|
Aschig
| |
| Monday, July 16, 2007 - 6:00 pm: |
| 
|
खरेखुरे देवतत्व. जर देव खरेच अस्तित्वात असेल, आणी मी नास्तिक असेन, तर केवळ माझ्या मनात देव नसल्यामुळे काही फरक पडणार नाही. G1 या model मध्ये देव खरच अस्तित्वात असतो, आणी कुणाला काहीही वाटो प्रत्येक व्यक्ति ही पुर्णपणे देवाचा अंश असते. पुर्णपणे physical उदा. घ्यायचे झाल्यास universe == god आणी व्यक्ती म्हणजे केवळ आपले भौतीक शरीर. तुझ्या आणी मझ्या शरीरामध्ये physically काही common नाही पण आपण एकाच universe मध्ये रहातो, म्हणुन मग ते G11 model असेल. सर्व (केवळ G11-G18 न्हवे तर G21-G26 ई.) पैकी एकच model योग्य असल्याने, देवाच्या कोणत्या संकल्पनेमुळे कोणते models eliminate होतात हे कळण्यास आपल्याला मदत होऊ शकेल.
|
Aschig
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:29 am: |
| 
|
2-person developments for G2 G3 and G6 (G4 and G5 to come later).
|
Aschig
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:37 am: |
| 
|
Trying to upload the image yet again ...
|
महाबळ, तुम्ही इथे जे काही टाकलं आहे, ते अजिबात समजले नाही. देव ही संकल्पना समजायला इतकी अवघड असेल याची कल्पना नव्हती.
|
Aschig
| |
| Tuesday, July 17, 2007 - 6:21 am: |
| 
|
सतीश, उरलेले १-२ भाग तयार झाले की मी detailed examples द्यायचा प्रयत्न करीन. models नेमके काय आहेत हे समजेपर्यन्त क्लिष्ट वाटतील. असा प्रयत्न मी देखील पहिल्यांदाच करतो आहे, पण एक्-दोन गोष्टी लगेच जाणवल्या. G3 मी अद्वैतवादाकरता वापरतो आहे. यात आपण आणी देव यात द्वैतभाव नसतो. माझ्या models मध्ये देव आणी व्यक्ती यांचा overlap हिरव्या रंगाने दाखवीला आहे. त्यामुळे G3 मध्ये केवळ हिरवा रंगच दिसतो. दोन व्यक्ति जर असतील आणी दोघांचाही देव एकच असेल तर G32 हे model असणार. जर दोघांचा देव पुर्णपणे भीन्न असेल तर G31 असणार, आणी partial commanality असेल दोघांच्या देवात तर G33 असणार ( overlap चा रंग G+G+P असा वापरला आहे शक्य आहे की हे submodel चालणार नाही). पण G33 किंवा G32 असण्याकरता व्यक्तिंमधे देखील commonality असावी लागेल. नाहीतर देव सुध्धा भीन्न असतील. अद्वैतवाद स्विकारला तर या ३ पैकी कोणते model खरे असावे हे आपल्याला ठरवावे लागेल. आणी तिन्ही जर शक्य नसतील तर अद्वैतवादाचा त्याग करावा लागेल. अर्थात व्यक्तिंमध्ये commonality म्हणजे नेमके काय या बद्दल देखील वीचार करायला हवा. तुम्हाला काय वाटतं?
|
आशिष बाकीचे भाग देखील येउदेत. पण तू खरेच जबरी परिश्रम घेतो आहेस. धन्यवाद. च्यायला, मनोज आणि इतर, सेट थेअरी तुम्हाला देवाच्या बाबतीत वापरणे पटते का? जर तुमचा मुद्दा सेट थेअरी वापरणे हेच योग्य नाही असा असेल, तर मग चर्चाच नाही करता येणार.
|
Asami
| |
| Tuesday, July 17, 2007 - 2:10 pm: |
| 
|
pardon me for intrusion, but you guys got to read this one Search for "want a hotline to god? call a republican" apparently it 19s not just president bush who has a direct connection to god, from whom he receives affirmations on his actions and principles. he seems to have wangled a 1cparty 1d discount from god vis-a-vis these hotlines and now every second republican seems to have and use one. like our esteemed senator vitter from louisiana, who, after having been outed on his connections to the washington d.c. prostiution ring, now asks the media and the tax-paying public he purportedly serves to move on, since he has 1creceived forgiveness from god. 1d and while he 19s at it, he also accuses his political enemies of using this to make him seem like an unprincipled, bad man who does things contrary to his values. bad democrats! say sorry! that 19ll teach those atheists who go around committing all kinds of sins. who will they go and receive forgiveness from, pray tell?!
