|
Yog
| |
| Thursday, December 20, 2007 - 6:27 am: |
|
|
Ajai, That is one of the three reasons... आणि ते कारण फ़क्त genuinely ज्याना परवडत नाही त्यान्ना लागू केले तर मग वर म्हटले तसे इतर दोन प्रकारात जास्त करून piracy मोडते असे मला वाटते.. असो किम्मत जास्त कमी हे व्यक्तीगत आहे. तुला, मला परवडत असेल, दुसर्या कुणाला खरच परवडतही नसेल... फ़क्त तेव्हडे एकच कारण आहे असे मि म्हणत नाही.
|
Ankyno1
| |
| Thursday, December 20, 2007 - 6:30 am: |
|
|
पायरसी वर अक्सीर इलाज म्हणून आजकाल बर्याच DVD / VCDया budget discs असतात. म्हणजे DVD ची किम्मत रु. ३४ पासून सुरु होते. सरफ़रोश सारखा सिनेमा ही रु.३४ मधे मिळतो. 5.1 Dolby Surround Sound Subtitles Better picture quality अशी खास DVD वैशिष्ट्ये त्यात असतीलच अस नाही. थोडे जास्ती (रु.६९) खर्च केले तर या सुविधा असलेली DVD उपलब्ध आहे. (कल हो ना हो, रंग दे बसन्ती असे सिनेमे (sony bmg) वर आहेत) 'जब वी मेट' सारखा २ महिन्यापूर्वीचा सिनेमा ही budget DVD वर उपलब्ध होतोय. यानी पायरसी ला नक्कीच आळा बसेल. DVD वर सिनेमे बघायचा मुख्य फायदा (मला जाणवलेला) असा की लोणताही सिनेमा घरच्या सर्वान्च्या सोयीनुसार एकत्र बसून बघता येतो. सलग ३ तास वेळ नसेल तर रोज थोडा थोडा बघता येतो. Home Theater system आणि 5.1 channeled DVD असेल तर theater ची मजा घरी लुटता येते. original DVD चा मला जाणवलेले मुख्य फायदा सुन्दर sound & picture quality पण अजूनही सर्व सिनेमे हे budget DVD वर उपलब्ध नाहीत. english तर नाहीच. पण video lib. चा option आहेच ना त्यामुळे मला घरी DVD पहण्याचा पर्यायच बरा वटतो.
|
Ajjuka
| |
| Thursday, December 20, 2007 - 9:16 am: |
|
|
सन्मे, थोडं स्पष्टीकरण... |एक मात्र आहे, बॉलीवुडचे चित्रपट, त्यांची मल्टीप्लेक्समधली तिकिटं आणि त्या कलाकारांना मिळणारे प्रचंड मानधन याचा मेळ घालणं अवघड आहे. | चित्रपटांचा दर्जा हा एकुणातच वादाचा आणि सापेक्ष मुद्दा आहे म्हणून तो बाजूला ठेवू. मल्टीप्लेक्समधली तिकिटं म्हणाल तर देत असलेल्या तांत्रिक व इतर सुविधांचे ते पैसे मुळात आहेत. आणि मग कुठल्या भागात काय रेटने तिकिटे विकत घेतली जातात हा पण मुद्दा आहे. कलाकारांचे मानधन... चित्रपटनिर्मितीच्या क्षेत्रातला कामगार वर्ग ( spotboys, dressmen te junior artists ) आणि निर्माता, पब्लिसिस्ट, वितरक यांच्या ऑफिसमधले कर्मचारी हे सोडता महत्वाचे सर्व लोक free lancer आहेत. त्यांना कायद्याचे कुठलेही संरक्षण नसते. काम होईनासे झाल्यावर येणारा पैसा बंद होतो. पेन्शन हा मुद्द नसतो नाकी प्रॉव्हिडंट फंड सारखे काही. एका प्रोजेक्टच्या नंतर दुसरं प्रोजेक्ट लगेचच असेल असंही नसतं. मानधनाच्या रकमा लोकांपुढे येतात पण हे विसरलं जातं. आणि मग त्या त्या कलाकाराची salebility हा महत्वाचा मुद्दा येतो. किंग खान असल्यावर इतका इतका profit आहे हे उघड गणित आहे. तेव्हा त्या salebility चा फायदा त्या कलाकाराने करून घेतला तर नवल नाही. |आणि सामान्य प्रेक्षकांकडून कितीही पैसे घेतले तरी ते तंत्रज्ञापर्यंत तेवढ्या प्रमाणात पोचत असतील असं वाटत नाही. त्याचा मुख्य हिस्सा नटनट्यांकडे आणि निर्मात्याकडे जातो हे उघड आहे. असो. | येणार्या पैश्यावर कुणाचीच फी अवलंबून नसते. चित्रपट हे एक product आहे. जे काही लोक मिळून बनवतात. ते बनवण्याबद्दल त्यांना त्यांची फी मिळते. पण ते product निर्मात्याच्या मालकीचं असतं कारण ती फी त्याने मोजलेली असते. निर्माता मग ते product वितरकाला विकतो. संपूर्ण किंवा काही अधिकार अबाधित ठेवून. येणार्या नफ्यामधे वितरकाचा वाटा पहिला आणि मग निर्मात्याचा असतो. आजकाल काही नट आपल्या मानधनाऐवजी किंवा बरोबर काही territories मागतात. त्या त्या territory मधे मिळणारा profit हा त्या त्या कलाकाराअचा असतो. पण ह्यात परत saleble factor महत्वाचा ठरतो.
