|
Chyayla
| |
| Monday, November 26, 2007 - 9:50 am: |
| 
|
वेगवेगळे पर्याय उपलब्ध असताना आपण काही गोष्टी ठराविक पद्धतीनेच का करतो, असा प्रश्न कदाचित त्यांना पडलेला असेल! या उदाहरणावरुन प्राचिन काळापासुन भारतात अध्यात्माच्या मार्गावर अग्रेसर होताना किती सखोल विचार केला याचे महत्व पटतय. देव जाणण्यासाठी त्यान्नी अशी विषिष्ट चौकट बांधुन ठेवली नाही. तर सगळ्याना सर्व प्रकारचे मार्ग जोखण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. स्वामी विवेकानंद तर म्हणतात भगवत प्राप्ती, ज्ञान मिळवण्यासाठी हव्या त्या मार्गाचा उपयोग करा एवढेच नव्हे तर प्रत्येक व्यक्ति परत्वे धर्म वेगळा झाल्यास ते अतिशय उत्तम (धर्म म्हणजे Religion नव्हे). यातुनच भारतिय अध्यात्मशास्त्राचे प्रगल्भ रुप दिसुन येतय तर भारताबाहेर, ईतर संस्कृतीत ही प्रगल्भता यायला बराच वेळ लागेल. भारतातही या मुलतत्वाला बरेच धक्के बसले व बसतही आहेत पण तरीही मुलतत्व कायम ठेवण्यास यशस्वी ठरलो. ज्याप्रमाणे लाटांच्या खळखळाटांचा समुद्रावर परिणाम होत नाही त्याप्रमाणेच हे अध्यात्मिक तत्व अबाधित राहिले आहे. सध्या आपण पहातोच की ईस्लाम, ख्रिश्चन यान्नी देवासाठी कृत्रीम संस्था (मशीद, चर्च) निर्माण केल्यात व त्या माकडांच्या उदाहरणाप्रमाणे विषीष्ट नियम, उपासना पद्धती, प्रेषीत, धर्मग्रंथ, कर्मकांड यानाच महत्व दिले ते का करायचे त्यासाठी अध्यात्मिक पैलु पेक्षा समाज, राज्यशासन असे कृत्रीम पैलु आहेत व त्याबाहेर त्यान्ना पडता येत नाहीये. काळानुसार त्यांच्यातही ही प्रगल्भता येइलही पण सध्या तरी अपरिपक्व, व एकाठीकाणी खोळम्बुन पडल्या सारखी अवस्था दिसुन पडतेय. यात कुणाला कमी लेखण्याचा उद्देश नाही तर थोड्या वरच्या पातळीवरुन विष्लेशण करण्याचा प्रयत्न आहे. कदाचित काळाच्या ओघात तेही या पातळीवर येतिलही. कारण परिवर्तन हा संसाराचा नियम (ह्या नियमाला तेवढा अपवाद) आहे. रवींद्रकदम तुम्ही छान थोडक्या शब्दात मर्म सांगितले, अगदी बरोबर आहे देव जाणायचा म्हणजे स्वता:लाच जाणा म्हणजे स्वता:च दिव्य स्वरुप (देव) जाणा. यातच सगळ आले.
|
कर्मकान्डे, रुढीन्चे अन्धानुकरण, या गोष्टी हिन्दु धर्मात नाहीत असे म्हणायचे आहे का?.
|
हिंदू धर्मात देवाचे ठराविक रूप नसल्यामुळे तो धर्म सहिष्णू झाला पण त्या धर्मात कर्मकांडे, रुढी, अंधश्रद्धा अमाप आहे. कुठल्याही दगडा धोंड्याला शेंदूर फासा अणि मग त्यासमोर कोंबड्या, बोकड मारा आणि खा. अगदी तथाकथित जागृत देवस्थानातही हाच प्रकार. मूर्तीपूजा असल्यामुळे मुर्तींना किळस येईल इतक्या पद्धतीने नटवने, दागिने चढवणे, दुधातुपाने माखून त्या खाद्यपदार्थांचा अपव्यय आणि दुर्गंध, अस्वच्छतेला निमंत्रण. हे प्रकार इस्लाम वा ख्रिस्ती लोकांत दिसत नाहीत. आम्हा नास्तिकांच्या मते जगात देव किती ह्याचे उत्तर शून्य आणि हिंदूंच्या कोट्यावधि देवांपेक्षा एक देव मानणारे अचूक उत्तराच्या खूप जवळ आले आहेत! त्यांनी अजून एका आकड्याने खाली जायला हवे!
