|
Mansmi18
| |
| Monday, July 23, 2007 - 12:17 am: |
| 
|
नमस्कार, थोडेसे विषयांतर होतय पण मला कोणी नास्तिक सांगेल का कि त्यांचा typical दिवस कसा असतो? धन्यवाद.
|
माझा टिपिकल दिवस चार चौघासारखाच जातो.
|
Radha_t
| |
| Monday, July 23, 2007 - 5:14 am: |
| 
|
च्यायला देव धर्म सामजिक दोष यात माझा गोंधळ उडालाय हे तुम्हाला मान्य आहे तर. फक्त माझाच उडालाय की पूर्ण समाजाचा जे जरा चिंतन करून तुमच तुम्हीच ठरवा. देव म्हणजे काय हे समजण्याची माझी कुवत नाही हे मी आधीच सांगितले आहे. देव म्हणजे काय हे तुम्ही मज पामराला सोप्या शब्दात सांगाल तर मी उपकृत होईन. moral support इथे मी moral support देऊ शकले असते चा अर्थ माझ्यासारखी तिथे अडकलेली किंवा सोबत असलेली कोणतिही व्यक्ति असा होतो. अहंकाराचा आणि नास्तिकतेचा संबंध नसावा असे मला वाटते. आस्तिक अहंकाराची उदाहरण द्यायची गरज असल्यास कळवावे. दुसरी गोष्ट चांगले संस्कार याचा अर्थ जरा समजून सांगाल काय? उगा दुसर्याला त्रास देऊ नये जगा आणि जगू द्या. एवढा एकच संस्कार तुम्हाला पुरेसा वाटत नाही काय BTW तुमच्यावर कोण कोणते संसकार झालेत, तुम्ही किती भाग्यवान आहात ते आम्हालाही कळु द्या. त्या विचारांची जी दुर्गती व्हायची ती झालेली आपण पहातच आहोत. तुम्ही अकांगी विचार करताय अस वाटत नाही काय. दुर्गती झालिये अस तुम्ही म्हणता. सगळ्यांनी ते मान्यही करायला हवय ना. मला सांग ज्यान्नी देव नाकारला त्यान्नी काय दीवे लावलेत देव मानणार्यांनी काय दिवे लावलेत त्याची सुद्ध list काढूयात का आपण चिन्या शुद्रांना मंदिरात नाकारल गेल याचा तुम्हा लोकांना आनंद व्हायला पाहिजे. कारण मंदिर वगैरे थोतांड,अंधश्रध्देच्या ठिकाणी ते गेले नाहित तर ते त्यांच्या फ़ायद्याचेच आहे नाहि का??मग तुझा त्याच्यावर आक्षेप का? शूद्र नास्तिक होते हे ठरवणारे तुम्ही कोण? BTW इथे तुम्हा लोकांना चा अर्थ काय होतो जरा elaborate कराल? क्षमापानम च्यायला - तुमच नाव मला आजिबात आवडल नाही. ( संस्कारांचा यात किती हात? एक भाबडा प्रश्न ) . आधी उलट सुलट विचार न करता बोलायच आणि मग क्षमा मागायची मला पटत नाही. चूक झाली असेल तर काय होईल ती शिक्षा भोगायला तयार आहे.
|
Radha_t
| |
| Monday, July 23, 2007 - 5:15 am: |
| 
|
मनोज - तुम्हीच आधी सांगा की तुमचा typical दिवस कसा जातो ते. नम्र विनंती बर.
|
Aschig
| |
| Monday, July 23, 2007 - 5:36 am: |
| 
|
folks, I have not been able to finish G4 yet (or the follow-up discussion). Thanks for being patient.