|
अज्जुका तू म्हणतेयस ते बरोबर आहे. पण मी म्हटलं ते वेगळ्याच संदर्भात. पण ते फारसं एक्स्प्लेन केलं नव्हतं कारण तो या बिबीचा विषय नाही. एक्टिंग कशाशी खातात हे माहित नसलेले, बाकी कसलाही टॅलेंट नसलेले (सुनील शेट्टी, ममता कुलकर्णी, किशन कुमार आणि अजून कितीतरी) लोक केवळ बॉलीवुडच्या नावाखाली प्रचंड पैसा कमावतात पण त्याचं जस्टीफिकेशन मिळत नाही म्हणून म्हटलं होतं. पैसा निर्मात्याचा कारण प्रॉडक्ट त्याचं हे मी मान्य करते पण एका यशस्वी चित्रपटाच्या जोरावर एखादा भुक्कड हीरो किंवा हिरॉईन पुढे बरेच चित्रपट खूप पैसा मिळवतात ना. तो आपल्याच खिशातून जातो. असो. खरंच हा मुद्दा फार गुंतागुंतीचा आहे आणि माझा फारसा आक्षेपही नाही या मूर्खपणाला. आपणच जबाबदार आहोत प्रेक्षक म्हणून शेवटी.
|
Slarti
| |
| Thursday, December 20, 2007 - 2:20 pm: |
|
|
हा फक्त business perspective नाहीये, याला कायदेशीर आणि नैतिक बाजू आहेच. 'निर्मात्यांनी परदेशी चित्रपट कॉपी केला आहे / निर्माता कर चुकवतो' म्हणून आम्ही पायरसी करतो ही कुठली नीतीमत्ता आहे ? लोक चूक वागतात म्हणून आपल्या चूक वागण्याचे समर्थन करणे ही तथाकथित रॉबिनहूडी (शेरवुडकर, पुणेकर नव्हे) मानसिकतासुद्धा पायरसीच्या मागे आहे. या प्रतिक्रियात्मक विचाराने सोय (सर्वच दृष्टीने) होते, त्यातून प्रश्न सुटायच्या ऐवजी चिघळतच जातो. प्रेक्षकांनी कुठे काय बघावे हा त्यांचा प्रश्न आहे हे खरे, पण म्हणून कायदा धाब्यावर बसवायचा ? शिवाय कलाकारांकडून ही अपेक्षा का की त्यांनी तिकीटे sponsor करावीत ? प्रेक्षकांनी कायदा तोडू नये म्हणून ही लालूच दाखवावी लागत असेल तर तो प्रश्न समाजाच्या नैतिकतेचाही होतोच. रद्दड भुक्कड चित्रपट बघू नका. ते असे चित्रपट तयार करतात याचा पायरसीशी संबंध कळला नाही. त्यांच्या कमाईच्या मुद्याचेही औचित्य कळले नाही.
|
Yog
| |
| Thursday, December 20, 2007 - 4:24 pm: |
|
|
slarti, गैरसमज होतोय तुमचा.. कायदा नैतिकता या गोष्टी आहेत, असाव्यात पण its not level field anymore.. आजकाल चित्रपट निर्मिती हा व्यवसाय आहे its an industry आणी ते चान्गलेच आहे. do you agree that simply from business perspective what you can control is what you can provide and how you provide that, and your overall business model..? बाकी कायदा, नैतिकता, इत्यादी सर्व बाबी दुर्दैवाने कुठल्याही धन्द्यात पायदळी तुडवल्या जातात.. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून पायरसी करा अस मी म्हणत नाही. पण afterall its vicious circle.. वर इतरान्नी म्हटल्याप्रमाणे या नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत.. one has to give some to get some हा पूर्वापार चालत आलेला नियम आहे.. आज त्याच रूप थोड बदललय. असो.
