|
Chyayla
| |
| Monday, July 09, 2007 - 12:34 am: |
| 
|
सर्वप्रथम क्ष, चिन्या व ईतर मायबोलीकरान्नाही धन्यवाद. कर्मयोगासाठी देव मानण्याची जरुरी आहे. देव माना कर्म करा मात्र फ़ळाची अपेक्षा ठेउ नका जे फ़ळ देव देइल ते आनंदानी स्विकारा याला म्हणतात कर्मयोग चिन्या, तुझा झालेला गैरसमज दुर करण्यासाठी लिहितोय, कर्मयोग जो गीतेत वर्णन केला आहे तो मी पण जाणतो पण विस्तारभयास्तव पुढचे काही लिहिले नव्हते. माझ्या पोस्ट मधे एक वाक्य आहे ह्या सगळ्या योगान्ची एक सुरेख सांगड रोजच्या जीवनात घातल्या जाते. अजुन एक वाक्य मी मुद्दाम लिहिले सुरुवातीला तुम्हाला देव मानण्याची गरज नाही. एखादा नास्तिकही कर्मयोगाला अभिप्रेत सदाचरण करत असेल तर ते अयोग्य आहे का? अर्थात त्याच त्याला बरे वाईट फ़ळ मिळेलच. धर्म हा फ़ार सुक्ष्म असतो कुठे कोणाचा भ्रम होइल व चुकीचा अर्थ काढल्या जाईल सान्गता येत नाही. म्हणुनच "महाजनो येन गतस्य पंथा:" म्हटले आहे जे धर्माच्या मार्गाने गेलेत त्यांच मार्गदर्शन घ्या म्हणुनच रामायण, महाभारत यांचा अशा वेळेस उपयोग होतो. जसे खोटे बोलणे पाप आहे पण एखाद्या निरपराध, अबलेचा जीव वाचवण्यासाठी खोटे बोलणे हे पुण्यच ठरेल. असो कर्मयोग देव न मानता सुरु करता येतो पण पुढे त्याचेही फ़ळ भोगावीच लागतात मी आतापर्यंत मुद्दाम कर्मफ़ळाबद्दल बोललो नव्हतो. जेन्व्हा हा कर्मफ़ळाचा मुद्दा येतो तेन्व्हा मात्र तुम्हाला त्यापासुन मुक्त होण्यासाठी देवाची गरज लागते हे मी मान्य करेल हा त्या कर्मफ़ळापासुन मुक्तिचा उपाय आहे म्हणजे आता ईथे भक्तीचा शिरकाव झाला. असो मला वाटत मी समजेल असे स्पष्टीकरण दीले शेवटी भक्ती ही सगळ्यात महत्वाची हेही मी म्हटले आहे. अंतिम सत्य याला कोणी चिरन्तन सुख, पुर्ण ज्ञान, अक्षय आनन्द, सच्चे प्रेम काहीही म्हणु शकतो, भगवंताचे स्वरुप हे "सच्चिदानन्द" आहे म्हणतात, तसेच त्याला देव, ईश्वर, दीव्यतेज काहीही नाव द्या सगळे एकाच ठीकाणी पोचतात. कुणाला अंतिम सत्य वैगेरे काही नसत असे समाजायचे त्याला खुशाल समजु द्यावे. (अर्थात जोपर्यंत तो हाती शस्त्र धरत नाही तोपर्यंतच, उदा: कम्युनिज्म ची धर्म ही अफ़ुची गोळी वैगेरे) तान्याला उत्तर दील्याप्रमाणे मनुश्य त्याची नैसर्गिक जिज्ञासा याला काही अंत नाही त्यामुळे ज्याला जो काही शोध घ्यायचा तो घेत राहील नाहीतर घोड्याच्या डोळ्याला ज्याप्रमाणे झापडे लावुन तो चालत राहील तीच त्याची गती. तरी या प्रकाराला अवैज्ञानिक का म्हणु नये? वर जयन्त साळगावकरानी म्हटल्या प्रमाणे विज्ञानापुर्वी येते श्रद्धा, मग ज्ञान, जिज्ञासा व त्यातुन निर्माण झालेली कल्पना शक्ति, प्रयोग, श्रद्धेनी