|
Asami
| |
| Wednesday, December 12, 2007 - 4:38 pm: |
|
|
कारण जनरली आवाज वाचणारे हे 'चावट' या कॅटेगरीत मोडतात मी वाचते आवाज दरवर्षी. >>लालू तू " त्या " category मधे मोडते हे माहित नव्हते. आता मी My Experience वर लिहितो
|
Lalu
| |
| Wednesday, December 12, 2007 - 5:04 pm: |
|
|
LOL इथे टीपी करु नको. 'जत्रा' कसा आहे ते लिही.
|
Asami
| |
| Wednesday, December 12, 2007 - 5:58 pm: |
|
|
'जत्रा' कसा आहे ते लिही. >> Tu ला हवा तसा
|
Farend
| |
| Wednesday, December 12, 2007 - 7:38 pm: |
|
|
पूर्वी चंदेरीचा ही चांगला अंक निघायचा. आता चित्रपटांवर निघतो का एखादा? आणि गौतम राजाध्यक्ष अजूनही चांगले फोटो देतात का त्यात?
|
Zakasrao
| |
| Thursday, December 13, 2007 - 6:15 am: |
|
|
अरेच्य्च्या चांगला आहे का ह्या वर्षीचा अवाज??? बर बघतो कुठे मिळाला तर नक्कि वाचेन. लालु मी हि अगदी असामी सारखच लिहिणार होतो फ़क्त दिवाळी अंक वाचण्यासाठी एखादी लायब्ररी असावी अस आता मला वाटतय. कारण मी सगळे अंक विकत घेवु शकत नाहि. एखाद दुसराच घेतो.
|
Bee
| |
| Thursday, December 13, 2007 - 10:01 am: |
|
|
अक्षर आणि ललित बद्दल लिहा जर कुणी वाचले असतील तर.
|
Farend
| |
| Thursday, December 13, 2007 - 10:17 pm: |
|
|
झकास तू पुण्यात आहेस ना सद्ध्या? अनेक लायब्ररीवाले पूर्वी दिवाळी अंक ठेवत वेगळी वर्गणी देऊन ते वाचता येत असत. अजूनही असेल कदाचित आणि इतर शहरातही असेल, पण मला माहीत नाही.
|
Hkumar
| |
| Sunday, December 16, 2007 - 4:21 am: |
|
|
'अंतर्नाद' च्या अंकात अनुवादीत साहित्य हा विशेष विभाग आहे. नामांकित अनुवादकारांचे लेख त्यात आहेत. अनुवादांसंबंधीचे एक वाक्य आवडले: Words into World & World into words .
|
Savani
| |
| Sunday, December 16, 2007 - 5:13 am: |
|
|
झकास, पुण्यात अप्पा बळवंत चौकात रसिक साहित्य चे दुकान आहे तिथे चौकशी करा दिवाळी अंकांच्या लायब्ररीबद्दल. मी २००४मध्ये गेले होते तेव्हा त्यान्ची खास दिवाळीअंकांची लायब्ररी होती. मला वाटतं महिना १०० रु. वर्गणी होती.
|
Mahaguru
| |
| Monday, December 17, 2007 - 5:58 am: |
|
|
मायबोली 'खरेदी' विभागाच्या कृपेने गेल्या वर्षी पासुन दिवाळी अंक वाचायला मिळत आहेत. ह्यावर्षी मागवलेल्या अंकांबद्दल्: आवाज - खिडक्या, पडदे सगळे आहे पण पांचटपणा पण खुप काही दर्जेदार नाही. दर्जा - १ / ५ रुपेरी - चंदेरीचा अंक निघालानसल्यामुळे त्याएवजी हा अंक मिळाला. पुर्ण वाचला नाही पण मराठी चित्रपट सृष्टी च्या वाटचाली वरील काही लेख बरे आहेत. - २.५ / ५ मेहता मराठी ग्रंथ जगत - फक्त चाळला. वाड.मयीन नगरे आणि असे गुरु असे शिष्य अश्या लेख माला आहेत. फार काही अपेक्षा नाही. २.५ / ५ अक्षर - अजुन वाचला नाही पण अनिल अवचट, पुष्पा भावे, पद्मजा फाटक, डॉ. विजया संगवई यांचे लेख तसेच आरोग्यम धनसंपदा अशी विशेष लेखमाला असल्याने उसुकता आहे. मौज - वाचन चालु आहे. श्री. पु. च्या आठवणीबद्दलची लेखमाला बरी आहे. अनिल अवचट नरेंद्र चपळगावकर महेश एलकुंचवार यांचे लेख तसेच काही प्रवास वर्णने, शास्त्र आणि शास्त्रज्ञ ही लेखमाला पण वाचनीय आहेत. सुधीर रसाळ कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांचे लेख अजुन नाही वाचले. कवितांबद्दल फार समजत नाही पण मंगेश पाडगावकर, शंकर वैद्य, ना.धो. महनोर, वसंत आबाजी डहाके या सारखी नावे आहेत. एकुण हा पण चांगल्या दिवाळी अंका पैकी एक आहे. चित्रलेखा - हा मी कशाला मागवला काय महिती. अनुक्रमणिका बघुनच ठेवुन दिला. मायबोली तर्फे भेट म्हणुन मिळालेला रुचिरा मी तत्परतेने सौ. च्या स्वाधीन केला. अनेक पदार्थांची पाककृती असलेला दिवाळी विशेषंक आहे.विकत घ्यावा असे काही खास नाही.
