|
Apurv
| |
| Monday, July 09, 2007 - 5:00 pm: |
| 
|
बापरे! किती हा वादविवाद? सगळच फार हास्यास्पद आहे. माणूस देव आहे हे नाकारण्या इतका अहंकारी होतो आणि जगभर जाहीरही करतो... खरच हास्यास्पद आहे. समजा, क्षणापुरतं तुम्ही assume केल की देव आहे, सर्व ज्ञान त्यानीच निर्माण केल आहे...मग तुमचे जे अर्धवट ज्ञान आहे, त्यानी तुम्ही कसे जाणाल देव सर्वज्ञानी आहे की नाही. देवानीच जर ज्ञान बनवले आणि थोडेसे माणसाला दिले तर त्याचा उद्धटपणा एवढा? उथळ पाण्याला खळखळाट फार. बर मग देव नाही, मग सत्य... असत्य.. प्रेम.. कशालाच अर्थ नाही. कर्म नाही.. कर्माची शिक्षा नाही... तुमचे कोणावरतरी प्रेम आहे का? कुठून आले हे प्रेम? जेंव्हा लहान मूलाला वाटते की आपल्या आई वडीलांना काय कळत, आणि तो उद्धट पणे बोलतो, त्याचप्रकारे हे ही बोलणे हास्यास्पद आहे. विज्ञान देव आहे हे सिद्ध करू शकत नाही ह्याचा अर्थ विज्ञान अपूरे पडत नाही, माणसची आकलन शक्ती अपुरी पडते. माझ्या बोलण्याचा काही राग मानू नका... अर्थात देव नसेल तर कसला राग नी कसले प्रेम... जे काही ते करा... कोण आहे जवाब मागणारं?? नाही का?
|
Mansmi18
| |
| Monday, July 09, 2007 - 5:18 pm: |
| 
|
aschig तुमचे दोन्ही मुद्दे बरोबर. मैत्रेयी, मी राधाच्या प्रश्नाला उत्तर दिले आहे. तुम्हाला कळले नसेल तर परत लिहितो. देवाला न मानण्याने काहिच negative होणार नाही. देवाला मानण्याने प्रतिकुल परिस्थितीत जगण्याचे सामर्थ्य येइल. पण देवाच अस्तित्व मान्य करण्याची आणि देवावर श्रद्धा असण्याची गरजच काय ? ---------------- काहीच गरज नाही. हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. धन्यवाद.
|
देवाला न मानण्याने काहिच negative होणार नाही. देवाला मानण्याने प्रतिकुल परिस्थितीत जगण्याचे सामर्थ्य येइल. >>>यातून असा अर्थ निघत आहे की देवाला मानले असता असे काहीतरी मिळत आहे जे देवाला न मानता मिळत नाही. हे मलाच वाटतेय की तुम्ही खरोखर तसे सुचवताय?. देवाला नाही मानले तर ते सामर्थ्य असणार नाही असे म्हणायचेय का?
|
Mansmi18
| |
| Monday, July 09, 2007 - 5:35 pm: |
| 
|
अपुर्व, तुमचे म्हणणे १००% बरोबर. मला जे देव मानत नाहीत त्यांच्याबद्दल काहीच म्हणायचे नाही. त्यांचे जे मत आहे ते आपल्या जागी आहे. पण ते जेव्हा त्यांच्या देवाबद्दलच्या चुकिच्या कल्पना करुन जे देवाला मानतात त्याना "अन्धश्रद्ध" किंवा मुर्ख समजतात आणि त्यांच्या भावनेचा उपहास करतात तेव्हा वाईट वाटते. मी माझ्या कुठल्याही पोस्ट मधे कोणाला सांगायला गेलो नाही कि तुम्ही देवावर विश्वास ठेवा वगैरे वगैरे. मी फ़क्त मी देवाला का मानतो हे सान्गितले. मी जे लिहिलेय ते पुर्ण न वाचता न समजता परत परत तोच मुद्दा उगाळत बसण्यात काय अर्थ आहे? तुमचा प्रेमाचा मुद्दा थोडा आणखी पुढे नेउन मी म्हणेन प्रेम, माया, आपुलकी यांचे quantitative measurement कोणी घेतलय का? कोणाला प्रेम scientifically prove करता येइल का? का त्याचेही अस्तित्व आपण अमान्य करायचे just because it cannot be scientifically proved ?
