Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 16, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » RamSetu Project Lets Wake Up !!!! » Archive through October 16, 2007 « Previous Next »

Dineshvs
Saturday, October 13, 2007 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भीमबेटका, हा मध्य प्रदेशातील पुरातन देवळांचा समुह आहे. भारतातील प्राचीन भित्तिचित्रे तिथे आहेत.
Sunlit या प्रकल्पाची सुरवात बाजपेयी सरकारनेच केली होती याचा सर्वाना सोयीस्कर विसर पडला आहे.
तसे बघायला गेले तर त्या पट्ट्याला नकाशात Adam's Bridge असाही शब्द वापरतात.
सध्या मोठी जहाजे मुंबईच्या गोदीत येतच नाहीत. ती सरळ श्रीलंकेत जातात. त्यातुन जर भारताचा माल असेल तर तिथे तो छोट्या बोटीत भरला जातो.
तर हा मोठा वळसा टाळण्यासाठी आणि भारताला उतपन्न मिळण्यासाठी, काहितरी मार्ग निघायलाच हवा.
त्या सेतुच्या भारताकडच्या बाजुने किंवा अगदी भारताच्या भुमीतूनही असा सागरी कालवा काढता येईल. ( अशक्य वाटत असले तरी असे कालवे जगात आहेत. ग्रीसमधे दोन कपारी उभ्या खोदुन सागरी कालवा खोदलेला आहे. )
त्या नैसर्गिक सेतुचा, सागरी प्रवाह रोखण्यास उपयोग होत असेल, काहि पर्यावरणाचा प्रश्ण असेल तर गोष्ट वेगळी आहे.


Chyayla
Saturday, October 13, 2007 - 7:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या वाजपेयी सरकारने या प्रकल्पाचा श्रीगणेशा केला त्यांचे याबाबतीत (त्यावेळचे) मत जाणून घ्यायला आवडेल!!!!!!

विकृत सेक्युलर व मुर्दाडवादी हिंदुकडुन अजुन काय अपेक्षा करणार...

असो दीनेश आणी ईतर मायबोलीकरांच्या माहितीसाठी.. कारण तुम्हाला ही याविषयावर पुर्ण माहिती नाही म्हणुन ईथे लिहित आहे. (मुर्दाडवाद्याना तसेही सांगुन काही फ़रक पडणार नाही तो नाहीच.)

१९९८ मधे वाजपेयी सरकारने प्रथम या प्रकल्पाला अनुमती दीली होती. हे खरे पण अर्धवट माहिती देउन दीशाभुल करायचा मोह कसा आवरणार? सुनिलराव निदान पुर्ण माहिती तरी देत जा ही विनन्ती.

१९९८ मधे जेव्हा या प्रक्ल्पाला हिरवी झेंडी देण्यात आली होती त्यावेळेस रामसेतू तोडणे हा पर्याय नव्हता. सम्पुआ च्या कार्यकाळात या प्रकल्पाचे स्थान अचानक बदलवण्यात आले ज्यात रामसेतू तोडुनच हा प्रकल्प करण्याचा अट्टहास आला.

त्यावेळेस ६ पर्याय उपलब्ध होते, त्यातले पहिल्या पाचात रामसेतूला धक्काही लागणार नव्हता. भाजपा सरकारने सेतूसमुद्रमच्या प्रकल्पासाठी NEERI च्या सुचनेनुसार पहिले ५ पर्याय स्विकारले होते.

वस्तुता हा ६ वा पर्याय ज्यात रामसेतू तोडणे अभिप्रेत आहे जास्त खर्चिक असुनही विकृत सेक्युलर कॉंग्रेस सरकारने तोच स्विकारला याला काय म्हणावे.

असो.. मुर्दाड हिंदुवाद्याना दुसरा प्रश्न.. वाजपेयी सरकारने तर राम अस्तित्वात नव्हता असले प्रतिज्ञापत्र दीले नव्हते मग (यावेळेसच्या) सरकारने का दीले याबाबतितही मत जाणुन घ्यायला आवडेल.






Chyayla
Saturday, October 13, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एन ए डी टी च्या महासंचालक श्रीमती सरोजबाला यांच्याकडुन रामायणावर अधिक संशोधन करुन त्याची सत्यता पडताळुन पाहण्यात यश आले आहे.

