|
अध्यात्म विज्ञानाच्या आकलनाबाहेरचे असेल तर शास्त्राच्या कसोट्या त्याला लावण्याचा अट्टाहास नको. मग हेच तर आम्ही तुम्हाला कित्येक दिवसापासुन सांगतो आहोत!!!चला बर झाल की तुम्हाला तरी कळल. आता हेच तुम्ही इतरांनाहि समजवा. आमचे हेच म्हणने आहे की विज्ञानाला जरी कळत नसले तरी आध्यात्म आहे आणि देवही आहे. विज्ञानाच्या डोळ्यातुन देव शोधायचा प्रयत्न करु नका. तुकाराम, विवेकानंदादी लोकांच्या सांगण्याला गणिती पाया होता याची कल्पना नव्हती. अहो कसला गणिती पाया धरुन बसला आहात स्लार्ति???अशिगच चुकिच वक्तव्य उघड पडल्यावर त्याने सारवासारव करण्यासाठि गणित वगैरे लिहिल होत. आजुबाजुला बघा किति गोष्टी गणिताशिवाय होत असतात ते. बाकी च्यायलांनी बरोबर मुद्दा मांडलाय जेन्व्हा आधुनिक विज्ञान नव्हत तेंव्हा माणुस बुध्दिप्रामाण्यवादी नव्हता का?? aschig,there r no experiences 2 atheist!!!if u have not heard of a film then how can u say that this film exists or not???if i say there is a film called Baraka n if u haven't even heard of it ,how can u say that there is such film or not forget abt.sayin it's good or bad.the 'unique' experiences of different people r possible as i had stated. God has millions n trillions of forms ,if e.g. X sees that form which no one has seen before He can say that his experience is unique,similar may happen with another person.if u say that everythin what theist say is maya then u indirectly agree that there is somethin else than maya .it is not material world(as science may state). आइन्स्टाईन गलिलिओ यान्ची वक्तव्ये मान्य करत्नो कारण ती विज्ञानाच्या कशोटीवर उतरतात म्हणून. केवळ त्यान्च्या विशयी श्रद्धीमुळे नव्हे. विजयराव,आधी अशिगची पोस्ट नीट वाचा. आम्ही पण तुकाराम,ज्ञानेश्वर,विवेकानंद यांची वक्तव्य मानतो कारण ती आध्यात्मिक कसोटीवर उतरतात.
|
आमचे हेच म्हणने आहे की विज्ञानाला जरी कळत नसले तरी आध्यात्म आहे आणि देवही आहे. विज्ञानाच्या डोळ्यातुन देव शोधायचा प्रयत्न करु नका. हेच विधन भुते, पर्या, सन्तक्लोस, युनिकॉर्न, मरिआई, यान्च्या बाबत ही करता येइल.
|
Aschig
| |
| Monday, August 20, 2007 - 4:53 am: |
| 
|
> जेन्व्हा आधुनिक विज्ञान नव्हत तेंव्हा माणुस बुध्दिप्रामाण्यवादी नव्हता का? One of the puzzling, challenging, mostly unaddressed question seems to be "what is science?" Most people seem to falter there. It is not mathematics. nor is it what the scientist do. It is more a methodology. Apparatus, experiments, proofs happen to be only parts of it. It involves making a hypothesis, asking questions that will help determine if the hypothesis is true or not, devising ways to answer those questions, gather data from experiments thus prescribed and then analysing the data. Whatever is done in this fashion is science. So science has existed for a long time, a really long time. So, if the right questions can be asked there is nothing beyond science. Many times answers are assumed. Then there is not much scope for science. What then happens is not even bad science. If you assume that something can not be answered by science, all that means is you are not ready to think about the questions. If God is so powerful, perhaps He has created science and he must have made a provision so that His existence can be proven by science? Shall we try to decide what the questions should be? Can all theists state one question which if answered could prove (or disprove) His existence? May be ditto for atheists?