|
Mansmi18
| |
| Monday, July 09, 2007 - 5:40 pm: |
| 
|
यातून असा अर्थ निघत आहे की देवाला मानले असता असे काहीतरी मिळत आहे जे देवाला न मानता मिळत नाही. हे मलाच वाटतेय की तुम्ही खरोखर तसे सुचवताय?. देवाला नाही मानले तर ते सामर्थ्य असणार नाही असे म्हणायचेय का? ------------------------------------------------------- तुमचा गैरसमज झालाय!! देवाला मानले असता काहीना ते सामर्थ्य मिळते.(मला वाटते तुम्ही, राधा आणि इतर gifted लोक याना जन्मत: ती देणगी असते जी माझ्यासारख्या काही लोकाना नसते आणि त्याना ते देवाला मानण्याने मिळते). माझी कसली बिशाद हो तुम्हाला असमर्थ म्हणायची
|
Slarti
| |
| Monday, July 09, 2007 - 6:00 pm: |
| 
|
>>> तुमचा प्रेमाचा मुद्दा थोडा आणखी पुढे नेउन मी म्हणेन प्रेम, माया, आपुलकी यांचे quantitative measurement कोणी घेतलय का? कोणाला प्रेम scientifically prove करता येइल का? का त्याचेही अस्तित्व आपण अमान्य करायचे just because it cannot be scientifically proved ? हे "काही गोष्टी संख्येत मोजता येत नाहीत व त्यांचे अस्तित्व शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध करता येत नाही" याचे उदाहरण म्हणून दिले आहे की देव ही संकल्पना प्रेम, माया, आपुलकी इ. भावनांसारखी आहे असे सुचवायचे आहे ?
|
Deshi
| |
| Monday, July 09, 2007 - 6:14 pm: |
| 
|
मला काही प्रश्न आहेत. नास्तीक वा देव न माननार्यंसाठी. प्रामानिक उत्तर अपेक्षीत. १. येशु ला मारल्यावर परत तो तिसर्या दिवशी प्रकट झाला म्हनतात. तो कुठल्या शक्तीवर? ती खरी कथा आहे की भाक्ड कथा. खरी असेल तर मग पुर्णजम्न खरा का. ( येशुचे उदा ह्या साठी की तो हिंदु धर्मीय नाही म्हणुन). २. पैंगबर हे शेवटचे मेसंजर मानले जातात. मुस्लीम धर्मायांत देखील पैंगबरा आधी मेंसेजंर होऊन गेले मग तेच का शेवटचे, कोणी आयातुल्ला खोमेनी का नाही? ३. हिन्दु धर्मायात १० अवतार मानले गेले त्यात, राम आहे वा नाही ह्यला पुरावा नाही पण कृष्ण होता ह्याला पुरावे आहेत, मग ते द्शावतार देखील (बुध्दांसहीत) थोतांड की अंधश्रध्दा? की ते खरच होते? ४. फक्त हिंदु धर्मीयातच पुर्णजन्म वा आदल्या जन्माचे कर्म भोगने हा प्रकार आहे, ईतर धर्मायात तो नाही पण हिन्दु धर्म या क्षेत्रात पुढे होता का? की त्यांनी हे गेस मारले.
|
Slarti
| |
| Monday, July 09, 2007 - 6:18 pm: |
| 
|
या प्रश्नांचा 'देव म्हणजे काय' याच्याशी असलेला संबंध लक्षात नाही आला.