|
Chyayla
| |
| Tuesday, November 27, 2007 - 5:19 am: |
| 
|
मला एकच स्पष्ट उत्तर द्या या सगळ्या गोष्टींचा म्हणजे रुढी, कर्मकांड आणि देव यांचा काय संबंध. मी याबद्दल आधीच लिहिलेय तुम्ही परत तेच सुरु करताय. हिंदु जीवनशैलित रुढी पाळा, मुर्तिपुजा करा, मंदिरात जा असे काही नियम नाहीत किंवा कोणी करत नसेल तर ईतर Religion प्रमाणे त्या माकडांप्रमाणे कुणी मारतही नाहीत. दगडा धोंड्याला शेंदूर फासा अणि मग त्यासमोर कोंबड्या, बोकड मारा आणि खा याला सामाजिक विकृती म्हणता येइल आणि ती कोणत्याही System मधे येते व जातेही.. परत याचा आणि देवाचा काय संबंध????? असो हे झाले देवाच्या नावावर काही ठरावीक समाजापुरता मर्यादित. पण हिंदु तत्वज्ञानात याबद्दल तर कुठेही काही लिहिले नाही... माझा एक तेलुगु सहकारी म्हणतो की त्यांच्याकडे दिवाळीत सणाला मटन बनवायची रुढी आहे... घ्या आता हे कुठुन आले? देवामुळे????? तुम्हाला जर सामाजिक विकृतीच पहायच्या असतील तर देवाच्या नावापेक्षा ईतर ठिकाणी जास्त सापडतील. उदा: भ्रष्टाचार, चोर्या, खुन, दरोडे, पार्टीच्या नावावर कोंबड, बकर्या व जगातले कित्येक निष्पाप प्राणि कापणे, दारु ढोसुन गुन्हे करणे ही यादी बरीच लांब व्हायची. शेवटी परत सांगतो की तुम्ही असम्बंध मुद्दे ईथे उपस्थित करत आहात. यांचा आणी देवाचा काही संबंध नाही.
|
Radha_t
| |
| Tuesday, November 27, 2007 - 9:36 am: |
| 
|
तो जळी स्थळी काष्टी पाताळी, चराचरात सामावलेला आहे. परन्तु तो आपल्याला शोधता आला पाहिजे तर तो माझ्यातही असला पाहिजे. म्हणजे मी सुद्धा देव आहे. निर्जीव वस्तूंमधे सुद्धा देव असला पाहिजे मग त्या निर्जीव वस्तूंवर श्रद्धा किंवा कुठल्याही प्रकारच्या भावना असण्याच कारण काय? ही स्वतःची आणि जगाची फसवणूकच आहे. जगातल्या सर्व दुष्ट पापी लोकांमधेही देव असला पाहिजे. देव त्यांच्याकडून अशी काम का करून घेतो? निर्जीव वस्तूंमधे काय असत? अणू रेणू, एलेक्ट्रोन्स, प्रोटोन्स, विद्युत लहरी. त्यात देव exactly कुठे असतो? energy म्हणजे देव का? चराचरातल चैतन्य म्हणजे देव का? आणि असला तरी त्याला पुजायच कशाला?
|
Zakki
| |
| Tuesday, November 27, 2007 - 2:16 pm: |
| 
|
पुन: एकदा. देव ही एक कल्पना आहे. ती पूर्वीपासून अतिशय लोकप्रिय नि सन्मान्य झाली आहे. पण देवाचे खरे स्वरूप फक्त अनुभूतितून मिळते, नि ते फार कठिण आहे. त्यातहि विश्वास असल्याशिवाय ते जमत नाही म्हणे. म्हणजे मुळातच अडचण. विश्वास नाही, मग ते कठिण काम करायचे कशाला? नि ते केले नाही तर देव नाहीच. मग या बाकीच्या गोष्टी कुठून आल्या? लोकांनी तयार केल्या. अगदी पूजा, नामस्मरण इ. सुद्धा. हळू हळू त्यातल्या शेकडो चालीरीतींचा लोप पावला आहेच. तर जे लोक देव नाही म्हणतात ते असले लिहून ज्यांचा देवावर विश्वास आहे त्यांना उगीचच न संपणार्या वादात अडकवतात.
|
Zakki
| |
| Tuesday, November 27, 2007 - 2:19 pm: |
| 
|
जसे पैसा गुंतवून नफा मिळवणे या साठी लोक निरनिराळ्या 'युक्त्या' वापरतात. त्यातहि त्यांचे स्वत:चे एक शास्त्र असते. ते शास्त्र प्रत्येक संस्थेच्या, व्यक्तिच्या मते वेगळे असते. त्या सर्व लोकांना नफा होतोच असे नाही. मग हळू हळू लोक एकाच किंवा दोन चार 'theories' वर विश्वास ठेवू लागतात. जशी परिस्थिती बदलते तशी त्या शास्त्राची उपयुक्तता कमी जास्त होते. मग काही लोक ते शास्त्र खोटे आहे असे म्हणायला लागतात. तसेच आपले कल्याण व्हावे यासाठी काही लोक देव मानून त्याचे अवडंबर करतात. काही करत नाहीत. अनेऽक अनेऽक वर्षांपूर्वी अनेऽक लोकांनी देव नि तत्संबंधित इतर कल्पना या अगदी एकमताने मान्य केल्या. कालमानाप्रमाणे त्या तितक्याशा बदलल्या नाहीत. शिवाय मूलभूत तत्वे विसरून फापटपसाराच (कर्मकांडे, ती सुद्धा चुकीच्या पद्धतीने करणे) वाढवला. म्हणून आज हा गोंधळ.
|
एकदा एक डोळ्यांचे तज्ञ डॉक्टर एका आंधळ्या माणसाचे डोळ्यांचे ऑपरेशन करतात. ह्यामुळे त्या माणसाला दिसू शकणार असतं. ऑपरेशन झाल्यावरती काही दिवसांनी जेव्हा पट्टी काढायची वेळ येते, तेव्हा डॉक्टर म्हणतात की आता डोळे उघड म्हणजे तुला दिसू लागेल. तर त्यावर तो पेशंट म्हणतो की आधी मला proof द्या की मला नक्की दिसेल मगच मी डोळे उघडेन. डॉक्टर म्हणतात की तुला दृष्टी आली आहे हे कळण्यासाठी तुला डोळे उघडून स्वत: अनुभव घ्यावा लागेल. दुसर्यानी दिलेल्या कुठल्याही proof नी ते शक्य नाही.
|
Chyayla
| |
| Wednesday, November 28, 2007 - 2:16 am: |
| 
|
झक्की, अमेय फ़ारच सुंदर पोस्ट.. मुलभुत तत्वे विसरल्या मुळे हा फ़ापटपसारा झाला त्यामुळे देवाबद्दल गोंधळ निर्माण झालाय हे खरे. राधा, पूजा करणे म्हणजे त्याला जाणुन घ्यायची पद्धत आहे पूजा म्हणजे भक्ति, पूजा म्हणजे प्रेम, जिज्ञासा, उत्सुकता, सत्य जाणण्याची धडपड.. तु समजते तसे निव्वळ कर्मकांड नव्हे. (अगदी शेंदुर फ़ासणे, मुर्तिपुजा करणे हेही नाही, शेंडे नोंद घेतीलच... ) हे मूलभुत तत्व आधी समजुन घेतले तर गोंधळ होणार नाही. एखादी गोष्ट जर तुम्हाला जाणायची असेल, जिज्ञासा शमवायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचे चिंतन, मनन करावे लागेल त्याचा सतत ध्यास घ्यावा लागेल, अभ्यास करावा लागेल यालाच भक्ति आणि या पद्धतीला पूजा म्हणतात. अशाप्रकारे जगातल्या कोणत्याही गोष्टीची भक्ति केली कि त्याचे ज्ञान हळुहळु होत जात ते सत्य तुमच्या समोर आपसुक उलगडत जात, पण तेवढी श्रद्धा, आत्मविश्वास, प्रेम व मुख्य म्हणजे तेवढा धीर असायला हवा. देव जाणायचा असेल तर ईतर गोष्टीबद्दल तुला मागच्या पोस्टमधे लिहिले आहेच.