|
Slarti
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:18 pm: |
| 
|
आशिष, venn diagrams ची कल्पना interesting आहे. बुशच्या नावाने बोंब मारायची सोय राहिली नाही, प्रतिभाताई मृतात्म्यांशी संवाद साधतात असे ऐकतो.
|
Mansmi18
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:58 pm: |
| 
|
च्यायला, मनोज आणि इतर, सेट थेअरी तुम्हाला देवाच्या बाबतीत वापरणे पटते का? ------------------------------------------------ तान्या, मला त्या diagrams मधुन काय निष्कर्ष निघणार आहे हेच कळले नाही. जर कोणी सोप्या शब्दात ते समजावले तर समजुन घेण्याचा प्रयत्न करीन. राहिले पटण्याचा प्रश्न.... कुठलेही समीकरण माझ्या देवाच्या संकल्पनेत बदल करु शकणार नाही. समजा असे सिद्धही झाले कि देव नाही तरीही माझ्यापुरता तो असेलच. पण असे असले तरी आशिषचा हा प्रयत्न अतिशय sincere आहे आणि त्यामुळे त्यातुन काय निष्कर्ष निघतोय हे पहायला मी अतिशय उत्सुक आहे. सेट थिअरी हा देवाला जाणुन घ्यायचा आणखी एक प्रयत्न त्यात मला वावगे काहेच वाटत नाही.
|
Radha_t
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:40 am: |
| 
|
वेन डायग्रॅमचा रिझल्ट काय येतोय बघायला मिही उत्सुक आहे. त्यात देव आहे अस जरी आल तरी माझ्या शंकांच अजून निरसन झालच नाहिये कुठली तरी अज्ञात शक्ती आहे जिच्यामुळे हे सगळ जग चालतय, गवताच पान हलतय, ग्रह तारे फिरतात, आणि देव जाणे काय काय होत पण त्या शक्तिला देव मानायची काय गरज आहे. आपण तिला देव मानतोय हे तिला कळेल का तरी आपण म्हणजे या इतक्या मोठ्या ब्रह्मांडातल्या एका पृथ्वी नावाच्या छोटाश्या ग्रहावरची मोजकी टाळकी. respect श्रद्धा, पूजा, नामस्मरण या सगळ्या गोष्टीसुद्धा फ़क्त इथेच आहेत, पृथ्वी सोडली तर इतर ठिकाणी सुद्धा असतील काय देव काय आहे हे जाणून घेणे ठीक आहे पण जोपर्यंत तो काय आहे तेच माहित नाही तर त्याच्यावर श्रद्धा ठेवून काय उपयोग ? मग अश्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हटल तर ?
|
>> आपण तिला देव मानतोय हे तिला कळेल का मानणारे लोक तिला कळण्यासाठी देव मानतात असे नव्हे राधा. बाकी श्रद्धा ही अंधच असायला हवी नाही का? डोळस असते ती चौकस बुद्धी नीरक्षिरविवेक करणारी. खरेखोटे पडताळून पहाणारी. >> पण त्या शक्तिला देव मानायची काय गरज आहे. मग दुसरं काहीतरी नाव दिलं तर चालेल? आपल्या निर्मात्याला आपण कृतज्ञता दाखवली तर ती अंधश्रद्धा कशी होऊ शकते? मग तो कुठल्याही फॉर्ममधे का असेना. अगदी निर्जीव वस्तूंवरही जीव जडतोच की. आयुष्य सुंदर आहे असे वाटणार्या प्रत्येकाला अशी कृतज्ञता वाटत असावी. तुझे मुद्धे (आधीपासूनचे ) मला interesting वाटले पण नेमका आक्षेप कशाला आहे ते कळले नाही. आणि वेन डायग्रॅम्स सही आहेत पण स्पष्टीकरण हवे.
|
राहिले पटण्याचा प्रश्न.... कुठलेही समीकरण माझ्या देवाच्या संकल्पनेत बदल करु शकणार नाही. समजा असे सिद्धही झाले कि देव नाही तरीही माझ्यापुरता तो असेलच. मनोज, बात कुछ जम्या नही.. तुझ्या आजपर्यंतच्या पोस्ट्स वरुन तु ओपन आहेस हे जाणवते.. पण जर तु असे म्हणालास की कोणतेही स्पष्टीकरण मिळाले तरी तु नाही बदलणार, तर मग तुलाच मजा नाही येणार.. असो, थोडे डायग्रेशन झाले.. वेन डायग्रॅम्स येउ देत..
|
Aschig
| |
| Wednesday, July 18, 2007 - 7:41 am: |
| 
|
Possibilities for G5

|
Aschig
| |
| Wednesday, July 18, 2007 - 7:48 am: |
| 
|
There are 9 possibilities for G4 even when its just two persons. So it will take until tomorrow. (details will come after that - but feel free to let your imagination go wild until then). BTW, these are not ways to prove or disprove God. These are different possibilities. For each possibility (model) one will have to ask what kind of God will fit that model. If no God fits that model can be eliminated. It may happen that Gods from different religions or sects may fit different models. Then we will have ways of classifying such groups. This is what we do in cosmology (indeed, all of science). Observations are gathered, models are made and then these models are compared against the observations. That is how we learnt that the Earth is not flat, the Earth is not at the center of the solar system (let alone the universe) and so on.
|
Aschig
| |
| Wednesday, July 18, 2007 - 7:50 am: |
| 
|
In G51 the two persons have something in common, and so do their Gods (the overlap could even be complete), In G52 neither the persons overlap, nor do their Gods. In G53 persons overlap but not their Gods In G54 persons do not overlap but the Gods do.
|
Radha_t
| |
| Thursday, July 19, 2007 - 8:30 am: |
| 
|
संघमित्रा माझा अक्षेप निर्मात्यावर किंवा त्याच्याविषयी असणार्या कृतज्ञतेवर नक्कीच नाही. आक्षेप आहे तो त्याच्या consequences वर. सृष्टीचा निर्माता माझ्या मते एकच असावा, पण मग वेगवेगळ्या धर्मांचे निर्माते वेगवेगळे का? वेगवेगळ्या धर्मांचे देव वेगवेगळे का? आक्षेप आहे तो त्या धर्म बनवणार्यांवर आणि पाळाणार्यांवर. देवा धर्माच्या नावाखाली मानवता चिरडणार्यांवर. देवाच्या नावाखाली प्राण्यांची कत्तल करणार्यांवर. आक्षेप आहे तो देवाच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण आणि इतरही अनेक प्रदूषणं करण्यावर. आक्षेप आहे तो शुद्रांना मंदिरात प्रवेश नाकारण्यावर आक्षेप आहे तो जातियवादावर आक्षेप आहे तो reservation वर ... याचा अर्थ असा नाही कि देव नसेल तर हे सगळ होणार नाही कदाचीत यापेक्षाही भयंकर काही तरी होईल. आक्षेप आहे तो देवाच्या नावाखाली हे सगळ होण्यावर!!
|
Chyayla
| |
| Saturday, July 21, 2007 - 12:03 am: |
| 
|
आता मला सांगा देवाचा काय उपयोग झाला? just moral support तो तर मीही तुमच्य शेजारी उभी राहून तुम्हाला देऊ शकले असते, पण मी देव नाही याचा अर्थ असा नाही कि देव नसेल तर हे सगळ होणार नाही कदाचीत यापेक्षाही भयंकर काही तरी होईल आक्षेप आहे तो देवाच्या नावाखाली हे सगळ होण्यावर!! राधा, मला प्रामाणिकपणे वाटतय तुझा देव, धर्म, समाज, सामाजिक दोश यांचा गोंधळ उडाला आहे. या सगळ्या गोष्टींचा ईथे चर्चा करण्याचा काय सम्बंध? आता मला सांग जर तुझाच ईतका गोंधळ उडाला आहे तर तु Moral support म्हणुन कशी देउ शकशील? किंवा मला काय कुणालाच काय कसा देउ शकशील? एक वेळ तु तुझ्याजवळच्याना देशीलही पण जगातल्या सगळ्या जीवान्ना कशी देउ शकशील? व्यक्ति कितीही महान असली तरी सुद्धा मर्यादा असतातच त्याच्या काही गोष्टी कुणाला बरोबर वाटतात तर कुणाच्या द्रुष्टीने भयंकर चुक, गुन्हा असेल त्यामुळे एखादी व्यक्ति पुर्णपणे Moral Support देउच शकत नाही. शिवाय अशी सामान्य व्यक्ति कधी तरी सम्पेल सोबत त्याचा असलेला Support ही. आणी जो कोणी असे म्हणतो मी श्रेश्ठ मी तुम्हाला Moral support देईल त्याला निश्चित गर्व झाला असे समजावे. आणी हा नैसर्गिक नियम आहे की गर्वाच घर खाली होतच. पुराणात, ईतिहासात व अगदी रोजच्या जीवनाही अशाच उन्मत्त प्रवृत्तींचा नाशच पहायला मिळुनही मनुष्य का गर्व करतो कोण जाणे? (प्रभुची माया दुसरे काय? त्यामुळे मी पण विचार लादत नाही हे लक्षात घ्यावे.) त्यापेक्षा शिवाजी महाराजान्सारखे अचाट कर्तुत्व करुनही ते नम्रपणे म्हणतात "ही ती श्रींची ईछा:" असा कर्मयोग भावुन जातो. व ईतरानाही प्रेरणा व Moral Support देतो. नास्तिकतेचा अर्थ होतो "निराशा" ती तुमच्यात पुर्णपणे दीसुन येते. तसेच नास्तिकता म्हणजे उन्मत्तपणा, स्वता:च्या सात्विक शक्ति न ओळखणे असे अज्ञान वा ते समजुन घेण्याचा प्रयत्नही न करणे म्हणजे आळस स्वता:च्या जिज्ञासा, बुद्धीला एका विशिश्ट भौतिक क्षेत्रापुरता संकुचित करणे. एखाद्या मोठ्या वृक्षाला देखील भक्कम जमिनीचा आधार लागतो जर असा आधार देवाच्या नावाने मिळत असेल करोडो जनतेला सदवर्तन, सदाचारण करण्याची प्रेरणा मिळत असेल तर काय हरकत आहे? केवळ एकांगीपणे निराशेतुन विचार करणे बरोबर नाही वाटत आणी ईथे तरी मला वाईटापेक्षा चान्गल्या गोष्टी जास्त आहेत म्हणुनच हे जग अस्तित्वात आहे. ज्याना त्याची एकच बाजु पाहुन नुसते रडायचे त्याना रडु देत बापडे. असो खर्या अध्यात्मात चांगले, वाईट याच्याही पुढे जाउन विचार करावा लगतो त्यालाच गीतेतले समत्व म्हणतात. पण प्रापंचिक जीवनात निर्णय घ्यायची वेळ येते तेन्व्हा विचार करावा लागतो. अशा वेळेस तरी संताच्या देवाविशयक शिकवणी सामान्य मानवाच मार्गदर्शन व जीवन जगण्यासाठी हिम्मत देतात. तेन्व्हा नास्तिकतेसारखा निराशावादी, संकुचित विचार सोडुन देणे ईष्ट असे मला वाटते व तो मानवहितासाठी उपकारक राहील. देव (खरा देव समजुन घेतला तरच) निराशेतुन माणसाला वर काढतो, जीवन केवळ रडण्यासाठी नाही जीवन हसण्यासाठी आहे तसेच अखंड आशा व अतुट श्रद्धा ह्यांचा विकास करण्यासाठी आहे. देव या द्वारे एक आधार देतो कारण तोच शाश्वत आहे शक्ति आहे ज्यावर विश्वास ठेवुन धैर्याने जीवनातल्या संकटांचा मुकाबला करण्यास प्रेरणा मिळते. एक खुलासा: "दाम्भिकता" मग ती देवाच्या नावाने का असेना माझा विरोधच राहील पण म्हणुन देवालाच विरोध करण्याचा मुर्खपणा नाही करणार. मला वाटत तुमच्यासारख्या व्यक्ति ह्या रोज तान्दुळात काही खडे आहेत म्हणुन तान्दुळच फ़ेकुन देत असाव्यात. देवाच्या नावाखाली हे होण्यावर... मी तुम्हाला जे देवाच्या नावावर नाही झाले किन्वा देव नाही असे मानुन एक विचारधारा चालवली त्यांची गत उदाहरणासहीत देतो. १) तुम्हाला ठाउक आहे देव न मानणारे महात्मा बुद्ध यांचा बौद्ध धर्म लोप होण्यामागे एक मोठे कारण हेच आहे की त्यांचा जीवनाप्रती निराशावादी दृष्टीकोण जसे जीवन हे दुखा:ने भरले आहे वैगेरे. त्या ऐवजी सामान्य जनाना उत्सवप्रिय, आनन्दी जीवन जगण्याचा दृष्टीकोण ठेवुन जगणे जास्त रुचले. व वास्तविक जीवनात त्याचीच गरज आहे हे सिद्ध झाले. २)मला सांग ज्यान्नी देव नाकारला त्यान्नी काय दीवे लावलेत. उदाहरणार्थ तुमच्या विचारान्ना तंतोतंत जुळणारी विचारसरणी म्हणजे "कम्युनिजम" धर्म म्हणजे अफ़ुची गोळी वैगेरे.. कारण कम्युनिस्ट सुद्धा प्रचलीत System मधले दोश सुधरवण्यापेक्षा त्यातले अपवादात्मक दोश जे कालान्तराने नाहीसे होतातही व समाज जागृती केल्यामुळे जातातही, तर अशा मुळ System लाच कालबाह्य म्हणुन दाखवतात व त्याचा नावाने ओरडा करुन भावना भडकावतात पण जेन्व्हा ठोस पर्याय द्यायची वेळ येते तेन्व्हा बोबडी वळते कारण तो विचारच आधी केलेला नसतो आणी मग सुरु होतो मानवतेला काळीमा फ़ासणारा नंगा नाच. (मला वाटत राधा वर तु Moral support चा पर्याय अशाच प्रकरातला दीला होतास.) असो या कम्युनिजमने रशियातच स्वताच्याच लाखो निरपराध जनतेची का कत्तल केली. तुला कम्बोडियाच्या नास्तिक, कम्युनिस्ट पॉलपॉटची राजवट पहायची आहे तुला एक लिन्क देतो आणी मग मला सांग देव न मानणारे काय करतात? ह्यातली २:४० ची MaoCommies ची लिन्क वाच. /hitguj/messages/46/112850.html?1179271307 वर मी देव न मानणार्या दोन विचारधारेंचे उदाहरण दीले त्यातले एक चान्गले असुनही (गौतम बुद्धांचे) तत्कालीन परिस्थितित योग्य बदल घडवुनही पुढे पराभुत झाले कारण ते तसेही चिरन्तन सनातन नव्हते तर दुसरे कम्युनिजमचे देव न मानणार्यांचे वाईट उदाहरण दीले. पण या दोन्ही परिस्थितीतही देव नाही ही संकल्पना बाळगणारे अपयशी व कुचकामी असल्याचे सिद्ध झाले. व त्यांची जी गती होणार होती तशीच झाली. अर्थात याकडे पाहुन कोणी रडणार नाही कारण त्या विचारांची जी दुर्गती व्हायची ती झालेली आपण पहातच आहोत. क्षमापानम.. राधा खरच तुमच नाव खुपच छान आहे, मला तुमच्याबद्दल वैयक्तिक रोष नाही कारण सगळ्यांची बुद्धी, अनुभव, संस्कार (चांगले संस्कार व्हायलाही भाग्य लागत) हे वेगवेगळे असतात. जसे आहेत त्यातच तो पुढे प्रगती करत जातो व सत्याचा उलगडा होत जातो कधी गोड तर कधी कडु अनुभव घेउन, त्यामुळे तुम्ही कुठे दुखावल्या गेल्या असल्यास चु. भु. दे. घे.
|
Slarti
| |
| Sunday, July 22, 2007 - 12:25 am: |
| 
|
>>> केवळ एकांगीपणे निराशेतुन विचार करणे बरोबर नाही वाटत आणी ईथे तरी मला वाईटापेक्षा चान्गल्या गोष्टी जास्त आहेत म्हणुनच हे जग अस्तित्वात आहे. हे पटते आणि "देव या संकल्पनेतून सदाचरण करायची प्रेरणा मिळत असेल तर त्यात वाईट काय" हेही समजू शकते. फक्त येवढेच की सदाचरण (विशेषतः सध्या) बर्याच अंशी subjective आहे असे दिसते... >>> नास्तिकतेसारखा निराशावादी, संकुचित विचार सोडुन देणे ईष्ट... देव हे आस्तिकांच्या लेखी आशेचे सर्वोच्च रूप असेलही, पण म्हणून नास्तिकांनी देव नाकारला याचा अर्थ त्यांनी आशा नाकारली असा होत नाही. निराशा हे नास्तिकतेचे एक कारण असू शकते, पण म्हणून सर्व नास्तिकवादच निराशावादी (आणि संकुचित) आहे असे नव्हे. कोणाच्या मनातला आस्तिकतेबद्दलचा गोंधळ दूर करायचा असेल तर तेव्हा स्वतःला नास्तिकवाद नीट कळला आहे की नाही हे बघणेही उचित होय. त्यायोगे अशी सरसकट विधानेही येणार नाहीत.
|
Chyayla
| |
| Sunday, July 22, 2007 - 5:03 am: |
| 
|
स्लार्ती, ना-आस्तिक म्हणजे एखादी वस्तुस्थिति नाहीच असे मानणारे हा प्रकार मला संकुचित वाटतो तर आस्तिक मधे अशी घालुन घेतलेली मर्यादा वाटत नाही. आणी एखादी गोष्ट नाहीच अशी समजुत करुन घेतली मग पुढचे सगळेच मार्ग खुन्टले म्हणुन नास्तिकता म्हणजे संकुचितपणा वाटतो असे म्हटले आहे. नास्तिकाना आशा करायला काही तरी भक्कम आधार लागत असेल तर मग तो आधार कोणता? मी माझ्या पोस्टमधे राधाच्या Moral support च्या मुद्द्यावर याबाबततच लिहिले आहे. अजुन एक मुद्दा "ऋणं कृत्वा घृतं पीबेत" असा चार्वाकाप्रमाणे नास्तिकवाद मानला तरी थोडा विचार करा याचे काय भयंकर परीणाम होतील. कुणाची किंवा देवाची चिंता कशाला करायची? आपण आपले जीवन भोगात घालावे बस हे त्यांचे तत्वज्ञान... थोडा विचार कर भोग मिळवण्यासाठी मग मनुष्य कोणत्या थराला जाउ शकतो. कुणाचा मुडदा जरी पाडला, कुणावर जबरदस्ती करायलाही त्याला काहीच वाटणार नाही.
|
अगदी बरोबर च्यायला. कट्टर निरिश्वरवादी किती कृर असतात हे तर कम्युनिस्टांनी दाखवुनच दिलेल आहे. राधाचा फ़ार मोठा घोळ झालेला दिसतोय. ती पुरेशी माहिति नसताना एकदम conclusion वर jump करते आहे.तिने लिहिलय-"देव काय आहे हे जाणून घेणे ठीक आहे पण जोपर्यंत तो काय आहे तेच माहित नाही तर त्याच्यावर श्रद्धा ठेवून काय उपयोग ? मग अश्या श्रद्धेला अंधश्रद्धा म्हटल तर ?" कोणी सांगितलय की देव काय आहे, कोण आहे हे माहित नाही?तुमच्या निरिश्वरवाद्यांनीच ना??त्यांना देव आहे हे कळत नाही हे त्यांच अज्ञान आणि लिमिटेशन आहे. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या मान्यता का पाळतात वगैरे गोष्टींची उत्तरे दिलेली आहेत. ती नीट वाचाविस. शुद्रांना मंदिरात नाकारल गेल याचा तुम्हा लोकांना आनंद व्हायला पाहिजे. कारण मंदिर वगैरे थोतांड,अंधश्रध्देच्या ठिकाणी ते गेले नाहित तर ते त्यांच्या फ़ायद्याचेच आहे नाहि का??मग तुझा त्याच्यावर आक्षेप का? असो गेले १५ दिवस वगैरे वेळ नव्हता त्यामूळे मायबोलिवर येउ शकलो नाही, त्यामुळे आशिशच्या आकृत्या वगैरे काही समजत नाहित त्यामुळे नंतर वेळ मिळाल्यावर त्याबद्दल लिहिन.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|