|
Chyayla
| |
| Monday, July 23, 2007 - 6:17 am: |
| 
|
राधा माझ्या पोस्ट वर काही तरी उत्तर दील्याबद्दल धन्यवाद पण मला खरेच तुम्हाला काय म्हणायचे काहीच कळाले नाही किंवा तुम्ही एक तर पोस्टच नीट नसेल वाचली. त्यातल्या त्यात आयडीला नाव म्हणुन का समजताय?.. शुद्र हे नास्तिक?.. एकांगी विचार त्यांची झालेली दुर्गती ते तर मी पुराव्याने मांडले तुम्ही पण पुराव्याने उत्तर देउ शकला असता तर मी मान्य केले असते व आमच्या ज्ञानातही भर पडली असती... तुम्ही नास्तिकतेचे गुणगाण करत होता म्हणुन त्यातला फ़ोलपणा दाखवला, कारण दुसरीकडे तुम्हीच देवाला अनावश्यक, टाकाउ वैगेरे म्हणत होतात ना? बाकी देवाच्या नावावर होणार्या दांभिकतेला विरोधच केला आहे याकडे तुम्ही जाणुन बुजुन दुर्लक्ष का केले? अजुनही काही मार्मिक प्रश्न विचारले आहेत त्याचही उत्तर शोधत आहे.. तुमच्या उत्तरावरुन सध्या तरी काहीच ताळमेळ लागत नाहीये... असो तरी आपला आभारी आहे.
|
Radha_t
| |
| Monday, July 23, 2007 - 7:07 am: |
| 
|
कोणते पुरावे दिलेत मलाही समजले नाहित. आणि माझ नाव राधा नाही तो माझा ID आहे. मी विचारलेले बरेच प्रश्न कदाचित मार्मिक नसतिलही पण अनुत्तरित रहिलेत हे खर. तुम्हिही माझी post नीट वाचलेली दिसत नाही. काही गोष्टी तुम्हाला उद्देशुन आहेत काही चिन्याला.
|
Mansmi18
| |
| Monday, July 23, 2007 - 8:59 am: |
| 
|
राधा, माझा दिवस चारचौघांसारखाच असतो फक्त त्यात देवाच्या प्रार्थनेचा समावेश असतो. आता तुम्ही नास्तिक लोक आमच्यासारखे अन्धश्रद्ध नाहीत त्यामुळे तुमचा सारा वेळ आत्मचिंतनात आणि लोकांची दु:खे दूर करण्यात जात असेल म्हणुन विचारले. दुसरी गोष्ट, आतापर्यंत तुमची पोस्ट्स फ़क्त देवाविरुद्ध आणि आस्तिकांविरुद्ध अतिशय तीव्र भाषेत गरळ ओकण्यात गेली आहेत. दुसरे काय म्हणत आहेत हे नीट न वाचता तुम्ही जे अगदी वाट्टेल ते लिहित आहात. प्रथम प्रथम मी तुमच्या पोस्ट्स ला उत्तर लिहिली पण नंतर लक्षात आले कि काही खाजगी कारणामुळे तुमच्यात देवाबद्दल इतका द्वेश भरला आहे कि तुम्ही तीच तीच गोष्ट परत परत लिहुन उगाच वितंडवाद घालत आहात. तुमचे प्रश्न अतिशय वरवरचे आणि पुर्ण विचार न करता लिहिलेले वाटतात. त्यातुन तुमची कोणीहि लिहिलेले वाचायची तयारी दिसत नाही. एखादा मुद्दा शंभरवेळा परत परत लिहिला म्हणून तो ग्राह्य होत नाही. तुमच्यासारखेच इतरही नास्तिक लिहितात पण त्यांच्यात देवाबद्दल द्वेष दिसत नाही.
|
Chyayla
| |
| Monday, July 23, 2007 - 1:56 pm: |
| 
|
राधा, माझी २० जुलै आणी २२ जुलै ची पोस्ट आहे त्यात दुर्गती बद्दल २ उदाहरणे दीलीत. आता या उप्पर मी तुम्हाला पोस्ट कशा वाचायच्या ते सांगु शकत नाही. मनस्मी चे म्हणण्यात तथ्य आहे खरच माणुस एकदा द्वेशाने आंधळा झाला की सारासार विचार करण्याची कुवत घालवुन बसतो. आणी मग असा गोंधळ उडतो. आणी मग चांगल्या चालु चर्चेला वेगळेच वळण मिळते. माझा तुमच्याबद्दल वैयक्तिक द्वेश नव्हता व अजुनही नाही कारण तुमचे अश्या प्रकारे लिहिण्यामागचे कारण समजु शकतो. केवळ याच साठी मी क्षमापान केले होते, असो अजुन ते तुमच्या लक्षात यायला वेळ लागेल कदाचित.
|
Tiu
| |
| Monday, July 23, 2007 - 3:31 pm: |
| 
|
एकंदरीत असं दीसतंय की आस्तिक लोक (काही मंडळी सोडून) उपहासात्मक आणि वैयक्तिक टीका करण्यावर जास्तं भर देत आहेत... healthy discussions होत नहियेत असं वाटतंय!
