|
Ashwini_k
| |
| Friday, September 14, 2007 - 11:37 am: |
| 
|
होय दिनेशदा, ब्रम्हाची बहुतेक चार देवळे आहेत पण पुष्कर येथे ब्रम्हदेवांचे वाहन हंस आहे ( Bramhaa without Vishnu) . गोवा येथे तुम्ही पाहिलेली मुर्ती कमळातील होती का? कमळातील ब्रम्हदेव विष्णूच्या नाभीतून उत्पन्न म्हणजेच विष्णूसकट होत. तुम्ही उल्लेख केलेली कथा नेटवर वेगळ्या स्वरूपात वाचायला मिळाली. त्या कथेकडेही नीट पाहिले तर ब्रम्हाने सत्यातील पत्नीच्या (सावित्रीच्या) अनुपस्थितीत परस्त्रीस ( local maid ) वेळ निभावून नेण्यासाठी पत्नी कल्पिले हे दिसते. विषयांतर होत आहे, पण दिनेशदा, मला तुमच्या रेसिपींचा खुप उपयोग होतो, धन्यवाद!
|
Aschig
| |
| Friday, September 14, 2007 - 6:58 pm: |
| 
|
काशीला मागच्या वर्षी घेतलेला हा फोटो. आपण मागेच दाखवले आहे की दाडईवाले केवळ अग्नि आणी ब्रह्मदेव. हा अग्नि न्हवे.

|
Chyayla
| |
| Friday, September 14, 2007 - 10:03 pm: |
| 
|
कुठलाही कलाकार जी गोष्ट कधीच पाहिली नाही तिची कल्पना करू शकत नाही. फक्त जे पाहिल आहे त्याचे वेगवेगळे permutaions/combinations करून किंवा एखाद्याची एखादी property enhance करून वेगळि कल्पना मनात आणु शकतो. राधा, ईथे तुच स्वता:च्या प्रश्नाचे उत्तर दीले आहे. व तुझ्या या मताशी पुर्ण सहमत आहे, फ़क्त तुच तुझ्या मुद्याला प्रामाणिक रहा म्हणजे मिळवले. permutaions/combinations करून किंवा एखाद्याची एखादी property enhance करून मानवी भाव भावना जसे सुख, आनंद, प्रेम, करुणा हे रोजच्या जगात आपण अनुभवतो. स्वामी विवेकानंद म्हणतात की मानव या नश्वर जगातच प्रेम करायला शिकतो जसे आइचे मुलावर, नवर्याचे बायकोवर, प्रियकराचे प्रेयसीवरही केलेले सच्चे प्रेम पण हे सगळ नश्वर, जरी न टीकणारे तरीही त्याचे महत्व अजीबात कमी होत नाही. कारण यालाच enhance करुन तो देवावर प्रेम म्हणजे भक्ति करायला शिकतो तिथे तर देव हा सनातन, अमर्याद आहे मग या प्रेमाचा आवाका काय विचारावा. स्वामी विवेकानंद तर पुढे म्हणतात की सच्चे प्रेम हे केवळ देवावरच केल्या जाउ शकते. तो त्या प्रेमाच्या भावनेने देवाला अनुभवतो, त्यापासुनच अवर्णनिय, अखंड, अक्षय आनंद मिळवतो त्यामुळेच सामान्य आनंदाच्याही पुढे, परमानंद, ब्रह्मानंद असे म्हटल्या गेले आहे. या प्रेमातच न्हाउन संत नेहमी आनंदी रहात असल्याचे आपण पहातो. वर क्ष ने लिहिले आहे देवाला "सच्चिदानंद" (सद्-चित्-आनंद) म्हणजे देवाला आनंदस्वरुपही म्हटले आहे ते याचसाठी. त्यात अजुनही बराच आशय आहे, पुढे चर्चेत येइलच.
|
Dineshvs
| |
| Saturday, September 15, 2007 - 5:03 am: |
| 
|
अश्विनी, ती मुर्ती नुसतीच उभी आहे. कमळ वैगरे नाही. aschig माझ्या आठवणीप्रमाणे मुंबईतील बाबुलनाथाची मुर्ती दाढीधारी आहे. श्री शंकराची मुर्ती क्वचितच दिसते. तिथे चांदीची मुर्ती आहे. असो, पुढे चालु द्या.
