Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 26, 2007

Hitguj » Views and Comments » General » 'देव' म्हणजे काय? » Archive through July 26, 2007 « Previous Next »

Chinya1985
Tuesday, July 24, 2007 - 9:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राधा,तुला माझा मुद्दा कळलेला दिसत नाही. माझ्या म्हणन्याचा अर्थ होता की जर मंदिरात जाणे चुकिचे आहे तर ते सर्वांसाठीच चुकिचे असले पाहिजे. म्हणजे आस्तिक आणि नास्तिक सर्वांसाठिच चुकिचे असले पाहिजे. मग त्यात आस्तिक अथवा नास्तिक हा प्रश्नच येत नाही. देव फ़क्त आस्तिकांसाठी आहे आणि नास्तिकांसाठी नाही असे नाही.

Vijaykulkarni
Tuesday, July 24, 2007 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनस्मे,
स्पष्टीकरणाबद्दल आभार.
मी नास्तिक होण्या आधी मलाही असेच प्रश्न पडायचे.
पण प्रान्जळ पणे सान्गतो की नास्तिक झाल्यानन्तर माझी मन्:शान्ती खूपच वाढली.



Mansmi18
Tuesday, July 24, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार,

हे माझे या विषयावरील शेवटचे पोस्ट.

मला जे इतर पोस्ट्स वाचुन वाटले ते मी प्रांजळपणे लिहिले होते त्यात वैयक्तीक टीका करण्याचा अजिबात हेतु नव्हता. काही वेळा माझ्या पोस्ट्स नको तितक्या तीव्र झाल्या त्याने कोणी दुखावले गेला असाल किंवा कोणाला अपमानास्पद वाटले असेल तर मी क्षमा मागतो.

मला वाटते आस्तिकांचा विचार तुकाराम महाराजानी या अभंगात अतिशय सुंदर मांडला आहे.
||हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा||
||गुण गाइन आवडी, हेची माझी सर्वजोडी||
||न लगे मुक्ती आणि सम्पदा, संतसंग देइ सदा||
||तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी||

sshrini, aschig, vijay, chyayala, chinya, ksha आणि इतर तुम्हा सर्वांशी संवाद साधुन अतिशय आनंद झाला. परत एकदा माझ्या पोस्ट्सनी कोणी दुखावले गेला असाल तर क्षमस्व.

सर्वाना शुभेच्छा.

लेखनसीमा....






Chinya1985
Tuesday, July 24, 2007 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा फ़ारच छान मनस्मी तुकाराम महाराजांच्या भक्तिची एक टक्का भक्ती जरी माझ्या आयुष्या मिळवु शकलो तर माझ आयुष्य मी धन्य मानेल. तुझ्या विचारांसाठी धन्यवाद.

Anilbhai
Wednesday, July 25, 2007 - 1:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव कुठे आहे, ते तुकारामांच्या शब्दात...

देवा देह पाट, ह्रुदय संपुष्ट
आत कृष्ण मुर्त बैसवीली

भाव केले गंध, भक्तीच्या अक्षता
लाविल्या अनंता निढळामी

मन केले मोगरा, चित्त केले शेवंती
गळाहार प्रिती अर्पियले

जाळु क्रोध धुप, उजळु ज्ञान दीप
ओवाळु स्वरुप आम्ही त्याचे

तुका म्हणे पुजा, केली भावे एका
पंच प्राणसखा ओवाळुन



Swaneel
Wednesday, July 25, 2007 - 3:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव असतोच कुणी माना अगर मानू नका. कुणाच्या मानण्याने तो अस्तित्वात येत नाही, आणि कुणाच्या न मानण्याने तो लोप पावत नाही. गोष्ट असते ती फक्त आपण त्याच्याकडे कसे बघतो याची.

Savyasachi
Thursday, July 26, 2007 - 12:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सहज आठवल... कॉफ़ीन म्हणजे ख्रिस्ती माणसाची.... :-)

Chyayla
Thursday, July 26, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ़ करा हा लेख माझ्या कडे ईन्ग्रजीत आहे त्यामुळे जसाच्या तसा पोस्ट करतोय. यामधे स्लार्ती नी जो मुद्दा मांडला होता की नास्तिकवाद कसा यशस्वी होउ शकतो किंवा कोणत्या आशेवर ते राहतात त्यात आलेला Survival Instict चा मुद्दा त्यावर हे चपखल उत्तर असु शकेल.

