|
Radha_t
| |
| Friday, July 27, 2007 - 8:32 am: |
| 
|
जगात जे चैतन्य आहे त्यालाच देव म्हणतात का? सध्या माहीत असल्याप्रमाणे फक्त पृथ्वीवरच सजिव आहेत. सजिवांमधे प्राणी आणि वनस्पती हे दोन प्रकार. पैकी आपल्या अस्तित्वाची जाणीव ही फ़क्त प्राण्यांनाच अस मला वाटत. वनस्पतींना वेदना होतात हे ऐकल आहे पण त्यांच्या अस्तित्वाची जाणिव त्यांना आहे की नाही कुणास ठाऊक. राहिले प्राणी त्यात जनावरं आणि माणुस असे दोन प्रकार. जनावरांबद्दल नंतर बघू पण फक्त माणासाला त्याच्या अस्तित्वाची जाणिव आहे बाकी जगातल्या कुठल्याही निर्जीव वस्तूला तशी जाणिव नसावी अस मला वाटते. सूर्याला तो सूर्य अहे याची जणिव नसावी, पृथ्वी ला ती धरणी माता आहे याची जाणिव नसावी आणि जगात हे जे सगळ चैतन्य आहे त्यालाही त्याची जाणिव नसावी अस मला वाटत. बघा पटल तर. मग जर त्या चैतन्याला तो आहे याची जाणिव सुद्धा नाही तर इतर आहेत यांची जाणिव काय असणार? माणसाने त्याची भक्ती केली त्याला त्याची जाणिव होत असेल का? भक्ती मार्ग मला समजत नाही. कोणी समजून सांगेल काय? निर्विकार रहाणे मला समजते. स्वतच्या संवेदना जाणुन घेऊन अंतरातला परमेश्वर समजून घेणे मला समजते. विपश्यना मला समजते. पण त्या अंतरातल्या किंवा बाहेच्या परमेश्वराची भक्ती करणे मला समजत नाही कोणी समजून सांगेल काय? भक्ती मधे खूप शक्ती आहे अस मी ऐकलय वाचलय. तुकारामांचे अभंग मिही वाचलेत. पण त्यांच्या मार्गावर गेलेला दुसरा कोणी दिसला नाही. त्यांनी जशी घोंगडीवर बसून चंद्रभागा पार केली तस पार करणार नंतर कुणिच दिसल नाही. ज्ञनेश्वरांसारखी दुसर कुणी भिंत उडवलेली ऐकिवात नाही गौतम बुद्धांनी विपश्यना करून बोधी प्राप्त केली. त्यांच्याच मार्गावर गेलेले सत्यनारायण गोयंका आपल्या समोर जिवंत उदाहरण आहेत. कदाचीत डोळ्यासमोर हे उदाहरण असल्यामुळे अनुभूतीचा मार्ग मला कळायला सोपा गेला असेल. तसाच भक्तीचा मार्ग सोपा करून सांगणार कुणी आहे काय? तोही मार्ग समजून घेण्याची माझी जबरदस्त इच्छा आहे. हे मी उपहासाने आजिबात लिहित नाही. मी त्या मार्गाने जावो की न जावो पण तो मार्ग समजून घ्यायचा आहे. how does it work? आई वडिलांची भक्ती समजते, आजी आजोबांची भक्ती समजते, नवर्याने बायकोची भक्ती केलेली समजते, बायकोने नवर्याची केलेली भक्ती समजते गुरुची भक्ती केलेली मी समजू शकते पण त्या आजाणत्या चैतन्याची किंवा देवाची भक्ती कशी करायची? सिनेमात दाखवतात तसा देव ढगात किंवा समुद्रात बसतो हे बुद्धिला पटत नाही, दगडातल्या मूर्तीत सुद्ध देव दिसत नाही. तो दगडच आहे हे विसरायला मेंदू तयार होत नाही. मग देव शोधावा कुठे?