|
Asami
| |
| Thursday, December 20, 2007 - 4:56 pm: |
|
|
योग चांगले मुद्दे मांडलेस पण BB CD/DVD विकत घ्यावी का ? ( आणी इथे genuine अशी अपेक्षा असावी ) हा आहे आणी त्याचे उत्तर नेहमीच होकारर्थी असले पाहिजे. " जे आहे ते असे आहे ", म्हणून आहे ते योग्य नाही असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. Movies हि काही essential commodity नाही आहे कि जी नसेल तर ( baghaNaaryaachyaa ) आयुष्य मरणाचा प्रश्न उद्भवेल. त्यामूळे शक्य तिथे pirated न बघणे एव्हढा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. पण नाही जमले तर त्याचे समर्थन करणे कुठल्याच angle मधून पटत नाही. ( अर्थात तू तसे करतोयस असे मी सुचवत नाहीये फ़क्त तुझ्या मुद्द्यांवरून पुढे जातोय )
|
पायरसी करु नये सिड्या विकत घ्याव्या या मताचा मीही आहे पण ईथे वाचन करताना मात्र काही मुद्दे खासकरुन मुव्ही पायरसी बाबत नाही पटले. मुव्ही बिसनेस मध्ये जितक्या सिड्या तुम्ही विकत घेतल्या तेवढा त्याचा काम करनार्या, घाम गाळनार्या लोकांना मिळेल असे जे मत आहे ते चुकीचे आहे. त्या सर्वांना फक्त पगारच मिळतो अगदी नटांना देखील (त्यांची किंमत). प्रोड्युसर ला पण त्या सिड्यांचा फायदा होत नाही. होतो फक्त वितरकांना. कारण त्यांनी वितरनाचे हक्क विकत घेतलेले असतात. ( *म्हणून अमिताभ स्वतचे चित्रपट स्वत वितरीत करतो.) ( मग वितरकाचे पैसे पायरसी वाल्याने पळविले असे म्हणले तर बरोबर होईल, अन भारतात वितरक हे नावापुरते खरे काम करनारे डॉनच नाहीका?) चित्रपटातील गाण्यांच्या सिडीज वर पुर्वी गायकांचा हक्क असायचा कारण मर्यादीत पैसे मिळायचे तेव्हा. आता मात्र तसे नाही. चित्रपटातील गाण्यांवर त्यांना रॉयल्टी मिळत नाही. ऑफकोर्स अल्बम काढला तर प्रोड्युसर बरोबर तसा करार केला जाउ शकतो. मी शक्यतो गाणे विकत घेतो. ९९ सेंटला एक या प्रमाने apple ला पैसे देतो. अन तेही हिंदी गाण्याचे. यात कोणाला फायदा होतो. apple कारण ते वितरक आहेत ते गायंकाना त्यातील कट ( हिंदी गाण्यासाठी) देत नाहीत कारण सिडि रिप्रॉडक्शन चे हक्क त्यांनी विकत घेतले आहेत. मग गाणे विकत नाही घेतले तर काय फरक पडतो? कारण त्याचा फायदा गायकांना होतच नाही. म्हणुन तसा गायकांना, चित्रपटासाठी झटनार्या व्यक्तींना काहीही फायदा होत नाही हे सत्यच आहे. अमेरिकेचे उदा घ्यायचे झाले तर स्टार वॉर्स, डिस्ने वैगरे मधले स्पॉट बॉईज देखील मिलीनेअर झाले असते. पण तसे होनार नाही कारन वितरक मंडळीच डिव्हीडी, मुव्ही वैगरे कंट्रोल करतात. अन चांगला पिक्चर म्हणुन त्याची डिव्हीडी जास्तला अन वाईट म्हणुन कमीला असे होत नाही. ( सगळ्या १९ ते २५ मध्ये मिळतात).