|
मैत्रेयी मी राधाला लिंक देउन पोस्ट वाचायला सांगितली होती. तिचा मुद्दा पुढे सांगताना तुही ती वाचाविस. इथे वाच्- /hitguj/messages/46/127901.html?1183808965 ही पोस्ट लिहुन २ दिवस झाले आहेत. ह्यात तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला होता आणि शेवटी समजले नाही तर प्रश्ण विचारा असेही लिहिले होते. पण बहुतेक तुम्ही लोक पोस्ट न वाचताच तेच प्रश्ण रिपिट करत आहात. त्यापेक्षा एकदा पोस्ट वाचा आणि त्या संदर्भात प्रश्न विचारा स्लार्ती देव हा या भावनांसारखा आहे अस नव्हत सुचवायच.फ़क्त येव्हढच सुचवायच होत की सायन्स ला न समजणार्या गोष्टी आहेत. जशा भावना आहेत तसाच देवही सायन्सला समजत नाही. देशी सुदैवाने इथेतरी फ़क्त हिंदुंचा नसुन सर्वच धर्मातिल देवांचा विरोध होत आहे.
|
Aschig
| |
| Monday, July 09, 2007 - 8:07 pm: |
| 
|
एक आ. काही वक्तव्य करतो. मग एक ना. त्याबद्दल काही म्हणतो तर दुसरा आ. तसे नाहीच (आ. नं १ ने म्हंटल्याप्रमाणे) असे म्हणत पुढे येतो. एकुण काय तर आधी आस्तिक म्हणजे काय ते ठरवायला हवे. (१) 'देव निर्गुण, निराकार पण सर्व्-शक्तिमान आहे' असा काहीसा ल.सा.वी नजरेस पडतो (२) मग कर्म, त्याचे फळ मानण्याची गरज आहे का? (की ती एक package deal आहे?) (३) त्या पुढे जावुन पुनर्जन्म मानण्याची गरज आहे का? की एकदा logically deducible नसलेली गोष्ट गृहित धरली की इतर logically undeducible गोष्टी मानणे सोपे जाते? वरील ३ प्रकारात मोडणार्या आस्तिकांमध्ये समान दुवा केवळ "एक (किंवा अनेक) अंतिम सत्य आहे आणि ते देवा द्वारे आपल्याला कळु शकते (आणी मग काय??)" असे दिसते आहे. हे माझे विधान आस्तिकांना मान्य आहे काय? नास्तिकांपैकी कुणाला काही अंतिम सत्य असते असे वाटते का?
|
Deshi
| |
| Monday, July 09, 2007 - 8:32 pm: |
| 
|
आणि मग काय? हा प्रश्न आस्तिकांना नसतोच. कुठल्याही रुपात देवाची (मग भले ते अंतिम सत्य नसेल तरी) प्राप्ती करने ह्या कडे त्याचा कल असतो. वा निदान तो तश्या मार्गानी चालत असतो जसे भक्ती, नाम स्मरन वा गुरु पुजा. माह्या मते आस्तीकवादी पुढील विचार करतात. १. देव आहे. रुप सगुन साकार वा निर्गुन निराकार. २. ज्ञान, कर्म व भक्ती मार्ग ईश्वरा कडे नेतील व मुक्ती प्राप्त होईल. ३. जगातील सर्व गोष्टी, सुख, दुख वैगरे वैगरे ई ना देव जवाबदार आहे. (म्हण्जे तुमचे विधीलिखीत त्याने लिहीले आहे).
|
Apurv
| |
| Monday, July 09, 2007 - 9:09 pm: |
| 
|
देव ही काही संकल्पना नाही की काही व्याख्या नाही... आस्तिकांनी विश्वास ठेवा अगर नास्तिकांनी विश्वास ठेऊ नका... सत्य जे आहे ते आहे, ते काही बदलत नाही. दोनही जर आंधळे असतील तर कोण कोणाला काय सत्य दाखवणार?