मिळालेली चिकाटी व यशस्वी होण्याचा विश्वास जो आवश्यक असतो, आणी त्यातुनच पुढे येतो एखादा आविश्कार खर तर हे सगळे प्रगतीचे वैज्ञानिक टप्पे आहेत. हे जेन्व्हा श्रद्धा या टप्प्यात असते तेन्व्हा विरोध होतोच. आणी तोच मात्र श्रद्धावानासाठी कसोटीचा काळ असतो. जसे वैज्ञानिक काही शोध लावायचे तेन्व्हा त्याची सत्यता पडताळण्यापुर्वीच अविष्वास दाखवण्यासारखे आहे. मला तर त्या कोपर्निकस ने जेन्व्हा सांगितले की पृथ्वी ही सुर्यमालेचा केंद्र नसुन सुर्य आहे आणी तेंव्हा आधीच मत ठरवुन ठेवलेल्या चर्चने केलेला विरोध आठवतो. असो माणसामधे जसा जिज्ञासेचा सुंदर गुण असतो ज्याद्वारे तो वैज्ञानिक व अध्यात्मिक प्रगती करु शकला तसाच अविश्वास, सत्याला सामोरे जाण्यापुर्वीच दोशारोपण करायचे अवगुणही असतातच. त्यामुळे कुणी अंतिम सत्य, देव हे सगळ झुट असे म्हणत असेल तर तेही नैसर्गिकच आहे. आणी मला त्याबद्दल काही आक्षेप नाही. शेवटी ज्ञान विज्ञान हे सगळ अध्यात्मातच सामावले आहे, ज्याला समोर न जाता फ़क्त विज्ञानातच गुंतायचे त्याला तिथेच राहु द्यावे.
|
Ksha
| |
| Monday, July 09, 2007 - 4:55 am: |
| 
|
विजय, मला तरी वाटत नाही की जो कोणी डी अन् ए चाचणी करतो तो स्वत डी एन् ए चा अभ्यास करत असेल. असे करणे म्हणजे शास्त्राच्या संशोधनाचा काहीच फायदा न उचलल्यासारखे आहे. its like re-inventing the wheel आणि त्याचसाठी आपली शास्त्रे सुद्धा लिहीली गेली आहेत. आत्मा आणि परमात्मा यांचे देखील शास्त्रशुद्ध विवेचन तुमच्यासाठी खुले आहे. आपण कधी तिकडे नजर वाकडी केल्याचे मात्र दिसत नाही. आणि आधीच स्पष्ट करतो की आता "तुमचे ते शास्त्र आणि आमच्या त्या भाकडकथा" हे सांगू नका. खात्रीने ते सर्व खोटं आहे असे सिद्ध करता येत असेल तरच पुढे बोला. भौतिकशास्त्र, मानसशास्त्राला जसे मानता तसे हे ही शास्त्रच आहे. पहील्यांदा तुम्हाला त्यातले "काय पटत नाही" हे मुद्देसूद मांडून दाखवा मगच उत्तर मिळेल. अन्यथा तुमचे बोलणे काहिही आधाराशिवाय आहे असे समजेन.
|
हैद्राबादचे डॉक्टर न्यूटन पुनर्जन्मावर संशोधन करत आहेत. लोकांना संमोहनावस्थेत नेऊन त्यांच्या पूर्वीच्या जन्मातल्या आठवणी ते जागवतात आणि त्याद्वारे अनेक जुने रोग ते बरे करतात. एका मराठी मासिकाच्या अंकात मी नुकताच त्यांच्यावर एक प्रदीर्घ लेख वाचला. जिज्ञासूंनी खालील संकेतस्थळावर जाऊन माहीती वाचावी. http://www.liferesearchacademy.com/
|
>>> मी परत लिहितोय ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म हे देवाकडुनच आलेले आहेत. कुलकर्ण्यांना विचारलेला प्रश्न आता तुम्हाला विचारत आहे. जमल्यास उत्तर द्या.