|
Ajjuka
| |
| Thursday, December 20, 2007 - 6:34 pm: |
|
|
केदार, तुझ्या पोस्ट मधल्या काही मुद्द्यांबद्दल दुमत आहे. |(मग वितरकाचे पैसे पायरसी वाल्याने पळविले असे म्हणले तर बरोबर होईल, अन भारतात वितरक हे नावापुरते खरे काम करनारे डॉनच नाहीका?) | कसं काय? काही एक किंमत देऊन ते एक प्रॉडक्ट खरेदी करतात व ते विकतात. ते जास्त विकले गेले तर नफा होतो नाही गेले तर तोटा. कुठलाही दुकानदार हेच करतो ना? असो आणि काही एक टक्की नफ्याच्या वर मिळालेल्या नफ्यातला काही भाग हल्ली निर्माता, दिग्दर्शकालाही मिळतो. अशीही deals होतायत सध्या. तेव्हा कलाकारांना पैसे मिळत नाहीत त्यामुळे आपण पैसे खर्च केले नाही तरी चालेल हा मुद्दाच संपूर्ण चुकीचा आहे. |अन चांगला पिक्चर म्हणुन त्याची डिव्हीडी जास्तला अन वाईट म्हणुन कमीला असे होत नाही. ( सगळ्या १९ ते २५ मध्ये मिळतात).| अहो काहीतरी काय? सगळ्या सिनेमांच्या तबकड्या सारख्याच किमतीला मिळत नाहीत अगदी चोरीच्या सुद्धा. जुन्या चित्रपटांमधे हा चांगला वाईट प्रकार रहात नसेल कदाचित पण जे saleble ति DVD जास्त किमतीला लावली जातेच. अर्थातच त्यांच्या rights ची deals तशी झालेली असतात.
|
Svsameer
| |
| Thursday, December 20, 2007 - 7:56 pm: |
|
|
>>>>मुव्ही बिसनेस मध्ये जितक्या सिड्या तुम्ही विकत घेतल्या तेवढा त्याचा काम करनार्या, घाम गाळनार्या लोकांना मिळेल असे जे मत आहे ते चुकीचे आहे. त्या सर्वांना फक्त पगारच मिळतो अगदी नटांना देखील (त्यांची किंमत). प्रोड्युसर ला पण त्या सिड्यांचा फायदा होत नाही. होतो फक्त वितरकांना. अगदी मान्य. पण जर उद्या सर्व जण पायरेटेड CD, DVD घ्यायला लागले तर या वितरकाना फायदा होणार नाही आणि ते पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी निर्मात्याला कमी किंमत देणार.. हे जर असच माहे मागे नेलत तर एकंदर सर्व system चंच नुकसान नाही का?
|
अज्जुका त्या डॉलर मधल्या किमती आहेते. भारतात ऑफकोर्स ६० रु पासुन २५० पर्यंत मिळतात. ( मला फक्त फरक दाखवायचा होता). मी स्वत देखील डिव्हीडी विकत घेतो. पायरसी असु नये हे मलाही वाटते. फक्त नान्याची दुसरी बाजु दाखवतोय. कारण वर बर्याच जनांनी पिक्चर मध्ये काम करनार्या, गाणार्या प्रत्येक जनांना फायदा होतो हे लिहीले आहे. अन पिक्चर निर्मान करने हे धंदाच असल्यामुळे जास्त फायदा कसा होईल हे बघने योग्य आहे. माझ्या पोस्ट मध्ये कुठेही पायरसीचे सर्मथन नाही. मी फक्त आर्थीक बाजु मांडली आहे. त्यामुळेच apple i tunes चे उदा दिले आहे. ९९ सेंट ला भारतीय रु त कन्वर्ट केले तर आक्खी CD मिळते. ( बाय दी वे देशी दुकानात १० डॉलर ला हिंदी CD मिळते. माझ्या मित्राचे शिकागोत दुकान आहे. तो भारतातुन ७० रु ला एक CD खरेदी करतो अन ईकडे तिच CD ९ ते १० डॉलर ला विकतो. या पैसा कोणाला मीळतो? हा तर निव्वळ त्याचा फायदा आहे. पोस्ट वजा जाता तो त्या CD वर निदान ५ डॉलर कमावत असेन. अशा किती तरी साईट ( मराठी, हिंदी चित्रपटांच्या DVD US मध्य विकनार्या अनेक (य) साईटस आहेत. त्या सर्व वितरक कंट्रोल करतात का? ( ह्याला जनकारांकडुन उत्तर अपेक्षीत आहे).
|
Asami
| |
| Thursday, December 20, 2007 - 8:21 pm: |
|
|
केदार तुझ्याच नाण्याची ही बाजू विचारात घेतली आहेस का ? pirated CD घेतल्याने वापरला जाणारा पैसा कोणाकडे जातो ? त्यांचा त्यावर काय हक्क आहे ?