|
Ashwini_k
| |
| Monday, September 17, 2007 - 8:06 am: |
| 
|
ती कथा हेच दर्शवते की सत्यापासून फ़ारकत घेऊन यज्ञासाठी परस्त्रीची पत्नीम्हणून कल्पना केल्याने ब्रम्हाची उपासना नाही. आता हे ही खरे की कोणीही कुठेही कशावरही बसलेल्या ब्रम्हाची मुर्ती यापुढेही स्थापन करू शकतो. पण ज्याला कुठचीही उपासना कोणी का, कोणाची, कधी करायची हे जाणण्यात रस आहे तो या कथांचा नुसता एक गोष्ट म्हणून विचार करणार नाही. आता, हनुमंत लंकेला सितेचा शोध घ्यायला जातात तेव्हा वाटेत सुरसा नागिणीची कथा घडते. तिला देवांनीच पाठवले असते व ती तसे हनुमंतास सात्विकतेने सांगते (हे तीचे "ममता" रुप). पण जेव्हा हनुमंत श्रीरामांनी सोपवलेल्या कामाची पुर्तता झाल्याशिवाय स्वतःस सुरसाच्या मुखात प्रवेश करायला नकार देतात तेव्हा ती हट्टाला पेटते व तीला "ममता" रुप जाऊन "मोह" रुप येते. ती हनुमंतास गिळण्यास आपले मुख सोळा योजने वासते (मोहाच्या माणसाला बळी पाडणार्या सोळा कला-कुठल्या ते येथे देत नाही) तेव्हा हनुमंत आपला आकार दुप्पट म्हणजेच बत्तीस योजने करतो (मोहाच्या प्रत्येक कलेला हरवणार्या हनुमंताच्या दोन शक्ती). पण मग सुरसा आपला जबडा १०० योजने मोठा करते तेव्हा हनुमंत अतीलघु रुप घेतात व मुखात प्रवेश करून झपकन बाहेर येतात. (आधिच्या मोहाच्या वेळी विचलीत न होणारा मनुष्याच्या समोर कधीकधी पाय घसरवणारा भल्यामोठ्या मोहाचा क्षण येतो त्यावेळी हनुमंत आपल्याला अतिलघु रुप घ्यायला शिकवतात. इथे माणसाचा आकार म्हणजे त्याच्या गरजांचा आकार. प्रचंड मोठा घात करणारा क्षण माणूस आपल्या गरजा कमीतकमी ठेउन निभवून नेऊ शकतो). इथे व्यसनी माणसास व्यसनाच्या मोहापासून दूर राहायला आवश्यक असणारी मनःशक्ती हनुमंताची उपासना देऊ शकते (इतर औषधे व कौंसेलिंगच्या जोडीने हनुमंताची उपासना जरूर करायला द्यावी).
|
मोहाच्या माणसाला बळी पाडणार्या सोळा कला-कुठल्या ते येथे देत नाही क्रुपया द्याल का? just curious
|
Ashwini_k
| |
| Tuesday, September 18, 2007 - 5:25 am: |
| 
|
मोहाच्या सोळा कला माणसाला कशा गिळू पहातात व प्रत्येकीला face करायला मदत करणार्या हनुमंताच्या दोन दोन शक्ती (total 32) कशा कार्य करतात (तंतोतंत results मिळालेले माझ्या पहाण्यात आहेत) ते सगळे लिहायला खूप वेळ लागेल आणि believe me माझी उत्तम रित्या explain करायची योग्यता नाही. तुम्हाला खरंच interest असेल तर "दैनिक प्रत्यक्ष" मधले ते particular ८ अग्रलेख वाचावेत (खरंतर पुर्वदुषित ग्रह न ठेवता एक उत्तम व प्रत्येकास उपयोगी पडेल असे लिखाण म्हणून जरी वाचले तरी ते आठच नाही, तर प्रत्येक अग्रलेख कळायला सोपा पण अप्रतीम आहे).
|
Radha_t
| |
| Thursday, September 20, 2007 - 8:42 am: |
| 
|
च्यायला, माझा मुद्दा तुमच्या लक्षात आलेला दिसत नाही. देव जर कधीच पाहिला नसेल, अनुभवला नसेल तर त्याची कल्पना कशी करावी? माझच उदाहरण घेतल तर मी सच्चिदानंद ची कल्पना कशी करू?
|
Chyayla
| |
| Thursday, September 20, 2007 - 10:18 pm: |
| 
|
राधाजी, त्यासाठी माझे त्या आधीचे पोस्ट पहा..
|
Maanus
| |
| Friday, September 21, 2007 - 11:40 am: |
| 
|
हे काय चालु आहे अरे. yz लोक आहेत हे
|
Zakki
| |
| Friday, September 21, 2007 - 7:01 pm: |
| 
|
बा माणसा, शबरीची उष्टी बोरे रामाने खाल्ली. लोकांनी त्यांच्या मते जे greatest त्याची तुलना जर मोठ्या भक्तीपूर्वक देवाशि केली असेल, तर देवाला संतोषच होईल. कारण शेवटी देव असे जो भाव तसा! देवाचा कधी अपमान होत नाही, त्याला राग येत नाही. त्या सर्व गोष्टी मानवाची वैशिष्ठ्ये.
