|
Aschig
| |
| Wednesday, May 10, 2006 - 12:08 am: |
| 
|
thanks tanya. here is another link - crossposted from another BB: Is God a Taoist - by Raymond Smullyan
|
P_para2
| |
| Monday, May 22, 2006 - 10:06 am: |
| 
|
kind request 2 all peoples here is tht plz read & go through lit of SWAMI VIVEKANANDA . It will clear all doubts off all peoples abt GOD . "nar seva yahi narayana seva hai"
|
आधीच्या पोस्ट्स न वाचता लिहितो आहे देव म्हणजे कोण??उत्तर अगदि सोपे आहे- देव म्हणजे- भगवान श्रीकृष्ण . Krishna means God and God means Krishna
|
Mansmi18
| |
| Sunday, July 01, 2007 - 9:00 pm: |
| 
|
Can you set up an experiment to prove the existance of God? --------------------------------------------------------- vijay, Yes there is an experiment to prove existence(by the way it is spelled existence,,not existance) of god. Place- anyplace Time-anytime Equipment-Nothing necessary Pre-requisite-Your heart should be pure. You should get rid of 6 enemies..viz kaam, krodh, lobh, moh, mada, matsar Note:The above is extremely necessary or the experiment cannot start. Conclusion-Once your heart becomes pure, you will not need any experiment to prove his existence. You will feel him in your heart. You will become him!!! (I tried the above but could not succeed as the pre-requisite is very difficult to attain. I cant get rid of 6 enemies because they have become my dear friends!!) some past successful experiments were done by: Sant tukaaraam, sant dnyaneshwar, Muktabaee. meeraabaee, sant kabeer, vivekaanand.
|
Paarava
| |
| Monday, July 02, 2007 - 6:11 am: |
| 
|
namaskar. Mansmi18, sarwapratham tuze abhinandan. khup chaan lihilayes. mala watata kadachit ithe aastikanaa diwachawaycha prayatna kelya jatoy. aani yaat "naastikaanaa" maja watate. "deemadu", "jaswanda", post wachun anand zala. maza purnapane dewawar Vishvas aahe. yenaryala ek diwas jayachech aahe. aani tyache margahi wegwegale aahet. kuthe accident, kuthe aajar. tyacha dewashi smbandh kai? bharpur anubhav sangata yetil. pn saglyanii sangitlelya goshti "vijay" yanna patlelyach nahit. tarihi pudhehi vichaar mandalaya mala awadatil. bhetuya.
|
