Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 24, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ग्लोबल वॉर्मींग - गंगोत्री वितळते आहे » Archive through June 24, 2007 « Previous Next »

Asami
Thursday, June 21, 2007 - 4:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते विमान etc बाजूला ठेवून ह्याबाबत विचार करायला हरकत आहे का ? जुने काय नवे काय ह्या प्रकार सगळ्यांच्याच मूळावर येणारा आहे. बघा पटत असेल तर.
गंगा

Kedarjoshi
Thursday, June 21, 2007 - 5:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अणूपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे " म्हणजे सगळ्यात छोटे आणि सगळ्यात मोठे
आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की 'ब्रह्मांड' म्हंटले आहे - 'Universe' >>>>>

त्याही खुप आधी कृष्णाने यशोदेला आपल्या तोंडात्च ब्र्म्हांड दाखविल्याचा उल्लेख महाभारतात आहे.
असामी गंगा वाचविन्याचे प्रोजेक्टस केंद्र व उत्तर प्रदेश सरकार ने हाती घेतले आहेत. त्या विषयी मागे कधीतरी एक लेख वाचला होता त्यात बरीच माहीती होती. (ग्लोबल वॉर्मीग सहीत) तसेच आता बहुदा गंगेत प्रेत सोडायला बंदी आहे (निदान कागदोपत्री तरी).


Asami
Thursday, June 21, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार वाइट गोष्ट हीच कि हिंदू धर्माचा उदो उदो करणारेही ह्याबाबत काहीच करत नाहित.

Kedarjoshi
Thursday, June 21, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

You said it.कारण तसा खर्या अर्थाने कोणीही धर्माकडे पाहात नाहीये. त्याला राजकिय जोखडात अडकविल्यामुळे काही नविन करायला गेले की त्याला विरोध होतो.

चांगल्या दृष्टीकोणातुन जर कॉंग्रेस काही करायला गेली तर त्याला भाजपा आडवनार व भाजपा ने काहीही केले की बाकीचे लोक आडवनार. हे एक सर्कल झाले आहे.

काही लोक तरीही प्रयत्न करतात. निदान आपण त्यांना थोडा हातभार लावु शकतो.


Slarti
Friday, June 22, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>वाइट गोष्ट हीच कि हिंदू धर्माचा उदो उदो करणारेही ह्याबाबत काहीच करत नाहित.
असामी, याला अनुमोदन.
तरीही एक प्रश्न पडला. गंगोत्री वितळत आहे ते मुख्यतः भारतात निर्माण होणार्‍या हरितगृह वायुमुळे आहे का ?


Asami
Friday, June 22, 2007 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गंगोत्री वितळत आहे ते मुख्यतः भारतात निर्माण होणार्‍या हरितगृह वायुमुळे आहे का ? >> आता त्यावरून वाद नको. India is emerging powerhouse. Agreed that developed countries are more responsible for GHE, but it's pretty lame excuse for not doing anything in terms of GHE. In fact, Chindia have more responsibility as they can nick the problem before it manifests. शेवटी काय आहे तिथे " तुझे - माझे " करून फ़ारसा उपयोग नाहि कारण कुर्‍हाड पडली तर सर्वांवरच पडणार आहे.

Slarti
Saturday, June 23, 2007 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी, परत एकदा तुझ्या म्हणण्यास अनुमोदन. पण मी तो प्रश्न आपली जबाबदारी झटकण्याच्या उद्देशाने विचारला नव्हता. 'आधी तुमचे उत्सर्जन कमी करा' हे सुपातल्या दाण्यांनी म्हणणे आहे हे लख्ख आहे. पण धोरण ठरवताना काही गोष्टींचा विचार आवश्यक ठरेल.
हरितगृह वायु हा जागतिक प्रश्न आहे. जागतिक राजकीय इच्छाशक्ती निर्माण होऊनसुद्धा हरितगृह परिणाम आटोक्यात आणायला बराच काळ लागेल. शिवाय अगदी देशात जरी बोलायचे झाले तरी या प्रश्नासाठी देशव्यापी जागृती करणे, कायदे करणे, अंमलात आणणे इ.इ. गोष्टी आवश्यक आहेत, जे भारतासारख्या महाकाय, लोकसंपृक्त व विकसनशील देशासाठी अवघड काम आहे. आता जर असे माहिती असेल की गंगोत्री वितळण्यामागे मुख्यतः भारतीय हरितगृह वायूंचा हात आहे तर अशावेळी गंगेच्या धार्मिक महत्वाचा पुरेपूर वापर करून या प्रश्नाविषयी जनजागृती करता येईल. म्हणजे "बाबांनो, जगभरातून हे वायू सोडले जातात, त्याने गंगेच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे" असे लोकांना सांगण्यापेक्षा "बाबांनो, आपण भारतीय एवढा हरितगृह वायु तयार करत आहोत की त्याने गंगेच्या अस्तित्वास धोका निर्माण झाला आहे" हे सांगणे जास्त परिणामकारक ठरेल असे मला वाटते. म्हणून माझा प्रश्न. अर्थात तुम्ही म्हणाल की तसे जरी नसले तरी सांगायला काय हरकत आहे ? पण इथे सरकारला इच्छा नाही हे स्पष्टच आहे. असे काही खोटे सांगून आपली (=प्रश्नाचे गांभीर्य कळालेले लोक) बाजू पक्की राहत नाही, त्यांना (राजकीय पक्ष, सरकार) त्यात छिद्रे काढणे सोपे जाते.


