|
Prady
| |
| Friday, December 14, 2007 - 2:25 am: |
| 
|
मी सकाळी ह्या थ्रेडवर एका वेबसाईटची माहिती दिली होती. आता तो मेसेज इथे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी हे देखील वाचलं होतं की असे मेसेज जिथे वेबसाईटची माहिती दिली जाते (चकटफू चित्रपटांच्या) उडवले जातात कारण बेकायदेशीरपणे चित्रपट बघू नयेत असा स्तुत्य हेतू असतो. दिवसभरात मी इथे फिरकले नाही त्यामुळे माझ्या मेसेज नंतर इथे काय झालं हे माहित नाही. सकाळचा मेसेजही आता इथे नाही. कदाचित मी ही अशीच एखादी बेकायदेशीर साईट दिली की काय म्हणून तो उडवण्यात आलाय. अत्ता मेसेज पोस्टायचं प्रयोजन हेच की मी सकाळी दिलेली साईट ही अशी कुठल्याही प्रकारची बेकायदेशीर उद्योग अर्थात पायरसी करणारी साईट नव्हती हे कळावं. Bigflicks ही Reliance ची कायदेशीर साईट आहे आणी निर्मात्यांकडून रितसर हक्क घेऊन ते हे चित्रपट साईटवर प्रदर्षीत करतात. त्या संबंधी वृत्त देखील वर्तमानपत्रांमधे प्रसिद्ध झालं होतं. https://www.relianceindiacall.com/us/landing_moviemania.aspx इथे गेल्यास रिलायन्सच्या वेबसाईटवरच त्याची जाहिरातही केलेली आढळेल. अमेरिकेत जसं Netflix प्रचलित आहे तसाच bigflix भारतात निघालय आणी भारता बाहेर रहाणार्यांना देखील दर्जेदार चित्रपट पहाता यावेत म्हणून ही साईट आहे. ईथे काही किरकोळ रक्कम भरून तुम्ही चित्रपट डाऊनलोड करू शकता आणी फारसे न गाजलेले किंवा थोडे जुने चित्रपट फुकटही बघू शकता. कुठल्याही प्रकारे बेकायदेशीर कृत्याला खतपाणी घालण्याच्या द्रुष्टीने मेसेज पोस्ट केला नव्हता हे कळावे.
|
Manuswini
| |
| Friday, December 14, 2007 - 8:44 pm: |
| 
|
prady , उत्तम केलेस (ह्या तुझ्या वरच्या पोस्टबद्दल) explain केलेस की bigflicks काय साईट आहे ते. मी स्वत काही मराठी मूवी bigflicks वरच बघितले, उलत relianceindiacall ची offer आहे $15 card घेतले तर $4 चा कुठलाही मूवी download करु शकतो. मी असेच ते चार मराठी मूवी पाहीले. इथे आणखी एक मराठी साईट होती पण ती साईट वापरून बघणे computer ला धोक्याचे आहे म्हणून मी पाहीली नाही ती. हां but I dont deny that I did see few movies on youtube at times hindi specially . माझ्या मराठी मूवी बघितल्याच्या पोस्ट मध्ये टाकयचे राहून गेले हे सांगायला. उगाच कल्पना नसताना कोणावरही बोटे दाखवणे नी आरडओरड करणेही चुकीचे आहे. मी piracy ला support करत नाहीय नी मी कोणाच्या पोस्टच्या विरोधात नाही आहे का कोणाशी दुश्मनी म्हणून मी ही पोस्ट करत नाही आहे, पण एक प्रश्ण नक्कीच खचीतच पडतो जेव्हा कोणीही असा दिंडोरा करतात 'हे चुक, ते चुक असे picture बघणे चुक, त्यांनी स्वतही प्रामाणीक पणे जबाबदारी घेतलीय का हे follow करायची? सुरुवात ही कुठुनतरी करावीच लागते मग स्वत ही प्रामाणीकपणे आधी सर्व बाजूने करावी मग ती पसरावी शक्य होईल तसे. मग बाकीचे नक्कीच support करतात हा माझा अनुभव आहे. का फक्त दुसर्यांना भाषण सोपे आहे नी स्वत तेच करायचे. हे लिहायचे कारण, हे कधी तुम्ही नकळतपणे तपासून पाहीले आहे का स्वतच्या बाबतीत?? १) तुम्ही स्वत youtube वर कधीच कुठले मूवी चुकुन बघितले नाहीत? २) US मधील एखाद्या गुज्जुच्या दुकानात $5 वा $25 'rent' account उघडून dvd किंवा video cassett कधीच rent करत नाहीत का मग ही dvd वा casseet ची print हे लोक कसे करतात हे कधी point out केलेय का? किंवा स्वत घेणे थांबवले आहे का 'विरोध' against piracy म्हणून? ३) स्वत आणलेली(विकत किंवा rented DVD कधीच घरच्यांमध्ये किंवा अगदी जवळच्या लोकांमध्ये शेयर नाही केलीत का कधीच? piracy against point चांगला raise केला पण काही गोष्टी आपण जेव्हा दुसर्याला चुक म्हणून दाखवतो तेव्हा आपणही नकळतपणे 'त्याच' करत असतो. चु. भू. द्या. घ्या. mods, sorry विषयांतर झाले जरा.
