|
अजून काही देव कसा कालबाह्य झाला आहे त्याची उदाहरणे गाईसारख्या निर्बुद्ध पशुला देव मानणे कालबाह्य मानायला हवे असे मला वाटते. आगीला, सूर्याला, चंद्राला, ग्रहांना देव मानणे त्यांचे खडेबिडे चढ्या भावाने घेणे हेही कालबाह्य मानले जावे. माझ्या धर्मग्रंथात जसे लिहिले आहे तसा देव न मानणार्यांना ठार मारणे वा त्यांचे धर्मपरिवर्तन करणे वा त्यांना जबर कर द्यायला भाग पाडणे असे सांगणारा देव कालबाह्य मानला जावा.
|
आस्चिग, अगदी बरोबर.. नास्तिक देखील देव न मानणारे आस्तिक.. मी कधीपासुन हेच बोलतोय की देव ही संकल्पनाच मला निरर्थक वाटते.. आहे नी नाही हा प्रश्णच येत नाही..
|
Shrini
| |
| Friday, July 06, 2007 - 5:01 am: |
| 
|
aschig, I can't find the post you've mentioned, and your blog doesn't give any info on its gist. Could you pl. give a link to your post here ?
|
Aschig
| |
| Friday, July 06, 2007 - 5:33 am: |
| 
|
shrini, look under itar bhaashiy/neil gaiman: /hitguj/messages/103385/127813.html?1183668535
|
Ksha
| |
| Friday, July 06, 2007 - 6:47 am: |
| 
|
Aschig, तुम्ही ते वजनदार दगडाचं वगैरे उदाहरण असं देताय की जणू तुम्हाला माहीती आहे कि देव exactly किती वजन उचलू शकतो आणि तुम्ही ती सुरूवातच मुळात चुकीची केल्यामुळे पुढचं काही ग्राह्य धरता येत नाही. थोडंसं सबळ उदाहरण द्या. शें. न. गमतीशीर बोलता तुम्ही खूप! तुम्ही स्वतच तुमचे विधान वाचून बघा. मग कळेल तुम्हाला तुम्ही कुठे चुकताय, तुम्ही ज्या सार्या कल्पना सांगितल्या आहेत त्या "कल्पना" कालबाह्य झाल्या आहेत. याचा अर्थ "देव" कालबाह्य झाला असे नव्हे. जरा पटेल असं काहितरी बोला की राव!
|
Shrini
| |
| Friday, July 06, 2007 - 7:11 am: |
| 
|
what aschig's basically asking is : can God limit His ability permanently ? if yes, then there would be certain things He won't be able to do; and if no, He can not do atleast one thing (limit his ability permanently); so in either case, He can't be omnipotent.
|
>>> and if no, He can not do atleast one thing (limit his ability permanently); so in either case, He can't be omnipotent. प्रकाश स्वतःच्या उपस्थितीत काळोख निर्माण करू शकत नाही. म्हणजेच त्याच्या सामर्थ्यात काहीतरी उणीव आहे असा याचा अर्थ झाला. किंवा पाणी स्वतःला सुकवू शकत नाही. तसेच अग्नि स्वतःला थंड करू शकत नाही. ही त्यांची लिमिटेशन्स समजायची का?
|
Shrini
| |
| Friday, July 06, 2007 - 9:50 am: |
| 
|
Light/Water/Fire are not God in the current context of this discussion. Humans generally equate Godness to Omnipotence., but if they're ok with a semi-omnipotent God, then this may work.