Utilitarian standards cannot explain the ethical relations of men, for, in the first place, we cannot derive any ethical laws from considerations of utility. Without the supernatural sanction as it is called, or the perception of the superconscious as I prefer to term it, there can be no ethics. Without the struggle towards the Infinite there can be no ideal. Any system that wants to bind men down to the limits of their own societies is not able to find an explanation for the ethical laws of mankind. The Utilitarian wants us to give up the struggle after the Infinite, the reaching-out for the Super-sensuous, as impracticable and absurd, and, in the same breath, asks us to take up ethics and do good to society. (म्हणुनच नास्तिकवाद हा संकुचित विचाराचा, कुठेतरी माणसाची जिज्ञासा गुदमरवुन टाकणारा वाटतो म्हटले होते, शिवाय नैतिकता का, कशी?या मुळ प्रश्नाकडे दुर्लक्श केल्याने Survival Instict चा मुद्दा मागे पडतो. )

Why should we do good? Doing good is a secondary consideration. We must have an idea. Ethics itself is not the end, but the means to the end. If the end is not there, why should we be ethical? Why should I do good to other men, and not injure them? If happiness is the goal of mankind, why should I not make myself happy and others unhappy? What prevents me? In the second place, the basis of utility is too narrow. All the current social forms and methods are derived from society as it exists, but what right has the Utilitarian to assume that society is eternal? Society did not exist ages ago, possibly will not exist ages hence. Most probably it is one of the passing stages through which we are going towards a higher evolution, and any law that is derived from society alone cannot be eternal, cannot cover the whole ground of man's nature.
(evolutionary psychology च्या मताप्रमणे मानवी नैतिकतेच्या कल्पना उत्क्रांतीतून जन्म घेतात)
वर हाही तर्क आपसुकच खोडुन काढण्यात आलेला दीसतो.

At best, therefore, Utilitarian theories can only work under present social conditions. Beyond that they have no value. But a morality, an ethical code, derived from religion and spirituality, has the whole of infinite man for its scope. It takes up the individual, but its relations are to the Infinite, and it takes up society also -- because society is nothing but numbers of these individuals grouped together; and as it applies to the individual and his eternal relations, it must necessarily apply to the whole of society, in whatever condition it may be at any given time. Thus we see that there is always the necessity of spiritual religion for mankind. Man cannot always think of matter, however pleasurable it may be.

Chinya1985
Thursday, July 26, 2007 - 7:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला छान लेख आहे. मी मागे हेच लिहिल होत राधाला की जर देव वगैरे मानल नाही तर चांगल का वागाव अस बर्‍याच वेळी नास्तिक विचारतात. स्लार्तीनी लिहिलेल वरवर बरोबर वाटत पण माणुस हा अतिशय स्वार्थी प्राणी आहे त्यामुळे तो समाज वगैरे विचार करण्याआधी स्वत्:चा फ़ायदा बघतो.

Chinya1985
Thursday, July 26, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आषाढी एकादशीनिमित्य-

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव
येणे सोंसे मन जालें हावभरी परती माघारी घेत नाही
बंधनापासुनि उकलली गांठी देतां आली मिठि सावकाशें
तुका म्हणे देह भरिला विठ्ठलें कामक्रोधी घर केलें रितें


Antara
Thursday, July 26, 2007 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देव वगैरे मानल नाही तर चांगल का वागाव >>>>कृपया generelise करु नका. चांगले अनि वाईत वागनरे लोक अस्स्तिकात असतात तसे नास्तिकात पण. चांगले वागायला देवाचा धाक हवाच असे का? तस असते तर आस्तिक लोक सगले एकजात गुणी बाळे दिसली असती, पन तसे नसते यातच काय ते समजा

