Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 20, 2007

Hitguj » Views and Comments » General » गाणी, सिडी, व्हिसीडी डिव्हीडी विकत घ्यावी का » Archive through December 20, 2007 « Previous Next »

Shendenaxatra
Tuesday, December 18, 2007 - 5:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


एक लक्षात घ्या की कायदा पटत नाही म्हणून तो गायब होत नाही.

प्रत्येक ठिकाणी कायद्याचा बडगा चालत नाही. निव्वळ कायद्याच्या धाकाने लोकांनी आपले ऐकावे असे वाटत असेल तर घरोघरी पोलिस धाडावे लागतील. ते परवडेल का? कुणालाही परवडेल अशा भावात कॉपी करण्याचे साहित्य मिळत असेल आणि कंटेंट निर्माते माज करत असतील तर लोक कायदा झुगारून देणार. कुठेतरी सुवर्णमध्य साधला पाहिजे. आज हे क्षेत्र त्या स्थितीत नाही म्हणू पायरसी होते आहे.
मोनॉपलीचा कायदा केवळ आवश्यक गोष्टींना लागू असतो असे नाही. कुठेही ती असली तर सरकारचा हस्तक्षेप वा देखरेख आवश्यक आहे.



Slarti
Tuesday, December 18, 2007 - 7:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> ४. कित्येकदा तबकड्यांवर अनेक जाहिराती असतात. त्याकरता जाहिरातदारांनी पैसे मोजले असतात. म्हणून सर्व जाहिराती बघणे हे गिर्‍हाईकाचे कर्तव्य आहे असे निर्माते म्हणू लागले तर ते योग्य आहे का? त्या जाहीराती फास्ट फॉरवर्ड करणे बेकायदेशीर आहे असे समजायचे का?

ते पैसे जाहिरातदाराने प्रेक्षकांना दिलेले नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांनी काय करावे हे जाहिरातदार मुळीच ठरवू शकत नाही. प्रेक्षक चित्रपट बघण्यासाठी पैसे मोजतात, जाहिरात बघण्यासाठी नव्हे. त्यामुळे जाहिरात बघणे / न बघणे हे निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे. हे सर्व लक्षात घेऊनच जाहिरातदार जाहिरात करत असतो.

अमेरिकन देसी, तुम्ही केलेल्या कामासाठी मोबदला मागावा की नाही व तो कोणत्या स्वरुपात असावा हे तुम्ही ठरवायचे असते. दुसर्‍या कोणी तो मागितला नाही म्हणून तुम्हीही मागू नये ही अपेक्षा तुमच्यासाठी न्याय्य आहे का ?


American_desi
Tuesday, December 18, 2007 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kay manase ahat ho tumhi loka ... mazya varach chadhayala lagale. Kahi changale sangayala gelo ani tyache he dushparinam.

Mhanun bharatatale politicians sarakhe gappa asatat. karan tumachya sarakhi lok ... jo tond ughadato tyala padayacha kasa yat guntalele.

dhanya ahe tumachi. Changale vichar sangat hoto ... sagalyani milun copy karu and marathi dharma vadhavu ... pan nahi ...

Jadoo
Tuesday, December 18, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी म्हणते जर movies च्या निर्मात्यांनिच जर सगळ्या CD/DVD कमी किमतित उपलब्ध करुन दिल्या तर? आणि त्या सुद्धा movie release झाल्यावर say after a month or after short duration जर त्या उपलब्ध करुन दिल्या तर लोक नक्किच pirated DVD खरेदि करण्यापेक्शा original खरेदी करतिल
Usually लोक DVD घेतात कारण
Convinence & ownership पुन्हा कधिहि हवा तेंव्हा चांगला movie बघता येइल म्हणुन
आणि जर काहि तुम्हला एकदम कमि किमतित चांगली quality मिळत असेल तर कोणी pirated का घेइल?
असेहि निर्माते piracy थांबवु शकणार नाहित


Chinya1985
Tuesday, December 18, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय पायरसीचा पब्लिसिटी होण्यास उपयोग नक्की होतो,आणि मराठीलाही झाला. बिल गेट्सनी हे मान्य केले होते की पायरसीचा पब्लिसिटी म्हणुन नक्किच उपयोग होतो. दुसरी गोष्ट म्हणजे चित्रपट चांगला आला म्हणजे लगेच त्याला प्रतिसाद मिळायला लागत नाही,पायरसीनी हा प्रतिसाद लवकर मिळायला लागला. दुसरी गोष्ट म्हणजे परदेशात सगळीकडे महाराष्ट्र मंडळ नसतात व जरी असतील तरी सगळीकडे चित्रपट दाखवतात असे नाही. आणि चित्रपट असा आधीच ठरवुन generally लोक बघत नाहित. एखाद्या दिवशी मुड आला की चित्रपट बघु असच जास्त वेळी असत.

आणि डीमांड ऍन्ड सप्लायच्या नावाखाली जास्त वेळा सामान्य माणसाची लुटच होते. ८-९ वर्षापुर्वी ऑडीओ सीडीची किंमत ४००रुपये वगैरे होती. सर्वांना माहीत आहे की ति बनवायला ३-४रुपयेही लागत नाहित,मग या लोकांनी इतक्या पटीनी भाव लावायला नकोत. value of money नावाचा काही प्रकार आहे का नाही? शिवाय तेंव्हा ऍसेम्बल्ड पीसी इतकी विंडोव्ज,ऑफ़िस यांची किंमत होती आज लॅपटॉपबरोबर या गोष्टी मोफ़त मिळतात. मग या लोकांनी ही लुट पुर्वी का केली???आज लॅप्टॉप कम्पन्या हजार एक रुपयाला विंडोज वगैरे खरेदी करत असतील व ग्राहकांना देत असतील. मग या लोकांनी आधी शेकडो,हजारो पटीनी भाव लावुन लोकांची लुट करुन पायरसीला हातभार लावला नाही का??आणि आम्हाला कायद्याला विरोध करायचा हक्क आहे. धनिक सरकारकडुन त्यांच्या फ़ायद्याचे कायदे करुन घेतात. आज आफ़्रिकेतील लाखो एड्सग्रस्त रुग्ण जरुरी औषधापासुन वंचीत रहातात का कारण श्रीमंत औषधाच्या कम्पन्यांनी कायदे वगैरे करुन मोनोपॉली वगैरेच्या माध्यमातुन औषधांचे भाव शेकडो पटीनी वाढवलेत. हे चुकिचे आहे. आता शास्त्रिय संगिताच्या VCD च्या किमती अजुनही अडीचशे,तिनशे वगैरे असतात. याला काय अर्थ आहे??मग तुम्ही म्हणता की शास्त्रिय संगिताच काय होणार???तुम्ही फ़क्त श्रीमंतांना परवडेल इतक्याच भावात शास्त्रिय संगित आणले तर मग भविष्य चांगल कस बनेल??मग आता हळुहळु त्याचीही पायरसी व्हायला लागलिय. जर पायरसीने उद्या या ३००-४००च्या VCD चा खप खुप कमी झाला तरच हे लोक त्याच्या किमती कमी करतील. अशा वेळी पायरसी चुकिची कशी म्हणता येईळ??मला लुट मान्य नाही मग ती कायदेशीर का असे ना लुट ही लुटच.


Maanus
Tuesday, December 18, 2007 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

how many over here are in business and in employment?
मराठीत, इथे नोकर माणस किती आहेत आणि उद्योग करणारे किती?

every man gets one chance in his lifetime to make fortune. most common man gets this chance only once, exceptional people keeps getting it more than once.

Alisha created one good song "made in india", i am not aware of any other good creation from her. She has to keep earning money on that one song for her complete life. There is years of hardcore work behind that one song, it was not produced in one night.

Like her there are many other singers in world who have had their once in lifetime moment and after that they were not able to produce anything that good again. So whatever they can earn till that song is in market, they have to earn. Because you never know tomm some new guy can come in market with his once in lifetime moment.

Whatever you can grab, you should grab in this period, you deserve it. and you have to keep "this is not correct" thoughts somewhere aside.

Same thing applies to cd distributors, that can be their only chance to make fortune. or that cd can be that time company owners, project managers one time chance.

anyway, to understand any of above things, you have to be in business.


Tanyabedekar
Tuesday, December 18, 2007 - 8:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिन्या, हे साधे अर्थशास्त्र आहे. सीडीचा उत्पादन खर्च म्हणजे केवळ कच्च्या मालाचा आणि मजुरीचा खर्च नसुन त्याच्या संशोधनात लागलेला खर्च, इतके दिवस संशोधन चालु ठेवताना आलेला खर्च, वर्किंग कॅपिटल, बाकी फिक्स्ड कॉस्ट ह्याचा विचार करा जरा. फुकट सिनेमे बघायचे आहेत म्हणुन काय वाट्टेल ती कारणे द्यायची का? आणि तुला कायद्याला विरोध करायचा हक्क आहे तो तोडायचा नाही.

आणि सीडी तथाकथीत महाग विकणे ह्यात सामान्य माणसाची काय लुबाडणुक झाली. जेव्हा अन्नधान्याची टंचाई असते तेव्हा माल तटवून त्याची किंमत वाढवणे ह्याला लुबाडणूक म्हणतात. वॉरंटीची हमी देवून ती न पुरवणे ह्याला फसवणूक म्हणतात. सीडी ची किंमत हा डीमांड सप्लाय चा खेळ आहे. वॅल्यु ऑफ मनी नावाचा काहीही प्रकार नसतो. आणि सगळ्या गोष्टींची किंमत जर सरकार अथवा लोकांनी कंट्रोल करावी असे वाटत असेल तर भांडवलशाहीचा पुरस्कार करु नका. आणि त्याची निगेटीव्ह साइड भोगायची पण तयारी ठेवा. आठवा आपलाच देश, १९९२ च्या आधीचा.


Ajjuka
Wednesday, December 19, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अमेरिकन देसी सारखे दळभद्री विचारांचे लोक जोवर आहेत तोवर काही भलं घडू शकत नाही. आणि अमेरीकन देसी तुम्हाला जी PhD मिळणार आहे/ मिळाली आहे ती दाखवून तुम्ही नोकरी मिळवणारच आहात ना भरभक्कम पगाराची? ती कशासाठी? एवढा हावरटपणा कशाला?
business मधल्या लोकांनी सांगावं मला की investment, period of investment या प्रमाणात किती आणि कसा profit किंवा निदान recovery तरी अपेक्षित धरली जाते? तेच गणित मांडायचं ठरवलं तर निर्माते किंवा distributors लोभी कसे काय?
सॉफ्टवेअर च्या संदर्भात मी काही सांगू शकत नाही पण मूव्ही पायरसी च्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे मांडू शकते.
फरेंड म्हणतो तसे ग्रे एरियाज बरेच आहेत. कायदे अजून तरी अपुरे आहेत त्यामुळे पळवाटा खूप आहेत पण नैतिकतेचा विचार आपण नक्कीच करू शकतो.
असो.. यासंदर्भात बरंच काही आहे पण ते नंतर.


Tanyabedekar
Wednesday, December 19, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काही करमणूक क्षेत्रातला नाही. पण माझ्या एका मित्राने मागच्या वर्षी एक लघुपट, केवळ ५-६ मिनीटांचा बनवला होता. तेव्हा मी वस्तुंची जमवाजमव, चहा पाणी, ट्रांसपोर्ट असली फुटकळ कामे केली होती. एक शॉर्ट फिल्म बनवायला जीवाचे पाणी करायला लागते. फीचर फिल्म बनवताना किती प्रयत्न करावे लागत असतील ह्याचा विचार करा. तसेच सिनेमा, संगीत ह्यावर अवलंबून असणारी केवळ नट, नट्या, फायनांसर, गायक ही मंडळी नसुन अनेक छोटे मोठे कलावंत, टेक्निशियन, विक्रेते, अक्षरश्: हजारो वेगवेगळ्या एंटिटीज ह्या प्रचंड मोठ्या सप्लाय चेन मध्ये आहेत. फुकट डाउनलोड, कॉपी करण्याने तुम्ही ह्या अनेक "सामान्य" लोकांच्या पोटावरपण लाथ मारत आहात.