|
Slarti
| |
| Tuesday, July 10, 2007 - 12:04 am: |
| 
|
>>> देव ही काही संकल्पना नाही की काही व्याख्या नाही... आस्तिकांनी विश्वास ठेवा अगर नास्तिकांनी विश्वास ठेऊ नका... सत्य जे आहे ते आहे, ते काही बदलत नाही. हे शेवटी तुमचे मतच झाले कारण नास्तिकसुद्धा तुमचा युक्तीवाद वापरु शकतात. (देव ही एक कल्पनाच आहे, देव अस्तित्वात नाहीच हेच सत्य, आस्तिक वा नास्तिकांच्या मानण्याने / न मानण्याने काहीच फरक पडत नाही इ.इ.) आशिष, तू मांडलेल्या तिसर्या मुद्यातील प्रश्न मला नेहमीच पडत आला आहे. इथेही तो प्रश्न विचारला होता, पण आस्तिक / नास्तिक कोणीच उत्तर दिले नाही. परत विचारतो, देव तार्कीकदृष्ट्या सुसंगत असावा / नसावा या गृहीतकाला आधार काय ? (मला दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेण्याची उत्सुकता आहे म्हणून "असावा / नसावा".)
|
Chyayla
| |
| Tuesday, July 10, 2007 - 12:10 am: |
| 
|
एक (किंवा अनेक) अंतिम सत्य आहे आणि ते देवा द्वारे आपल्याला कळु शकते हे वाक्य किती विरोधाभास आणी मनाचा गोंधळ दाखवुन देतय ना. सत्य आणी देव हे वेगळे कसे असु शकते? तरी माहितीसाठी सांगतो देव किंवा सत्य समजायला गुरुची आवश्यकता असते. अपुर्वचे पोस्ट पहिल्यांदाच वाचायला मिळाले उत्तम लिहिलेस. यातून असा अर्थ निघत आहे की देवाला मानले असता असे काहीतरी मिळत आहे जे देवाला न मानता मिळत नाही मैत्रेयी अशा प्रकारचे वाक्य किंवा अशा अर्थाचे विधान कोणी केलेले दीसत नाही. कारण कर्मफ़ळ हे ज्याचे त्याला भोगावेच लागते अगदी राम कृष्ण यासारख्या महात्म्यान्नाही ते टळले नाही तेथे आपल्या सारख्या पामरांची काय गत. राधा ला केवळ सुखासाठी देव असावा अशी समजुत झाली काय? वास्तविक पहाता एखादा दुखा:त असेल तर कदाचित त्यामागे त्याचे भलेच असु शकते. तुम्ही कित्येक यशस्वी लोकांची उदा: व्यावसायिक, वैज्ञानिक कारकिर्द पहा त्याना कित्येक अपयश, दु:ख वाट्याला आलेत पण त्यातुनच ते अग्नीतुन सोने तळपुन निघावे त्यासारखे पुढे आलेत. देव ही एक कल्पनाच आहे स्लार्ती मला वाटत आधी देव म्हणजे काय हे नास्तिक, निरिश्वरवादी काय समजतात हे कळले तर पुढे बोलता येइल कारण इकडे मनाला वाटेल ते देव समजुन त्याबद्दल लिहिणे सुरु आहे असे वाटते... साप समजुन भुईला धोपटणे. चिन्या, तु थोडा आधीचा विचार करुन पहा जसे पृथ्वीवर काही लोक असे असतील ज्याना देव काय मग भक्ति काय आणी कोणाची हे नाही माहिती (अज्ञानी) मग ते कर्मफ़ळ अर्पण कसे करु शकतील. याच पार्श्वभुमीवर ईतर मार्गाबद्दल मी बोललो होतो म्हणुन मी नास्तिक मी त्या द्रुष्टीने बोलत होतो, बाकी तुझे पोस्ट पटले. आज मानव वैज्ञानिक व अध्यात्मिक द्रुष्ट्या प्रगत झाल्यामुळे आपण तु म्हणतो तशी Theory मांडु शकतो.
|
परत विचारतो, देव तार्कीकदृष्ट्या सुसंगत असावा / नसावा या गृहीतकाला आधार काय ? हा खरोखर गुगली म्हणावा लागेल. थोडासा विचार केल्यानन्तर मला असे वाटते की या गृहीतकाला आधार नाही. नास्तीक लोकान्चा एक युक्तीवाद असाच असतो. देव असलाच तर तो तार्कीक द्रुश्ट्या सुसन्गत असायला हवा. आणी त्यानन्तर त्याच्या तार्कीक विसन्गतीची उदाहरणे देणे. what if the intelligent designer is not so intelligent?
|
Slarti
| |
| Tuesday, July 10, 2007 - 1:50 am: |
| 
|
च्यायला, माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी नास्तिकांचे मत जाणून घेण्याची गरज काय ? आपण इथे देवाच्या स्वरुपावर बोलत आहोत, विचारलेला प्रश्न त्याच्या स्वरुपासंदर्भात मूलभूत आहे. म्हणूनच तुमचे जे काही गृहीतक असेल ते दुसर्या पक्षाच्या मतांवर / समजांवर अवलंबून नसेल, स्वतंत्र असेल असे वाटते.
|
मी ह्या चर्चेमधून माघार घेतली होती कारण इथे गुरु, कर्मफळ, पुनर्जन्म, भक्ति ते मुक्ति, देव न मानणे म्हणजे अतिमाज वगैरे लेव्हल सुरु झाली. चार्वाकाचे ऋणं कृत्वा घृतं पीबेत सोडून बाकीचे ३ भाग मला पटतात. असो. सर्वप्रथम चिन्याचे एक स्टेटमेंट: "जशा भावना आहेत तसाच देवही विज्ञानाला समजत नाही. " भावना विज्ञानाला समजत नाहीत म्हणजे काय? तुम्ही नक्की ठाम आहात की आजचे जे विज्ञान आहे त्याला भावना समजत नाहीत? माझ्या माहिती प्रमाणे भावना, त्यांचे ओरिजिन, कुठले केमिकल्स त्यांना उद्दिपीत करतात वगैरे बाबतीत बरेच संशोधन झाले आहे आणि चालु आहे. देशीचे ४ प्रश्ण (मला अजुन तरी त्याचा रेलेव्हन्स नाहे कळलेला तरी असो) १. येशूला मारल्यावर तो परत प्रकट झाला ह्याला काही ऐतिहासिक पुरावा नाही. २. मुस्लीम धर्मीयांमध्ये अहमदी नावाचा पंथ पैगंबरांनंतर अहमद नावाच्या गृहस्थाला शेवटचा प्रेषित मानतात. ह्या पंथाला भुट्टोच्या काळात पाकिस्तान मध्ये अ-मुस्लिम घोषित केले गेले. इराण हा शिया मुस्लिम देश असुन, ते अजुनही १२ व्या इमामाची वाट बघत आहेत. ३. कृश्ण होता ह्याला पुरावा असणे आणि दशावतार खरेच झाले ह्याची सांगड काय? आणि बुद्ध दशावतारात कधीपासुन आला? ४. बुद्ध धर्म देव मानत नसला तरी पुनर्जन्म मानतो. अनेक आदिवासी जमाती ह्या पुनर्जन्म मानतात. त्यामुळे हिंदू धर्म हा या बाबतीत युनिक नाही. च्यायला देव समजायला गुरुची आवश्यकता असते हे पण एक अंतिम सत्य काय? नास्तिक आणि निरिश्वरवादी देव नाही असेच म्हणतात. मग देव म्हणजे ते काय समजतात ह्या प्रश्णाला अर्थ काय? ते आस्तिकांच्या ज्या देव म्हणुन संकल्पना आहेत त्याचे खंडन करतात. स्वतःची देव म्हणजे काय अशी काही नास्तिकांची व्याख्या नसते. माणुस आणि जनावर ह्यामध्ये फरक तो काय असा एक मुद्दा मागील काही पोस्ट्स मधे दिसला होता. मानव आणि पशू ह्या मध्ये महत्वाच फरक म्हणजे