|
Radha_t
| |
| Friday, August 17, 2007 - 6:59 am: |
| 
|
त्या सेठ ना विचार ना बाबा अस का झाल तुला मागच का आठवलय म्हणुन तो काय देव आहे? की तो म्हणेल ते सगळ खर?
|
Santu
| |
| Friday, August 17, 2007 - 7:20 am: |
| 
|
तो काय देव आहे))))) राधाबाई मग तु तरि काय देव आहेस काय कि तु म्हटलेल सगळ खर. आणि राम क्रुष्ण परम हंस, विवेकांनन्द, ज्ञानेश्वर यांच्या पेक्षा तु शहाणि काय?
|
>>>>आणि राम क्रुष्ण परम हंस, विवेकांनन्द, ज्ञानेश्वर यांच्या पेक्षा तु शहाणि काय? अर्थाऽऽऽत, यात काय शन्का हे का????? (कृद्ध चेहरा हा असा ) सन्तू, "एक" पेक्षा "दीड" केव्हाही मोठ्ठा ना रे भाऊऽऽऽ? इतक कस तुझ गणित कच्च????? DDDDDDDD
|
Radha_t
| |
| Friday, August 17, 2007 - 7:49 am: |
| 
|
एक राधा आणि अर्धा लिंबू ( लिंबूटिंबू रे ) झाला की नाही दीड इतकही कस कळत नाही रे तुला?
|
चला, मेंदू पासून मेंदू, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, शहाणे, दिड शहाणे यांच्यावर आधारीत मॉडेल बनवा पाहू पटकन! नाहितर हे सर्व आहे की नाही हे कसे कळणार? ("बाप दाखव, नाहितर श्राध्द कर" असा प्रकार). भावना, मेंदूतील केमिकल रिअक्शन्स यांचा एकमेकांशी संबंध असतो. मी जे काही १ली "ढ" पर्यंत शिकले आहे त्या प्रमाणे केमिकल रिअक्शन्स ह्या सारख्याच कंडीशन्स मध्ये सारखेच रिझल्ट्स देतात. मग सर्वांची मेंदूची रचना सारखी असूनही, सारखेच संप्रेरक मेंदूत असूनही, प्रत्येकाच्या भावना, विचार वेगवेगळ्या का? चला मॉडेल बनवा! नाहीतर कोणालाही एकतर भावनाच नसतात किंवा सर्वजण परेड सारखे सारखाच विचार करतात किंवा प्रतिक्रिया देतात यापैकी एक कसे सिध्द होणार? काय करणार, युनिव्हर्सली प्रुव्ह झाले पाहिजे ना! मॉडेलिंग जमले नाही तर वारकरी बनायची शिक्षा आहे बरं का! (हि मस्करी आहे हे युनिव्हर्सली सारख्याच भावनेने लक्षात घ्यावे हि विनंती).
|
Radha_t
| |
| Friday, August 17, 2007 - 8:31 am: |
| 
|
मग सर्वांची मेंदूची रचना सारखी असूनही आता हे कोणी सांगितल? सगळ्यांच्या चेहेर्याची रचना सारखीच असते, दोन डोळे दोन कान, एक नाक त्याच्याखाली ओठ मग I-card ला फोटो कशाला लावायचा ज्याचा त्याचा? अस म्हणण्यासारखा झाल.
|
प्रत्येकाचे बाह्य रूप व स्त्री पुरुषांमध्ये रिप्रोडक्टीव्ह सिस्टीम वेगळे असते हे माहीत होते. पण आतडी, हृदय, फुफ्फूसे, मेंदू ह्यांची रचना (एबनॉर्मलिटी सोडली तर) माणसा माणसा मध्ये वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या पेशी, कार्य व आकार असतात (उदा. कोणाचे स्क्वेअर हृदय वगैरे असू शकते, कोणाच्या मेंदूतून सलायव्हा पाझरते, कोणाच्या सलायव्हरी ग्लांड मधून इन्सूलिन सिक्रीट होते) हे नव्हते हो माहित मला!. हे खरे असेल तर वेगवेगळ्या भावनांच्या सेम केमिकल रिअक्शन्सचे मॉडेल बनवायला सुरुवात झालीच असेल. आहे खरा केमिकल लोच्या!