|
Chyayla
| |
| Friday, July 06, 2007 - 9:59 am: |
| 
|
तुमचे सगळ्यान्चे मुद्दे वाचुन बरेच प्रश्न आपोआप निर्माण झाले ते मी विचारेलच. पण सध्या तुमच एकमत झालेल दीसतेय की देव नाही. यावर एकच प्रतिक्रिया... Thanks God! You are not existing ... असो विनोदाचा भाग सोडुन आस्चिगच्याच भाशेत. Those who find that Non-exixtence of God concept is useful should continue to get comfort from it so long as they do not take up arms against those who do think about God and seek ultimate truth. तुम्ही ज्या सार्या कल्पना सांगितल्या आहेत त्या "कल्पना" कालबाह्य झाल्या आहेत. याचा अर्थ "देव" कालबाह्य झाला असे नव्हे क्ष एकदम मनातल बोललास मला पण सगळ्यात पहिले हाच विरोधाभास आढळुन आला. की या सगळ्या देवाबद्दलच्या खुळचट समजुती आहेत बस. या खुळचट समजुती रीटायर्ड करणे योग्य. त्यातल्या त्यात देव धर्मग्रंथाद्वारे लोकाना मारायला सांगतो ही तर अजुनच खुळचट कल्पना आहे. म्हणुनच मी मागे अशा प्रकारच्या तर्कानी मनोरंजन होतय हे म्हटले होते. शे. न. तुमच्या बद्दल वैयक्तिक नाही म्हणायचे मला पण हे म्हणजे देव अशी जी तुमची समजुत आहे ती योग्य वाटत नाही. नास्तिक देखील देव न मानणारे आस्तिक तान्या मग नास्तिक कोणाला म्हणायचे आता? मज पामराचा गोंधळ झालाय निदान या उत्तराची अपेक्षा करतोय. मागे मी तुम्हाला बुद्धीप्रामाण्यवादावरही प्रश्न विचारले होते त्याही उत्तरान्ची वाट पहात आहे. सतिश माढेकर अतिशय योग्य तर्क मान्डलात अभिनन्दन. Light/Water/Fire are not God in the current context of this discussion आस्चिग चा मुद्यातला विरोधाभास दाखवण्यास हे अतिशय योग्य असे उदाहरण आहे. शिवाय ते उदाहरणच आहे त्यामुळे हा या चर्चेमधे आणण्यात काहीच चुक नाही. शिवाय Omnipotent सोबत Omnipresent विसरलात वाटत.
|
Radha_t
| |
| Friday, July 06, 2007 - 10:51 am: |
| 
|
माझाही एक भाबडा प्रश्न आहे , देव आहे नाही , कसा आहे कुठे आहे महित नाही तेवढी माझ्या बुद्धिची कुवतही नाही कदाचीत ती एक संकल्पना असेल ... काहिही ... तो असला नसला तरी आपल्याला काय फ़रक पडतो .. आपल आयुष्य ३०-४०- ५० - १५० फ़ार फ़ार तर २०० वर्ष ... आपली कुवत किती ? फ़ार फ़ार तर मंगळावर जाउ .. किंवा अजुन थोड पुढे ... पण देव कशाला हवा .. तो तुमच आयुष्य १०००० वर्षांच करु शकेल ? का तुम्हाला सुर्याला गिळायला मदत करेल ? बर ते जाउ दे मग देव हवा कशासाठी? परिक्षेत पास करण्यासाठी, मुलिचा जीव वाचवण्यासाठी? सुनामी रोखण्यासाठी,पाप धुण्यासाठी का मोक्ष मिळवून देण्यासाठी? जर क्षुल्लक कामासाठी देव नाही , सुर्याला गिळण्यासारख्या अशक्य कामात देव मदत करु शकत नाही तर देव हवा कशाला ? देवाची संकल्पनाच कशाला ? बर वाटत म्हणून मनःशांतीसाठी ? एवढ्या एकाच कामाने ती मिळू शकेल ? शोधली तर दुसरी कारण मिळतील का ? समाजात अराजकता माजू नये म्हणून? एक गम्मत सांगते .. माझी मुलगी जेवत नसली झोपत नसली की तिला राक्षस येईल, अमका येएल तमका येइल करुन खायला लावते किंवा झोपायला लावते, तस देव आहे पाप करु नका तो शिक्षा देइल हा बाळबोधपणा अजून किती दिवस चालणार ? देवाची संकल्पना कालबाह्य करायला माझेही अनुमोदन !!
|
Bee
| |
| Friday, July 06, 2007 - 11:00 am: |
| 
|
नास्तिक देखील देव न मानणारे आस्तिक >> हे विधान अगदी खरे वाटते. ते कसे तर, मुर्तीपुजा किंवा माणसासारखीच दिसणारी एखादी शक्ती म्हणजे देव हे न मानणारा नास्तिक. पण ही नास्तिक व्यक्ती हे मानते की अशी शक्ती ह्या ब्रम्हांडात आहे जी माणसारखी दिसत नाही किंवा आपण ज्या देवांना पुजतो तशी ती दिसत नाही. आपल्याकडे बरेच जण देव म्हणजे मुर्तीपूजा हेच अधिक मानतात. देवबाप्पा नाव घेतले की कुठलानाकुठला तरी देव नजरेसमोर दिसतो. मग आपली श्रद्धा म्हणा आपण त्या देवाची पुजा वगैरे करतो. बरेच असे आस्तिक लोक असा विचार करत नाही की देव निराकार आहे मग तो कसा आहे, त्याचे रूप कसे असेल, तो कुठल्या form मधे असेल..