जिज्ञासा असेही लिहिले होते. पशूला जिज्ञासा नसते काय हो? कित्येक प्राणि कुतुहल दर्शवितात. माणुस आणि जनावर ह्यांच्यामधील फरक म्हणजे मेंदूची कुवत ही अधिक आहे. गरज ही शोधाची जननी आहे. बहुतेक शोध हे आपण भौतिक दृष्ट्या अधिक सुखी होण्यासाठी लागले आहेत. अगदी मिलिटरीसाठीचे शोध सुद्धा एक देश दुसर्या देशावर हुकुमत गाजवण्यासाठी आणि पर्यायाने आर्थिक सुबत्तेसाठी लावतो. एक काल्पनिक समाजाची कल्पना करा, जिथे आपल्या पेक्षा प्रचंड विकसीत, एलियन (प्रचंड अशा अर्थाने की आज आपल्यात आणि एका कुत्र्याच्या विकासामध्ये जेव्हडा फरक आहे तेव्हडा फरक माना) प्रजाती आपल्यावर राज्य करत आहे. मग काय आपण ही प्रजाती येण्यापूर्वी जिज्ञासू होतो आणि आता नाही असा होतो? on a lighter note: समजा असे मानू की देव आहे. आपले विधिलिखित त्याने लिहिले आहे किंवा तो कंट्रोल करतो. मग असे असावे की त्याचीच इच्छा नसावी की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा हे फक्त नास्तिकांना उद्देशून बरं का..
|
Chyayla
| |
| Tuesday, July 10, 2007 - 6:29 am: |
| 
|
स्लार्ती, होय तुझी अपेक्षा बरोबर आहे. आणी मी केवळ याच मुद्यासाठी पहिल्यापासुन बोलत आहे तरी साप समजुन भुईला धोपटणे हे काय असते त्याची मजा पहात होतो. असो तुला धन्यवाद की तु गाडी रुळावर आणलीस. सगळ्यात पहिले ईश्वर हा वर्णानातीत आहे त्याचे वर्णन करायला जगात शब्दच नाही तरी काही तर्क देण्यासाठी आपण काही भौतिक व अभौतिक तत्वांचा आधार घेतो. माझ्याकडुन काही प्रयत्न अर्थात मी कोणताही सन्दर्भ घेउन वर्णन केले तरी त्याला काही मर्यादा असु शकतात. माझे बरेच तर्क आहेत किंवा ईतर ठीकाणी वाचलेले आहेत. यावर अधीक चर्चा होउ शकते पण विस्तार भयास्तव मी आटोपशीर घेतोय. तरी कुणी काही उणीवा लक्षात आणुन दील्यास स्वागतच आहे. १)कधी मला ईश्वर हा न्युटननी सांगितलेल्या Energy च्या व्याख्या व त्याच्या Properties सारखा जाणवतो. जसे Energy is niether created nor destroyed but it can be transformed from one from to another form आणी दुसरी व्याख्या Energy ही सगळी कडेच व्याप्त असते. भलेही दीसत नाही जसे मी एखादी टाळी वाजवली तर एक आवाज येतो हा आवाज कुठुन निर्माण झाला म्हणजे ही शक्ति अस्तित्वात होती म्हणुनच त्याचेच रुपान्तरण ध्वनीत झाले ना. त्याचप्रमाणे देवही सर्वत्र व्याप्त आहे भलेही तो दीसत नसेल ही सृष्टीची, जीवनाची जी ही रुपे आहेत ती त्यापासुनच निर्माण झालीत. व त्यामुळेच या जगताचा व्यव्हार चालतो. २)दुसरे असे की ह्या शक्तिला, सत्याला समजुन घेण्यासाठी जी मानवी रुपात देवाची कल्पना केली आहे ते म्हणजे देवासारख्या Abstract स्वरुपाला समजण्यासाठी सोपे जावे म्हणुन जसे तुम्हाला एखादे गणीत सोडवायचे आहे त्यात आपणही एखादी क्ष ची Value गृहीत धरतो व पुढे मात्र उत्तर सापडले की त्या क्ष ची गरज रहात नाही आपण क्ष ( x )= something म्हणुन उत्तर मिळवतो. आगदी हाच तर्क अध्यात्मात वापरल्या जातो जसे आधी सगुण रुपात देवाला पुजल्या जाते त्यापासुन तोपुढे टप्प्याटप्प्याने ज्ञान मिळवत जातो आणी शेवटी त्याला जेन्व्हा उत्तर सापडते तेन्व्हा त्याला या सगुण रुपाचीही गरज रहात नाही. पण यामुळे त्या गृहीतकाचे महत्व तसुभरही कमी होत नाही. ३)एक तर्क मी मानव व देव यांच्या संदर्भात देउ ईछितो पुराणात यासाठी सागर व मातीचा घडा याचे उदाहरण दीले आहेजसे समुद्रातले पाणी जरी एखाद्या घडात ठेवले तरी पाणी ते सारखेच असते, घडा फ़ुटला की पाणी परत सागराला जाउन मिळते केवळ घड्याची आवरण चढल्यामुळे आपल्याला त्याच्या मर्यादा दीसतात पण अन्तर्गत पाणी मात्र तेच असते. त्याचप्रकारे प्रत्येक जीवात जो प्राण आहे जीवात्मा आहे तो ईश्वराचेच स्वरुप आहे केवळ त्याला शरीर मिळाल्यामुळे मायेच्या आवरणामुळे त्याला स्वता:च्या दीव्य व ईश्वरी स्वरुपाचे विस्मरण होते पण अन्तता: जीव हा ईश्वर स्वरुप आहे. म्हणजे जन्माला आलेला प्रत्येक जीव हा ईश्वराचेच रुप आहे. हो देव म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसुन तुम्ही स्वता:च आहात. (अहम ब्रह्मास्मी) पण मायेच्या बंधनात अडकल्यामुळे तुमची ही गती झाली. तेंव्हा देवाला शोधायला कुठेही जायची गरज नाही तो माझ्यात, तुमच्यात सर्व प्राणीमात्रात चराचरात व्याप्त आहे. ४) असेच दुसरे उदाहरण हवेचे दीले जाते हवा आपणास दीसत नाही पण तीचे अस्तित्व तर जाणवते जर हीच हवा फ़ुग्यात भरली तर त्याला त्याचे आवरण दीले तर ती वेगळी entity वाटते पण आत व बाहेर हवा मात्र तीच आहे. पण जसे फ़ुग्याचे आवरण गळुन पडते तशी त्यातली हवा मुक्त होते व शेवटी वातावरण्याच्या हवेत मिसळल्या जाते. तसाच सम्बंध मनुश्य व देवामधे आहे. ५)खरे म्हणजे हा तर्क आधी द्यायला हवा होता पण तरीही. कोणी तरी वर म्हटले होते की तुम्ही स्वता: कोण आहात हे बघा. तुम्ही काय शरीर आहात का? तुम्ही ईन्द्रीयान्द्वारे चालु, बोलु, ऐकु, पाहु, रस, वास घेउ शकता मग तुम्ही ईन्द्रीये आहत का? नाही. जसे ऐकता म्हणजे नेमका कोण ऐकतो, तुम्ही बघता म्हणजे कोण बघतो तुम्ही विचार करता म्हणजे कोण करतो तुम्ही विचार करता म्हणजे तुम्ही काही मन सुद्धा नाहीत, तसेच केवळ बुद्धीही नाही मग तुम्ही आहात कोण? हा प्रश्न स्वता:ला विचारुन बघा. व्यक्ति मृत झाल्यावर तर सगळे भौतिक पदार्थ, रसायन, ईन्द्रीये सगळ जसच्या तसच असत मग अस तुमच्या शरीरातुन काय निघुन जात की तुम्ही मृत ठरता? ती वस्तु कोणती ज्यामुळे तुम्ही जीवंत होता व ती निघुन गेली आणी सगळ संपले. ६)हे सारे जगत म्हणजे शीव शक्तिने भरले आहे व त्याचाच हा पसारा आणी खेळ सुरु आहे ज्याला आपण विज्ञानात Matter & Energy म्हणतो याशीवाय जगरहाटी चालत नाही. म्हणुनच म्हणतात की शक्ति शिवाय शीव हा शव आहे. त्यासाठीच हिन्दुन्मधे शीव व शक्ति (पार्वती) यांची सन्केतरुपाने पुजा होते. प्रत्येक जीव हा शीव आहे व त्यातला प्राण ही शक्ति आहे. असो मी वर वैज्ञानिक पद्धतीने काही तर्क द्यायचा प्रयत्न केला मी जेन्व्हा स्वता: हे वाचले तेन्व्हा जाणवले की मनुश्य अध्यात्मामुळे विज्ञानाच्याहीपलीकडे प्रगत झाला आहे हे खरे ही तर फ़क्त एक झलक होती. वेदान्नी ही अस्सल आधुनिक वैज्ञानिक तत्वे ईतक्या प्राचिन काळापासुन मान्डुन ठेवले होते याचा खरे तर विस्मय व अभिमान वाटतो. अजुन पुढे काही तर्क आहेत खरे अजुन कुणाकडे काही असेल तर ज्ञानात भर पडेल. .
|
Chyayla
| |
| Tuesday, July 10, 2007 - 6:38 am: |
| 
|
मग असे असावे की त्याचीच इच्छा नसावी की आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा हे फक्त नास्तिकांना उद्देशून बरं का होय हे तितकेच खरे असावे म्हणुनच देवाची साक्षही पटते. कारण माणुस एका सत्यापासुन अनुभवानुसार, पुढच्या सत्यापर्यंत सरकत असतो. जसे लहानपणी बाळाला चन्द्र हा चन्दोमामा दाखवल्या जातो त्याची जिज्ञासा तीथेच शान्त होते तुम्ही जर त्याला चन्द्राचा आकार, परीघ, पृथ्वीपासुनचे अंतर सांगत बसाल तर सांगणाराच मुर्ख ठरतो. तो जस जसा मोठा होतो तस तसे त्याला सत्य कळु लागते अगदी तोच प्रकार सगळ्यान्सोबत घडत असतो. त्यामुळे सुरुवात करायला देव नाही असे म्हणुन केली तरी हरकत नाही उलट दांभिक लोकान्पेक्षा ते चांगलेच आहे. पण प्रगती होत रहाते. मेन्दुची कुवत अधीक असो की जिज्ञासा असो पण त्या अधीक कुवतीच्या मेन्दुचा उपयोग फ़क्त Existence पुरताच सन्कुचित करायचा हे तरीही पटत नाही. त्याचाच उपयोग करुन माणुन अध्यात्मापर्यन्त पोहोचला असे म्हणायला हरकत नाही.
|
Slarti
| |
| Tuesday, July 10, 2007 - 3:41 pm: |
| 
|
च्यायला, तुम्ही त्या मुद्यांद्वारे तुमच्या दृष्टीने देवाचे स्वरुप काय ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ठिक आहे. पण ते माझ्या प्रश्नाचे उत्तर कसे हे कळाले नाही. मी जे गृहीतक म्हणतो ते हे - "देव (व त्याचे अस्तित्व) तर्कसुसंगत असावा / नसावा." तुम्ही कुठली बाजू घेत आहात ? तुम्ही त्या मुद्यांद्वारे तर्कसुसंगत मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे असे दिसते, म्हणजे देव तर्कसुसंगत असावा असे तुमचे गृहीतक आहे काय ? परत स्पष्ट करतो, मी तुम्हाला देव तार्कीकदृष्ट्या सिद्ध करा असे विचारत नाही, "वैज्ञानिक दृष्टीने तर्क करा" अशी माझी अपेक्षा नाही, तर "मुळात देव तर्कसुसंगत असावा की नसावा" असा प्रश्न विचारत आहे. तुमची या प्रश्नावरची भूमिका स्पष्ट केलीत तर पुढे बोलता येईल.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|