|
Zakki
| |
| Monday, July 23, 2007 - 4:49 pm: |
| 
|
नेहेमी असेच होते. मांडायचे ते मुद्दे मांडून झाले, नवीन काही उरले नाही लिहायला, की लोक असेच करतात. इथेच नाही तर कुठल्याहि BB वर पहा. जरा दहा पंधरा postings झाली की सगळे हे असेच!
|
राधा, तुम्ही लोक म्हणजे तुम्ही निरिश्वरवादी. जर तुम्ही निरिश्वरवादी देव वगैरे थोतांड मानता आणि श्रध्दांना फ़सवणुक वगैरे मानता तर मग तशी फ़सवणुक शुद्रांची होत नाही तर तुम्ही निरिश्वरवाद्यांनी आनंदी व्हायला हव. पण आधी त्यांना मंदिरात शिरण्यास प्रवृत्त करायच आणि मग म्हणायच हे सगळ थोतांड आहे तिथे जाउ नका. ही गोष्ट चुकिची आहे. मान्य आहे की धर्माच्या नावावर चुकिच्या गोष्टी पसरवल्या जातात. किंवा फ़सवणुक वगैरे केली जाते पण म्हणुन सर्व थोतांड म्हणने चुकिचे आहे. पण ते तर प्रत्येक क्षेत्रातच होत. शिक्षणक्षेत्रात भ्रष्टाचार आहे म्हणुन शिक्षणक्षेत्रच बंद करा म्हणने चुकिचे आहे. देव म्हणजे कोण आहे हे मी मागेच लिहिल होत. देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण. तु भगवद्गीता एकदा वाच. पण त्यातल्या चुका काढण्याच्या मनोवृत्तिने वाचु नकोस. तर ती समजुन घेण्याचा प्रयत्न कर. तुला नक्की फ़ायदा होईल. तु लिहिलय चांगल जगा आणि दुसर्यांना जगु द्या हा एक संस्कार पुरेसा नाही का?. पण बर्याच वेळा निरिश्वरवादी म्हणतात आम्ही का चांगल जगाव??चांगल जगायच का वाईट हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे.
|
देव हा न्यायी आहे वगैरे म्हणतात. देवाच्या मर्जीवाचून एक पानही हलत नाही असाही दावा वाचनात आला आहे. मग जे लोक देवाला हायज्याक करुन धार्मिक नेते बनतात, अनेक दुष्कृत्ये करतात त्यांना देव ताबडतोब शिक्षा का देत नाही बरे? जसे मध्ययुगात कित्येक लोकांना देवाच्या नावाखाली जिवंत जाळले, अन्य अत्याचार केले. देवाला जीवन जगण्याविषयी जे सांगायचे होते ते त्याने धर्माच्या माध्यमातून सांगितले आहे असे त्या त्या धर्माचे लोक सांगतात. (हे खोटे आहे का?) बाकी पापांची शिक्षा देव सावकाश देत असेल असे मानू पण देवाचे खोटे प्रतिनिधित्व करून निरपराध लोकांवर अत्याचार करणे, लुबाडणे, स्वत:चे उखळ पांढरे करून घेणे हे देवाच्या दृष्टीने गंभीर अपराध असले पाहिजेत. अशा लोकांना देवाने ताबडतोब जबरदस्त शिक्षा दिली आहे अशी उदाहरणे आहेत का? की ते फक्त पुढल्या जन्मातच होते असे समजायचे? की असल्या गोष्टी सामान्यांच्या कुवतीच्या बाहेर आहेत असे समजायचे?
|
Slarti
| |
| Monday, July 23, 2007 - 7:16 pm: |
| 
|
>>> नास्तिकाना आशा करायला काही तरी भक्कम आधार लागत असेल तर मग तो आधार कोणता? मी माझ्या पोस्टमधे राधाच्या Moral support च्या मुद्द्यावर याबाबततच लिहिले आहे. अजुन एक मुद्दा "ऋणं कृत्वा घृतं पीबेत" असा चार्वाकाप्रमाणे नास्तिकवाद मानला तरी थोडा विचार करा याचे काय भयंकर परीणाम होतील. कुणाची किंवा देवाची चिंता कशाला करायची? आपण आपले जीवन भोगात घालावे बस हे त्यांचे तत्वज्ञान... थोडा विचार कर भोग मिळवण्यासाठी मग मनुष्य कोणत्या थराला जाउ शकतो. कुणाचा मुडदा जरी पाडला, कुणावर जबरदस्ती करायलाही त्याला काहीच वाटणार नाही. हा मुद्दा महत्वाचा आहे. नैतिकता, चांगल्या-वाईटाच्या कल्पना, सद्गुण, सदाचार याबद्दलच्या कल्पना कोठून आल्या ? मला वाटते की तुमचा प्रश्न या प्रश्नाचा एक भाग आहे. evolutionary psychology च्या मताप्रमणे मानवी नैतिकतेच्या कल्पना उत्क्रांतीतून जन्म घेतात. उदा. "ऋणं कृत्वा..." हे आचरणात आणले का जात नाही ? जर प्रत्येकाने ते आचरणात आणण्याचे ठरवले तर समाजात प्रचंड गोंधळ निर्माण होईल, अनाचार माजेल. ही अवस्था समाजाच्या हिताची नाही. समाज यातून कोसळू शकतो. समाजाचे हित हे माझ्या हिताशी निगडीत आहे, त्यामुळे समाजाला असलेला धोका हा पर्यायाने माझ्या अस्तित्वाला धोका होतो. त्यामुळे असे वर्तन बोकाळू नये याची काळजी मी आणि पर्यायाने समाज घेतो. कसे ? तर त्यासाठी कायदे केले जातात. कायद्यांच्याद्वारे हे वर्तन थांबवण्याचा प्रयत्न केला जातो. नुसते कायदेच नव्हे तर त्याला social taboo चे रूप दिले जाते, जेणेकरून असे समाजघातकी वर्तन काबूत आणता येईल. सारांश, "ऋणं कृत्वा..." वागणे हे माझ्या, माझ्या प्रजातीच्या हिताचे नसल्याने ते (मोठ्या प्रमाणावर) होत नाही. The survival instinct of our own species kicks in and prohibits/discourages these things from happening. आता आशेचा प्रश्न आहे. माझ्या नैतिकतेच्या कल्पना मानवजातीच्या जगण्याशी, त्या जातीच्या प्रगतीशी निगडीत आहेत. थोडक्यात, त्या कल्पना survival and propagation of my species या अतिशय मूलभूत नैसर्गिक भावनेतून जन्माला आल्या आहेत. तद्वत माझी आशा हीसुद्धा त्या भावनेतून निर्माण झाली आहे कारण निराशावाद हा संहारक आहे. मग आशा ठेवायची कशावर ? आशा ही की मी आणी माझा वंश जगेल, प्रगती करेल. मग यातून अत्यंत स्वार्थी वर्तन जन्माला येऊ शकते. पण तो स्वार्थ जेव्हा समाजविघातक ठरतो, तेव्हा कायदे, social taboo आड येतात. ठीक आहे, पण मग समाज जेव्हा घडत होता तेव्हा तर कायदे वगैरे काहीच नव्हते. तेव्हा काय होत होते ? उदा. या basic instinct मुळे मी जमा केलेले अन्न माझ्याकडेच ठेवू लागलो. पण ते वाटून घेतल्याशिवाय मला mate मिळणार कसा ? दुसरे, मला समुहाशिवाय जगणे अवघड आहे आणि समुहात रहायचे असेल तर अन्न वाटून घेणे भाग आहे. जो हे करणार नाही त्याला समुहातून बाहेर तरी केले जाईल किंवा समूहात त्याच्याबद्दल नाराजी पसरेल. काहीही झाले तरी त्याच्या अस्तित्वाला धोका आहे. पर्यायाने स्वार्थी वर्तनाला आळा बसतो. येवढेच नव्हे तर टोकाचा स्वार्थ सोडला तर मला जास्त फायदा आहे ही समज निर्माण झाली. मी फक्त एक उदाहरण दिले, पण ही मीमांसा इतर ठिकाणीसुद्धा लागू होते. Ultimately, my own survival and the survival of my progeny is inherently connected to the survival of my species. There is no further basic instinct than this instinct. पण हे सर्व असले तरी लोक विकृत का वागतात ? त्यांचे survival instinct कुठे जाते ? एक शक्यता अशी की त्यांना sunconsciously असे वाटत असावे की असे वागणे त्यांच्या (आणि पर्यायाने species च्या) हिताचे आहे. मुस्लिम अतिरेक्यांना असे वाटते की इस्लाम हाच जगण्याचा खरा मार्ग आहे. हे सर्वच धर्मांधांबद्दल खरे आहे. दुसरी शक्यता अशी की त्यांचे मानसिक संतुलन ढळले आहे. कुठलीही प्रजाती perfect नाही. aberrations, abnormalities येणारच. तिसरी शक्यता अशी की परिस्थिती त्यांना असे वागायला भाग पाडत आहे (हूडांनी दुसर्या BB वर परिस्थितीतून गुन्हेगारी कशी निर्माण होऊ शकते याचे छान विवेचन केले आहे.) In fact, the reason they turn to crime is their survival. So their survival instinct is, in fact, intact. It is just that their notion clashes with the notion of survival of the rest of the society. Given the complex nature of our society and human mind, this clash arising out of difference in ideas is inevitble. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे नैतिकता, आशा वगैरे भावनांचा उगम उत्क्रांतीद्वारे विशद करता येवू शकतो. त्यामुळे नास्तिकांना देव, धर्म या संकल्पनांची गरज वाटत नाही. माझे वरील विवेचन अतिशय थोडक्यात आहे, सविस्तर विवेचन वाचायचे असल्यास richard dawkins ची the selfish gene, The god delusion , daniel dennett चे Darwin's dangerous idea , steven pinker चे the language instinct, how the mind works ही पुस्तके वाचावीत. चार्वाकाचा नास्तिकवाद कशातून आला हे मला माहिती नाही. आधुनिक नास्तिक विचार हा भौतिकशास्त्राबरोबरच नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताशी निगडीत आहे. त्यामुळे आधुनिक नास्तिक विचार समजून घ्यायचा असेल तर हा संबंध समजून घेणे महत्वाचे.
|
आता तुम्ही नास्तिक लोक आमच्यासारखे अन्धश्रद्ध नाहीत त्यामुळे तुमचा सारा वेळ आत्मचिंतनात आणि लोकांची दु:खे दूर करण्यात जात असेल म्हणुन विचारले. जरा अधिक स्पष्ट कराल आणी आधुनिक नास्तिकवाद जाणून घेण्यासाठी डॉकिन्स ची पुस्तके उपयुक्त आहेत
|
Mansmi18
| |
| Tuesday, July 24, 2007 - 2:11 am: |
| 
|
विजय, माझी ही comment जरा वेगळ्या प्रकारे व्यक्त झाली. मी typical दिवसाबद्दलचा प्रश्न कुठल्याही उपहासाने किंवा कुत्सिततेने विचारला नव्हता. दिवसातुन एकदातरी देवाची प्रार्थना किंवा स्मरण केले नाही तर मला चुकल्यासारखे वाटते किंवा काहीतरी राहुन गेल्यासारखे वाटते. नास्तिक हे करत नसतील त्यामुळे त्याना कुठल्या गोष्टीने मन्:शांती आणि सामर्थ्य मिळते हे विचारण्याचा माझा उद्देश होता. त्यासंदर्भात मी विचारले होते पण मधे काही हेटाळणीच्या प्रश्नांमुळे माझ्या उत्तरातही थोडी कटुता आली. यापुढे असे होणार नाही याची काळजी घेइन. उत्तराची अपेक्षा आहे. धन्यवाद.
|
Radha_t
| |
| Tuesday, July 24, 2007 - 5:09 am: |
| 
|
च्यायला राधा खरच तुमच नाव खुपच छान आहे, मला तुमच्याबद्दल वैयक्तिक रोष नाही कारण सगळ्यांची बुद्धी, अनुभव, संस्कार (चांगले संस्कार व्हायलाही भाग्य लागत) हे वेगवेगळे असतात. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की माझ्यावर संस्कार झालेले नाहीत किंवा जे झालेत ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे लायकीचे नाहीत. असा अर्थ मी काढून घेतला त्याबद्दल मी तुमची सर्वांसमक्ष माफी मागते. हव असेल तर माफी पत्र लिहून देईन. तुम्ही माफ करालच अशी अपेक्षा. धन्यवाद. अन्यथा द्याल ती शिक्षा भोगायची तयारी आहेच. ------------------------------------------------------------------- चिन्या शुद्रांना मंदिरात नाकारल गेल याचा तुम्हा लोकांना आनंद व्हायला पाहिजे. कारण मंदिर वगैरे थोतांड,अंधश्रध्देच्या ठिकाणी ते गेले नाहित तर ते त्यांच्या फ़ायद्याचेच आहे नाहि का??मग तुझा त्याच्यावर आक्षेप का? पन शुद्र नास्तिक होते आणि त्यांन मंदिरात जायची इच्छा नव्ह्ती हे तुम्ही कस काय गृहीत धरलत? की शुद्रांनी नास्तिकच असायला पहिजे अस देवाने सांगितलय? राधा, तुम्ही लोक म्हणजे तुम्ही निरिश्वरवादी. जर तुम्ही निरिश्वरवादी देव वगैरे थोतांड मानता आणि श्रध्दांना फ़सवणुक वगैरे मानता तर मग तशी फ़सवणुक शुद्रांची होत नाही तर तुम्ही निरिश्वरवाद्यांनी आनंदी व्हायला हव. पण आधी त्यांना मंदिरात शिरण्यास प्रवृत्त करायच आणि मग म्हणायच हे सगळ थोतांड आहे तिथे जाउ नका. ही गोष्ट चुकिची आहे. पुन्हा तेच, शुद्र देव मानत नव्हते हे तुम्हाल कोणी सांगितल? आणि जर ते देव मानत असतील तर त्यांची फसवणूक होते अस कोणताही नास्तिक / निरिश्वरवादी म्हणणार नाही. ---------------------------------------------------------------- Mansmi18 काही खाजगी कारणामुळे तुमच्यात देवाबद्दल इतका द्वेश भरला आहे कि तुम्ही तीच तीच गोष्ट परत परत लिहुन उगाच वितंडवाद घालत आहात तुम्ही अमेरिकेतल्या बायका हळदीकुन्कवाला पीतात ती wine घेउन पोस्ट लिहिलेय का हो तुम्ही केलेली अशी अनेक वक्तव्य मला वैयक्तीक टिका वाटते. मी जर अशी तुमच्यावर कुठे वैयक्तीक टिका / हल्ले केले असेल तर आधीच क्षमा मागते. आणि ते कृपा करून माझ्या लक्षात आणुन द्यावे ही विनंती. आणि माझ्या अजाणतेपणामुळे मला तुमची सगळी वक्तव्य वैयक्तीक हल्ले वाटले याबद्दलही तुमची सर्वांसमक्ष क्षमा यचना करते. तुम्ही थोर मनाने मला क्षमा करालच अशी अपेक्षा. अन्यथा द्याल ती शिक्षा भोगायची तयारी आहेच.
|
Chyayla
| |
| Tuesday, July 24, 2007 - 6:42 am: |
| 
|
स्लार्ती, फ़ार छान मुद्दे मांडलेस मी नक्की विचार करेल तुझ्या सगळ्या मुद्यांवर. सध्या स्लार्तीने जे मुद्दे मान्डले त्यात मला कुतुहल असे वाटते की जर अशी Theory असेल तर मग पुढे त्या Theory ला तो विचार मांडणार्या व्यक्तिला महत्व प्राप्त होउ शकते मग ही सगळी Theory समजावी त्याची खुण पटावी व पुढच्या पीढीला द्यावी म्हणुन काही संकेत, प्रतिके निर्माण होउ शकतात किंवा असे लोक ते या Theory ला मानतात त्यांचा समुह, समाज किंवा State च निर्माण होउन त्यालाच महत्व येउ शकत म्हणजे कुठेतरी त्याना आधार, किंवा श्रद्धा ही ठेवावीच लागेल. म्हणजे फ़िरुन आपण एकाच ठीकाणी तर पोहोचत नाही ना? चांगले संस्कार व्हायलाही भाग्य लागत खर म्हणजे कोणतेही संस्कार वाइट असो वा चांगले त्यानी एक बंधन, ठरावीक चौकट निर्माण होते व मनुष्य त्यातच बंदीस्त होतो. म्हणुनच अध्यात्मात म्हटले की देवाच्या मार्गावर या चांगल्या वाईटाच्याही पुढे सर्व प्रकारच्या बंधनातुन मुक्त होत पुढे जाणे श्रेयस्कर. त्यामुळे कोणते संस्कार वाईट कोणते चांगले हे मी ठरवणारा कोण. त्याला उत्तर काळच देतो व त्याच त्यालाच पुढे मागे आपोआप कळत. कुणाच्या सांगण्याने काही फ़रक पडत नाही. उगीच कुणाला अगदी मलापण आपल्यावर चांगले संस्कार झाले असे समजुन गर्व नको व्हायला किंवा कुणावर वाईट झाले म्हणुन मनाला तुछ्:अता येउ देउ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यामुळे पुढे असे शब्द लिहिण्याचे नक्की टाळेल. खर तर वरच्या वाक्याचा अर्थ कोणाला वाटेल तसा घेता येतो. जर तुमचा काही गैरसमज झाला असेल तर मीच माफ़ी मागतो तसे क्षमापान मी आधीच केले होते. त्यावरही तुम्ही मला उलट सुलट लिहिले पण मला तुमचा राग अजीबात आला नव्हता. असो स्वामी विवेकानंदानी एक खुप छान उदाहरण दीले आहे. की जे काही थोर संत महात्मे, प्रतापी होउन गेलेत ज्यानी भारताचा अभिमान सतत वाढवत ठेवला त्या सगळ्यामधे एक गोष्ट फ़ारच महत्वाची व समान होती की त्यांच्यावर लहानपणी झालेले संस्कार त्यात सगळ्यात मोठा वाटा माता-पित्यांचा अगदी त्यांचे माता पिता आंधळेपणानेही भक्ति करायचे त्यान्ना ज्ञान, तर्क काही माहित नाही, माहित आहे तर फ़क्त शुद्ध प्रेम आणी केवळ प्रेम अशांकडेच असामान्य व्यक्तिनी जन्म घेतलेला आढळतो. या गोष्टीचा नीट अभ्यास केला तर सहज लक्षात येइल. मला तरी आता सगळ्यामार्गापेक्षा भक्तिमार्ग हाच भावतोय त्याशिवाय ईतर मार्ग फ़ारच कोरडे वाटतात. श्रद्धा, भक्तिनेच आपोआप ज्ञानही निर्माण होते हे खरे. पण ती निर्माण व्हायला संस्कार व सत्संग मिळणे यालाही भाग्य लागतच.
|
Radha_t
| |
| Tuesday, July 24, 2007 - 7:56 am: |
| 
|
Mansmi18 राधा, माझा दिवस चारचौघांसारखाच असतो ... आता तुम्ही नास्तिक लोक आमच्यासारखे अन्धश्रद्ध नाहीत त्यामुळे तुमचा सारा वेळ आत्मचिंतनात आणि लोकांची दु:खे दूर करण्यात जात असेल म्हणुन विचारले. आजिबात नाही, आत्मचिंतन, आणि लोकांची दुःख दूर करण्याचा मक्ता फक्त आस्तिकांचा. आमचा ( नको नको ) माझा पूर्ण वेळ फक्त माझ्या स्वार्थासाठी असतो. माझा स्वार्थ यात माझा परिवार, माझे स्वास्थ्य आणि माझ करियर यांचा समावेश आहे. फक्त कुणालाही कुठल्याही प्रकारे दुखवू नये ही काळजी सर्वतोपरी घ्यायचा प्रयत्न करते. त्यातूनही दुखावले गेलेच तर " प्रभूची इच्छा " न मानता परिणाम ( कर्मफळ ) भोगायची तयारी असते. typical दिवस कसा जातो याच समाधान कारक उत्तर मिळाल असेल अशी आशा. Chyayla मला वाटत तुमच्यासारख्या व्यक्ति ह्या रोज तान्दुळात काही खडे आहेत म्हणुन तान्दुळच फ़ेकुन देत असाव्यात. आजिबात नाही. आम्ही तांदुळातून खडेच काढुन टाकतो. पण जर तांदळात खड्यां ऐवजी, खड्यांमधे तांदूळ असतील तर मात्र तांदळासकट खडे फेकून देतो.
|
Radha_t
| |
| Tuesday, July 24, 2007 - 8:16 am: |
| 
|
Slarti post आवडली. तुम्ही नमूद केलेली पुस्तक वाचण्याचा मोह होत आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|