|
असामी अरे तोच तर मुद्दा मी मांडतोय. (विरोधाभास आहे असेच माझे सांगने आहे) अन ति CD पायरेटेड नसते. चांगली सिल्ड वैगरे असते. ओरीजनल साउंडट्रक. त्या पैशांवर त्यांचा काय हक्क. की बिझनेस आहे म्हणुन चालवुन घ्यायचे. मग आज जी DVD Best buy ला २० ला मिळते ती दुसरी कडे ३० ला मिळनार का? म्हणुन कॉमन लोक पायरसी करतात. (भारती य गाण्या व पिक्चर साठी, इथे करने अवघड आहे. कारण सिस्टीम. सव्या नुकसान आहेच त्यामुळे मी डिव्हीडी विकत घेतो. ( कधी कधी लायनीत लागुन सुध्दा) फक्त रेव्ह्यन्यु शेअरींग बाबत लिहीत होत. ( काय करनार स्वघोषीत हाडाचा अर्थतज्ञ आहे ना). दुसरे उदा द्यायचे झाले तर net fiix, block buster वैगरेंचे देता यिल. BB सारखे लोक DVD भाड्याने देतात. अन माझ्या सारखे अनेक हजारो लोक ती रेंट नी घेउन पाहातात. आता गंमत अशी की रेंट ने घेउन पाहाने ही पायरसी झाली नाही का? US मध्ये तरी BB, NF हे रेव्हेन्यु शेअर करत असनार वा डिव्हीडी वितरनाचे हक्क त्यांनी विकत घेतले असे समजु त्यामुळे ओके पण भारतात काय? पाणपट्टी वर पण डीव्हीडी रेंट नी ( व विकत) मिळते. मग एक डिव्हीडी विकत घेउन मी १००० जणांना ती भाडेतत्वा देऊन स्वत नफा कमविला. ही पायरसी नाही का? विजय कुलकर्णी ने आधीच लिहीले आहे रेडीयो चोरुन आनला म्हणजे स्वतचा होतो का? अजुन तरी भारतात असा कंट्रोल नाही. मग भाड्याने आनलेल्या सर्व डिव्हीडी पायरसी होत नाही का? त्याचे समर्थन कसे कराल? मग तुम्ही पण त्याचा भाग नाही का? (परत एकदा मी पायरसीचे समर्थन करत नाही)
|
केदार apple च्या उदाहरणात एक चूक आहे. जरी apple प्रत्येक गाणे ९९ सेंटला विकत असले तरी प्रत्येक गाण्याचा खप हा नक्कीच वेगळा वेगळा असणार आहे. मग ज्या गायकाचे, संगीतकाराचे गाणे जास्ती विकले जाते तो जास्त पैसे डीमांड करत असणार. किंवा जर गायक, संगीतकार जरी डायरेक्टली हक्क विकत नसतील तर वितरक जास्त किमतीला विकेल. वितरकाला जर जास्त किंमत मिळत असेल, तर पर्यायी कलाकारांना जास्त मोबदला मिळेल अथवा जास्ती मोबदल्याची मागणी करता येईल. थोडक्यात मनी फ्लो हा खालपर्यंत होतच राहणार.
|
Priya
| |
| Thursday, December 20, 2007 - 8:42 pm: |
|
|
असामी, तुझं म्हणणं अगदी १००% पटलं. विकत घ्यावी का? हा माझ्या मते प्रश्नच होऊ शकत नाही. जसे सॉफ्टवेअरही विकत न घेता वापरावे का हाही मुद्दा होऊ शकत नाही. या विषयावर चर्चा होते हे भयंकर त्रासदायक आहे. आमच्या इकडील दुकानात चक दे आणि Blue Umbrella च्या DVD दिसल्या. पण दुकानदाराला विचारल्यावर त्याने सांगितले की तुम्ही घेऊ नका कारण त्या पायरेटेड आहेत. पुढे हेही सांगितले की चक दे ची ओरीजीनल येईल थोड्या दिवसांनी तेव्हा सांगेन पण Blue Umbrella मात्र मागवणार नाहीये कारण परवडत नाही. पण निदान तो ओळखतो त्यामुळे त्याने प्रामाणिकपणे सांगितले तरी. तेव्हा हे आपल्यावरच आहे की कायदा केवळ सोयीचा असेल तर पाळायचा की आपल्या सोयीसाठी त्यात पळवाटा शोधायच्या की जोपर्यंत कायदा आहे तोवर तो आपल्या गैरसोयीचा असला तरी पाळायचाच. खरं तर कायदेशिरपणे पहायला - ऐकायला उपलब्ध असताना गैरसोय हा मुद्दाही गैरलागू होतो. केदार - मीही तुमच्याप्रमाणेच iTunes वरुन हिंदी, मराठी गाणी घेते. पूर्ण सी. डी. हवी असेल तर मात्र भारतात फेरी झाली की आणते. या संदर्भात एक छान अनुभव. पद्मजा फेणाणी ची एक आणि सुरेश वाडकरांची एक अशा दोन सी. डी. मी कित्येक दिवस शोधत होते. मायबोलीच्या खरेदी विभागात त्या नव्हत्या म्हणून मी मेल पाठवून चौकशी केली की त्या मिळवून देता येतील का. तर थोड्याच दिवसांत त्या मला मायबोलीने मिळवून दिल्या. घरबसल्या हव्या असलेल्या सी. डी. मला मिळाल्या आणि अतिशय सुलभ आणि तत्पर प्रक्रिया होती त्या मिळवण्यासाठी. मायबोली सोय करते आहे म्हटल्यावर मी अजिबात विचार केला नाही की भारतात त्या सी. डी. किती रूपयांला मिळतील. कारण काही आर्थिक फायदा झालाच तर आपल्या मायबोलीचाच होणार आहे ना? iTunes वरून ९९ सेंटला एक गाणे जर मी घेते तर सी. डी. साठी हा मायबोलीचा पर्याय जास्त भावण्यासारखा नाही का?