|
बरोबर मनुस्विनी. माझ तर स्पष्ट मत आहे की तुम्ही जर options उपलब्ध करुन दिले तर लोक त्याचा वापर करतील. भारतातुन मोझरबेअरच्या स्वस्त DVD,CDs उपलब्ध झाल्याने त्या आम्ही आणल्यात पण जर नसतील तर पायरेटेड कॉपिज पण आणतो. मराठी चित्रपटांना ८-१० वर्षापुर्वी फ़ार खराब काळ होता. तेच तेच पांचट जोक,त्याच त्याच कथा,कथेशी संबंध नसतानाही टाकलेल्या लावण्या यामुळे पब्लिक मराठी चित्रपटांपासुन दुर गेल होतं. लोक मराठी चित्रपट टी.व्ही.वरही पहायला तयार नव्हते. आजकाल जरा बरे चित्रपट निघत आहेत. पायरसी नसती तर हे लोक परत मराठी चित्रपटांकडे वळले असते का??माझ्यामते नाही. पायरसीमुळे मराठी चित्रपटांना बर्यापैकी प्रसिध्दी मिळाली हे तुम्ही कसे नाकारता??आता रिलायन्ससारखे ऑप्शन्स उपलब्ध होत असतील तर ते स्वागतार्ह आहे.
|
Manuswini
| |
| Saturday, December 15, 2007 - 12:08 am: |
| 
|
चिन्या, तुला माझे म्हणणे लक्षात आलेले दिसत नाही. मी हे नाही म्हणत आहे की piracy चांगली किंवा piracy ने चांगले दिवस आले आहेत नी त्याच माध्यमातून मूवीस बघा. पण उगाच फुका आरडओरड करण्यापुर्वी काही जबाबदारी आपण सुद्धा घ्यावी नी पाळत असेल तर बोटे दाखवावी. तसे म्हटले तर piracy ने easy access वाढला आहे,लोक आवर्जून नवीन मराठी मूवीस बघत आहेत though very unfortunate way; कारण त्यानेच तर piracy ला खतपणी मिळतेय. पुर्वीचे पांचत मूवी फुकटात पण कोनी बघत न्हवते. आता ही जबाबदारी मूवी makers नी घ्यायची how to stop piracy . NJ तला एक गुज्जु वाणी(पटेल कश वाला) चोरून थेटरात बसून का काय ते print काढून ती video cassette $50 ला दिवसाला विकायचा. वर fine लावायचा उशीर झाल्यावर. एक दिवस चांगला झापलाच म्हटले चोरून काढतोस वर fine लावतोस नी account बंद केले.(मी casseett उशीरा परत करत न्हवते नाहीतर आणखी एक भाषण होईल) खुप काही महान काम नाही केले. पण केले.
|
Ajay
| |
| Saturday, December 15, 2007 - 1:39 am: |
| 
|
Prady, Manuswini,माझ्या संदेशात तुमच्यावर कुठेही व्यक्तिगत रोख नव्ह्ता. तो तुम्हाला तसा वाटला असेल ते मी तुमची माफी मागतो. तुम्हाला काय नैतिक आहे हे सांगण्याचा मला काहीही अधिकार नाही. माझी इतकीच विनंती आहे की आपण मूळ मुद्याकडे वळूया.