रामाचा जन्म खरोखरच झाला काय? झालाच तर मग केव्हा आणी कोठे झाला? लाखो भारतियांचे श्रद्धास्थान असलेल्या रामाने उत्तर की दक्षीण भारतात पाय ठेवला? चला तर हे तथ्य जाणुन घेउ या. प्रभु श्रीरामाची पहिली कथा कुठे वाचनात आली असेल तर वाल्मिकी रामायणात. रामाचा अयोध्येचा राजा म्हणुन राज्याभिषेक झाल्यानंतर ही कथा लिहिण्यात आली आहे. महिर्षी वाल्मिकी हे अतिशय चांगले खगोलशास्त्रज्ञ होते, पंचाग किती पुराण काळापासुन भारतिय वापर करत आहेत हे सर्वविदीतच आहे. महर्षी वाल्मिकीनी रामायणात वारंवार दिलेल्या ग्रहस्थितीच्या संदर्भातुन दिसुन येते. नक्षत्रांचा अचुक उल्लेख त्यात करण्यात आला आहे. एकदा तयार झालेली ग्रहस्थिती कित्येक हजारो वर्षे पुन्हा तयार होत नाही, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे त्यान्नी वाल्मिकी रामायणातील ग्रहस्थितीच्या Planetorium Gold या सॉफ्टवेयर मधे टाकत गेले आणी त्यातुन ईंग्रजी तारखा शोधत गेले. याचा मेळ ईतका तंतोतंत जुळतो की रामायणावर विश्वास ठेवल्याशिवाय कुणालाही नकार देता येणार नाही.

भारतिय महसुली सेवेत असलेले पुष्कर भटनागर यान्नी हे सोफ्टवेयर अमेरिकेतुन भारतात आणले. ते Fogaware Publication चे असुन, सुर्य आणि चन्द्रग्रहणाच्या तारखा सुद्धा त्यातुनच सांगितल्या जातात. पृथ्विपासुन कोणता कोणता ग्रह किती दूर आहे, हे सांगण्यासाठी जगभरातील खगोलशास्त्रज्ञ याच सोफ्टवेयरचा वापर करतात. या ग्रहस्थितीवरुन रामजन्म ते १४ वर्षाचा वनवास आटोपून अयोध्येत परतण्यापर्यंतच्या सार्या तारखा अचूक निघतात.

रामजन्माचा उल्लेख वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातील १८ व्या सर्गात आणि ८ व्या व ९ व्या श्लोकात आहे. चैत्र महिन्याच्य नवव्या तिथीला रामाचा जन्म झाला, असे त्यात दिले आहे. त्यात असलेले उल्लेख असे: सुर्य मेष राशीत, गुरु कर्केत, मंगळ मकरेत, शनी कन्येत, बुध मीनेत, अमावस्येनंतरचा नववा दिवस, चन्द्र होता पुनर्वसू नक्षत्रात, (मिथुन राशीत) कर्क लग्नाच्या पूर्वेकडे उदय. ही माहिती Planetoriuam Gold मधे टाकल्यानंतर त्यात ही ग्रहस्थिती अस्तित्वात असल्याचे आढळून आले. त्यामुळे रामायणात ती सहजच कुणी लिहिलेली नाही. दिवस निघाला १० जानेवारी ई. स. प०र्व ५११४. याचाच अर्थ रामाचा जन्म आजपासून बरोबर ७११७ वर्षांपूर्वी झाला. अयोध्येचे अक्षांश रेखांश २५ / ८१. त्यादिवशी बरोबर चैत्र शु. नवमी होती. या ग्रहस्थितीनुसार वेळ येते दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान. ही तीच वेळ आहे, ज्यावेळी देशभरात रामजन्म साजरा केला जातो. रामजन्माच्या वेळी आकाशस्थ ग्रहांचे जे चित्र या सोफ्टवेयर दिले आहे त्याचे चित्रही देण्यात आले आहे.

वाल्मिकी रामायणात अयोध्या कांडात असा उल्लेख आहे की, रामाला राजा करण्याची राजा दशरथाची ईछा होती. कारण सूर्य, मंगळ आणि राहू हे त्यांच्या नक्षत्राभोवती होते. कारण या ग्रहस्थितीत राजाचा मृत्यू होतो वा कटकारस्थानाचे बळी व्हावे लागते. राजा दशरथाची मीन राशी होती. त्यांचे नक्षत्र रेवती होते. ही ग्रहस्थिते आहे, ५ जानेवारी ई. स. पू ५०८९ रोजीची आणि नेमक्या त्याच दिवशी रामाला अयोध्या सोडून वनवासात जावे लागले. त्यामूळे राम वनवासात गेले, त्यावेळी ते २५ वर्षाचे होते,हेही सिद्ध होते. (५११४-५०८९). प्रभू रामचंद्र वनवासाला जायला निघाले तेव्हा ते २५ वर्षाचे होते हे दर्शविणारे अनेक श्लोक वाल्मिकी रामायणात आहेत. यापेक्षा आणखी पुरावा रामाचे अस्तित्व नाकारणार्यांना हवा?