|
Aschig
| |
| Monday, July 09, 2007 - 5:24 am: |
| 
|
या जन्मीचे रोग ते बरे करु शकत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. मेल्याशीवाय स्वर्ग दिसत नाही हे ऐकले होते, पण मेल्याशीवाय रोग बरे होत नाहीत हे पहिल्यांदाच ऐकायला मिळाले. त्यांचा motto मात्र आवडला: we create our own reality.
|
Aschig
| |
| Monday, July 09, 2007 - 6:10 am: |
| 
|
manoj, I am not sure when the transformation occured. It was certainly not sudden. In fact, I asked exactly that question (about my becoming an atheist) to my father on father's day a few days back. He could not say either. What I recollect of the journey is that it was through exploring the world, looking at other people, experimenting and so on. Also as a revolt against what I saw around me which did not seem connected to the world I live in. I could provide more details, but I do not think that will matter. One thing that I did learn was to take most claims with a sack of salt. Start by not believeing anything (or doubting everything). Thankfully, for most things I neither have to doubt them, nor to believe them for continuing to live peacefully (e.g. am I alive, who are my parents, does the universe have an aim and so on). May be you should tell us why you are a theist?
|
>>> या जन्मीचे रोग ते बरे करु शकत नाहीत ही खेदाची गोष्ट आहे. मेल्याशीवाय स्वर्ग दिसत नाही हे ऐकले होते, पण मेल्याशीवाय रोग बरे होत नाहीत हे पहिल्यांदाच ऐकायला मिळाले. मी जे वाचले त्यानुसार आपल्या या जन्मातल्या रोगांचा आपल्या पूर्वजन्माशी संबंध आहे असा त्यांचा दावा आहे. ते माणसाच्या पूर्वजन्माच्या स्मृती जागृत करून या जन्मातल्या रोगाचे कारण शोधून काढतात आणि त्याद्वारे माणसाचे या जन्मातले रोग बरे करतात असे मी वाचले आहे.
|
Aschig
| |
| Monday, July 09, 2007 - 6:54 am: |
| 
|
म्हणजे या जन्मीच्या स्मृतीवरुन पुढच्या जन्मी कोणते रोग होणार हे सांगता यायला हवे. त्याचप्रमाणे पहिलाच जन्म जेंव्हा असतो, तेंव्हा तो पुर्णपणे निरोगी असायला हवा. Dr. Newton Buddha नावावरुन भारतिय वाटत नाही म्हणजे हे बहुदा वैदिक ज्ञान नसावे.
|
>>> म्हणजे या जन्मीच्या स्मृतीवरुन पुढच्या जन्मी कोणते रोग होणार हे सांगता यायला हवे. त्याचप्रमाणे पहिलाच जन्म जेंव्हा असतो, तेंव्हा तो पुर्णपणे निरोगी असायला हवा. Dr. Newton Buddha नावावरुन भारतिय वाटत नाही म्हणजे हे बहुदा वैदिक ज्ञान नसावे. त्यांचे संपूर्ण नाव डॉ. कोंदिपल्ला न्यूटन व मंडळींचे नाव डॉ. लक्ष्मी आहे. ते मूळचे हैद्राबादचे आहेत. कोणत्यातरी आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले असे मी वाचले आहे.
|
Radha_t
| |
| Monday, July 09, 2007 - 8:30 am: |
| 
|
मनोज सर्व प्रथम तुम्ही वैयक्तीक हल्ले/टिका करणे बंद करावी अशी नम्र विनंती. मी दारू पिवून पोस्ट लिहिली .. हा संदर्भ मला असा कुठलाही ट्रिगर मिळाला नाही की जेव्हा पासून मी नास्तीक झाले. माझ्यावर आस्तिक आणि नास्तिक दोन्ही संस्कार होत होते. माझी आई आस्तिक तर वडील नास्तिक. पण शेवटी मनाला बुद्धिला जे पटल ते फ़ॊलो केल. दुसर अस की बुद्धी प्रामाण्यवादी किंवा विध्न्यान देवाच अस्तित्व नाकारतात अस कुणी सान्गितल? देव असेलही ... पण त्याची पूजा कशाला ? नामस्मरण कशाला ? काय गरज आहे ? याची जी कारण दिली जातात त्यालाच मी बाळ्बोधपणा अस म्हटल आहे. मनोज माझा असा नम्र आग्रह आहे की तुम्ही या प्रशांची उत्तर द्यावीतच तुमच्य मते देवाच अस्तित्व कस आहे? देव आहे हे मान्य केल .. कुठल्या तुम्ही म्हणाल त्या फ़ोर्म मधे .. पण देवाच अस्तित्व मान्य करण्याची आणि देवावर श्रद्धा असण्याची गरजच काय ? आणि त्याला मानल नाही तर काय होईल ?तो रागावेल? मला शिक्षा करेल ? आणि मानल तर काय मला बक्षिस मिळेल, आयुश्य वाढवून मिळेल पुण्य मिळेल ? काय होइल exactly ?
|
Bee
| |
| Monday, July 09, 2007 - 9:57 am: |
| 
|
राधा, इतक्या दिवसानंतर आलीस आणि वादात काय पडलीस
|
Radha_t
| |
| Monday, July 09, 2007 - 10:54 am: |
| 
|
हा चावून चोथा झालेला विषय मला आवडतो म्हणून रे यशवंत
|
Mansmi18
| |
| Monday, July 09, 2007 - 1:58 pm: |
| 
|
राधा, aschig तुम्हा दोघांच्या प्रश्नाचे उत्तर एकदम देतो. प्रथम राधा, तुम्ही लिहिलेले मला अतिशय असंबद्ध वाटले त्यामुळे तसे लिहिले. त्याबद्दल तुम्हाला वाइट वाटले असेल तर मी दिलगीर आहे. तुम्ही परत परत तेच लिहिताय. =============================== पण देवाच अस्तित्व मान्य करण्याची आणि देवावर श्रद्धा असण्याची गरजच काय ? काहीच गरज नाही. तुम्ही आपल्या मुलांवर, आइ वडीलांवर प्रेम करता ते गरज आहे म्हणुन करता का? निरपेक्ष प्रेम कोणी करु शकत नाही का? ================================ आणि त्याला मानल नाही तर काय होईल ?तो रागावेल? मला शिक्षा करेल ? आणि मानल तर काय मला बक्षिस मिळेल, आयुश्य वाढवून मिळेल पुण्य मिळेल ? काय होइल exactly === तुम्ही देवाला मानण्याचान मानण्याचा आणि आयुष्यात संकटे येण्याचा किंवा न येण्याचा सम्बन्ध जोडताय. मी आधीहि म्हटल्याप्रमाणे सुख्-दु:ख हा आपल्या आयुष्याचा भाग आहे. एका मागे दुसरे यायचेच त्यात देवाला दोष का द्यायचा? जे काही चांगले वाईट होते ते आपल्या कर्माने. देवावर ज्यांचा खरा विश्वास आहे आणि जे देव ही संकल्पना काय आहे हे जाणतात त्याना जीवनातील सुख्-दु:खाना धैर्याने तोंड देता येते. आणि कुठल्याही परिस्थितीत आनंदीत राहता येते. दुसरी गोष्ट देवाचे स्मरण्हरीस्मरण माणसाला सावध करते. त्यामुळे माणसाच्या हातुन योग्य तेच होते त्यामुळे मनुष्य सुखी होतो.(इथे सुखी याचा अर्थ श्रीमंत, सगळ्या इच्छा पुर्ण होतात असा घेउ नये. सुखी याचा अर्थ आहे त्या परिस्थीतित मन प्रसन्न होते.) aschig , मी लहानपणापासुन आस्तिक संस्कारात वाढलो. आमच्या घरी जास्त देवाचे काही करत नव्हते पण नास्तिकता नव्हती. हे झाले लहान्पणी. पण हे तुम्ही किंवा तान्याने म्हटल्याप्रमाणे कोणी सान्गितले म्हणुन. स्वत्: न समजता देवाला मानत होतो. नंतर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी स्वत:ला प्रश्न करु लागलो कि देव हा नक्की काय प्रकार आहे. मी देवाचे एवढे करतो पण माझ्या मनासारखे का होत नाही? एकदा तर मला शाळेत मिळालेली देवाची मुर्ती उचलुन मी कचर्यात फ़ेकुन द्यायला निघालो कारण माज़्या मनाविरुद्ध काही घडले. माझ्या सुदैवाने मला माझ्या गुरुंचे सहाय्य मिळाले. मी परत एकदा त्यांची प्रकाशने वाचली आणि तेव्हापासून मी नियमित प्रार्थना करायला लागलो आणि संकटाला सामोरे जायचे(कोणालाही दोष न देता)धैर्य अंगी आले. त्यानंतर USA ला आल्यानंतर्ही अनेक संकटेवाइट गोष्टी घडल्या(उदा. ३ वेळा layoff झाले. प्रचंड आर्थिक संकटे आली. आजुनही येतात्येतील. पण यात देवाला मी कधीच दोष दिला नाहीदेणार नाही). माझी देवावर श्रद्धा माझा एक मित्र या दृष्टीने आहे.(मी देव omnipotent का omniscient वगैरे भानगडीत कधी पडलो नाही. त्याचे अस्तित्व माझ्यापुरते मला जाणवते ते इतराना जाणवुन द्यायची माझी इच्छा नाही.) मी परत परत म्हटले आहे कि मला नास्तिकतेबद्दल अपार कुतुहल आणि आदर आहे. मी देवाला मानतो म्हणुन इतरानीही मानवे असा माझा मुळीच आग्रह नाही. परंतु आस्तिक विचारसरणी हा मुर्खपणा आणि अंधश्रद्धा आहे हे आस्तिक विचारसरणी म्हणजे काय हे जाणुन न घेता चुकिच्या कल्पनानी देवाला दोष देणे याला माझा आक्षेप आहे. धन्यवाद.
|
च्यायला, माझ्यामते एखादा माणुस देव न मानता सदाचारण करत असेल तर तो कर्मी होतो कर्मयोगी नाही. तसेच तुम्ही लिहिले होते की भक्तियोगाला पुजाअर्चा,यज्ञ वगैरे गोष्टी महत्वाच्या आहेत. मुळात ही गोष्ट कर्मयोगीला महत्वाची आहे. स्वामी विवेकानंद तर म्हणतात की भक्तियोगीला मंदिरातसुध्दा जाण्याची गरज नाही. त्याला सर्व ठीकाणी २४तास देव दिसत होतो. त्याला कुठेही जा देवाचा विसर पडत नाही,त्याच्या मुखी देवाचेच नाव असते आणि त्याचे विचार फ़क्त देवाबद्दलच असतात. मग त्याला मंदिर आणि इतर जागा यात फ़रकच काय? माझ्यामते देव नाहिच म्हणुन जगणे चुकिचे आहे. 'ब्रह्म सत्यम, जगत मिथ्या' हे माहिति असणे खुप गरजेचे आहे. सतिशराव हे फ़क्त हैद्राबादचे डॉक्टर करत नाहित. क्लायोरन्स ही एक मेथड आहे ज्यात अशा गोष्टी केल्या जातात. इस्लाम ख्रिश्चन धर्म देवाकडुन आलेले नाहित हे तुम्ही कसे ठरवले?? इस्लामबद्दल वेद (जे इस्लामच्या कितितरि हजार वर्षापुर्विचे आहेत)ते कुठे लिहितात-'भविष्य पुराण पर्व ३ खंड, अध्याय ३','अथर्व वेद ' ,'ऋग्वेद',' सामवेद अग्निमंत्र','सामवेद उत्तरचिक', 'सामवेद इंद्र','यजुर्वेद्-अध्याय ३१'. इथे कुठेही इस्लामबद्दल वाईट लिहिलेले नाही. एका ठिकाणी ख्रिस्ताबद्दलही अशी माहिति वाचली होती जेथे 'देवाचा पुत्र' अशा अवताराबद्दल लिहिण्यात आले होते.
|
राधा, तु मी लिहिलेली पोस्ट वाचलेली दिसत नाही. त्यात मी तुझ्या प्रश्नांची उत्तरे दिलि आहेत. तु ती न वाचताच परत तेच प्रश्न केले आहेत. ति पोस्ट इथे वाच,पहिलिच पोस्ट आहे- /hitguj/messages/46/127901.html?1183808965
|
Zakki
| |
| Monday, July 09, 2007 - 2:36 pm: |
| 
|
राधा, तुम्ही देव मानला नाही, देवाची पूजा केली नाही तरी देव तुम्हाला काऽहीहि करणार नाही. पण देव असो की सैतान, कुणाच्या नावाने काही केले की आपली संकटे नाहीशी होतिल, आपल्याला हवे ते मिळेल, (निदान गोंधळलेले मन शांत होऊन, ती नाहीशी करण्यासाठी, उपाय सापडेल, किंवा हवे असलेले मिळवण्याचा उपाय सापडेल) यासाठी लोक काहीतरी मानतात. तुम्ही सध्या आहात त्या अवस्थेत तुम्हाला समाधान असेल तर तुम्ही देव वगैरे चे काही केले नाही तरी चालेल. दुसरा प्रश्न म्हणजे अंतिम असा एक परमात्मा आहे का? आपल्या वाट्याला आलेला आत्म्याचा अंश शुद्ध करून (कर्माची वाईट फळे पूर्णपणे भोगून) तो परमात्म्यात मिसळला की आपली या जगातल्या पुनर्जन्मातून, नि इथे भोगाव्या लागणार्या यातनांतून कायमची सुटका होईल, अश्या कल्पनेवर जर तुमचा विश्वास असेल तर देवपूजा, नामस्मरण इ. अनेक मार्ग सुचवण्यात आलेले आहेत. परमात्मा मानत असाल तर देव मानलाच पाहिजे, पूजा केलीच पाहिजे असे नाही, पण दुसरा सोपा मार्ग आहे का माहित? जसे अनेक वर्षे तप करणे इ., जमणार आहे का? आता परमात्मा, वगैरे मानत नसाल, तर तुम्हाला कधी तरी प्रश्न पडतो का की कधी वाईट, कधी चांगले असे का होते? ते नेहेमीच चांगले असेल असे काही करता येईल का? जेंव्हा हजारो वर्षांपूर्वी ऋषि मुनींनी विचार केला, नि कित्येकांनी ह्या सर्व संकल्पना (परमात्मा, देव) मान्य केल्या, तेंव्हा इतर लोकांनी पण तसेच केले. शिवाय हजारो वर्षे, मुसलमानांचा किंवा राज्यकर्त्यांचा छळवाद, शास्त्रीय ज्ञानाचा अभाव, रोगराई, दुष्काळ यातून काही मार्ग नसल्याने लोक आणखीनच याच्या मागे लागले. मग आणखी चांगले व्हायला आणखी कर्मकांडे. कुणा ब्राम्हणाने सांगितले की फक्त आम्हालाच पूजा सांगण्याचा अधिकार आहे, तर आम्हाला पैसे देत जा, नि लोकांनी ते मानले! आजकालच्या लोकांना देव, परमात्मा वगैरेशी काही देणं घेणं असण्याचा संबंध नाही. फक्त Apple घेऊ की Microsoft , मला iPhone कसा मिळेल, इ. प्रश्न आहेत. ते लवकरच सुटतात. फारच उच्च विचाराचे असाल, तर मेडिसिन, काँप्युटर, astrophysics इ. त संशोधन करा. ते देवाचे वगैरे राहू दे बाजूला. ज्या लोकांना भारतातल्या ज्ञानाबद्दल माहिती नव्हती, त्यांनी ख्रिस्चन, मुस्लिम, यहुदि इ. तत्वज्ञान अंगिकारले. सुदैवाने तुम्ही भारतात आहात. तुम्ही स्वत:साठी काय वाट्टेल तो मार्ग स्वीकारू शकता. कुठलातरी धर्म असलाच पाहिजे असेहि नाही. निदान हिंदू समाजात तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही. (एखादा भामटा मुद्दाम तुमचे पैसे चोरेल नि म्हणेल की तुम्ही देव मानत नाही म्हणून तुमचे पैसे गेले, ही गोष्ट वेगळी). तेंव्हा तुम्ही चार्वाक यांचे म्हणणे माना. 'यावज्जीवेत्, सुखं जीवेत्, ऋणं कृत्वा घृतं पिबेत् भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत:|
|
देवावर ज्यांचा खरा विश्वास आहे आणि जे देव ही संकल्पना काय आहे हे जाणतात त्याना जीवनातील सुख्-दु:खाना धैर्याने तोंड देता येते. आणि कुठल्याही परिस्थितीत आनंदीत राहता येते. >>>अहो मग हेच सगळे देवावर विश्वास न ठेवताही जमते की, का नाही? देवावर, देव या संकल्पनेवर अजिबात विश्वास नसलेले लोक चांगले human beings , किंवा यशस्वी, समाधानी सर्व काही असू किंवा नसूही शकतात की! हे तुम्ही लिहिताय ते सर्व जसे आस्तिकांमधे आढलते तसेच नास्तिकांतही आढळते की!! 
|
Mansmi18
| |
| Monday, July 09, 2007 - 3:35 pm: |
| 
|
अहो मग हेच सगळे देवावर विश्वास न ठेवताही जमते की, का नाही? देवावर, देव या संकल्पनेवर अजिबात विश्वास नसलेले लोक चांगले हुमन बेइन्ग्स ------------------------------ मी आस्तिकांपुरते लिहिलेय. नास्तिकात असतीलही असे लोक. मी असे कुठे लिहिलेय कि नास्तिकात तसे नसतात? तुम्हाला एखादा मुद्दा मांडायचाय का? का उगाच मताची "पिंक" टाकायचीय?
|
पण देवाच अस्तित्व मान्य करण्याची आणि देवावर श्रद्धा असण्याची गरजच काय ? देवाला मानल्याने अथवा न मानल्याने नक्की काय होईल हा राधाचा प्रश्न अनुत्तरित च राहतोय, एवढाच माझा मुद्दा. (तुम्हाला 'पिंक' म्हटल्याने बरे वाटत असेल तर तसे म्हणा तुम्ही )आणखी लिहीत नाही सध्या..
|
Aschig
| |
| Monday, July 09, 2007 - 4:00 pm: |
| 
|
म्हणजे आस्तिकांपैकी देवावर ज्यांचा खरा विश्वास आहे ते आनंदानी जगु शकतात असे म्हणताय? की उलटे म्हणायचे: आस्तिकांपैकी जे आनंदी आहेत त्यांचा खरा (किंवा खर्या) देवावर विश्वास असला पाहिजे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|