Chyayla
Saturday, June 23, 2007 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाइट गोष्ट हीच कि हिंदू धर्माचा उदो उदो करणारेही ह्याबाबत काहीच करत नाहित.

स्लार्ती, असामी मग हिन्दु सन्स्कृतीचा द्वेश करणारे याबाबतित काय करत आहेत असा प्रश्न साहजिक येतो, अर्थातच वर जे वाक्य लिहिले आहे ते जाणुन्बुजुन लिहिले आहे हे कळतच. अर्थातच हरीत गृह वायु ही केवळ हिन्दुन्ची जबाबदारी नाही.

मुळात ईथे हरीत ग्रृह वायुच्या व पर्यायानी गन्गोत्रीच्या बाबतित हिन्दु धर्माचा उदो उदो करणारे व द्वेष करणारे यान्चा काही सम्बन्ध नाही, त्यामुळे निरर्थकपणे केवळ हिन्दुना नावे ठेवण्याची गरज नाही असे मला वाटते.

नाही केले तरी अपेक्षा करायची व केले तर विरोध करायचा असला दुट्टप्पीपणा उलट इथे रामसेतुच्या निमित्याने दिसुन आलेला आपण पहातच आहोत ना?
मला तुमच्या बद्दल वैयक्तिक नाही बोलायचे पण जे काही विधायक कार्य करतात त्याला स्वता: काहीही न करता केवळ विरोधाकरता विरोध करणे हे काही पटत नाही.

तसे स्लार्तीचे शेवटच्या पोस्टमध्ये तथ्य आहे. कारण सध्याची परिस्थिती तशीच आहे. पण मला एक उदाहरण देउन सान्गायचे आहे की राजकिय इछाशक्ति असेल तर या गोष्टीही शक्य होतात यासाठी... कदाचित भारतातील आतापर्यन्त भ्र्ष्ट राज्यकर्त्यान्मुळे सगळ्यान्चा विष्वास उडाला असेल. पण वाजपेयी सरकार जेन्व्हा होते (मला भाजप म्हणुन केवळ आन्धळे समर्थन करायचे नाही काही झाले तरी ती राजकिय पार्टी आहे पण भ्रष्ट कॉन्ग्रेस समोर काही वेगळे व विकासात्मक बाजु उथळपणे दीसावी म्हणुनही त्यानी केले असेल पण करुन दाखवले हे मात्र खरे.)

या सरकारने देशभर रस्ते, महामार्ग निर्मितिचा जो धडाका लावला, मोबाईल क्रान्ती केली तसेच भारतातील सगळ्या नद्या जोडुन पाणी समस्या निवारणाची जी योजना केली होती व धडाका पहाता तेही अशक्य नव्हतेच.
तर ही उदाहरणे राजकिय पातळीवरही प्रामाणिक इछाशक्ति असेल तर होउ शकते हे सिद्ध झाले आहे.

तसेच जर तुम्हाला नितिन गडकरी यान्चही कार्य आठवत असेल तर त्यानी महाराष्ट्र भर जे रस्त बान्धले तो प्रयोग अप्रतिम होता. मी नागपुरचा असल्यामुळे त्यान्च कार्य प्रत्यक्ष बघण्याचा योग आला होता.

तरी सर्वस्वी सरकारवरही अवल्म्बुन रहावे असे माझे म्हणणे नाही पण सरकार जर सम्वेदन्शील असेल तर सरकार व जनता दोघान्च्याही सहकार्याने कोणतेही कार्य सहज शक्य आहे.





Asami
Saturday, June 23, 2007 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बर बाबा मी असे सुचवतो, प्रत्येक धर्माप्रमाणे लोकसंख्येचे वर्गीकरण करून त्याप्रमाणे GHE ला विभागून त्याप्रमाणे त्यावर नियंत्रण आणले जावे. त्यातही शक्य असेल तर reservations आणले जावे. creamy layer प्रमाणे करता आले तर अजूनही उत्तम. परत गंगोत्री हे हिंदूंना आधिक पूजनिय असून त्याचा र्‍हास होत असल्यामूळे हिंदू GHE साठी minority आहेत असे समजून त्यांना Carbon credits दिले जावेत. सर्वे सुखिन : संतू

माझे Friday, June 22, 2007 - 3:04 pm post एकदा please वाचा , तुमचा धर्माधारीत चष्मा बाजूला ठेवा आणी एकदा विचार करून पाहा. नसेल काढता येत तर कमीत कमी " हिंदूच्या धर्मस्थानाला धोका पोहोचत असेल तर हिंदूंनी त्याबाबत पुढाकार घ्यायला हरकत नसावी " असा विचार करून पहा.
ह्याउप्परही नाही पटले तर सोडून द्या.