Chyayla
Thursday, July 26, 2007 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंतरा, तुझ्या वाचण्यात चुक झालेली दीसतेय. ईथे देवाचा धाक वैगेरे हा मुद्दा आलाच कुठे? तु आधी नीट समजुन घे ही विनंती. तरी धाकातुन नैतिकता कशी होउ शकते? उलट दुसरीकडे स्लार्तीच्या मुद्यानुसार मी जर समाजाचे वाईट केले तर माझेही वाईट होइल म्हणून आपण चांगले वागायला हवे, नैतिकता पाळायला हवी.. ईथे धाक जाणवतोच ना? शिवाय व्यक्तिची नैतिकता ही दुसर्यावर, समाजावर अवलम्बुन असावी हे जरा विचित्रच वाटत ना.
It takes up the individual, but its relations are to the Infinite, and it takes up society also

असो या आधीची स्लार्तीची पोस्ट वाच म्हणजे सगळ लक्शात येइल. तुझ्याकडे काही मुद्दे असतील वाचायला आवडेल आम्हाला.

व्वा. चिन्या खुपच सुंदर, ज्ञानेश्वरांच्या "पांडुरंग कांती " यात अद्वैताचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे भक्तिद्वारे देव मिळवल्यावर भक्ताची काय अवस्था होते याचे सुंदर वर्णन केले आहे जरुर ऐकावे असे. या गीतात आधी त्याचे गद्य रुपात निरुपण केले आहे ते तर अजुनच ऐकण्यासारखे आहे


http://smashits.com/music/marathi/songs/485/kanada-vo-vithalu.html


Aschig
Thursday, July 26, 2007 - 3:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

chyayala, source of your writing? You, or someone else?

Just like being theist may not mean being afraid of god, similarly, being atheist need not mean being unethical.

Also, the quote seems to equate atheists with utilitarians. That need not be a tautology i.e always true (just like atheists need not be unethical, as stated above).

Apurv
Thursday, July 26, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/75/128830.html?1185429265

विठ्ठल तो आला आला... नंदिनी चा लेख... काही गोष्टी ज्या सिद्ध करणे कठीण... परमेश्वराशी प्रत्येकाचे एक नातं असते... ते कोणी न शिकवता आपोआप जोडलं जातं. त्याचा आनंद... समाधान... ह्या कथेतून छान प्रकारे व्यक्त केला आहे.

Slarti
Thursday, July 26, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> The Utilitarian wants us to give up the struggle after the Infinite, the reaching-out for the Super-sensuous, as impracticable and absurd, and, in the same breath, asks us to take up ethics and do good to society.

'अनंताचा' अभ्यास सुरु असतो, सुरु आहे. cosmology आणि quantum mechanics या दोन शाखा छोट्यात छोटे आणि मोठ्यात मोठे अशा दोन गोष्टींचा अभ्यास करतात. सर्व ज्ञान आहे असे मुळीच नाही, पण जे माहिती नाही तिथे देवाचा आधार घेण्याची गरज निदान आतातरी भासत नाही. तीच गोष्ट consciousness and cognition ची. त्यावर संशोधन सुरु आहे, शिवाय आंतरशाखीय संशोधनाने मूळ धरले आहे. (त्यात अजून तरी अध्यात्माशी सांगड घालून संशोधन करण्याची गरज भासत नाहीये). म्हणून 'अनंतापाशी' आमचे struggle संपते / संपले हे मला एक चुकीचे गृहीतक वाटते. लेखकास 'अनंत' म्हणजे काय म्हणायचे आहे ते न कळल्याने मी ही उदाहरणे दिली आहेत. दुसरे काही अपेक्षित असल्यास सांगावे.

Ethics itself is not the end, but the means to the end.