|
Yog
| |
| Thursday, December 20, 2007 - 8:47 pm: |
|
|
>>" जे आहे ते असे आहे ", म्हणून आहे ते योग्य नाही असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. असाम्या तू आता american double negative व्याकरण मराठीत आणतोयस का..? मला वाटत डायलेसीस सारख्या गोष्टि सोडता इतर कुठलिही गोष्ट जिवन मरणाचा प्रश्ण नसावी.. पायरसी का व कशी होते अशी चर्चा चालू झाली म्हणून त्या अनुशन्गाने मि लिहीले होते. CD/DVD/VCD? original विकत घ्याव्यात हा विचार योग्य आहे. पायरसीतून कोणाला किती पैसे मिळतात, कुणाचे किती वाचतात पायरसीचा पैसा कुठे जातो हा एक मोठा गहन विषय होईल.. पण पायरसीमूळे चित्रपट किव्वा इतर निर्मितीवर घोर सन्कट वा बन्द पडायची वेळ येईल,सर्व system च नुकसान वगैरे होईल हे कुठल्याही अन्गाने पटत नाही... its business risk mgmt planning ज्याना ते जमत ते पायरसी गृहीत धरून त्यातूनही नफ़ाच कमवतात. again that % might vary based on the "scale" of individual business. खर तर its typical case of circular supply chain/money flow...and u would agree that there is nothing called "balanced economy". किन्ग खान करोडोत मिळवेल तेव्हा चित्रपटाबाहेर black करणारे आणि पायर्सी करणारे हजारात कमवतील.. इतकच! its proportional economy. नैतीकता, कायदा वगैरे च्या दृष्टीकोनातून पायरसी करावी का, पायरेटेड वस्तू विकत घ्यावी का याच उत्तर "नाही" आहे. पण माझा खिसा मला हलका "वाटत" असेल आणि मी चार पैसे वाचवले तर जगात उलथापालथ घडणार नाहीये या कारणाने पायरेटेड विकत घ्यावी का याच उत्तर हो आहे. खिसा आणी पोट भरले असेल तर तुम्ही पहिल्या वर्गातील consumer असू शकता किव्वा तशा गप्पा करू शकता.. अन्यथा दुसरा वर्ग सर्वान्ना खुलाच आहे. btw: उगाच नाही आजकाल info/content mgmt/copywriters मधल्या तज्ञाना मोठ्या मोठ्या ELECTRONIC MEDIA/publications CO. तून मागण्या आहेत..
|
बरोबर टन्या तु रॉयल्टीचे म्हणतोअस. मी आधी लिहील्या प्रमाने अमेरिकेत प्रत्येक गाण्यावर रॉयल्टी मिळते पण भारतात नाही. अन मी जे apple चे उदा दिले ते भारतासाठी दिले. मी तिथून हिंदी गाणे ९९ सेंट ला विकत घेतो. भारतात अल्बम वर रॉयल्टी मिळु शकते पण चित्रपटातील रॉयल्टी आता बहुतेक मिळत नाही. फार पुर्वी मिळायची तरी आपले अनेक गायक, संगीतकार मरताना गरीब होते. apple च्या उदा हे सांगायचे होते की आख्खी भारतीय गाण्यांची CD मी ९९ सेंट ला विकत घेउ शकतो तर ईकडे एक गाणे घ्यावे लागते. शिवाय आपले संगीतकार वा गायक दरमहीन्याला प्रत्येक साईट कडुन चार्ट घेउन किती खप झाला हे नक्कीच बघत नाहीत. रादर मालीनी राजुरकरांना हे देखील माहीती नसेल की त्यांचे गायण i tunes, amazon, emusic वर मिळते. ( जस्ट एक नाव) मग यात त्यांना रॉयल्टी मिळन्याचा प्रश्नच कुठे येतो. अमेरिकेत मात्र म्यानेजर लोक बघतात. अन खप वाढला की अशी डिमांड करता येत नसते कारण कॉन्ट्रक्ट. उद्या खप कमी झाल तर ते रॉयल्टी ( प्रती गाणे) कमी थोडीच करनार. रॉयल्टी ही परसेंटेज मध्ये असते. हा एक प्रकार तर दुसरा म्हणजे एकदाच पैसे घेउन सर्व हक्क विकने. आपल्या कडे दुसरा प्रकार जास्त प्रचलीत आहे. आधी सिस्टीम तयार करावी (वितरकांनी, निर्मात्यांनी) अन मग पायरसी पायरसी असे ओरडावे असे बघन्याची सिस्टीमच आपल्या कडे नाही म्हणुन पायरसीला आळा बसनार नाही.