Slarti
Saturday, June 23, 2007 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फक्त हिंदूंचा दोष नाही हे खरे, सर्वच लोक कारणीभूत आहेत. ते विधान हिंदूंच्या माथ्यावर खापर फोडण्यासाठी केले असावे असे मला वाटत नाही. पण हिंदुत्ववादी लोक हिंदू धर्माशी निगडीत इतर प्रश्नांकडे ज्या जागरुकतेने बघतात, ती जागरुकता, ती तीव्रता इथे दिसत नाही. हा प्रश्न गंगेचा आहे, म्हणून हिंदू धर्माशी निगडीत आहे. मग केवळ 'त्यात परकीय शक्ती / धर्माचा हात नाही' किंवा 'गंगेवर होणारे परिणाम हे एका झटक्यात दिसणारे नाहीत (उदा. रामसेतू तोडणे)' यामुळे हिंदुत्ववादी संघटनांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष होते असे वाटते. बरे, या लोकांकडे वर्षानुवर्षे चालणारे आंदोलन छेडण्याचे सामर्थ्य नाही असेही नाही. अस्मितेच्या प्रश्नावरून देशव्यापी जागृती करणे हेसुद्धा त्यांनी केले आहे. रामजन्मभूमीच्या प्रश्नाबाबतीत या दोन्ही गोष्टी त्यांनी केल्या आहेत. आता गंगेचे प्रदूषण हा प्रश्नही नवीन नाही. पण तो प्रश्न या संघटनांनी लावून धरल्याचे माझ्या माहितीत तरी नाही. म्हणजे ही जबाबदारी त्यांचीच आहे का ? मुळीच नाही. मी असे म्हणत नाहीये की त्यांनीच हे करायला पाहिजे. कृतीची जबाबदारी सर्वांचीच आहे. मुद्दा असा की अशा प्रश्नांकडे त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष पाहून त्यांचा हिंदुत्ववाद हा केवळ संधिसाधू वाटत राहतो, मतपेटीवादी वाटू लागतो. या उद्वेगातून ते विधान आले आहे (निदान मीतरी तसे समजतो). जबाबदारी ढकलण्यातून किंवा दुटप्पीपणातून नव्हे.

Asami
Saturday, June 23, 2007 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks mate. .. ........

Chyayla
Saturday, June 23, 2007 - 7:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचा धर्माधारीत चष्मा बाजूला ठेवा आणी एकदा विचार करून पाहा

एकदम बरोबर.. पण असामी हे तुम्हाला पण लागु होतय कारण तु जेन्व्हा एखाद्याला धार्मिक चश्म्यातुन धर्माधारीत ठरवतो त्याच चश्म्यातुन तु पण धर्माधारीत किन्वा धर्माविरुद्ध बोलतोय हे लक्षात येतय का? म्हणजे समर्थन करा की विरोध करा धर्माधारीत सम्बन्ध आलाच

पण हिंदुत्ववादी लोक हिंदू धर्माशी निगडीत इतर प्रश्नांकडे ज्या जागरुकतेने बघतात, ती जागरुकता, ती तीव्रता इथे दिसत नाही

रामसेतुच्या बाबतित केवळ धर्मच आहे असे नाही त्यामागे नैसर्गिक, भौगोलिक, देशाची सुरक्षितता हेही मुद्दे आहेत मग अशा प्रश्नान्कडे जागरुकता, तीव्रता कमी हे कशावरुन?
मुद्दा असा की अशा प्रश्नांकडे त्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष पाहून त्यांचा हिंदुत्ववाद हा केवळ संधिसाधू वाटत राहतो, मतपेटीवादी वाटू लागतो

तुम्हालाही उद्वेग येतो हे पाहुन आश्चर्य वाटतय. माझाही समज आणी उद्वेग आहे नव्हे खात्रीच आहे जर हा गन्गा प्रदुशणाचा मुद्दा जर हिन्दु सन्घटनान्नी काढला असता तर रामसेतू प्रमाणेच याला पण बेम्बीच्या देठापासुन विरोध केला असता. मग गन्गा पवित्रच कशी? ती स्वर्गातुनच कशी आली? यामुळे स्थानिक लोकान्चा विकास खुन्टतो गावातले, कारखान्यान्चे सान्डपाणी कुठे जाणार मग ते घाण रहातील, शिवाय गरीबान्चे उद्योगही जातील असे एक ना अनेक प्रश्न तुम्हीच निर्माण केले असते. हे अगदी हास्यास्पद वाटतय ना? पण तुम्ही जर रामसेतू वरचे विरोधकान्चे मुद्दे वाचले तर हे लक्षात येइल.