|
Maanus
| |
| Saturday, September 22, 2007 - 1:27 am: |
| 
|
देवाचा कधी अपमान होत नाही, त्याला राग येत नाही. ह्या पंधरवड्यात चंद्रा कडे का नाही बघत?
|
Limbutimbu
| |
| Saturday, September 22, 2007 - 5:42 am: |
| 
|
पुढील पोस्ट्स एचजी वरील एका मायबोलीकराशी झालेल्या हेत, मुद्दामहुन टाकल्यात! कधी मार्ग चुकतोही.....! चुकल तर परतीची वाट दरवेळेस असेलच अस नस्त.......! परतीची वाट असेल, तर माग फिराव, नसेल तर मेण्ढ्याप्रमाणे धडका देत देत पुढेच जात रहाव! >>>>>>तु देव मानतोस का? >>>>>>का तु दैववादी आहेस? तुझा स्वता:वर विश्वास कमी आहे का?? हो, मी देव मानतो, पण त्याच बरोबर देवाने दिलेले या जन्मीचे कर्मस्वातन्त्र्यही मानतो! हो, काही बाबतित मी दैववादी हे! अशा कित्येक गोष्टी अशा हेत की ज्या मानवाच्या हातात नाहीत! जसा भूतकाळ बदळण शक्य नाही तसच कोण कुठे का जन्म घेईल अन काय कारणाने केव्हा खपेल हे मानवाच्या हातात नाही, या व अशा बाबतीत मी दैववादी हे! मला कोण कुठे का भेटेल, वा भेटणार नाही यावर एका मर्यादेपलिकडे माझा कन्ट्रोल नाही! मर्यादित अर्थाने दैववादी असण्यात मला गैर वा न्युनगन्डात्मक वाटत नाही जो मी ज्या देहाने जन्माला आलोय, त्यावर माझा नितान्त विश्वास हे! तो विश्वास हे म्हणुनच येवढी वर्षे तगुन राहिलो! विश्वास नाही तो त्या सर्व घटकान्वर, ज्यान्च्यावर माझा कन्ट्रोल नाही! ज्या घटकान्वर आपला काडिचाही कन्ट्रोल नाही त्यान्ची आठवण ठेवणे म्हणजे आत्मविश्वास कमि असे मी मानत नाही योग असतील तर जरुर भेटु, नसतील तर कालत्रयीही नाही >>>>>>>>> हे अती वाटत नाही तुला?? अजिब्बात नाही! योग असतील तर पुण्यातल्या कुठल्याही सिग्नलला थाम्बलो असतानाही तू भेटशील, योग नसतील तर तुझ्या समोर येवुन बसुन गिळुन गेलो तरी तू ओळखायला नकार देशील्/ओळखणार नाहीस! **************** >>>>>>>तुझ्या एकंदर लिखाणावरुन मला असे वाटले..... >>>>>>>१. तु कुणावर तर भयंकर चिडलेला आहेस, >>>>>>>२. तुला माझ्याशी ओळख नको हे. >>>>>>>३. तु परीस्थितीने होरपळलेला वाटतोस पण तसा नसशील असं वाटतंय >>>>>>>४. भुतकाळाचं ओझं वागवायची तुला हौस आहे का? >>>>>>>५. झकास ला अनुमोदन >>>>>>>६. लिंबु हा लेखक म्हणुन वेगळा आणि माणुस म्हणुन वेगळा आहे का? की स्वतःचं प्रतिबिंब त्याच्या लेखनात असतं. १. माणसाला त्याच्या स्वतःशिवाय दुसर्या कुणावर कशावर चिडायचा अधिकारच नाही या वस्तुस्थितीवर मात्र मला चिडता येत! २. lol ओळख आहेच, भावनिक जवळिक वाढणे महत्वाचे! बरोबर ना? त्याकरिता अन्तराचे बन्धन नसते! (प्रॅक्टीकली, परिस्थितीवशात, मी कोणालाच प्रत्यक्ष भेटायला फार क्वचित जाउ शकलो हे, ज्यान्ना भेटलो नाही त्यान्ना भेटायची इच्छा नाही असे नाही) ३,४,६. होरपळण, भाजण, जळण इत्यादी बाबि प्रत्येकाच्या आयुष्यात कधिनाकधी येतातच! ज्यान्च्या येत नसतील ते नशिबवान असावेत किन्वा सहनशील असावेत! अनुभवाचे बोल नि भुतकाळाचे ओझे यातिल सीमारेषा अस्पष्ट असते! पण तू म्हणतोस त्यात तथ्य हे! मी तर म्हणतो की जाणता अजाणता, प्रत्येकजणच नजिकचा भुतकाळ राहुदेच, जन्मोजन्मीच्या भुतकाळाच्या ओझ्याची लक्तरे अन्गभर वागवित फिरत असतात! इथे लिम्बु "लिम्बु" म्हणुन राहू इच्छितो! तसाच रहातो! लिखाणाबाबत म्हणशील तर मी अनेकवार पुनःपुन्हा सान्गितलेय की मी अनुभुती नि अनुभव याशिवाय एक अक्षरही लिहीत नाही! तोन्डी सान्गायचा गप्पागप्पान्मधला सन्वाद या नेटवर साधताना जे लिखाण घडते त्यास लेखकाचे लेखन म्हणावे