|
राधा तुझी ही पोस्ट व्यवस्थित आहे.या आधिच्या पोस्ट्स म्हणजे उगाचच विरोध करायचा अशा भावनेच्या होत्या. चैतन्याला जाणीव आहे का की ते चैतन्य आहे??तर जरुर आहे. भक्ती चैतन्याची नाही तर देवाची करायची. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून चमत्कार झाले मात्र तशा चमत्काराची गरज भक्तीला नाही.भक्ती म्हणजे तुम्ही आणि देव यांच्यातिल प्रेम. भक्ती मार्ग हा सध्याच्या कलियुगात देवाकडे जाण्यासाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे. देव म्हणजे Absolute . त्यामुळे देवाचे नाव, त्याचे रूप,त्याचे कार्य, त्याचे विचार हे सर्व एकच आहेत. देवाचे नाव आणि स्वत्: देव यात फ़रक नाही. त्यामुळे देवाचे नाम जपणे फ़ार महत्त्वाचे आहे. त्यासाठी अनेक मंत्र आहेत. मंत्र जपण हा भक्ति मार्गातिल अतिशय महत्त्वाचा भाग आहे. 'श्रवणम,किर्तनम,विष्णु-स्मरणम,पादसेवनम अर्चनम, वंदनम,दास्यं,सख्यम,आत्मनिवेदनम,' हे भक्तिसाठीचे मार्ग आहेत. थोडक्यात सांगायचे म्हणजे तुम्ही २४ तास देवातच मग्न रहा. जेंव्हा काम कराल तेंव्हा देवासाठी करा,जेंव्हा वाचताय तेंव्हा देवाबद्दल वाचा, देवाबद्दलच लिहा. त्यामुळे तुमच सर्व जिवनच देवाच्या चैतन्याने भरत आणि देव Absolute असल्याने तुम्ही त्याच्या consciousness मधुन केलेल्या गोष्टी spiritualised बनुन जातात. त्यातुनच तुमची आध्यात्मिक प्रगती होते. यासाठी 'गोकुळातिल गोपी' आदर्श आहेत. त्या भगवानाच्या प्रेमात सतत मग्न असायच्या. बाकिच्या या material जगातिल गोष्टींबद्दल त्यांन्च्यातिल रस नाहिसा झाला होता. भक्तीमधे आनंद ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. भक्तीमधे आपोपाप आनंद प्राप्त होऊ लागतो. भक्तीमधील ३ महत्त्वाचे नियम असे की तुम्ही देवाला काहिहि material गोष्टी मागु नका, देवाबद्दल भीती बाळगु नका,एकाच देवाशी भक्ती ठेवा. देव जे देईल ते माझ्या भल्यासाठीच देईल त्यामुळे भय कुठल्या गोष्टीचे?? आता तु विचारलच आहे तर मी थोडी थोडी भक्तीबद्दल माहिती लिहित जाईल. कारण माहिति प्रचंड आहे. A.C. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद हे स्वत्: महान भक्त होते आणि त्यांनी लिहिलेली 'भगवद्गीता-जशी आहे तशी' must read प्रकारची आहे. त्याआधी त्यांचे ' the science of self realisation ' (मराठीतही आहे)हे पुस्तक पण वाचावे.
|
Slarti
| |
| Friday, July 27, 2007 - 8:59 pm: |
| 
|
>>> भक्ती चैतन्याची नाही तर देवाची करायची. चराचरातील चैतन्य आणि देव यांच्यात काय फरक मानला जातो ? >>> एकाच देवाशी भक्ती ठेवा. या नियमामागील उद्देश काय ?
|
डॉकिन्स च्या पुस्तकान्प्रमाणेच द गॉड पार्ट ऑफ द ब्रेन हे पुस्तक ही सुन्दर आहे.
|
चराचरातील चैतन्य आणि देव यांच्यात काय फरक मानला जातो ? याबद्दल वेगवेगळे पंथ वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. मी जी गोश्ट समजवायचा प्रयत्न करतोय त्यात चैतन्य म्हणजे देव आहेच आणि देव म्हणजे चैतन्य+इतरही अशी मान्यता आहे. एका देवाशी भक्ती ठेवा म्हणजे अस की एकावरच अवलंबुन रहा. गणपतिला म्हटल मी तुझाच एकनिष्ठ भक्त नंतर काहिवेळानी कृष्णाला म्हटल मी तुझाच एकनिष्ठ भक्त मग लक्ष्मीला मी तुझाच एकनीष्ठ भक्त अस करु नका. कृष्ण तर कृष्णच. अस करा.
|
गणपतिला म्हटल मी तुझाच एकनिष्ठ भक्त नंतर काहिवेळानी कृष्णाला म्हटल मी तुझाच एकनिष्ठ भक्त मग लक्ष्मीला मी तुझाच एकनीष्ठ भक्त अस करु नका का बुवा? सर्व देव तर एकच आहेत ना?
|
कृष्ण, गणपती, लक्ष्मी यांना वेगवेगळे अस्तित्व आहे. वैष्णव झालात तर त्यांचे नियम पाळा, शैव झालात तर त्यांचे नियम पाळा म्हणुन एकाशिच एकनिष्ठ रहा असा नियम आहे. म्हणजे इतर देवांना नमस्कारही करु नका अस नाही. म्हणजे वैष्णव व्हायच असेल तर इतरांकडे 'माझ्यात कृष्णाबद्दल खरी भक्ती येउ दे ' अस मागण मागा. मला यात काहिहि चुकिचे वाटत नाही. स्वामी विवेकानंद तर म्हणतात की तुम्ही एकच घरी मुर्ती अथवा फ़ोटो घ्या आणि सतत त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा. एकाच वेळी वेगवेगळे देव,पुजापध्दती,मान्यता follow करणे अवघड आहे म्हणुन एकाच देवाशी एकनिष्ठ रहा असा नियम आहे
|
Radha_t
| |
| Monday, July 30, 2007 - 4:40 am: |
| 
|
कृष्ण, गणपती, लक्ष्मी यांना वेगवेगळे अस्तित्व आहे. हे सगळे कुठे रहातात? वैष्णव झालात तर त्यांचे नियम पाळा, शैव झालात तर त्यांचे नियम पाळा कसले नियम? एक दोन उदाहरणं मिळतील काय
|
विनयला अनुमोदन. निराकारावर विश्वास ठेवायचा ना? की त्याच्या वेगवेगळ्या रुपांमधल्या एका रुपाला एकनिष्ठ रहायचं? आणि रुपाला एकनिष्ठ रहायचं? देव या विषयाबाबतीत माझं अज्ञान बरच आहे. संभ्रमही आहेत. समजण्याची कुवत हळूहळू डेवलप व्हावी म्हणुन हे प्रश्न नाकारता येत नाहीत. मेघा
|
Zakki
| |
| Monday, July 30, 2007 - 12:49 pm: |
| 
|
देव एकच, नि तो किंवा ती निर्गुण, निराकारच आहे. पण अश्या अदृष्य, निराकार गोष्टींवर लक्ष कसे केंद्रित करायचे, म्हणून मूर्ति घडवल्या. जसे, कुठलाहि विषय शिकताना प्रथम सोप्या, सोप्या गोष्टी आधी शिकून मग कठिण गोष्टी शिकवतात. एकदा ज्ञान वाढले की बर्याच गोष्टी समजू लागतात, नि महत्वाचे काय नि नाही ते कळू लागते. (कुणि Graph theory हा विषय शिकला असाल तर विचार करा, की प्रत्यक्ष graph न काढता गणिताने किंवा इतर मार्गाने त्या graph ची माहिती मिळते. पण तो विषय एकदम तिसरी चौथीत शिकवता येणार नाही. तसेच आधी मूर्ती पहा, नि नंतर मूर्ति नसली तरी तुम्हाला भक्ति करता येईल.) शैव, वैष्णव वगैरे गोष्टी, अशासाठी की लोकांनी गोंधळून जाऊ नये. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत, पण एकदा एक मार्ग धरला की तोच पाळावा. जसे एका दिशेने गेलात तर डावीकडे वळा, पण उलट दिशेने आलात तर उजवीकडे वळा, हे नियम पाळले नाहीत, मधेच दुसर्या मार्गाच्या सूचना वापरल्या, तर इच्छित स्थळी पोचणार नाही. माझ्या मते, विवेकानंदांच्या सांगण्याचा अर्थ असा की तुम्हाला एकच, नि कोणतीहि, मूर्ति पुरते. उगाच दहा मूर्ति आणून घोळ घालू नका, चुकाल. कारण त्यांना माहित होते की देव तर खरे म्हणजे एकच आहे, निर्गुण, निराकार आहे, मूर्ति हे केवळ मार्गातले साधन आहे, साध्य नव्हे.
