|
Peshawa
| |
| Friday, August 03, 2007 - 3:10 am: |
| 
|
>>>1. It is based on evidences and logic. Agreed! However, logic and evidences can not be provided in a finite known system for something that requires more information than the system can provide. So it can safely be said that given the state of science it can not be infered/proved whether actually god exists or not. but science is THE tool to find the answer of the question whether there is god or not. It allowes us to discard chaff from grain. If at all s/he/it exists someone in future will be able to prove it using science ONLY! Read this: LimitsOfLogic
|
Radha_t
| |
| Friday, August 03, 2007 - 6:03 am: |
| 
|
Nandini2911 तुम्हाला आतापर्यंत कुणी हीन लेखलेलं मी वाचलेलं नाही बरोबर आहे तुम्ही वाचलेल नाही. कारण तो BB त्या posts आता नसतीलही. पण मी त्याच नाव सुद्धा सांगायला तयार आहे. waakaDyaa असा त्याचा id आहे. त्याने मला नाही पण देव न मानणार्यांना वाईट समजल जाईल अस काहिस post केल होत. तिथूनच, श्रद्धा असावी की नसावी, देव आहे की नाही आणि शेवटी देव म्हणजे काय ही चर्चा सुरू झाली होती.
|
झक्की काका, मी रजनीश वगैरेची भक्त नाही. पण खूप दिवसापूर्वी मी लायब्ररीतून आणलेलं एक पुस्तक वाचलं होतं. त्याम्धे देव आणि मानव याच्या नात्याचा खूप विचार केला होता. त्यातलाच वरील एक मुद्दा होता. राधाजी, कुणी आक्षेपार्ह पोस्ट लिहिलं म्हणून सर्वानाच "तुम्ही" कुत्सितपणे लिहिणं बरोबर आहे का? माफ़ करा. पण तुमच्या कुत्सित आणि खडूस पोस्ट्स बर्याच वाचल्या आहेत. तुम्ही देव मानत नाही हे समजल्यानंतर "देव कसा आहे?" या प्रश्नवर तुम्ही चर्चा करण्याचे कारणच काय? नाही ना त्याचे अस्तित्व... मग विषयच मिटला ना. ज्याच्यासाठी देव आहे, अर्था आस्तिक लोकासाठी... काय गरज आहे त्याचं अस्तित्व सिद्ध करण्याची. नाक बंद असलेल्या माणसाला तुम्ही हा बघ मोगर्याचा सुवास आणि ही बघ गटारातली दुर्गंधी असं सांगू शकता का? सांगितलं तरी त्याचं नाक बंद असल्यामुळे तो का मानेल की सुगंध अथवा दुर्गंध आहे. ही ज्याची त्याने घ्यायची अनुभूती आहे. नास्तिक लोक त्याच्या बुद्धीप्रामाण्यवादाचा अनुभव घेतील. आपण आपल्या "देव" असल्याचा अनुभव घेणारे. "देव" ही mythological , spiritual , cultural, scientific संकल्पना आहे, एका कन्सेप्टचा दुसरीकडे वापर केल्यास वरच्या चर्चेसारखा घोळ होतो. मला एक दोन मुद्दे लिहायचे आहेत. वेळ मिळाला की नक्की लिहीन,
|
Radha_t
| |
| Friday, August 03, 2007 - 8:17 am: |
| 
|