जे काय ध्येय आहे तेच मी मांडले. ध्येय हे की मी व माझा वंश जगावा. एक लक्षात ठेवा की मी इथे माझा व्यक्तिगत वंश म्हणत आहे. म्हणजे माझी मुले-बाळे, माझे कुटुंब. त्यासाठी मी समाजाचा का विचार करु ? चिन्याचा प्रश्न बरोबर आहे. समाजाचा विचार directly केला जातच नाही. पण तो अतिशय indirectly होतो. प्रश्न हा की औदार्य हा सद्गुण का मानला जाऊ लागला ?
१. मी माझ्या कुटुंबाची काळजी घेणे हे तर नैसर्गिक आहे.
२. मग मी माझ्याकुटुंबाशिवाय इतरांना का मदत करू ? मी दुसर्‍या कोणाला मदत करेन कारण मला त्याबदल्यात भविष्यात परतफेड अपेक्षित आहे. अशा प्रकारे मी माझ्याकडे नसलेल्या गोष्टी मिळवू शकतो. हा 'इस हाथ से देन, उस हाथ से लेन' असा व्यवहार नाही, तर येथे भविष्यात परतफेडीची अपेक्षा आहे. पण मला काय खात्री कि दुसरा मी केलेली मदत लक्षात ठेवेल ? सुरुवातीला खात्री नाही, त्यामुळे सूरुवातीला धोका आहे. पण एकदा मला कळले कि हा मी केलेली मदत लक्षात ठेवत नाही, तर मी पुढे त्याला मदत करणार नाही. आपण संवाद साधतो, त्यामुळे 'तो परतफेड करत नाही' हे माझ्याकडून टोळीतील इतरांना कळेल आणि इतरजणदेखिल त्याला मदत करायला नाखुष होतील. आता खरा तोटा मदतीची परतफेड करायला नकार देणार्‍याचा आहे.
३. मी जर मदत करू शकतो तर ती माझ्यासाठी जमेची बाजू आहे कारण मदत कोण करू शकेल ? तोच ज्याच्याकडे शक्ती आहे (शारिरीक, आर्थिक, ई.). म्हणजे याचा एक उपयोग असा झाला कि मी 'याबाबतीत' दुसर्‍यापेक्षा वरचढ आहे हे सिद्ध झाले, (वर्चस्व सिद्ध करणे ही अजून एक नैसर्गिक प्रवृत्ती) आणि दुसरा उपयोग असा की माझ्यात मदत करण्याची शक्ती आहे हे इतरांस कळल्याने मला mate मिळवणे सोपे झाले.
४. परत मग निरपेक्ष मदतीचे / दानाचे काय ? तर 'प्रसिद्धी' महत्वाची. आपण समूहाने राहतो, भाषेद्वारे संवाद साधतो. 'मी परतफेडीची अपेक्षा न करता मदत करतो' ही प्रसिद्धी मला फायद्याची ठरते. मुळात दान / मदत का आवश्यक ? तर वरील कारणे आहेत, त्यात मी निरपेक्ष मदत करतो ही प्रसिद्धी झाली तर अर्थातच माझ्याकडे जास्त लोक मदत मागायला येणार. त्याद्वारे मी माझे वर्चस्व प्रस्थापित करू शकतो (अधिकृतरित्या करेनच असे नाही, पण एकतर ती संधी उपलब्ध होते व दुसरे म्हणजे ती जाणीव निर्माण होते.)
मला एवढेच सांगायचे आहे की मनुष्य अतिशय स्वार्थी आहेच आणि फार थोडे लोक दररोज समाजाचा विचार करतात. पण 'जर' मला समाजात रहायचे असेल तर मला समजाचे रितीरिवाज पाळणे, समाजाच्या नैतिकतेच्या कल्पना मान्य करणे आवश्यक ठरते. पण मुळात त्या कल्पना कोठून आल्या ? तर वरील कारणांमधून, जेव्हा आपण टोळ्यांमध्ये राहत होतो. तेव्हा या कल्पना जन्म घेत होत्या, असे दिसले की औदार्य वगैरे प्रवृत्ती असणारी माणसे survive होत आहेत, जास्त चांगल्या तर्हेने survive होत आहेत, साहजिकच ती प्रवृत्ती वाढत गेली आणि निती झाली.
CAUTION : मला जे औदार्य म्हणायचे आहे ते भव्यदिव्य औदार्य नाही. हे रोजच्या जगण्यासाठीचे आवश्यक असलेले 'औदार्य'. माणूस जसाजसा प्रगत होत गेला, त्याचा मेंदू अधिकाधिक गुंतागुंतीचा होत गेला, समाज आणि समाजातील व्यवहार (केवळ आर्थिक नव्हे तर इतरदेखिल) गुंतागुंतीचे होत गेले तसतसे औदार्य वगैरे नैतिक संकल्पनासुद्धा अधिक गुंतागुंतीच्या होत गेल्या, त्याला पातळ्या आल्या, त्यात थोडीफार सापेक्षता आली. पण एवढी क्लिष्टता सुरुवातीपासून नव्हती. ती क्लिष्टता आपल्या बौद्धिक प्रगतीचे जबरदस्त उदाहरण आहे हे लक्षात ठेवणे महत्वाचे.
गंमत म्हणजे हे फक्त मानवातच दिसरे असे नाही. संशोधनांती असे दिसले आहे की vampire bats कोण मदत करतो हे लक्षात ठेवतात. उदा. या वघळाने माझ्या मदतीची परतफेड म्हणून regurgitated blood दिले नाही आणि याने दिले हे लक्षात ठेवले जाते आणि त्याप्रमाणे response दिला जातो. कळपामध्ये एखादा प्राणी 'पहारा' देण्याचे, धोका आला तर इतरांना सावध करण्याचे काम स्वतःच्या जीवाला धोका पत्करून करतो. सगळेच का करत नाहीत, एकच कोणीतरी करतो. उदा. arabian babblers सारांश, 'औदार्य' हे अशा प्राण्यांमध्येसुद्धा दिसून येते कारण त्यांच्यात survival instinct बुद्धीच्या क्लिष्ट पातळ्यांखाली लपलेला नाहीये, तो 'obvious' आहे.

