|
Ashwini_k
| |
| Thursday, August 09, 2007 - 5:09 am: |
| 
|
विज्ञानाची प्रगती आवश्यकच आहे. ती कोणीच नाकारत नाही. उलट खरा बुध्दीवादी शोधक प्रवृत्तीचाच असतो. विविध कारणांनी तो अनेक गोष्टींच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न करतो तेव्हा शोध लागतात (सी.एफ़.सी. चा शोध लागला पण त्याचे ग्लोबल वार्मिंगमधले कॉन्ट्रिब्यूशन पाहिल्यावर त्याला सब्स्टीटुट शोधण्याची गरज पडली). पण त्यापलिकडे जे आहे ते कोणी प्रामाणिकपणे मान्य करतो, कोणी शेवटपर्यंत मान्य करत नाही. इथे मी एक पाहिले, की, तथाकथीत बुध्दीवाद्यांना वाटते की देव, भक्ती यावर विश्वास ठेवणारे म्हणजे अडाणी, विज्ञानशी काही देणेघेणे नसणारे. पण सुनिता विल्यम्सदेखिल अंतराळात गणपती व भगवदगीता घेऊन गेली होती. तीने ते काय शोपीस म्हणून नेले होते काय? कोणी कितीही बुध्दीचा अहंकार दाखवला तरी सगळे फ़ोर्सेस ज्यांना माणसाने शोध लावल्यानंतर विविध नावे दिली, ते "त्या"च्याच कंट्रोल मध्ये आहेत. मला पण संत कबिरांची रचना आठवली हरिसे कोई नही बडा दिवाने, क्यू गफ़लत में पडा
|
Ashwini_k
| |
| Thursday, August 09, 2007 - 5:43 am: |
| 
|
मुन्नाभाईने दिवसरात्र न झोपता एकच गोष्ट केली त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. समर्थांनी त्यांच्या प्रत्येक कृती, मग ते समाज जागृती असो किंवा लिखाण असो किंवा बलसंवर्धन असो, डोके ठिकाणावर ठेऊन (श्रीरामा, मला क्षमा करा, नको नको ते शब्द वापरावे लागत आहेत) भक्ती केली. ----- भक्तीची ढाल म्हटले तरी चालेल. तेही कवच (शॉक एब्सॉर्बर) आहे. ------ संतांनी कधीही चुकांवर कसलेही पांघरुण घातले नाही. त्यांचे वागणे आदर्श असे.
|
Radha_t
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:55 am: |
| 
|
मुन्नाभाईने दिवसरात्र न झोपता एकच गोष्ट केली त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. पण एक गांधी दर्शन सोडल तर मुन्नाभाईच्या इतर कुठल्याही वागण्यातून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल अस कुणालाही वाटत नव्हत. मला जे भावावस्था = केमिकल लोच्या, अशी एक शक्यता आहे अस म्हणायचय, ते समजतय का? कारण सगुण किंवा निर्गुण देव दर्शन कसा देतो आणि तो एखाद्यालाच का दिसतो याच logical/scietific उत्तर शोधण्याचा छोटासा प्रयत्न बाकी संत देवाच्या भक्ती मधे वेडे झाले होते हे तर सगळ्यांनाच मान्य असेल. फक्त त्यांना मनोरुग्ण हा शब्द वापरला जात नाही. आणि संतांची आणि मुन्नाभाईची बरोबरी किंवा संतांची हेटाळणी करण्याचा उद्देश बिलकुल नाही
|
Ashwini_k
| |
| Thursday, August 09, 2007 - 7:25 am: |
| 
|
मुन्नाभाई लायब्ररीत सतत वाचत बसला, तोही रात्रंदिवस, तेही तेन्शन मध्ये त्याचाच परिणाम त्याच्या डोक्यावर झाला. कालांतराने तो परिणाम फ़ेड झाला. त्याच्या आधी तो नॉर्मलच होता. संतांची तशी अवस्था नव्हती. ते नेहमीच नॉर्मल होते. फ़रक लक्षात येतो आहे का तुम्हाला? संत वेडे होते? आपल्याला कपड्यांचे, सिनेमाचे, एखाद्या व्यक्तीचेहि वेड असते म्हणजे आपण इनसेन असतो का? नाही. आपल्याला त्या गोष्टीची आवड असते, प्रेम असते (इंटेन्सिटी व्यक्तीनुसार कमी जास्त असते). त्याप्रमाणेच संताना (संतानाच का? सामान्य लोकांनाही) त्या भगवंताचे (ज्याच्यापासून आपण सर्व निर्माण झालो) वेड (अतीव प्रेम) असते. सगळ्यांना नाही हो देव दिसत. संत तुकडोजी महाराजांचा अभंग आठवला मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव (इथे, दिस) - देव बाजारचा भाजीपाला नाही रं देव अशाने पावायचा (दिसायचा) नाही रं
|
Radha_t
| |
| Thursday, August 09, 2007 - 7:54 am: |
| 
|
सगळ्यांना नाही हो देव दिसत. या BB वरील किती भक्तांना देव दिसला? त्यांनी हात वर करा. आणि कुठल्या रुपात दिसला कसा दिसला यावर उद्या एक निबंध लिहून आणा.