नंदिनीजी, जर तुम्ही मझ्या आधिच्या post वाचल्या असतील तर तर तुमच्या हे लक्ष्यात यायला हव होतं. की जगात सर्वत्र जे चैतन्य आहे, आपल्या बुद्धीपलिकडच कही तरी आहे, आपल्या अवाक्याबाहेरचही काही तरी आहे, त्यालाच जर देव मानल जात असेल मी काय ते मानू नका अस म्हणत नाही. ठीक आहे काही तरी आहे. आता त्याल तुम्ही देव अस नाव दिलत. पण त्याच्या विषयी भावनाच का असल्या पहिजेत? त्याची भक्ति करुन अस काय मिळत ते जाणून घ्यायचा प्रयत्न मी करत आहे. झक्कींच देव म्हणजे कल्पनाविलास हे म्हणण मला पटत. देव म्हणाजे काय ह्याच्या आपापल्या संकल्पना मांडायचा माझ्या मते इथे सर्वांनाच अधिकार आहे. देव असेलही. माझ्या मते या जगातले चैतन्य म्हणजेच देव आहे. फक्त तो ढगावर किंवा समुद्रात बसलेला किंवा कुणाची घोडागाडी हाकणारा नसावा अस मला वाटत आणि ते मी इथे सांगायचा प्रयत्न करीत आहे. माणासातल्या माणुसिकला मी देव म्हणते दगडाच्या किंवा धातूच्या मुर्तीला नाही. राहिली गोष्ट कुस्तीत बोलण्याची. तर मी देव नाही मला कुणी हिणवून बोलल की लगेच तशाश तसेच उत्तर देते. मी कुस्तित बोललेल तुम्हाला दिसल पण मला कुत्सित बोललेल तुम्हाला दिसल नसाव, किंवा कदाचीत ते तुमचे प्रियजन असावेत. ही चर्चा पुढे आपल्या दोघिंच्यात वैयक्तीक पातळीवर जाण्या आधी बंद व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. दुसरी गोष्ट मी जे काय post करते ते जर आक्षेपार्ह असेल तर mods माझी कान ऊघडणी करतील माझ्या post बद्दल किंवा माझ्या लिहिण्याच्या शैलिवर चर्चा करण्याची ही जागा नव्हे. मी मांडलेले मुद्दे ( अर्थात तुम्हाला ते मुद्दे वाटत असतील तर ) ते तुम्ही जरूर खुडून काढा. मी मझ्या लिखाणामधे कधीही कुणालाही वैयक्तीक पातळीवर किंवा वैयक्तीक बाबींवर काहिही बोलले नसावी unless initiated from other side "देव कसा आहे?" या प्रश्नवर तुम्ही चर्चा करण्याचे कारणच काय? मी कधी कुठे काय करायच हे ठरवणार्या तुम्ही कोण? ( हे कुत्सीत आहे हे मला मान्य आहे )
|
राधाजी, काही गोष्टीचे स्पष्टीकरण आधीच देते. मी वैयक्तिक रीत्या तुम्हाला उद्देशून पोस्ट लिहीली नव्हती, तुम्ही लिहीईत. आणि इथे माझे कुणीही प्रियजन नाहीत. त्यामुळे ते दोन मुद्दे निकालात निघाले. देव असेलही. माझ्या मते या जगातले चैतन्य म्हणजेच देव आहे. फक्त तो ढगावर किंवा समुद्रात बसलेला किंवा कुणाची घोडागाडी हाकणारा नसावा अस मला वाटत आणि ते मी इथे सांगायचा प्रयत्न करीत आहे. माणासातल्या माणुसिकला मी देव म्हणते दगडाच्या किंवा धातूच्या मुर्तीला नाही. >>>>>>>>>>>> देव म्हणजे चैतन्य हे मलाही पटतं. देव असेलही... हा विचार गडबडीचा आहे. एकदा ठरवा, देव आहे की नाही. असला तर मान्य करा, आणि तो नसला तर तेही मान्य करा. देवाविषयी तुमचा एक घोळ झालेला आहे. "देव" हा फ़क्त ढगात, समुद्रात किंवा घोडागाडी हाकत बसलेला नाही. हे त्याचं एक रूप आहे. आपण आपल्याला समजण्यासाठी. तो अनादी अनंत आहे. त्याला सुरुवात नाही अंत नाही. तो सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी. आणि दिसत नाही, त्याचा नुभव घ्यावा लागतो. ही माझे "वैयक्तिक" मत आहे. कारण मला देव असा भेटला आहे. "देव" नाही हे म्हणणार्याच्या मताचा मला आदर आहे. मत पटत नसलंतरी ते चुकीचं आहे हे मी म्हणत नाही. तुम्ही कधीही कुठेहा काहीही लिहा, (माझ्यावर वैयक्तिक रीत्या लिहिलंत तरी मला फ़रक पडत नाही.) पण इथे मला देवाविषयीचे माझे विचार मांडायचे आहेत. तरी आपण आपला आपापसातला संवाद जरा थांबवूया. ठीक आहे??