Slarti
Wednesday, December 19, 2007 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तान्याने मांडलेल्या मुद्यांच्या अनुशंगाने.... पेटंटचाही विचार असतो. ते जोपर्यंत expire होत नाही तोपर्यंत किंमती स्वस्त होत नाहीत.... हे केवळ ती गोष्ट तयार करण्याचेच नसून विशिष्ट उत्पादनपद्धतीचे, recording पद्धतीचे असे सर्वांचे असू शकते. VCD वगैरेंच्या किंमतीबाबत हे कारण असू शकते याचा विचार केला आहे का ?
उत्तम उदाहरण म्हणजे २००१ मध्ये बहुतेक आशिया व युरोपसाठी CD patents expire झाल्याने किंमती उतरल्या. तोपर्यंत Sony and Philips दोघांना पैसे द्यावे लागायचे. त्यानंतरदेखिल Philips ची काही विशिष्ट उत्पादनपद्धतीवरची, recording तंत्रज्ञानावरची patents लागू होती.
दुसरे म्हणजे CD वगैरेंमध्ये कलाकाराची royalty सुद्धा असतेच. की आता ती आपणच ठरवणार आहोत ?


Ajjuka
Wednesday, December 19, 2007 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळात पायरसी ही चोरी आहे. आता चोरीचे उदात्त्तीकरण करायचे असेल तर प्रश्नच संपला. तसेच पायरसीमुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले असं म्हणणं म्हणजे खरोखरीच या बिझनेसची काडीचीही माहिती नसणं आहे.
चित्रपटांच्या पायरेटेड सीडी, व्हिसीडीज जेव्हा येतात तेव्हा त्या फुटकळ भावात मिळतात कारण त्या तयार करण्यासाठी चोराला काहीच कष्ट पडत नाहीत, खर्च पडत नाही.
स्टुडीओजमधे ट्रान्स्फर साठी आलेला मेडिया ढापून किंवा चित्रपटगृहात कॅमेरा लावून हे उद्योग केले जातात. पहिल्या प्रकारातल्या सीडीज चा दर्जा उत्तम असतो कारण मूळ मेडिया ढापलेला असतो. चोरी करण्यासाठी येणारा खर्च आणि प्रत्येक सीडीची किंमत एवढीच काय ती investment . मग मातीमोल भावाने विकले तरी फायदाच असतो. पण असा फायदा खाणार्‍यांना greedy न म्हणता स्वतःच्या कष्टाच्या मानधनाची व नफ्याची अपेक्षा करणारा माणूस greedy म्हणवला जातो हा शुद्ध गाढवपणा आहे.

पायरसीमुळे सीडी व डीव्हीडी rights च्या किमती खाली येतात, box office वरचे collection बोंबलते त्यामुळे अर्थातच recovery वर परिणाम होतो आणि तो परिणाम झाल्याने पुढे बजेटवर मर्यादा येतात त्यामुळे अनेक गोष्टींना बजेटपायी फाटा देणे, कलात्मकतेला मुरड घालत जाणे, काही महत्वाचं तंत्र न परवडणे इत्यादी गोष्टी स्थायी स्वरूपात चित्रपटसृष्टीमधे रहातात.
अजून नंतर...


Slarti
Wednesday, December 19, 2007 - 7:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पायरसीमुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस आलेत हे विधान केवळ अज्ञानमूलकच नव्हे तर अतार्किकसुद्धा आहे. मुळात चोरी करून तुम्ही त्या निर्मात्याचे नुकसान करत आहात तर मराठी चित्रपटसृष्टीला 'चांगले दिवस' कसे येतील ??!!
"...असा फायदा खाणार्‍यांना greedy न म्हणता स्वतःच्या कष्टाच्या मानधनाची व नफ्याची अपेक्षा करणारा माणूस greedy म्हणवला जातो हा शुद्ध गाढवपणा आहे."
you said it !!