कि लिखित सन्वाद म्हणावा हे ज्याचे त्याने ठरवावे! नाही का? तुझ्या कॉमेण्ट बद्दल धन्यवाद! एक सुचना, नेहेमी आणि सर्वान्बाबतीतच लागु पडणारी.........! माझ्या लिखाणावरुन माझी कल्पना करु नकोस! शब्दान्ना स्वतन्त्र अस्तित्व असते.... शब्दान्च्या साखळीला स्वतन्त्र अर्थ असतो, पण अशी जरुरी नाही की अशा साखळ्या माण्डणारे त्या अर्थाबरहुकुम असतील! किम्बहुना, बहुतान्श लेखकान्च लिखाण हे "मनोराज्यात्मक" असते असे माझे मत. तस अस्त नस्त तर बाबुराव अर्नाळकर डिटेक्टीव्ह कथा लिहायचे सोडुन काळा पहाड किन्वा तत्सम व्यक्तिरेखान्प्रमाणे स्वतःच जगले नस्ते का?????? . पट्टीचा लेखकु विरळा! एखादाच ज्ञानदेव तुकारामान्सारखा.....! एक पसायदान, आठशे नऊशे वर्षान्नतरही टिकुन हे! ********************* >>>>>> म्हणजे लेखक लिंबु आणि माणुस लिंबु हे वेगळे आहेत तर, बरं वाटलं ऐकुन. माणुस एका वेळेस एकाच भुमिकेत जगु शकतो, नीट विचार करुन बघ, तुझ्याही अनुभवास येईल! ज्या वेळेस तो पिता असतो तेव्हा तो सासर्याची भुमिका नाही निभावु शकणार, येवढेच नव्हे तर पित्याच्या भुमिकेत असताना पुत्राची भुमिकाही निभावु शकणार नाही, अन जे काही निभावले जाते असे वाटते त्यासच "तडजोड" म्हणतात! समजायला अवघड हे जरा, पण जे आहे ते असेच आहे! अर्थात, लिम्ब्या लिम्ब्या अस्तो जोवर तो लिम्ब्याच्या भुमिकेत अस्तो, साहेबासमोर तो गोगलगाय अस्तो, लिम्बीसमोर आज्ञाधारक नवरा तर पोरान्समोर ओझ्याचे गाढव अस्तो! :D . पट्टीचा लेखकु विरळा! एखादाच ज्ञानदेव तुकारामान्सारखा.....! एक पसायदान, आठशे नऊशे वर्षान्नतरही टिकुन हे! >>>>मग हा लिखाणाचा अट्टहास का? तुझाच नव्हे, कुणाचाही!! लाखमोलाचा सवाल विचारलास! बोलणे, गप्पा, कविता, गाणी बजावणी, लेखन, चित्र शिल्पादिक कला वगैरे सर्व काही सन्वादाची रुपे आहेत. हा सन्वाद कुणाबरोबर? तर स्वतःबरोबर किन्वा दुसर्या बरोबर.......! काही जणान्चे बाबतीत इश्वराबरोबर! या माध्यमातून प्रत्येकजण त्याला आलेलि अनुभुती वा प्रत्यक्ष अनुभव दुसर्याकुणास सान्गु पहातो, या जगातील एकटेपणाची सुप्त जाणिव नकळतपणे दुसर्याशी सन्वाद साधुन टाकुन देवु पहातो! यातील फार कमीजण, जे इश्वराशि सन्वाद साधू इच्छीतात, ते भौतिक सन्वादातुन अन्ग काढुन घेवुन अरण्यात एकान्तवास पत्करतात......! ज्याक्षणी इश्वराचे अस्तित्व जाणवते, त्या क्षणी मानवी भौतिक जीवनातील एकटेपणा सम्पतो! असे असन्ख्य साधू सन्याशी नित्य युगानुयुगे अरण्यात जातच असतात......! त्यातले फार थोडे, हाताच्या बोटावर मोजण्याइतके साधूसन्त, त्यान्ना जाणवलेली अनुभुती/अनुभव अन्य सामान्य जनान्ना सान्गायला परत जनमानसात फिरतात! ते सामाजिक साधू म्हणुन ओळखले जातात...... जसे की ज्ञानेश्वर, तुकाराम, सन्त रामदास, परमहन्स, विवेकानन्द... आणि असे कित्येक! जर ते अन्य जनास कळवित असलेली त्यान्ची अनुभुती यथार्थ असेल, सत्य असेल तर त्यान्नी सान्गितलेले, मग ते कोणत्याही फॉर्म मधे जसे की लिखित, वाचिक स्वरुपात असेल, कालौघात टिकुन रहाते! त्यापासुन अनेकजणान्ना भौतिक आयुष्यात जगण्याची उमेद मिळते! बाकी आमच्या सारखे अज्ञ लोक, काल पाहिलेल्या शिनेमाच्या/मॅचच्या अनुभुतीच्या इस्टोर्या सान्गण्यात मग्न असतात! (त्यातही गैर काही नाही, पण ते तसे असते, नि त्यान्चे तसे असते) ******************* [>>>>>लिखाणाबाबत म्हणशील तर मी अनेकवार पुनःपुन्हा सान्गितलेय की मी अनुभुती नि अनुभव याशिवाय एक अक्षरही लिहीत नाही! तोन्डी सान्गायचा गप्पागप्पान्मधला सन्वाद या नेटवर साधताना जे लिखाण घडते त्यास लेखकाचे लेखन म्हणावे कि लिखित सन्वाद म्हणावा हे ज्याचे त्याने ठरवावे! नाही का? >>>>>किम्बहुना, बहुतान्श लेखकान्च लिखाण हे "मनोराज्यात्मक" असते असे माझे मत. तस अस्त तर बाबुराव अर्नाळकर डिटेक्टीव्ह कथा लिहायचे सोडुन काळा पहाड किन्वा तत्सम व्यक्तिरेखान्प्रमाणे स्वतःच जगले नस्ते का??????] >>>>>>>ही २ परस्पर विरोधी विधाने एकच हेतु कशी सिद्ध करतात? मूळात, या विधानात तुला जो परस्पर विरोध जाणवतोय तो बहुतेक माझ्या "अनुभव नी अनुभुती" शिवाय न लिहिणे --- जेव्हा अन्य लेखक "मनोराज्यात्मक" लिहितात असे सान्गणे यात जाणवत असावा असे मला वाटले! पुन्हा शब्दान्चा खेळ....अनुभुती आणि मनोराज्ये यातही फार अस्पष्ट सीमारेषाहे! प्रत्यक्ष अनुभव जो भौतिक पातळीवर केवळ आणि केवळ "पन्चेन्द्रियान्ना" कळतो तो वेगळा, अनुभुती त्यापेक्षा वेगळी, ती मानसिक पातळीवर फुलत जाते.... मनोराज्येही अनुभुतीचीच एक अन्ग हेत! फरक इतकाच की अनुभुती प्रत्यक्षात उतरु शकते तर मनोराज्यान्वर प्रत्यक्षात उतरण्याचे बन्धन नसते! दोन्ही गोष्टी दुसर्यास कळविण्यास काही एक माध्यम जसे की भाषा, लेखन, हावभाव, चित्र वगैरे लागते! तो झाला सन्वाद, आधीच्या पोस्त मधे सन्वाद का, त्याच उत्तर दिल हे! मी जेव्हा लिहितो तेव्हा याच अनुभुती (किन्वा प्रत्यक्ष अनुभवा)शिवाय लिहित नाही, पण मी जर ठरवले तर मनोराज्यात्मक "जुगवलेल्या गोष्टी" देखिल लिहू शकतोच ना? किम्बहुना मी तर त्याही पुढे जावुन असे म्हणेन की कोणतेही "असत्य विधान" हे एक "जुगवलेले मनोराज्यच" नस्ते का? माझ्या मते तरी वरील विधानात तुला जाणवलेला विरोधाभास हा "भ्रामक" आहे! ******************* खरे तर थोडक्यात सान्गायचे तर मी जेव्हा अनुभुती अन अनुभव याचा दाखला घेत घेत लिहीतो, तेव्हा ते "सत्याच्या" अधिक जवळ असते जर मी मनोराज्यात्मक लिखाण केले असते तर ते "असत्याच्या" अधिक जवळ्चे झाले असते! सत्य किन्वा असत्य या शब्दान्ना टाळुन मी अनुभुती/अनुभव किन्वा मनोराज्ये अशी शब्दरचना केलि [आयला, ही पोस्ट माझी मलाच कळायला कठीण जात्ये] ****************** देवाच्या शोधाकरीता, कदाचित अभ्यासुन्ना वरील सन्वादाच्या कारणान्चे विश्लेषण उपयोगी पडु शकेल असे वाटले म्हणुन ही आमच्या नविन मायबोलीवरील वह्यातील चर्चा इथे टाकली! सदरील चर्चा "राज्या" ही आयडी असलेल्या मायबोलीकराबरोबर झाली, ती त्याचे वहीतुन कॊपी करुन घेतली असे! (त्याने या पोस्ट्स डिलीट न मारल्याबद्दल त्याला धन्यवाद)
|
आयला, ही पोस्ट माझी मलाच कळायला कठीण जात्ये] ****************** देवाच्या शोधाकरीता, कदाचित अभ्यासुन्ना वरील सन्वादाच्या कारणान्चे विश्लेषण उपयोगी पडु शकेल असे वाटले म्हणुन ही आमच्या नविन मायबोलीवरील वह्यातील चर्चा इथे टाकली तुमच्या पोस्ट तुम्हालाच समजत नाहीत तर अभ्यासुना काय समजणार? आमचे प पू श्रीराम लागू म्हणतात तेच खरे, देवाला रिटायर करा
|
Limbutimbu
| |
| Saturday, September 22, 2007 - 2:56 pm: |
| 
|
>>>>> तुमच्या पोस्ट तुम्हालाच समजत नाहीत तर अभ्यासुना काय समजणार? अभ्यासुन्ना काय समजेल की नाही, हे मात्र तुम्हालाही समजत नाही हे नक्की सिद्ध झाले, नाही का विजयराव???? DDD एनिवे, तुम्ही लोक जेव्हा देवाला रिटायर कराल तेव्हा करा....... लकडी जाने, चमडी जाने, मेरेको क्या????? सद्ध्यातरी या, या लिम्ब्याला रिटायर करायला बसलेत लोक त्यान्ची काळजी मी करतो, देवाची काळजी त्याचा तो करेल! 
|
Yog
| |
| Saturday, September 22, 2007 - 8:33 pm: |
| 
|
लिम्ब्या तुला रिटायर होवून कसे चालेल? इथले TRP कमी होईल ना.. already दर्जाची जागा चर्चा अन जाहिराती घेत आहेत.. 
|
Chyayla
| |
| Monday, October 15, 2007 - 10:25 am: |
| 
|
सत्संग शिबिरात स्वामीजींची साधकांशी मनमोकळी चर्चा सुरु होती. विषय होता, 'परमेश्वर कसा मिळेल?' स्वामीजी म्हणाले, "तुम्हाला परमेश्वर खरोखरीच हवा असेल तर तत्क्षण मिळेल!" सारेजण एकमेकांकडे बघु लागले. एक साधक म्हणाले, "होय, आम्हाला खरोखरीच परमेश्वर हवा आहे!" "मिळाला काय?" स्वामीजीन्नी विचारले. "छे: हो, नाही मिळाला- काय कारण असाव?" "मी जे म्हणालो त्यातील 'खरोखरीच' हा शब्द महत्वाचा आहे. त्यात ती आत्यंतिक तळमळ अभिप्रेत आहे. परमेश्वर मिळाला नाही यावरुन हे सिद्ध होते की परमेश्वर तुम्हाला खरोखरीच हवा असे नव्हते, अन्यथा तो तत्क्षण ताबडतोब मिळाला असता!" स्वामीजींच्या बोलण्यातील तळमळीची ती गुह्य खोच लक्षात घेत सार्या उपस्थितांनी दाद दीली. 'प्रेम ते प्रभू प्रगटई जिमी आगी.' आगकाडीत अग्नी विद्यमान आहे; परंतु काडी घासल्याशिवाय तो प्रगट होत नाही. असाच परमात्मा सर्वत्र विद्यमान आहे, हवेप्रमाणे समान रुपाने व्याप्त आहे. तो प्रेमरुप स्पर्शानेच प्रगट होतो. "आपण सारे जड आहोत, चैतन्य केवळ तो हरी आहे," स्वामीजी बोलून गेले. एक साधक म्हणाले, क्षमा असावी, पण हे नाही पटले आमचे ईन्द्रिय मन बुद्धी हे चैतन्य असताना आम्ही स्वता:ला जड का मानावे?" तर मग माणुस मेल्यावर त्याचे सर्व ईन्द्रिये शाबूत दिसतात पण ते विषयज्ञान देत नाहीत हे खरे ना- आत्म्याच्या चैतन्याची उर्जा प्राप्त होउन ईन्द्रिये कार्यरत दिसतात्- आत्मा हा परमात्म्याचाच अंश असल्याने तो निसंशय चैतन्य आहे पण, आम्ही तर जडच आहोत" असो. जडचेतन चर्चा एवढीच पुरे. वेदांत मात्र जड चेतन असा भेद करीत नाही. जड वस्तूंमधे चैतन्य झोपलेले असते एवढेच! जडाचे चेतन्- चेतनाचे जड होणे ही घडामोड पृथ्वीत अहर्निष चालु आहे. जड भासणार्या वस्तूच्या अणूंची सरंचना बघितली असता त्यात गतिमान ईलेक्ट्रोन्स असतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. असे असताना जड दिसते म्हणुन त्याला जड म्हणणे हे सत्याचा अपलाप करणारे ठरु शकेल. या न्यायाने जगातल्या सार्या वस्तू मग चैतन्य ठरतात. चैतन्य म्हणजेच ईश्वर! म्हणुन कोणत्याही वस्तूची पूजा ही ईश्वराचीच पूजा ठरते. मुर्तीवर कुणी जडत्वाचा आरोप करीत असेल तर तोही वाद आता परस्परच मिटला की नाही! मग दगडाची वा मूर्तीची पूजा केली तर बिघडले कुठे? बिघडते तेव्हा, जेव्हा हे तत्व न जाणता एखादा माणुस त्या मूर्तीमधे देव बसुन आहे- आत दडुन आहे असा (गैर) समज करुन घेतो तेव्हा!! ही सम्पुर्ण तात्विकता तुकोबांनी किती थोडक्यात व्यक्त केलीय बघा! केला पाषाणाचा विष्णू-परी पाषाण नव्हे विष्णु| विष्णुपूजा विष्णूसी अर्पे पाषाण राहे पाषाणरुपे|| एक नित्याचा प्रश्न असतो "मूर्तित देव आहे काय?" यावर एक मार्मिक उत्तर असे की, मूर्तीतच काय तो मूर्तीबाहेरही अगदी सबंध चराचरात आहे. तेव्हा परमेश्वराला मूर्तीच्या आकारमानात अडकवल्याने काही गोंधळ उडतात. मूर्तिपुजा हा परमेश्वराच्या व्यापकतेचा नकार नाही" मला माझ्या परमेश्वराशी काम. त्याचेशी माझा संवाद आहे. आम्ही दोघे एकमेकांच्या मनीचे गूज जाणतो. एवढेच पूरे नाही काय? हवा सर्वत्र एकच आहे. पण मुम्बईची हवा मला नागपुरात काय कामाची. नागपुरची माझ्या नाकाजवळची हवा माझ्या श्वासाला कामाची!! टीप्: या लेखाचा लेखक मला अज्ञात असल्यामुळे त्याचे नाव देउ शकत नाही त्याबद्दल क्षमस्व
|
Akhi
| |
| Thursday, October 25, 2007 - 11:39 am: |
| 
|
मला अस वाटत की देव ही संक्लपना आहे. आणी तो माणसाच्या श्रध्देचा भाग आहे. कोणी जगातल्या मांगल्या वर आपली श्रध्दा ठेवत. नतमस्तक होणे महत्वाचे बाकी गोष्टी दुय्यम ठरतात. आणी नुसत देव देव करुन देव भेटत नसतो. देव म्हणजे मन्:शांती मनातला चांगुलपणा. माझा साठी कोणी देव असेल तर फक्त माझी आई!!!
|
मि बरयाच लोकाना म्हणताना एकले कि, आम्हि देवाला मानतो. मला असे वाटते कि, देवाला मानण्यापेक्षा त्याला जाणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खरया देवाचा कोणी शोध घेतला आहे का? असे म्हणतात कि, "देव जवळी जवळी पण भेट नाही जन्मभरी"!! तो जळी स्थळी काष्टी पाताळी, चराचरात सामावलेला आहे. परन्तु तो आपल्याला शोधता आला पाहिजे म्हणजेच त्याच्या अस्तित्वाची आपणास जाणिव घेता आली पाहीजे. मुळात त्याची जाणीव करुन देणारा भेटावा लागतो. समर्थ एक उदाहरण देतात कि, कस्तुरी जातीच्या हरिणाच्या नाभिमध्ये छान सुगन्ध देणारी कस्तुरी असते, पण तिला त्याची जाणीव नसते. ति दिवसभर त्या तिच्याच नाभितुन येणारया सुगन्धाच्या शोधात वनवन भटकते, शेवटी दमल्यावर आपल्या उदराशी जेव्हा ती आपले नाक नेते तेव्हा तीला जाणीव होते कि हा छानसा सुगन्ध आपल्याच नाभीतुन येत आहे आणि ज्या कस्तुरिच्या शोधात आपण भटकतोय ति आपल्याच ऊदरात आहे. .. मनुष्य सुध्हा असाच भर्रकटला आहे... आणी भर्रकटत चालला आहे.
|
Sherloc
| |
| Thursday, November 22, 2007 - 4:16 am: |
| 
|
वर्तनाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी पाच माकडांच्या एका पिंजऱ्याच्या मधोमध उंच शिडीवर काही केळी ठेवली. जेव्हा जेव्हा एखादं माकड केळ्यांच्या घडाच्या लोभाने ती शिडी चढू लागे तेव्हा तेव्हा इतर माकडांच्या अंगावर थंडगार पाण्याचा जोरदार फवारा उडवला जाई. ....... हळूहळू माकडांना शिडीवर चढणं आणि गार पाण्याचा पाण्याचा फवारा यांच्यातला परस्पर संबंध लक्षात येऊ लागला. मग माकडांनी त्यावर उपाय शोधला. जे माकड शिडीवर चढण्याचा प्रयत्न करे, त्याला इतर माकडं एकत्र येऊन चोप देत आणि शिडीवर चढण्यापासून परावृत्त करीत. काही काळाने चोप मिळेल, या भीतीने एकही माकड त्या शिडीवर चढेनासं झालं. केळ्यांची हावही त्यांना त्यासाठी प्रवृत्त करेनाशी झाली. मग, काही दिवसांनी शास्त्रज्ञांनी माकडं शिडीवर चढू लागल्यावर गार पाण्याचे फवारे उडवणं बंद केलं. तरीही त्या फवाऱ्यांच्या भीतीने माकडं शिडीवर चढेनाशी झाली होती. शिवाय जोडीला इतरांच्या माराची भीती होतीच. एखादं माकड शिडीवर चढू लागलं की, इतरांनी एकत्र येऊन त्याला चांगला चोप द्यायचा हा जणू त्या पिंजऱ्यातला नियम बनून गेला. त्यामागचं कारण नष्ट झालं होतं, पण नियम कायम राहिला. मग शास्त्रज्ञांनी वेगळीच शक्कल लढवली. त्या पाच माकडांपैकी एका माकडाला त्यांनी बाहेर काढलं आणि त्याच्या जागी दुसऱ्या पिंजऱ्यातलं माकड आत सोडलं. अर्थात, या नव्या माकडाला या पिंजऱ्यातला नियम माहीत नव्हता. त्यामुळे शिडीच्या टोकाला असलेली केळी पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. ते शिडीवर चढू लागलं. लागलीच उरलेली चार माकडं त्याच्या अंगावर धावून गेली आणि त्याला चांगलाच चोप दिला. चार-पाच वेळा शिडीवर चढण्याचा असफल प्रयत्न केल्यावर "शिडीवर चढू नये, कारण शिडीवर चढल्यास इतर माकडांकडून चोप मिळतो' हे नव्या माकडाच्या मनावर अगदी घट्ट बिंबवलं गेलं. त्यामागचं कारण त्याला माहीत नव्हतं. पण, हा नियम पाळायलाच हवा, याची खूणगाठ मात्र त्याने बांधली. मग, ते माकडही शिडीवर चढेनासं झालं. त्यानंतर काही दिवसांनी शास्त्रज्ञांनी जुन्या माकडांपैकी आणखी एका माकडाला पिंजऱ्याबाहेर काढलं आणि त्याच्या जागी एक नवं माकड पिंजऱ्यात सोडलं. बाहेरून आलेल्या पहिल्या माकडाचं जे झालं होतं, तसंच दुसऱ्या माकडाचंही घडलं. बाहेरून आलेल्या या दुसऱ्या माकडाला चोप द्यायला बाहेरून आलेलं पहिलं माकडही जात असे. हळूहळू हे दुसरं माकडही शिडीवर चढेनासं झालं. मग शास्त्रज्ञांनी आधी तिसरं, मग चौथं, मग पाचवं अशी सारी माकडं हळूहळू बदलली. म्हणजे पिंजऱ्यातल्या मूळ माकडांची जागा आता नव्या माकडांनी घेतली. आता फवाराही नव्हता, जुनी माकडंही नव्हती. पण, शिडीवर चढणाऱ्याला चोप देण्याचा नियम काही बदलला गेला नाही. जर त्या माकडांना बोलता येत असतं आणि त्यांना विचारलं असतं, की शिडीवर चढणाऱ्याला तुम्ही चोप का देता, तर मला खात्री आहे, त्यांनी उत्तर दिलं असतं, ""का ते नेमकं माहीत नाही. पण, इथे नेहमी असंच केलं जातं.'' हे उत्तर तुम्हाला परिचयाचं वाटतंय का? तुमच्या मित्रांना ही गोष्ट आवर्जून सांगा. वेगवेगळे पर्याय उपलब्ध असताना आपण काही गोष्टी ठराविक पद्धतीनेच का करतो, असा प्रश्न कदाचित त्यांना पडलेला असेल! वरील उतारा आजच्या सकाळ मध्ये आहे. तो वाचला आणि साहीरच्या गाण्यातल्या ओळी आठवल्या "यह पाप है क्या और पुण्य है क्या रितोंपर धर्मकी मोहरे है हर युगमें बदलते धर्मोंको कैसे आदर्श बनाओगे..... संसारसे भागे फिरते हो भगवान को तुम क्या पाओगे" हा विषय खरच खुप गहन आहे. माझी स्वत:ची यामध्ये बर्याच वेळा द्विधा मनस्थिती झालेली आहे. आपण आपल्या छोट्याशा आयुश्यात अश्या अनेक गोष्टी का करत असतो, ज्याचा कार्यकारणभाव आपल्याला कधीही उमगत नाही?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|