Farend
| |
| Thursday, August 30, 2007 - 10:34 pm: |
| 
|
श्रीनाथ व कुंबळे नी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अशी जिंकलेली मॅच आठवली ना? ही ती मॅच
|
Vinaydesai
| |
| Wednesday, September 05, 2007 - 6:14 pm: |
| 
|
आज रॉबिन उत्तप्पाच्या प्रेमात पडावे इतका मस्त खेळ.. आत्तापर्यंत या दौर्यात, अश्या परिस्थितीत कुणी टिकतच नव्हतं... आगरकर मुर्खासारखा आऊट झाला (पण तो आगरकरच आहे)... Hats off to Uttappa MOM मात्र ओवेस शहाला दिलं तर चाललं असतं.. त्याने नाबाद 107 आणि नंतर Bowling पण मस्त केली होती..
|
Farend
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:50 pm: |
| 
|
उथपाला मी १-२ मॅचेस मधे पाहिला होता, तेंडुलकरच्या सुरुवातीच्या दिवसांत जशी त्याच्या बॅटिंग मधे वेगळीच एनर्जी होती तसे वाटले होते याची पॅटिंग बघून. पण वर्ल्ड कप मधे त्याने फारच अपेक्षाभंग केला.
|
Kedarjoshi
| |
| Thursday, September 06, 2007 - 12:03 am: |
| 
|
उथाप्पा चांगला फलंदाज आहे. त्याचे काही शॉटस पाहुन एकदम रॉबीनसिंग ची आठवन येते. ३०० + चा चेस केल्यामुळे टेम्पो मस्त आहे त्यामुळे पुढची match जिंकु बहुतेक. आगरकर ला घ्यायला नको. सचा रिटायर होतोय म्हणे.
|
Panna
| |
| Thursday, September 06, 2007 - 3:14 am: |
| 
|
सचा रिटायर होतोय म्हणे. सुतोवाच तरी केलय त्याने!! बघुया, अजुन किती दिवस खेळतो ते..
|
Farend
| |
| Thursday, September 06, 2007 - 4:37 am: |
| 
|
सच्या फक्त वन डे मधून निवृत्त होण्याचे म्हणतोय, तेच बरे आहे. टेस्ट मधे अजून २-३ वर्षे खेळू शकेल. लाराने तेच केले होते. पुन्हा पूर्ण निवृत्त होण्याची गरज नाही, एखादी super important tournament खेळू शकतो जसे लारा ने वर्ल्ड कप ला केले.
|
Vinaydesai
| |
| Thursday, September 06, 2007 - 12:33 pm: |
| 
|
खरं तर सचिनने वन डे साठी पाचव्या क्रमांकावर यायला हरकत नाही... (निवृत्त होण्यापेक्षा). म्हणजे फार ओवर्स खेळायलाही नको (नेहमी नेहमी), आणि प्रतिस्पर्ध्याला टेंशन...
|
Zakki
| |
| Thursday, September 06, 2007 - 1:10 pm: |
| 
|
प्रतिस्पर्ध्याला टेंशन... म्हणजे शत्रूपक्षाच्या गोलंदाजांना सांगता येईल, 'बघ हं, दोन गडी बाद कर, पण तिसरा नको, नाहीतर सचिन येईल खेळायला! '
|
Panna
| |
| Thursday, September 06, 2007 - 1:40 pm: |
| 
|
खरय फ़रेंड, तो जर का सिलेक्टिव्ह राहिला तर टेस्ट काय वन-डे पण २-३ वर्षे सहज खेळू शकेल. वर्ल्ड कप नंतर ज्या पध्दतीने त्याने कम-बॅक केलय... मान गये उस्ताद!!!
|
Kedarjoshi
| |
| Thursday, September 06, 2007 - 5:12 pm: |
| 
|
ती अफवा होती, सच्या खेळनार http://content-usa.cricinfo.com/india/content/current/story/309832.html
|
Zakki
| |
| Friday, September 07, 2007 - 1:53 pm: |
| 
|
पण तो अश्याच धावा काढेल का नेहेमी? ते जमणे कठिण होईल असे ज्यांना वाटते ते म्हणतात त्याने निवृत्त व्हावे. शिवाय Anderson इ. गोलंदाजांचे काय मत आहे या बाबत?
|
Kedarjoshi
| |
| Saturday, September 08, 2007 - 12:09 pm: |
| 
|
सकाळची झोप वाया घालविली. साला काहीही खेळतात. अन अम्पायर पण त्यांचाच कडुन आहे बहुतेक. बघु आता बॉलर काय करतात ते.
|
Farend
| |
| Saturday, September 08, 2007 - 12:34 pm: |
| 
|
मी अजून झोपलोच नाही. आजचा खेळ बघून असे वाटले नाही की याच लोकांनी मागच्या २ मॅचेस मधे ३००+ रन्स केल्या होत्या.
|
Kedarjoshi
| |
| Saturday, September 08, 2007 - 1:08 pm: |
| 
|
हो रे मला वाटले निदान आज ३२० काढु. त्यातल्या त्यात धोनी मुळे थोडी फार तरी लाज वाचली. अगदी पहील्या ओव्हर पासुन डिफेन्स वर जायची काय गरज होती कळले नाही.
|
Tiu
| |
| Saturday, September 08, 2007 - 2:47 pm: |
| 
|
तेंडुलकरला ढापला आज परत!