विजय, देवावरच्या चर्चेमध्ये भक्ति, श्रद्धा, विश्वास हे शब्द आले की तार्कीक चर्चा संपते. त्यामुळे ह्या बाबतीत चर्चा करणे निष्फळ ठरते. माझा असा अनुभव आहे की बरेच लोकं लहानपणापासून आई वडील इतर वडिलधारे लोक ह्यांना बघुन देवावर विश्वास ठेवायला सुरुवात करतात. फारच थोडे जण आपली श्रद्धा तपासुन बघतात. ह्याला अनेक कारणे असु शकतात. उदा: आई वडील शिक्षक ई. लोकांवर असलेली श्रद्धा आणि विश्वास ज्यामुळे त्यांच्या कडुन आलेल्या मतांना पडताळुन पाहणे ही कल्पनाच सहन होत नाही. किंवा परीक्षा, अवघड प्रसंग अश्या वेळी देवाची प्रार्थना आराधना स्मरण करुन मानसीक आधार मिळालेला असतो. अथवा कुटुंबा मध्ये, ओळखीच्यांमध्ये काहीतरी अजब अतार्कीक घटना (बहुतेक वेळा अश्या घटनांचे संपूर्णपणे तार्कीक स्पष्टीकरण देता येते पण असे विश्लेषण केलेले नसते) घडते ज्यामुळे देवावर विश्वास ठेवला जातो. याउप्पर देखील अनेक कारणे असु शकतात. मी फक्त मला आढळलेली उदाहरणे वरती उद्धृत केली आहेत. मला आठवते मी साधारण सातवी-आठवीत असताना आपण देवाला का नमस्कार करतो, देव वगैरे काही खरेच असेल का असे प्रश्ण स्वत:ला विचारायला सुरुवात केली. केवळ आई-वडील्-शिक्षक्-बहुसंख्य लोक देवाला मानतात म्हणुन देवाला मानणे मूर्खपणाची आहे असे लक्षात आले. जसे जसे माझे वाचन वाढत गेले, विविध संस्थांमध्ये काम आणि त्यामुळे अनेक विविध लोकांशी संपर्क येवू लागला, तसे तसे मी या गोष्टीचा अधिकाधीक विचार करु लागलो. देव ही संकल्पना मला माझ्या दैनंदीन आयुष्यात कुठेही आढळेना. किंवा अश्या एखाद्या संकल्पनेवर विश्वास असणे किंवा नसणे ह्याने माझ्या आयुष्यातील कोणतीही घटना बदलत नाही, फरक पडत नाही असे माझ्या लक्षात आले. आणि मी ह्या संकल्पने बद्दल विचार करणे वृथा आहे अश्या निष्कर्षाप्रती आलो. माझ्या मते ज्या लोकांचा विश्वास आहे ते त्यांचे खाजगी मत आहे. त्यांना स्वतःचे मत बाळगण्याचा, प्रसार करण्याचा आणि त्या मताप्रमाणे आचरण करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. माझा आदर ह्या अधिकाराप्रती आहे. आता ह्या प्रश्णाची माझी बाजु. सर्व गोष्टी ह्या तर्काच्या आधारावर, बुद्धीप्रामाण्यवादावर पडताळून पाहिल्या जाव्यात असे माझे मत. ह्यामुळे समाज अधिक सजग बनेल. अतार्कीक गोष्टी ह्या रुढींमधून हद्दपार होतील. एखादी रुढी,मत,विचार फक्त संक्रमीत होत आला आहे, थोरा-मोठ्यांनी सांगितले आहे म्हणुन मान्य केले न जाता डोळसपणे मान्य अथवा अमान्य केले जाईल. आणि हे माझे मत असुन त्याचा प्रचार मी करत राहीन. अंधश्रद्धा, समाजाला घातक विचार आणि रुढींचे संक्रमण ही ह्या वादाची अजुन एक बाजु. त्यावर स्वतंत्र विश्लेशण करायला लागेल आणि एक वेगळा बीबी देखील त्याकरीता उपलब्ध आहे. मी माझ्या परीने स्पष्टीकरण दिले आहे. सर्वांचे विचार आणि टिप्पणी स्वगतार्ह.
|
Mansmi18
| |
| Tuesday, July 03, 2007 - 7:03 pm: |
| 
|
शंतनु, मी आस्तिक आहे पण अंधश्रद्ध नाही. तुझे प्रश्न इथे विचारल्यास त्यावर चर्चा करायला मला आवडेल. कृपया specific प्रश्न विचार जेणेकरुन तुझा आक्षेप कुठल्या गोष्टीला आहे ते कळेल. तुझ्या POST वरुन तुझा आक्षेप नक्की कशाला आहे ते कळले नाही. धन्यवाद.
|
Chyayla
| |
| Wednesday, July 04, 2007 - 3:57 am: |
| 
|
या BB चा विशय आहे देव म्हणजे काय? माझ्या मते "जे काही दिव्यत्व धारण करते ते म्हणजे देव होय" अशी सरळ सोपी व्याख्या. त्यानुसार प्रत्येक मनुश्य, पापी असो वा पुण्यात्मा, गरीब, श्रीमन्त कोणीही असो, तसेच प्राणी, स्रुष्टी व हे समस्त चराचर हे दीव्यत्व धारण करुन आहे हे सगळ देवच आहे देवाचीच रुपे आहेत (देव याचा अर्थ मी परमेश्वर, भगवान, ब्रह्म अशा समानार्थी शब्दानी घेतोय) म्हणुन "सर्वम खल्विदम ब्रह्मासी" त्यामुळे प्रत्येकच व्यक्त अव्यक्त रुपाने दीव्यत्व सगळीकडे व्याप्त आहे. ज्याला म्हणुनच आपण Omnipotent , Omnipresent म्हटले आहे. असो तर ह्या त्याच्या गुणामुळे सुद्धा देव म्हणजे काय हे जाणायला मदत होते. एका चर्चेत सावट यान्नी छान सान्गितले होते की मनुश्य गुरुच्या आशिर्वादाने (गुरु म्हणजे ही स्रुष्टी तुमचे अनुभव हेही असु शकते) आधी हे जाणतो की "अहम ब्रह्मास्मी" म्हणजे माझ्यात देवत्व आहे तसे तुझ्यातपण आहे "त्वं तत्वमसी" तु पण तोच आहे असे करुन याची व्याप्ती सम्पुर्ण जगतच ब्रह्म आहे ईथपर्यन्त मनुश्याचा प्रवास होतो. देवाच्या अस्तित्वाबद्दल मी असे म्हणेल देव हे ईतकेच सत्य आहे जितके सत्य तुम्ही आहात. तुम्ही स्वता:च अस्तित्व नाकारु शकत नाहीत म्हणजे मुळात तुम्ही कोणी आहात ही जाणीवच ज्यामुळे तुम्हाला होते ते देवत्व (दीव्यत्व) तुमच्यात आहे म्हणुनच तुम्हाला अशी जाणीव स्वता:ची, ह्या चराचराचे होते कारण तुम्ही ते पाहु जाणवु शकता. माझ्या मते हाच एक सगळ्यात महत्वाचा तर्क आहे. जर हा Consciousness नसेल तर तुम्ही आहात काय आणी नाहीत काय सारखच, मग कसचे तुम्ही आणी कसचा देव? तेन्व्हा तुमच्या अस्तित्वाचा Consciousness हा महत्वाचा तो का येतो? याचा विचार करुन बघा, म्हणजे ईथे श्रद्धा, विश्वास याचा प्रश्नच नाही.. आहे तर निखळ तर्क. असो पुढे चर्चा करुच, सध्या ईतकेच.
|
Aschig
| |
| Wednesday, July 04, 2007 - 6:08 am: |
| 
|
tanya, well said. You may be interested in reading Daniel Dennett's book "Breaking the spell". It is very well written. There is a well received novel called "American Gods" by Neil Gaiman. I finished reading it today. It discusses at different levels the existence of Gods noting that none of the Gods were born in America (he is referring to European and Indian Gods mainly) and they all arrived here in the minds of peoples who migrated. The novel is too verbose for my liking, but the concept is interesting.
|
Shrini
| |
| Wednesday, July 04, 2007 - 6:38 am: |
| 
|
तुमचा consciousness म्हणजेच देवत्व, किंवा तो देवामुळेच येतो, या म्हणण्याला काय तार्कीक आधार आहे ? Aschig, so what's the point of that book ? I'm sure that original Americans, i.e. Red Indians worshipped their own gods...
|
तान्या, तुमच्या म्हणण्याला पुर्ण अनुमोदन. माझ्या शेजारच्या अपार्टमेन्ट मध्ये एक अत्यन्त सुस्वभावी क्रुश्ण्वर्णीय महिला रहाते. ती एकटीच असते. तिच्या सात वर्षाच्या मुलीला एका असाध्य आजाराने ग्रासले आहे. ती मुलगी कायम बेडवर असते. नोकरी साम्भाळून मुलीची काळजी घेताना तिची होणारी धावपळ पाहून खरेच दु:ख होते. तीला कामात होते तेवढी मदत अम्ही पन करतो. बोलता बोलता ती म्हणाली की माझ्या आधी माझी मुलगी जावुदेत. तिचे हे वाक्य काळजाला छेदून गेले. खरेच देव आहे का? तो हे सर्व पहातो आहे का? हे पाहून त्याला खरेच दया येत नाही? असे कितितरी अनुत्तरीत प्रश्न आहेत ज्यान्चा शोध नास्तीकतेकडे घेवून जातो.
|
Chyayla
| |
| Wednesday, July 04, 2007 - 2:39 pm: |
| 
|
किंवा तो देवामुळेच येतो तुमच्या पोस्टवरुन असे वाटतय की तुम्हाला तर्कच नाही समजला. बाकी देवाबद्दल तुमच्या कल्पना ऐकुन करमणुक होते आणी प्रश्न पडतो अडाणी आणी सुशिक्शीत अडाणी यामधे काय फ़रक असावा हा विचार करतोय. हा BB आस्तिक विरुद्ध नास्तिक असा आहे का? असाही प्रश्न पडलाय.
|
विजय, तू ज्यामुळे नास्तीकतेकडे वळतो आहेस ती कारणे चुकीची आहेत असे मला वाटते. मुळात तू असे अज्युम करतो आहेस कि देव असला तर जगात इतक्या वाइट गोष्टी होणारच नाहीत. माझे म्हणणे असे की मला बुद्धीप्रामाण्यवादावर किंवा तार्कीकतेच्या आधारवर देव ह्या संकल्पनेची गरजच भासत नाही. च्यायला, जसे फक्त पॉइंट मास होते तेव्हा त्याच्याबाहेर काय होते हे रेफरंस सोडून विचारणे होते, तसेच कॉन्शसनेस सोडून बाहेर बघणे होते.. आणि माझी नेणीव ही देवाचे अस्तित्व कसे सिद्ध करू शकते? तू जो तर्क मांडला आहेस तो एक लूप आहे. गोल गोल फिरतोय. असो. बीबीचा विषय देव म्हणजे काय? तर माझ्या मते काही नाही. निरर्थक प्रश्ण. एक थोडे सिमिलर (अगदी तंतोतंत नाही) उदाहरण देतो. यती अस्तित्वात आहेत का? असतील किंवा नसतील. जर सबळ पुरावा (भौतिक पुरावा आणि जो तार्कीक आणि बुद्धीप्रमाण असेल) आला तर मान्य करेन. नाहीतर आज आहे तीच स्थिती. फरक काहीच पडत नाही. आशीष तू सांगितलेली पुस्तके मी जरुर वाचेन. एक शेवटची कमेंट. वरील सर्व प्रो-देव पोस्ट असे गृहीत धरतात की देव अशी संकल्पना असायलाच हवी. त्यांचे हायपॉथीसीसच तिथुन सुरु होते. मग कोणी सृष्टी म्हणजे देव, चांगली गोष्ट म्हणजे देव, नेणीव म्हणजे देव, समाजाची सेवा म्हणजे देव, कृष्ण म्हणजे देव, सर्वशक्तिमान म्हणजे देव अशी विधाने करतात. जर हे गृहीतच नाही धरले की देव अशी संकल्पना असावी (इथे लक्षात घ्या की माझे गृहीतक देव नाही असे नाहीये) आणि मग सृष्टी, समाजसेवा, नेणीव आणि जाणीव, कृष्ण ह्यांना स्वतंत्रपणे नाही का बघता येणार? मला कदाचीत हे सर्व सुलभतेने मांडता येत नाहीये. मी लॉजिकचा विद्यार्थी नाही आणि भाषेचा देखील नाही. जितके जमले तितके लिहिले
|
च्यायला, तुझी वरील पोस्ट ही मी आधीची पोस्ट लिहीत असताना आली. त्यामुळे त्यावरील टिप्पणी इथे. इतरांच्या देवाबद्दलच्या कल्पना वाचुन तुझी करमणुक होते आहे हे वाचून आनंद झाला. कोणाचीही करमणूक करणे हे अतिशय अवघड काम आहे. ते माझ्या हातून घडतेय तर उत्तमच. असो. अडाणी आणि सुशिक्षीत अडाणी हे मात्र थोडे खटकले. तुझे असे म्हणणे आहे का की देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका येणे हे सुशिक्षीत माणसाला अशक्य आहे? जर तुझी अशी समजूत असेल तर चर्चेस अर्थच उरत नाही. जसे देवाच्या अस्तित्वाबद्दल तुला अजिबात संशय नाही तसेच काही लोकांना देव अस्तित्वात असुच शकत नाही याबद्दल अजिबात संशय नसतो. माझ्यासारखे काही देव ह्या संकल्पनेची गरज, उत्क्रांती आणि उपयुक्तता अश्या अंगाने विचार करतात. आणि मी स्वतःला शिक्षीत समजतो. चार्वाका पासून सार्त्रे पर्यंत अनेक विचारवंतानी वेगवेगळ्या पद्धतीने आपापले विचार मांडले आहेत. यात काही नास्तीक, काही अज्ञेयवादी तर काही मधले आहेत. जसे वेदकर्त्यांनी, शंकराचार्यांनी, वेगवेगळ्या प्रेषितांनी, ज्ञानेश्वर, तुकाराम, साईबाबा आणि मायबोलीवरील अनेकांनी आस्तिक विचार मांडले आहेत. त्यांचे विचार मला पटत नाहीत म्हणुन मला ते अडाणी किंवा सुशिक्षीत अडाणी वाटत नाहीत. ते बरोबर आणि मी चूक असू शकतो. मी ह्या ऑप्शनला ओपन आहे.
|
मनोज, तुझ्या प्रश्णाला उत्तर द्यायचे राहुनच गेले. पण ते आता बरेच स्पष्ट झाले असावे. माझे प्रमुख मुद्दे २: १. केवळ आपल्याला लहानपणापासून सांगण्यात आले की देव आहे म्हणुन बहुसंख्य लोक देवावर विश्वास ठेवतात आणि हा विश्वास कधीही पडताळून न पाहता आचरणात आणतात. हा विश्वासच अतार्कीकतेवर आधारीत असल्याने ह्याचे आउटकम हे अतार्कीक येत राहते. २. समाज श्रद्धा, विश्वास ह्या गोष्टींना आधार न मानता जर तर्क आणि बुद्धीप्रामाण्यवादाला आधार मानू लागला तर सामाजीक दृष्ट्या अधिक प्रगती होइल.
|
Mansmi18
| |
| Wednesday, July 04, 2007 - 3:53 pm: |
| 
|
"मग कोणी सृष्टी म्हणजे देव, चांगली गोष्ट म्हणजे देव, नेणीव म्हणजे देव, समाजाची सेवा म्हणजे देव, कृष्ण म्हणजे देव, सर्वशक्तिमान म्हणजे देव अशी विधाने करतात." --------------मग काय हरकत आहे त्यात? (इथे लक्षात घ्या की माझे गृहीतक देव नाही असे नाहीये) ---------------------मला तर वाटले तेच तुझे गृहीतक आहे?? आणि मग सृष्टी, समाजसेवा, नेणीव आणि जाणीव, कृष्ण ह्यांना स्वतंत्रपणे नाही का बघता येणार? -----------------------स्वतंत्रपणे म्हणजे कसे पहावे??? मला कदाचीत हे सर्व सुलभतेने मांडता येत नाहीये. मी लॉजिकचा विद्यार्थी नाही आणि भाषेचा देखील नाही. -----------------------------------हे मात्र बरोबर वाटत आहे. तुझ्या विचारांचा खुप गोन्धळ झाला आहे. शांतपणे बसून विचार कर आणि नीट मुद्देसूद लिहि. एक निरीक्षण्: बरेच लोक देवाविरुद्ध अशामुळे होतात की त्यान्च्या मनाविरुद्ध काहीतरी होते उदा. नोकरी गेली, कोणी जवळचे मरण पावले, प्रेमभंग झाला, कोणी जवळचे आजारी आहे, लग्न जमत नाही इ इ. आपल्याला देव म्हणजे आपला नोकर वाटला का? आपल्या मनाप्रमाणे वागायला? बरेच नास्तिक स्वत:ला "दिवार" मधला "अमिताभ" समजतात. "मुझे भगवान से कुछ नही चाहिये" असे म्हणण्यात त्याना धन्यता वाटते. किंवा मला कधी देवाची गरज भासली नाही असे म्हणतात.(मुळात देवाची किंवा देव या संकल्पनेची गरज का असते हेच न कळल्याने घडलेल्या गोन्धळातुन हे सर्व घडते). कृपया प्रथम आपले विचार नीट संकलीत करून लिहिलेत तर चर्चा जास्त चांगली होइल. (मी इथे स्पष्ट करु इच्छीतो की मला नास्तिक विचारसरणीबद्दल अत्यंत आदर आहे आणि चांगली logical debate करायला खुप आवडेल). धन्यवाद.
|
मनोज च्या (रादर तुझ्या) पहील्या मुद्याला पुढे न्यायचे तर असे विचारेल की जर त्या गोष्टी देव नाहीत तर मग देव काय आहे अशी तुझी अपेक्षा आहे. देव असेल किंवा नसेलही. मला दोन्ही मान्य आहेत. म्हनजे कदाचीत मी ही गोंधळलेला असेल ईतरांचा दुर्ष्टीने पण कधी कधी वाटत की देव नसावा. तर कधी वाटत मग जगायची प्रेरणा का मीळते, विवेकानंदना त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले ते चुक होते का? की ते मिळालेच नाही कारण त्यांना देव म्हनजे तेच असे कळाले. हे कस्तुरी मृगा सारखे तर नाही ना? मागे आशिष च्या बीबी वर हाच प्रश्न मी त्याला विचारला होता. तो अजुनची आहेच. कारण त्याच ऊतर कदाचित स्वत ला अनुभवावे लागेल. मग ती अनुभुती म्हनजे देव की आप्ल्यातच असलेली सुप्त शक्ती? देव असावा वा नसावा त्याने फरक पडत नाही. देव नाही वा आहे ही जी श्रध्दा आहे ती कदाचीत महत्वाची. खर सांगायच तर हा वाद घालनेच चुक कारण देव आहे वा नाही याची अनुभुती कोणालाही नाही त्यामूळे आपन जे बोलतो ते कदाचीत तर्कावर आधारीत. (जे आपल्या २ वा ३ डायमेन्सन बुद्धी ला कळाले ते) मग परत एकदा ज्या विषायाची माहीतीच नाही त्या वर वाद कसा घालु शकतो. तन्या मला तरी तुझे विचार आवडले. गोंधळलेले वाटले नाहीत पण त्याच वेळी मी आस्तीक का नास्तीक हे ऊत्तर माझ्या कडे नाही. कारण रोजच्या जिवनात मी बहुतेक नास्तीकच असतो. पण अचानक एक दिवस लहर येते व मी देवळात जाऊन तास दोन तास बसतो. कदाचित शांतते साठी कदाचित स्ट्रेस घालविन्या साठी. मग तेव्हा मी आस्तीक असतो का? आणि जेव्हा शेजार्या कडे सत्यनारायनाची पुजा असते तेव्हा त्या कथा ऐकयला मी जात नाही कारण त्या मला पटत नाहीत मग तेव्हा मी नास्तीक का? धर्मावरिल (सर्वच) बरीच पुस्तक मी वाचली आहेत पण बर्याच पुस्तकांनत्र तो घोळ अजुनही वाढला आहे. कारण ती कन्स्पेट पचायला अवघड आहे. कृष्ण म्हणतो मी आहेही आणि नाहीही. ते सम्जुन घ्यायला वेळ लागेल. तेव्हा कदाचीत निदान मी आस्तीक का नास्तीक हे कळन्यास मदत होईल.
|
आपल्याला देव म्हणजे आपला नोकर वाटला का? आपल्या मनाप्रमाणे वागायला? पण त्याच्या वागण्याची सन्गती तर हवी?
|
Chyayla
| |
| Wednesday, July 04, 2007 - 6:34 pm: |
| 
|
तर्क आणि बुद्धीप्रामाण्यवादाला आधार मानू लागला तर सामाजीक दृष्ट्या अधिक प्रगती होइल. तान्या तुझे विचार ऐकण्यास उत्सुक आहे आणी ती टिप्पण्णी अर्थातच तुला उद्देशुन नव्हतीच. पण वर जे तु म्हटले त्याला फ़ारच मर्यादा आहेत अरे जेन्व्हा तु बुद्धी हा शब्द वापरतो त्यालाच काय प्रमाण म्हणुन वापरणार? मुळात ही बुद्धीच का निर्माण झाली मग येत मन जे विचार करु शकते असे आपल्याला जाणवते हे मन तरी कसे तयार झाले? ज्याच्या आधारावरच तुम्ही तर्क मानायला निघालेत मुळात त्याच्याच बद्दल जर शोध घ्यायचा प्रयत्न कराल तर काही मिळण्याची शक्यता आहे असे वाटते. तरी तुम्ही बुद्धी, मन म्हणजे काय? ते कसे आले? व का? आले जर ते नैसर्गिकच आले तर मग सगळ्याना वेगवेगळी बुद्धी का? ते सान्गु शकलात तर बुद्धीप्रामाण्यवादाचा तर्क म्हणजे अंतिम सत्य असे मानता येइल. बरे दुसरे असे सान्गा तुम्हाला बुद्धीप्रामाण्यवाद मानायला बुद्धी आहे असे जाणवते यातला हा "तुम्ही" म्हणजे कोण? अर्थातच इथे सन्दर्भ हा अध्यात्मिक आहे सामाजिक नव्हे पण शेवटी अध्यात्म ही मानवाची भुक आहे तेन्व्हा त्याला एक सामाजिक आशय येतोच. असो मनोजचा मुद्दा की आई-वडील म्हणतात म्हणुन देव मानायचा काय? आणी तान्यानी म्हटल्याप्रमाणे ते अतार्किक आहे, यावर अगदी साधा प्रश्न विचारता येतो की आई म्हणते म्हणुन वडील, भाउ, बहीण ईतर नाते आपण मानतोच ना. अर्थात देव ही ती म्हणते म्हणुन माना असे मला म्हणायचे नाही. पण हे उदाहरणच चुकीचे आहे असे वाटते. देव आहे की नाही यासाठी स्वानुभवच हवा कोणी सान्गतो म्हणुन आंधळेपणाने नव्हेच. पण दुसरी गोष्ट अशी की मानव समाजाने काही संकल्पना, शोध ईतक्या वर्शाच्या करोडो लोकान्च्या अनुभवातुन, प्रयोगातुन व निरिक्षणातुन सिद्ध केले त्याला आपण न अनुभवताच नाकारणे याला अडाणीपणा म्हणतो. जसे आता आपण पहिल्यापासुन चाक शोधुन काढत बसणार नाहीत तर सरळ मोटार चालवु. व त्यापुढचे संशोधन करु. तसेच पुर्वजानी जी सत्ये शोधुन काढली त्या आधारावर प्रत्येकानी पडताळणी करण्यास हरकत नाही. व त्यापुढे प्रगती करावी हे जास्त सायुक्तिक वाटत. नास्तिकतेबद्दल मलाही आदर आहे एखादी व्यक्ति सदाचारी आहे पण नास्तिक आहे हे आस्तिक म्हणवुन भ्रष्टाचार, ढोन्गीपणा, दंभ मिरवणार्यांपेक्षा शतपटीने चांगले. पण असा नास्तिकही मिळणे कठीण आहे. फ़क्त एकच अट नास्तिकतेसोबत त्याची सत्य जाणुन घ्यायची धडपडही हवी जशी ही धडपड, सत्य शोधण्याची तयारी नरेन्द्र सारख्या नास्तिकानेही दाखवली व पुढे तुमच्या सगळ्यान्च्या तर्काच्या आधारे मुर्तीपुजा करणारे, कर्मकान्ड करणारे व जगाच्या व तुमच्या हिशोबी ठार वेडे ठरतील असे स्वामी रामकृष्ण परमहंस हे त्यांचे चक्क गुरु होतात म्हणजे काय. बुद्धीप्रामाण्यवादी, तार्किकतेला महत्व देणारे नरेन्द्र हा श्रद्धा, भक्ती यान्चा अत्युच्च सन्गम असणारे रामकृष्ण यांचे शिश्यत्व स्विकारतो याला काय म्हणावे. त्यामुळे मी तरी आपल्या पुर्वजान्नी जे शोधुन काढले त्याचा मी पुर्ण आदर करतो. व वैयक्तिक पातळीवर त्याची पडताळणी करायला पुर्ण उत्सुक आहे. यामुळे माझे चाक शोधुन मोटार बनवण्यासारखे कष्ट व वेळ वाचतो असे मी मानेल. परत एक गोष्ट लक्शात घ्या मी त्यान्च अंधपणे मान्य करायचे म्हणत नाही तर त्यानी जे सिद्ध केले त्याची वैयक्तीक पडताळणी म्हणतोय.
|
Mansmi18
| |
| Wednesday, July 04, 2007 - 10:56 pm: |
| 
|
केदार, तान्या आपण कर्मकांड, पुजापाठ, देवळात जाणारे ते आस्तिक समजतो पण ते कामापुरते आस्तिक असे मला वाटते. हे सगळे करुन काही मनाविरुद्ध झाले तर "अहो कसला देव! जगात देव नाही बघा!" असे म्हणणारे ढोन्गी आस्तिक असतात. अशा आस्तिक लोकापेक्षा जे कधिही देवळात जात नाहीत, जे देवाला मानत नाहीत, परंतु मनाने अतिशय शुद्ध आहेत असे नास्तिक हे खरे आस्तिक म्हणता येतील. मला वाटते आस्तिक्-देवाचे अस्तित्व मानणारे नास्तिक्-देवाचे अस्तित्व न मानणारे तान्याचा गोंधळ झाला असे मी म्हणतो कारण तो जे देवळात जातात, आंधळेपणाने(मोठ्यानी सान्गितले म्हणुन) देवाला मानतात त्याना आस्तिक समजतोय. खरे तत्व समजुन न घेता असे सर्व करणारे खरे आस्तिक नव्हेत. माझ्या मते खरा आस्तिक तो आहे जो देवाचे(किंवा देव या संकल्पनेचे) अस्तित्व मान्य करतो पण थोतांडात अडकत नाही. त्याचा देवावर "अढळ" विश्वास आहे आणि हा विश्वास आयुष्यात चांगले झालेकिंवा वाइट झाले तरी कमीजास्त होत नाही. ज्याचा या गोष्टीवर विश्वास आहे की देव माझा पाठीराखा आहे आणि तो मला जीवनात येणार्या संकटाना तोंड द्यायला सहाय्य करणारा आहे.(हे लक्षात घ्या की देव येणारी संकटे टाळणारा आहे हे मी म्हटले नाही कारण जीवन म्हटले कि सुख-दुक्ख ही आलीच). ज्याचा सत्य, चांगले यावर दृढ विश्वास आहे. जो दुसर्याचे वाइट चिंतीत नाही, दुसर्याला कमी लेखीत नाही, दुष्कृत्ये करीत नाही. इथे काही लोकानी ३३ कोटी देव असा हेटाळणीने उल्लेख केला आहे. ते कसे आले ते समजुन घ्यायला हवे. "ब्रम्ह" वगैरे मोठेमोठे शब्द सामान्य लोकाना कळत नाहीत म्हणुन त्याची आराधना करण्यासाठी त्या परमोच्च शक्तीचे सग़ुण रूप म्हणुन निसर्गातील दृश्य गोष्टीना नावे दिली आहेत, उदा.सूर्यनारायण, नवग्रह इ. निर्ग़ुण abstract ज्ञान आमच्यासारख्याना पचायला जड जाते म्हणून हा खटाटोप. यात काय वाइट आहे? एक मी स्पष्ट करु इच्छितो कि जे "नास्तिक" आहेत त्यांच्याबद्दल मला आदर आहे. आणि अपार कुतुहल पण आहे. तान्याचे विचारसरणी अगदी चांगली आहे आणि त्याची नास्तिकता opportunistic वाटत नाही. अगदी प्रामणिक आहे त्यामुळे चर्चा फ़ारच चांगली होत आहे. त्यामुळे एखादा अधिक ऊणा शब्द मी लिहिला असेल तर मी क्षमा मागतो. ही चर्चा अशीच सुरू रहावी हि इच्छा. धन्यवाद.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|