बाकी मतपेटी वैगेरे जे म्हणताय त्याबाबत केदारनी जे म्हटले ते पटतेय. अरे बाबा राममन्दीराच्या बाबतित हिन्दुन्चा कैवार घ्यायला कोणीच नव्हते आले निदान ते आले तरी त्यात राजकिय फ़ायदा ओढुन नाही घेतला तर कसच नवल. माझे म्हणणे आहे की कुणीही यावे राष्ट्रीय अस्मितेसाठी समर्थन जरुर मिळेल. एवढच काय गन्गा प्रदुषण मुद्दा काढाच पहा तुम्हाला समर्थन मिळते की नाही. पण एक लक्षात ठेवा गन्गा प्रदुषण व ईतर प्रदुषण नियन्त्रण यासाठी सरकारचेही सहकार्य तेवढेच आवश्यक आहे. तरी भाजपच आणी सन्घच कशाला कोणीही पुढे यावे त्याला ना नाही फ़क्त उद्देश प्रामाणिक असावा.

खरे तर दुसर्याला उपदेश देण फ़ार सोपे आहे हे करा ते करा आणी जरी केले तर विरोधही करायचा याला मी दुट्टप्पीपणा म्हणतो... बरे ठीक आहे हा मुद्दा तुम्ही काढा तुम्हाला पुर्ण समर्थन. बरे असे तर नाही हा मुद्दा हिन्दु सन्घटनानीच काढायला पाहिजे.

गन्गा प्रदुषण नियन्त्रणासाठी तशीही आन्दोलनाची गरज नाही, गरज आहे ती कृतीची, सरकारच्या इछाशक्तिची त्याला जर कुणी हिन्दु सन्घटनानी विरोध केला तर मग बोला व तेन्व्हा मात्र हिन्दु सन्घटनाना दोश जाइल... व तुमच्या बोलण्याला काहीतरी अर्थ राहील. तुम्ही एकप्रकारे दीशाभुल करत आहेत अस स्पष्ट जाणवतय. याउपरही तुम्हाला केवळ हिन्दु सन्घटनान्च्याच नावाने खडे फ़ोडायचे असतील तर माझा काही ईलाज नाही.






Asami
Saturday, June 23, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गन्गा प्रदुषण नियन्त्रणासाठी तशीही आन्दोलनाची गरज नाही, गरज आहे ती कृतीची, सरकारच्या इछाशक्तिची >>भल्या माणसा कमित कमी माझी link कशासंबंधात आहे ते वाचायचे तरी कष्ट घे एव्हढी मोठी posts लिहिण्यापूर्वी.


Slarti
Saturday, June 23, 2007 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कैक वर्षांपासून या देशातील पर्यावरण संघटना गंगाप्रदूषणाचा प्रश्न काढत आहेत. असामीने दिलेल्या बातमीत तर याविषयी काम करणार्‍या लोकांची / संघटनांची नावेही दिली आहेत. लोक बर्‍याच काळापासून आवाज उठवत आहेत. त्यांना भाजप आदी पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे का ? संसदेत त्याविषयी किती प्रश्न विचारले आहेत ? कसा पाठपुरावा केला आहे ? त्यांचे या प्रश्नांसंबंधी धोरण काय (काही असलेच तर) आणि त्यांच्या जाहिरनाम्यात ते अंतर्भूत आहे का ? हे त्यांच्याकडूनच नव्हे तर सर्वच पक्षांकडून अपेक्षित आहे. पण ते बाकीचे पक्ष हिंदुत्ववादी नाहीत. हिंदुत्ववादी पक्षांनी हे न करणे म्हणजे धर्मनिरपेक्ष तत्वावर उभ्या राहिलेल्या एखाद्या पक्षाने 'आम्ही फक्त हिंदु व इस्लाम यांचाच विचार करू' असे म्हणण्यासारखे आहे (पक्षाच्या धोरणात सुसंगती हवी). म्हणजे ज्यांच्या लेखी या प्रश्नाचे महत्व केवळ अनन्यसाधारण असावे ( because it is their core principle ) ते हिंदुत्ववादी पक्ष हे करत नाहीत (माझ्या माहितीप्रमाणे), त्यामुळे त्यांची हिंदुत्ववादाची जी भूमिका आहे तिच्या सातत्याबद्दल (= consistency ) व प्रामाणिकतेबद्दल शंका येते. (आता हे कोणातच नाही, त्यांनाच का दोष द्यावा म्हणा !! ) लोक काम करत आहेत, आवाज उठवत आहेत, मग तिकडे लक्ष देऊन रामसेतु, रामजन्मभूमीप्रमाणे देशजागर का होत नाही ? परत हे तत्व या संघटनांच्या गाभ्याशी आहे हे लक्षात घेतले तर हा सातत्याचा अभाव अधिकच खटकतो. ठिक आहे, आता गंगा आणि गंगोत्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न उपस्थित झाला आहे, बघू कोण पक्ष काय भूमिका घेतो ते.
रामसेतूला कैक पैलू होते हेही खरे. पण मुख्य मुद्दा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा होता.
या वादात भाजप आदी चूक व काँग्रेस बरोबर हा आवेश मुळीच नाही. उणीवा सगळ्याच पक्षांत आहेत. विशेषतः या बाबतीत तर कोणालाच काही घेणेदेणे नाही. पण माझ्या विचारांत जर एखादी उणीव असेल तर तिचे निराकरण दुसर्‍याच्या विचारांतील उणीव दाखवून कसे करता येईल ? 'तुम्ही म्हणता ते काँग्रेस वगैरे तरी कुठे करतात' हा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून हे स्पष्ट केले.