|
Mukund
| |
| Wednesday, September 26, 2007 - 11:26 am: |
| 
|
अरेच्या! सगळे क्रिकेटप्रेमी कुठे गेले? २०-२० विश्वस्पर्धा जिंकुनसुद्धा इथे एकही पोस्ट नाही? कमाल आहे... सर्वप्रथम धोनी व तरुण भारतीय टिमचे हार्दीक अभिनंदन! हा २०-२० प्रकार माझ्यासारख्या क्रिकेटप्युरीस्टला अगदी मनापासुन पटला नसला तरी ज्या पद्धतीने आपल्या टिमने या स्पर्धेत खेळ केला त्याचे मला मनापासुन कौतुक करावेसे वाटते. तुम्हाला कोणाला जर इंटरेस्ट असेल तर माझे मे २२ चे पोस्ट वाचा... त्यात मी ज्या पद्धतीने आजकाल सगळे क्रिकेट खेळत आहेत त्याबद्दल खेद व्यक्त केला होता.. आणी या स्पर्धेत धोनीने माझे म्हणणे ऐकल्यासारखे वाटले व त्याने त्याच्या खेळाडुंना दबावमुक्त खेळण्याची मुभा(किंवा सल्ला म्हणा!) दिली व त्याचा परीणाम आपल्याला या स्पर्धेत दिसुनच आला. मी मागे हेही म्हटले होते की द्रवीड हा कधीच चांगला कर्णधार नव्हता.... एक खेळाडु म्हणुन तो एक महान क्रिकेटपटु म्हणुन या खेळाच्या इतिहासात अजरामर होईल.. मला स्वत:ला २००२ मधे तो जेव्हा त्याच्या कारकिर्द्रीच्या शिखरावर होता व जेव्हा त्याने लागोपाठ ४ शतके कसोटी मधे फडकावली होती... तेव्हा त्याला खेळताना पाहण्याचे भाग्य लाभले होते. त्याचे टेक्नीक व चिकाटी सगळ्यांपेक्षा सरस आहे. पण कर्णधार म्हणुन त्याने गेल्या २ वर्षात जसा संघ घडवला त्याचे फळ आपल्याला या वर्षीच्या विश्वकरंडकात बघायला मिळाले होते. अतिशय डिफ़ेन्सीव्ह मेंटॅलिटीमुळे व हरु की काय या भीतीने आपला संघ पछाडला होता. त्याउलट धोनीने.. हरले तरी पर्वा नाही पण तुम्ही दबावाखाली न खेळता जिंकण्यासाठी खेळा असा सल्ला सर्व तरुण खेळाडुंना दिला... व त्याचा परीणाम कसा झाला हे आपण सगळ्यांनी या स्पर्धेत पाहीले असेलच... पण क्रिकेटचा हा प्रकार कितीही ऍक्शन पॅक असला तरी याला खरे क्रिकेट म्हणण्यासाठी मन धजवत नाही हेही तितकेच खरे...
|
Farend
| |
| Wednesday, September 26, 2007 - 4:21 pm: |
| 
|
अरे मुकुंद मला तेच आठवले होते परवा. आम्ही एक दोघांनी विचारपूस मधे मेसेज टाकले त्यामुळे कदाचित येथे काही आले नाही. तू आलास का नवीन मायबोलीवर?
|
आपल्या संघाने २० २० विश्वकप जिंकला याचा आनंद नक्कीच आहे पण या विजयासाठी त्यांच्यावर ज्या प्रकारे खैरात केली जाते आहे ते न पटणारे आहे. याच विषयाला अनुसरुन हा लेख! जय हिंद! जय महाराष्ट्र! http://www.saamana.com/2007/Sept/30/Link/Utsav_1.htm
|
|
Mandard
| |
| Monday, October 01, 2007 - 4:26 am: |
| 
|
हा लेख बर्यापैकी एकांगी आहे. राज्यसरकारनी जनतेचे पैसे वाटणे चुकीचे आहे. तसेच विमानवाहतुक मंत्र्यांना फ़ुकट प्रवासाची घोषणा करायची काही गरज नव्हती. पण पवारांनी BCCI चा पैसा वाटला तर त्यात काय problem आहे. शिवसेनेचे मनोहर जोशी पण होते की सत्कार समारम्भात.शिवसेनेचे राज्य असते तर त्यांनीही हाच तमाशा केला असता. फ़क्त एक गोष्ट मात्र बरोबर आहे. शरद पवार एक कृषिमंत्री म्हणुन failure आहेत. आता भारतात लोकांना क्रिकेट सोडुन काही आवडत नाही त्याला पवार काय करणार. वि. आनंद इतक्या वेळा जिंकुन येतो. त्याच्यास्वागताला कोण जाते त्याची बायको सोडुन. पंकज अडवाणी आज बिलियर्डस मधे एक नंबर आहे किती लोकांना माहिती आहे. हाॅकीच्या मॅच ला फ़ायनल सोडुन सगळ्या सामन्यात स्टेडीयम रिकामी असतात. इतर खेळांच्या दुरावस्थेला फ़क्त राजकारणी नाही तर आपण जनता पण जबाबदार आहोत. हे विषयांतर, तसेच Air India च्या कर्मचार्यांचे पगार पटेल वाढवत नाहीत. हे अत्यंत योग्य आहे. त्याना मिळतो तो पगार त्यांच्या लायकी पेक्षा जास्त आहे. The service provided by Air India is one of the wrost in the world. Dirty flights, toilets. No politeness towards customers. This airlines is a big shit. पटेल जे करत आहेत त्यात काहीही चुक नाही. संजय राउत फ़क्त विरोधासाठी विरोध करत आहेत.
|