|
Farend
| |
| Thursday, December 20, 2007 - 10:24 pm: |
|
|
कोणत्याही consumer क्षेत्रात असलेल्या गोष्टी वापरणारे २-३ प्रकारात मोडत असावेत्: मिळेल तेव्हा पडेल ती किंमत देऊन त्या विकत घेणारे... उदा: इंग्रजी चित्रपटाची डीव्हीडी आली की लगेच बेस्ट बाय मधे वगैरे जाऊन सरळ आहे त्या किमतीला विकत घेणारे, या गोष्टी स्वस्तात कोठे मिळतील ते पाहून वाटले तर थोडे थांबून किंमत कमी झाल्यावर घेणारे, ब्लॉकबस्टर वगैरे मधून रेंट करणारे आणि मिळेल तशी मिळेल तेथून फुकट कॉपी करून पाहणारे. (ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी... Best Buy हे अमेरिकेतील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठी चेन असलेले दुकान व Blockbuster हे DVD रेंटवर देणारी मोठी चेन आहेत) मला वाटते अशा वस्तूंच्या विक्रीतून होणारा नफा जास्त करून पहिल्या प्रकारच्या ग्राहकांकडून होतो. अमेरिकेत असे असंख्य लोक अजूनही आहेत की जे कोठे deal compare वगैरे न करता मनाला येतील तसे वाट्टेल ते विकत घेतात (०.२५% ने घराचा हप्ता कमी झाला तर ग्राहकाच्या हातात एकदम खेळता पैसा येतो कोठेही खर्च करायला असे म्हणतात, आणि मुळातच १००० उत्पन्न असेल तर १२०० खर्च क्रेडिट वर करायची वृत्ती) इंग्रजी चित्रपटांना मिळणारा नफा हा तिकीट खिडकी वरचे उत्पन्न, DVD च्या विक्रीतून होणारे उत्पन्न आणि merchandize च्या विक्रीतून होणारे उत्पन्न (उदा: जुरासिक पार्क वाले डायनासोर्स किंवा डिस्ने च्या चित्रपटातील कॅरेक्टर्स) असे सगळे असते. आता मराठी चित्रपटांकडे यातील फक्त पहिला ऑप्शन सद्ध्या आहे. त्यांच्या DVD/VCD ना जर ते पहिल्या प्रकारचे ग्राहक (किमान दुसर्या प्रकारचे. डील बघूनच, पण विकत घेणारे) मिळाले नाहीत तर त्यातून काही उत्पन्नच मिळणार नाही आणि pirated कॉपीज बघून तिकीट खिडकी वरचे उत्पन्न ही जाईल. यात मराठी चित्रपट व्यवसायाबद्दल वाटणार्या चिंतेने हे लिहिलेले नाही, पण जेव्हा चांगले नवीन मराठी चित्रपट किंवा गाणी येत नाहीत तेव्हा एक मराठी रसिक म्हणून आपल्याला ही ते आवडत नाही. आज मी येथे जेव्हा तमिळ किंवा तेलुगू लोकांना उपलब्ध असलेले असंख्य नवीन चित्रपट पाहतो तेव्हा त्याच दुकानात जेमतेम एखादा दिसणारा मराठी चित्रपट पाहून असे वाटते की आपले चित्रपट असे कधी दिसतील. (नशीब, पुस्तके येथे मिळत नसली तरी भारतात खूप नवीन पुस्तके येत असतात आणि मायबोली वरच्या त्या BB मुळे माहीतही होतात). आता काही लोकांना चांगली गाणी असतील काय किंवा नसतील काय काहीच फरक पडत नाही. जेव्हा चांगली गाणी आली तेव्हा ती वाजवणारे आणि जेव्हा ती नसतील तेव्हा अगदी 'नवीन पोपट' किंवा कायतरी ते 'लुगड्यात गमावलं' वगैरे सुद्धा आनंदाने आवडून घेणारे किंवा मध्यंतरी ती स्त्रियांची गाणी पुरुषांच्या आवाजात व पुरुषांची स्त्री आवाजात वगैरे आली होती ती सुद्धा चालवून घेणारे