Slarti
Saturday, June 23, 2007 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामीला परत एकदा अनुमोदन
असामी, sorry , तू उपस्थित केलेल्या प्रश्नाला फाटे फोडायचा माझा उद्देश नव्हता. पण मी चुकून तेच केले आहे असे दिसते. क्षमस्व.


Chyayla
Saturday, June 23, 2007 - 8:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी मी तु दीलेली लिन्क वाचलेली आहे. आणी गन्गा प्रदुषण त्याची गम्भिरता मलाही कळते आणी माझा त्याला अजिबात विरोध नाही, उलट समर्थनच आहे.

पण या आडुन तुझे आणी स्लार्तीचे हिन्दु सन्घटनान्च्या नावाने खडे फ़ोडायचे प्रयत्न चालु आहे त्याबद्दल मी म्हटले यात माझे काय चुकले? आणी हो त्यासाठीच मी Argument करत आहे. विरोध नाही.

हिन्दु धर्माचा उदो उदो करणारे... हे अनावश्यक वाक्य तुझेच आहे ना? याला मी खोचकपणा म्हणतो तुला ती पोस्ट उडवायची असेल तर जरुर उडव. त्यावरती मग माझ्या पण पोस्ट उडवल्या तर माझीही हरकत नाही.

असामी मला हेच म्हणायचे आहे की एखादा मुद्दा प्रामाणिकपणे मान्डायला काय हरकत आहे त्यात उगाच कोणाला एकान्गीपणे दोष देउन जबाबदारी झटकण्यात काय अर्थ आहे.

स्लार्ती मुद्दा गन्गा प्रदुषणाचा नाहीये माझे पोस्ट नीट वाच मला वाटतय असामी व स्लार्ती तुम्हा दोघानाही गन्गा प्रदुषणाच्या प्रश्नापेक्षाही त्याच्या गम्भिरतेकडे बघण्यापेक्षाही हिन्दु सन्घटनान्च्या नावाने खडे फ़ोडण्यात जास्त रस दीसतोय त्याबद्दल मला आक्षेप आहे. निदान तुमच्या सगळ्या पोस्ट मधुन तरी हाच सुर निघतोय

स्लार्ती, जर हिन्दु सन्घटनान्च्या नावाने खडे फ़ोडायचे तर गन्गा प्रदुषणच कशाला हवे असे कित्येक मुद्दे निघु शकतात हे लक्शात घे.


Asami
Saturday, June 23, 2007 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाउ तू खरच माझी post वाचली आहे असे मला दिसत नाही. Did you at least read the title, maybe ?

It is not about Ganga pollution . This is much more beyond that. Global Warming is extremely serious issue which goes beyond any race, religions, country etc. सध्या तरी त्याबद्दल फ़ारसा awareness दिसत नाही. त्या प्रश्नाची व्याप्ती जेव्हढी आहे तेव्हढा तरी नक्कीच नाही. ज्या issue मुळे येत्या काही वर्षांमधे राष्त्रेच्या राष्ट्रे उद्धवस्त होणार आहेत त्याप्रमाणात त्याबाबत काहीच होताना दिसत नाही. त्यासंबंधी उपाय शोधणे आणी कमीत कमी त्यावर control ?? ठेवणे ह्याद्रुष्टीने ज्या प्रयत्नांची गरज आहे ते दिसत नाहीत. chinindia सारख्या विकसनशील देशांनी त्याला developed vs developing असा नवीन फ़ाटा फ़ोडलाय. तो कितपत बरोबर आहे मुद्दा बाजूला ठेवू.