खरदुषणसोबत झालेल्या युद्धाच्यावेळी सूर्यग्रहण होते. राम वनवासात असताना १३ व्यावर्षी सूर्यग्रहण होते, असे वाल्मिकी रामायणात म्हटले आहे. तीच ग्रहस्थिती या सॉफ्टवेयर मधे टाकली तेव्हा तारीख निघाली ७ ऑक्टोबर ई.स. पूर्व ५०७७. ठीकाण येते पंचवटी (२० उत्तर / ७३ पूर्व). या सॉफ्टवेयरने आणि वाल्मिकीन्नी दिलेली ग्रहस्थिती नेमकी अचुक आहे. हनुमान श्रीलंकेतून सुन्नभ पर्वतावर आला. त्याला साडेचार तास लागले. पहाटे ६.३० ते सकाळी ११ पर्यंत. या काळातील ग्रहस्थिती जी वाल्मिकी रामायणात दिलेली आहे, ती या सॉफ्टवेयर मधे टाकल्यानंतर १४ डिसेंबर ई. स. पू. ५०७६ हा दिवस निघतो. याच दिशेने रावणाच्या वधाची तारिख ४ डिसेंबर ई. स. पू. ५०७६ ही येते. रामाचा वनवास २ जानेवारी ई. स. पू. ५०७६ रोजी संपला. हा दिवस सुद्धा चैत्र महिन्यातील शुद्ध पक्षातील नवमी आहे. श्रीराम अयोध्येला परतले, तेव्हा ते ३९ वर्षाचे होते. (५११४-५०७५)

श्रीमती सरोजबाला यांचा हा अभ्यास खरोखरच थक्क करणारा आहे. रामसेतू आणि रामाच्या अस्तित्वाबाबत त्यांचे अतिशय नेमकेपणाने माहिती गोळा केली आहे. त्यांच्या या अभ्यासातून केंद्राचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा करावी काय?

तरुण भारत वरुन साभार..


Jaymaharashtra
Saturday, October 13, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्या!
नेहमीप्रमाणे अगदी योग्य उत्तर दिलेत.
स्वतला तथाकथित सेक्युलर म्हणवणारे वडीलांना वडील न म्हणवणार्‍यांच्या प्रजातित मोडतात त्यामुळे अश्या लोकांच्या निरर्थक बडबडी कडे लक्ष न देणे योग्य.


Dineshvs
Sunday, October 14, 2007 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला माहितीबद्दल आभार. त्या संशोधनात रामसेतु बद्दल काय लिहिलेय ?
हा सेतु बहुदा आधीपासुन अस्तित्वात असावा, आणि तो त्या काळात वापरातही असावा.
मी लिहिल्याप्रमाणे, त्या जागेला पर्याय होते आणि आहेतही.
भारताला उत्पन्न मिळण्याच्या दृष्टीने, भारताजवळुन असा मार्ग होणे गरजेचे आहे.


Chyayla
Sunday, October 14, 2007 - 4:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद जयमहाराष्ट्र, दिनेश्- वस्तुता: माझी ११ ऑक्टोबर ६:४५ AM ची पोस्ट रामसेतूच्या अस्तित्वाबद्दल व त्याच्या कित्येक शतके वापराबाबतच आहे. दुसरा तर्क मी मागे मांडला होता की ती जागा नैसर्गिकरित्या उथळ असल्यामुळे कदाचित नल व नील यांच्या मार्गदर्शनाखाली वानरसेनेने वरुन दगड, झाडे माती टाकल्यामुळे सेतू बनवणे सहज शक्य झाले असावे. असो हा माझा अंदाज आहे.

पण एक गोष्ट नक्की श्रीमती सरोजबाला यांनी जे संशोधन केले त्यात राम, रामायणाचे अस्तित्व व सोबत त्या सेतूचा वापर निर्विवाद पणे सिद्ध होतो. हा सेतू मानवनिर्मित नाही हेही खरे कारण तो वानर निर्मित आहे व अनैसर्गिक आहे त्याचा एक पुरावा खालील प्रमाणे देण्यात येतो. कारण ज्या प्रकारचे खडक व त्याची रचना या सेतूमधे दिसुन येते ती आसपास कुठेच नाही म्हणुन त्याला Uniqe म्हटल्या गेले आहे.
Sethu, a big land mass bridging India and Sri Lanka that looks like finger like projections on either side, not seen elsewhere on sea coast, rules out the possibility of geological formation.When Valmiki Ramayana clearly described that the vast land mass was built by Vanaras, Golanguls, and Rukshyas, it is improper to deny documentary evidence and to attribute to geological formation. Truly speaking, even cyclones are not known to mobilize huge stones from no where to form several kilometers long structure. While renaming Nala Sethu, as Adam's Bridge, the British emphatically used the word Bridge with the belief that it is not a geological formation

याव्यतिरिक्त रामायणावर संशोधन झाल्याचे माझ्या माहितीत आहे ज्यात रामायणात उल्लेखित भौगोलीक माहितीच्या आधारे माग घेतला असता तो सुद्धा तंतोतंत जुळुन येतो. यावर अधिक वैज्ञानिक संशोधन व पुरावे google वरही मिळतील.