|
Santu
| |
| Friday, August 17, 2007 - 11:00 am: |
| 
|
लिम्बु आता राधाबाईंच्या कडुन दिडकि शिकलि पाहिजे त्या शिवाय हे गणित कळायचे नाहि
|
अश्विनी ताई, प्रत्येक माणसाचे अवयव सेम असतात पण किरकोळ फरकाने केमिकल लोच्या होतो. चहा मध्ये असते काय? चहा पावडर, दूध, साखर, पाणी. पण आमच्या हिचा चहा अम्रुतासारखा लागते आणी होटेल मधला चहा बेचव! तसेच आहे हे
|
Antara
| |
| Friday, August 17, 2007 - 1:31 pm: |
| 
|
अश्विनिके, अहो चार अर्धज्ञानी लोक टाळ्या वाजवतील या असल्या मेन्दू, संप्रेरके वगैरे शब्द वापरून लिहिलेल्या पोस्त ना. वाजवू देत बापडे. पण तुम्हाला कुणी सांगितले की सगळ्यांच्या मेन्दुत सारखीच संप्रेरके सारख्याच प्रमाणात स्त्रवतात म्हणून? ते मूळ assumption च साफ़ चूक आहे. अज्ञानावर आधारित आहे. जरा गूगल वापरून पहा मेन्दुचे कार्य कसे चालते, भावना, बौद्धिक कल, वगैरे कसे ठरते, याची कारण मीमान्सा उपलब्ध आहे. इतर ज्ञानी लोकान्चे एक वाक्य : "मेन्दू अजून मेन्दू बनवू शकलेला नाही".. .. बरं मग??? 
|
Santu
| |
| Friday, August 17, 2007 - 2:06 pm: |
| 
|
अंतरा मेन्दु नाहि बाई कॉंपुटर अजुन मेन्दु बन्वु शकला नाहि असे म्हटले मी. अर्धज्ञानी काय? संप्रेरके काय? माझ्या तर समद टकुर्यावरन गेल बघ दिडकि पाठ केलि रे लिम्बु भाव आता अर्धीटकी पाठ केलि पाहिजे असे वाटते जुने अंकलपी पाठवुन दे रे भाउ
|
Chyayla
| |
| Friday, August 17, 2007 - 2:18 pm: |
| 
|
याला म्हणतात सायंटिफ़िक बुवाबाजी! म्हणजे उगीच काहीतरी शास्त्रीय भासतील असे शब्द वापरून केलेली भोंदूगिरी. अश्विनी, १०० टक्के पटतय. हा BB वाचुन तरी खात्री पटली. आधी माझा गैरसमज होता की नास्तिक (देव न मानणारे) हे विज्ञानवादी असावे पण काही व्यक्तिन्ना असणारे भुत, भविष्याचे ज्ञान कुठुन आले असावे? जसे पुनरजन्म किंवा भविष्य (नॉस्टॅडेमस चे उदा.) कस काय कळतय? या गोष्टीकडे हेतुपुर्वक दुर्लक्ष करुन ते काही नसतच अशी समजुत करवुन घेणे मला नाही वाटत की हा विज्ञानवादी दृष्टीकोण आहे. तर केवळ स्वता:ची नास्तिकवादाची समजुत तीच खरी बाकी कितीही स्पष्ट दीसत असेल तरी ते खोटेच असे काही सिद्ध करण्याचा आटापिटा दीसतोय. मला अजुन एक कळाले नाही की भावना निर्माण झाल्या म्हणुन रसायन प्रक्रिया होते की रसायन प्रक्रिया झाल्यामुळे भावना निर्माण होतात? बरे असो सगळे रसायन असुन सुद्धा असे शरीरातुन काय निघुन जाते की माणुस मृत होतो?
|
Antara
| |
| Friday, August 17, 2007 - 2:44 pm: |
| 
|
शरीरातुन काय निघुन जाते की माणुस मृत होतो? >>A person is declared dead when one of two things occurs: 1) Brain death - no barin activity / responce and/or 2) Cardiac/Respiratory arrest. i e no pulse. रसायन प्रक्रिया झाल्यामुळे भावना निर्माण होतात?>> हो होतात. आणि हेही known आहे की कोणत्या भावना निर्माण व्हायला काय कारणीभूत आहे. FYI उदा anti depression drugs उपलब्ध आहेत. तसच overactive, anxiety इ इ साठी calming medicines आहेत. (ती औषधे चांगली की वाईट तो वेगळा विषय होईल! पण अति उत्तेजना, अति नैराश्य, काळजी इ भावनांना कारणीभूत नेमके रसायन(?) माहित असून त्याला टार्गेत करणारे दुसरे औषध देण्याइतपत माहिती माणसाला आहे.) काही माणसांना भूत बविष्य कसे कळते >>>>>कितीही स्पष्ट दीसत असेल तरी ते खोटेच असे काही सिद्ध करण्याचा आटापिटा दीसतोय. >>>>> मला स्वताह ला दाखवावं कुणीही भूत बविष्य सांगून, जर बरोबर आलं तर मी मन्य करायला तयार आहे! असे खुल्ले चैलेन्ज मी आजवर अनेक लोकाना दिले पण अफ़सोस त्या क्षणी एकजात सगळे कहितरि थातुर मातुर कारण देतात, की बाबा विश्वास नसेल तर अम्हि सान्गत च नाहि भविश्य असे काहितरि. याला मी भम्पक पणा म्हणते!!
|
Asami
| |
| Friday, August 17, 2007 - 3:43 pm: |
| 
|
आधी माझा गैरसमज होता की नास्तिक (देव न मानणारे) हे विज्ञानवादी असावे >> मूळात हे ग्रुहितक बरोबर आहे का ? नास्तिक असला तर तो विज्ञानवादी असलाच पाहिजे ? किंवा आस्तिक मनुष्याची विज्ञानावर श्रद्धा असू शकत नाही का ? ह्या खरच पर्सपरविरोधी संकल्पना आहेत का ?
|
नॉस्टॅडेमस चे उदा.) नॉस्टॅडेमस यानी अत्यन्त मोघम भाषेत सर्व काही लिहिले आहे की त्यातल्या काही गोष्टीन्ची नन्तर घडलेल्या घटनान्शी सान्गड घालता येते. मी ही असे भविष्य वर्तवेन "येत्या काही वर्षानी भारताच्या द्रुष्टीनी अत्यन्त महत्वाच्या एका व्यक्तीचे अकाली निधन होयील. " आता असले मोघम विधान केल्यावर त्याला भविश्य म्हणत नाहीत.
|
अंतरा तुझ्या शेवटच्या पोस्टमधे तुझे विज्ञानाचे अज्ञान दिसते आहे त्यामुळे ती मागे घे. आधी anti depressant drugs च मेक्यानिसम समजवुन घे मग कळेल की तु काय चुक बोलते आहेस. दुसरि गोष्ट म्हणजे death ची खरी definition म्हणजे जेन्व्हा EEG आणि ECG काम करणे बंद करतात. तु दिलेली आणि मी दिलेली definition सारखी वाटते पण थोडा technical फ़रक आहे. मुद्दा हा आहे की हृदय आणि मेंदु काम करण का सोडतो??ते विज्ञानाला अजुनहि न समजल्याने सध्याची मृत्युची definition ही अचुक नाहि. अश्विनिचा मुद्दा काही हिणवण्यासारखा नाहि. अगदि बरोबर मुद्दा आहे की आपण इतके वेगवेगळे का आहोत. उत्तर असे आहे की आपले DNA ,RNA यामध्दे वेगवेगळे sequences असतात त्यामुळे आपण वेगवेगळे आहोत,तसेच इतरहि कारणे आहेत. पण तरिहि भावनांबाबत हे अजुन सिध्द झालेले नाहि कारण त्या बाह्यपरिस्थितिंवर अवलंबुन असतात. यात चुक अशी की आपण non living पासुन living झालो हे विज्ञानाचे मत चुकिचे आहे. त्यामुळे DNA RNA वेगळे का असतात सर्वांना हे explain होउ शकत नाहि. , technically होउ शकतात्त पण याचे खरे कारण गवसलेले नाहि. स्लार्ती, अहो सगळ्या भावना express करण्यासारख्या नसतात. काहि वेळा कुणाला dull वाटते म्हणुन जगात कोणिच रडत बसत नाहि. असो. आध्यात्मिक अनुभव हे काहि भावना नाहित. मि फ़क्त एक उदाहरण दिले होते ज्या द्वारे हे सिध्द होते की अशिगचे वक्तव्य चुकिचे होते. त्यानी त्याचे चुकिचे वक्तव्य defend करणे ठिक आहे पण तुम्ही त्या 'चुकिच्या' विधानासाठी कशाला खटाटोप करत आहात?? regression therapy ही पुर्वजन्माच्या अनुभवांवर आधारित आहे त्यामुळे इतर काही कारने असण्याची शक्यता नाहि. पुनर्जन्म असु शकतो (आहेच अस नाहि) हे तरि मान्य करा. तुम्ही लोक म्हणालात की 'पुनर्जन्म आहे यावर विश्वास बसेल इतके पुरावे नाहित मात्र जितके आहेत त्यावरुन शक्यता नाकारता येत नाहि' तरि हरकत नाहि. पण नाहि म्हणजे नाहिच हे जे तुम्ही लोक अडुन बसलेला आहात ते बुध्दीप्रामाण्यवादाला धरुन नाहि
|
आधी anti depressant drugs च मेक्यानिसम समजवुन घे मग कळेल की तु काय चुक बोलते आहेस. जरा समजावाल का यात चुक अशी की आपण non living पासुन living झालो हे विज्ञानाचे मत चुकिचे आहे. जरा स्पष्ट कराल
|
Aschig
| |
| Friday, August 17, 2007 - 9:27 pm: |
| 
|
On the one hand, things should be universal to be true. On the other, they should be completely personal, or rather , internalised. You should go with something because you can convince yourself about it (slightly different from belief) - about something being true through your reasoning and understanding, and not because some tukaram, or vivekanand, or stevenson, or einstein or galileo says so. That is the only necessary and sufficient condition. After all, what else matters?
|
बुद्धाची थेअरी निरिश्वरवादी आहे. पण त्यामध्ये पुनर्जन्म मानलेला आहे. तसेच पुनर्जन्म असला तरी देव आहे हे सिद्ध होत नाही किंवा इथे कुठेही त्याप्रमाणे युक्तिवाद मांडलेला दिसत नाही. मला वाटते हा मुद्दा माझ्या त्या लांबलचक पोस्ट पासुन सुरु झाला जिथे मी मृत्यु-अनिश्चितता-कुतुहल इत्यादी बद्दल लिहिले होते. तुम्हा लोकांनी कॉंटेक्स्ट सोडुन भलत्याच मुद्यावर भांडण सुरु केले. तिथे मी मृत्युनंतर आपले वर्तमान अस्तित्व संपते असा मुद्दा मांडला होता. समजा असे मानले की आपण पुनर्जन्म घेतो तरी जे चालु (करंट) आयुष्य आहे ते तिथे संपते हे तरी नक्की. ते संपण्याबरोबरच आपण जे जे काही केलेले असते, आपले आप्तस्वकीय, साठवलेली संपत्ती ई.ई. त्या क्षणाला या आयुष्याच्या संदर्भात इर्रेलिवंट होते. आणि त्यानंतर काय ही एक अतिशय टिपिकल अनिश्चितता येते असा माझा युक्तिवाद होता. मी अशी आशा करतो की चर्चा परत पुळ मुद्यावर यावी. आशीश मी सहसा "वा मस्तच रे.. अमुक अमुक यांना धन्यवाद.. सही सिक्सर मारला" अश्या पोस्ट टाकत नाही. कारण माझ्या मते आपण इथे लॉबींग करत नसुन वैयक्तिक मते मांडतो आहोत. तरी राहवले नाहे म्हणुन, तुझे शेवटचे वाक्य सही होते. After all, what else matters?
|
तुम्हा लोकांनी कॉंटेक्स्ट सोडुन भलत्याच मुद्यावर भांडण सुरु केले>>
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|