|
Shrini
| |
| Friday, July 06, 2007 - 11:20 am: |
| 
|
There's no paradox in aschig's question. It actually questions the very concept of omnipotence. Now if you bring omnipresence to table, it only goes further to show that God is not omnipotent, because clearly Light/Fire/Water inherently have the aforementioned limitations, and hence so does the God that inhabits them.
|
Chyayla
| |
| Friday, July 06, 2007 - 2:10 pm: |
| 
|
मी या BB बद्दल आधीच म्हटले होते की आधी देव म्हणजे काय ते पहा आणी मग त्यावर चर्चा करा. ईथे कित्येकान्च्या देवाबद्दलच्या संकल्पना बघितल्या राधा, शे. न., विजय खास करुन ईत्यादीन्च्या तसेच ईतरही आधी देव काय हे पहाण्याची तसदी कुणीच घेत नाही. त्या आधीच स्वता:च अगदी विचित्र कल्पना करुन घाईने त्याला कालबाह्य करुन मोकळेपण झालेत. राधा, तु जे म्हणते की सुर्याला गिळायला मदत ते तर मनुष्य पण नाही करु शकत मग काय मनुश्य पण कालबाह्य झाला का? हा सगळा संसाराचा पसारा, विश्व उत्पन्न झाले याला काही तरी कार्य कारण भाव असला पाहिजे ना? माणुस साधी मातीही निर्माण करु शकत नाही मग कोणत्या विज्ञानाच्या जोरावर तो ईतका गर्व दाखवतो? तरी सगळ्यात पहिले तु पण देवाबद्दल विचित्र संकल्पना करुन घेतली आहे दुसरी गोष्ट जसे लहान मुल पडले की आपण नाही कोणाला तर जमिनीलाच "हात रे" करुन चापटी मारतो आणी म्हणतो यानी पाडले ना तुला? झाल त्याची शिक्षा कुणालातरी मिळाली याचा आनन्द लहान मुलाला होतो आणी तो रडने थाम्बवतो. मला ह्या गोष्टीची आठवण झाली कारण तुमचा देवाला कालबाह्य करण्याचा प्रकार अगदी अश्याच स्वरुपाचा आहे. हा सुद्धा बाळबोधपणाच वाटतो. यात कुणी राग मानुन घेउ नये कारण तुमच्याच सारखा तर्क मी ही मान्डतोय तेंव्हा मला पण प्रामाणिक उत्तरांची अपेक्षा आहे. तसेच सगळ्यान्चे तर्क वाचायला आवडतात कारण चर्चेमधे सगळ्याप्रकारचे तर्क ज्याच्या त्याच्या समजुतीनुसार येउ शकतात हे मला मान्य आहे. बी, मला नाही वाटत नास्तिक म्हणजे देवाला निराकार मानणे. कारण त्याना देव कोणत्याच Form मधे मान्य नाही. तरी मला तान्याकडुन याच उत्तर वाचायला आवडेल. आपल्या कडे साकार, निराकार किंवा आवडेल त्या प्रकाराने ज्ञान प्राप्त होइल त्या कोणत्याही मार्गाने प्रत्येक व्यक्तिनुसार प्रकार बदलतो. अगदी निरीश्वरवादही सत्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे ज्यात जे आहे त्याचा निशेध करत करत मनुष्य सत्य समजवुन घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे ईश्वराचे असलेले अस्तित्व नाकारुनही, असे मला वाटते.