|
अशीग,श्रीमद भागवतम हे गीतेच interpretation नसुन तो एक स्वतंत्र ग्रंथ आहे. त्याला भागवतपुराण पण म्हणतात. १८००० श्लोकांचा विराट ग्रंथ आहे हा. त्याला वेदांत सुत्रांची भक्ति commentary म्हटले जाते. श्लोक आज लिहितो. परमाणु अमर्याद नाहित??युनिव्हर्स अमर्याद आहे अस तुमच सायन्स म्हणत.जर ते अमर्याद असेल तर त्यातिल matter अमर्याद आहे आणि जर matter अमर्याद आहे तर परमाणु मर्यादित कसे झाले???दुसरि गोष्ट omniscient या शब्दाच्या चर्चेच्या वेळि लॉजिशिअन म्हणाले होते की मला आधी हे दाखवा की जगातिल ज्ञान मर्यादित आहे, मग दाखवा की कोणाला ते माहित आहे तरच मी मान्य करिल की सर्व ज्ञान असलेला कोणी आहे. मग मीही अस म्हणु शकतो की जीवांची संख्या किति आहे ते सांगा मगच मी मानेल की ते अमर्याद नाहित. मग देवाच्या बाबतित आणि इतर गोष्टींमधे standards वेगळे का?? ते G1,G2 काय ते तुच बघ बाबा!!मागे मी अद्वैतवादाच्या मॉडेलच्या वेळि प्रश्न विचारले होते त्यांचे अजुन तु उत्तर दिलेले नाहित. शिवाय अद्वैतवादाची नदी पाण्याशी केलेली comparism बद्दल काय वाटले?? स्लार्ती, 1. It is based on evidences and logic. 2. More importantly, all the evidence that is coming out of research fits into this theory. This is an ongoing process merely knowing the structure cann't prove that u know how it was formed in the beginning.it is not based on evidences!!we can create hundreds of chemicals etc. in the lab . similarly amino acids r created.as i have said earlier there is nothin gr8 in it.what logic is behind that??isn't it more logical 2 say that 'life comes from life'??so as we see life always comes from life , our view that life on this planet came from another life 'God' is far more logical than ur viewpoint.u have written that this is ongoing process.then how can u jump to conclusion ??u must wait till the time this process comes 2 an end and gives u evidences??till that time arrives,u r havin faith in that theory. as u think that evidences n logic justifies ur belief in that theory i can say that my spiritual experiences justifies my faith in God. तुम्ही स्वत्: प्रामाणिकपणा दाखवा आणि मान्य करा की शास्त्रज्ञ म्हणतात ते तुम्ही आंधळेपणानी accept करता. शेन्डेन मी अस नाही म्हटल की कुठल्यातरि जन्मी शिक्षा भोगावी लागेल. या जन्मीसुध्दा शिक्षा होऊ शकते. दुसर म्हणजे एकाच वेळी स्वातंत्र्य आणि कंट्रोल कस होत हे समजण्यास अवघड आहे. मी परत कधीतरी समजवायचा प्रयत्न करेन. सरकार अशी शिक्षा करेल याला कारण काय??कारण सरकारला, पंतप्रधानाला एक भिती असते की अस माझ्या नावानी काही झाल तर माझ नाव खराब होईल,माझ सरकार जाईल,काही केल नाही तर समाजात अराजक माजेल इत्यादी. पण मी लिहिल्याप्रमाणे देवाला यापैकी कोणतिच भिति नाही, त्यामुळे देव अस करत नाहि. जर देव सर्वांसमोर येउन उभा राहिला आणि सांगितल की मी असाच युगानुयुग इथे चौकिदाराच काम करणार आहे तर मग या नश्वर जगाचा उपयोगच काय??शेवटी हे जग आणि यातिल गोष्टी ही सर्व त्याची एक लीला आहे.जर नास्तिकांनाही देव दिसु लागला तर मग तो मिळवण्यासाठि आयुष्यभर प्रयत्न करणार्या लोकांबरोबर तो अन्याय नाही का होणार? पेशवा, नंदिनि झकी अनुमोदन!
