|
Slarti
| |
| Wednesday, August 29, 2007 - 8:57 pm: |
| 
|
I'd say the calvinistic thought would apply to Mother Teresa's case. Her actions or virtues are immaterial as it is completely within God's mercy whom to redeem.
|
Aschig
| |
| Wednesday, August 29, 2007 - 9:45 pm: |
| 
|
It has more to do with determinism and how a single gene (out of 60000-80000 genes) can determine that fact irrespective of cast-creed-nationaility-theistic inclinations etc.
|
Ashwini_k
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:32 am: |
| 
|
विजय दादा, '''काहीही प्रयास न करता हातावर हात ठेऊन बसणे हे आस्तिक किंवा नास्तिक कोणाकडूनही अपेक्षित नाही. ''' ---- मी तरी अवाक्यात असलेलेच प्रयास करू शकते, त्याच्यापेक्ष्या जास्त नाही, कारण मी सामान्य माणूस आहे. '''की आपण कोणितरी स्पेशल आहात असे आपल्याला वाटते?''' --- नाही. स्पेशल समजत असते तर तुम्हा लोकांसारखी प्रत्येक गोष्ट आपल्या हुशारीच्या अवाक्यात आहे असे समजले असते. आणि सुनामीतदेखिल माणसे आश्चर्यकारकरित्या वाचलीच. तुमचा असा समज आहे का की देव पाठीशी असला की माणूस मरतच नाही! जो जन्माला आला तो मेलाच पाहिजे. नाहीतर विचार करा, जख्ख म्हातारे होऊन, विकलांग अवस्थेत जगावे लागण्यापेक्षा थोडेच पण उत्तम अर्थपूर्ण आयुष्य मिळणे चांगले नाही का? मरण हे चांगले आले पाहिजे. "तो" (किंवा "ती", तुम्हाला पाहिजे ते म्हणा) पाठीशी असला, की अकाल मरण देत नाही अकाल मरण म्हणजे शारिरीक अकाल मरण नाही (ते आलेले परवडले). मरण हे वैचारीक, भावनिक, आर्थिक, सामजिकही असते व ते एकदाच नाही तर आपण परत परतसुध्दा अनुभवू शकतो. सुनामीत जे वाचले पण ज्यांचे घरदार, बाकिचे कुटुंब गेले त्यांनी भावनिक मरण अनुभवले. आमचे देखिल वरील घटनेत तसेच होऊ शकले असते. '''यात मला तुम्हाला दुखवायचे नाही हे पुन्हा स्पष्ट करतो. ''' --- सेम टू यू. ओ अंतरा ताई, '''आणि येस्स माझ्याकडे मला शोर्टसर्किट ची शंका जरी आली असती तर मी मला शक्य तेवढी सर्व खबरदारी व उपाय केलेच असते.''' --- मला शॉर्ट्सर्किटची शंका आली नव्हती, नुसताच मनाला उगाच्च्याउगाच विचार जाणवून गेला. शंका येण्यासाठी तसे काहीतरी सर्कम्स्टन्सेस (मधेच इंग्लीश कसे टाईप करायचे ते मला माहीत नाही, ब्रेकेट्स्ची गडबड होते आहे) असावे लागतात. तसे असते तर मी देखिल काळजी घेतलीच असती. '''मला काय माहित तुम्ही सांगता त्यात तार्किक किती अन अतिशयोक्ति किती. ''' --- मी जसे घडले तसेच्यातसे सांगितले. तुला अतिशयोक्ती वाटु शकते कारण तुला हे झेपत नाही असे दिसते. तन्या, मला वाटले तुझे प्रश्न माझी उत्तरे यांचा तुला मेळ लागत नव्हता म्हणून माझ्याशी कट्टी घेतलीस की काय! '''कमीपणा वगैरे सगळे रिलेटीव्ह असते.. एकच आयुष्य (निदान तुर्तास तरी).. त्यात लोकांशी कशाला तुलना करायची.. '' आमच्या विचारांना अंधश्रध्दा वगैरे म्हणतात हे तुला दिसत नाही का? आणि अंधश्रध्दा वगैरे देखील रिलेटिव्ह आहे मग तुम्ही लोकं का तुलना करता? (इथे "बाबा बंगाली" लोकांसारखं काही विघातक तर काही नाही ना?) श्रध्दे ने मन समर्थ होते, सर्व बाजूंनी विधायक बदल घडतात.
|
Tiu
| |
| Thursday, August 30, 2007 - 4:17 pm: |
| 
|
हा योगायोग म्हणा, माझी अंधश्रध्दा म्हणा, काहीही म्हणा, >>> हे तुमचंच वाक्य. आणी तसं म्हणाल्यावर लगेच राग यायचं काय कारण तुम्हाला? आमच्या विचारांना अंधश्रध्दा वगैरे म्हणतात हे तुला दिसत नाही का? >> इती अश्विनी 
|
अंधश्रद्धा व श्रद्धे मध्ये मला (वैयक्तिक) फरक दिसत नाही. माझे सर्व प्रश्ण पाहिलेस तर माझा रोख हा श्रद्धा म्हणजे काय आणि ती का येते ह्यावरच आहे. असो. """श्रध्दे ने मन समर्थ होते, सर्व बाजूंनी विधायक बदल घडतात. """ मी आधीदेखील लिहिले होते की श्रद्धेमुळे लोक पॉझिटिव्ह विचार करतात, त्यांना मानसिक समाधान मिळते. परंतु एखाद्या गोष्टीवरील श्रद्धा त्या एंटिटीला सिद्ध करत नाही.
|
अमेरिकेतल्या लहान मुलान्ची श्रद्धा असते की नाताळ च्या दिवशी सान्ताक्लॉज येतो आणी चान्गले वागलेल्या मुलाना भेट वस्तु देतो पण वाईट वागलेल्या मुलाना नाही. त्यामुळे नाताळ आला की मुले नीट वागु लागतात. हे चान्गलेच आहे. पण म्हनून सान्तक्लॉज आहे हे सिद्ध होत नाही.
|
Aschig
| |
| Thursday, August 30, 2007 - 5:33 pm: |
| 
|
किंवा मोठी झाल्यावर मुले त्याला मानत नाहीत म्हणजे तो नाही असे सिद्ध होत नाही. येवढे मात्र खरे की तो नाताळच्या दिवशी जगभर presents वाटत फिरत नाही तुमची श्रद्धा असो वा नसो.
|
टिऊ, '''हे तुमचंच वाक्य. आणी तसं म्हणाल्यावर लगेच राग यायचं काय कारण तुम्हाला? आमच्या विचारांना अंधश्रध्दा वगैरे म्हणतात हे तुला दिसत नाही का? इती अश्विनी''' ---ए टिऊ, मला काही अंधश्रध्द म्हटल्याबद्दल प्रॉब्लेम नाही. कारण माझ्यादृष्टीने परमेश्वर आहेच. पण मी श्रध्देबद्दल काही बोलल्यावर तुलना कशाला करायची वगैरे म्हटले, त्यावर मी दाखवू इच्छीत होते की तोच न्याय तुम्हाला का नाही? तसेच देव आहे हे आम्हाला अनुभवतूनही कळत गेले. तुम्ही तो नाही हे सिध्द न करताही ठामपणे तो नाहीच असे म्हणता, म्हणजे खरे अंधश्रध्द कोण? --------- तुमच्या दृष्टीने अंधश्रध्द माणसांची यादी खूप मोठी आहे त्यातील काही खालील प्रमाणे (यांच्या पुढे तर आम्ही फ़डतुसच), १. सुनिता विल्यम्स्- हिने अंतराळात मोठी भरारी मारली पण सगळे मुसळ केरात कारण एवढी विज्ञानात पुढे (खरोखरच पुढे! पुढे जायचा आव आणून नव्हे) जाऊन सुध्दा अंतराळात मागासल्यासारखी भगवद्गीता, गणपती घेऊन गेली. २. महात्मा गांधी- समस्त इंग्रजांना हलवून सोडले, हाकलून दिले. पण आयुष्यभर "राम" व देह ठेवताना "हे राम" म्हटले. ३. स्वामी विवेकानंद- यांनी अंधश्रध्द माणसांप्रमाणे रामकृष्ण परमहंसांना सद्गुरू मानले, जे शारदा मातेचे उपासक होते. (असे लिहील्यावद्दल, मी यातिघांची माफ़ी मागते) या सर्व सश्रध्द माणसांनी आपापली क्षेत्रे अतीउत्तमरित्या हाताळली. श्रध्दा हे त्यांचे बलस्थान होते. ----- चला उधळा फ़ुले! (टिऊ, हे रागाने नाही बरं!)
|
अश्विनी, तु जी उदाहरणे दिली आहेस ती माणसे कितीही चांगली, महान, समाजसेवक असली तरीही त्यांची जे श्रद्धा होती ती बरोबरच होती असे सिद्ध होत नाही. इथे मुळ मुद्दा तो आहे. जसे तु इथल्या अनेक अश्रद्ध लोकांचे उदाहरण घेतलेस तर ते काही चार्वाक, काम्यु, मार्क्स इत्यादी लोकांनी सांगितले म्हणुन अश्रद्ध आहेत असे नाही. तसेच श्रद्धा ही नेसेसरीली चांगलीच असते असे नाही. तु जशी श्रद्धाळु आहेस तसाच ओसामा पण श्रद्धाळु आहे. पण त्याच्या श्रद्धेचे आउटकम बघ. अंधश्रद्धा किंवा श्रद्धा ही रिलेटिव्ह कशी? उलट इथे आजपर्यंत जी चर्चा चालु आहे त्यामध्ये श्रद्धेला अब्सोल्युट एंटिटी प्रमाणेच डिस्कस केले जात आहे. तसेच तु माझ्या प्रश्णांना बगल देतच आहेस. मी आधीही विचारले होते की एखादी गोष्ट सिद्ध झाल्याशिवाय तुमचा त्यावर विश्वास बसतो (मग भले ती गोष्ट समाजविघातक नसेना का, उदा: एखाद्या संतांवरची श्रद्धा) ही अंधश्रद्धा नाही का? तसेच श्रद्धे मुळे सिद्धता येत नाही ह्याचेही तु अजुन उत्तर दिले नाहीस. आणखी एक मुद्दा. अश्रद्ध देखील असे मानत नाही की प्रत्येक गोष्ट त्याच्या आवाक्यात आहे. पण म्हणुन तो असेही मानत नाही की ते कुणाच्यातरी आवाक्यात आहे. अशी सुप्रीम पॉवर असायलाच हवी का? मान्य की त्यामुळे मनाला शांती मिळेल, कुणीतरी पाठीराखा आहे असा आधार मिळेल. पण म्हणुन अजुनही सिद्ध न झालेला काल्पनिक आधार घेणे ही स्वतची फसवणुक नाही का?
|
तन्या, '''मी आधीही विचारले होते की एखादी गोष्ट सिद्ध झाल्याशिवाय तुमचा त्यावर विश्वास बसतो (मग भले ती गोष्ट समाजविघातक नसेना का, उदा: एखाद्या संतांवरची श्रद्धा) ही अंधश्रद्धा नाही का? तसेच श्रद्धे मुळे सिद्धता येत नाही ह्याचेही तु अजुन उत्तर दिले नाहीस. ''' ---कितीवेळा उत्तर देऊ? तेच तेच लिहायचा कंटाळा आला. '''अश्रद्ध देखील असे मानत नाही की प्रत्येक गोष्ट त्याच्या आवाक्यात आहे. पण म्हणुन तो असेही मानत नाही की ते कुणाच्यातरी आवाक्यात आहे. ----हे पण नाही, ते पण नाही. मग अश्रध्दांचा किती गोंधळ उडाला आहे बघ. '''अशी सुप्रीम पॉवर असायलाच हवी का? मान्य की त्यामुळे मनाला शांती मिळेल, कुणीतरी पाठीराखा आहे असा आधार मिळेल. पण म्हणुन अजुनही सिद्ध न झालेला काल्पनिक आधार घेणे ही स्वतची फसवणुक नाही का?''' ---नुसती मनाला शांतीच नव्हे तर अखंड विश्व चालवणारा "तो" (सुप्रिम पॉवर) फ़ील करणे हे अनुभवाने आमच्यासाठी सिध्द झालेले आहे (पुन्हा तेच!). पण "तो" किंवा सुप्रिम पॉवर नाही असा अजूनही सिध्द न झालेला काल्पनिक मुद्दा मांडणे ही स्वतःची फ़सवणूक नाही का?
|
Princess
| |
| Friday, August 31, 2007 - 10:21 am: |
| 
|
चर्चा छान चाललीय. बरे मध्ये कोणीतरी तो दाढी मिशीचा प्रश्न विचारला होता ना तर घैसासांच्या संपुर्ण चातुर्मासात याचे उत्तर असे लिहिले आहे दाढी मिशा हे मानवातील नराचे लक्षण असुन बाल्य तारुण्य व वृद्धत्व या अवस्था मानवाला असतात, देवताना नव्हे. पितामह ब्रह्मदेव हे प्रजापती असल्या मुळे त्याना दाढी मिशा दाखवतात. शंकर हा मानवी वंशातून सिद्धतेला पोहचलाय म्हणुन काही चित्रात दाढी मिशा दाखवतात. ह प्रश्न मलाही पडला होता. वरचे उत्तर पुर्णपणे पटलेय असे नाही पण थोडा तरी गुंता सुटलाय. अश्विनी, असे देवावर सोपवुन झोपुन जाणे योग्य नव्हे. ते म्हणतात ना, प्रयत्न न करणार्याला देवही मदत करत नाही. तुमच्या मनात शॉर्ट सर्किटचा विचार येण्यासाठी नक्कीच काहीतरी धागा असेल. नीट आठवुन बघा. कुठले तरी बटन किंवा इलेक्ट्रिक अप्प्लायन्स गरम लागले असेल किंवा तत्सम. तुम्ही जे केलेत ते खरोखरच अंधश्रद्धेत मोडते. मी एक आस्तिक व्यक्ति आहे आणि तुमच्य आस्तिकतेला माझा मुळीच विरोध नाही.
|
Maanus
| |
| Friday, August 31, 2007 - 1:41 pm: |
| 
|
अरे वा म्हणजे माझ्या प्रश्नाला शास्त्रशुद्ध उत्तर आहे की. good माझ्या मानात एक सुप्त इच्छा आहे. की एकतरी दिवस असा जावा जेव्हा इथे कुणीच msg नको लिहायला आणि हा BB last one day posts च्या search result मधे नको यावा.
|
Divya
| |
| Friday, August 31, 2007 - 3:32 pm: |
| 
|
आश्विनी देव हा सर्वव्यापी जरी असला तरी तो निसर्गाप्रमाणे तटस्थ आहे. तो कसलेही चमत्कार करत नाही. तो सर्वांसाठी सारखाच आहे आस्तिकांसाठी सुद्धा आणि नास्तिकांसाठी सुद्धा. त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करण म्हणजे त्याच्या सारख तटस्थ होण. माणुसाचे ( हा वरचा माणुस नाही ) अहंकार, द्वेष, मत्सर हे त्याचे शत्रु आहेत त्याला दुख देणारे आणि तटस्थ होण म्हणजे त्यांच्यापासुन दुर जाणेच होय.
|
Aschig
| |
| Friday, August 31, 2007 - 4:12 pm: |
| 
|
माणुस, तथास्तु! - पण कोणीतरी काहीतरी विचारतं आणी देवांना पुन्हा अवतिर्ण व्हावं लागतं :-) डोक्यावरील केस हे नर (किंवा नारी) चिन्ह न्हवे काय?
|
Tiu
| |
| Friday, August 31, 2007 - 4:20 pm: |
| 
|
दाढी मिशा हे मानवातील नराचे लक्षण असुन बाल्य तारुण्य व वृद्धत्व या अवस्था मानवाला असतात, देवताना नव्हे. पितामह ब्रह्मदेव हे प्रजापती असल्या मुळे त्याना दाढी मिशा दाखवतात. शंकर हा मानवी वंशातून सिद्धतेला पोहचलाय म्हणुन काही चित्रात दाढी मिशा दाखवतात. >>> अरे वा म्हणजे माझ्या प्रश्नाला शास्त्रशुद्ध उत्तर आहे की. good >>> हे काय शास्त्रशुद्ध उत्तर आहे का? काहीतरी काय?
|
Aschig
| |
| Friday, August 31, 2007 - 4:36 pm: |
| 
|
Agni too had a beard. Check out page 37 of Art of Osian Temples: Socio-Economic and Religious Life in India, 8Th-12th Centuries A.D. By Asha Kalia You can find it in Google Books
|
Princess
| |
| Friday, August 31, 2007 - 5:41 pm: |
| 
|
ते उत्तर मी स्वत:च्या मनाने दिलेले नसुन चातुर्मासात दिलेले आहे. मला ते पुर्णपणे पटलेले नाही असेही मी आधीच सांगितले आहे. त्यामुळे जर तुम्हाला शास्त्रशुद्ध उत्तर माहिती असेल तर कृपया द्या.
|
Maanus
| |
| Friday, August 31, 2007 - 5:56 pm: |
| 
|
ए अरे कुठल्याही विषयावर वाद करता तुम्ही लोक...
|
Tiu
| |
| Friday, August 31, 2007 - 6:50 pm: |
| 
|
कृपया गैरसमज करुन घेउ नये... मला फक्त ' चातुर्मासात दिलेलं आहे म्हणजे ते बरोबर किंवा शास्त्रशुद्ध आहे असं नाही' इतकंच म्हणायचं होतं... त्यात तुम्हाला किंवा इतर कुणाला दुखवायचा हेतु नव्हता... आणि देवांना दाढी मिशा का नसतात ह्याचं माझ्याकडे तरी काही शास्त्रशुद्ध , logical, illogical उत्तर नाही... Infact देवांना दाढी मिशा का नसतात हा पुढचा प्रश्न झाला. मुळात देव का असतात (किंवा देव असतात का?) ह्यावर पण माझ्याकडे काही उत्तर नाहिये! बाकी चर्चा चालु द्या!!!
|
Aschig
| |
| Friday, August 31, 2007 - 7:01 pm: |
| 
|
So, the question should be, IF God(s) exist(s), THEN do (should?) they have beard(s) and moustache(s). For humans these aspects are a residual from earlier ages. Why do the genes express themselves only after adolescence? Could it be an indication of growing up as in getting mature rather than just growing? May be the concept of God as depicted in pictures is an immature one?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|