|
>> मला एकच स्पष्ट उत्तर द्या या सगळ्या गोष्टींचा म्हणजे रुढी, कर्मकांड आणि देव यांचा काय संबंध. मी याबद्दल आधीच लिहिलेय तुम्ही परत तेच सुरु करताय. ह्या निरर्थक गोष्टी देव ह्या कल्पनेमुळेच सुरू झाल्या आहेत. म्हसोबा, सटवाई, जरी मरी ही मंडळी आदिम स्वरुपाची देव देवी आहेत. जो कुणी त्यांना नवस बोलणे, बळी देणे, पूजा करणे, नैवेद्य वगैरे करतो तो किंवा ती देवासाठी करतोते आहे अशा श्रद्धेने. हे सगळे हिंदू धर्मात सर्रास चालते. निव्वळ सोयीचे तेच आमचे आणि कर्मकांड वगैरे म्हणजे देवाशी संबंधच नसलेल्या गोष्टी असा आव आणणे म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाणे आहे. सामान्य भक्ताच्या दृष्टीने हाच देव असतो. तिरुपती हे "देवस्थान" आहे. तिथे भक्तीचा जंगी व्यापार चालतो हे उघड सत्य आहे. वेदांचे विवेकानंदांचे कितीही दाखले दिलेत तरी ही गोष्ट नजरे आड करता येत नाही. देव ही संकल्पनाच अशी आहे की त्यातून असली पोकळ कर्मकांडे निर्माण होतात. कुठलीही तर्कशुद्ध भूमिका नसल्याने देव ह्या अनावश्यक, कालबाह्य कल्पनेला असे फाटे फुटतात. मुस्लिम व ख्रिस्ती लोकांचा देव अमूर्त असतो म्हणून असली पोकळ कर्मकांडे तुलनेने कमी निर्माण होतात. आपण अक्षरश्: कशालाही देव मानत असल्यामुळे रुढींनी उच्छाद मांडला आहे हे धडधडीत सत्य आहे.
|
निव्वळ बोधकथा वापरून आपला मुद्दा मांडायची फ्याशन आली आहे मग ही बोधकथा वाचा. एकदा आटपाट नगरीच्या राजाला एका चतुर विणकराने एक पोषाख विकला. खरे म्हणजे पोषाख वगैरे काहीच नव्हता पण विणकराने म्हटले की एका अद् भूत धाग्याने हे वस्त्र बनवले आहे त्यामुळे राजावर निष्ठा असणार्यांनाच ते वस्त्र दिसेल. पापी, कलंकित लोकांना दिसणार नाही. राजाने खूष होऊन तो "पोषाख" चढवला. विणकराला घसघशीत इनाम वगैरे मिळाले. मग राजाने एक मिरवणूक काढली. कुणाही प्रजाजनाला राजा नागवा आहे असे म्हणण्याची छाती झाली नाही कारण आपण पापी आहोत, आपली राजावर निष्ठा नाही असा संशय यायचा. सर्वजण राजाच्या वेषाचे तोंड फाटेपर्यंत कौतुक करत होते. तेवढ्यात एका लहान मुलाने ही मिरवणूक पाहिली आणि अचंब्याने तो सहज म्हणाला की "अरेच्चा! राजाने कपडेच घातलेले नाहीत!" लोकांनी ते ऐकले आणि म्हणाले हे लहान मूल पापी वा फितुर कसे असेल? बहुधा राजाने कपडेच घातलेले नाहीत बरं का. आणि थोड्याच वेळात ही गोष्ट षट् कर्णी झाली आणि राजाची फजिती झाली. देव आहे म्हणणारे त्या विणकरासारखे "चतुर" आहेत. एक अस्तित्त्वात नसलेली गोष्ट ते सगळ्यांच्या माथी मारू पहात आहेत. तुम्हाला देव दिसत नसेल तर तुमचा प्रयत्न कमी पडतो आहे, तुमची श्रद्धा कमी आहे म्हटले की झाले!
|
Radha_t
| |
| Wednesday, November 28, 2007 - 4:16 am: |
| 
|
देव आहे म्हणणारे त्या विणकरासारखे "चतुर" आहेत शेंडे नक्षत्र, एकदम पटेश. याच गोष्टीत समजा तो विणकर चतूर नसून खरोखरीच अस काही अदभूत धागे असतील तरी अश्या वस्त्राचा उपयोग काय की जामुळे श्रद्धा नसणार्या लोकांना राजा नागवा दिसेल. जर समजा मानल की श्रद्धा बिद्धा असून कुणाला अनूभूती झाली आणि ज्ञान मिळाल, त्याला एकट्यालाच कशाला सगळ्यांनाच झाली तरी पुढे काय? आत्मा परमात्मा विलीन झाले, माणुस सुख दुखाच्या पलिकडे गेला, जन्म मरणाच्या फेर्यातून सुटला तरी पुढे काय? सगळेच जीव असे मोक्ष प्राप्तिला गेले तर सृष्टिच्या चक्राच काय? ते थांबून चालेल का?सगळेच भगवान बुद्ध होउन चालेल का? ज्ञान प्राप्ती झालेल्या माणसामधे आणि न झालेल्या माणसामधे फरक का? अन्न वस्त्र निवारा या तर दोघांच्याही मुलभूत गरजा आहेतच. मरण हे अंतीम सत्य दोघानांही आहेच. ज्ञान प्राप्ती झालेला सर्व सुखी असतो आणि न झालेला सदैव दुःखी असेही नाही. तसही रामदास स्वमीनी म्हटलच आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधोनी पाहे. बुद्ध great न्व्हते अस माझ बिल्कुल म्हणण नाही. पण त्यानी जे केल ते फक्त विकारांपासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग शोधला आणि जगालाही तो सांगितला. hats off to him पण याचा अर्थ मी असा मानणार नाही की ते देव होते किंवा त्यांना देव भेटला. अनूभूतिच्या जोरावर विकारांपसून मुक्ती हे ज्ञान प्राप्त झाल इतपत ठीक आहे. पण त्यावरून जगात देव आहे आणि तो सर्व शक्तीमान आहे हे मानायला मन तयार होत नाही. एक कल्पना म्हणुन देव मानायला हरकत नाही पण ती entity असूच शकत नाही.
|
राधा, नक्किच तो तुझ्यातही आहे. तुला त्याची ओळ्ख नाही एवढेच! जर मनुष्याला सजीवामध्ये दडलेला देव पाहता येत नाही तर निर्जिव वस्तुतील देव तो काय पाहणार? मनुष्य स्व:ताच स्व्:ताची फसवणुक करत आहे. रात्रि झोपल्यानन्तर पुन्हा सकाळी तुमच्या अन्गावरची चादर कोण बाजुला काढतो? ती चेतनाशक्ति जर त्याने निर्माण केली नसती तर १२ तासान्च्या आतच या देहाची विल्हेवाट लावावी लागली असती. म्हणजेच चराचरातील चैतन्य त्याच्यामुळेच! समर्थ बोलतात, सजीवान्च्या अन्तरी असणारा आत्मा हाच खरा देव आहे! मग द्रुष्ट, पापी लोकान्मध्येही तो असतो तरीही ते पाप करत असतात कारण त्याणा त्याची जाणीव नसते. त्या जीवावर विषयान्चा पगडा असतो, वा तो देह पुर्णपणे त्यान्च्या अधीन गेलेला असतो आणि तेच त्याच्याकडुन पापकर्म करुन घेत असतात. हा आता या विषयान्ची ओळ्ख करुन घ्यायची असेल तर ती करुन देणारा भेटावा लागतो, किन्वा ज्याचा तो अधिकार आहे तोच त्यान्ची जाणीव करुन देऊ शकतो. मनुष्याच्या अन्तरी असण्यारया त्या विषयविकारान्ची एकदा का त्या देहाला जाणीव झाली की त्याच्याकडून उत्तम कर्म घडतात आणि हीच तर त्या अन्तरी असणारया देवाची खरी पुजा आहे! म्हणुनच सन्तानी लिहुन ढेवले आहे की "शोधीशी मानवा राऊळी मन्दिरी नान्दतो देव हा आपुल्या अन्तरी. " आणि हेच सान्गण्याचा त्यानी सतत प्रयत्न केला होता.
|
Mansmi18
| |
| Wednesday, November 28, 2007 - 1:34 pm: |
| 
|
नमस्कार या BB वरील पोस्ट्स वाचुन सुचलेली ही कविता. (मंगेश पाडगावकरांची क्षमा मागुन देव म्हणजे देव म्हणजे देव असतो तुमचा आणि आमचा अगदी सेम असतो ख्रिस्ती लोक "गॉड" म्हणुन हाक मारतात मुस्लीम लोक "अल्लाह" म्हणुन साद घालतात भाषा वेगळी असली तरी देव तोच असतो बाहेर तो दिसत नाही त्याला आत पहावा लागतो समर्थाना "राम" बनुन भेटतो मीरेला "श्याम" बनुन भेटतो आपल्याला मात्र तो कधी दिसत नाही कारण अहंकाराचा चष्मा आपण कधीच काढत नाही(२) कोणी म्हणतात देवाची मला गरज पडत नाही कारण त्याच्यावाचुन माझे काही अडत नाही गरजेपोटी केली त्याला भक्ती म्हणत नाहीत जीवन जगण्याची त्याने शक्ती मिळत नाही देव म्हणजे देव म्हणजे देव असतो यांचा आणि आमचा मात्र सेम नसतो सहान्च्या पाशातुन सुटल्याशिवाय देव दिसणार नाही किती अवडम्बरे केली त्याला देव फसणार नाही देव अनुभवायला आहे एक रामबाण उपाय अहंकाराला बाजुला सारुन धरा सद्गुरुंचे पाय आता देवा तुमच्या चरणी आहे एक प्रार्थना संतांचा केमिकल लोच्या केलात तसा आमचा पण करा ना!!(१) सन्दर्भ्: १.या BB वरील काही पोस्ट्स. या पोस्त्स मधे ज्ञानेश्वर, समर्थ रामदास वगैरेना "मुन्नाभाई" सारखा "केमिकल लोच्या" झाला होता असे काहीनी मांडले होते. आणखी एकाने ज्ञानेश्वरंच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि त्यान्नी "सन्जीवन समाधी" न घेता "आत्महत्या" केली होती असेही लिहिले होते. २."विट्ठल तो आला आला" हा नन्दिनि९११ चा लेख (यातील एक उपमा मी वापरली आहे). धन्यवाद नन्दिनी!
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, November 28, 2007 - 7:10 pm: |
| 
|
ज्ञान प्राप्ती झालेल्या माणसामधे आणि न झालेल्या माणसामधे फरक का? अन्न वस्त्र निवारा या तर दोघांच्याही मुलभूत गरजा आहेतच. मरण हे अंतीम सत्य दोघानांही आहेच. ज्ञान प्राप्ती झालेला सर्व सुखी असतो आणि न झालेला सदैव दुःखी असेही नाही. तसही रामदास स्वमीनी म्हटलच आहे. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तुची शोधोनी पाहे. >>>>>>> अगदी बरोबर आहे राधा. रादर अन्न वस्त्र नसेल तर सामान्यांना ( म्हण्जे ९९ टक्के) लोकांच्या याच गरजा असतात. तुझे विचार (तुझा अनेक पोस्टा मधुन वाचलेले) अन नोरेनचे विचार ( विवेकानंद) सारखेच आहेत. देव या कल्पनेचा तत्कालिन उच्चवर्णीय ( यात फक्त ब्राम्हण नाहीत) गैर फायदा घेतला त्यामुळे अचान्क ब्रिटीशांचा आक्रमनानंतर आपल्या देशात नास्तीकतेच वारे जोरात वाहु लागले. देवाचा वा त्या शक्तीचा विज्ञानाशी सांगड घालन्याचा प्रयत्न विवेकानंदांनी केला आहे. विवेकानंदावर व रामकृष्ण मिशन वर बाजारात अनेक पुस्तक आहेत. नास्तिकांनी ती वाचली तर देवाकडे ( वा त्या शक्तीकडे) वेगळ्या दृष्टीने पाहाता येईल. तु त्यांची काही पुस्तक नक्की वाच. त्यात तुला जसे वाटते तेच लिहीले आहे पण थोड्या वेगळ्या पध्दतीने. कदाचीत तुला देवाकडे बघन्याचा वेगळा डायमेन्शन मिळेल. कारण देव की कल्पना नंतर्च्या उच्चवर्नीयांनी बदलली आहे. ती खरी काय आहे हे जानुन घेन्याचा प्रयन्त विवेकानंदानी केला होता. BTW ज्ञानेश्वरांसारखी विदेह समाधी विवेकानंदानां पण घेता येत होती. म्हणजे त्यांनाही केमीकल लोच्या होता का? (फक्त तुच नाही तर येथील सर्वांनी ती वाचावी).
|
देव या कल्पनेचा तत्कालिन उच्चवर्णीय ( यात फक्त ब्राम्हण नाहीत) यावर एक वेगळा बीबी उघडावा लागेल
|
Akhi
| |
| Thursday, November 29, 2007 - 3:50 am: |
| 
|
वा छान कविता. hope लोकन्चे डोळे उघडुन त्यांना देव भेटेल्दिसेल
|
"बाहेर तो दिसत नाही त्याला आत पहावा लागतो." वा! फारच मार्मिक लिहीलय. आपल्या अन्तरी असणारया त्या नारायणाची ओळ्ख कोणालातरी झाली बुवा! समर्थ सान्गतात, मनुष्याने नेहमी अन्तर्मुख व्हायला पाहीजे. परन्तु मनुष्य मात्र देवाला बाहेर शोधत फिरतो आहे आणी यामुळेच हे भोन्दुबाबा देवाच्या नावावर अवडम्बर माजवत आहेत. "सहान्च्या पाशातुन सुटल्याशिवाय देव दिसणार नाही".. आपल्या देहावर ज्यान्चा पगडा असतो तेच ते हे सहा विषय जे मनुष्याला नेहमी त्या अन्तरीच्या परमात्म्यापासुन दूर खेचुन नेतात, त्याला त्याची ओळ्ख करुन देत नाही. जोपर्यन्त ज्याचा अधिकार आहे व ज्याने स्व:त त्या विषयान्वर विजय मिळवलेला आहे अश्या सदगुरुन्ची भेट होत नाही तोपर्यन्त हा देह त्या सहान्च्या मायाजाळातुन सुटणार नाही. म्हणूनच म्हणतात " सदगुरु साक्षात परब्रम्ह ".
|
Zakki
| |
| Thursday, November 29, 2007 - 2:29 pm: |
| 
|
मेल्यावर काय होते मला माहित नाही. त्यासाठी जिवंत असताना काही करावे हे कसे नक्की सांगू शकणार? पण इहलोकी, या देहाला, मनाला सुख लागावे या साठी काहीतरी असावे, असे वाटते. आता प्रत्यक्ष देव आहे की नाही माहित नाही. तो असण्याची गरज पण नाही. पण सनातन धर्मात जे तत्वज्ञान सांगितले आहे, त्यात ऐहिक सुख दु:खे अल्पकालीन असतात, हे फक्त अनेऽक वर्षे जगलेल्यांना जाणवतात. त्यामुळे हळू हळू ते ऐहिक सुखदु:खांऐवजी काहीतरी नेहेमीच सुख वाटेल असे करता येईल का ते बघत असतात. त्यासाठी गीतेत बरेच मार्ग सांगितले आहेत. इतरत्रहि बरेच काही काही लिहीले आहे. ते सगळे समजणे मला तरी फार कठिण वाटते. मग त्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? शेवटी, देव ज्याला म्हणतात, अश्या एखाद्या धातूच्या मूर्तिला, किंवा दगडाला नमस्कार करून येता जाता कुठल्यातरी 'देवा'चे नाव घेत बसले, की मनातील लोभ, राग, मत्सर, नि तद्भव मानसिक दु:खे कमी होतात हा अनुभव. तर देव असो की नसो. माझ्या पुरते मला सुख नि आनंद वाटेल असे काय करावे याचे उत्तर सापडले आहे. अर्थात इहलोकी असे पर्यंत ऐहिक सुखासाठी जवळ बक्कळ पैसा पाहिजे हे मात्र अगदी लहानपणापासून समजले पाहिजे. तिथे 'अमर प्यार' वगैरे चा काही उपयोग नाही. शिवाय शारीरिक दु:खे होऊ नयेत या साठी तब्येतहि सांभाळावी लागते हेहि लहानपणीच कळले पाहिजे. मी तसे इतरांनाहि सांगतो. विश्वास वाटला तर करून बघा, तुम्हालाच फायदा होईल. नाही विश्वास वाटला तर तुमचे आयुष्य तुम्हाला लखलाभ!
|
तुमचा अनुभव किंवा माणसाला आयुष्याच्या शेवटी शेवटी जे कळतं ते ज्ञान जर त्याला पुस्तकांच्या माध्यमातून खूप आधी मिळालं तर त्याचा खरा उपयोग होऊ शकेल ह्या हेतूनी उपनिषद आणि किंवा गीता लिहिली गेली. संस्कृत भाषेमुळे ते समजणं नंतर सोपं राहिलं नाही. >>>>शेवटी, देव ज्याला म्हणतात, अश्या एखाद्या धातूच्या मूर्तिला, किंवा दगडाला नमस्कार करून येता जाता कुठल्यातरी 'देवा'चे नाव घेत बसले, की मनातील लोभ, राग, मत्सर, नि तद्भव मानसिक दु:खे कमी होतात हा अनुभव. मूर्तीपूजा किंवा देवाला हिंदू धर्मात physical रूपाला का मान्यता आहे ह्याबद्दल स्वामी विवेकानंदांच्या शिकागो मधल्या ह्या published paper मधे थोडी माहीती मिळेल. अर्थात त्याचा गैरफ़ायदा घेतला जातो ही वाईट गोष्ट आहे पण, त्यामुळे एखादा माणूस मूर्ती रुपात देव पहात असेल तर ते पूर्ण चूकच आहे असही म्हणता येणार नाही असं हा पेपर वाचल्यावर वाटतं. पेपर मधला ह्या context मधला काही भाग खाली देत आहे. पण पूर्ण पेपर वाचल्यावर हे असं का म्हटलं आहे हे कळण्यात अजून मदत होईल. "Superstition is a great enemy of man, but bigotry is worse. Why does a Christian go to church? Why is the cross holy? Why is the face turned toward the sky in prayer? Why are there so many images in the Catholic Church? Why are there so many images in the minds of Protestants when they pray? My brethren, we can Do more think about anything without a mental image than we can live without breathing- By the law of association the material image calls up the mental idea and vice versa. This is why the Hindu uses an external symbol when he worships. He will tell you. it helps to keep his mind fixed on the Being to whom he prays. He knows as well as you do that the image is not God, is not omnipresent. finer all, how much does omnipresence mean to almost the whole world? It stands merely as a word, a symbol. Has God superficial area? If not, when we repeat that word ‘omnipresent’, we think of the extended sky. or of space - that is all. As we find that somehow or other, by the laws of our mental constitution, we have to associate our ideas of infinity with the image of the blue sky, or of the sea, so we naturally connect our idea of holiness with the image of a church, a mosque, or a cross. The Hindus have associated the ideas of holiness, purity, truth, omnipresence, and such other ideas with different images and forms. But with this difference that while some people devote their whole lives to their idol of a church and never rise higher, because with them religion means an intellectual assent to certain doctrines and doing good to their fellows, the whole religion of the Hindu is centered in realization. Man is to become divine by realizing the divine. Idols or temples or churches or books are only the supports, the helps, of his spiritual childhood; but on and on he must progress. He must not stop anywhere. ‘External worship, material worship’ say the scriptures, ‘is the lowest stage,’ struggling to rise high, mental prayer is the next stage, but the highest stage is when the Lord has been realized., Mark, the same earnest man who is kneeling before the idol tells you, ‘Him the sun cannot express, nor the moon, nor the stars, the lightning cannot express Him, nor what we speak of as fire; through Him they shine.’ But he does not abuse anyone’s idol or call its worship sin. He recognizes in it a necessary stage of life."
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|