|
Ashwini_k
| |
| Friday, August 03, 2007 - 10:01 am: |
| 
|
राधा, तो बुद्धीच्या पलिकडे आहे हे माहीत असूनही एखाद्याला त्याचे अस्तित्व सिद्ध करायचे असेल तर? - म्हटले तर सिध्द करायची गरज नाही. सिद्ध करता येणारही नाही कारण त्यासाठी जी बुध्दी लागेल त्याच्याही पलिकडला "तो" आहे. तो फ़क्त ज्याचा त्याला अनुभवता येतो. त्याचे अस्तित्व आक्रुत्या काढून दाखवणे जसे शक्य नाही तसेच आक्रुत्या काढून "तो" नाही हे दाखवायचा आटापिटा करणे हे हास्यास्पद आहे. ------- तसच दुसर्या बाजूनेहि, बुद्धीच्या पलिकडेही काहीतरी आहे हे माहित असूनही ते अमान्य करायचे असेल तर? - आहे हे माहित असून अमान्य करणे म्हणजे काय? हा विरोधाभास नाही का? "त्याच्याशी" भावना न ठेवणे म्हणजे अमान्य करणे असेल तर ज्याची त्याची मर्जी व त्यात दुसर्या कोणी ऑब्जेक्शन घेऊन हीन लेखणे चूक आहे. --------- शेंडेनक्षत्र, देवाचे सगळ्यावर नियंत्रण असते पण तो सगळ्यांना स्वातंत्र्यही देतो हे म्हणणे काही पटत नाही. - माणसाला कर्मस्वातंत्र्य आहे पण त्यालादेखिल कायदा "त्याचाच" लागू होतो. उदा. आपण क्रिकेट कसेही खेळू शकतो पण क्रिकेटचे नियम आपल्याला लागू होतातच व त्यानुसार आपल्याला आउट किंवा धावा दिल्या जातात.
|
नंदिनिच बरोबर आहे, देव ढगातहि आहे, त्यापलिकडेही आहे, तो कणाकणात आहे. तो आपल्याला दिसु शकत नाही हे आपले लिमिटेशन आहे. एका भक्तीयोग्याला अमेरिकन माणसाने विचारले तुम्हाला देव दिसतो का??योगी म्हणाले हो मला दिसतो, सतत दिसत असतो,मी जिथे बघेल तिथे दिसतो. अमेरिकन म्हणाला मला का नाही दिसत भक्तियोगी म्हणाले तुलाही दिसु शकतो पण तुझ्याकडे त्याला बघण्यासाठी लागणारे डोळे कुठे आहेत(दृष्टी कुठे आहे)??या छोट्याशा डोळ्यांनी तु किति गोष्टी बघु शकतोस??ज्याप्रमाणे सुक्ष्मजीवांच निरिक्षण करायला microscope रुपी डोळे लागतात त्याप्रमाणे देवाला बघायला आध्यात्मिक दृष्टी लागते जी भक्तिने develop केलि जाते. राधा तु कधी म्हणतेस चैतन्य म्हणजे देव आहे. मग चैतन्याला देव मानणार्या अद्वैतवादाच्या चुका काढल्यावर तुला त्या गोश्टी पटतात. तु एकदा नक्कि स्पष्ट कर की देव आहे की नाही. म्हणजे त्याप्रमाणे आमची उत्तरे ठरतिल.
|
Radha_t
| |
| Friday, August 03, 2007 - 10:56 am: |
| 
|
'life comes from life' : seems interesting धान्यामधे सुद्धा जीव असतो का? की अस काही तरी असत की त्याला पोशक वातावरण मिळाल की त्यातून जीव निर्माण होतो? याबद्दल आशिष आणि चिन्या तुमची काय मत आहेत तु एकदा नक्कि स्पष्ट कर की देव आहे की नाही. म्हणजे त्याप्रमाणे आमची उत्तरे ठरतिल. चिन्या चैतन्य आहे त्याला देव हे नाव आहे. एवढ मला मान्य आहे पण त्याची पूजा करण मला मान्य नाही. त्याला साकड घालण मला पटत नाही. त्याचा धावा करण मला पटत नाही. झक्कींच पण आधी तुम्ही बुडावरून हला, हाती शस्त्र घ्या, हे पटत पण नि मग धावा करा हे पटत नाही. हाती शस्त्र तर घेतलेलच आहे मग जर तुम्ही योग्य असाल सत्याच्या बजूने असाल तर धावा करायचिही गरज नाही अस मला वाटत.
|
Ashwini_k
| |
| Friday, August 03, 2007 - 11:30 am: |
| 
|
चिन्या, हो रे हो! निरक्षर पण भक्तीमार्गी चोखामेळांना "तो"दिसे पण तथाकथीत बुध्दीवाद्यांना तो दिसेल असे नाही.
|
आजची नाही, चाळीस पन्नास हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होमो सेपियन नुकताच उत्क्रांत होता. त्याच्यामधे आणि इतर होमो मधे एकच फ़रक होता. त्याला प्रश्न खूप पडायचे. आणि त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याचा तो प्रयत्न सुद्धा करायचा. अचानक पाऊस का पडतो? वीजा कशा काय चमकतात? ठराव्क ऋतूमधेच ही फ़ुलं क येतात? कधी कधी चांदणं असतं कधी कधी अंधार का असतो? सूर्य रोज का उगवतो? का मावळतो? एखाद दिवशी शिकार मिळते, एखाद दिवशी मिळत नाही असे का? कालचा दिवस आजच्यासारखा नव्हता आणि उद्याचा दिवस आजच्यासारखा नसेल हे का? तो शिकारीसाठी जंगलात दूरवर भटकायचा. त्याची मादी मात्र त्याच्या पिलाची काळजी घेत असायची. त्याला पडणार्या अनेक प्रश्नातलं हे एक कुतुहल होतं. त्याच्याकडे शक्ति होती. मात्र तरीही त्याला सृजनाचं गूढ अजून सुटलं नव्हतं. तिला शून्यातून विश्व उभं करता येत होतं. ती एखाद्या साध्या गुहेला सुद्धा "घर"पण द्यायची. एक अशी जागा जोथे त्याला परत जावंसं वाटायचं. कितीतरी माद्या होत्या त्याच्या टोळीत. पण त्याला तीच हवी असायची. का तेही त्याला माहीत नव्हतं. त्याची आणि तिची पिल्लं त्या दोघासारखीच दिसायची. का तेही त्याला माहीत नव्हतं. एवढं सगळं त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं पण तरीही हे सर्व घडत आहे हे त्याला ठाऊक होतं. यातले पॅटर्न त्याला समजत होते. त्याने खूप प्रयत्न केला शोधायचा की कोण हे सर्व करत आहे. कुणीच सापडलं नाही. जणू एखादी अदृश्य शक्ती हे सर्व चमत्कार घडवून आणत होती. पहिल्यान्दा तो त्या चमत्काराना घाबरला. मग त्याने ते सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि सरतेशेवटी तो नतमस्तक झाला, झुकला, त्या अदृश्य शक्तीला त्याने "देव" नाव दिलं.. (पुढे आहे,)
|
राधा तुला धावा करण पटत नाहि. ठिक आहे. मग इतर ध्यानधारणेच्या पध्दतींबद्दल तुझे काय मत आहे??तिथे धावा करणे गरजेचे नसते. त्याबद्दल तुला काय म्हणायचय??देवाला साकड घाला अस भक्तियोग सांगत नाहि. मी लिहिल होत की ३ बेसिक गोष्टी आहेत भक्तियोगाच्या त्यात देवाला काही मागु नका अशीहि एक आहे. धान्याबद्दल बायोलॉजितिल dormant state बद्दल तुला माहिति नाहि का? त्यात तुझ्या प्रश्नाचे उत्तर सापडेल. अश्विनि, पुर्ण अनुमोदन. नंदिनि, मला नाही पटली शेवटची पोस्ट.
|
Zakki
| |
| Friday, August 03, 2007 - 1:30 pm: |
| 
|
ती गोष्ट लवकर आटोपति घेतली. नतमस्तक होण्यापूर्वी हजारो वर्षे त्याने बरेच काही काही शोध लावले, बराच विचार केला, बर्याच लोकांनी एकत्र येऊन चर्चा केली, बरेच प्रयोग करून पाहिले, त्यातून बरेच काही ज्ञान प्राप्त झाले. काही theories मांडल्या. पण शेवटी त्याला हार मानावी लागली. नि त्याने 'देव' तयार केला. मग बरेच काही काही theorems तयार केले. त्यात उपनिषदे, गीता इ. येतात. आता कसे, त्यावर श्रद्धा ठेवली की, जेंव्हा तुमचे मन गोंधळते, तुम्हाला कष्ट होतात, तेंव्हा त्याचे नामस्मरण करा. बर्याच लोकांना त्याचा चांगला अनुभव आला. बर्याच म्हणजे किती? लाखो कोट्यवधि लोकांना हजारो वर्षे त्यात काही गम्य वाटले. त्यांनी पण बरेच काही काही संशोधन केले. पण बहुधा ते सगळे 'देव' या संकल्पनेपासून सुरु होते, नि तिथेच थांबते. आईनस्टाईन, स्टिव्हन हॉकिन्स यांनी बरेच संशोधन केले. त्यांच्या संशोधनाचा 'देव' याशी काही संबंध नाही. विश्वाची बरीच कोडी त्यांनी उलगडली. पण शेवटी त्यांनी सुद्धा मान्य केले की, हो कदाचित् 'देव' असेल. आईन्स्टाईनला तर या भारतीय तत्वज्ञानाचे फार कौतुक. हजारो वर्षात, जगभर कोट्यवधि लोकांनी मात्र निरनिराळ्या स्वरूपात 'देव' मानला आहे. आता आजकाल लोक आणखी प्रश्न विचारून, आणखी चर्चा करून देव ज्याला म्हंटले ते खरे आहे का? या प्रश्नाचे उत्तर शोधतील.
|
Slarti
| |
| Friday, August 03, 2007 - 3:11 pm: |
| 
|
The evidence for evolution theory is partly in the lab, partly in the 'field'. The lab evidence is not 'generated'. The experiment is generated, not the evidence. Hope you understand the difference. Do watch the miniseries I mentioned. Having said it, I'll stress my point 4. Can we be wrong ? Yes, surely. In fact, this theory might be utterly wrong. But the probability of that is becoming smaller and smaller as further research keeps corroborating the theory. Still, we accept the possibility of that being wrong. We don't wait to form a theory until the 'end'. There is no such end. That's not how science works. We propose a theory, we test its hypotheses, we look for evidence, we modify the theory as per the evidence... THIS is how it's an ongoing process. So far no research outcome has contradicted the core of the theory. शास्त्राच्या या धर्मामुळे आम्ही आता फारतर अज्ञानी असू, पण अंधश्रद्धाळू नव्हे. विज्ञान चुका करते, त्या चुकांतून शिकत जाते. या चुकांची विज्ञानाला पूर्ण जाणीव आहे. ते त्याचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. उपरोल्लेखित ongoing process ला समांतर भक्तीवेदांत वगैरेमध्ये नाही का ? परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची / मोक्ष मिळवण्याची तुमची प्रक्रिया ongoing process आहे. जसे आम्ही आमच्या पुराव्यांना, प्रयोगांना प्रमाण 'मानतो' तसे तुम्ही गीता, भागवत, आधी होऊन गेलेले संतमहात्मे यांना प्रमाण मानता, त्यांचा शब्द प्रमाण मानता आणि असे मानता की ते मोक्षपदी गेले. त्यांचा शब्द हे एक प्रमाण झाले. आता तुम्ही मोक्षपदी गेलात का ? नाही. पण तुम्हाला काही अध्यात्मिक अनुभव आले. ते मोक्षाचे अर्थातच नव्हेत, पण ते अनुभव व वरील प्रमाणे यावरून तुम्ही logical निष्कर्ष काढता की मोक्ष इ. आहे. (तर्क तुम्हालाही सुटला नाही). तुम्ही स्वतः थांबलात का 'शेवटपर्यंत ( = मोक्षपद)' तो सिद्धांत खरा कि खोटा हे बघण्यासाठी ? नाही. मग तुम्ही "jump to conclusion" केले का ? नाही, कारण 'मोक्ष आहे हे सिद्ध होणे' ही ongoing process आहे. त्याची अंतिम सिद्धता तेव्हाच जेव्हा तुम्हाला मोक्ष मिळेल. आता आमच्याकडेही असेच पुरावे आहेत, त्यावरून आम्ही काही एक logical निष्कर्ष काढला. आमचे संशोध सुरु आहे, आमच्याकडेही अंतिम सिद्धता नाही, पण त्याचा अर्थ आम्ही "jump to conclusion" केले असा नाही. तर तुमच्या पद्धतीत आणि आमच्या पद्धतीत फरक तो काय ? आमच्याकडे हे सर्व प्रमाण असूनसुद्धा आमचा सिद्धांत चुकीचा असू शकतो ही शक्यता मान्य करतो, त्याची जाणीव ठेवतो. आमचा आमच्या सिद्धांतावर अंधविश्वास नाही. गीता, भागवत इ. चुकीचे असू शकतात ही शक्यता इस्कॉन मान्य करते का ?
|
झक्कीजी, येतेय मी त्या विषयावर पण येत आहे, मुळात हे मला जसं आठवलं तसं मी लिहत आहे. तर त्याने देव या संकप्लनेचा शोध लावला. जे जे त्याला माहीत नव्हतं. ते ते त्याने देवाच्या अधीन केलं. त्याला सर्वात जास्त कुतुहल जन्म आणि मृत्यूचं होतं. हा दुसरा माणूस येतो कुठून किंवा तो मेल्यावर कुठे जातो याचा तो विचार करायचा. जिवंत माणुस आणि प्रेत यामधे नक्की काय फ़रक आहे? मुल जन्माला कसे काय येते? ते मोथे कसे काय होते? हे प्रश्न त्याला सतत पडायचे. निसर्गात एक कालानुक्रम असतो. जो हळू हळू त्याला समजायला लागला. चंद्र मोठा होत जातो आणि हळू हळू कमी होत जातो याचं त्याला आश्चर्य वाटायला लागलं. याच दरम्यान तो हळू हळू स्थिर होऊ लागला होता. शेती अत्यंत प्राथमिक अवस्थेत त्याने सुरू केली होती. अग्नि, ज्याची सुरुवातीला त्याला भिती वाटली होती. त्याला त्याने आटोक्यात आणलं होतं. कित्येक प्राणी माणसावळण्याचा त्याचा प्रयत्न चालू होता. आणि तेव्हा त्याला एक गोष्ट समजली. जर तो दुसर्यावर control करू शकतो तर त्याच्यावरही कुणीतरी control करू शकतो. आतापर्यंत "देव" हा फ़क्त चमत्कार घडवून आणत होता. पण आता तो controller झाला. सर्वकाही तो नियंत्रित करतो असं झालं. यापैकी कित्येक टोळ्यानी "देव" ही स्त्री मानली. कारण तिच्यामधे सृजनाची असीम शक्ती होती. तिच्यावरच टोळीचं भवितव्य अवलंबून होतं. त्यामुळे जास्तीत जास्त धडधाकट मुलं जन्माला घालणारी "ती" मुख्य होती. त्यामुळे बर्याच टोळ्यामधुन मातृसत्ताक पद्धत रूढ झाली. आदिम मानवाचा शेतीकडे प्रवास सुरू झाला होता. त्याचबरोबर कुटुंबसंस्था उदयाला आली. "समाज" तयार झाला. देवाण घेवाणाची पद्धत सुरू झाली. याचबरोबर "देव" या संकल्पनेचा प्रवास सुरू झाला, (पुढे आहे) }
|
Slarti
| |
| Friday, August 03, 2007 - 3:34 pm: |
| 
|
peshawa, i thought there was contradiction in the second paragraph of your last post. If given state of science god's existence vannot be inferred then how in future could science be used to dis/prove the same ? Wont it have the same problem mentioned in the first paragraph ?
|
Asami
| |
| Friday, August 03, 2007 - 3:51 pm: |
| 
|
If given state of science god's existence vannot be inferred then how in future could science be used to dis/prove the same ? >> I think he is saying the same. It can not. So jstop trying so
|
Slarti
| |
| Friday, August 03, 2007 - 4:06 pm: |
| 
|
i see. thanks asami. as it happens i am not at all trying to dis/prove god's existence. i want to explain evolution's stand because there are a lot of half-baked notions about it e.g. its stand on morality, its so-called proof, its verisimilitude, why we 'believe' in it etc. 'Scientific faith' is a deep issue, i was trying to give a flavour of the difference between religious faith and scientific faith. thanks anyway.
|
Tiu
| |
| Friday, August 03, 2007 - 4:34 pm: |
| 
|
zakki : पण शेवटी त्यांनी सुद्धा मान्य केले की, हो कदाचित् 'देव' असेल. मला नाही वाटत stephen hawking आणी Einstein नी कधी मान्य केलं की देव असेल!!! do u have any reference to this statement? आणि नंदीनीच्या म्हणण्याप्रमाणे हजारो वर्षांपुर्वी माणसाला पडलेल्या प्रश्णांची उत्तरे त्याला मिळाली नाहीत म्हणुन देव ही संकल्पना आली हे 100 टक्के मान्य! पण कालांतराने त्या प्रश्णांची उत्तरे (वेज्ञानिक कसोटीवर तपासलेली) मिळाल्यावर देव ही फ़क्त आपल्या अज्ञानातुन आलेली एक संकल्पनाच होती हे पण मान्य करायला नको का? P.S.: how to write vaidnyanik in devnagari?
|
Aschig
| |
| Friday, August 03, 2007 - 5:22 pm: |
| 
|
चिन्या, विश्व अमर्याद नाही. विश्वाचे वय १३.७ billion वर्षे ( give or take a few hundred million ) आहे. प्रकाशाच्या गतीने इतक्या वेळात ३००० megaparsec इतकेच अंतर कापता येवु शकते. विश्वाचा आकार तेवढाच. 1 KG of Hydrogen contains 10**27 atoms (and less number of higher atomic number atoms) mass of the sun is 10**30 kg there are 10**11 stars in our galaxy if you take inter galaxy distance to be a megaparsec, within a sphere of 3000 mpc (the size of the universe) you can have ~3x10**10 galaxies So the total number of atoms is 10**(27+30+11+11)= 10**80 Even if you consider the fact that visible matter forms only about 5% of the critical density, and if the rest is "assumed" to have similar number elements, we come up with 20x10*80=10**82 That is a whooping 18 orders of magnitude below google (which is 10**100). Even if I have missed say 10 orders of magnitude in my computation, we are clearly far from infinite whether other universes exist is no concern of ours currently चिन्या, तु अद्वैतवादी नाही असे म्हंटल्यामुळे तुझे नदीचे उदा. सुटले असवे. बरेच पाणी वाहुन गेले आहे. मी शोधतोच, पण जमल्यास पुन्हा copy- paste कर. राधा, ते धान्याबद्दल तुला बहुदा slarti ला विचारायचे होते. Anyway धान्य म्हणजे, well, seed! त्यात जीव नसतो तर जीवनाचे code असते. देवाच्या स्वरुपापेक्षा जिवाचे स्वरुप काय हा जस्त गहन प्रश्ण आहे
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|