|
Prady
| |
| Saturday, December 15, 2007 - 2:19 am: |
| 
|
अजय कृपया माफी मागू नका. मला खरं तर माझ्या मेसेज नंतर तिथे काय झालं हे ही माहीत नाही आणी मी ते कुणालाही विचारलं देखील नाही. संध्याकाळी मेसेज दिसला नाही म्हणून केवळ अडाखे बांधले की असं का झालं असावं. आणी म्हणून स्पष्टीकरण दिलं. तुमची मतं आणी मनूची मतं आपापल्या जागी लॉजिकल आहेत. आणी मला असंही वाटत नाही की तुम्ही माझ्यावर काही व्यक्तीगत टीका केली. त्यामुळे तुम्ही माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
|
Slarti
| |
| Saturday, December 15, 2007 - 4:07 am: |
| 
|
पायरसीमुळे लोक मराठी चित्रपटाकडे वळले हे पटत नाही. १. चित्रपटाचा विषय व मांडणी हे दोन्ही वाढत्या शहरी मध्यमवर्गाला रुचेल असे होऊ लागले... २. आणि हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिराततंत्राचा उत्तम वापर केला गेला. याची खरी सुरुवात, मला वाटते, 'बिनधास्त'पासून झाली. इथे महाराष्ट्रात तरी चित्रपट चांगला आहे असे कळले तर बहुतेक लोक चित्रपटगृहात जाऊन बघतात आणि तो चित्रपट चांगला आहे हे व्यावसायिक जाहिराततंत्र व कर्णोपकर्णी प्रसिद्धी असे कळते, पायरसीने नव्हे.... अन् तो चित्रपट बघण्यासाठी पायरसीवर अवलंबूनही राहत नाहीत. राहता राहिले महाराष्ट्राबाहेरील मराठी लोक.... तर पायरसीने चित्रपट बघण्याची सोय करून दिली, प्रसिद्धी मात्र नाही, ती आधीच झालेली असते. बाकी "पायरसी करू नका" या कायद्याला "मग परदेशातील मराठी लोकांनी मराठी चित्रपट बघूच नयेत का ?" असे 'प्रत्युत्तर' करणे हे गुन्हेगारी उद्दामपणाचे द्योतक आहे.
|
Manuswini
| |
| Saturday, December 15, 2007 - 4:46 am: |
| 
|
अजय, तुमचा गैरसमज झाला, मी तुमची चुक किंवा तुम्हाला व्यक्तीगत target करून अजिबात लिहीत न्हवते. नाहे माझा piracy ला support आहे. all i was saying that piracy ही कुठल्या ना कुठल्या रूपात आजकाल 'उपलब्ध' असलेल्या मध्यमातून होत असते. कित्येक वेळा आपण स्वत नकळत पणे तेच करत असतो. piracy is bad ,piracy is bad पण कीती लोक खरोखर ती काळजी घेतात किंवा घेवु शकतात. नुसता ओरडाओरड करतात, बोटे दाखवतात पण मुळात स्वत कीती Strictly पाळु शकतात. पण असेही नाही की ही थांबवणे शक्य नाही कारण सुरवात ही आपल्याकडूनच होते. बाकी कुणाला ही उगाच फुकट तत्वज्ञान द्यायचा उद्देश न्हवता. ज्याला त्याला योग्य वाटेल तेच तो करतो. माफ़ी वगैरे मागु नका. असो, हे बाकींच्याना,ज्यांना मराठी मूवीस पहायचे असतील तर relianceindiacall वर pre-paid phone card घेताना option आहे की $15 हवे आहे का. $4 मध्ये कुठलाही मूवी पहाता येतो.
|
माझ पायरसी बद्दल स्पष्ट मत आहे तुम्ही चांगले options उपलब्ध करा पायरसी कमी होईल. आणि मराठी पायरसीबद्दल जे मत आहे तेच इतर बद्दल आहे,इंग्रजी हिंदी, सॉफ़्टवेअर सगळ्यांबद्दल एकच मत असले पाहीजे. नाहीतर म्हणाल मराठीची पायरसी नको आणि सॉफ़्टवेअर पायरसी चालते. सर्व प्रकारच्या पायरसीकडे एकाच दृष्टीकोणाने पाहिले पाहिजे. आम्ही ८-९वर्षांपुर्वी जेंव्हा कॉम्प्युटर घेतला होता तेंव्हा ऍसेंबल्ड कम्प्युटर ५०हजाराच्या आसपास होता आणि विंडोज आणि मायक्रोसॉफ़्ट ऑफ़िसची किंमत ५०हजाराच्या आसपास होती. आता कोण PC घेऊन त्याच्याच इतक्या पैशात हे सॉफ़्टवेअर्स घेईल जेंव्हा फ़ुकट ते मिळत असेल तेंव्हा???पण आता त्याला चांगला पर्याय उपलब्ध आहे, मागच्या वर्षी लॅपटॉप घेतला तेंव्हा विंडोज,नॉर्टन फ़्री मिळाल. मनुस्वीनीनी म्हटलेल बरोबर आहे,जे लोक पायरसीचा विरोध करत आहेत त्यांनी कधीच कुठलेही चित्रपट, गाणी,सॉफ़्टवेअर पायरसीच्या माध्यमातुन वापरलेले नाहीत का याचे उत्तर द्या. स्लार्ती, बिनधास्तनंतरही काही वर्षे खराबच गेली होती. शिवाय तुम्ही दिलेले कारण मला तरी माहित नव्हते. माझ्या माहितीप्रमाणे तरी बरेच लोक मराठी चित्रपट पायरेटेड कॉपिजवर बघु लागले आणि मग जेंव्हा कळल की आता बरे दिवस आलेत तेंव्हा चित्रपटगृहात जाऊन बघु लागले. शिवाय जाहीरातबाजी ही नेहमीच होत होती. त्या जाहीरातबाजीने मराठी चित्रपटांपासुन दूर गेलेला प्रेक्षक परत आला हे पटत नाही. आम्ही ११वी १२वीत असताना कॉलेजमधे पायरेटेड कॉपिज बघुनच लोकांच्या लक्षात आले होते की मराठी चित्रपट बरे निघत आहेत. शिवाय परदेशात चित्रपट पाहुच नयेत का हा लॉजिकल प्रश्न आहे. त्याचे उत्तर निर्मात्यांनी वगैरे देणे जरुरीचे आहे. शिवाय हा कायदा तेंव्हा कुठे जातो जेंव्हा डेक्कन जिमखाना,जंगली महाराज रोड येथे खुलेआम पायरेटेड कॉपिज विकल्या जातात,केबलवर चित्रपट दाखवले जातात??कायद्याची अंमलबजावणी भारतात केली तर त्याचा फ़ायदा होईल पण परदेशातील लोकांनी चित्रपट या मार्गाने पाहिल्यास काहीच तोटा नाही कारण परदेशात मराठी चित्रपट रिलिज होत नाहीत त्यामुळे पब्लिकनी पायरेटेड कॉपी बघितल्याने चित्रपटगृहात लोक आले नाहीत व तोटा झाला अस तर नाही शिवाय पायरसी नको म्हणुन परदेशातुन लोकांनी भारतात जाउन चित्रपट बघावेत हेही शक्य नाही. स्लार्ती तुम्ही कधी पायरसीचा वापर केलेलाच नाही का??कधी पायरेटेड सॉफ़्टवेअर वापरलेच नाही का?
|
Ajay
| |
| Monday, December 17, 2007 - 2:56 am: |
| 
|
तुमचा प्रश्न स्लार्तीना आहे पण मला थोडे बोलावेसे वाटले. मला वाटते तुमची हरकत नसावी >स्लार्ती तुम्ही कधी पायरसीचा वापर केलेलाच नाही का??कधी पायरेटेड सॉफ़्टवेअर वापरलेच नाही का? समजा असे धरून चालूया जगातल्या १०० टक्के मराठी माणसानी कधितरी तस्करीचे उत्पादन वापरले आहे. आता तरी आम्ही काय करतो तुम्ही काय केले अशा वादात न पडता हा प्रश्न मुळात काय आहे, कसा कमी करता येईल याच्याकडे पाहुया का? नाहीतर सगळेच corruption करतात मग त्याबद्दल बोलायचा कुणालाच अधिकार नाही असे म्हणून कधिच त्याबद्दल कुणी बोलायचे नाही नाही का? का सगळेच करतात म्हणून ते योग्य होते? सगळेच करतात म्हणून ते समाजमान्य होत असेल, योग्य नाही. मराठी चित्रपट चांगले यायला लागले याचा तस्करीशी काहीही संबंध नाही. महाराष्ट्र सरकारने चित्रपटाना काही आर्थिक सुविधा दिल्या ज्यामुळे कमी लोक चित्रपट बघायला आले तरी चित्रपट काढण्याचे आर्थिक गणित जमू लागले. त्यामुळे अधिकाधिक चांगल्या निर्मात्याना, कलाकाराना चांगले चित्रपट काढावेसे वाटू लागले. कारण चित्रपट चालण्यासाठी मुद्दाम मसाला घुसडण्याची तेव्हडी गरज उरली नाही. याच काळात तंत्रज्ञानाची किंमत कमी होत होती ( पण तंत्रज्ञांचा मेहेनतताना वाढत होता). चांगल्या चित्रपटाना एक वेगळा पण नफ्यासाठी पुरेसा प्रेक्षकवर्ग हि मिळत होता. या सगळ्याचा एक चांगला परीणाम म्हणून अधिकाधिक चित्रपट तयार होत गेले. त्यातले किती लोकप्रिय झाले हा भाग वेगळा. >शिवाय परदेशात चित्रपट पाहुच नयेत का हा लॉजिकल प्रश्न आहे. परदेशातल्या कुठल्या महाराष्ट्र मंडळाच्या कार्यकारिणीवर कधी काम केले आहे का? परदेशातला मराठी माणूस मराठी चित्रपट असेल तरी तो बघायला येतोच असे नाही. मग भले त्याचे तिकिट एक पिझ्झा या पेक्षा कमी किमतीचे असेल तरीही. >परदेशातील लोकांनी चित्रपट या मार्गाने पाहिल्यास काहीच तोटा नाही तोटा आहे. ज्या मराठी मंडळानी असे चित्रपट दाखवायचा प्रयत्न केला त्याना तोटा आहे. ज्यानी परदेशात व्हिसीडी वितरण करण्यासाठी प्रयत्न केले त्याना तोटा आहे. ज्या कलाकारानी एकरकमी मोबदला न घेता रॉयल्टीवर आधारित मोबदला घेतला त्याना तोटा आहे. जे कलाकार त्यांचे प्रदेशात कार्यक्रम करून, त्या कार्यक्रमानंतर त्याच्या सीडी व्हीसीडी विकतात त्याना तोटा आहे. आणि याहून फार मोठा तोटा आपल्या सगळ्यांचा आहे. एकूणच पायरसी खूप असल्यामुळे, ज्याना अशा तबकड्या काढणे शक्य आहे, पण तस्करीतला तोटा इतर प्रकारे (कार्यक्रम) भरून काढणे शक्य नाही असे कितीतरी निर्माते यात उतरत नाहीत त्यामुळे आपल्या सगळयाना अजुन जितक्या तबकड्या पहाता येणे शक्य आहे तेव्हड्या निघतच नाहीत.
|
Jya goshti copy karata yetat tya copy karavyat he maze mat ahe. Yat kahi piracy etc. nahi. Ya companya ani kalakar greedy zale ahet. Maze prashna : Jyani bhasha shodhun kadhali te royalti magatat ka? Jyani math shodhun kadhale te royalti magatat ka? Devani hat/pay, dole, mendu dila ... to royalti magato ka? Mi PhD keli ani research fookat publish kela (karava lagala) ... mi royalti magato ka? Shivaji ne marathi sanskriti vachavali .. to royalti magato ka? Mag he kalakar ani companya ka magatat? Khadyat geli hi loka. Mi jar kahi copy karu shakato tar mi ti karanar. Ha maza janma sidha hakka ahe.
|
अमेरिकन देसी तुम्ही पोटापाण्याचा धंदा करता त्याचा मोबदला घेता की नाही? की फुकटच करता? त्याचप्रमाणे निर्माते, कलाकार ह्यांचा पोटापाण्याचा धंदा आहे कलेची निर्मीती करणे व ती विकणे. मग त्यांचे उत्पादन असे सहजतेने कॉपी करता येते केवळ हे कारण समर्थनीय आहे?? तुमच्या पोस्टवरुन असे वाटते आहे की तुमचा PhD चा प्रबंध तुम्ही फुकट प्रकाशित केला नाहीत तर तो तुम्हाला करायला भाग पडले. म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करायला भाग पाडले ह्याचा राग तुम्ही बाकी लोकांवर अशीच वेळ आणुन काढणार का?
|
Killedar
| |
| Monday, December 17, 2007 - 10:31 pm: |
| 
|
american Desi, ramadasaani "dasbodh" lihila, tyaani phd maagitali ka? >Devani hat/pay, dole, mendu dila mag devani phd magitali ka? maga tumhaalaahi phd kashaala havi? > Ya companya ani kalakar greedy zale ahet He student ugach greedy jhaale aahet. Nusati phd gheun thambat naahi tar ti chalu asataana TA karun kinwa RA karun tynaa jagayala paise have asataat. tyana phukatcha aani bhuke raahun kaam karayala kaay hote?
|
इलेक्ट्रॉनिक माध्यमे व त्याची कॉपी करणे कितपत कायदेशीर आहे ह्यात काळे व पांढरे इतके ठळक भेद नाहीत. राखी छटा खूप आहेत. उदा. १. जेव्हा पूर्ण किंमत घेऊन एखादी सिनेमाची डिव्हिडी वा व्हिसिडी विकत घेतली जाते तेव्हा ती खराब झाली वा चालेनाशी झाली तर निव्वळ कच्च्या मालाची, टपालाची किंमत लावून तशीच नवी तबकडी मिळवता येणे हा गिर्हायकाचा हक्क आहे असे मला वाटते. तशी आज मिळते का? नाही. मग तबकडीची ब्याकप कॉपी बनवता येणे हा गिर्हाईकाचा हक्क आहे का? २. बहुतेक तबकड्या बनवणार्या कंपन्या थोडक्याच आहेत त्यामुळे गिर्हाईके मिळवण्याकरता किंमत कमी करावी असे त्यांना वाटत नाही. त्यांचे विशेष अडतही नाही. अशा परिस्थितीत लावतात ती किंमत कायदेशीर म्हणून स्वीकारणे हे न्याय्य आहे का? आठवा, पूर्वी एचेम्व्ही अव्वाच्या सव्वा किंमतीत ध्वनिफिती विकायची. टी सिरीज आल्यावर झक मारत किंमती उतरवल्या. पण तोवर त्यांनी लुबाडणूक केली त्याची शिक्षा त्यांना मिळाली का? आजिबात नाही. ३. दुसरे असे की तबकड्या लायब्ररीतून आणून बघणे, पाहुण्यांना बोलवल्यावर सगळ्यांनी मिळून सिनेमा पहाणे हेही गैर म्हणावे का? कारण तिथेही एकच तबकडी अनेकांना बघायला मिळते. कुणी सांगावे पुढे ह्यावरही बंदी घाला अशी मागणी होईल. ४. कित्येकदा तबकड्यांवर अनेक जाहिराती असतात. त्याकरता जाहिरातदारांनी पैसे मोजले असतात. म्हणून सर्व जाहिराती बघणे हे गिर्हाईकाचे कर्तव्य आहे असे निर्माते म्हणू लागले तर ते योग्य आहे का? त्या जाहीराती फास्ट फॉरवर्ड करणे बेकायदेशीर आहे असे समजायचे का?
|
Asami
| |
| Monday, December 17, 2007 - 11:30 pm: |
| 
|
ह्या topic वर BB उघडावा लागतो ह्यापेक्षा खेदाची गोष्ट काय असू शकते ? सगळ्यांचे moral compass वेगवेगळे असू शकतात हे मान्य असूनही काही मापदंड हे सर्वमान्य कालातीत असतात असे वाटत होते. बहुधा तसे नसावे खरे
|
Asami
| |
| Monday, December 17, 2007 - 11:33 pm: |
| 
|
पण तोवर त्यांनी लुबाडणूक केली त्याची शिक्षा त्यांना मिळाली का? आजिबात नाही. >> माज्या मते हे साधे demaan and supply चे principle आहे, बाकी काही नाही. तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य असले तरी ते CD/DVD बेकायदेशीरपणे copy करणे ह्यासाठी कसे समर्थनिय ठरू शकतात ?