भौगोलिक संदर्भ व खगोलशास्त्रिय संदर्भ हे दोन्ही रामायण हे काल्पनिक नाही हे सिद्ध करायला पुरेसे आहेत.
प्राचिन भारतिय ऋशी मुनींचे खगोलशास्त्रिय पंचांग वापरण्यामागची दूरद्रुष्टी खरच थक्क करणारी आहे. त्याचे महत्व आज ईतक्या शतकानंतर लक्षात येत आहे. कारण कालगणनेमधे, त्याची पद्धती व वापरामधे बदल होउ शकतो पण खगोलशास्त्रिय संदर्भ बदलत नसतात.

थोडेसे हटके.. Lets wake up म्हणुन हा BB सुरु करुन गेलेला सुयोग स्वता:च झोपला की काय?



Chinya1985
Sunday, October 14, 2007 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(इच्छा असेल तर दै. प्रत्यक्ष मधील "तुलसीपत्र" ही अग्रलेख मालिका पहिल्यापासून मिळवून वाच).

अश्विनि कुठे मिळेल हे दैनिक प्रत्यक्ष???इंटरनेटवर आहे का??

च्यायला,छान पोस्ट आहे. रामसेतु नैसर्गिक नाही याला अनेक पुरावे आहेत. इथे रिदिफ़ वरिल लिंक दिलेलि आहे तिथे अजुन पुरावे दिले आहेत्-
http://specials.rediff.com/news/2007/jul/31slid1.htm


हे जे तार्‍यांचे वय नक्षत्रांवरुन काढले तसेच आकाश किती वर्षांनी परत येऊ शकते??माझ्या माहितिप्रमाणे रामजन्म ७००० नाही तर त्याहुनही कितितरी जुना आहे.

Shendenaxatra
Sunday, October 14, 2007 - 11:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खगोलशास्त्र वापरून वेळेचे निदान अचूक होते हे एकवेळ कबूल करू. पण त्यावरून एवढेच सिद्ध होते की अमुक एक वर्षापुर्वी ग्रहतार्‍यांची अमुक एक स्थिती होती आणि आपल्या लोकांना त्यावर आधारित कालमोजमापन माहीत होते. त्यावरून राम होता असे सिद्ध होत नाही. काव्याला रियलिस्टिक टच देण्याकरता वाल्मिकीने असले खरे वाटणारे तपशील दिले नाहीत हे कशावरून?
आजच्या कितीतरी कादंबर्‍यात खरोखरच्या जागांची वर्णणे असतात. गलिव्हरच्या सफरींमधे लिलिपुटच्या छोट्या लोकांची अगदी अचूक मोजमापे उल्लेखलेली आहेत. ज्यूल व्हर्नच्या कादंबर्‍यात विविध ग्रहतार्‍यांची अचूक मोजमापे आहेत. म्हणून काय त्यांच्या कादंबर्‍या इतिहास ठरत नाहीत.
शिलालेख, नाणी, घरे, गाडगी मडकी असले काही सापडल्याशिवाय रामायण इतिहास होता असे म्हणणे अवघड आहे.


Chyayla
Monday, October 15, 2007 - 4:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्डेनक्षत्र, ते अवघड जरी असले तरी मला नाही वाटत की त्याने रामायणाच्या सत्यतेला काही बाधा येते. रामायण, रामसेतू हे काल्पनिक आहे ह्या पेक्षा ते सत्य आहे याचेच पुरावे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. विज्ञानाने अधिक प्रगती केली तर उद्या अजुन प्रखरतेनी सिद्ध होईलच भले आज त्याच्या मर्यादा असु शकतील.

दुसरी एक गोष्ट जी मला तुमच्याच बाबतित वैयक्तिक नाही म्हणायचे कारण तुम्ही फक्त त्या मानसिकतेचे एक प्रतिनिधी आहात..

मला या गोष्टीच नेहमीच अप्रूप वाटते की जसे बायबल मधे किती तरी अवैज्ञानिक भाकड कथा असुनही पाश्चात्य त्याला scripture म्हणतात व ते खरेच म्हणतात. आणी दुसरीकडे रामायणाचे, सेतूचे कितीही वैज्ञानिक (निदान बायबल पेक्षा किती तरी सरस व वास्तविक) पुरावे असले तरी त्याला Mythological म्हटले जाते. हा केवढा विरोधाभास म्हणावा.

मला याबद्दलही वाटत नाही कारण ते त्यांच श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतीलच पण आपल्याही लोकान्नी त्यांची आंधळेपणाने री ओढावी हे फ़ारच खटकत. अजुनही आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतुन बाहेर पडणार नाही का? स्वता:ची अस्मिता आपणच नाही जपणार तर कोण बाहेरचा परकिय येउन जपणार? की त्यासाठी कुण्या परकियानीच रामायण, रामसेतू हे खरे म्हणुन प्रमाणित करायची वाट पहावी लागणार का?