|
नास्तिक देखील देव न मानणारे आस्तिक कारण देव नाही असे सिद्ध झाले आहे का? देव नाही अशी देखील निश्चितता नाही. त्यामुळे देव नाहीये असे विधान करणे हे देव आहे हे विधान करण्यासारखेच आहे. माझ्या पहिल्या पोस्ट पासुन मी एक गोष्ट म्हणतोय ती ही की देव ह्या संकल्पनेची मला गरज, उपयुक्तता दिसतच नाही. दिसलीच तर त्यामुळे होणारे नुकसानच जास्ती आहे. जसे धर्म एक देवापासुन निघालेली एंटीटी आहे. बीबीचे टायटल आहे देव म्हणजे काय? मी म्हणतोय देव ही संकल्पनाच का हवी.. काही जबरदस्ती आहे का की अशी एक सर्वशक्तिमान शक्ती असायलाच हवी. बुद्धीप्रामाण्यवाद कधीच असे म्हणत नाही की तुम्ही अंतीम सत्याला पोचाल.. मुळात अंतीम सत्याला पोहोचणे किंवा मिळवणे हे एकच ऑब्जेक्टिव्ह असावे का? किंवा अंतीम सत्य आहे हे निश्चित का? मला जगात एकच सत्य जाणवते ते म्हणजे माझा एक्झीस्टन्स.. बाकी प्रत्येक गोष्ट ही त्याच्या रेफरन्सने येते.. माझ्या दृष्टीने बुद्धीप्रामाण्यवाद म्हणजे जे भौतिक बुद्धीला पटते ते.. तु म्हणतोस अध्यात्म ही माणसाची भूक आहे.. हे जनरल स्टेटमेंट असेल तर चूक.. मला नाही ही भूक.. सत्य शोधण्याची भूक म्हणजे काय? आणि ती प्रत्येक माणसाला असावी म्हणजे काय? का असावी? हे हायपॉथीसीसच का मुळात? प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे जसा प्रत्येक माणुस वेगळा आहे जशी प्रत्येक प्राणि-प्रजाती वेगवेगळी आहे.. हे उत्क्रांतीच्या प्रमेयाने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.. उत्क्रांतीची काही स्पष्टीकरणे बरोबर असतील व काही चुकीची.. मला वाटते तुला म्हणायचे आहे की चैतन्य कुठुन आले? दगड आणि सजीव ह्यांच्यात नेमका फरक काय? मला ह्या प्रश्णांची उत्तरे नाही माहिती.. बुद्धीप्रामाण्यवाद देवू शकेल की नाही तेही नाही माहिती.. पण मला माहिती नाही म्हणुन देव आहे हे मला नकीच पटत नाही.. देव आहे ह्याचे स्पष्टीकरण डिडक्टिव्ह लॉजिक वापरून काढणे चुकिचे आहे.. कारण आपल्याला हातात फाइनाइट सेट नाहीये.. मी बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार करतो कारण तो मला रोजच्या आयुष्यात पुरेसा आहे.. रोजचे आयुष्य हा शब्दप्रयोग महत्वाचा कारण माझा रेफरन्स हा माझा एक्झीस्टन्स आहे.. मी त्याबाहेर जाऊन बघु शकत नाही.. ते माझे लिमिटेशन आहे.. परत पहिल्या वाक्याला.. देव ह्या संकल्पनेची आवश्यकता मला वाटत नाही..
|
हा सगळा संसाराचा पसारा, विश्व उत्पन्न झाले याला काही तरी कार्य कारण भाव असला पाहिजे ना? का बुवा? लॉटरीचे तिकिट लाखो लोक घेतात. एखाद्यालाच बक्शीस लागते. ते त्यालाच का मिळावे याला काही कार्यकारणभाव आहे का? माणुस साधी मातीही निर्माण करु शकत नाही मग कोणत्या विज्ञानाच्या जोरावर तो ईतका गर्व दाखवतो? आपण ज्या सन्गणकावर हे लिहिता तो पण माणसानेच केला आहे. बेडेकर, राधा तुमचे म्हणणे शम्भर टक्के पटले. पण मला एक शन्का सारखी सतावते. लहान मुले सान्ताक्लोज च्या कल्पनेवर विश्वास ठेवतात आणी ख्रिस्मस च्या सुमारास चान्गले वागतात. सामान्य समाजात देव अशी भुमिका वठवीत असेल का? देव नाही अशी तुमची जितकी पक्की खात्री आहे तशी सर्वान्ची झाली तर? लूटालूट आणी मारामारी तर होणार नाही? उत्क्रान्तीच्या सुरुवातीच्या पायर्यान्वर देवावरील विश्वास उपयोगी पडला असावा.
|
Slarti
| |
| Friday, July 06, 2007 - 4:51 pm: |
| 
|
आशिषचा मुद्दा मलाही मूलभूत वाटतो. माढेकर, तुम्ही जी लक्षणे सांगितली आहेत त्या उणीवाच आहेत. त्यामुळेच आपण सुकवायला पाणी वापरत नाही. उलट जर देव सर्वशक्तीमान असेल तर त्याला हे सर्व करता येणे आवश्यक आहे (सर्वशक्तीमान या व्याख्येनुसार). तेच उदाहरण घ्यायचे झाले तर पाणी, आग वगैरे देव होऊ शकत नाहीत कारण त्यांच्यात सर्वशक्तीमान असणे हा गुणधर्म नाही. आशिषने उपस्थित केलेला मुद्दा omnipotence paradox म्हणून प्रसिद्ध आहे. यातील philosophical responses मधील essentially omnipotent चा जो मुद्दा आहे तो अवश्य वाचा. त्याचा इथे उपयोग करता येईल. मॅकीचे विचार interesting वाटतात. सारांश, आशिषच्या मुद्याला उत्तर देताना तुम्हाला येथील प्रतिवादाचा आधार घ्यावा लागेल. दुसरे म्हणजे, असे म्हणू शकता की पाणी, आग वगैरे in itself alone सर्वशक्तीमान नाहीत, पण सर्वशक्तीमान देवाची अपूर्ण / अंशतः रूपे आहेत. जर ही सर्व रुपे एकत्र केलीत तर कदाचित सर्वशक्तीमान हा गुणधर्म निर्माण होईल. शेवटी असेही वाटेल की हा सर्व शब्दच्छल आहे कारण असा प्रकारचा वाद तार्कीक न राहता कधी semantics मध्ये जातो ते कळणे अवघड जाते (निदान मलातरी). मला प्रश्न पडतो की सर्वशक्तीमान असे काही (याच गुणधर्माचा वापर करुन) तर्कदुष्ट असू शकते का ? (किंवा दुसर्या बाजूने विचारायचे झाल्यास) सर्वशक्तीमान या गुणात तार्कीक सुसंगती अध्याह्रत का असावी ?
|
another interesting point I read was God can not be omnipotent and omniscient at the same time. can God know when I am going to die? can he postpone my death by one year? if yes, he can not really know when I am going to die. sorry I am posting this in english.
|
Ksha
| |
| Friday, July 06, 2007 - 5:48 pm: |
| 
|
टण्या, अगदी उत्तम मुद्दा मांडला आहेत तू. "अध्यात्म ही माणसाची भूक आहे" हे वाक्य जनरल नाही! ती प्रत्येक माणसाला असतेच असे मुळीच नाही. आणि त्याप्रमाणे तुम्हाला "देव नाही" हा विचार करण्याचे आणि त्यावर पूर्ण विश्वास असण्याचे स्वातंत्र्यदेखील आहे. पण, देव ही संकल्पना, माझ्या मानण्याने किंवा तुमच्या न मानण्याने असू किंवा नसू शकत नाही. तिचं "असणं" हे तुमच्या आमच्या विकल्पांवर अवलंबून नाही. आणि त्यातच त्या संकल्पनेचं सामर्थ्य आहे. आता आशिषने उपस्थित केलेला मुद्दा, श्रिनीने परत थोडं समजावून सांगितल्यावर म्या पामराला त्याला काय म्हणायचंय ते कळलं.. आपल्याला नाही बुवा एवढे तर्कशास्त्रातले ज्ञान the point is you are trying to compare apples with oranges... अग्निचे, किंवा प्रकाशाचे नसणे म्हणजे काळोख. आणि त्या व्याख्येनुसार हे सिद्ध होते की प्रकाशाचे हे limitation आहे की तो काळोखात असू शकत नाही. बरोबर. कोरडेपणा असेल तिथे पाणी असू शकत नाही हे पाण्याचे limitation बरोबर. पण परमेश्वराचा एक अजून गुण आहे जो या दोन्हींमध्ये नाही. सर्वव्यापकत्व. प्रकाश आणि काळोख या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जर प्रकाश असेल तर तिथे काळोख असू शकत नाही, पण "देव" म्हणजे या उदाहरणामधल्या नाण्याचा धातू आहे. तो प्रकाश किंवा काळोख या दोन्हींमध्ये भरून राहीला आहे. तेव्हां जर हे लक्षात घेतले की सर्व चराचरांमध्ये जर देव व्यापून राहीला असेल तर त्याला त्याचे limitation म्हणू शकत नाही. ही आपल्या बुद्धीची कुवत म्हणता येईल जी capabilities आणि limitations च्या पुढे जाऊ शकत नाही. बाकी जे देव नाही याला "अनुमोदन" देतायत त्यांची तर मला खूप गंमत वाटतेय. अहो तुम्ही काय ठराव पास करताय का "आजपासून आपण असा ठराव पास करूया की देव अस्तित्वात नाही" जैसे सागरांतील थेंब दोन सिद्धांत मांडती समुद्र नेण अन् कूपातील जल देई अनुमोदन पूर्ण तया||