|
Zakki
| |
| Monday, July 30, 2007 - 1:06 pm: |
| 
|
मी माझ्या स्वत:च्या पानावर लिहिल्याप्रमाणे, माझ्या मते, देव, परमात्मा वगैरे नुसत्या कल्पना (किंवा theories ) आहेत. त्या बर्याच लोकांना पटल्या म्हणून आत्तापर्यंत त्या शिल्लक आहेत. यापुढे जर तुम्हाला वाटले की तसे काही नाही, त्याशिवायहि माझ्या मार्गाने मला समाधान मिळते, तर तसे करा. त्याच कल्पनेत असेहि आहे, की तुम्ही जर देवाचे काही केले नाहीत, तर देव तुम्हाला शिक्षा देतो, हे खरे नाही. असे प्रकार पाश्चिमात्य कल्पनांमधे आहेत. आपला देव (जे मानतात त्यांच्या साठी) अत्यंत प्रेमळ नि क्षमाशील आहे. शिवाय तुम्ही त्याला शिव्या दिल्यात तर त्या त्याला पोचतच नाहीत. फक्त तुम्ही एकचित्ताने त्याचे स्मरण केलेत तरच त्याला पोचते, नाहीतर तुम्ही कोण, कुठले, काय करता हे जाणून घेण्याची देवाला गरज नाही. म्हणून तर सगळे अत्याचारी मुसलमान जिवंत आहेत. ज्यांना त्यांची कृत्ये आवडत नाहीत, त्यांच्या मुळे जिविताला धोका येतो असे वाटते, त्यांनी देवावर निष्ठा ठेवून स्वत:हून प्रयत्न करून त्यांचा संहार करावा, देव काही करणार नाही, फक्त Moral Support! . पण भारतात कसले होणार ते, सगळे लेकाचे लाचखाऊ, भ्रष्ट, आंधळे, स्वार्थी नेते नि त्यांच्या हाती राज्य देणारी जनता! मग देव वगैरे गोष्टी असल्या काय नि नसल्या काय?
|
Slarti
| |
| Monday, July 30, 2007 - 2:51 pm: |
| 
|
झक्कींचे interpretation बरोबर आहे असे वाटते. निर्गुण निराकार भक्ती सोपी नसावी. त्यामुळे विठोबाचे महत्व. विनोबा म्हणतात की दहा दिवस गणपती बसवून मग त्याचे विसर्जन करायचे यात मोठा अर्थ भरला आहे... मूर्तीची पूजाअर्चा करा, पण त्यात अडकून पडू नका.
|
झक्कि, एकदा नक्कि ठरवा देव आहे का नाही??आधी म्हणता ही एक कल्पना मग म्हणता देव निर्गुण, निराकार एकदा नक्कि ठरवा काय ते. दुसरी गोष्ट देव निर्गुण आहे का सगुण आहे ही चर्चा नाहि आहे. राधाने भक्तीमार्गाबद्दल विचारले आहे म्हणुन मी लिहिले होते. आणि लिहिणार आहे.देव सगुण आहे की निर्गुण ही चर्चा वरच्या दर्जाची आहे बेसिक नाही. प्रत्येकाने आपापल्या अनुभवाने ठरवाव सगुण की निर्गुण ते. असो अशी चर्चा नंतर करता येईल. आता राधाचे प्रश्न्-हे सर्वजण कुठे रहातात??जगात अमर्याद ग्रह तारे आहेत अस विज्ञान म्हणत. आमचा धर्मही थोडस असच म्हणतो. विष्णु वैकुंठ नावाच्या ठिकाणि वास करतात. इतर देवही अशाच वेगवेगळ्या ठिकाणी वास करतात. याला भौतिक पुरावा नाही पण करोडो ग्रह तारे आहेत त्यापैकी एक वैकुंठ, गोलोक वृंदावन कशावरुन नाही??देसरा प्रश्न म्हणजे नियम्- नियम आहेत अस नाही. फ़ारफ़ार तर मान्यता म्हणा.पण साध्या भाषेत म्हणायचे तर वैष्णव एकादशी पाळतात तर इतर देवांचे भक्त ते पाळतातच असे नाही. वैष्णव द्वारका,वृंदावन,जगन्नथपुरी,पंढरपुर इथे जातात तर शैव ज्योतिर्लिंग,अमरनाथ या ठिकाणी जातात. मेघा, निर्गुणावर विश्वास ठेवायची गरज नाही. अनुभवातुन त्या conclusion वर आल तरी चालत(राजयोग,ज्ञानयोग हे मार्ग आहेत.मी सध्याची चर्चा भक्तीयोगावर करतोय). दुसरी गोष्ट अशी की मी धार्मिक अभ्यास मराठीतुन फ़ारसा केलेला नाही त्यामुळे शब्दांमधे थोडेसे घोळ होऊ शकतात (उदा. एकनिष्ठ. हा शब्द पुर्णपणे बरोबर आहे अस मला वाटत नाही पण alternative शब्द माहित नाही त्यामुळे तो लिहिला आहे.त्याचप्रमाणे 'नियम' हा शब्दही). मेघा, निर्गुणावर विश्वास ठेवायचा की सगुणावर हा तुझा वैयक्तीक प्रश्न आहे. मी स्वत्: द्वैत अद्वैत वादी आहे. म्हणजे देव हा सगुणही आहे आणि निर्गुणही अस मानणारा आहे. देवाची रुपे ही केवळ कल्पना आहे हे मला मान्य नाही. निर्ग़ुण आहे पण त्यापुढे परत सगुण आहे हे 'इषोपनिषदातिल' एका श्लोकातुन स्पष्ट होते.
|
यत्करोषि यद्श्नासि यज्जुहोषि ददासी यत यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम भगवद्गीता ९.२७ भाशांतर्-तु जे काही करशील,तु जे काही खाशील,तु जे काही देशील,दान करशील,तु ज्या काही तपस्या,पुजाअर्चना करशील त्या हे कुंतिपुत्रा, मला दिलेल offering म्हणुन कर. या भौतिक जगात सर्व गोश्टी क्षणभंगुर आहेत. एकच गोष्ट शाश्वत ती म्हणजे देव. देव सोडुन बाकी सर्व माया आहे. या मायेने आपण आपले स्वत्:चे आणि देवाचे अस्तित्व विसरुन गेलेलो आहोत.तुम्ही माना अथवा नाही,तुम्ही मायेचे सेवक असता. कोणी आपल्या कुटुंबियांची सेवा करतो,कोणी मित्रमंडळींची,कुणी समाजाची कुणी राज्याची, कुणी देशाची,कुणी जगाची सेवा करतो. अगदीच काही नाही मिळाल तर कुत्र्या मांजरांची सेवा करतो. पण यापैकी कुठली गोष्ट शाश्वत आहे??एकही नाही. सर्व गोष्टी आज आहेत उद्या नाहित. आज आहेत पण काल नव्हत्या. पण आपल्याला शाश्वत गोष्टींकडे जायच असेल तर आपल्याला देवाकडे जाव लागेल. जगात प्रत्येक गोष्टीची विरुध्द गोष्ट असते. तर मग क्षणभंगुर गोष्टी इथे आहेत तर शाश्वतही असायला हव्यात. क्षणभंगुर जगाबरोबरच शाश्वत जगही असायला हवे.त्या शाश्वत गोष्टी म्हणजे देवाशी संबंधीत गोष्टी. मग आपण या क्षणभंगुर गोष्टींची म्हणजेच मायेची सेवा का करतो. याला कारण असे की आपण आपली मुळ identity विसरलो आहोत. आपण या क्षणभंगुर शरीराशी इतके attached आहोत की त्यामुळे आपण मायेत गुरफ़टुन गेलो आहोत. आणि जिथे आनंदही क्षणभंगुर आहे अशा या जगात अडकुन आहोत. आपल्याला इथुन शाश्वत अशा सच्चितानंद (शाश्वत ज्ञान आणि आनंद) देवाकडे गेलच पाहिजे. आम्ही फ़क्त एव्हढच म्हणतो की जर तुम्ही कुटुंब,पैसा,सामाजिक स्थान,समाज जग या क्षणभंगुर मायेची सेवा करता तर मग शाश्वत अशा देवाची का नाही???ज्या देवाची माया ही एक शक्ती आहे त्या सर्वशक्तिमान देवाची का नाही सेवा करत??? बर मग कशी करायची त्याची सेवा??त्याचे उत्तर पोस्टच्या सुरुवातिला दिलेल्या श्लोकात आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु मामेवैष्यसि युक्त्वैवमात्मानं मत्परायण्: || भगवद्गीता ९.३४ भाषांतर्-तुझी बुध्दी सतत माझ्याबद्दलच विचार करु दे, माझा भक्त बन,मला वंदन कर,माझिच प्रार्थना कर. माझ्यात पुर्णपणे absorb (मग्न) झाल्यास तु नक्कीच माझ्याकडे येशील.
|
Aschig
| |
| Monday, July 30, 2007 - 7:50 pm: |
| 
|
झक्की, तुमच्या काही गोष्टी पटतात. देवाकडचे फक्त शिव्या filter करण्याचे साधन मज पामराला देखिल मिळाले तर छान होईल. पण त्या वैकुंठस्थित भगवंतापर्यन्त माझा धावा पोचायला निदान ७० वर्ष (प्रकाशाच्या गतिने) लागणार असल्यामुळे मी इहलोकी (हा सध्या पृथ्विचाच भाग आहे निदान ज्याला नरक म्हणतात तो) पोचल्यावरच ते शक्य होईल. आणी तेंव्हा जरा उशीर झालेला असेल. जे लोक केवळ त्यांची भक्ती देवापर्यंत पोचते असे वाटुन चांगले वागतात त्या लोकांना मला सांगावेसे वाटते की त्या फळाची अपेक्षा सोडुन (किंबहुना देव नसतोच असे कल्पुन) चांगले वागुन पहा. त्यात जी मजा आहे ती अजुन कशातच नाही. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही त्याचप्रमाणे देव नाही असे समजुन चांगले वागण्यातील अप्रुप जाणवत नाही. जे देवाची भक्ती करण्याची गरज नाही (तो कोपेल का या भितिने) असे असुन केवळ छान वाटते म्हणुन भक्ति करतात (आणी ईतर लोकांना तसे करायची जबरदस्ती करत नाहीत) त्यांना त्यांचा वेळ लखलाभ.