हिंदू धर्माची नीव मानल्या जाणार्‍या गंगेचे अस्तित्व ह्या GHE ने धोक्यात आले आहे. अशा वेळी कमीतकमी हिंदुत्ववादी संघटनांनी तरी ह्याबाबत आवाज उठवायला काय हरकत आहे ? Agreed that everyone should be involved in irrespective of relgeion etc but someone has to take initiative to generate mass scale propaganda. Who would be better candidate to do so using angle of Hinduism and gangaa. Think about awareness it can generate when someone says Ganga Khatareme. अयोध्या , रामसेतू एव्हढाच किंवा त्याहूनही मह्त्वाचा असा हा issue आहे. ते करत नाही म्हणून आम्ही का करू ह्याने नुकसान कोणाचे होणार आहे हे येणारा काळच देईल. hi.ndUism हे core identity असणार्‍या एकातरी पक्षाचे ह्याबाबत केलेले काम मला दाखव , म्हणजे तुला माझ्या post मधला उद्वेग कळेल. हिंदू धर्माला पुजनिय गंगा वाचवा अशी अपेक्षा simi, huriyat नि जमाते इस्लामी etc कडे करायची का ?

Hope this clears the point. And you are saying ...... ?


Chyayla
Saturday, June 23, 2007 - 9:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विकसन्शील देशांनी त्याला developed vs developing असा नवीन फ़ाटा फ़ोडलाय

अगदी मान्य हे एक Global Politics सुरु आहे अमेरिका व ईतर विकसित राष्ट्रे विकासाच्या, समृद्धीच्या नावाखाली प्रदुषण थाम्बावायला तयार नाही तर ते नाही थाम्बवत तर आम्ही का म्हणुन थाम्बवावे अशा दुष्टचक्रात सगळे जग अडकले आहे पण त्यात नुकसान होते अख्या जगाचे, निसर्गाचे व सम्पुर्ण मानव जातच धोक्यात आली आहे?

प्रदुषणाव्यतिरिक्त युद्धे, हिन्साचार, दहशतवाद, शस्त्रस्पर्धा, Nuclear weapon अजुन काय काय ते? ह्यातले सगळेच धोके फ़ारच गम्भीर आहेत.

असामी, You said it तु शेवटच्या पोस्ट मधे हिन्दु सन्घटनान्कडुन या चान्गल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली त्यातच तुझा विश्वास दीसुन आला... अरे असे बोलणे कुठे आणी उदो उदो करणारे... म्हणुन खोचक बोलणे कुठे यात फ़रक आहे. शब्दानी पुर्ण अर्थच बदलतो व उगाच वाद होतो तो टाळला तर चर्चा प्रामाणिकपणे चालु राहील हे निश्चित

आणी मला नाही वाटत की ही बाब त्यान्च्या लक्शात आणुन दीली, याबद्दल जाणीव निर्माण केली तर ते करणार नाहीत, त्यामुळे आधीपासुनच ते करत नाही असे म्हणुन फ़ाटे फ़ोडण्यात अर्थ नाही, पण ईथे केवळ एकाच सन्घटनेनी पुढाकार घेतल्यानी जास्त निश्पन्न निघायची अपेक्षा नाही कारण यात केवळ हिन्दुच नव्हे तर, धर्म, समाज, देश याच्याउपर जाउनही सम्पुर्ण मानवजातीनी एकत्र येउन उपाय करायची गरज आहे.

कदाचित वसुधैव कुटुम्बकम, सर्वेपी सुखीना: सन्तु अशी सन्स्कृती जपणारे हिन्दुत्व (वाद नव्हे) जर जगात पसरले तर हे शक्य होइल. पण त्या आधी स्वता:चेच घर ठीक करणे याला जास्त महत्व आहे. काय बरोबर ना? (आणी यात धार्मिक चष्मा वैगेरे काही नाही ही आहे सन्स्कृती, नाहीतर मला परत धार्मिक चश्मा लावला असे म्हणशील आणी मग काय बोलणेच खुन्टले.)

तुला माहित असेल की वक्त्याने गावातले अर्धे लोक वेडे म्हणु नये, म्हणावे तर या गावातले अर्धे लोक शहाणे नाहीतर पब्लिकचा मार खाशील राजा. शेवटी काय शब्दाला महत्व... आले का लक्षात



Slarti
Saturday, June 23, 2007 - 9:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

exactly. त्यांना हिन्दुत्ववादी संघटना म्हणून देशव्यापी जनाधार आहे, तेव्हा गंगा / गंगोत्री चा वापर करून त्यांना उत्तम जागृती करता येईल असे वाटते - केवळ नदीबाबतच नव्हे, तर एकूणच हरितगृह परिणामाविषयी. राष्ट्रीय स्तरावरची संघटना म्हणून त्यांच्याकडे जनजागृतीसाठी आवश्यक सर्व गोष्टी आधीपासुनच उपलब्ध आहेत, जे इतर कुठल्याही स्वयंसेवी संघटनेकडे, व्यक्तीकडे नाहीत. त्यामुळे त्यांनी या प्रश्नाला हात घालणे सर्वात जास्त परिणामकारक ठरेल.