|
Santu
| |
| Monday, August 20, 2007 - 7:29 am: |
| 
|
अस्चिग आम्हा ला ईग्रजी कठिण जाते तवा वाईच मर्हाठित लिव्हा
|
Ashwini_k
| |
| Monday, August 20, 2007 - 11:34 am: |
| 
|
अंतरा, "अहो चार अर्धज्ञानी लोक टाळ्या वाजवतील या असल्या मेन्दू, संप्रेरके वगैरे शब्द वापरून लिहिलेल्या पोस्त ना. वाजवू देत बापडे. पण तुम्हाला कुणी सांगितले की सगळ्यांच्या मेन्दुत सारखीच संप्रेरके सारख्याच प्रमाणात स्त्रवतात म्हणून? ते मूळ अस्सुम्प्तिओन च साफ़ चूक आहे. अज्ञानावर आधारित आहे. " ---- मी कधीच म्हटले नाही की सगळ्यांच्या मेंदूत सारखीच संप्रेरके सारख्याच प्रमाणात स्त्रवतात म्हणून. संप्रेरके सारखीच असतात व प्रमाण वेगवेगळे असते. टाळ्या वाजवण्यासाठी मेंदू व संप्रेरके हे शब्द काही मोठे नाहीत. सामान्यांची साधी भाषा आहे (शाळेत शिकवली जाणारी). म्हण मला, अर्धवट ज्ञानी किंवा अज्ञानी, पण स्वतःला ज्ञानी सिध्द करण्यासाठी दुसर्याला कमी प्रतीचे दाखवणे मला गरजेचे वाटत नाही. विज्ञानाच्यावरही पुरून उरणार्या परमेश्वराला विज्ञानाच्या फ़्रेममध्ये कोंबायला बघणे हे माझ्याच्याने होणार नाही. मी त्याच्यापुढे धुळीचा कणही नाही. परमेश्वर सोडच! पण हे जे विज्ञान आहे ते देखिल एवढे विस्तृत आहे की मी मी म्हणणार्या कोणाही एकाच्या अवाक्यातले नाही. तरीही, ऑल दी बेस्ट!
|
Slarti
| |
| Monday, August 20, 2007 - 3:53 pm: |
| 
|
>>> What then happens is not even bad science. Reminds me of the famous quote by Pauli : This isn't right. This isn't even wrong.

|
Chyayla
| |
| Monday, August 20, 2007 - 4:55 pm: |
| 
|
धन्यवाद संतु तसेच तुमच्या विनन्तीला माझाही पाठिम्बा, निदान मायबोलीवर शक्य तो मराठीतुन तरी लिहु या. स्लार्ती आणी आश्चिग तुमच्या प्रश्नांची चपखल उत्तरे आहेत वेळ काढुन लिहिल. तुम्ही जी पोस्ट लिहिली तरी प्रश्न तोच उरतो की बुद्धीप्रामाण्यवाद हा वैज्ञानिक कसोट्यांवरच अवलम्बुन असतो का? तुम्ही केवळ विज्ञानाबद्दल लिहिले पण सध्या मुद्दा बुद्धीप्रामण्यवादाचा आहे. जे विज्ञानाची अपुर्णता मान्य करुन त्याही पुढे बुद्धीचाच उपयोग करुन जातात ना? मग तो बुद्धीप्रामाण्यवाद नाही का म्हणता येणार. माझ्या माहितित तरी कोणताही संत हा निर्बुद्ध नव्हता तर ते प्रचंड बुद्धीमान होते आणी म्हणुनच करोडो लोकांच्या बुद्धीला पटले. आणी तेही इतक्या शतकानंतरही त्यात तितकेच नाविन्य आहे व अजुनही टीकुन आहे यातच काय ते कळते. अजुन एक स्पष्ट करु ईछितो मी मागे ही म्हटले तुमचे सगळे तर्क हे पाश्चात्यांच्या देव ह्या संकल्पनेवर आधारीत आहेत. आणी आम्ही मुळात भारतिय अध्यात्मशास्त्रावरुन मते मांडत आहोत. त्यामुळे तुम्ही चुकीची मते समजुन अजुनच चुकिची मते बनवत आहात. आणी त्यामुळे असला घोटाळा होतोय. उदा.: तुम्ही समजता की आम्ही असे समजतो की देवानी हे जग निर्माण केले आणी आता त्यातच तुम्ही म्हणता की देवानी विज्ञान तयार केले.. हीच तर चुकीची कल्पना आहे. भारतिय अध्यात्म शास्त्र म्हणते देवानी जग निर्माण केले नाही(त्यात विज्ञानही आले) तर देवच हा जगाच्या रुपाने व्यक्त झाला आहे जे आपण पहातो हे सगळे व्यक्त ब्रह्म आहे त्यासोबत त्याची माया आहे जी आपल्याला भुल पाडते.. असो मायाबद्दलच पुढे लिहिल. परमेश्वर सोडच! पण हे जे विज्ञान आहे ते देखिल एवढे विस्तृत आहे की मी मी म्हणणार्या कोणाही एकाच्या अवाक्यातले नाही. तरीही, ऑल दी बेस्ट अश्वीनी.. तुमच्या या वाक्याची प्र्शंसा करायला शब्द नाहीत
|
Slarti
| |
| Monday, August 20, 2007 - 7:10 pm: |
| 
|
प्रश्न आहे तो objectivity चा. किती लोकांच्या बुद्धीला पटते, कोणत्या लोकांच्या (संतमहात्मे) बुद्धीला पटते त्याने 'बुद्धीप्रामाण्य' येत नाही कारण ते बुद्धीचा वापर करुनच पुढे जात आहेत की दुसर्या कशाने याची खात्री नाही. खात्री का नाही ? कारण विज्ञानाच्या पुढे बुद्धीचा वापर करुन जाणार्या करोडो लोकांच्या बुद्धीला जे पटते ते तसेच करुन पुढे जाणार्या इतर करोडो लोकांच्या बुद्धीला पटत नाही... हजारो वर्षे झाली तरीही. मग ती खात्री कशाने मिळावी ? 'प्रामाण्य' कशाचे मानायचे ? बुद्धीच्या आणि केवळ बुद्धीच्या वापराची खात्री होइल जेव्हा त्यात objectivity येईल. ती येते वैज्ञानिक कसोट्यांनी. अनेक बुद्धीमान लोक बुद्धीप्रामाण्यवादी नसतात. त्यानेही काही सिद्ध होत नाही, बुद्धीप्रामाण्य हे बुद्धीच्या दर्जावर, बुद्धीच्या संख्यात्मक गुणवत्तेवर अवलंबून नाही.
|
स्लार्ति, मुळात हा मुद्दा सुरु झाला कारण तुम्हि लोकांनी पुनर्जन्म तसेच इतर धार्मिक गोष्टींना बघताना आणि विज्ञानाने शोधलेल्या गोष्टींना बघताना double standards वापरले. तेंव्हा माझे म्हणने होते की हा बुध्दीप्रामाण्यवाद नाहिच. कारण तुम्ही बुध्दिचा वापर सोडुन फ़क्त विज्ञानानी म्हटलय म्हणुन गोष्टींचे समर्थन करत होता. त्यावर तुम्ही म्हटले की जे विज्ञान मानते तोच बुध्दिप्रामाण्यवाद. त्यावरुन्च या बुध्दिप्रामाण्यवादाची कुचकामी परिस्थिति कळली बुध्दिचा वापर आपण फ़क्त विज्ञानात करत नाहि तर दैनंदिन जीवनातही करतो. पण तुमच्या definition प्रमाणे बुध्दिप्रामाण्यवाद म्हणजे 'वैज्ञानिक दृष्टीकोण'. त्यामुळे तुम्हि लिहिलेल्या objectivity वगैरे गोष्टी चुकिच्या ठरतात. च्यायला,देवाने हे जग निर्माण केले आहे हे आपला धर्म सुध्दा सांगतो. वेदांमधे असेही म्हटलेय की विष्णुच्या श्वासागणिक अनेक विश्वे निर्माण होत असतात आणि अनेक नष्ट होत असतात. तसेच ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे ४ युगे होतात आणि जग निर्माण होतात आणि नष्ट होतात.
|
देवच हा जगाच्या रुपाने प्रकट झाला आहे ह्या वाक्याचा अर्थ काय? जर तर्क लावायचा नाही असे म्हटले तर मग फक्त श्रद्धा आली आणि ह्या वाक्यावर विश्वास ठेवता येइल. पण जरासा देखील तार्कीक विचार केला तर ह्या विधानामध्ये अनेक प्रश्ण आहेत ज्याची उत्तरे तुम्ही द्याल का? १. देव जर जगाच्या रुपाने प्रकट झाला तर त्याच्या आधी काय होते? २. बिग बॅंग सारखी एखादी थेअरी मान्य केली, तर देव आणि त्यायोगे जग प्रकट होण्याचे कारण काय? जर देव हाच सबकुछ आहे तर मग ह्या घटनेचे कारणही देवच आहे. म्हणजे देव ह्या घटनेच्या आधी देखील अस्तित्त्वात होता. म्हणजे काळ देखील अस्तित्त्वात होता आणि देवाच्या अस्तित्त्वासाठी स्पेस पण असली पाहिजे. मग जग निर्माण झाले (किंवा देव त्या रुपाने प्रकट झाला) हे विधान खोटे ठरते. जर ह्या सर्व कंडिशन्स मध्ये देखील जर देवच ह्या जगाच्या रुपाने प्रकट झाला असे म्हटले तर मग फक्त एकच शक्यता उरते ती म्हणजे देवाला कोणताही भौतिक शास्त्राचा नियम लागु होउ शकत नाही. पण तरीही असे घडलेच ह्यावर तुमचा व बहुसंख्य लोकांचा व थोर संतांचा ठाम विश्वास आहे. ह्यालाच श्रद्धा म्हणतात का? आमचे कोणते तर्क पाश्चात्य संकल्पनांवर आधारीत आहेत? इथे बहुतांशी भारतीय संकल्पनांवरच चर्चा झालेली आहे. कृपया स्पष्ट करा की कोणते तर्क पाश्चात्य संकल्पनांवर आधारीत आहेत. कारण हा मुद्दा तु आणि च्यायला वेळो-वेळी पुढे करत आहात. स्लार्टी ने मांडलेला मुद्दा परत एकदा रिपीट करतो. बहुसंख्यांना पटते म्हणुन ते खरेच असते असे नाही. आशीशने दिलेली विज्ञानाची व्याख्या परत एकदा वाचा. इथे मी, आशीश, स्लार्टी वेळोवेळी बरेच प्रश्ण मांडत आहोत त्याची उत्तरे डावलुन बगल देउन तुम्ही जात आहात असे नाही वाटत का? सर्व चर्चेनंतर आपण एकच प्रश्ण चिवडत बसलो आहे. तो म्हणजे श्रद्धेला तार्कीक व वैज्ञानीक आधार काय? किंवा श्रद्धेला असा आधार असण्याची गरज आहे का? ह्याचे उत्तर जर विज्ञानाने सर्व गोष्टी एक्स्प्लेन होत नाहीत, बुद्धीला सर्व घटनांचा कार्य-कारणभाव समजत नाही असे असेल तर हे कारण सर्वशक्तिमान देवाचे अस्तित्व शाबीत करत नाही हे यापुर्वीच स्पष्ट झालेले आहे. "विज्ञान नव्हते तेव्हा माणुस बुद्धिप्रामण्यवादी नव्हता का?" विज्ञान नव्हते म्हणजे काय? माणुस एखाद्या घटनेमागील कार्य्-कारण भाव शोधायला लागला आणि त्यासाठी एक पद्धती वापरायला लागला तेव्हाच तो विज्ञानवादी झाला. त्याला जे प्रश्ण पडले त्यातुन कदाचित देव ह्या संकल्पनेचा उगम झाला असावा. अध्यात्मदेखील अश्याच प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्याची एक पद्धती होती व आहे. तेव्हा प्रायोगिक विज्ञान हे त्याच्या हाताशी नसल्याने त्याने थेरॉटिकल उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. आज देखील थेरॉटिकल फॅकल्टीज ना जेव्हा प्रॅक्टिकल वा एक्स्परिमेंटल पुरावे दिले जातात तेव्हाच तिला मान्यता मिळते. प्रश्न इथे येतो जेव्हा अध्यात्म तसेच देव ही संकल्पना निर्विवाद पणे मान्य करायला सुरुवात होते. उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अध्यात्माने त्याच्या प्रगतीचा प्रवास पुर्ण केला आहे हे विधान. प्रश्ण एव्हडाच आहे की आपण ही शक्यता विचारात घेवुन तिचा ऑब्जेक्टिव्हली विचार करणार आहोत की श्रद्धेने? अश्विनी इथे अंतरा सोडुन इतरही लोक हेटाळणी न करता प्रश्ण विचारत आहेत. तु त्यांच्या प्रश्णांची उत्तरे देवु शकतेस. कारण तु तिच्या पोस्ट्सना उत्तरे देवुन साध्य काहीच होत नाहीये.
|
Chyayla
| |
| Monday, August 20, 2007 - 9:23 pm: |
| 
|
चिन्या, विष्णुच्या श्वासागणिक अनेक विष्वे निर्माण होतात असे तु म्हणतोस ना तेही एका अर्थी बरोबर आहे पण विष्णु शब्दाचा अर्थ काय ते पहा विष्णु म्हणजे पसरणे हे जे विष्व आहे त्याच्या अणु रेणुत तो पसरला आहे. ह्या सगळ्या सामान्य लोकाना त्यांच्या भाषेत कळावे म्हणुन तु म्हणतो तसे प्रारुप दीलेले आहे. तान्याने जो अश्वीनीला सल्ला दीला तसाच मी संतुना पण देइल.
|
Slarti
| |
| Monday, August 20, 2007 - 9:36 pm: |
| 
|
बुद्धीप्रमाण्य म्हणजे 'केवळ स्वबुद्धीचा वापर आणि स्वबुद्धीच प्रमाण' नव्हे. तो एक दुर्दैवी गैरसमज आहे. दैनंदिन जीवनात बुद्धीबरोबरच ethics, morality, free will या subjective गोष्टी येतात. दैनंदिन जीवनात केवळ बुद्धीचा वापर केला जातो असे म्हणणे आहे काय ? सारांश, त्यावरुन objectivity वगैरे चूक हा निष्कर्ष काढता येत नाही. बरे, पुनर्जन्म वगैरेकडे बघताना वैज्ञानिक कारणेच दिली आहेत, दुटप्पीपणा कोठून आला ? त्या कारणांचा प्रत्यवाय त्याच भाषेत केला तर काही उद्बोधन होईल. विज्ञान कोणा एकाच्या बुद्धीला प्रमाण मानत नाही. विज्ञान म्हणजे नक्की काय ते खरोखर समजून घ्यायची इच्छा असेल तर 'philosophy of science' वरील पुस्तके वाचावीत. गैरसमज दूर व्हायला मदत होते. असो. आता देवाने जग निर्माण केले की नाही केले ? कोणाची बुद्धी प्रमाण मानावी ?
|
Slarti
| |
| Monday, August 20, 2007 - 9:48 pm: |
| 
|
>>> ह्या सगळ्या सामान्य लोकाना त्यांच्या भाषेत कळावे ...
काय शालजोडीतला हाणला आहे हो... एकदम आवडेश 
|
Asami
| |
| Monday, August 20, 2007 - 9:58 pm: |
| 
|
slarty फ़ार सुंदर आणी मुद्देसूद लिहितोस रे तू. एकदम अवडेश
|
विज्ञानाच्यावरही पुरून उरणार्या परमेश्वराला विज्ञानाच्या फ़्रेममध्ये कोंबायला बघणे हे माझ्याच्याने होणार नाही. मी त्याच्यापुढे धुळीचा कणही नाही. अश्विनी ताई, मुळात असा परमेश्वर आहे हे अम्ही का मानावे केवळ तुम्ही म्हणताय म्हणून? आणी परमेश्वराला विज्ञानाच्या फ्रेम मध्ये कोम्बायचा प्रयत्न आम्ही करीत नाही, तर विज्ञानाची परिभाषा वापरून देवाचे अस्तित्व सिद्ध करण्याचा खटाटोप करणारे करतात. "परमेश्वराच्या अस्तित्वाचा आमच्याकडे कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, पण आमची श्रद्धा आहे, अम्हाला बरे वाटते, म्हणून आम्ही मानतो " असे प्रान्जळ पणे कबूल करणार्या आस्तिकाना अम्ही उगाचच इरिटेट करत नाही. पण परमेश्वर विज्ञानाच्यावर पुरुन उरणारा आहे अशी विधाने केली की गोन्धळ होतो.
|
Chyayla
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:06 am: |
| 
|
काय शालजोडीतला हाणला आहे हो... एकदम आवडेश स्लार्ती मीत्रा.. काय हे गम्मत करत आहेस का? मी आता म्हणु शकतो की काय मस्त शालजोडीतला हाणुन घेतला आहे हो स्वता:ला ... असो वैयक्तिक मला काही म्हणायचे नव्हते तर ते General होते हे लक्षात आलेच असेल.. बुद्धीप्रामाण्यवादासाठी वैज्ञानिक कसोट्या फ़क्त एक उपकरण,( Tool ) आहे बस. त्यामुळे वैज्ञानिक कसोट्या मानणे म्हणजेच बुद्धीप्रामाण्यवादी हे काही जमत नाही. बुद्धी काय पशुन्नापण असते ते त्याचा उपयोग करुनच जीवन जगतात म्हणजे ते त्यांच्या बुद्धीलाच प्रमाण मानुन कार्य करत असतात त्यांच्या कडे कुठुन येणार वैज्ञानिक कसोट्या? माझ्या निरिक्षणानुसार हा शब्द तान्याने आणाला. ईथे मी म्हणु शकतो तान्या हा अद्नेयवादाचा प्रतिनिधी असुन अद्नेयवाद्यांच सरळ सरळ काम आहे. असेना का तो ईश्वर मला काय फ़रक पडतो, कशाला जे आपल्याला समजु शकत नाही त्याच्या मागे कशाला लागावे. म्हणजे हातच सोडुन पळत्याच्या मागे का लागावे, जसे आहे तसे जगा बस अशी सरळ साधी विचारसरणी आहे. आश्चिग मला पुर्णपणे skeptik वाटतो. या दोघांची स्पष्ट भुमिका कळाली फ़क्त ते Model वैगेरे काय ते मला अजुनही कळाले नाही त्यातुन काय निषकर्श निघाला तुम्हाला कोणाला कळले तर मलाही मराठीतुन समजुन सांगावे असो... पण मला तुमची भुमिका स्पष्ट कळाली नाही कदाचित या दोघांची सरमिसळ असावी असे वाटते. बाकी जे नुसते वादावादी साठी आलेत त्यांच्याबद्दल न बोललेले बरे. असो तुम्ही असल्याप्रकारचे विधान गम्मत म्हणुन करत असाल व त्यात वैयक्तिक वाद नसावा अशी मी निदान तुमच्याकडुन अपेक्षा करतो.
|
Aschig
| |
| Tuesday, August 21, 2007 - 2:56 am: |
| 
|
च्यायला, विश्व आणी विष्णु यातील श आणी ष वेगवेगळे आहेत. पण वेदांताच्या बादरायणाला शोभेल असाच आहे
|
Prafull
| |
| Tuesday, August 21, 2007 - 4:42 am: |
| 
|
Q. Dev Mhanje Kaay? A. God is infinity .. its the canvas in which all the events of the universe are getting unfolded. events may cease to exist and then emerge again but he remains still, unaffected. Sorry, concept of infinity is beyond my intellect but I know it exists, and thats why i believe God exists.
|
you say that the concept of infinity is beyond your intellect but you know that it exists.. isnt there a fallacy, prafulla?
|
Peshawa
| |
| Tuesday, August 21, 2007 - 6:41 pm: |
| 
|
आता देवाने जग निर्माण केले की नाही केले ? कोणाची बुद्धी प्रमाण मानावी ?>> ह्या प्रशणाच्य उत्तराला बुद्धीच प्रमाण का मानावी असा प्रषण आहे असे वाटते. पहिल्यांदा बुद्धी जगातल्या सगळ्या गोष्टि explain/understand करु शकते हा समज अंधविशास म्हणता येइल असा आहे कोणि बुद्धीचे हे सर्वसमावेशक्पण सिद्ध केले आहे का? कोणि करू शकेल का? If the axioms are changed one just gets a different system with some different rules and implications त्या न्यायने 'देवाने जग बनवले' हा axiom धरून कोणि जगत असेल तर त्याच्या system मधे ते "सत्यच" आहे. त्याच्या system मधले science/scientific methods त्या axiom मुळे प्रभावीत होणारच. त्यामुळे स्त्यासत्यता पडताळण्याच्या कसोट्याही बदलणार. त्यातून बुद्धीचा संबंध म्हत्वाने भाशेशी आहे म्हणाजे आपण जे विचर करतो ते मन्व्निर्मीत structure 'भाशा' वापरून करतो. त्यामुळे त्या structure चि limitations अपोआप बुद्धिवर येतात. असे असताना तीला प्रमाण कसे मानायचे? त्याच्याही पुधे एखादी कलपना जेंव्हा समजली किंवा कळळि असे आपण म्हणतो तेंव्हा नक्की काय होते हे कोणि सांगु शकेल का?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|