|
Zakki
| |
| Friday, July 06, 2007 - 6:26 pm: |
| 
|
माझ्या धर्मग्रंथात जसे लिहिले आहे तसा देव न मानणार्यांना ठार मारणे वा त्यांचे धर्मपरिवर्तन करणे वा त्यांना जबर कर द्यायला भाग पाडणे असे सांगणारा देव कालबाह्य मानला जावा. NCT, शेंडेनक्षत्र! कोणत्या देवाबद्दल बोलता आहात हे कळतय् ना तुम्हाला? हिंमत आहे का त्या देवाला मानणार्या लोकांच्या समोर असे बोलायची? उगीच आपले गरीब बिचारे हिंदू, गरीब बिचार्या मायबोलीवर काय वाट्टेल ते ऐकून घेतात म्हणून बरे. असेल एखादी त्या देवाला मानणार्यांची साईट, तिथे जाऊन लिहून दाखवा. मुडदा पडेल तुमचा नि तुमच्या घरच्यांचा. आणि मुख्य गंमत म्हणजे शेवटी आले तर कुणि देव मानणारे हिंदूच येतील मदतीला. देव न मानणारे हिंदू मात्र ' हे असेच व्हायला पाहिजे होते, त्यांचा देवच नाकारतो म्हणजे काय?' असे म्हणतील.
|
Mansmi18
| |
| Friday, July 06, 2007 - 7:04 pm: |
| 
|
राधा, तुम्ही अमेरिकेतल्या बायका हळदीकुन्कवाला पीतात ती wine घेउन पोस्ट लिहिलेय का हो? तुम्हाला मंगळावर जायला, सुर्याला गिळायला(हे काय प्रकरण आहे कळले नाही बुवा मला!) देवाची मदत कशाला हवी? वडाची साल पिम्पळाला लावणे म्हणजे काय हे आज मला कळले. देव हवा कशासाठी? परिक्षेत पास करण्यासाठी, मुलिचा जीव वाचवण्यासाठी? सुनामी रोखण्यासाठी,पाप धुण्यासाठी का मोक्ष मिळवून देण्यासाठी? --अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला वाटतेय की देव अशी कोणी व्यक्ती आहे जी तुम्हाला तुमच्या convenience प्रमाणे तुम्हाला हवे ते हवे त्या वेळी कुठलाही प्रयत्न न करता देइल? मनाप्रमाणे गोष्ट झाली की हे सगळे मी स्वत्: केले माझ्या बुद्धीने आणि कर्तृत्वाने. आणि वाइट झाले की काय तुमचा देव? हे सगळे वाइट त्याने घडु कसे दिले? ----बाळ्बोधपणा??? क्षणभर देवाला बाजुला करा हो. वाइट कर्माचे फ़ळ वाइट द्यायला देवाची गरज नाही. तुम्हाला ते आपोआप मिळेल हा सरळ हिशोब आहे त्यात देवाचा काय सम्बन्ध? तुम्ही काहीही विचार न करता मनात येइल ते बरबटून काढले आहे. मला वाटते इथे देवाच्या अस्तित्वाच्या मागे जे लागले आहेत त्याना कदाचित वैयक्तीक आयुष्यात काही ठिकाणी अपयश, निराशा, वैफ़ल्य आले, मनाविरुद्ध गोश्टी घडल्या आणि ते खापर कोणावर तरी फ़ोडायचे तर ते देवाच्या माथी फ़ोडले. त्याना अचानक साक्षात्कार झाला कि देव नावाचे या जगात काही नाही असलेच तर त्यामुळेच जगात वाइट गोष्टी वाढल्या आहेत. सुखदु:ख हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येक मनुष्याच्या आयुश्यात कमीजास्त प्रमाणात ते असतातच मग त्यात देवाला ओढायचे काय कारण?? (देव या संकल्पनेवर्देवावर ज्यांचा खरा विश्वास आहे ते संकटाना सामोरे जातात असा blamegame खेळत नाहीत.) असो. सान्गायचा मुद्दा एवढाच राधाबाई, की जरा विचार करा आणि मग लिहा. उगाच उचलला mouse आणि click केला असे नको!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|