Chyayla
Saturday, June 23, 2007 - 11:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी व स्लार्ती मी थोडा Google वर शोध घेतला आणी विहिप ची एक शाखा गन्गा रक्षा समिती चे कार्य निदर्शनास आले. ही एक लिन्क मिळाली त्यातली ही माहिती.

http://www.gangotri.org/Ganga_Action_Plan.html

The Ganga Action Plan envisaged cleaning the river naturally by releasing 30,000 turtles to feed on the organic waste and corpses, but did not account for poachers nor take any steps to involve the police or forest guards. Instead of lamenting at the failure of the official machinery - after all, we are the vote banks of this democracy! – this is an excellent instance that shows how change must involve the community and that local initiative is key to all progress. NGOs and religious organisations like Eco-friends, Sri Ganga Raksha Samiti and the Sankat Mochan Foundation are likewise working with people to remedy the wrongs.

A Religion-Environment Confluence was held at Prayag during Ardha-Kumbha, organised by Eco-friends in 1995, as also a Save Ganga Cycle Rally led by Sunderlal Bahuguna. Eco-friends also mobilised the Dom community, which works on cremation grounds, to help retrieve bodies from the Ganga. This was complemented by initiatives like the Ganga Conservation Awareness Trip from Kolkata to Hyderabad in 1997 organised by the Sri Ganga Raksha Samiti. In July 2000, another yatra took place from Haridwar to Delhi. Sadhus and saints such as Jagadguru Swaroopanand Ji and Chinmayanand Ji used their position and religious eminence to appeal to the people and communicate the importance and urgency of the issue. The Swatcha Ganga Chhatra Sangam organised in 2002 enlists the help of Varanasi's school children... cont.

अर्थातच हे प्रयत्न अपुरे आहेत पण कुठे तरी सुरुवात झाली आहे आणी हिन्दु सन्घटना याही बाबतित जागृत आहेत याच समाधान वाटत.

खरे म्हणजे हिन्दुन्नीच गन्गे मधे अर्धवट जळालेले शव फ़ेकणे, सान्डपाणी सोडणे हे सगळे टाळले पाहिजे. याशिवाय कानपुरच्या चर्मोद्योग कारखान्यातुनही खुपच प्रदुषण गन्गेमधे प्रवाहित केल्या जाते या सगळ्यान्वर कडक कायद्याने बन्दी घालावी.

राजीव गान्धीच्या काळात हे काम सुरु झाले खरे पण तीच लालफ़ितशाही व इछाशक्तिचा अभाव यामुळे हा प्रकल्प अपयशी झालेला दीसतोय. आणी GHE चे म्हणशील तर मला नाही वाटत ही जागतिक समस्या या सन्घटनान्च्या आवाक्यात येइल.


Chyayla
Sunday, June 24, 2007 - 12:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्लार्ती तु समजतोस तेवढ सोपे काम नाही. माझा स्वता:चा अनुभव आहे. हजारो वर्शाचे सन्स्कार, गुलामी यातुन समाजाला बाहेर काढायलाही १,२ पिढ्या अजुन जातील.

नागपुरला सन्घाने जगद्गुरु शन्कराचार्याच्या हस्ते बाबासाहेब आम्बेडकरान्च्या पुतळ्याला माल्यार्पण केले. किती हिन्दुन्नी जातियवाद सोडला असे वाटते.

अरे या सन्घटनान्ची अर्धी शक्ति हिन्दुन्नाच खरे हिन्दुत्व शिकवण्यात खर्ची होती. ईतर विरोधकान्च्या प्रचारामुळे त्याना असे वाटते की हे मुस्लिमविरुद्ध आहे की काय? म्हणजे त्याला हिन्दुत्व समजायचे काय? एवढच जर असत तर या देशात कित्येक राष्ट्रीय पक्ष आहेत त्यात जास्त प्रमाणात हिन्दुच आहेत ना? पण ईतक्या लवकर त्यान्च्यात फ़रक पडनार आहे का? स्वार्थान्ध, सत्तान्ध झालेले हिन्दुच आहेत ना जे याना विरोध करतात. मुलायमसिन्ग, अर्जुनसिन्ग, लालु व बन्गालातले कम्युनिस्ट हे सगळे हिन्दुच आहेत ना. हा हिन्दु समाजाला एक शापच आहे. त्यामुळे अशा लोकानमधे जागृती निर्माण करणे किती कठीण काम असेल याची कल्पाना येउ शकेल.