|
Zakki
| |
| Monday, July 30, 2007 - 10:53 pm: |
| 
|
चिन्या तुमचा गोंधळ होणे साहाजिक आहे. माझ्या मते खरेच तो केवळ एक सिद्धांत आहे, नि तो आजकालच्या भौतिक शास्त्रान्वये सिद्ध करता येत नाही. त्याची प्रचिति केवळ व्यक्तिगत रीत्या येऊ शकते, नि त्याला हि बराऽऽच मोठा काळ लागतो. आस्चिग प्रमाणेच अनेकांचेहि हेच मत आहे की तो सिद्धांत खरा की खोटा याची एका आयुष्यात प्रचिती येणार नाही. म्हणून मग त्यांनी पुनर्जन्माचा, कर्मफळाचा इ. सिद्धांत बसवले ते या theory बसतात. अशा रीतिने ही theory विकसित होत गेली. अजूनहि त्याला भौतिक परिमाण नाही. आजकालच्या instant results च्या जमान्यात हे शक्य नाही. एडिसनने विद्युत् दिव्याचा शोध लावेस्तवर तीहि एक theory च होती. अर्थात् त्याला भौतिक प्रत्यय देता येत होते. तसे या शास्त्राचे नाही. अजूनहि डार्विनच्या सिद्धांतावर शंका घेणारे लोक आहेतच. पण काही लोक काहीतरी गोष्टींना पुरावा मानून ते खरे मानतात. Black hole आहे की नाही याबद्दल आत्ता पर्यंत हो की नाही असे चालू होते. काही लोक त्यावर विश्वास ठेऊन त्याचे 'पुरावे' शोधतात. त्यांनी black hole नसतात असे मानले तर त्याहि बाजूचे पुरावे त्यांना गोळा करता येतील. मग खरे काय? आता भौतिक शास्त्राचा आधार नसताना हजारो वर्षे लोक आपले ती theory खरी मानून त्याचा काही काही विकास करत गेले. तो सर्वांना मानवला. का ते माहित नाही. मी फक्त त्याबद्दल वाचले. म्हणून मी माझी जी काय मते होती, त्या theory वरून समजलेली, ती मांडली. स्वत: मी या गोष्टींचा फारसा विचार न करता, रोजचे आयुष्य जगत असतो. गुलमोहर मधे कुणि लिहीले आहे की आषाढीची वारी, किंवा अचानक झालेले देवदर्शन याने त्यांना प्रसन्नता वाटली! मलाहि वाटते, तो एक आनंद आहे, जो हिंदूंखेरीज इतरांना समजणार नाही. तशा आनंदाचा पुन: पुन: प्रत्यय यावा, म्हणून काहीतरी करायचे. अलास्काचे निसर्गसौंदर्य पाहूनहि बराच आनंद झाला, पण तो वरील आनंदापेक्षा कमीच. म्हणून तसा आनंद मिळण्यासाठी काहीतरी करायचे. शांतपणे नुसते बसून तो आनंद मिळत नाही, पण त्याबरोबर देवाचे नाव घेत राहिले तर होतो. म्हणून काही मी रोजचा व्यवहार सोडत नाही. पण निवृत्त झाल्याने सध्या भरपूर वेळ आहे, त्यामुळे मला असल्या गोष्टी जमतात, म्हणून मी करतो.
|
चिन्या, तुम्ही म्हणताय ते सारे ठीक आहे हो, पण माझे ख्रिश्चन मित्र म्हणतात की येशू ची भक्ती केल्याशिवाय स्वर्ग मिळणे अशक्य आहे. खरे काय आणी खोटे काय
|
Radha_t
| |
| Tuesday, July 31, 2007 - 4:30 am: |
| 
|
zakki माझ्या मते, देव, परमात्मा वगैरे नुसत्या कल्पना (किंवा theories ) आहेत. त्या बर्याच लोकांना पटल्या म्हणून आत्तापर्यंत त्या शिल्लक आहेत. अगदी मनापासून पटल.पण Aschig प्रमाणेच माझाही filter बाबत गोंधळच उडाला आहे. chinyaa पण यापैकी कुठली गोष्ट शाश्वत आहे??एकही नाही... आपल्याला शाश्वत गोष्टींकडे जायच असेल तर आपल्याला देवाकडे जाव लागेल याचा अर्थ आपण स्वतःही शाश्वत नाही. पण देवाकडे गेल्याने आपल्याला शश्वती मिळणार, कसल शाश्वत मिळणार exactly काय मिळणार? ते तिथे गेल्यावरच कळेल हे उत्तर अपेक्षित नाही. की आपणही शाश्वत होणार? आणि देवाकडे जायच म्हणजे नेमक कुठे जायच? वैकुंठात? परवा मी एक सिनेमा पहिला त्यात अस दाखलय की कर्णाच कवच आणि कुंडल इंद्राने हिमालयाच्या कुठल्याश्या शिखरावर लपवून ठेवल आहे. व्हिलन ते मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि हिरो ते त्याला मिळवण्यापासुन परावृत्त करतो. शेवटी त्या कवच कुंडलांचा नाश होतो. हे scipt जर बर्याच वर्षांनंतर कुणाच्या हाती लागल तर कदाचीत ती एक दंतकथा होऊन महाभारताशी त्याची सांगड घातली जाईल. ही शक्यता नाकारता येत नाही. तसच रामायण महाभारतही अश्याच कुठल्या दंतकथा modify होत होत आपल्या समोर आल्या असतील ही श्यक्यता ही नाकारता येत नाही.
|
झक्कि माझा गोंधळ उडालेला नाही. तुम्हाला अस का वाटल की गोंधळ उडालेला आहे?? अशिगनी खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत ७० वर्षे तरी लागतिल अस लिहिलय हे चुकिच आहे. ईश्वर्: सर्वभूतानां हृद्देशेअर्जुन तिष्ठति भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारुढानि मायया भगव्द्गीता १८.६१ भाषांतर्-ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे,आणि हे अर्जुना तो सर्व जीवांच्या कृत्यांकडे लक्ष ठेऊन आहे जे मायेने बनवलेल्या यंत्रावर आरुढ झालेले आहेत. त्यामुळे चेष्टा करण्याचा प्रयत्न करणार्या अशीगचा मुद्दा चुकिचा ठरतो. तुम्ही देवाबद्दल साधा विचार जरी केला तरी तो त्याच्यापर्यंत पोहोचतो. याचबरोबर ईषोपनिशादातिल श्लोक ५- परमेश्वर चालतो आणि चालतही नाही.तो सर्वात दूर आहे, आणि सर्वात जवळ आहे.तो सर्व गोष्टींमधे(सर्व गोष्टींच्या आत) आहे आणि तरिही तो सर्व गोष्टींच्या बाहेरही आहे. इषोपनिशद श्लोक ५. त्यामुळे तो सर्वात जवळ आहे त्यामुळे त्याच नामस्मरण केलेल त्याला लगेच कळत. झक्की तुम्ही म्हणताय की असे सिधांत बनले असतिल अस झाल असेल पण हे फ़क्त तर्क आहेत. या तर्कातुन काहिच साध्य होणार नाही विजयराव, ख्रिश्चन लोकांनी स्वत्:चा धर्म पाळावा आम्ही विरोध करत नाही. पण फ़क्त ख्रिश्चनच देवाकडे जातिल हा काहि ख्रिश्चनांचा समज immature आहे. मी एका लेखात वाचल होत की येशु नी पण अस म्हटल नव्हत. असो हा सध्या आपला विषय नाही. राधा हे शिव्या filter करणे काय आहे???समजल नाही. तुझा प्रश्न आहे की आपणही शाश्वत नाही का??याच उत्तर आहे की आपण शाश्वत आहोत. पण पहिला प्रश्न आपण आहोत कोण??हे शरिर जे काही वर्षानी संपणार आहे ते म्हणजे आपण का??उत्तर आहे नाही. आपण म्हणजे हे शरिर नाही. 'अहं ब्रह्मास्मि'-मी म्हणजे हा आत्मा आहे. मी म्हणजे हे शरीर नाही. भागवतात म्हटलय की आपण शाश्वत असल्याने क्षणभंगुर गोष्टींमधे आपल्याला शाश्वत आनंद मिळुच शकत नाही.. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भुत्वा भविता वा न भुय: | अजो नित्य: शाश्वतो s यं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे भाशांतर्-आत्म्यासाठी जन्मही नसतो, मृत्युही कधीच नसतो. तो कधीच भौतिक झाला नाही,होत नाही होणार नाही. तो जन्मलेला नाही,शाश्वत आहे,अमर आहे,जुना आहे,जेंव्हा शरीर मरते तेंव्हा तो मरत नाही. देवाकडे काय शाश्वत असेल तर तेथे या जगाप्रमाणे जन्म,मृत्यु,जडा, व्याधी नाहित. तिथे इथल्याप्रमाणे माया नाही. तिथे सर्व भगवद्प्रेमात गुंग आहेत आणि त्यामुळेच आनंदी आहेत. तिथे पुर्ण स्वातंत्र्य आहे पण कोणीही त्याचा गैरफ़ायदा घेत नाही. ते जग transcendental आहे. निर्गुण, निराकारवादी साधु वगैरे निर्गुण, निराकार ब्रह्ममधे विलिन होतात. गोलोक वृंदावन हे spiritual world आहे (स्वर्ग नाही!). वैकुंठ त्याचाच भाग आहे. राधा तो सिनेमा वगैरे रामायण येउ शकत नाहि. कृपया शक्यतांबद्दल बोलु नका. कारण मग अशा अनेक शक्यता निघु शकतात.