च्यायला, स्पष्टच सांगायचे झाले तर पहिल्या परिच्छेदात केवळ विधाने केली आहेत, लेखकास असे का वाटते हे त्याने विशद केले नाही, त्याच्या पुष्ट्यर्थ उदाहरणे, पुरावे वगैरे काहीच दिसत नाही. उद्या मी फक्त 'नैतिक कल्पना या नैसर्गिक निवडीतूनच आल्या आहेत, त्यांचा आणि धर्माचा / देवाचा काहीही संबंध नाही' असे विधान केले आणि वर म्हणालो की 'मी धर्म व नैतिकता यांचा संबंध खोडून काढला आहे' तर ते तुम्हाला पटेल का ? माझा आक्षेप त्यातील विचारांपेक्षाही चर्चेचे संकेत न पाळण्याला आहे. दुसरे म्हणजे मला त्यात सुस्पष्टता आढळत नाही. 'अनंत' म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ? (थोडे विषयांतर. मी हे आधीही विचारले होते, आता परत विचारतो : देव अनादिअनंत आहे असे प्राचीन भारतीय तत्वज्ञ सांगतात. त्याच तत्वज्ञांनी त्यांना असे का वाटते याचे काही विष्लेषण केले आहे का ? असल्यास कोणी ते थोडक्यात सांगू शकेल का ? मी पुरावे वगैरे मुळीच मागत नाही हे आधीच स्पष्ट करतो. फक्त त्यांना असे का वाटले हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे आणि इथे तो अभ्यास असलेले लोक दिसतात त्यामुळे इथे विचारतो.)

All the current social forms and methods are derived from society as it exists, but what right has the Utilitarian to assume that society is eternal? Society did not exist ages ago, possibly will not exist ages hence.

समाज शाश्वत असेल वा नसेल. समाज जर शाश्वत नसेल तर समाजावर अधिष्ठान नसलेल्या नैतिकतेला ( = देव / धर्मावर अधिष्ठान असलेल्या) अर्थ तरी काय ? आणि समाज जर शाश्वत असेल तर समाजावर अधिष्ठीत नसलेल्या नैतिकतेची गरज काय ? दुसरे म्हणजे हे जे नियम तयार झाले ते एका क्षणात तयार झाले नाहीत, मानवाच्या उत्क्रांतीबरोबरच तेही उत्क्रांत होत गेले आहेत आणि ही प्रक्रिया अजून सुरु आहे. ५० वर्षांपूर्वीच्या नैतिकतेच्या काही कल्पना आणि आताच्या कल्पना यात फरक आहे. जागतिकीकरणामुळे समाजाच्या नैतिकतेच्या कल्पनांवर काय परिणाम होत आहे हा चिंतनाचा विषय आहे. चिन्मय म्हणतो की विस्थापित लोकांना घरबसल्या खायला द्या, निदान ते विरोध तरी करणार नाहीत. हा नैतिकतेच्या कल्पनांमधील बदल नाही काय ? बाकी कारणे जाऊ द्या पण नैतिकतेच्या कल्पना जर उत्क्रांत होत असतील तेच extrapolate करून त्यांचा जन्मही उत्क्रांतीतून झाला असू शकतो ही शक्यता विचारात घेतली पाहिजे असे वाटत नाही का ? ती शक्यता आहे हेही मान्य न करणे हे 'संकुचित' नव्हे काय ?