बरे त्याला ऍडम्स ब्रिज च का म्हणावे, (कुणी ऍडम्स नावाच्या व्यक्तिने तो ब्रिज तर नाही बनवला) जर तो ब्रिजच आहे तर मग रामसेतू का नाही?


Dineshvs
Monday, October 15, 2007 - 5:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, सेतु बद्दल नाही, पण असा सागरी मार्ग व्हायला हवा, याबद्दल तर दुमत नाही ना. मग त्या सेतुला धक्का न लावता, हा कालवा होवु शकतोच की.

सांस्कृतिक वारश्याबद्दल आपण थोडे जास्त सुदैवी आहोत. त्या गोष्टींची अजुनही आपली नाळ जोडलेली आहेच.
हड्डाप्पा आणि मोहेंजोदारो पाकिस्तानात असुन त्याबद्दल त्याना काहिच नाते जोडता येत नाही, इजिप्तमधल्या पुरातन संस्कृतिशीदेखील आताच्या इजिप्तचा काहिच संबंध उरला नाही.


Chyayla
Monday, October 15, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा, अगदी १००% मान्य, सेतूसमुद्रम प्रकल्पाला विरोध नाहीच असा कालवा होणे गरजेचे आहे त्यात दुमत नाही. आक्षेप आहे तो ईतर स्वस्त पर्याय उपलब्ध असल्यावरही रामसेतूसारखा सांस्कृतिक वारसा उध्वस्त करण्याला. वास्तविक पहाता याला चिनच्या भिंती प्रमाणे मान्यता व महत्व द्यावयास हवे व जतन करायला हवे.

Ashwini_k
Monday, October 15, 2007 - 6:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, बरोबर आहे. तालिबान्यांनी बामियान बुध्दमूर्ती तोडल्या. तोडायला वेळ नाही लागला हो! पण ऐतिहासिक वारश्याचा खजिना स्वतःच मातीमोल केला. निदान आपण तरी असे करायला नको.

आणि माझ्या माहितीप्रमाणे, मुंबई जवळ न्हावा शेवा, जवाहर बेट, JNPT येथे जहाजे येतात, कांडला व मंगलोर येथे २६-२७ TMT , गोवामंगलोर two port discharge साठी ३० TMT , विशाखापट्टणम, हल्दिया येथे 13 TMT capacity ची जहाजे regularly येतात. पोर्ट ब्लेअरलाही येतात. एवढा मोठा समुद्रकिनारा भारताला असताना, श्रीलंकेजवळ जाऊन transhipment करण्यापेक्षा किंवा रामसेतू तोडण्यापेक्षा बंदरे राखणे व इतर स्वस्त व विध्वंस न करणारे उपाय शोधणे हे योग्य नाही का?

चिन्या, "प्रत्यक्ष" तुला तुझ्या नेहमीच्या पेपरवाल्याला सांगूनही लावता येइल (मुल्या रू.२/-). हे वृत्तपत्र बिगर राजकीय व माहितीने पुरेपूर भरलेले (सायन्स, आंतरराष्ट्रीय इ.) असते. यात काहीही मसाला टाईप नसल्याने हा पेपर quality ने चांगला आहे. कालच्या पेपरात, "तुलसीपत्र"चा १०९वा भाग आहे.


Dineshvs
Monday, October 15, 2007 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारश्याची कितपत ओळख करुन दिली जाते ?
मला तरी असा उल्लेख शालेय अभ्यासक्रमात असल्याचे आठवत नाही. आपल्या सगळ्याच वारश्यांकडे दुर्लक्ष झालेय.
परवा कुणीतरी सांगत होते कि सर्व वस्तु एकाच ठिकाणी मिळाणारी मॉल संस्कृति, अगदी शिवाजी महाराजांच्या काळी देखील होती. रायगडावर २३ दुकानांची बाजारपेठ अजुन शिल्लक आहेच की.
पण तिथे काय वस्तु विकायला असत. तो माल कुठुन येत असे. ग्राहक गडावरचेच होते कि आजुनाजुच्या गावातुनदेखील लोक येत, महाराजांचे त्यावर काय नियंत्रण होते, त्या बाजारपेठेची मालकी कुणाची होती, गडावरती माल कसा आणला जात असे, आहे काहि माहिती आपल्याला ?

इजिप्तमधले अस्वान धरण बांधताना त्यांचे एक देऊळ पाण्याखाली जाणार होते, ते वाचवायचे आव्हान त्यानी जगाला केले, व ते देऊळ पुर्णतः कापुन परत जोडुन थोडे वर परत उभारण्यात आले.


Peshawa
Monday, October 15, 2007 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिलालेख, नाणी, घरे, गाडगी मडकी असले काही सापडल्याशिवाय रामायण इतिहास होता असे म्हणणे अवघड आहे. >>>

अगदी बरोबर आहे शेंडे. त्याचे काय आहे पुरातत्व खाते हे सरकारी असल्याने सरकारच्या धार्मिक धोरणांचा उपद्रव ह्या खात्यच्य संशोधनावर होतो...

राम होता का नव्हता रामाच्य सल्ग्न जागांचे उत्खनान वैगेरे करायला मग पैसा मिळत नाही... करणार्यांच्या career ची वाट लावल्या जाते त्यात राजकारण येते. हे दुर्दैव ... जे निश्कर्श निघतील ते सोसायची तायरी (दोन्हि बाजुनी ) नसेल तर वृथा वाद कशाला हवेत?

बाब्री मशिधिच्या वेळेस झलेले उत्खनन आणि त्यावरचे निश्कर्श पोचले का जनते पर्यंत?



Shendenaxatra
Monday, October 15, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

==शेन्डेनक्षत्र, ते अवघड जरी असले तरी मला नाही वाटत की त्याने रामायणाच्या सत्यतेला काही बाधा येते. रामायण, रामसेतू हे काल्पनिक आहे ह्या पेक्षा ते सत्य आहे याचेच पुरावे जास्त प्रमाणात उपलब्ध आहे.
==
आजिबात नही. ते सत्य आहे ह्याचे कुठलेही ठोस पुरावे नाहीत. ते मिळेपर्यंत त्याला इतिहास म्हणणे चूक आहे.

==दुसरी एक गोष्ट जी मला तुमच्याच बाबतित वैयक्तिक नाही म्हणायचे
==कारण तुम्ही फक्त त्या मानसिकतेचे एक प्रतिनिधी आहात..
झाले सुरू. मुद्द्याला उत्तर देता आले नाही की असे फाटे फोडले जातात. विचारणार्‍याच्या मानसिकतेवर हल्ल करा. त्याला पाश्चिमात्यांचा गुलाम ठरव वगैरे वगैरे नेहमीचेच.

==मला या गोष्टीच नेहमीच अप्रूप वाटते की जसे बायबल मधे किती तरी अवैज्ञानिक भाकड कथा असुनही पाश्चात्य त्याला स्cरिप्तुरे म्हणतात व ते खरेच म्हणतात. आणी दुसरीकडे रामायणाचे, सेतूचे कितीही वैज्ञानिक (निदान बायबल पेक्षा किती तरी सरस व वास्तविक) पुरावे असले तरी त्याला मायथॉलोजी
म्हटले जाते. हा केवढा विरोधाभास म्हणावा.
==
समस्त पाश्चात्यांना एकाच रंगाच्या फराट्याने रंगवण्याचे आपले काम आततायी आहे. बायबलला सगळे पाश्चात्य इतिहास मानत नाहीत. त्यांच्यात अनेक मतभेद आहेत. पण लोकांनी उत्खनन करुन नवे पुरावेही शोधले आहेत. आपण काय केले? काही नाही. नुसते राजकारण. स्क्रिप्चर हा शब्द इतिहासाला समानार्थी नाही.

==
मला याबद्दलही वाटत नाही कारण ते त्यांच श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतीलच पण आपल्याही लोकान्नी त्यांची आंधळेपणाने री ओढावी हे फ़ारच खटकत. अजुनही आपण गुलामगिरीच्या मानसिकतेतुन बाहेर पडणार नाही का? स्वता:ची अस्मिता आपणच नाही जपणार तर कोण बाहेरचा परकिय येउन जपणार? की त्यासाठी कुण्या परकियानीच रामायण, रामसेतू हे खरे म्हणुन प्रमाणित करायची वाट पहावी लागणार का?
==
मूळ मुद्द्याला उत्तर न देता बायबलादी असंबद्ध विषय उपस्थित करायचे काही कारण नाही. त्याकरता वेगळा बीबी उघडावा.
ग्रहतार्‍यांच्या गणिताचा पुरावा भूतलावरील घटनांकरता होऊ शकत नाही असे माझे म्हणणे आहे. त्याला कुराण, बायबल, अवेस्ता इत्यादी विषय न आणता उत्तर देता आले तर बघा.


Dineshvs
Monday, October 15, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंडेनक्षत्र, सर्व मुद्दे मनापासुन पटले.
असा प्रखर शास्त्रीय वाद, आपल्याकडे झेपत नाही हेच खरे.


Chinya1985
Monday, October 15, 2007 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंडेन जे दोन इंग्रजी लेख मी दिलेले आहेत या BB वर त्यावरुन हे स्पष्ट होते की रामाचे आणि रामसेतुचे अस्तित्व शोधण्यासाठी कुठलाही प्रयत्न सरकारने केला नाही आणि सरळसरळ conclusion वर आले की रामाच्या अस्तित्वाला पुरावा नाही. समजा एखाद्या खुनाचा तपास केलाच नाही आणि म्हटले की खुनी लोक मिळाले नाहित तर खुनच झाला नाही हे सिध्द होते तर ते सपशेल चुकिचे आहे. आधी पुर्णपणे तपास तर करा.

शिलालेख नाहित असे सांगता येणार नाही पण गाडगी,मडकी,नाणी मात्र सापडलेली आहेत हे नक्कि. फ़क्त त्यांची माहिति पोहोचत नाही. उत्खनन हे अतिशय मागास शास्त्र आहे. जेवढी जमिन आहे त्याच्या ०.००००१% जागेच उत्खनन झालेल आहे भारतात तर हे प्रमाण अजुन कमी आहे. त्यामुळे जर उत्खननात एखादी गोष्ट सापडली तर तो पुरावा होतो मात्र ती सापडली नाही तर ती गोष्ट झालिच नाही असे सिध्द होत नाही. रामजन्माचा पुरावा म्हणजे पुर्ण भारतभरात असलेली मंदिरे,वेद,पुराणे,उपनिषदे या साहित्यांमधील रामाबद्दलचे उल्लेख हे आहेत. तुम्ही लिहिलेल आहे शिलालेख पण शिलालेख जर सापडला तर तुम्ही म्हणाल की कशावरुन शिलालेख काढणार्‍या माणसाने खरेच लिहिले आहे??तोही वाल्मिकिंनी सांगितलेल्या रामावर विश्वास ठेवणारा असु शकेल. नाण्यांच्या बाबतही तेच. त्यामुळे सर्व प्रकारच्या पुराव्यांवर आक्षेप घेतला जाउ शकतो आणि त्यामुळे प्राचीन इतिहासातिल प्रत्येक घटना झालिच नव्हती असा निश्कर्श लावला जाउ शकतो. आता साध बघा ना सगळ्यांसमोर झालेल्या गुन्य्हांच्या पुराव्यांचे शोध,मग त्याची पडताळणी या गोष्टींच्या केसेस कोर्टामधे वर्षानुवर्षे चालतात. मग हजारो वर्षापुर्वीच्या गोष्टींना तर किति वर्षे लागायला हवित??

मी मागे लिहिले होते की लाखो वर्षांपुर्वी माणुस (होमो सेपिअन) होता याचे पुरावे आर्किओलॉजिस्टना मिळालेले आहेत,म्हणजे दागिने,भांडी वगैरे. त्या आर्कीओलॉजिस्टचे नाव आहे Michael Cremo आणि richard thompson . हे दोघे जगातिल महत्वाच्या आर्कीओलॉजिस्टपैकी आहेत. या दोघांची 'The Hidden History of Human Race' आणि Forbidden Archaeology ही पुस्तके वाचा म्हणजे मी काय म्हणतो ते लक्षात येईल.


Chyayla
Monday, October 15, 2007 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

==दुसरी एक गोष्ट जी मला तुमच्याच बाबतित वैयक्तिक नाही म्हणायचे
==कारण तुम्ही फक्त त्या मानसिकतेचे एक प्रतिनिधी आहात..
झाले सुरू. मुद्द्याला उत्तर देता आले नाही की असे फाटे फोडले जातात. विचारणार्‍याच्या मानसिकतेवर हल्ल करा. त्याला पाश्चिमात्यांचा गुलाम ठरव वगैरे वगैरे नेहमीचेच

मग खोटे आहे का ते? ईथे उलट तुम्हीच मुद्याला उत्तर टाळले त्याच काय? जे अश्या प्रकारे गुलामगिरीची मानसिकता बाळगुन असतात तसेही त्यांच्यावर हल्ला करणे फ़ारच सोपे जाते. कारण तोच त्यांचा weak ponit असतो.

एकप्रकारे तुमच म्हणण बरोबर आहे पक्षपाती पाश्चात्यच कशाला पाहिजे आपल्याकडे सिक्युलर, लालभाई अशा नरपुंगवांची काही कमी आहे का?


आपण काय केले? काही नाही. नुसते राजकारण
वर जे काही श्रीमती सरोजबाला व रेडिफ वरचे पुरावे दिलेत त्यात तुम्हाला कोठुन राजकारण दिसले? याचे प्रामाणिक उत्तर द्यावे

तुम्ही लिहिलेल आहे शिलालेख पण शिलालेख जर सापडला तर तुम्ही म्हणाल की कशावरुन शिलालेख काढणार्‍या माणसाने खरेच लिहिले आहे??तोही वाल्मिकिंनी सांगितलेल्या रामावर विश्वास ठेवणारा असु शकेल. नाण्यांच्या बाबतही तेच. त्यामुळे सर्व प्रकारच्या पुराव्यांवर आक्षेप घेतला जाउ शकतो आणि त्यामुळे प्राचीन इतिहासातिल प्रत्येक घटना झालिच नव्हती असा निश्कर्श लावला जाउ शकतो.
अगदी बरोबर चिन्या हा मुद्दा मला पूरेपुर पटला. आता खालील विसंगतीपुर्ण वाक्य पहा म्हणजे तुझ्या मुद्याला ईथेच प्रमाण मिळतय. आता काय बोलणार?