|
Zakki
| |
| Tuesday, July 31, 2007 - 12:44 pm: |
| 
|
आस्चिग यांच्या विधानाकडे मी चेष्टा म्हणून पाहिले नाही. पण त्यांना माहित आहे की हे सर्व गीता, वेद इ. ठिकाणी सांगितलेले तत्वज्ञान जरी खरे असेल तरी मनाची संपूर्ण एकाग्रता असेल, तरच आपली प्रार्थना देवापर्यंत पोचते, पण तसे काही एकदम होत नाही. त्याला भरपूर म्हणजे भरपूर सराव लागतो, आणि मग त्याला सत्तर वर्षे तरी पुरतील की नाही असा प्रश्न पडतो. नि ते खरे आहे. मनाची एकाग्रता, कर्मण्येऽवाधिकारस्ते या गोष्टी केवळ वाचायला ठीक आहेत, पण प्रत्यक्षात आचरणात आणायला अत्यंत कठिण. खरे तर म्हणूनच आपल्या 'धर्मात' शेकडो, हजारो rituals सांगितली आहेत. त्यातली जी काही तुम्हाला वाटतील ती करा. म्हणजे ज्या योगे तुमचे साध्य तुम्हाला मिळायची शक्यता वाटते तो मार्ग स्वीकारा, नि त्यापासून ढळू नका. म्हणूनच फक्त एकच बायबल, एकच कुराण, एकच देव, असे आपल्यात नाही. कुणि शैव बना, कुणि वैषणव, कुणि खंडोबा, जगदंबा कुणाचीहि भक्ति करा, पण करा नि निष्ठेने करा. शिव्यांचा फिल्टर्: एक तर फिल्टर हा शब्द मी वापरलेला नाही. देव जरी आपल्या 'जवळ' असला तरी तो निर्गुण, निराकार आहे. त्याच्याशी संपर्क साधायचा तर काहीतरी ' connection' पाहिजे. ते म्हणजे एकाग्रतेने केलेली भक्ति. शिव्या म्हणजे भक्ति नव्हे. मग ती त्याला पोचत नाही. जसे बॅटरी ते दिवा यांच्यामधे वायर लागते, ती सुद्धा conducting पदार्थाची. ती जोपर्यंत जोडत नाही, तोपर्यंत कितीहि जवळ ठेवले असले तरी दिवा पेटत नाही. शिवाय आजकालची instant संस्कृति. मला तुम्ही म्हणता तो देव, शाश्वतता पाहिजे पण आधी दाखवून द्या की ते कुठे आहेत? खरेच आहेत का? ते तर शक्य नाही, कारण theoretically, म्हणजे सनातन तत्वज्ञानाप्रमाणे ते फक्त वयक्तिक रीत्या अनुभवता येते. मग ह्या theory वर विश्वास कसा ठेवावा? गीता, वेद सांगतात ते तरी खरे कशावरून, हे प्रश्न पडणारच. त्याला या तत्वज्ञानात उत्तर नाही. त्याला उत्तर: 'श्रद्धा', ' faith '. (एक विचारणा: वायरलेस ने जर आपला आवाज इकडून तिकडे जातो, तर electricity का तशी इकडून तिकडे करता येणार नाही? सगळ्या मुळी waves च आहेत!)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|