Most probably it is one of the passing stages through which we are going towards a higher evolution, and any law that is derived from society alone cannot be eternal, cannot cover the whole ground of man's nature.

ही शक्यता मीतरी नाकारत नाही (अगदी "most probably" असे मला वाटत नाही, पण शक्यता आहे हे मान्य करतो.) देव / धर्माखातर नितीमत्तेची चाड बाळगायला माझा व्यक्तिशः विरोध नाही, चाड बाळगल्याशी कारण असे माझे मत. पण त्याच देव / धर्माच्या नावाखाली विविध मानवीसमूहांमध्ये नितीमत्तेच्या कल्पनांमध्ये जी अभूतपूर्व तफावत व सापेक्षता निर्माण झाली आहे आणि समाजाचे स्थैर्य धोक्यात आले आहे त्याचे काय ? नैतिकता देवाकडून आली असेल तर ती absolute पाहिजे, त्यात सापेक्षता कशी असेल ?
परत एकदा विनंती करतो की मी दिलेल्या यादीतील पुस्तके वाचावी. काहीच नाही तर Matt Ridley चे The origins of virtue हे पुस्तक अवश्य वाचावे. विचार न पटण्याआधी तो विचार समजणे हे महत्वाचे नाही का ? दुर्दैवाने, मी याहून सविस्तर समजवून देऊ शकत नाही.


Peshawa
Thursday, July 26, 2007 - 5:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

what dawkins say :-)
God1?
God2?

discussion


What slarty says that ethical behavior can be explained by evolution Interesting demonstration by dawkins :-)

Good Guys Win First



Blind watchman:-)

part1
part2


check this also

Universe


Apurv
Thursday, July 26, 2007 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते देव आहे की नाही हे जाणून घेण्या साठी तुम्हाला पुस्तके... संशोधन वगैरेची काही गरज नाही...

सर्वसाधारण पणे हे माहीती आहे ना की जर देव असेल तर तो सर्व प्रणिमात्रांमध्ये आहे... मग जर का तुमच्या मध्ये देव असेल... किंवा देवाचा अंश असेल तर तुमच्या पेक्षा त्याबद्दल अधिक तुम्हाला कोण सांगू शकेल?

पुस्तके हवी तेवढी वाचाल... त्याला मर्यादा नाही... पण त्याने तुम्ही स्वत: मध्ये देव आहे की नाही हे कसे जाणाल?

त्यामुळे तुम्ही स्वत: मध्ये डोकाऊन पहा... म्हणजे... दिल चाहता है मध्ये आमिर खान म्हणतो ना की... ये सवाल तुम्हे अपने आप से पुछना है...


Slarti
Thursday, July 26, 2007 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी वर मांडलेले काही मुद्दे डॉकिन्सच्या The God Delusion मधील The roots of morality : why are we good ? या धड्यातून घेतले आहेत. मी सांगताना gene चा आधार घेतला नाही कारण ते करणे मला जास्त अवघड वाटले, शिवाय ते नीट जमले नाही तर गैरसमज जास्त निर्माण होतात जसे खुद्द dawkins त्या docu च्या सुरुवातीस सांगतो. त्यामुळे पेशवा, links बद्दल धन्स.
अपूर्व, आत डोकावून पाहताना आठवले की आमिर खान असेही म्हणतो... पर्फेक्शन को और पर्फेक्ट करना मुष्कील है...


Zakki
Thursday, July 26, 2007 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडक्यात, हिंदी सिनेमे पहावेत!


Pancha
Friday, July 27, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थोडक्यात, हिंदी सिनेमे पहावेत!
- आणि नंतर मायबोली वर "चित्रपट कसा वाटला" ते सांगणे


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators