mala tumhala he ek suggest karavasa vattha ki, tumhi aadhi tumhi kevha SSC zalat he year declare kara aani tya nantar tumhi hey discuss karu shakta ki kontya year la konte dhade kiva kavita hotya. karan pratyek jan aaplya aaplya year che dhade kiva kavita suchvat jato aahe aani tya mule faar confusion nirmaan hota. bagha patat asel tar .... mee SSC 1996 la zale aani tya veles aamhalahi " smashanateel sone " ha dhada hota .
|
Sayuri
| |
| Wednesday, October 03, 2007 - 7:00 pm: |
|
|
आठवी की दहावी मध्ये मराठीमध्ये एक धडा होता (इंग्रजी माध्यम)..'श्रीनिवास पानसेचे अंगण' अशा नावाचा...किती छान धडा होता तो..
|
सायुरी, त्यात बाई एकदा वर्गात निबंध लिहायला सांगतात आणि तो आईचं, बाबांचं, घराचं सुंदर चित्र निबंधात रेखाटतो. बाईंना ते खूप आवडतं. त्याच्या प्रेमळ आईचं, बाबांचं, घराचं, अंगणाचं, इतकं सुंदर वर्णन, त्यांचे घरातील एकमेकांशी असलेले घट्ट प्रेमाचे संबंध हे सारं वाचून बाईंनाही हेवा वाटतो... नंतर तो मोठा झाल्यावर कधीतरी बर्याच काळानंतर बाईंना तो बाजारात किंवा असेच कुठेतरी अचानक भेटतो. बाई आवर्जून त्याच्याशी बोलतात. त्याच्या आई-वडिलांची आस्थेनं चौकशी करतात. तेव्हा त्यांना कळते की, तो लहानपणापासूनच अनाथ आहे. साधारण अशी गोष्ट होती, तो हाच धडा ना?
|
Bsk
| |
| Thursday, October 04, 2007 - 6:12 am: |
|
|
माझ्याकडे १ली पासून ते १०वी पर्यंतची सगळी मराठी ची पुस्तकं आहेत! मराठी माध्यम.. ती शोधीन आता...मजा येते ते धडे वाचायला!
|
Shravan
| |
| Thursday, October 04, 2007 - 12:06 pm: |
|
|
WOWWW BSK , तुझ्याकडे सगळी मराठी माध्यमाची १ली ते १०वी ची मराठीची पुस्तके आहेत. मी ती पुस्तके मिळवण्याच्या खुप प्रयत्नात आहे. बालभारतीत मिळतील का निदान १ली ते ४थी पर्यंतची?? कृपया अवश्य कळव...
|
Bsk
| |
| Thursday, October 04, 2007 - 5:23 pm: |
|
|
ho. miltil bahutek.. karan aaini ti vikatch anliet.. try karun bagha..
|
Sayuri
| |
| Thursday, October 04, 2007 - 5:26 pm: |
|
|
Gajanandesai, Perfect! अगदी हाच तो धडा. किती सुरेख आहे तो धडा! खरं तर मी मराठी माध्यमात शिकलेय. पण माझी आई इंग्रजी माध्यमाला मराठी शिकवत होती त्यामुळे इंग्रजी माध्यमाची मराठी पुस्तके मी सगळी वाचली होती. खूप छान धडे होते त्यात.
|
Sayuri
| |
| Thursday, October 04, 2007 - 5:39 pm: |
|
|
पण तो धडा कुणाचा होता ते आठवत नाहीये
|
Paarava
| |
| Sunday, October 07, 2007 - 7:42 am: |
|
|
नमस्कार मी नविन आहे इथे. खूपच छान बी.बी. आहे ही. "स्मशानातलं सोनं" आणि "लाल चिखल" कुणी वाचले आहेत का? अप्रतीम आहेत. एक अंगावर शहारे आणणारा तर दूसरा डोळ्यात पाणी आणणारा.
|
Bsk
| |
| Sunday, October 07, 2007 - 6:28 pm: |
|
|
लाल चिखल म्हणजे, त्या बाजारामधे टोमॅटो विकले नाही जात, म्हणून तो माणूस पायांनी तुडवतो,अशी काही गोष्ट होती का? फारच कसंतरी वाटायचं ते वाचताना!
|
Shravan
| |
| Monday, October 08, 2007 - 1:39 pm: |
|
|
BSK , तुम्ही ती पुस्तके कुठून विकत आनलीत? मला वाटत होते, तुम्ही ती संभाळून ठेवलेली असावीत. तुम्हाला कुठे मिळाली ही पुस्तके? कृपया कळवावे. मी मागे एकदा बालभारतीत प्रयत्न केरुन बघितला होता पण तिथल्या सरकारी कर्मचार्यांनी काही दाद लागू दिली नाही. मी परत प्रयत्न करेल तिथे पण तुम्हाला ती कुठून मिळालीत ते कळवा.
|
हो BSK तिच. लाल चिखल माझी पण आवडती कथा आहे. बहुदा शंकर पाटलांनी वा व्यंकटेश माडगुळकरांनी लिहीली आहे. CBDG
|
Paarava
| |
| Monday, October 08, 2007 - 8:02 pm: |
|
|
हो तीच कथा बी एस के. बरोबर आहे कसतरीच वाटायच. पण अप्रतिम होती. हे सगळ लिहिताना, वाचताना आणि शेअर करताना खूपछान वाटतय. पुर्वीचे शाळेतले तास आठवतात. "कणा" कविता पण छान होती.
|
Sush
| |
| Tuesday, October 09, 2007 - 6:14 am: |
|
|
अशीच एक ग्रामिण कथा होती, दावं. आठवतिये का कुणाला. आणि ने मजसि ने कविता सावरकरां चि मला आठवतं एरवी खुप गोन्धळ करणारा आमचा वर्ग हि कविता शिकवताना एक्दम शांत होता. बेल झालि दुसर्या बाई वर्गात आल्या तरि कोणालच भान नव्हते, ना मराठिच्या बाईंना ना सगळ्या मुलींना.
|
Santu
| |
| Tuesday, October 09, 2007 - 8:16 am: |
|
|
अरे देवा तुझे सुंदर आकाश सुंदर प्रकाश अशी कायशी कविता होति कविता होति ते आठवते बुवा मराठि माध्यमाला. आठवते का कुणाला?
|
Shravan
| |
| Tuesday, October 09, 2007 - 2:16 pm: |
|
|
मायबोलीकरहो, बालभारती मध्ये चौकशी करून झाली. तिथे पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. कृपया कुणाला माहीत असेल कुठे मिळू शकतील मराठी माध्यमाची १ ली (१९८५) ते ४ थी (१९८९)पर्यंतची पुस्तके तर कळवा. धन्यवाद..!!! 'लाल चिखल' आनंद यादव यांचा तर नव्हता??
|
Ldhule
| |
| Tuesday, October 09, 2007 - 2:53 pm: |
|
|
Check this out for some marathi poems: http://sanskritdocuments.org/marathi/eshala/ मराठी कविता
|
Neelu_n
| |
| Wednesday, October 10, 2007 - 9:18 am: |
|
|
वा मस्त बीबी आहे.. मी पण ५वी पासुनची सर्व बालभारतीची पुस्तके जपुन ठेवलीयत. मला खुप आवडायची ती. त्यात आणि नामवंत चित्रकारांची चित्रही होती. शिवाय धड्यासोबतची चित्रे तीही सुरेख होती. 'अनामवीरा' कविता आठवतेय का? माझी सर्वात आवडती कविता.
|
Badamraja
| |
| Friday, October 12, 2007 - 6:56 am: |
|
|
मला ४थी त असतांना साने गूरुजींची एक कविता की धडा होता. त्यातली एक ओळ आठवतेय ती अशी " स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी " मला वाटत ही कवीताच असणार. संपूर्ण वर्ग सेन्टी झालेला बर्याच मुलि आणि काही मुल सुद्धा रडली. (बरेच जन घरी जाउन सुद्धा रड्ले आईच्या कुशीत) ती कविताच अशी आहे कि कुणाच्याही डोळ्यात सहज पाणी येइल.
|
Hkumar
| |
| Friday, October 12, 2007 - 8:21 am: |
|
|
नीलू, परवा internet वर विहार करताना मला 'अनामवीरा' कविता सापडली आणि खूप आनंद झाला. मी ती एकदा वाचली व लक्षात आले की ती माझी पूर्ण पाठ आहे. मग बरेच दिवस ती म्हणत राहीलो. कुसुमाग्रजांना त्रिवार वंदन!
|