|
>>>> त्यांनी हात वर करा. मी केला हात वर! मला सगुणरुपात देवी दिसली! (देव विचारल होत, देवी नाही, अस म्हणु नका प्लीज ) निराकार स्वरुपात ठाई ठाई जाणवला...! तो माझ्या पाठीशी सदैव आहे हे ही अनेकवार कळले! हे तेव्हाच कळते जेव्हा माणुस अनाकलनिय सन्कटात सापडतो अन त्यातुन वाचतोही! अर्थात वाचण ते स्वकर्तुत्व किन्वा योगायोगाचा भाग अस समजत नाही तोवरच! बर, हात वर केला, आता पुढ काय????? निबन्ध लिहून आणू???? अन तो तूऽऽऽ तपासणार?????? DDD
|
Ashwini_k
| |
| Thursday, August 09, 2007 - 8:38 am: |
| 
|
नंदिनी, हात वर कर! मी तुझा "विठ्ठल तो आला आला" लेख मायबोलीवर नुकताच वाचला. छान आहे. राधा, नंदिनीची परवानगी असेल तर तू त्याच लेखाला निबंध समज पाहू. माझे म्हणशील तर मला विविध प्रकारे देव भेटला गं! पण माझ्याकडे नंदिनी सारखी प्रतिभा नाही. मला या मार्गावर जमेल तेवढे पुढे जायचे आहे. वाटेत "त्या"चे अस्तित्व जाणवत राहीले तरी त्या ठिकाणी गुंतून वाटचाल थांबवण्यापेक्षा "त्या"चे बोट धरून पुढे जायचे आहे. खंडाळा घाट कितीही सुंदर असला तरी पुण्यास जायचे तर मार्ग तोच असला तरी पुढे सरकले तरच पूणे येणार ना?
|
Ashwini_k
| |
| Thursday, August 09, 2007 - 8:50 am: |
| 
|
लिंबू, तुला राधा (रखुमाईचे भक्तीरुप) देवी तर नाही दिसली? तू तो दात काढून हसणारा व खदाखदा हसणारा स्मायली कसा काढतोस?