काव्याला रियलिस्टिक टच देण्याकरता वाल्मिकीने असले खरे वाटणारे तपशील दिले नाहीत हे कशावरून?
शिलालेख जरी सापडली असते तरी असली मुक्ताफ़ळ उधळणे थाम्बले असते का? अयोध्येत असे कितीतरी तेथे आधी राममंदीर अस्तित्वात होते असले सज्जड पुरावे असुन काय झाले त्याचे? वर पेशव्याने हा मुद्दा आणलाच आहे.

ग्रहतार्‍यांच्या गणिताचा पुरावा भूतलावरील घटनांकरता होऊ शकत नाही
का? अस्सल वैज्ञानिक पूरावा चालत नाही.

रोज आकाशात सुर्य उगवतो म्हणुनच आपण दिवस, वार, तारिख यांचा आधार भूतलावरील घटनांसाठी संदर्भ म्हणुन घेतो ना? मग तुमच्या हिशोबाने हे सगळ थाम्बवाव लागेल. कारण तेही गणितच आहे ना.. शेंडे याबाबत थोडा विचार करुन, common sense वापरुन(राहवले नाही म्हणुन हा शब्द वापरतोय) लिहायला हवे होते. कि विरोध करायचा म्हणुन काहीही लिहायचे असे ठरवले होते.


असा प्रखर शास्त्रीय वाद, आपल्याकडे झेपत नाही हेच खरे
दिनेश, हे मलाही पटले पण ईथे कोणतीही शहानिशा न करता रामायण, रामसेतू नाहीच असे आधीच ठरवुन ठेवले तर मग पुढचे बोलणेच खुंटले. तुम्हीच सांस्कृतीक वारसा बद्दल बोलत होतात ना?



Zakki
Monday, October 15, 2007 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या वाजपेयी सरकारने या प्रकल्पाचा श्रीगणेशा केला त्यांचे याबाबतीत (त्यावेळचे) मत जाणून घ्यायला आवडेल!!!!!!

मला वाटते च्यायला यांनी याला उत्तर दिले आहे. (ऑक्टोबर १३). सुनिल्त आता त्या माहितीची सत्यता पडताळून माफी मागायला येतील का?

बाकी फक्त सभ्य लोकांकडून ज्या अपेक्षा करायच्या त्या सुनिल्त यांना लागू पडत नसाव्यात!

शेंडे नक्षत्र हे फारच कठोर तर्कशास्त्र वापरत अहेत, त्याप्रमाणे त्यांचे म्हणणे चूक नसावे.

प्रश्न फक्त एकच की च्यायला यांनी म्हंटल्याप्रमाणे हिंदूंच्या भावना न दुखावता दुसरा मार्ग जर जास्त चांगला असेल तर तो स्वीकारायला काय हरकत आहे? आणि समजा, जरी त्या दुसर्‍या पर्यायाला थोडे जास्त पैसे पडत असतील, तरी बहुसंख्य लोकांच्या भावने साठी बहुसंख्य लोकांनी दिलेल्या कराच्या पैशातून खर्च केला तर काय जाते? ज्या मुसलमानांचे वापरलेले डायपर चाटण्यासाठी अहमहिकेने नेते पुढे येत आहेत, त्या मुसलमानांनी किती पैसे दिले आहेत कर म्हणून? हिंदूंनी किती? काही हिशेब?

मला शंका येते की पुन: एकदा खुन्नस बाळगून हिंदूंना डिवचण्यासाठी नि मुसलमानांचे पाय, त्यांच्या बुटाचे तळ चाटण्यासाठी हे नेते असे करत आहेत. अरे, अत्यंत भेकड, अत्यंत मूर्ख, अत्यंत स्वार्थी, अत्यंत लाचखाऊ, नि अत्यंत नालायक असे बरेच नेते भारताला लाभले आहेत!! सुनिल्त यांच्यासारख्यांची त्यांना साथ आहे. आता रडा!! नाहीतर भारत सोडून इकडे तिकडे जा.

भारतीय संस्कृतीची काही काळजी करू नका, कंसाच्या तुरुंगातून निसटून मोठ्या झालेल्या कृष्णासारखी भारतीय संस्कृति, भारतातल्या गाळातून (अत्यंत वाईट्ट, बेशिस्त, लोक!) वर येऊन जगभर फुलेल!





Paragb
Tuesday, October 16, 2007 - 8:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Madhyantari ET madhe yavar ek lekh hota. Environmental va Navagation drushtya tyach pramane khoop va niyamit dredging karave lagat asalyamule dekhil to marga technically non feasible aahe asa thodkyat ashay hota. To report kuthe milu shakel kaay ?

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators