Apvaad maayabaÜlaI idvaalaI AMkacaa. <<< ilaMbaÜNaI tulaa hivayao ka djao-dar r_IÆ 
|
Bee
| |
| Wednesday, December 01, 2004 - 9:54 am: |
| 
|
jaUnao idvaaLI AMk Cana vaaTtat vaacaayalaa. baroca vaacak jaUnao idvaaLI AMk vaacaayalaa naakartat (amaagacao
karNa malaa AjaUna kLlaolao naahI. AMk ho vat-maanap~k naahI kI baatmaI iXaLI hÜla. maaJyaakDo Axar
1986 caa Aaho. AqapasaUna [qapya-Mt vaacanaIya Aaho. AsaÜ.. [qao malaa kuNaI navaIna laoKk laoiKkaMba_la maaihtI dola kaÆ dÜna tIna vaYaa-t navyaa laoKakaMba_la
eoklao naahI. ra^baIna maoGanaa pozo baÐkot naÜkrI krtat ho tulaa ksao kaya maaihtI JaalaoÆ
|
ra^ibana AgadI AgadI. hvaa tuJyaa pÜsTlaa pNa AgadI AgadI. p`omasva$p Aa KrMca punha ekda vaacaNyaasaarKI hÜtI. %yaa svaaMt sauKaya ilaihtat mhNaUna to AiQak djao-dar hÜt Asaola.
|
Chafa
| |
| Wednesday, December 01, 2004 - 2:05 pm: |
| 
|
LOL h. h.Ê do TaLI² ~D
|
Hkumar
| |
| Saturday, December 08, 2007 - 5:12 am: |
| 
|
गेली ३ वर्षे थंड पडलेल्या या BB ला जागृत करावे म्हणतो. सध्या मी २००७ चा 'अंतर्नाद' चा दि. अंक वाचत आहे. त्यातील यशवंत रांजणकरांची 'गांधी' चित्रपटाची जन्मकथा खूप आवडली. मोतीलाल कोठारींच्या या चित्रपट काढायच्या कल्पनेला प्रत्यक्षात यायला तब्बल २० वर्षे लागली. 'गांधीं'ची भूमिका करणारे बेन किं. हे मूळ भारतीय वंशाचे असून त्यांचे मूळ नाव कृष्ण भानजी आहे ही माहिती सदर लेखातून मिळाली.
|
Zakasrao
| |
| Saturday, December 08, 2007 - 11:26 am: |
| 
|
मी ह्या वर्षी स्टॉल वर गेलो. तिथे पाटकरांचा आवाजचा हातात घेतलेला दिवाळी अंक किंमत वाचुन खाली ठेवला. १०० रु जरा जास्तच आहेत नै. वर त्या मानाने आतमध्ये दर्जेदार कंटेंट असेल तर बर. म्हणून घेतला नाही. ह्याच आवाजने त्यांच्या २५ कि ५० वर्ष झाल्यावर एक पेशल अंक काढला होता. ३५० रु फ़क्त. तो मात्र मी घेतला होतात. त्यात बरीच जुनी व्यन्गचित्रे होती. अगदी बाळासाहेब ठाकर्यानी काढलेलीसुद्धा मग कथाश्रीचा घेतला. अनुक्रमणिका वाचली त्यातली लेखक लेखिकांची नाव वाचुन घेतलाय अंक. सध्या वाचतोय. अजुन तरी निराशा झाली नाही
|
Hkumar
| |
| Sunday, December 09, 2007 - 5:01 am: |
| 
|
'आवाज' मधील व्यंगचित्रे लाजवाब असतात बाकी.
|
Dakshina
| |
| Tuesday, December 11, 2007 - 6:53 am: |
| 
|
झकास... तू पण आवाज वाचतोस? बहुतेक सगळे कोल्हापूरकर वाचतात वाटतं. कारण जनरली आवाज वाचणारे हे 'चावट' या कॅटेगरीत मोडतात (असं माझं मत ) पण आमच्या घरी पण आवाज यायचा. मागे एकदा काही निमित्ताने मी एका आयुर्वेदीक दवाखान्यात गेले होते, तिथे (बर्याच वर्षांनी) आवाजचा अंक पाहीला... कोल्हापूरनंतर प्रथमच.
|
Hkumar
| |
| Tuesday, December 11, 2007 - 10:33 am: |
| 
|
मनातून सगळेच 'चावट' असतात्; काहीजण वरून तसे नसल्याचा आव आणतात!
|
Zakasrao
| |
| Tuesday, December 11, 2007 - 10:38 am: |
| 
|
दक्षिणा ह्यावर्षी नाही घेतला. कारण आता क्वलिटी नाही अस मला वाटत. बहुतांश व्यंगचित्र चावट असतात. (अर्थात ती तशी आहेत की नाहीत ह्यासाठी ती पहावी लागतात ) आणि लेख आचरट म्हणुन. शिवाय किमंत बाकीच्यापेक्षा जास्तच आहे. मग तेवढ्याच किन्वा त्यापेक्षा कमी पैशात दर्जेदार अंक मिळु शकतो.
|
आवाज मध्ये या वेळी चांगल्या कथा आहेत. ( दक्षीना मी कोल्हापुरकर नसुन्ही आवाज मला आठवत असल्यापासुन दरवर्षी वाचतोय). म टा मध्ये यावेळेस भारत सुपरपॉवर या विषयावर बरेच लेख आहेत. ऐचकुमार बेन मुळ भारतीय वंशाचा नाही तो मिक्स आहे.
|
Farend
| |
| Tuesday, December 11, 2007 - 10:08 pm: |
| 
|
आवाज मधे पूर्वी ते 'खिडकी' असलेले पान आणि ते उलटल्यावर भलतेच निघणारे चित्र असलेली व्यंगचित्रे फार मस्त असायची. मधे (५-६ वर्षांपूर्वी) बघितेले तर एकूण दर्जा खालावलेला होता, म्हणजे आचरटपणा होता पण विनोद नव्हता. या वर्षी कोणते चांगले आहेत अंक? आवाज आणि मटा दोन कळाले.
|
केदार विकीपीडीयावर बेन चे मुळ नाव कृश्ण भान्जी आहे असे दिले आहे. पण त्याचा बाप हा मुस्लिम आहे असेही लिहिले आहे. त्यामुळे ही माहिती चुकिची वाटते.
|
Bee
| |
| Wednesday, December 12, 2007 - 3:17 am: |
| 
|
प्लीज.. मौज आणि सकाळच्या दिवाळी अंकाबद्दल माहिती मिळेल का?
|
Divya
| |
| Wednesday, December 12, 2007 - 3:43 am: |
| 
|
कारण जनरली आवाज वाचणारे हे 'चावट' या कॅटेगरीत मोडतात (असं माझं मत) अगदी अगदी दक्षिणा. 
|
Psg
| |
| Wednesday, December 12, 2007 - 5:39 am: |
| 
|
'कथाश्री' च्या कथांनी फार निराशा केली काहीच्याकाही आहेत (असं माझं मत!) 'माहेर'चा पूर्ण अंक वाचनीय आहे. कथाही 'मी आणि माझी आई' अशी विशेष लेखमाला आहे. ती पण वाचनीय. 'आवज'मधे त्या खिडक्या असतात की अजून.. मला आवडत नाही तो अंक. लेखन बरं असेलही, पण व्यंगचित्र चक्क अश्लील असतात. आणि दुर्दैवानी बरीच असतात. अर्थात, 'आवाज' आवडीने वाचणारे अनेक आहेत, त्यांच्यावर मी काही टीका करत नाहीये प्रत्येकाची आवड!
|
Hkumar
| |
| Wednesday, December 12, 2007 - 8:07 am: |
| 
|
मी 'अनुभव' चा अंक वाचत आहे. त्यातील संजय जोशी यांचा 'आणखी मोठ्या रेषेसाठी' हा लेख वाचला. एका कंपनीत astt. Vice president असणार्या या गृहस्थांनी चक्क वयाच्या ४३ व्या वर्षी निवृत्ती घेतली आहे. पुढील आयुष्य ते साहित्य, संगीत व स्वतःचे छंद यातच घालवणार आहेत.
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, December 12, 2007 - 2:27 pm: |
| 
|
हो आवाज ची व्यंगचित्र व खिडक्या अश्लीलतेकडे वळनार्या आहेत यात वादच नाही. पण त्या खिडक्यांमध्ये कमालीची कल्पकता असते. ( मधले एक दोन वर्ष सोडुन). पण आवाज मध्ये अगदी मान्यवरांचा कथा असतात जसे गंगाधर गाडगिळ, मंगला गोडबोले वैगरे वैगरे. त्यामुळे त्या व्यंगचित्रांकडे दुर्लक्ष करायचे. 'आवाज' आवडीने वाचणारे अनेक आहेत, त्यांच्यावर मी काही टीका करत नाहीये प्रत्येकाची आवड>> झाल मला आता त्या क्यॉट्यागिरि मध्ये समस्त भगिनी वर्गाने टाकले वाटत. अहो तस काही नाहीये हो. मी आपला साधा वाचक आहे. कालनिणर्य पण बरा आहे. आता लोकमत वाचायला घेतो आज. टन्या तो मुस्लीम नाही. त्याचे नाव भानजीच आहे बहुदा. त्यांचे वडील गुजराथी होते व आई ईंग्लीश पण गांधी करन्या आधी तो कधीही भारतात आला न्हवता. मध्ये मी त्याचे पिक्चर व त्याचे ब्यॉकग्रांउड वाचले होते कुठल्याश्या इंग्रजी लेखात तो लेख मिळाला तर टाकतो ईकडे.
|
Lalu
| |
| Wednesday, December 12, 2007 - 3:44 pm: |
| 
|
'आवाज मध्ये यंदा 'खिडक्या' नाहीत. 'पडदे' आहेत! मी वाचते आवाज दरवर्षी. साप्ताहिक सकाळ - साच्यातून काढलाय. २,३ कथा (त्यातली एक अनुवादित. बर्या आहेत.) अवचटांचा लेख (स्किप केला). सत्यदेव दुबेंची मुलाखत चांगली आहे. लीला पाटील यांनी लिहिलेल्या आठवणी आणि नीता गद्रेंचं दुर्धर आजराशी सामना केल्याचं अनुभवकथन आहे. हो, आणि वार्षिक राशिभविष्य आहे. धनंजय - मनोरंजक आहे. अंक मोठा आहे तसा. गूढकथा, रहस्यकथा, गुन्हेगारी, शिकारकथा इ. इ. आहेत. काही कथा चांगल्या आहेत. मौज - एलकुंचवार आणि मोनिका गजेंद्रगडकर यांच्या २ कथा वाचून झाल्यात. यातच श्री.पुं वर एक लेखमाला आहे त्यात पाडगांवकरांनी लिहिलंय. अजून पूर्ण वाचून झाला नाही. किस्त्रीम - सुरेखा पुणेकरांवर 'मी लावणी घरंदाज केली' हा लेख आहे. बाकी काही लिहिण्यासारखे नाही. अजून वाचून होतील तसे लिहीन.
|
Asami
| |
| Wednesday, December 12, 2007 - 4:37 pm: |
| 
|
धनंजय - मनोरंजक आहे. अंक मोठा आहे तसा. गूढकथा, रहस्यकथा, गुन्हेगारी, शिकारकथा इ. इ. आहेत. काही कथा चांगल्या आहेत. >> शेवटी शेवटी रटाळ होत जातो अगदी. बहुधा चांगल्या कथा निवडून सुरूवातीला ठेवल्या आहेत. Good example of editing
|