|
>>>> तुला राधा (रखुमाईचे भक्तीरुप) देवी तर नाही दिसली? \ clipart{lol} \ clipart{proud} \ clipart{biggrin}
त्या स्लॅश अन क्लिप आर्ट मधली स्पेस काढुन टाइप कर! देवी कोल्हापुरची अम्बाबाई अन तुळजाभवानी दिसल्या होत्या, मागे कुठ तरी मी लिहिल पण होत! हनुमानाच ध्यान मात्र तस करु शकलो नाही, खर तर केल नाही कारण झेपेल की नाही याची शन्का होती! गणेशाच दर्शन मात्र स्वप्नात झाल हे! (आता लोक म्हणतात की जे दिवसभर मनात बालगता तेच स्वप्नात दिस्त! अहो पण तस अस्त तर शिन्ची ती "रायान्ची ऐश्वर्या" का कधीच दिसली नाही स्वप्नात????? भक्ती कमी पडली का माझी????) अनेक देवस्थाने, खास करुन शन्कराची पिन्ड, त्या त्या ठिकाणी जायच्या विचार देखिल केला नसताना आधीच स्वप्नात दिसली हेत! लिम्ब्या, क्षणभर खर मानल की तुला देव दिसला, पण यातुन तुला मिळाल काय? असा प्रश्न बरेच विचारतील, पण मी देवाचे दर्शन काही मिळविण्याकरीता मागण्याकरीता अपेक्षित नव्हतोच, किम्बहुना मागा मागीच करायची तर देवानी ही सृष्टी अन त्यात कोट्यावधी जन्ता बनवुन ठेवलीच हे की, आधी त्यान्ना टेस्ट करा, मग जा देवाकडे! माझ म्हणण अस होत की मी सन्कटात हे, तू वेळेत येत नाहीस मदतीला, तर किमान तू आहेस हे तरी दाखवुन दे म्हन्जे मला धीर राहील की तू आहेस तर माझ वाकड होणार नाही! (अर्थात नन्तर हेही कबुल करावच लागल की वेळेला माझ्या नकळतच देव माझ्या पाठीशी सदैवच हे!) कोण तरी म्हणुन गेलय, समयसे पहिले और भाग्यसे अधिक कुछ नही मिलता!
|
या BB वरील किती भक्तांना देव दिसला? त्यांनी हात वर करा. आणि कुठल्या रुपात दिसला कसा दिसला यावर उद्या एक निबंध लिहून आणा >>>>>> राधा, देव दिसला यापेक्षा कितीजणाना देवाचा अनुभव झाला हे विचार. खूप लोक भेटतील. याच बीबीवर कितीतरी जण भेटतील, माझा विठ्ठल तो आला आला हा लेख मी २१व्या वर्षी लिहीला होता. आणि त्यानंतरही मला देव भेटत राहिलेला आहे. पंढरपूर कशाला, मुंबईत भेटलाय, देवळात नव्हे तर रस्त्यावर. (माझा तोही अनुभव मी नक्की लिहेन, तेव्हा तू तो तपास आणि खुश्शाल माझ्या "कल्पनाविस्ताराला" नापास कर. )
|
शी!!!!एव्हढी मोठि १ तास लिहिलेलि पोस्ट गेली. sorry परत नाही लिहु शकत सगळ.
|
Ashwini_k
| |
| Thursday, August 09, 2007 - 11:36 am: |
| 
|
चिन्या, लिही रे लिही परत. आधीपेक्षा छान लिहीशील बघ!
|
Slarti
| |
| Thursday, August 09, 2007 - 3:11 pm: |
| 
|
>>> हनुमानाच ध्यान मात्र तस करु शकलो नाही, खर तर केल नाही कारण झेपेल की नाही याची शन्का होती! ध्यान झेपणे म्हणजे नक्की काय ?
|
अश्विनि, नको परत काय तेच लिहायच. तुम्हि उत्तर देतच आहात की. तरि थोडक्यात लिहितो. हात वर. निबंध नाहि लिहिणार पण(मला स्वत्:ची खिल्लि उडवुन घ्यायचि इच्छा नाहि) मुन्नाभाइ एक पिक्चर होता त्यामुळे त्याच्यात जितक दाखवल आहे तित्कच खया hallucination मधे असत अस नाहि. अशीग, नद्या आणि समुद्राच्या उदाहरणात तुझे G1,G2 काय म्हणतात??शिवाय आपण मायेने cover झालेले आहोत म्हणुन वेगवेगळे आहोत याबद्दल मत काय?? शेन्डेन संतांच्या मार्गाने गेल्यास त्यांनी सांगितलेला मार्ग बरोबर होता हे कळते म्हणुन त्याचा स्विकार करतो आम्हि तन्या या फ़्रेम ऑफ़ रेफ़ेरन्स वगैरेचा विचार करतच तु जगतोस का? रचना, तु किति धर्मग्रंथ वाचले आहेत??आम्हाला तर सगळे ग्रंथ एकच गोष्ट सांगतात असे वाटत नाहि. पारायण नाहि करायला आवडत तर नको करु. तो काहि नियम नाहि
|
Aschig
| |
| Thursday, August 09, 2007 - 6:51 pm: |
| 
|
चिन्या, मायेनी covered असो वा अजुन कशाने, जर I == GOD हे लागु नसेल तर मग ते model G3 (अद्वैतवाद) नसुन दुसरे कोणतेतरी बनते ( G1, G2, G4 etc. ) आणि मग त्याचा विचार करावा लागतो. नद्या-नाले हे एक नसतात. त्यांचा flow, salinity, pH हे वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे, जर नदी नं १ == समुद्र असे मानले, आणी नदी नं २ == समुद्र असे मानले, आणी म्हंटले की आमच्या चंद्रपुरची छोटी इरा == वाराणसीची गंगा, त्यामुळे तिर्थयात्रेला जायची गरज नाही, इरेचेच पाणी प्या, तर कोणत्या आईचा भक्त तुमचे ऐकेल?
|
पण सुनिता विल्यम्सदेखिल अंतराळात गणपती व भगवदगीता घेऊन गेली होती. तीने ते काय शोपीस म्हणून नेले होते काय? हा मुद्दा सहज खोडून काढण्यासारखा आहे. लिम्बूटिम्बू, तुमची तपस्या नक्किच कमी पडली. कालच ऐश्वर्या माझ्या स्वप्नात आली होती.
|
अश्विनि, इथे जे देव न मानणारे अथवा अज्ञेयवादी आहेत, ते देव मानणार्यांना अडाणी वगैरे समजत नाहीयेत. नाहीतर इतकी चर्चाच कशाला झाली असती. उलटे जर तु काळजीपूर्वक पाहीलेस तर (उदा. तुमच्या स्वतःच्या पोस्ट्स) देव मानणारे ठाम आहेत की देव आहेच. या बद्दल दुमत नाहीच. त्यांच्या दृष्टीने देव न मानणारे नादान आहेत. हा दृष्टीकोण केवळ ह्याच फोरमवर नाही, बाहेर सुद्धा येतो. तु काळजीपूर्वक पाहिलेस तर आम्हा लोकांचा दृष्टीकोण हा ज्ञान वाढत जाते, प्रगती होत राहते असा आहे. आणि त्यामुळे कालच्या कल्पना, संदर्भ आज लागु होतातच असे आम्ही मानत नाही. आज ज्या संकल्पना आहेत चूक असु शकतात, इन फॅक्ट त्या संपूर्णपणे बरोबर आहेत अशी आमची मुळीच समजूत नाही. पण आज आपल्याला संपूर्ण ज्ञान नाही म्हणुन कुणालातरी ते आहे, कुणीतरी सर्व शक्तिमान आहे अशी स्वतःची समजूत करुन घेत नाही. थोरांनी सांगितले, आई-वडीलांनी सांगितले, संतांनी सांगितले आणि मुख्य म्हणजे बहुसंख्य तसे म्हणतात म्हणुन ती गोष्ट खरीच असेल असे आम्ही मानत नाही. hope i have cleared your misconception. चिन्या, मी फक्त फ्रेम ऑफ़ रेफरंसचा विचार करत जगत नाही. किंवा मी जन्मतःच ही संकल्पना शिकुन आलो असे नाही. पण मी जे काही वाचले, चर्चा केल्या, हिंडलो-फिरलो, सामजिक संघटनांमध्ये काम केले त्यातुन मी शिकत राहिलो.. शिकतो आहे.. (आपले, पाश्चिमात्य ई.ई... माझी आपले तत्वज्ञान टाकावु आणि पाश्चिमात्य श्रेष्ठ अशी काही कल्पना नाहीये.. पण देव ही संकल्पना आणि धर्म व संस्कृती ह्या माझ्या सृष्टीने दोन भिन्न गोष्टी आहेत..) इतर अनेक उद्योग करतो. ते ह्या चर्चेशी निगडीत नाहीत.
|
कोणी कितीही बुध्दीचा अहंकार दाखवला तरी सगळे फ़ोर्सेस ज्यांना माणसाने शोध लावल्यानंतर विविध नावे दिली, ते "त्या"च्याच कंट्रोल मध्ये आहेत. "त्या"च्याच कशावरून "तिच्या" का नाही? दोन वर्षान्पुर्वी अमेरिकेत एका खाणीत बारा कामगार अडकून पडली. त्याना वाचविण्याचे रेस्क्यू वर्कर्स नी अहोरात्र परिश्रम केले. शेवटी फक्त एकालाच वाचविण्यात त्याना यश आले. आणी त्या वाचलेल्या माणसाला ही मेन्दूला जबर दुखपत झालेली आहे. त्याना वाचविण्याचे प्रयत्न सुरु होते तेव्हा बरेच नातेवाईक चर्च मध्ये अहोरात्र प्रार्थना करीत होते. त्या वाचलेल्या एका माणसाच्या नातेवाईकानी देवाला श्रेय दिले आणी आभार मानले. वाचलेल्या एका माणसाचे श्रेय जर देवाला जाते तर गेलेल्या अकरा माणसाचा दोष त्याच्या वर का नाही?
|
Radha_t
| |
| Friday, August 10, 2007 - 5:20 am: |
| 
|
गेलेल्या अकरा माणसाचा दोष त्याच्या वर का नाही त्यांनी या किंवा मागच्या जन्मी काही तरी पापं केली असतील. किंवा सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद नाकारून ते खाणीत शिरले असतील "त्या"च्याच कशावरून "तिच्या" का नाही? निराकार रे बाबा निराकार. तो / ती कुठल्याही रूपात असू शकते येऊ शकते, दर्शन देऊ शकते. तिला / त्याला वास घेता येत नाही ऐकू येत नाही त्याला कुणीच जाळु शकत नाही उचलू शकत नाही तोडु शकत नाही पाहू शकत नाही except भावावस्था. भावावस्था म्हणजे केमिकल लोच्या नाही. काय गम्मत आहे नाही त्याला रूप नाही आकार नाही, कुठल्याही संवेदना होत नाहीत, मग आपण बोललेल कस कळत? मनातल्या मनात नामस्मरण केलेल कस कळत? त्याला मेन्दू आहे का? डोळे आहेत का? कान आहेत का? मग ऐकू कस येत? दिसत कस? तो विचार कसा करतो? सगळ्यांचे पाप पुण्याचे हिशेब कसे आणि कुठे ठेवतो? त्याच्याकडे सतत वाढत रहाणारी memory आहे का? मेंदू तर माणसाला आहे म्हणुन तो विचार करू शकतो, लक्षात ठेऊ शकतो, डोळे तर माणसाला आहेत म्हणुन तो बघू शकतो नाही तर झाडे कुठे काय बघू शकतात? ऐकू शकतात? त्याला स्नायू आहेत का? ताकद कुठे असते? वार्याची ताकद वाफेची ताकद, चंद्र सूर्यांची ताकद अणू रेणूंची ताकद सुद्धा कळते पण ज्याला आकार उकार नाही त्याची ताकद कशी असते? झक्कींच म्हणण बुद्धीला पटत, देव हा काल्पनीक आहे.
|
राधाजीच्या सर्व पोस्ट जर सलग वाचत गेल्या तर एक वेगळी मजा येते. एकदा त्या म्हणतात देव असेलही. मग तो नाहीच आहे. , मग त्याना चैतन्य हे देव वाटायला लागतं. मग त्या म्हणतात की त्या दोन नावेत स्वार झाल्या आहेत. कधी संताना त्या "मनोरूग्ण" मानतात तर कधी मुन्नाभाई आणि संत रामदास याची तुलना कशी होईल हे व्विचारतात. मग अचानक त्या मास्तरीणीसारखा निबंध लिहायला सांगतात पण माझ्या अनुभवाबद्दल काहीच बोलत नाहीत (जो आधीच लिहिलेला आहे). मग त्याना कधी मझं म्हणणं पटतं कधी समीरचं तर कधी झक्कीकाकाचं. केमिकल लोच्याबद्दल आपण काहीतरी म्हणत होतात ना?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|