असेल बरेच लोक आहेत, त्यांना काहीच फरक पडत नाही. पण आपल्यासारख्या ज्यांना दर्जेदार गोष्टी बघायची आणि ऐकायची इच्छा आहे अशा लोकांनी जर त्या न घेता मिळेल तेथून फुकट पाहिले (ते ही बर्याच वेळा क्वालिटी शी compromise करत) तर मराठी सीडी ची system ही downward spiral मधे जाऊन त्या सहज उपलब्ध होणे ही बंद होईल अशी भीती आहे. आणि याचा थेट आर्थिक परिस्थितीपेक्षा आवडत्या गोष्टीवर खर्च करण्याची तयारी असण्याशी संबंध आहे. मी जवळजवळ ७-८ वर्षे त्याच पुलं किंवा काही वपूंच्या कथाकथनाच्या टेप्स ऐकतो (त्याची आवड हे एक कारण आहेच), किंवा काही ऋतु हिरवा वगैरे अपवाद सोडले तर तीच ती ६०-७० च्या दशकातील मराठी गाणी ऐकतो कारण या नंतरचे दर्जेदार चित्रपट, कथाकथन, गाणी प्रत्येकाची वेगळी आवड पुरवेल एवढ्या मोठ्या संख्येने उपलब्धच नाही मराठीत. माझ्या तमिळ तेलुगू मित्रांकडे दर काही दिवसांनी नवीन चित्रपटांच्या किंवा त्यातील गाण्यांच्या सीडीज दिसतात आणि ते सगळे लोक त्या विकत घेत नसले तरीही त्यांच्या खपाचे critical mass आता तयार झाले आहे. आणि आपण इथून तिथून अश्या pirated किंवा फुकट गोष्टी वापरल्या तर ते मराठीत कधीच होणार नाही. नुकसान विक्रेत्यांचे, कलाकारांचे आहेच पण आपलेही आहे.
|
Asami
| |
| Thursday, December 20, 2007 - 11:27 pm: |
|
|
केदार rental agency न rent करण्यासाठी हक्क विकत घ्यावे लागतात. त्यामूळे त्यांच्याकडून rent करणे हि piracy होत नाही. पण अशी rent केलेली DVD copy करून rent करणे हि सरळसरळ piracy चे उदाहरण आहे. योग " नैतीकता, कायदा वगैरे च्या दृष्टीकोनातून पायरसी करावी का, पायरेटेड वस्तू विकत घ्यावी का याच उत्तर "नाही" आहे. पण माझा खिसा मला हलका "वाटत" असेल आणि मी चार पैसे वाचवले तर जगात उलथापालथ घडणार नाहीये या कारणाने पायरेटेड विकत घ्यावी का याच उत्तर हो आहे. खिसा आणी पोट भरले असेल तर तुम्ही पहिल्या वर्गातील cओन्सुमेर " इथे वर्गवारी करण्याची वेळ यावी ह्यासारखी खेदाची ग़ोष्ट नसावी. जे चूक आहे ते चूक आहे. नैतिकता नि कायदा दोन्हीपलिकडे फ़ारसे काही उरत नाही असे मला वाटते. मी वरती लिहिलेय तसे CD/DVD मुळे कोणाचेही काही अडत नाही त्यामूळे परवडत नसेल तर नघू नये अगदी टोकाचे वाटले तरी pirated बघून at least त्याला तत्वज्ञानाचा लेप चढवून तरी मांडू नये एवढीच साधी अपेक्षा रे. PS : परत हे तुला उद्देशून असे नाहीये तर general वाक्य आहे
|
Yog
| |
| Friday, December 21, 2007 - 12:06 am: |
|
|
general विधाने करून इथे वाद पेटणार नाही असे तुला वाटते की काय..? नविन मायबोलीवर नविन आहेस का रे..? तर पायरसी पायरसी तुमची बोम्ब ही कळ्कळीची अन आमचे स्पष्टीकरण मात्र तत्वज्ञानाचे लेप. बर! राहिल तर. असो. भावना पोचल्या. यावर धोन्डोपन्तान्चे काय म्हणणे आहे?
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|