|
Psg
| |
| Wednesday, December 19, 2007 - 10:45 am: |
|
|
'प्रिय मैत्रिण' हा दिवाळी अंक जरा बिचकत बिचकतच हातात घेतला.. असे 'मैत्रिण' वगैरे अंक हमखास 'गृहशोभिका' टाईपचे असतात.. पण अंक खूपच चांगला आहे. सुलभा देशपांडे, ईला भाटे, मुक्ता बर्वे यांचा नाट्यप्रवास, 'माझी बायको माझी सखी' हे सदर, पद्मजा फेणाणी- जोगळेकर यांची मुलाखत, चांगल्या दर्जाच्या कथा आणि ललित.. अंक अजिबात निराश करत नाही. जरूर वाचा! मुखपृष्ठावरची सुंदरीही खरंच सुंदर आहे, पण नाव आहे तिचं 'जिरल'!! कोणाची जिरंल?? काय माहित!!
|
Asami
| |
| Wednesday, December 19, 2007 - 6:29 pm: |
|
|
ह्यावेळचा जत्रा वाचल्यापासून मी आठवडाभर छापील पान पण वाचले नाहिये. किती टाकाऊ ? त्या piracy BB वरच्या काही post पेक्षाही जास्ती
|
Slarti
| |
| Wednesday, December 19, 2007 - 10:08 pm: |
|
|
निदान तो अंक विकतच घेऊन वाचलास ना ? अंतर्नादमधील अनिल किणीकरलिखित रॉय किणीकरांवरचा लेख सुंदरच आहे. (अंतर्नाद दिवाळी अंकाची प्रसिद्धी होईल व एकूण दिवाळी अंकांना चांगले दिवस येतील अशा आशेने तो अंक विकत न घेता ढापून आणून वाचला.)
|
Asami
| |
| Thursday, December 20, 2007 - 12:57 am: |
|
|
हो , अर्थात इथे तसे नसते केले तर चांगले झाले असते. त्यामूळे का होइना अंकाची quality वाढेल अशी अपेक्षा ठेवता आली असती
|
Lalu
| |
| Thursday, December 20, 2007 - 5:42 pm: |
|
|
अक्षर - चांगला आहे. वर MG ने सांगितलेले आरोग्यावरचे लेख अजून वाचून झाले नाहीत, पण बाकी सगळे वाचले. विजया संगवईंनी मुलाबद्दल, संजयबद्दल लिहिलंय. राजू परुळेकरांचा आईवरचा आणि पद्मजा फाटकांचा लेखही छान आहे. हॅरी पॉटर आणि लेखिका यांच्यावरही एक लेख आहे. (तसे ते अजून ३,४ दिवाळी अंकात आहेत) कथाही चांगल्या आहेत. एक अनुवादित आहे, एक कादंबरी आहे. ग्रेसी कुळकर्णीची कथा समजली नाही. बाकी अंकापेक्षा यात कविताही चांगल्या आहेत. मिळून सार्याजणी - जरा निराशाच झाली. 'घर' विषयावर काहींचे लेख आहेत. वसुंधरा कोमकली (कुमार गंधर्वांच्या पत्नी) यांच्यावरचा लेख आवडला. लोकसत्ता - शेवटी हास्यरंग पुरवणी वाचून झाली आहे. मध्ये एका पर्यटनाच्या जाहिरातीने पानं खाल्लीत पण बरा दिसतोय अजून पूर्ण वाचला नाही. कव्हरवर ऐश्वर्या(जोधा) आहे. वार्षिक राशिभविश्य - मैत्रिणीने रद्दीत टाकलेला, म्हटलं मला पाठव, बघू तरी काय आहे. तिने पाठवला. पण मग तिने तो रद्दीत का टाकला होता ते मला कळले! प्रत्येक राशीचे २००८ चे आठवडावार भविष्य आहे. (आता यात दुसरे काय असणार म्हणा.) पुन्हा जन्मतारीख, तीळ असल्या गोष्टींवरुन एकदम HHPV स्वभाववैशिष्ठ्ये वगैरे लिहिलीत. कोणाला पाहिजे का?
|
Priya
| |
| Thursday, December 20, 2007 - 8:20 pm: |
|
|
लालु, अगदी Pay it forward ईश्टाईल का? चन्देरी प्रसिद्ध न झाल्याने मिळालेला रुपेरी बराचसा वाचला. पण फारच वरवरचे लेख आहेत. शिरीष कणेकरांचे लेखन वाचून हे असले लेख झेपत नाहीत. बहुतेक सगळ्या अंकांनी निराशाच केली आहे. हातात घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवूच नये असा एकही नाही वाटला अजुन. शेवटी आता आवाज वाचायला घ्यावा असं म्हणतेय.
|
Hkumar
| |
| Saturday, December 22, 2007 - 7:06 am: |
|
|
स्लार्टी, तो राॅय किणीकरांवरचा लेख मलाही आवडला. तसाच एक दुसरा लेख 'अनुभव' च्या अंकात आहे. तो आता वाचेन.
|
अनुभवचा दिवाळी अंक खूप चांगला आहे. विशेषतः संजय जोशींचा "आणखी मोठ्या रेषेसाठी" हा लेख वाचनीय आहे. http://www.eanubhav.com/
|
Hkumar
| |
| Tuesday, January 08, 2008 - 1:46 pm: |
|
|
सतिश, आणि त्याच अंकात 'आखूड लोकांचा प्रदेश' या लेखात बर्याच मराठीजनांना भरपूर फटके मारले आहेत!
|
|
मायबोली |
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|