एवढच काय आज विहिपने देशभरातील सन्त, साधु यान्चे एकत्रीकरण देशकार्यासाठी केले ते तर फ़ारच कठीण आहे. एका सभेत सगळे आखाड्याचे साधु जमले होते आता त्याना व्यासपिठावर बसवायचे तर प्रश्न निर्माण झाला कोणाला कुठे बसवावे कारण हे अखाड्याचे साधु अतिशय अहन्कारी असतात व एक दुसर्यान्च्या मधुन विस्तवही जात नाही मग युक्ति अशी काढण्यात आली की सगळ्याना अर्ध गोलाकार असे व्यासपिठावर बसवाव नाहीतर त्यान्चे चेले चपाटे लगेच भडकुन जातात.

विहिपचा घर वापसी प्रकल्प ज्यात हिन्दु धर्मातुन गेलेल्याना परत हिन्दुत आणणे त्यासाठी ते आधी हिन्दुनाच आवाहन करतात की दुसर्या धर्मातुन येणार्या व्यक्तिला स्विकारा तो बाटला म्हणुन परत येउ शकत नाही असे नाही, किती लोक ऐकत असतील असे वाटते पण प्रयत्न सुरु आहेत.
सरस्वती शिशु मन्दिरच्या माध्यमातुन, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातुन वनवासी व गरीब दलीत समाजात शाळा, अनाथालय चालवली जातात त्यासाठी ते Retired झालेल्या दम्पतिना आवाहन करतात पण ते प्रयत्न ही अपुरे पडतात.

लोकान्ची मानसिकता ईतक्या सहजासहजी नाही बदलत. माझा स्वताचा अनुभव मी दलित वस्तित रहायचो पण जसे अत्याचार पुर्वी दलितान्वर व्हायचे म्हणुन ऐकले तसे अत्याचार उलट आमच्याच वर झालेत अगदी घरावर दगडफ़ेक, घरासमोर येउन शिव्या देणे, एकदा तर माझे कपाळच फ़ुटले होते दगड लागल्याने. मला वास्तविक पहाता किती राग, द्वेश यावा आणी बालसुलभ असल्यामुळे मला खरच राग यायचा मी बाबासाहेबान्चा पण राग करायचो पण जेन्व्हा कॉलेज मधे गेलो तेन्व्हा अभाविप च्या एका कार्यक्रमात बाबासाहेबाना माल्यार्पण करायला गेलो होतो अगदी मनाच्या विरुद्ध तेन्व्हा त्या शिबिराच्या सन्चालकानी मला समजावुन सान्गितले. शिवाय एकदा शाखेत एका दलीत विचारवन्ताचे पण भाषण झाले त्यान्नी ही दलिताना समजावुन घ्या त्यान्च्यावर काय बेतले आहे याची कल्पना करा असे सान्गितले तेन्व्हा पासुन माझी मानसिकता बदलली पण ही बदलायला खुप वेळ लागला. मी या बद्दल थोडे फ़ार "बौद्ध धर्मान्तर का व कशासाठी" या BB वरही याच अनुभवातुन लिहिले.

तर सान्गायचा मुद्दा असा की या सन्घटनान्चे विधायक कार्यही विना प्रचार सुरु असते, पण ते कार्य किती कठीण आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आल्याशिवाय नाही कळणार. त्यामुळे ईतराना दोष देण्यापेक्षा हिन्दुनमधलेच दुर्गुण काढणे किती कठीण काम आहे परन्तु सुरु आहे यातच समाधान. पण हिन्दु समाजाचे हे सगळे दुर्गुण आईच्या मायेनी पदरात घेउन शिवाय हिन्दु विरोधकानाही वेळ पडली तर उत्तर देउन रक्षण करुन अभिमान जागृत करणे हे कोण समजुन घेतो.

त्यामुळे मी ईथे जे काही लिहितोय ते पुर्ण अनुभवातुन व पोटतिडिकितुनच लिहित आहे. तरी तुम्ही त्याला समजुन घ्याल अशी अपेक्षा करतो.







Chyayla
Sunday, June 24, 2007 - 1:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी व स्लार्ती च्या पोस्टची वाट पहात होतो, विजय सायबाच काय ते हे असले चावुन चोथा झालेले मुद्दे त्याला सडेतोड उत्तर मिळुनही परत परत काढतच असतात. आता बघा थोड्या वेळाने सतिप्रथेचा मुद्दा काढतिल त्यान्च काही मनावर घेउ नका.

स्लार्ती तु म्हणाला होतास की एका तरी हिन्दुत्ववादी सन्घटनेच नाव गन्गा प्रदुषण नियन्त्रणामधे नाही पण थोडा शोध घेतल्यावर तेही मिळाले पण मग त्यावर तुमची कोणाचीच प्रतिक्रिया नाही. निदान तुम्ही अजाणतेपणी नावे ठेवलीत आता चान्गल्या कामाबद्दलही बोलाल असे वाटले होते... असो बाकी चालु द्या. माझ्या माहितिप्रमाणे असे बरेच प्रकल्प कित्येक क्षेत्रात आहेत जे हिन्दु सन्घटना राबवत आहेत.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators