उलथापालथ झालीय. हे सगळे श्रद्धाळु वाचकांआ वाचणे कठिण जाईल. मी लिहिलेली माहिती साधार आहे. मला ईमेल केली तर स्त्रोत कळवु शकेन. पण इथे ते अस्थानी ठरेल.
|
Sunilt
| |
| Thursday, December 06, 2007 - 4:55 pm: |
| 
|
दिनेश, इमेल पाठवली आहे.
|
Mansmi18
| |
| Thursday, December 06, 2007 - 10:04 pm: |
| 
|
झकासराव, चांगला मुद्दा. सत्यसाईबाबा भोन्दू आहेत कि नाही मला माहिती नाही. त्यांच्याबद्दल काही वाद आहेत हे मी ऐकलेले आहे. हे असले तरी त्यांचे काही उपक्रम चांगले असल्याचेही मी वाचले आहे. उदा. त्यांच्या काही शिक्षण संस्था उदा. कॉलेजेस, हॉस्पिटल वगैरे आहेत जे भारतात काही चांगले काम करत आहेत. काही दिवसापुर्वी "अनिरुद्ध बापु" यांच्या BB वर पण असाच गदारोळ उठला होता. पण त्यांचेही काही चांगले उपक्रम असल्याचे मी वाचले आहे.(त्यांच्याबद्दल असलेल्या वादाबद्दलही वाचले आहे). काहीही असले तरि हे लोक भारतात भारतातील लोकांसाठी काहीतरी करत आहेत. इथे मायबोलीवर आपल्यापैकी परदेशातील कितीजण भारतातल्या लोकांसाठी (आपले कुटुम्ब सोडुन) काही करतो? इथे आपल्या थंडगार AC ऑफ़िसात बसुन किंवा आपल्या आलिशान घरात बसुन green card, citizenship ची चिंता करत भारतात सामान्य माणसासाठी (भले भोन्दुपणाने का होइना) काम करणार्यांची कुचेष्टा करणे हे कितपत योग्य आहे? असो विषयांतरा बद्दल क्षमस्व!
|
सत्यसाईबाबा भोन्दू आहेत कि नाही मला माहिती नाही. त्यान्च्या हवेतून सोन्याची साखळी काढण्याच्या प्रयोगाची चित्रफीत सुद्धा प्रसिद्ध झाली होती. शिवाय कुचेष्टा त्यान्च्या चमत्कारान्ची होते सामाजीक कामाची नव्हे. असला भोन्दूपणा न करता आणी इश्वरी अवतार असल्याचा दावा न करता सामाजिक काम करणारे बरेच लोक आहेत भारतात. त्यान्ची कोणीही चेष्टा करीत नाही. बरेच दारूभट्टीवाले मटकावाले आपल्या कमाईतून काही भाग लोकाना दान करत असतात. म्हणून त्यान्चे समर्थन होवू शकत नाही.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|