|
हल्ली सिनेमातही जाहिराती घुसवलेल्या असतात. उदा. बागबानमधे हेमा मालिनी टाटा की कुठल्याश्या चहाचे पाकीट फोडून चहा बनवते तेव्हा ठसठशीतपणे तो ब्र्यांड पडद्यावर झळकतो. असे अनेकदा होते. तर बेकायदा कॉपी बनवून अनेकांनी हा सिनेमा पाहिला तर त्या उत्पादकाची आयतीच जाहिरात होईल व त्याचा फायदा होईल नाही का? इलेक्ट्रॉनिक माध्यमे विकणारे मोनॉपलीचा फायदा घेऊन वाट्टेल तो भाव लावत असेल तर त्यावर अंकुश ठेवणारी संस्था असायला हवी पण तशी काहीही नाही. त्यामुळे कायद्याचा आधार घेऊन भ्रष्टाचार करणार्यांना सिडी कॉपी करणे हे लोकांनी शोधलेले उत्तर आहे असे मला वाटते. इलेक्ट्रॉनिक्समधे एक क्रांती चालू आहे त्यायोगे उपभोक्ता अनेक बेकायदा गोष्टी करू शकतो. सगळ्यावर अंकुश ठेवणे अशक्य आहे. जरा स्थिरस्थावर झाले की ह्या कलेची निर्मिती करणारे काहीतरी कल्पक उपाय शोधतील ज्यायोगे बेकायदा कॉपी झाली तरी त्यांना पैसा मिळू शकेल.
|
Farend
| |
| Tuesday, December 18, 2007 - 1:26 am: |
| 
|
मला वाटते दैनंदिन गरजेच्या गोष्टींच्या किमतींवर अंकुश असण्याची गरज आहे (धान्य वगैरे), पण सीडी वगैरेंच्या किमती demand supply ने ठरवल्या जात असतील तर काय हरकत आहे. बॅकप कॉपी करणे हा हक्क म्हणता येईल, software CDs ची सुद्धा तशी कॉपी करता येते कायदेशीर पणे. बाकी गोष्टी gray area तील वाटतात. HMV वगैरेंचे माहीत नाही, कदाचित आधी त्यांची प्रोसेस अकार्यक्षम असेल (स्पर्धा नसेल तर असेच होते) त्यामुळे किंमत जास्त असली तरी नफा किती मिळत असेल कोणास ठाउक. जगात बर्याच गोष्टींबाबत असे झाले आहे.
|
entertainment is also a basic need !
|
Ajay
| |
| Tuesday, December 18, 2007 - 2:47 am: |
| 
|
> तबकडीची ब्याकप कॉपी बनवता येणे हा गिर्हाईकाचा हक्क आहे का? हो हक्क आहे आणि अमेरिकन कायद्यानुसार ते कायदेशीर आहे. इतकेच नाही तर माझ्या माहितीतले सगळे दुकानदार (भारतातले देखील) जर खराब तबकडी दिली तर त्याच कलाकाराचीचित्रपटाची दुसरी तबकडी बदलून देतात. >३. दुसरे असे की तबकड्या लायब्ररीतून आणून बघणे, पाहुण्यांना बोलवल्यावर सगळ्यांनी मिळून सिनेमा पहाणे हेही गैर म्हणावे का? गैर नाही. अमेरिकन कायद्यानुसार हे खाजगीत केले तर योग्य आहे. कायदेशीर आहे. इतकेच नाही तर काही तबकड्यांवर स्वत्:साठी तबकडीवरून mp3 format मधे रुपांतर करण्याचीही परवानगी दिली असते. पण सार्वजनिक रित्या पैसे लावा अथवा न लावा, केले तर गैर आहे. हे सगळे नियम fair use खाली मोडतात ज्या योगे जो मूळ ग्राहक आहे त्याला अडचण पडू नये अशी अपेक्षा आहे. म्हणून मित्राना बोलावून घरी चित्रपट पहाणे गैर नाही. पण त्याच चित्रपटाच्या प्रती काढून वाटणे बेकायदेशीर समजले गेले आहे. मला एक सांगायचे आहे इथे काही दिवसांपूर्वी असे संदेश होते (ते आता उडवले आहेत) -तुम्हीही माझ्यासारखी तस्करी करा, त्यात काही बेकायदेशीर नाही उलट ती मराठीची सेवा आहे, तस्करी अशी करता येईल वगैरे वगैरे ते पूर्णपणे बेकायदेशीर होते. एक लक्षात घ्या तुम्हाला कदाचित कायदा पटत नसेल, नैतिक दृष्ट्या योग्य वाटत नसेल म्हणून तो आपोआप गायब होत नाही. अधिक माहिती http://www.musicunited.org/2_thelaw.html http://www.musicunited.org/4_shouldntdoit.html
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|