Ashusachin
Wednesday, December 19, 2007 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry! for English, pan tumha sarvanbarobar Wachlele share karave watle mhanun English madhe det aahe.
Well, the first problem with piracy is that most people who worry about this kind of thing really don't have much experience in actually dealing with it in terms of what real world impact it has on sales.
That's because there are really groups of copymasters/pirates that one has to deal with:
1.Kids - Not a buyer and The casual pirate". This is where the biggest chunk of lost sales come from. For them, it's about convenience. These guys pirate not because they're cheap but because it's convenient.
To them, they'd love it if they could be reading a review at website and press a "one click download/copy/burn/buy" button and a link to an ISO CD image comes up.
The "Stupidity" of Copy Protection
There are no good statistics yet on what percentage of people are significantly affected by CD copy protection. But the anecdotal evidence is very disturbing.
I suspect that many reading this have either personally experienced what I'm about to describe or know someone who has gone through this:
Joe Gamer goes out and buys a game from the store. They get it home and play it and enjoy it. But one day, a few months later, they go to play it and can't find the CD. Where is the CD? There are piles of CDs everywhere. Maybe the kids took it. Maybe it fell into the trash.
Frustrated, Joe Gamer goes onto the net to look for a way to play the game without a CD. They go onto Google or Yahoo or whatever search engine they use and over the course of an hour or two they finally make their way to the "warez" world where cracks, file downloads, etc. are all easily available. More than that, warez has gotten frighteningly sophisticated with seamless distribution file systems and more. They find not just the CD crack but links to all the latest titles.
So then Joe Gamer, who normally buys games, now has to look at his options:
a) He can do "the right thing" and drive out to the store. Spend $50 on the game, bring it home and deal with the CD copy protection.
or
b) He can click on a link and have the game in a few hours. No CDs to mess with and no cost.
What do you think many Joe Gamers of the world are going to do? And what about the Joe Gamer whose game won't work because the CD protection doesn't work on their model of CD-ROM drive or DVD drive? Talk about motivating people to learn about warez.
In short: CD Copy Protection Creates Pirates.
CD/DVD companies just need to realize that copy/piracy is vastly overstated in terms of how much it affects real sales. And there are ways of reducing copy/piracy considerably by recognizing who their target audience is -- customers and potential customers. Make the incentive for being a customer be greater than the incentive to pirate it and you'll see what we've seen piracy not having a significant affect on revenue and a lot of happy customers.



Slarti
Wednesday, December 19, 2007 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुले चोरी करतात कारण मुळात चोरीचे सामान सहज उपलब्ध आहे म्हणून. तेच जो गेमरलाही लागू आहे. शिवाय जो गेमर चोरी करतो कारण तो निष्काळजी / आळशी / बेदरकार आहे म्हणून.... या सर्वात Copy protection दोषी कसे काय ठरते ? त्यामुळे वरील विधाने तर्कदुष्ट वाटतात.
एकंदरीतच ही चोरी समाजात अश्लाघ्य नाही हेही एक प्रमुख कारण आहे असे वाटते.



Asami
Wednesday, December 19, 2007 - 9:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

In short: CD Copy Protection Creates Pirates. >> I beg to differ here. I think it's pretty blanket statement and does not cover all situations.

e.g. Most of the bollywood/marathi DVDs/CDs either do not have copy-protection schemes or weak protection, but you will still find no of "copied" DVDs/CDs way higher than original ones.

One can argue about reducing prices but it can not be excuse for piracy. It's pretty lame excuse as a cover up


Arch
Wednesday, December 19, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ुकट घेणं किंवा मिळवणं नियमांची बंधनं झुगारणं ही एक वृत्ती असते. अशा वृत्तीला आळा घालणं फ़ार कठीण असत. in fact समजावणंपण कठीण असत.

Vijaykulkarni
Thursday, December 20, 2007 - 3:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या दुकानातून खरेदी केलेला रेडीओ मोडला किन्वा हरविला तर त्या त्या दुकानातून दुसरा रेडिओ चोरण्याचा हक्क मिळतो का?

औषधान्च्या जास्त किमतीसाठी औषधी कम्पन्याना दोष देणे पण चुकीचे आहे. एखादे नवे औषध विकसित करून बाजारात आणेपर्यन्त होणारा खर्च प्रचन्ड असतो.


Sanghamitra
Thursday, December 20, 2007 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>> शास्त्रीय संगिताच्या सिडीज महाग असतात.
अरे चिन्या Value for money असतात अशा गोष्टी.
तू म्हणतोयस त्याप्रमाणे मग एखाद्या माणसाचे झोपडपट्टीतले घर १००० स्क्वेअर फुटांचे असेल तर त्याची आणि एखाद्या luxuirious home project मधल्या १००० स्क्वेयर फुटाच्या घराची किम्मत सारखी असायला हवी का?
आणि ते काय कुणावर जबरदस्ती करतायत का घ्या म्हणून? ज्याला ते Value for money वाटते ते वाटेल ती किम्मत मोजून ती घेतीलच.
हिर्‍यांच्या हाराच्या चोरीसाठी ते महाग असतात हे समर्थन काही योग्य नाही. नाही का?
बरं पूर्वी ऑडियो सिडी महाग असायच्या आता त्या स्वस्त झाल्यात. तर हे असं प्रत्येकच fast changing technology बाबत होतं. उदा. कंप्यूटर्स, मोबाईल्स.
पायरसीनं मराठी भाषा किंवा कला वाढेल हे तर अगदी हास्यास्पद विधान आहे.
उलट सगळ्यांनीच थीयेटरमधे जाऊन पाहिलं तरच त्याला वैभवाचे दिवस येतील. नाही का?
थोडेसे विषयांतर :
एक मात्र आहे, बॉलीवुडचे चित्रपट, त्यांची मल्टीप्लेक्समधली तिकिटं आणि त्या कलाकारांना मिळणारे प्रचंड मानधन याचा मेळ घालणं अवघड आहे.
आणि सामान्य प्रेक्षकांकडून कितीही पैसे घेतले तरी ते तंत्रज्ञापर्यंत तेवढ्या प्रमाणात पोचत असतील असं वाटत नाही. त्याचा मुख्य हिस्सा नटनट्यांकडे आणि निर्मात्याकडे जातो हे उघड आहे. असो.


Yog
Thursday, December 20, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पायरसी कधीच सम्पणार नाही.. its just other side of the coin, i.e. "digital technology" . end of the day जे आपल्याला परवडत त्याचे दाम आपण मोजतो. खिशाला पाच्शे रुपयाची dvd परवडत असेल तर ती घेतो नाहीतर पन्नास रुपयाची pirated DVD .. आणि ग्राहक म्हणून काय विकत घ्याव याच पूर्ण स्वातन्त्र्य आवश्यक आहे. जोपर्यन्त original print/DVD चि किम्मत सव्रसामान्यान्ना परवडेल अशी होत नाही तोपर्यन्त पायरसी चालूच राहणार. आजकाल जवळ जवळ सर्व चित्रपट अर्धा पैसा promos प्रसिध्धीतून कमावतात अन अर्धा पहिल्या आठव्ड्यात (चित्रपट चान्गलामोठ्या banner चा असेल तर..) पूर्वी long run वर कमाई असे कारण अर्थात पूर्वी dvd देखिल नव्हत्या.. so one can argue that the profit/loss equations are still "proportional" in todays "pirated" world. तेव्हा तोही मुद्दा नाहीये. मला वाटत तीन प्रमुख कारणे आहेत्:
१. खिशाला मूळ प्रतीची किम्मत परवडत नाही
२. खिशाला परवडत असून देखिल फ़ुकट किव्वा इतर मार्गाने मिळते तर घ्या ही वृत्ती (पुन्हा ही वृत्ती कुठल्याही क्षेत्रात आहे.. आणि जगात सर्वत्र आहे.. so thats universal )
३. technology मुळे शक्य आहे तर का नाही? मुळ चित्रपटाची copy करून फ़ार तर काय रन्ग, पोत थोडे कमी दर्जाचे होतील.. चित्रपट, कथा, पात्रे, संवाद तेच असणार आहे ना?(इथे decent pirated copy अपेक्षित आहे). who cares pirated मधे नायिकेच्या गळ्याच्या शीरा ताणलेल्या दिसत नाहीत, original मधे दिसतात..? भन्साळीने करोडो रुपये निळाई वर उधळले म्हणून प्रत्त्येकाने त्याचे वेड पाचशे रुपये देवून विकत घ्यावे असे कुठे लिहीले आहे..? value of money खिशापासून सुरू होवून खिशात येवून सम्पते.. box office collection हा पूर्णपणे व्यावसायीक मुद्दा आहे.. piracy मुळे चित्रपटाच्या निर्मितीमूल्यावर मर्यादा येतात असा विचार करून आजकालच्या जमान्यात चित्रपट बनवताच येणार नाहीत. you just got to change your business model . मान्य की छोट्या निर्मात्याना झळ जास्त बसते.. but then thats the business challenge

आणि सर्वात शेवटचा मुद्दा. रद्दड आणि कचरा चित्रपट प्रेक्षकान्वर मारणारे निर्माते, कलाकार, किन्ग खान, अब्जात कमावतात. सामान्य माणसाने सात पिढ्या अहोरात्र काम केले तरी तितकी माया जमवता येणार नाही. do not buy pirated dvd म्हणून जाहिरात करणार्या या महाभागान्नी मग चित्रपटाच्या प्रत्त्येक प्रयोगाची निदान 100 तिकीटे तरी sposnor करावीत. असे कुणि केल्याचे ऐकले आहे का..? साखरेच्या पोत्यावर बसून इतरान्ना dibetis बद्दल डोस पाजणार्‍या या सर्व लोकान्नी (निर्माते, कलाकार) तरी या दृष्टीने काय काम केले आहे? मग प्रेक्षक म्हणून पायरेटेड copy घेवून चित्रपट बघणे सोपे आहे.. call it quality screening for less money. चित्रपट भुक्कड निघाला तर शम्भर गेल्याचे दुख्ख होईल, चारशे तर वाचतील. जसे डब्बा चित्रपटाची pirated copy सुध्धा विकली जात नाही तसेच दर्जेदार चित्रपटाची मूळ प्रत घेणारेही भरपूर लोक असतात अशी argument करता येईल.. either ways it will balance out. जिथे मूळ चित्रपटातील ५०% पेक्षा अधिक गोष्टी "उचललेल्या" असतात तिथे पायरसी बद्दल आक्षेप घेणे हेच एकतर्फ़ी वाटते. प्रेक्षकाने कुठे कधी काय कसे बघावे हे त्याचा प्रश्ण आहे.. त्याला काय द्यायचे आणि त्यातून फ़ायदाही कसा मिळवायचा हा निर्मात्याचा प्रश्ण आहे... स्वस्तात pirated dvd बघण्याचा पर्याय आहे हे माहित असूनही प्रेक्षागृहात जाणारा प्रेक्षक आहे तसेच, प्रेक्षागृहात भरपूर पैसे खर्च करून चित्रपट बघणारा प्रेक्षक असला तरी pirated बघणारा प्रेक्षक ही आहे हे निर्मात्याने लक्षात ठेवायला हवे. बस्स! इतकच! its just business perspective thats all.. बाकी सगळा तात्विक, नैतिक, भावनिक वाद शून्य आहे. आणि बेकायदा वगैरे तर कुणी म्हणूच नये. नियमित कर देखिल न भरणार्‍या निर्मात्यान्चे वा कलावन्तान्चे चित्रपट तर मुद्दामून pirated बघावे असे म्हटले तर कायद्याची पन्चाईत होईल...

तेव्हा हा प्रश्ण वरकरणी दिसतो तितका सोपा नाही. याला अनेक dimensions आहेत.. तूर्तास इतकच म्हणता येईल की piracy is here to stay..

या पोस्ट मधून कुणाही कलावन्त वा निर्मात्याच्या भावना दुखवायचा हेतू नाही पण piracy exists in all aspects and all fields, one has to just absorb it when it comes to business.


Ajay
Thursday, December 20, 2007 - 5:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>खिशाला पाच्शे रुपयाची dvd परवडत असेल तर ती घेतो नाहीतर पन्नास रुपयाची pirated DVD ..
>खिशाला मूळ प्रतीची किम्मत परवडत नाही
किंमत जास्त असल्यामुळे पायरसी होते हे विधान मला कधीच पटले नाही. तसे असते तर परदेशात राहणारे, सहा आकडी डॉ. मधे मिळवणारेसुध्धा कशाला पायरटेड चित्रपट पाहतील? भारतातदेखील इतकेच पैसे मिळवणारे सर्रास पायरेटेड सिडी पहातात.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators